जर तुम्हाला तुमचं वय माहीत नसेल, तर तुम्ही किती वर्षाचे असाल??


हे इतकं मोठं आगगाडीच्या सारखं लांबच लांब शीर्षक पाहून आश्चर्य वाटलं असेल नाही -किती साधा प्रश्न?  पण उत्तर   इतकं साधं सोपं आहे का?? आपलं नेहेमीचं वागणं हे आपल्या वयाला धरून असतं का? याचं उत्तर मिळालं की ह्या प्रश्नाचं उत्तर पण मिळेल. परवाच सलील ने  एक मेसेज पाठवला, त्या मधे हे वाक्य होतं, खूप आवडलं म्हणून त्यावर हे पोस्ट!

लग्नानंतर आजही जेंव्हा एखादी आजी लग्नातला शालू (५०- ५५ वर्षापूर्वीचा) काढून बसते, आणि त्यावरून हात फिरवते, तेंव्हा तिच्या डोळ्य़ातले भाव पाहिले की जाणवते, ते ७५ च्या स्त्रीच्या डोळ्यातले नाही तर  एखाद्या विशीतल्या मुली सारखे दिसतात. खरं की नाही?   म्हणजेच वयाच्या ७५ व्या वर्षी पण ती आजी  जेंव्हा त्या शालू वरून पुन्हा एकदा हात फिरवते तेंव्हा ते  “विशीतल्या” त्या काही “स्वप्नील  क्षणांना”   पुन्हा  एकदा जगायचा प्रयत्न करत असते.

एखादी मुलगी १४-१५ वर्षाची झाली की बाहूलीशी खेळणं  स्वतःला खेळणं आवडत असले तरीही लोकं काय म्हणतील म्हणून सोडून देते. पण   आपल्या सगळ्या बाहूल्या, खेळ भांडी, आणि इतर वस्तू  सांभाळून ठेवते. नंतर एखाद्या दिवशी वयाच्या तिशीला पोहोचल्यावर जेंव्हा ती खेळणी आपल्या ३-४ वर्षाच्या मुलीसाठी   काढते  ,तेंव्हा ती मुलीच्या स्वरूपात स्वतःचं लहानपण    पुन्हा एकदा जगायचा प्रयत्न करते . लहानपणी ती स्वतः त्या खेळण्याशी जशी खेळायची तशी खेळायला शिकवते मुलीला.

मला हे तर अजूनही न सुटलेलं कोडं आहे, की प्रत्येक आईला  किंवा वडीलांना आपल्या लहानपणीच्या खेळण्यांशी आपल्या मुलांनी खेळावं असं का वाटत असतं?? मानवी स्वभाव, बहुतेक   आपल्या खेळण्यांशी खेळताना बघून पुन्हा एकदा आपलं लहानपण एंजॉय करत असेल ती!

मी पण स्वतः जेंव्हा रस्त्यावरच्या पाणीपुरीवाल्या समोर उभा राहुन आपल्याला कोणी पहात नाही याची खात्री करून घेऊन पाणी पुरी खातो, तेंव्हा मी पण १५-१६ वर्षाचा  असतो. फरक इतकाच, की लहान असतांना ’पैसे कुठून आणले ?’म्हणून कोणी ओळखणार भेटलं तर विचारेल ही काळजी असायची, आज कोणी ’असा कसा कुठेही खातोस?’ म्हणून विचारेल ही काळजी असते. स्वच्छता वगैरे सगळ्या गोष्टींकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून पाणीपुरी खातो तेंव्हा मी नक्कीच १४-१५ चा असतो.

उन्हाळा आलाय, बायको कैरी च्या फोडी करून ठेवते, आणि लोणचं घालायची तयारी करते, तेंव्हा हळूच एक कैरीची फोड उचलून दाताखाली चावयची इच्छा होते,  आणि ती फोड जेंव्हा मी खातो , तेंव्हा ७-८ वर्षाचा असतो, पण दातांना कळ लागली की ताबडतोब खऱ्या शारिरीक वयाची जाणीव होते. 🙂

कधी नागपूरला गेलो की आई कडे अजूनही गव्हाच्या कुर्डया जेंव्हा वाळत घालायला ठेवल्या असतात तेंव्हा ती किंचित ओलसर कुर्डइ नुसती खातो तेंव्हा , किंवा पापडाची लाटी नुसतीच खातो तेंव्हा मात्र मी पुन्हा १०-१२ वर्षाचा होऊन आपल्या लहानपणात रमलेला असतो. आई जेंव्हा, ” अरे आता दोन पोरींचा बाप  झालास, आता तरी  हात धुऊन खा, म्हणते, तेंव्हा एकदम आजच्या वयाच्या ब्रॅकेट मधे पोहोचतो.

कधी तुम्ही  फिरायला निघाला आहात, एखादी खूप सुंदर मुलगी दिसते, तिच्याकडे पुन्हा पुन्हा पहावस वाटतं, तेंव्हा तुम्ही  वयाच्या विशी -पंचविशीतले  असता. पण त्या मुलीच्या ठिकाणी आपल्या मुलीचा चेहेरा दिसू लागला की लगेच आपलं   वय आठवतं.

याच्या विशी – पंचविशीत  असतांना एखादी सुंदर मुलगी दिसली तर तिच्याकडे पहावं वाटणं साहजिक असतं, काही गोष्टी ठरावीक वयातच शोभून दिसतात याची जाणीव आपल्या सबकॉन्शस माईंडला पण असते. आणि तीच गोष्ट  जर प्रौढ वयात केलं तर ती एक विकृती समजली जाईल याची एक पुर्ण जाणीव असते मनाला,आणि म्हणूनच तुमचं मन तुम्हाला  योग्य वेळी तुमच्या योग्य त्या वयाच्या ब्रॅकेट मधे बसवतं.

जर तुम्हाला तुमचं वय किती आहे हे माहीत नसेल , तर तुम्हाला  स्वतःलाच जाणीव होईल की आपण किती वेगवेगळ्या ’वयाच्या ब्रॅकेट्स ’ मधून दररोज जात असतो. एखादा मुलगा विटी दांडू खेळतांना दिसला , की त्याच्या हातून एक टोला मारायला दांडू घेतो, किंवा एखादा मुलगा गच्चीवर पतंग उडवत असेल तर त्याला जेंव्हा अरे डाव्या बाजूला कन्नी बांध म्हणून सांगतो तेंव्हा नकळतच ’त्याच्या वयाच्या’ आसपासच्या वयात आपण जाऊन पोहोचतो.

बायको स्वयंपाक करत असतांना, तिचं लक्ष नाही असं पाहून एखादं भजं  जेवायला बसण्यापूर्वी (तिच्या , अरे असं करू नकोस, पुन्हा जेवायला बसला की व्यवस्थित जेवणार नाहीस, आणि मग पुन्हा दुपारी काहीतरी कर म्हणून मागे लागशील ह्या अशा किंवा तसंच काही तरी बोलण्याकडे दुर्लक्ष करून  हळूच खातो, तेंव्हा एक व्रात्य मुलगा माझ्यातला जागा झालेला असतो, आणि तेंव्हा मी १३-१७वर्षाचा असतो.   माझ्यातल्या त्या व्रात्य मुलाला  खूप आनंद होतो असं काही करायला.

दुकाना मधे गेल्यावर गरज नसतांना बऱ्याच गोष्टी विकत घेतो तेंव्हा पण पुन्हा मी ’लहानच’ झालेला असतो. चिक्की, चिवडा, चकली, बाकरवडी   अशा अनेक वस्तू मी   घेतो ,  नंतर बायको काउंटर वर गेल्यावर बिल बनवतांना त्यातल्या अर्ध्या( खास नजरेने माझ्याकडे बघत )  वस्तू कमी करते, तेंव्हा मी पुन्हा ’मोठा’ होतो!

डायटींग सुरु आहे, म्हणून बायकोने गोड खाऊ नको म्हंटल्यावर पुन्हा तिच्या नकळत गोड खातांना मी पुन्हा लहान झालेला असतो. दिवाळीच्या वेळेस घरी  आकाशकंदील बनवतांना, एखाद्या तलावा शेजारी उभा असताना समोर हातातला दगड पाण्यावर ३-४टप्पे घेऊन जाईल असे   नेहेमीच  फेकतांना,  मी पुन्हा वयाच्या १५-१७ या वयात असतो. मला वाटतं , की मोठं झाल्यावर  वयाचा हा पिरियड खूप जास्त लक्षात रहातो आपल्या.

समुद्रावर फिरायला गेलो, आणि एखादा लहान मुलगा किल्ला वगैरे बनवतांना दिसला, की त्याच्याबरोबर बसून जेंव्हा मी पण किल्ला बनवतो, तेंव्हा किंवा  शेजाऱ्याची दीड वर्षाची लहान मुलगी बायको  घरी घेऊन येते, आणि तिला कडेवर घेऊन फिरतांना  तिच्या जावळांचा, जॉन्सन बेबी पावडर चा सम्मिश्र वास जेंव्हा येतो तेंव्हा  मी पुन्हा आपल्या तिशी मधे पोहोचतो. 🙂 आणि   आपल्या मुलींचं  हरवलेलं लहानपण पुन्हा आठवत असतो.

बायकोने आजपर्यंत हज्जार वेळा सांगून झालंय, की बाहेर गेल्यावर तरी कमीत कमी हाताने भात खाऊ नकोस म्हणून. पण मी मात्र चमच्याने भात खाणं कधीच एंजॉय करू शकत नाही. उन उन वरण भात कालवताना  हात किंचित पोळले की मला खूप आवडतं, आणि  मी पुन्हा लहानपणात पोहोचतो,   पण बरेचदा  हॉटेल मधे वगैरे गेल्यावर सभोवतालच्या लोकांची जाणीव  होत नाही, आणि नकळत हातानेच भात खाणं सुरु करतो. पण नंतर लक्षात आलं, की पुन्हा सरळ चमचा उचलून खाण सुरु करतो .:(

आपलं आयुष्य हे असंच असतं. जितकं आयुष्य आपण जगलो आहोत, त्याच्या आठवणी   मनात कुठेतरी सुप्त स्वरूपात द्डलेल्या असतात, आणि आपण आपल्या रोजच्या जीवनात “त्याच आठवणी ” पुन्हा पुन्हा जगण्याचा प्रयत्न करतो. हे करत असतांनाच  “आजच्या दिवसाची” पण ’एक नवीन आठ्वण’ तयार होतंच असते, पुन्हा काही वर्षानंतर जगायला..

खरं वय योग्य त्या वेळी आठवलं नाही तर काय होईल आपल्या आयुष्याचं ह्याची कल्पनाच करवत नाही. आजचं  आयुष्य आपण जगतो  केवळ काही आठवणी तयार करायला, ते उद्या कधी तरी पुन्हा जगायला म्हणून. आजचं आयुष्य आजचं म्हणून न जगणं   हा म्हणजे मानवी स्वभाव!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged , , , , . Bookmark the permalink.

71 Responses to जर तुम्हाला तुमचं वय माहीत नसेल, तर तुम्ही किती वर्षाचे असाल??

 1. s.k. says:

  uttam lekh kaka… vichar sahaj ani saral bhashet mandlet…
  mi kahi kaka evdhi mothi zaali naahi pan ek vichar manat aalaa tumcha lekh vachun….

  vay vadhla manun koni mhatara hot nahi…. you are as young as u feel… lapun bhaji khana kinva so calld mulanche vagna mothyani kela tar tyat kaay chuk???
  🙂

  • सीया
   सहजच मनात येईल ते लिहीत गेलो.
   वय वाढलं म्हणून कोणी म्हातारा होत नसतो.. 🙂
   प्रत्येकच माणूस आपले ’जुने चांगले क्षण’ पुन्हा पुन्हा शोधण्याचा प्रयत्न करत असतो.

 2. राजे says:

  राजे लोकांना वय नसते मालक !
  बाकी आई आजच सांडगे घालत होती.. व जाऊन मी मध्ये मध्ये खाऊन येत होतो 😀

  • राजे लोकांना वय नसते !! 🙂
   😀
   राजे लोकं चीरतरूण असतात, त्यांनी कसंही वागलं तरीही चालतं!

 3. kanchan says:

  खरे आहे हो, मी तर जेव्हा आपण वर्ल्ड कप ची म्याच जिंकलो तेव्हा मी अगदी लहान मुलासारखी, वेड्यासारखी टाळ्या वाजवून एकटीच घरात जोरात उड्या मारत नाचत होती १०-१५ मिनिटे, जेव्हा सासू ओरडली अग बस किती नाचशील? तेव्हा लक्षात आले कि लग्न झाले आहे म्हणून 😀

  • कांचन
   🙂 असं होणं साहजिक आहे. ती तर एक ऐतिहासिक घटना होती. मानवी स्वभावच आहे की आनंदाच्या क्षणी वय विसरायला लावतो, आणि पुन्हा आपल्या बालपणात निर्भेळ आनंद उपभोगायला घेऊन जातो.

 4. suma kulkarni says:

  Hi Mhendra,
  Ha lekh khup tachi zala Aahe.Aapla klpnavilas Aani chintanshilta pratek prichedat jannvte.

  • सुमा
   ब्लॉग वर स्वागत.. आणि उत्स्फुर्त प्रतिक्रियेसाठी पण मनःपूर्वक आभार.

 5. वाह वाह.. एकदम अंतर्मुख केलंत.
  तुम्ही दिलेली एक सो एक उदाहरणं डायरेक्ट भिडली काळजाला…
  शब्द नाहीत हो अजून काही बोलायला. टोप्या उडवल्या 🙂 🙂

 6. tejaswini joshi says:

  apratim lekh lihilay kaka.
  mi sudha engineering student asunahi sutyanmadhye ghari gele ki majhya bahulya kadhun tyana dress shivat basate.
  baki ya aathavani mhanaje jalichya panasarakhya asatat.vahit japun thevavyasha!!!!!!!!!!!!

  • तेजस्विनी,
   मस्त उपमा दिलेली आहेस तू!.. जाळीच्या पानासारख्या वहीत जपून ठेवण्या सारख्या आठवणी!! आमच्या घरी पण एका बॉक्स मधे बाहुल्या ठेवल्या आहेत- कधी तरी त्या पण बाहेर निघतात , आणि मग पुन्हा त्याच बॉक्स मधे जाऊन बसतात. बाहुली हा प्रत्येकच मुलीचा विक पॉइंट असतो.

 7. yog says:

  nice post.. like it

 8. tejaswini joshi says:

  kaka,ragavanar nasalat tar ek sangu?
  tumhi pratyek blog lihitana kalaji kasali karata ho?
  alankarik ,bhari bhari ,jad shabd vaparalelech likhan darjedar asatech ase nahi.
  shevati tumachya likhanatun vachanaryala kay sandesh milato yavarach lekhakach yash avalambun asat na? tumacha lekh vachatana aapalepana vatato.

  • तेजस्विनी
   लिहीताना अजिबात काळजी करत नाही मी, कारण लिहायचं असतं, ” काय वाटेल ते” – आणि ते तर एकदम सोप्पं आहे, जे काही मनात येईल ते सरळ सरळ लॅप्टॉप वर टाइप करायचं! एक गोष्ट आहे, आपली लिमीटेशन्स माहीती असतील तर लिहीणं सोपं जातं, ती चांगलं लिहीण्याची पहिली पायरी आहे असे मला वाटते. लिमिटेशन्स माहीत असल्याने ’जितकं’ माहीत आहे, तितकं खूप चांगलं लिहायचं, की मग न येणाऱ्या गोष्टींकडे लक्षंच जाऊ नये………..असो..
   प्रतीक्रियेसाठी आभार.

 9. एकदम मस्त काका! या वेगवेगळ्या वयात आपण कायम फिरुन येत असतो. पण निसटून गेलेलं वय आणि त्यावेळची मजा कधीच परत आणता येत नाही. मी याच आशयाची एक कविता लिहिलिये. ही बघा
  एक लहान मुलगा हरवलाय…

 10. अरुणा says:

  अगदि खरं तर वयानुसार वागतांना कधि कधि त्रास होतो. वाटतं हे वयाचं खोटं मोठेपण झुगारून द्यावं,क्वचित कधितरी जमतं ,पण जास्त वेळा आठवणींवर समाधान मानावे लागते. म्हणूनच आठवणी लाख्मोलाच्या.

 11. Tanvi says:

  मस्त लेख महेंद्रजी ….. 🙂 …. तुम्ही दिलेली उदाहरणं खूप मनापासून आवडली…. आपलं वय (वाढतय हे) विसरता येणं हे वरदान असावं नाही….

  • तन्वी
   हे वरदान मिळालं,की आयुष्यातला प्रत्येक दिवस आनंदी असेल.. पण तसं होत नाही याचंच दुःख आहे.

 12. Nikhil Bellarykar says:

  lay bhari. awesome!

 13. रोहन says:

  तुम्ही असे का म्हणताय?? माझ्या सारख्या लहानग्या मुलाला तर काहीच कळो न आले… 😀

 14. Ashwini says:

  Kaka agdi senti zalathi ani kelathi…

 15. महेश कुलकर्णी says:

  जेव्हा तरुण जेष्ट होती,त्यावेळी त्याच्या आठवणी त्याला आठवात,हा नैसर्गिक नियम आहे, हे असच चालू राहणार,पण आठवणी ह्या आठवणी असतात,मस्त,छान,आवडला,

  • महेश
   आठवणी पुन्हा पुन्हा जगण्याची आवड, यातूनच फोटो काढून आठवणी जतन करणे वगैरे होत असेल ! आठवणींच्यावर पण एक मस्त लेख लिहीला जाऊ शकतो. 🙂

 16. mau says:

  लेख अप्रतिम !!! प्रत्येक दिलेलं उदाहरण अगदी मनाला पटले….सुंदर….:) 🙂

 17. Ganesh says:

  ho na Kaka aata khup sarya lahalpanichya goshti iccha asun karta yet nahit…

  • गणेश
   “चांगल्या आठवणीं” पुन्हा पुन्हा जगण्याची उर्मी ” येत असते, आणि आपण त्याच आठवणी पुन्हा अनुभवायचा प्रयत्न करत असतो ! हे आपलं सर्व सामान्यांचं जीवन!

 18. Smita says:

  lahanpaNeechya sagaLya avaDatya goshtee sagaLyaveLee karata yeteel asa naHee, puN sandhee miLel tenva ‘ProuDhatvee japave nija shaishavala…’ , right? lekh nehameepramaNe pleasant!!! aNee tya bahulyach kay puN lahanpaNeechya kitetaree goshtee mulanchya nimittane apuN punha punha jagayala pahato …

  • स्मिता
   सौ. ची लहानपणीची पितळेची खेळ भांडी अजूनही आहेत. त्या मधे पाणी तापवायचा बंब, शेगडी.. असं बरंच काही काही आहेत. शेवटचे दोन परिच्छेद जे आहेत, ते सगळं सार आहे या पोस्टचं!

 19. Ninad says:

  Mast! June prasang dolyasamorun gelet. Tumhi nagpurkar ahat he mahit navte!

  • निनाद
   आधी पण बऱ्याच पोस्ट मधे संदर्भ आलाय याचा. मी मूळ आदिवासी! जन्म चंद्रपूर जिल्ह्यातला.. 🙂 लहानपण यवतमाळात गेलं, नंतर नागपूर… 🙂

 20. Prasad Haridas says:

  Mastach lihilay Kaka…

  Agadi Asach hota aai navin loncha ghalate tenvha.. Halakishi Kharawleli phod tondat takayala maja yete, Papdachi lati khayachi tar kityek diwsat wat pahatoy mi… Ani Kurdya sudha..

  Ajun ek visaralo.. Gallit yenari Matka Kulfi pan ashich athawate jenvha icecream parlar madhye basato 🙂

  Ajun tumachya wayat nahi geloy tarihi kup kahi watata karawasa punha punha

  Thanks..

  • प्रसाद
   बोटातून खाली गळून गेलेली वाळू असते, तसेच ते जुने क्षण!! त्यांना सांभाळून ठेवायचं, आणि पुन्हा पुन्हा कुठेतरी रोजच्या जिवनात शोधायचं……एवढंच आपल्या हातात असतं!

 21. प्रसाद थरवळ says:

  काका… शब्द अपुरे आहेत तुमच्या स्तुतीसाठी.. अप्रतिम विषय..! कधी वाचता वाचता अंतर्मुख झालो कळलंच नाही.. आणि सहज जाणवलं कि, अजून हि.. रोजच्याच दिनचर्येत आपण कळत नकळत.. अशा किती तरी बालिश गोष्टी करत असतो.. ज्या आपल्या वयाला साजेल्श्या नसतातच… खरंच आभार! प्रत्येकाच्याच मनात हे नक्कीच होतं, फक्त याला शब्दस्वरूप तुम्ही दिलंत त्याबद्दल…

  • प्रसाद
   धन्यवाद..खरे आभार सलीलचे मानयला हवे, त्यानेच हा लेख लिहायचा विषय दिला होता म्हणून लिहिला गेला हा लेख. आजचा दिवस पण उद्या जगण्यासाठी नवीन आठवणींचं भेंडोळं तयार करीत असतोच, नेव्हर एंडींग स्टोरी आहे ही!.

 22. मला तर आयुष्यभर लहानच राहावं वाटतं (वयाने आणि डोक्याने सुद्धा 😛 …उलट डोक्यानेच मुळात… डोकंच लय त्रास देतं जसं जसं मोठं होतं जातं 🙂 )…पण मोठं बनावच लागतं.
  तुमच्या हि पोस्ट वाचून कितीतरी गोष्टी मिस करतो आहे बघा आत्ताच्या आत्ता… 🙂
  मस्तच!

  • वैभव
   तुलाच नाही, तर प्रत्येकालाच आयुष्यभर लहान रहावंसं वाटत असतं, पण ते शक्य होत नाही, आणि मग दररोजच्या जिवनातले ते क्षण लहान होऊन जगणं इतकंच आपल्या हाती असतं. प्रतिक्रियेसाठी आभार..

 23. sangeeta borkar says:

  hallo mahendraji,
  mala tumche kelh khup aavadtat, mi nehmi vachate, aplya rojchya jivnatil prasang, anubhav tumhi khup sunder sangta, masttttttttt, saggle lekh khupch sundr ahet, all the besttttt

 24. Gurunath says:

  हा लेख कालच वाचला , पण ठरतच नव्हते मला कुठल्या वयाचे व्हायचे, आईची आठवण आली की परत चड्डी च्या वयात जावे वाटे पण तिची ट्रेडमार्क लेफ़्टहॅंड चपराक आठवली की सटारते (आम्ही हेरीडेट्री डावरे!!!). थोडे मोठे झाले की दहावी आठवते व मिलिंद बोकिल ह्यांच्या शाळा मधले “शाळा कधीच संपली आता फ़क्त उरले ते दहावी चे भयाण वर्ष” हे झाले म्हणुन क्यांसल… कॉलेज वय म्हणले की पहीले (अन शेवटचेही)हार्टब्रेक आठवते 😀 , तसे प्रत्येक वयात चांगले ही बरेच आहे. म्हणजे जर बालवयात गेलो की परत एकदा त्या म्याच ची शेवटची ओव्हर खेळावी वाटते, ज्याच्यानंतर मला कधीच क्रिकेट खेळवले नाही पोट्ट्यांनी!!!!. मायला परत लहान झालो तर काळेंच्या निल्याचे कांडात काढेन म्हणतो परत. माझी आवडती कंची चोरली होती लेकाच्याने. असो. स्थल-काल-परिस्थिती-आनंद/दुखः…. ह्या परीमितींचा विचार करुन मला तुम्ही दिलेल्या उदाहरणा प्रमाणे प्रत्येक वेळी वेगवेगळ्या वयाचे व्हावेसे वाटेल. :)……..

  • गुरुनाथ
   अरे ते सगळं आपोआपच होत असतं, सबकॉन्शस माईंड तुमच्या कॉन्शस माईंडवर कधी कुरघोडी करेल याचा काही नेम नाही. पाउस पडत असताना, हातातली छत्री न उघडता भिजायला आवडतं, आणि आपण तसं बरेचदा करतो सुध्दा!! असे अनेक प्रसंग तुला आठवतील निट विचार केला तर!

 25. bolmj says:

  भारी लिहलय..मी पण असाच कधीतरी फार खुश असलो कि लहान मुला सारखा वागतो बिनधास्त एकदम …सगळे खवय्ये मित्र भेटले कि मग हातावर पाणी ओघळे पर्यंत पाणीपुरी खातो…शाळेतले मित्र भेटले कि फालतू PJ आठवून भर रस्त्यात हसत बसतो…आणि गणपतीच्या वेळी गल्लीत गेलो हि मनात येईल तसे नाचतो एकदम गणपती नाच…..मजा यते स्वतःला परत एकदा अनुभवायला …नेहमीच्या सोफेस्टिकेटेड वागण्यातून तेवढीच मुक्तता….भावना अशा उफाळून आल्या तुमचा लेख वाचून खास तर या लाईन फार आवडल्या …”…..तेंव्हा एकदम आजच्या वयाच्या ब्रॅकेट मधे पोहोचतो.” मस्त …

 26. काका,

  अतिशय सुरेख लेख आहे.. सगळी उदाहरणं अगदी परफेक्ट.. एकदम चपखल आहेत.

  प्रत्येक प्रसंगात आपण एक नवीन व्यक्ती असल्यासारखेच वागतो नाही? 🙂

  • हेरंब
   तेच म्हणायचं होत, आपोआपच आपण आपली वागणूक बदलतो 🙂 वेळ बघून ( बरेचदा इतर गोष्टी तुमची वागणूक गव्हर्न करतात हे पण खरं म्हणा.. पण तरीही..

 27. Bindiya says:

  Gele te Divas Rahilya tya athavani …… Manala hurhur lavnarya

 28. Vruda Kulkarni says:

  Mast aahe lekh. Lahanpaniche diwas goldan period asato lifemadhala. Pan lahan asatana lagaleli asate moth vhayachi ghai !!! Ata kalat kay harawal te. Thanks , tya diwasat gheun gelyabaddal.

  • वृंदा
   ब्लॉग वर स्वागत.
   ते दिवस जरी गेले असले, तरीही आपण कळत न कळत ते दिवस आपल्या रोजच्या जीवनात शोधत असतोच. प्रतिक्रियेसाठी आभार.

 29. Nitin Kondamangal says:

  mala jagayche aahe ?

 30. तुझ्यातले ’ ते ’ खट्याळ मूल अजूनही तरोताजा आहे की. सहीच! वयाचे काय रे, त्याला वाढण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. .. 😀 पण आपल्यापाशी अशी मोरपिसे आहेत की….

  पापडाच्या लाट्या खाऊन खूप वर्षे लोटलीत बघ. एकदम तोंपासु. आणि आब्यांच्या कोयी मीठ लावून उकडून वाळवून त्याची सुपारी करायचो बघ… आठवते का तुला? काय मस्त लागायची ती सुपारी.

  खरेच, लहान बाळाला जवळ घेतले की मन अगदी ’ त्या ’ सुवर्णक्षणांमधे जाऊन पोहोचते. 🙂 अचानक काळ पुन्हा त्या क्षणात जाऊन थांबावा…. अन पुन्हा प्रवाहित व्हावा…. हम तो कुछ भी देनेको राजी है…. बस कोई लौटादो हमे….

  राजेहो, पोस्ट भिडली. भापो. 🙂

  • हो.. आठवतं ना . तसेच ते भाजलेल्या चिंचोक्यांची सुपारी पण लक्षात आहे. 🙂
   आपल्यातलं ते खट्याळ मुल तरोताजा आहे, तो पर्यंतच जगण्यातला आनंद आहे, नाही तर मग काय शिल्लक राहील??
   वय वाढणं सहाजिक आहे, आपण ते ग्रेसफुली घ्यायलाच हवं, पण सोबतच लहान लहान गोष्टीतला आनंद पण घ्यायला काय हरकत आहे? रोज सकाळी साडेपाच वाजता बगिचात फिरायला गेल्यावर पाच मिनिटं तरी झुल्यावर बसून घेतो मी ! मस्त वाटतं बघ.. 🙂

 31. videsh says:

  मला नेहेमी तुम्हा कविता करू शकणाऱ्यांचा हेवा वाटतो
  महेंद्रजी , फारच छान शेरा ! एकदम दुर्मिळच ! कवीचा हेवा करणारे आहेत , यावर विश्वास नाही बसत. धन्यवाद कवींची बाजू घेतल्याबद्दल .

  • विदेश
   जे आपल्याला येत नाही, त्या बद्दल कायम कुतुहल आणि हेवा वाटतोच. हा मानवी स्वभाव आहे. मी स्वतः पण कविता करण्याचा प्रयत्न केला, पण काही जमलं नाही.. म्हणून सोडून दिलं.

 32. Harshit says:

  really nice article. i am just 28 by age. but many times i feal i am too mature to do some very childish thing……
  but i dare i make them….who cares what you do……..

  • हर्षित
   खरंय.. आपल्याला जे वाटेल ते करावे, आणि शक्य तेवढा आन्ंद वेचत जावे .. बस्स्स.. कोणाला काय वाटेल याची काळजी करण्यात काय अर्थ आहे??

 33. Santosh says:

  Aai Shappath…. Lai bhari 🙂

 34. Rajeev says:

  MAHENDRA,
  THE MEDICAL FACT IS THAT , WHEN YOU REMEMBER YOUR CHILD HOOD, THE CELLS IN YOU BODY AS A CHILD( YOUNG YOU) ARE ALL REPALCED AT YOUR CURRENT AGE……
  MEANS YOUNG YOU IS NOT OLD YOU !!!!!!!!!!!

 35. i like this your …………………………..?
  writeen mattar ……….
  very nice …………….

 36. Asmita A. Nevrekar says:

  chan kupach chan wachtana lahan pan athawoon man tya kalat gale

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s