हर्नबी रोड- एक विरासत!

This slideshow requires JavaScript.

 मनीष मार्केट ते फाऊंटन कधी चालत गेला आहात का? कुठली गोष्ट प्रकर्षाने जाणवली?? खरं सांगायचं तर मी सुद्धा कित्त्येक वर्षात त्या रस्त्याने चालत गेलेलो नव्हतो.  पण  मागच्या आठवड्यात मात्र चर्चगेटचं काम  आटोपून घड्याळाकडे पाहिले तर लक्षात आलं की पुढल्या मिटींग साठी चक्क एक तास आहे. वेळ कसा घालवायचा हा प्रश्न होताच म्हणून  आणि मग चर्चगेटहून  सीएसटी पर्यंत चालत निघालो .

मला वाटत चालत जाणं ही एक इष्टापत्ती झाली, कारण केवळ याच चालण्या मुळे एक वेगळी मुंबई पहायला मिळाली. मला तसाही हॉर्निमन सर्कल, बेलार्ड पिअरच्या भागात पायी फिरायला  खूप आवडतं . तिथल्या निरनिराळ्या इमारती पहात रस्त्याने चालत जाणे हा आवडीचा छंद आहे माझा. हॉर्निमन गार्डन चे कंपाउंड आणि  फाटक ,किंवा लायब्ररीच्या पायऱ्या, आय एन एस आंग्रे,  पाहिल्या की आपण कुठल्यातरी निराळ्याच विश्वात गेल्याचा भास होतो.

तुम्ही पण बरेचदा फाउंटन ते चर्चगेट   चालत गेले असाल, पण बऱ्याच गोष्टींकडे नेहेमीच्याच म्हणून दुर्लक्ष केले जाते. जीपीओ  की तार ऑफिस च्या बाजूच्या फुटपाथ वरून चालत निघालो.  भरपूर वेळ हाताशी असल्याने थोडी टंगळ मंगळ करत , इकडे तिकडे पहात पायाखाली येणारे रंगीबेरंगी पेव्हर ब्लॉक्स पाहत चाललो होतो.

जीपीओ च्या समोरच्या फुटपाथ वर   त्याच्या मेन गेट पर्येंत पोहोचलो, आणि एकदम त्या पेव्हर ब्लॉक च्या ऐवजी सुंदर रितीने  सेट केलेले दगड दिसले. छान नक्षिकाम पणे सगळे दगड त्या मुख्य दारासमोरच्या भागात फुटपाथ वर लावलेले होते.

क्षणभर तिथेच रेंगाळलो, नकळत सेल फोन हातात घेऊन फोटो क्लिक केला.  पोर्तुगीझ पद्धतीचे हे फुटपाथचे  डिझाइन   इतक्या कलात्मकरित्या लावलेले होते, की त्याकडे दुर्लक्ष करणे कठीण झाले. फक्त गेट समोरच हे ओरीजिनल लावलेले दगड शिल्लक  आहेत, थोडं पुढे गेलं की पुन्हा पेव्हर ब्लॉक सुरु होतात! 😦

जुन्या गोष्टी , अशा पुन्हा होणे नाहीत, पण कमीत कमी जशा आहेत तशाच जर सांभाळणे तरी आपल्या हातात आहेच ना? पण दुर्दैवाने तसेही केले जात नाही.

एक सांगा, जर उद्या कोणीतरी ताजमहालाचे संगमरवर खराब झाले म्हणून त्या ठिकाणी  कोणी  स्पार्टेक टाइल्स बसवल्या तर??? मूर्ख पणा !! एकच शब्द आठवतो , आणि नेमका तोच शब्द मला पण सारखा  माझ्या मनात येत होता.

जुन्या वास्तू जशा आहेत तशा मेंटेन केल्या जाणे महत्त्वाचे असूनही , केवळ काही पैशांच्या लोभापायी इतक्या सुंदर विरासतीची विल्हेवाट लावलेली  आहे. हे पेव्हर ब्लॉक बसवण्याचा करंटे पणा करणारे कोण महाभाग आहेत याची मला अजिबात कल्पना नाही,पण जे आहेत ,ते निर्बुद्ध  आहेत हे मात्र नक्की. मुंबईच्या बऱ्याच  हेरीटॆज इमारती ह्या धोकादायक झाल्या आहेत म्हणून ( प्रत्यक्षात  धोकादायक झालेल्या नसताना देखील) त्या पाडल्या जात आहेत,  त्या करोड मोलाच्या जागेवर नवीन इमारती बांधून पैसे कमावता यावे म्हणून .

थोडं पुढे गेल्यावर जुनी पुस्तकं विकण्याची दुकान आहेत, त्या शेजारीच एक पाणपोई पण बांधलेली आहे. हुतात्मा स्मारकाकडे लक्ष गेलं, आणि क्षणभर त्या अज्ञात लोकांना मनोमन प्रणाम केला, त्यांनी ज्या महाराष्ट्रासाठी जीव दिला तो हा आज आहे असाच महाराष्ट्र होता का??

फाउंटनचं कारंजे कधीही पाहिलं तरी छानच दिसतं! पण त्यावर शेवाळलेले काही दगड मार त्याची उपेक्षा जाणवून देत होते. अतिशय सुंदर असलेले ते शिल्प , आपल्या पद्धतीचे एक आहे. त्यावर असलेली फ्लोरा देवता पण कुठेतरी दूर पहात बसली आहे असे वाटत होते. रस्ता क्रॉस न करता डीएन रोडला लागलो.

डी एन रोड म्हणजे एकेकाळचा हॉर्नबी रोड. सर हॉर्नबी हे मुंबई प्रांताचे गव्हर्नर होते १७७१ ते १७८४ साली , त्यांच्या सन्मानार्थ  त्याचे नांव या रस्त्याला देण्यात आले होते. ह्याच कालात (१८५० साली) नेमकी फोर्ट ची भिंत पण पाडण्यात आली होती, आणि  ह्या रस्त्याचे निर्माण कार्य  करण्यात आले.

क्रॉफर्ड मार्केट ते फाउंटन पर्यंतचा असलेला हा रस्ता एका दूरदृष्टी ठेवून बांधण्यात आलेला असल्याचे आजही जाणवते. त्या काळी म्हणजे साधारण १७५ वर्षा पूर्वी  दोन बिल्डींगच्या मधे सहा पदरी रस्त्याचे बांधकाम केले गेले. इतकी  दूर दृष्टी पाहून खरंच आश्चर्य वाटते. नाही तर आजकाल नुकतेच बांधलेले रस्ते पण काही दिवसातच कमी पडायला लागतात!

पादचाऱ्यांसाठी चालण्या करता कव्हर्ड फुटपाथ  असावा , म्हणजे त्यांचे उन आणि पावसापासून संरक्षण होईल -असा कायदा १८८५ ते १९१९ या काळात होता. त्या मुळे प्रत्येक इमारतीच्या दर्शनी भागात प्रत्येक बिल्डींग च्या बाहेरच्या भागात एकाच रुंदीच्या कमानी बांधण्यात आलेल्या आहेत. अजूनही या सगळ्या कमानी खूप छान  स्थितीत आहे.  पण दुर्दैवाने या कमानी खाली सगळ्या फेरीवाल्यांचे साम्राज्य आहे. १९१९ नंतर हा फुटपाथ कव्हर्ड असावा हा  नियम का रद्द केला ते समजले नाही.

सरळ चालत सीएसटी कडे निघालो ,तर  लक्षात आले की या रस्त्यावरच्या जवळपास सगळ्याच इमारती ह्या वर्ल्ड हेरीटेज मधे मोडल्या जातात, त्यामुळे त्यांच्या दर्शनी भागात काहीही बदल करता येऊ शकत नाहीत. हेच कारण असावे, की या रस्त्याला फाउंटन ते सीएसटी पर्यंत मात्र व्यवस्थित मेंटेन केल्या गेले आहे.

एका इमारतीच्या कमानी खालच्या फुटपाथ वरून गेल्यावर दुसऱ्या इमारतीच्या कमानी खाली शिरतांना पण काही वेगळे पण जाणवत नाही. इथे सगळे ओरीजिनल दगडांचे  बांधकाम अजूनही तसेच आहेत.

एके ठिकाणी १७-१८ व्या शतकातला काही खुणा अजूनही दिसून येतात. एक पोस्टाचा डबा, आता तुटक्या फुटक्या अवस्थेत , आणि त्या शेजारचे फायर हायड्रंट  अजूनही लक्ष वेधून घेते.

ह्या रस्त्याला वर्ल्ड हेरीटेज स्टेज २ चे संरक्षण देण्यात आले आहे, आणि तशी एक पाटी पण लावलेली दिसली आणि मला आश्चर्यच वाटले. आज पर्यंत इ्तक्या वेळेस त्या रस्त्याने गेलो असेल पण  आपलं त्या पाटी कडे कधी लक्ष गेलं नाही  याचं मलाच आश्चर्य वाटले.

काही वर्षा पूर्वी या ठिकाणी सगळ्या जुन्या इमारतींच्या वर निऑन साइन्स, जाहीराती वगैरे लावल्या जात असत. संपूर्ण इमारतीचे एलीव्हेशन हे जाहीरातीनं झाकल्या गेले जायचे,  पण नंतर  या रस्त्याला ’वर्ल्ड हेरीटेज ’म्हणून ’युनेस्कोने’ मान्यता दिल्यापासून हे सगळं बंद करण्यात आलं आहे.

युनेस्कोचा कुठल्याही इमारतीचे एलीव्हेशन बदलले जाऊ नये असा नियम पण आहे.  मला वाटतं की वर्ल्ड हेरीटॆजचं स्टेटस टिकवायचं म्हणून ,इथल्या इमारतींचे एलीव्हेशन आणि फुटपाथ वर मात्र जुने दगड अजूनही तसेच जतन करून ठेवलेले आहेत.  ते आजही इतक्या चांगल्या स्थिती मधे आहेत की अजुन शंभर वर्ष तरी त्याला काही होणार नाही याची खात्री आहे. इथे केवळ फुटपाथचे दगड बदलणे इतकाच मुद्दा नाही, तर बऱ्याच ठिकाणी इमारती मधे इतरही बदल केले जातात , पाडले जातात हा मुद्दा महत्त्वाचा वाटतो.

याच कमानी खालच्या फुटपाथ वर बरेच दुकानदार  बसलेले दिसतात. जो पर्यंत आपल्याकडली हप्ता पद्धत बंद होत नाही, तो पर्यंत कुठल्याही शासकीय जागेवर आपली दुकाने थाटून बसणाऱ्या ह्या फेरीवाल्यांना कोणीच थांबवु शकणार नाही.

मुंबईला असं  नवीन काहीतरी पहायला मिळतं, आणि मग मी  नेहेमी ठरवतो, आता  एकदा तरी हेरीटॆज वॉक ला जायचंच! पण अजुन तरी जमलेले नाही-  कधी जमेल ते कोण जाणे..

या पुढे कधी या रस्त्याने जाणे झाले, तर  ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या.. …

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in Uncategorized and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

64 Responses to हर्नबी रोड- एक विरासत!

 1. रोहन says:

  होय रे… ६-७ वर्ष झाली मला आता तिकडे फिरून… जाणे झाले तरी काही कामाने आणि मग गाडीतून त्यामुळे इथून चालत फिरणे होतच नाही.. 😦

  तू जी पाणपोई म्हणतो आहेस ना.. त्याच्या पलीकडल्या बाजूला जी इमारत आहे त्याच्या दर्शनी बाजूला २ पंख असलेले महाकाय प्राणी (काय म्हणावे त्याना?) आहेत. म्हणजे त्यांच्या मुर्त्या आहेत. अर्थात ती पारसी कलाकृती आहे हे नक्की.

  मला सी.एस.टी. ते अगदी गेटवे किंवा चर्चगेट चालत फिरायला आवडते. फिरलो देखील आहे खूप. तू म्हणतोस तसा एक हेरीटेज वॉक प्लान करूया का??? 🙂

  • नक्की करू या , मला आवडेल . एखाद्या रवीवारी सकाळपासून सुरु केले तर दुपारपर्यंत संपेल. फक्त एखादा चांगला लोकल माणूस हवा सगळं व्यवस्थित सांगणारा ( ऐतीहासीक मह्त्व) ती पारसी कलाकृती मला पण आठवते, पण मी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालत गेल्याने ते फोटो काढता आले नाहीत.

   • हेरिटेज वॉक, मेळाव्यानंतर करुया का? काय मज्जा येईल?

    • मेळाव्या नंतर रात्र होईल. सकाळी उन्हापूर्वी जास्त बरे पडेल. अखखा दिवस लागेल, आणि वाईड ऍंगल लेन्स, टेलीफोटॊ , आणि कॅमेरा मस्ट!! तू खरंच एंजॉय करशील.. आय प्रॉमीस!! क्लासिक लोकेशन्स आहेत सगळी.

 2. हां.. हे मी बघितलं होत तिथून जाताना.
  आपल्या इथे अश्या हेरिटेज वास्तू डागडुजी करताना अजून खराब करतात हे मात्र नक्की. त्या इमारतीचं बांधकाम तसच्या तसं उभारणे काही कठीण नाही, फक्त इच्छाशक्ती नाही आपल्या लोकांमध्ये.
  रशिया, इटली इथे जुने पडलेले पॅलेस पुन्हा तसेच्या तसे बांधून उभे केले आहेत, आणि त्या वास्तू तेथील पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहेत.

  एकदा तरी हेरीटॆज वॉक ला जायचंच! > मला पण सांगा प्लीज 🙂 🙂

  • नक्की जाऊ. ५ तारखेला ब्लॉगर्स मिट आहे, त्याच दिवशी सकाळी जायचं का? फक्त कोण दाखवेल सगळं? माहीती काढतो मी.

   • रोहन says:

    कोणी नाही मिळाले तरी आपण सहज फिरू शकतोच… 🙂 एखाद्या इराण्याकडे सोबत जेवणही होईल… 🙂

    • चालेल. मी तयार आहे. बेलार्ड पिअर, ते लायन गेट किंवा प्रिन्स ऑफ वेल्स पर्यंत , डॉक यार्ड रोड.. बरेच फिरता येऊ शकेल. तू इथे परत आलास की मला मेसेज दे, करू या प्लान.. 🙂

 3. Gurunath says:

  इथेच जवळ वाटेत ,”ग्रॅंड ओल्ड मॅन ऑफ़ इंडीया- दादाभाई नौरोजींचा पुतळा आहे ना?” बरेच वर्ष आधी आलो होतो आता आठवत नाही नीट, तेव्हा पण मी सिड्नेहॅम कॉलेज कडुन चर्चगेट स्टेशन ते सी.एस.टी पायी गेलो होतो.

  • हो, दादाभाई नौरोजी चा बसलेला पुतळा आहे. तो एकच पुतळा बसलेला आहे, बाकी सर्व, सर दिनशॉ, रानडे वगैरे उभे आहेत.
   पुण्याचा विश्रामबाग वाडा पण मला असाच मोहवतो. खूप सुंदर कोरीव काम आहे तिथे पण. सध्या असलेले ते पालिकेचे ऑफिस पाहिले की त्या भव्य वास्तूची दया येते.

   • Gurunath says:

    राजा केळकर वस्तुसंग्रहालय पाहीलेत काय? ,नसेल पाहिले तर नक्की पहा नेक्स्ट ट्रीप ला, सहीच आहे एक नंबर….

 4. rohit says:

  काका…..
  खरच अप्रतिम परीसर आहे तो.पण हल्ली लोकांची नजर मेलीय बहूतेक.माझ्या मित्रांना अशा ठिकाणांचा कंटाळा येतो.जुन काहीही नको वाटत त्यांना.जागतिक वारसा वगैरे तर लांबच्या गोष्टी झाल्या.
  हरीटेज वॅाकला यायला मलाही खरच आवडेल.

 5. खरंय, कुठल्याही गावी थोडं निरिक्षण केलं तर अनेक जुन्या गोष्टी नव्याने दिसतात… फक्त वेळ आणि दृष्टी हवी….

  • आनंद
   गोष्टी जुन्याच असतात, फक्त आपली दृष्टी बदलते वेळोवेळी! हा लेख लिहून झाल्यावर पोस्ट करू की नको? हेच नक्की होत नव्हतं. पण केलं पोस्ट!!!
   धन्यवाद.

 6. मनोहर says:

  या हॉर्नबीने वरळी-महालक्ष्मी रस्ता ईस्ट इंडिया कंपनीची परवानगी नसताना पुरा केला. पण त्यावेळी गव्हर्नर आपली ऑफिशियल पत्रेदेखील स्वत़ःच उघडत असल्याने त्याला मिळालेले बडतर्फीचे पत्र दडपून ठेवून नव्या गव्हर्नरला चार्ज देऊन मोकळा झाला. यानंतरच अधिकाऱ्यानी आपली पत्रे स्वतः उघडू नयेत असा फतवा निघाला.

  • मनोहर
   धन्यवाद.. चांगली माहीती दिलीत. हर्नबीच्या सन्मानार्थ हा फाऊंटन उभारण्यात आला होता , ही पण एक नवीन गोष्ट समजली काल.. 🙂 आभार.

 7. खरेच, खूप वर्षात माझी तिकडे फेरी झालेली नाही. आता हे सगळे वाचून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. पायाखालचा रस्ता होता एकेकाळी. रोहन म्हणतोय ते महाकाय पंख असलेले प्राणी-पक्षी( ? ) मलाही आठवतात.

  आपल्याकडे कशाचीच वज नाही कुणाला. बाहेरच्या देशात पाहा, इतकुसे काहीतरी असेल पण ते इतके जपतील, अगदी लगेचच प्रेक्षणीय करतील. आपल्याकडे प्रचंड आहे मात्र सरकारला त्याची दखल घ्यावीशी वाटत नाही. आणि लोकंही काही कमी थोडेच आहेत… तेही नाश करत राहतात.

  • इतका लहानसा मुद्दा आहे. सहज लक्षात आला चालत जातांना म्हणून ही पोस्ट लिहिली. इतकी सुरेख रचना केलेली आहे त्या दगडांची की क्षणभर पहातच रहावंसं वाटतं.
   तार ऑफिस,( फाऊंटन समोरचं) ज्याचा मी जीपीओ म्हणून उल्लेख केला त्याच्या आवारातले दगड काढून तिथे पण सिमेंटने जमिनीवर प्लास्टर केलंय.. पूर्वी तिथे काय असेल ??
   आता तरी जर बरं आहे, काही वर्षा पुर्वी तर इमारतींचे एलीव्हेशन पण दिसू नये इतक्या जाहीराती लावलेल्या होत्या या रस्त्यावर!! जे आहे, ते वाचवून ठेवायलाच हवे- हे जे काही आहे ती एक विरासत आहे, तिचा सांभाळ करून पुढल्या पिढीपर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्य आहे.
   कोणाला तरी कमिशन मिळते, म्हणून अशी नसाडी करणे योग्य वाटत नाही.

 8. Ashwini says:

  Kaka…gelyach athwadyat mi Mumbai Darshan hya sahlila jaun aale…mavas bhawand punyahun aali hoti….pan aapli mumbai itki sundar aahe he pahilyanech janval……Prince of Wales tar solid jaga aahe…pruna renovate kelay museum pan 20 min kai dombal pahun honar….pudhchya raviwari bet aahe parat jaycha….ani ho juhula ek Maharajanche ek shilpa aahe armar dalabarobarche atishay sunder…..pan mala sarwat jast kay awadla mahi aahe Malabar Hill, and Tower of Silencecha rasta…..

  • त्या म्युझियम मधे आम्ही सहा वर्षापूर्वी एकदा पाहूण्यांना घेऊन गेलो होतो, पण नंतर काही जाणं झालं नाही. मस्तच आहे म्युझियम.. अवश्य पहायला जा..मुलांना पण आवडेल.

 9. Smita says:

  Taj chya shejaracha walk puN asach tumhee dakhavalayat tasha kamaneenmadhala ahe- poorna savaleetun, mumbai koNtyahee european shaharasarkheech vasavalee gelee hotee , tyamuLe tithale raste buildings jasha cozy vaTataat tasach ya bhagat vaTata. aNakhee ek architectural influence mhaNaje don rastyanchya cross section la building cha facade- exactly at right angle to each other asha bhintee ahet baryach junya buildings chya. about the praNee pakshi-I think it’s called “asho farohar” kind of guardian angel; I am not too sure, may be someone can explain.

  • हो, ते पण आज पाहिलं. दोन रस्त्यांच्या मधल्या बिल्डींगच्या भिंती अगदी राईट एंगल मधे आहेत. चर्चगेटच्या मुख्य रस्त्याच्या समांतर रस्त्यावर पण सगळ्या इमारती एकाच रांगेत आहेत, अगदी मिनी ड्राफ्टर लावून ड्रॉइंग शिट वर काढाव्या तशा! तया गार्डीयन ऎंजल बद्दल वाचल्या सारखं वाटतंय कुठेतरी.. 🙂 धन्यवाद..

 10. रविन्द्र जाधव says:

  मलाही आवडेल हेरिटेज वाकला यावयास जरुर कळवा.

  र.ग.जाधव

 11. संदीप जगताप says:

  अगदी छान आहे ही पोस्ट. एखाद्या वास्तुतज्ञाप्रमाणे लिहिली आहे. ऐतिहासिक वैभव जतन करून ठेवण्याऐवजी आजही अशा अनेक इमारतींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं आणि नंतर त्या पाडून टाकल्या जातात. आपलं हे वैभव आपण जतन केलंच पाहिजे. सामान्य माणसालाही असंच वाटतं.

  अजून एक गोष्ट, काहीही म्हणा पण आपल्या पुर्वजांनी ज्याप्रकारे स्थापत्य निर्माण केलं, ते हल्लीच्या काळात फार अवघड आहे आणि तसे कारागिरही आता राहिले नाहीत. त्यांना खरच सलाम करायला हवा.

  या जुन्याच विषयावर एका नव्या आणि वेगळ्या दृष्टीने प्रकाश टाकल्याबद्दल धन्यवाद.

  • संदिप
   इतक्या लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया बघुन खरंच बरं वाटलं. आपणच ह्याकडे लक्ष द्यायला हवं नाहीतर हे सगळं गतवैभव नामशेष होईल यात शंका नाही. एक इमारत ज्या मधे इंग्रजांच्या काळचे जेल होते, ती पाडली गेली आहे, आणि तिथे आता एक मोठं कॉम्लेक्स उभं केलं गेलंय. असो.. जास्त लिहीत नाही.

 12. महेश कुलकर्णी says:

  जुने ते सोने ह्या म्हणीला काहीतरी(नेमका)अर्थ आहे ,आपण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • महेश
   तुमचं म्हणणं अगदी मान्य. खालची प्रदिपची कॉमेंट बघा.. इतकी सुंदर कॉमेंट आहे की तिच्यावरच एक पोस्ट लिहावंसं वाटतंय. आभार.

 13. aruna says:

  what the British did 250 years ago, we cannot do even now!

  • अरूणा
   बरोबर अहे, भारतात असलेले रेलवेचे जाळे किंवा पोस्ट वगैरे सगळे काही त्यांनीच सुरु केलेले आहे. एक ब्रिज आहे सुरत आणि बडोद्या मधे, तो अजूनही चांगला आहे- त्यावर पण एक पोस्ट लिहीली होती., खूप छान छान गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आपण.

  • Pradeep says:

   250 year? If I am not wrong, the treaty of Vasai took place in 1808 and the first railway ran between Byculla and Thane in 1853.
   Indians did build Konkan Railway, which is one of the engineering marvels. The construction railways in some of the most difficult terrain in Kashmir is currently going on. This is not to boast about our achievements, but given the limited resources and priorities, I think we would definitely be there after a few years or maybe decades. Sometimes, we Indians have an habbit of belittling our own achievemnts 🙂

 14. thanthanpal says:

  मी नेहमी मुंबई ला कामाला येतो . पहिल्या दिवशी VT स्टेशन पाहून छाती दडपून गेली होती. त्या नंतर प्रत्येक वेळी या स्टेशन वर उतरलो की असेच होते. आज ही या स्टेशन च्या भव्यतेची बरोबरी भारतातील कोणते ही स्टेशन करू शकत नाही. आज तर स्टेशन बांधले की महिन्याभरात त्याचे नुतनीकरण सुरु होते. पेव्हर चे अर्थकारण आणि राजकारण फार मोठे आहे. कायद्याने रस्त्यावर पेव्हर टाकणे बंद करावे . बेलार्ड पिअर, ते लायन गेट किंवा प्रिन्स ऑफ वेल्स पर्यंत , डॉक यार्ड रोड.. हा विभाग तर अत्यंत रमणीय आहे. येथे आल्यावर भारतात आहे असे जाणवत नाही. गर्दीत ही रमतगमत फिरण्यास येथे मजा येते. सर्वप्रथम बांधकामाची बिल्डर्स आणि राजकारण्यांच्या तावडीतून सुटका केली पाहिजे ; नाही तर ५०-६० वर्षा नंतर या शहरात राहणारी तरुण पिढी नक्कीच आपल्याला शिव्या घालेल .

  • अहो, आता तरी बरं आहे, काही वर्षापूर्वी या जाहिरातदारांनी सगळ्या हेरीटॆज बिल्डींगची पण वाट लावली होती. आता वर्ल्ड हेरीटेज म्हणून डिक्लिअर केलाय रस्ता म्हणून तरी थोडा अंकुश आहे. नाहीतर……….मुंबई म्हणजे हीच खरी मुंबई…. मला पण खूप आवडते इकडे फिरायला..

 15. yogesh says:

  मी दररोज त्या रस्त्यावरून चालत असतो पण कधी लक्षात नाही आले सर !!! उद्यापासून नक्कीच सर्वे करत येतो .

  • योगेश
   गोनिदांडेकरांचं एकदा मी लहान असतांना एक व्याख्यान ऐकलं होतं. मी तेंव्हा फार तर पाचवीत असेल. थोडक्यात लिहितो इथे..
   एकदा एका रस्त्याने एक माणूस चालला होता, त्याला एक फुल पडलेले दिसले, तो तसेच पुढे चालत गेला, अशीच काही फुलं रस्त्याने काही अंतरावर पडलेली होती.
   त्याच रस्त्याने एक दुसरा माणुस गेला, त्याला पण फुल दिसलं त्याने ते उचललं आणि ओंजळीत नीट धरून ठेवलं, पुढे गेला, अजून एक फुल दिसलं, ते पण उचललं.. असं करता करता, त्याच्याकडे ओंजळभर सुवासिक फूलं झाली. त्याने ती फुलं गुंफली, आणि त्यांचा हार केला आणि सुंगंधाचा आनंद घेत राहीला.

   म्हंटलं, तर साधी गोष्ट आहे, म्हंटलं तर खूप अर्थ पुर्ण… विचार करा..

 16. Santosh says:

  Abhari ahe… Tumcha photo slide show pahun mi swata firun alya sarkha watla mala; dole ole pan zalet… Mumbai is Mumbai!!!

  Missing it a lot!!!

  Thanks!!! 🙂

 17. Tejaswini Joshi says:

  ‘pravas ‘varnan jhakasach jhal aahe.hajaro lok tya rastyavarun yet jat asatil pan
  mala vatat nahi kuni etakya lakshapurvak te pahil asel.
  tumachyakade ti drushti aani rasikata aahe mhanun tumhala te disal.

  • तेजस्विनी
   थोडं जास्तंच लक्ष असतं माझं रस्त्याने चालतांना . आणि जुन्या बिल्डींग, आर्किटेक्चर माझ्या आवडीचे विषय. 🙂

 18. Pradeep says:

  I lived in that area for about 20 years since my Dad worked in Fire Brigade on Gunbow Street. Fort is the most beautiful area and almost every building and corner has some interesting history. There is a book ‘Aapli Mumbai, Anolkhi Mumbai’ by Sharada Dwivedi which gives lots of interesting facts about Fort.
  When you exit from the main gate to CST, you come to Nagar Chowk. This place was previously known as Faansi Chowk as the criminals were punished/hanged here. The current Azad Maidan / Bombay Gymkhana area was originally a huge lake called Faansi Talao, and later called Dhobi Talao. The St. George’s hospital was actually the Fort St George built by the East India Company and has two main gates – Church Gate and Bazar Gate.
  Most of the facades and the main buildings on the D.N. road were built between 1880s and 1910s. The structure with the wings in your photo is a Parsi Agyari built in 1898. The J.N. Petit library exactly opposite the Agyari was built in 1897 and boasts one of the best collections of Marathi books dating back to 1905. I have spent countless hours on the first floor reading room of this library and the collection of novels is very interesting. The main reading room of this library is a Victorian masterpiece and the library itself was declared a heritage building in 1990s. You may try to get permission from the security to see the main reading room on the 2nd floor to see the wonderful architecture.
  Usually people do not go to the residential areas of Fort assuming that it is only the commercial district of Mumbai. Although the main residential areas around Bora Bazar Road and Bazar Gate Street are not the most beautiful, you may get to know how the chawls came into existence. There was a clear partition in the residential areas of Fort. The English and Parsis used to live in all the buildings south of Rustom Sidhwa Road (Gunbow Street, the road exactly opposite Lawrence & Mayo). The Bohra Muslims used to live around the Bora Masjid Road (the road behind Mumbai House, connecting D.N. road and Bora Bazar Street). The Kutchis, Gujaratis and Marwaris used to live around Bazar Gate Street. Bazar Gate Street was the most happening street in Mumbai in the 19th century, an equivalent to NY’s Time Square!
  About the paver blocks – When we arrived in Fort in 1985, most of the roads were concrete roads without any potholes. They were very old but still capable of all sorts of vehicles. Sometime around the 1992, the BMC started digging those beautiful concrete roads and replacing them by tar roads. At the same time, it started messing up the beautiful foot-paths. I have pseronally seen many of the footpath stones stolen by the artisans to create (Pata-varvanta and Shiv Lingas!). Interestingly,the BMC has been renovating the roads in Fort every 2-3 years, esting crores of rupees.
  If you really want to get the best view of South Mumbai, use your contacts in the security personnel at the Stock Exchange building, The Reserve Bank or Hotel Taj. I have been to the terrace of the Stock Exchange building on a weekend through my friend working in the security. Believe me, you can identify almost every significant building from the Navy Nagar till Mahatma Phule Mandai (Crawford Market).
  Fort also has some of the best restaurants in Mumbai, many of them dating back to 1920s. The best places to eat real value for money food are the numerous Parsi/Irani restaurants – best among them is Britannia Restuarant (for non-veg), next to the New Customs House. The Manglorean restautants (for sea-food) nearby P.M. Road and Kawasji Patel street are also excellent.
  I have been living in London for a couple of years now and can say that Fort was designed as the exact replica of central London. Personally, I do not think that we owe anything to the British as they built everything from the money looted from Indians. Also do not think that what they ploughed back in India was more than 5% of what they looted from India. Now India is getting richer, it just needs to remove the corruption and build something new and artistic. There are thousands people in London/Paris/Rome, who live on touring the foreigners around the older parts of their towns. Wish we get to see the same in Fort in next few years!

  • प्रदिप
   खूप खूप सुंदर प्रतिक्रिया.. खूप नवीन माहीती मिळाली. इतकी माहीती मला नव्हती. आभार.
   बेलार्ड पिअरचं ब्रिटानिया माझं फेवरेट. तिथला चिकन बेरी पुलाव, बॉम्बेडक आणि कार्मेल कस्टर्ड विथ एखादा फ्लेवर्ड सोडा म्हणजे बेस्ट कॉम्बीनेशन. त्यावर पण एक पोस्ट लिहिलंय पूर्वी . ब्रिटानिया शोधलं तर सापडेल ब्लॉग वर..
   तुम्ही जे मंगलोरीयन ्रेस्टॉरंट म्हंटलं आहे, ते म्हणजे महेश का?? की दूसरं कुठलं आहे?
   तुमचं म्हणणं अगदी खरं आहे, रहिवासी असलेल्या भागात जाणं होत नाही. बोरा बाजार वगैरे भागात कधी फारसं फिरणं होत नाही. बिहाईंड बझार ( भेंडी बझार) हा भाग इंग्रजांच्या काळात खूप सुधारला. गोदीवर काम करायला मजूर हवेत, त्यांना रहायला म्हणून मग चाळी बांधल्या गेल्या. त्या काळच्या रीती नुसार जातीनिहाय व्यवस्था करण्यात आली रहाण्याची. इतकंच माहीती आहे. आजही जेंव्हा तुम्ही जेजे च्या फ्लायओव्हर वरून जाता तेंव्हा दोन्ही बाजूला असलेल्या चाळी दिसतातच. गाय वाडी, फणस वाडी, भुलेश्वरी वगरे भागात पण बराच फिरलो आहे.तिथे रहाण्याची मजाच वेगळी 🙂 प्रत्येक सण गाजतो त्या भागात. स्पेशली , गोविंदा, आणि गणपती तर मस्ट सी.. 🙂

   • Pradeep says:

    Mahendra,
    Correct – Britannia is really awesome. I visited it after reading its reviews on NY times website and found that the Parsi family owners of that restaurant lived in the building opposite to ours on Gunbow Street. The 3rd generation of this Parsi family is still living there and usually the 88 year old owner still takes the orders from customers. You may have noticed that the restaurant, the owner and the famous black rooster cock have appeared in countless movies/serials – the most famous being Chunky Pandey’s scene from the movie Tezaab. The family has now put a four feet portrait of the cock on its wall. Chicken Berry Pulao, Patrani Macchi and Mishti Doi are some of the favourite items on the menu card. The only problem is high prices due to huge tourust traffic.
    Mahesh Lunch Home on Cawasjee Patel St is very good for Manglorean sea food. In fact there was a resturant called Star of Persia on the Cawasjee Patel St / Gunbow Street junction famous for its kadak Irani chai. There are a few Irani bakeries/chai joints on Cawosjee Patel St and worth visiting for their special tea as well as speaking to the gentle Parsi Bawaas.
    Apart from these, there are many small restaurants serving authentic Konkani (Pradeep Gomantak restaurant on Gunbow Steet) and Udipi restaurants and Halwai (Punjabi Chandu on Cawasjee Patel St) shops in Fort. Pithle Bhakri saathi Zunka Bhakar Trust near Azad Maidan entrance (at Capital Cinema end). In short, when you go for your heritage walk in Fort, you would never be more than 10 min away from any awesome restaurant.

    • aruna says:

     it’s really wonderful that we have some of the past at least intact and people like you who appreciate it’s beauty and importance. I agree with you that we do not owe anything to the british for building this area, but we certainly should be thankful that that they gave us the vision of grandeur! we do have some big structures but they are either temples or the palaces, no public buildings. And certainly nothing for public facility.
     recently they have started Heritage tours in Pune ,though not professional, but by naturre lovers like ‘Nature Walk’. is there anything like that in Mumbai?

     • अरुणा
      एक गोष्ट मान्य करावीच लागेल, की जर ब्रिटीश नसते तर आपण आज ज्या स्टेजला आहोत त्या स्टेजपर्यंत कधीचपोहोचलो नसतो. सगळ्या भारताचं एकत्रिकरण झालं, ते ब्रिटीश आले म्हणूनच! नाही तर आजही राजेशाही सुरु राहीली असती आपल्याकडे- आफ्रिकेतल्या ट्राइब्स प्रमाणे 🙂

      • Pradeep says:

       Mahendra,
       Almost unrelated to your post but just another perspective on your response to Aruna – when the East India Company defeated Pashwas, India was already the second biggest economy in early 1800s- both in domestic markets and export oriented industries. When the British left, we were a nation of extreme poverty and still have a third of our population is below poverty. It took them only 150 years to annihilate a massive economy, destroy a rich history with trojans investions like Aryan Invasion theory and add permant faultlies in our society. Unfortunately, the history taught in our schools is bogus and nothing else but leftist propoganda. Drawing and redrawing the national maps has been a favourite British pastime.
       Although we have borrowed the current form of democracy from the British, it has simply taken away economic freedom from every citizen and introduced a massively corrupt and inefficient beaurocracy. This economic freedom was always taken for granted before the British arrived in India.

     • Pradeep says:

      Aruna,
      I somewhat agree to our point on preserving the history and heritage but not the vision of granduer. Just a simple quetion – which countries do you think have such massive grand ‘public’ structures built in the 18th and 19th centuries – France, Britain, Portugal and Spain. What was the source of the funds that went into these massive structures – slavery and colonial loot. When you visit Paris, you would be overwhelmed by the Napoleanic structures in the central district around the river. This was mainly built through the profits from slave trade, massive loot from the North African colonies and the Carribean islands (Haiti, Cuba etc). The same applies to the granduer in the UK – same source of funding. Almost every nook and corner of the grand public structures in Liverpool are built from the slave trade since it was the largest market of that trade.
      When individuals in India accumulated surplus wealth, they usually gave it to the the next of their kins or donated to the Temples. We still follow this practice. The same rule applied to wealthy individuals in Europe. When Indian rulers earned surplus money mainly through increased trade (commodities like spices, cotton, silk etc and not the ‘slaves’) that was usually spent on grand palaces (Mysore, Hampi etc), universities (Nalanda) and temples (the Buddhist caves in Sahyadris are the best emplaes of increased trade through Nane Ghat under Satvahanas period). The same principle applies to the European royal families as well. It was only when the national governments (led by the Parliament of England backed by the Royal English family, or the French government led by Napolean) started looting Asian, African and Carribean islands on an unprecedented scale between 17th – 20th century that the surplus was spent on building the ‘Public’ granduer. Part of this granduer was built from the money ‘forcibly taken’ from our forefathers. My grandfather – a farmer from a remote village in Nager district,died in 1994 at the age of 90 years. The last thing he told me was – you may get a good job and lead a better life because of the modern education , but do not forget what hell the farmers had gone through during the colonial era. It was a slavary and daylight robbery of their produce through monopolistic policies and other means.
      Personally, I would rather have basic and practical architecture (like Mohenjodaro and Harappa) rather than enjoying the ‘grand public’ buildings built on the foundation of looting the others.
      PS – if you happen to visit London and the ‘public’ museums like The British Museum, you would come across countless, priceless statues of gods/goddesses/ temple pillars stolen from India, Egypt and Iran. That is the western granduer for you 🙂

    • प्रदीप
     इराणी माझा फेवरेट. त्याचा ब्रून पाव चहा तर बेस्ट नाश्ता! अजूनही फोर्टला गेलो की मिलिटरी काफे मधे जातोच खिमा पाव खायला.. उद्या जायचंय टाऊन साईडला, तेंव्हा लंच बहूतेक स्टार ऑफ पर्शियाला ..धन्यवाद..

     • Pradeep says:

      Actually Star of Persia is gone now (just like the Parsis of Mumbai!). Ther is Yoko’s at that place.

      • प्रदिप
       स्टार ऑफ एशीया म्हणजे डीएन रोडने फाऊंटनला जातांना सिटी बॅंकेच्या गल्लीत आहे कोपऱ्यावर तेच ना? तिथे आहे योको सिझलर्स. एकदा गेलो होतो तिथे पण सिझलर्स साठी. :)त्या गल्लीत थोडं पुढे गेलं की महेश लंच होम आहे.. 🙂

       • Pradeep says:

        Mahendra,
        Correct, Start of Asia was on Rustom Sidhwa Road (prev Gunbow Street) and Mahesh Lunch Home is on Cawasjee Patel Street. If you walk further on this road towards South, you would come across Punjabi Chandu Halwai and a few Parsee bakeries. 3-4 shops next to Yoko’s on Gunbow Street is Pradeep Gomantak, quite good for Goan fish curries.

 19. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मी पूर्वी या भागात खूप फिरलोय.. मुंबई सोडल्यानंतर सगळंच बंद झालं. अर्थात एवढे सगळे डीटेल्स कधीच लक्षात आले नव्हते 🙂 मस्त वाटलं पोस्ट वाचून.. फोटोही झकास 🙂

 20. Smita says:

  since we are going down the history lane of Mumbai here; I want to add that all the ‘gates’ that you come upon in Mumbai were built deliberately by the portuguese to avoid attacks from and in sheer fear of Daryasamrat Kanhoji Angre ( Yes!! I was equally awed when I read this in the book – ‘The Warrior Peshwa’ by Sing).

 21. Santosh says:

  My goodnes… I just visit this page to see the reply of Mahendra Kaka… and Pradeepji… Man your views and the vast info about Mumbai is just outstanding!!!

  Kaka thanks a ton for this article and to make Pradeepji open his wealth in front of all of us.

  You guys are simply superb!!!
  GOD bless you a long and healthy life and lots of such brain stormers for all of us (Your Readers)!!!

  • संतोष
   प्रदिप त्या भागात राहिलेले असल्याने त्यांना खूप जास्त माहीती आहे. माझे ऑफिस पूर्वी लायन गेट ला होते, त्यामुळे त्या भागात नेहेमी फिरावे लागायचे. मस्त आहे तो भाग.

 22. sagarkokne says:

  नव्या मुंबईत राहूनही जुन्या मुंबईचे आकर्षण काही कमी झाले नाही. जुन्या मुंबईत, जुन्या आठवणीत रमत गमत फेरफटका मारायचा म्हणजे सुखाचा दिवस!

 23. geetapawar says:

  junya aatvni jagya jhalya,,, chaan lekh sir………………………

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s