जिभ कापा, नोकरी मिळवा..

दक्षिणेत गेल्यावर तिकडे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे तिथल्या लोकांचं सिनेमा वरचं प्रेम. कुठलाही सिनेमा लागला की त्या सिनेमातल्या हिरॊचे मोठमोठे कट आउट्स हे तर नेहेमीचेच झालेले आहेत.   एक वेळ स्वतःला खायला नसेल तरी पण   हे सगळे लोकं हिरोच्या कट आऊटला मात्र दुधाची आंघोळ घालणार हे नक्की.

दक्षिणेकडच्या लोकांना राजकीय परिपक्वता थोडी कमीच आहे अशी शंका  नेहेमीच येते मला!  सिनेमातले हिरोला  वास्तविक जीवनातले हिरो समजून पूजा करणे हे तर कायम सुरु असतेच.  एकदा अभिनेत्याचा नेता झाला की मग तर काही पहायलाच नको. एमजीआर, एनटीआर ,ते जयललिता ही त्याची जितीजागती उदाहरणं!

बरं दक्षिण भारतातली इलेक्शन पाहिली की बरेचदा मला तर प्रश्न पडतो की ही निवडणूक आहे की गुलामांचा खरेदी करण्याचा बाजार? एक उमेदवार म्हणतो , आम्ही फुकट टीव्ही देऊ, दुसरा म्हणतो, एक रुपया किलो तांदूळ, तर एक म्हणतो की आम्ही मंगळसूत्र देऊ प्रत्येकाला. हे सगळं अगदी उघड पणे सुरु असतं.  व्यवस्थित पणे पेपर मधे जाहीरात देऊन हे सगळे केले जाते.

इतक्या उघडपणे मतं विकत घेतांना पाहिले, की मग निवडणूक आयोगाचे अस्तित्त्व आहे की नाही?? याचा संशय यावा अशी परिस्थिती असते दक्षिण भारतात.इतक्या उघडपणे मतांसाठी पैशाची, सोन्याच्या मंगळसूत्रं किंवा टीव्हीची लालूच दाखवणे कुठल्या कायद्यात बसते हेच मला समजत नाही.

नेत्यांना पण चांगलं माहीती आहे, की लोकं गरीब आहेत, त्यांचा सिनेमा पाहण्यातला  उत्साह पण माहीत आहेच, मग  जर मतं हवे असेल , तर प्रत्येकाला कलर टिव्ही द्या, म्हणजे  उपाशी पोटी स्वप्नांच्या रंगीत दुनियेत सगळे मश्गुल राहून त्यांचे इतर ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष होईल, आणि मते मिळतील. एका भागातल्या केबल ऑपरेटरने जर निवडून आलो, तर सगळ्यांना दोन वर्ष केबल टिव्ही फुकट देण्याचे मान्य केले होते- आणि तो निवडून पण आला . हे सगळं उघड सुरु आहे, आणि म्हणे भारतात लोकशाही आहे.

कदाचित आठवत असेल, तो राजकुमार नावाचा एक कन्नड अभिनेता जेंव्हा विरप्पन ने पळवून नेला होता, तेंव्हा सरकारवर त्या विरप्पनला काय हवं ते द्या, पण राजकुमारला सोडवा म्हणून प्रेशराइझ करण्यात आलं होतं.  नंतर हाच राजकुमार जेंव्हा म्हातारा होऊन मेला, तेंव्हा संपूर्ण कर्नाटकात जाळपोळ, दंगली झाल्या होत्या.  बरं, हा अभिनेता मेला ह्याचे कारण ’नैसर्गिक मृत्यु’ असे असतांना सुद्धा जाळपोळ झाली.!!

व्यक्ती पूजा जितकी दक्षिण भारतात आहे, तितकी कुठल्याही राज्यात नाही. हल्ली महाराष्ट्रातही हे लोण हळू हळू पसरत चाललंय. इथे कुठल्याही ’एका पक्षा ’बद्दल मी बोलत नाही, तर कुठल्याही पार्टीच्या नेत्याची हीच परिस्थिती आहे.

एखाद्या नेत्यावर अंधविश्वास ठेऊन त्याचे मागे स्वतःची अक्कल गहाण ठेऊन  ’मेंढरा प्रमाणे’ चालत जाणारे कार्यकर्ते  आणि त्यांचे चमचे  पाहिले की खरंच फार वाईट वाटते. बरेचदा तर आपण लोकशाहीला लायक आहोत का असाही प्रश्न पडतो.

इथे नेत्यांना ’सुपर ह्युमन’चा दर्जा देऊन त्याच्या समोर लोटांगण घालण्यापासून तर त्यांच्या चप्पल उचलण्या पर्यंत कामं करण्यात ह्या ज्युनिअर किंवा होतकरू नेते( थोडक्यात चाटुगिरी करणाऱ्या )लोकांना कमीपणा वाटत नाही.

नुकतीच एक बातमी वाचली होती, की  रामानंतपुरम जिल्ह्यातील २७ वर्षाची एक दोन मुलींची आई असलेली तरूणी! तिचं नांव संगीता ! एकेकाळी २०० च्या वर चित्रपटात काम करणाऱ्या आणि आज सी एम असलेल्या  जयललीता या नटीची ही संगीता भक्त!!    जयललिताच्या विजयासाठी या संगीताने म्हणे नवस बोलला होता, की जर जयललिताची पार्टी निवडणुकीत   जिंकली , तर ती आपली जीभ देवा समोर कापून  वाहील.

जयललिताची पार्टी मेजॉरीटीने इलेक्शन जिंकली, आणि मग संगीताने ठरवल्याप्रमाणे देवासमोर  आणि हजारो लोकांच्या साक्षीने आपली जीभ कापून देवाला वाहिली. इतका अविवेकी मूर्खपणा कोणी करू शकेल यावर माझा विश्वासच बसत नव्हता. दुसरं म्हणजे, इतके लोकं समोर असतांना कोणी तिला अडवले कसे नाही हा पण प्रश्न आहेच.

ही संगीता   नवऱ्याने सोडलेली आहे, आणि आपल्या दोन मुलींच्या सोबत रहाते . तिच्या बद्दल जयललिताला कळल्यावर जयललितांनी तिला नोकरी  आणि एक लाख रुपये देण्याची घोषणा केलेली आहे. तसेच तिचा उपचार एका प्रायव्हेट दवाखान्यात करण्याचा खर्च पण दिलेला आहे.

मला हा प्रश्न पडतो, की हे संगीताचे असे करणे, आणि त्या घटनेचे उदात्तीकरण करणे कितपत योग्य आहे?? मिडीयाने पण या प्रकारणाचे भरपूर भांडवल करून त्या संगीताला मद्रास मधे  तर ’हिरोईन’ बनवले आहे.    हे पाहिल्यावर  पुढेही अशाच घटना अजून जास्त प्रमाणात होण्याची शक्यता वाढेल ह्यात काही संशय नाही.

त्या संगीताला नोकरी देण्यापूर्वी एखाद्या सायकीऍस्ट्रीस्ट ची आवश्यकता आहे !  तिच्या मानसिक अवस्थेची पूर्ण पणे तपासणी करून तिच्यावर औषधोपचार  करणे जास्त गरजेचे वाटते .केवळ संगीताच नाही, तर या घटनेचे उदात्तीकरण करणारे सगळे  जण  मानसोपचार तज्ञा कडे गेले तर ते  जास्त योग्य ठरेल.

  या सगळ्या प्रकरणातून  अशाच ’मानसिक दृष्ट्या कमजोर ’लोकांना  कुठला  संदेश दिला जातोय??जीभ कापा, आणि   नोकरी  व एक लाख मिळवा????

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय.. and tagged , . Bookmark the permalink.

59 Responses to जिभ कापा, नोकरी मिळवा..

 1. काका…सहमत

  आपल्याकडच राजकारण हे भावनांवरच जास्त चालत …सारासार विचार कोणीच करत नाही 😦

  • मला ह्याच गोष्टीचं नेहेमी आश्चर्य वाटत आलंय, आणि म्हणूनच म्हणतो, आपण खरंच लोकशाही च्या लायक आहोत का??

 2. काका, ह्याच बातमीचा मी बझ टाकला होता आश्चर्य वाटून… आपण खरंच २०११ मध्ये आहोत का असे वाटते असे वाचून… दक्षिणेत व्यक्तीपुजा सर्वोच्च आहेच.. पण तरीही ते राज्य प्रगती कसे करत आहेत याचं आश्चर्य वाटते..
  बाकी त्या संगिताला सायकायट्रीस्टला दाखवायलाच हवं..

  • आनंद
   इतकं असूनही त्यांची प्रगती कशी काय होते हा मला पण पडलेला प्रश्न आहे. मला वाट्तं की तिथले नेते, तळागाळांच्या लोकांना अशी प्रलोभनं देतात, आणि नंतर इतरांना रोजगाराच्या संधी मिळाव्या म्हणून नवीन सेझ डेव्हलप करतात, आयटी पार्क डेव्हलप करतात..
   आता आपल्या कडे पण सुरुवात झालेली आहे, पुण्याला हिंजेवाडी प्रमाणेच इतरही गावात, जसे नागपुर, औरंगाबाद, वगैरे ठिकाणी आयटी हब का सुरु केले जात नाहीत?
   हुंडाई ची फॅक्टरी जी चेन्नई ला आहे, ती नागपूरला बुटीबोरी ला येणार होती, पण नंतर काय झाले ते कळले नाही, आणि प्लांट गेला चेन्नाइ ला.’

 3. काय बोलू सुचत नाही आहे, ही लोक अजुन काय पायंडा मांडणार आहेत जगापुढे काय माहित… 😦

  • सुहास
   ही पहिली केस नाही. या प्रकारचा एक प्रसंग पूर्वी पण घडला आहे. अम्माच्या वाढदिवशी एका चहावाल्याने आपली जिभ कापली होती. खरंच जग कुठे जातंय, आणि आपण कुठे जातोय…. विरुद्ध दिशेला..

 4. abhijit says:

  तमिळनाडूचे कोणते तरी मंत्री म्हणे अम्मा जिथे असतील त्या भवनात चप्पल घालत नाहीत. त्या देवासमान आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. हे जरा अतीच आहे. या व्यक्ति चुका करतच नाहीत का? योग्य मुद्दा उपस्थित केलाय तुम्ही महेंद्रकाका. आपल्याकडे लोकशाही फक्त नावाला आहे. व्यक्तिपुजेच्या जोडीला जाती पातीचं राजकारण ही आणखी एक लोकशाहीला गाळात अडकवणारी गोष्ट आहे. लोकशाहीचा खरा अर्थ समजून प्रगल्भ लोकशाही अस्तित्वात येणे भारतात तरी नशिबात दिसत नाही.

  • अभिजीत
   मला पण तेच सारखं बोचत असतं. जातीयता नष्ट करायची म्हणतात, आणि जातींचेच राजकारण खेळतात आपले नेते. इथे राजकारण हा पण दुर्दैवाने खेळच झालेला आहे.

   सहज आठवलं म्हणून लिहीतो, सुखराम कॉंग्रेस मधे होता, तो पर्यंत तोत्याच्या नावे खडे फोडणारे भाजपाचे नेते, तो भाजपा मधे आल्याबरोबर एकदम त्याचे गुण गायला लागले होते.

   अम्मा पण भाजपला सपोर्ट केल्याबरोबर एकदम ती पण शुद्ध झाली असे वागायाला लागले लोकं.
   एखाद्या पक्षाच्या नेत्यांना शिव्या देत रहातो समाज, मग तो नेता आपल्या आवडीच्या पक्षात आला, की मग शिव्या बंद करून त्यांची तारीफ करणे सुरु करतो आपला समाज.

   समाजाला खरंच काय हवं आहे?? हा प्रशन आहेच!

 5. Gurunath says:

  राजकारण हे नेहमीच भावनांवर चालत असते, फ़क्त त्या कश्या भावना आहेत व त्या कश्या “एक्सप्रेस” होतात हा मुद्दा आहे………….. कुठे “आमच्या नोक~या कोण चोरतो” म्हणुन फ़िरंगदेशात मतांचा बाजार होतो तर कुठे हे जीभ कापे असतात. politicians are dealers in hopes whose factory is run over the steam of emotions they produce. लोकशाही म्हणली की मताधिक्य हे “चलनी नाणे ” असते, व नाणे बाजार भरणे साहाजिक होते. त्या वरुनच लोकशाही पक्व की बालिश हे ठरवणे मला रास्त नाही वाटत बुआ. बरे जर लोकशाही व्यवस्था (दक्षिणेतली) अपरीपक्व म्हणलो तर भ्रष्टाचार (२जी) हा पण एक मुद्दा होताच ज्याच्यामुळे लोकांनी करुणा नाकारले, आता टू जी चा तुमच्या आमच्या जिवनावर काय फ़रक पडतो आहे (प्रॅक्टीकली)? २जी चा भ्रष्टाचार होऊन ते अलॉट होऊन मोबाईल पसरले सुद्धा!!!!!!, पण दक्षिणेकडे लोकांनी तो उचलुन धरलाच , अगदी भ्रष्ट नेते जरी मोजले तरी राष्ट्रीय कार्यक्रम जसे की लोकसंख्या नियंत्रण, जननी सुरक्षा ,सकल घरेलु उत्पाद (जी.डी.पी) हेच नाही तर एच.डी.आय, जेंडर हेल्थ, स्त्री शिक्षण, पंचायत सबली करण, इत्यादी सामाजिक क्षेत्रांत त्यांचे इंडीकेटर्स हे उत्तर भारत सोडाच महाराष्ट्र अन गुजरात ला पण खाली बघायला लावणारे असे आहेत उदा केरळ, तामिळनाडू इत्यादी. तेव्हा कदाचित मला वाटते दाक्षिणात्य लोकांची वृत्ती “भावनिक उद्रेक” असणारी असते (जे त्यांचे सिनेमे पाहुनही पटते) पण म्हणुन त्याचे कोरिलेशन त्यांच्या भौतिक विकासासोबत लावणे मला तितकेसे संयुक्तिक नाही वाटत, उरला कटाउट चा प्रश्न तर ते पाहुन मला पण हसु येते, तरी ही चलता है यार!!!!!

  • गुरु
   भ्रष्टाचार हा मुद्दा नंतर निघाला. आधी नाही.
   मतांसाठी मंगळसूत्र आणि लॅपटॉप ची भेट देण्यात आली सगळ्यांना हे कसं विसरता येईल?

 6. रोहित says:

  काका,
  सुहास +………………अती झाल आणि हसू आल अस आहे लोकांच.आज एकीनी जीभ कापली उद्या आणखी कोणी काही कापेल……………

  • रोहीत
   खरंच अती झालेलं आहे, त्या बाईला म्हणे आंगणवाडीसदृष काहीतरी ठिकाणी काम दिलं गेलंय. मुलांमधे अशी मनोविकाराने ग्रस्त असलेली बाई कशी काय काम करणार?? असो.. असे अनेक उदाहरणं आहेत दक्षिणेत. स्वतःला जाळून घेणे हा प्रकार पण तिकडे पॉप्युलर आहेच..

  • geeta says:

   hahaha relly mala hach prashna padlya aapan nakki mansatch rahto na?

 7. Manoj Zavar says:

  भारतीय राजकारण, हे असच. मागे तुम्हीच एक उदाहरण दिलं होतं, काळ्या टोपीवाल्या मुलाच्या तोंडावर जोड्याने मारत नेलं होत कुठेतरी? डीटेल्स देताल का?

  • मनोज
   ती घटना विसरायची इच्छाआहे. त्या बद्दल खरंच काही लिहायची इच्छा नाही. खेडेकरांच्या बहीणीच्या निवडणूकीच्या मिरवणूकीत झालेली घटना आहे ती. मी शक्यतो ब्लॉग वर तो विषय टाळतो. असो..

   • Manoj Zavar says:

    मी नेटवर बराच वेळ सर्च केलं, काहीच रेफरंस मिळत नाहीये. मला डीटेल्स मेल करताल का? जाणून घेण्यात मजा नाही, पण कोण हे पापी? का त्यांनी असं केलं असावं, हे जाणून घ्यायचंय.

 8. ganesh bagal says:

  indiaWill Always Surprise You

 9. दक्षिणेतील राजकारण भावनांवर चालतं, हा महाराष्ट्रातील माध्यमे आणि राजकारण पंडितांचा आवडता सिद्घांत आहे. परंतु ते संपूर्ण सत्य नाही. खासकरून तमिळनाडूतील मतदार राजकीयदृष्ट्या अत्यंत सूज्ञ आहेत. गेली वीस वर्षे द्रामुक आणि अण्णा द्रामुक यांच्यात खो-खोचा खेळ चालू असला, तरी त्यापूर्वी १९७७ पासून १९८९ पर्यंत एमजीआर यांच्या नेतृत्वाखाली मतदारांनी स्थिर सरकार निवडून दिले होते, हे विसरून कसे चालेल. अगदी चित्रपट तारे-तारका निवडून आल्या तरी लोकांच्या हिताचे कार्यक्रम तमिळनाडूत तरी राबविले जातात एवढे सांगता येईल. शालेय विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन योजना असो किंवा आता काल जाहीर केलेली, बारावी संपताच थेट महाविद्यालयांतून रोजगार कार्यालयात नोंदणी करण्याची योजना असो, त्या राज्याने इतरांपेक्षा आघाडी घेतली आहे एवढे निश्चित.
  राहता राहिला भेटवस्तूंचा प्रश्न. महाराष्ट्रात गेल्या निवडणुकीत थेट पैसे वाटले होते, त्यापेक्षा ते बरे म्हणावे. (पुण्यात एका मतदारसंघात मतामागे ३,००० रु. वाटण्यात आले.) आणखी विशेष असा, की तेथील पक्षांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्ती केली आहे आणि ज्यावेळी ही प्रलोभने वावगी वाटली, तिथे ती मतदारांनी झिडकारल्याचेही उदाहरण आहे.
  या बाईपुरते बोलायचे झाल्यास अम्मांच्या विजयाचा लाभ घेऊन तिने डाव खेळला असण्याची शक्यता आहे. द्रामुक निवडून आला असता तरी तिने हेच केले असते, अन्यथा आणखी कोणी केले असते. दुर्दैवाने जयललितांना स्वतःचे असे कोडकौतुक करून घेण्याची खोड आहे आणि त्यासाठी त्या संधी शोधतच असतात. भाषेवरून जाळपोळ असो वा नेत्यांचे फाजील कौतुक असो, तमिळनाडूत घडलेल्या घटना काही वर्षांनी महाराष्ट्रात पाहायला मिळतात. त्यामुळे असे प्रकार इकडे घडणारच नाहीत, असे नाही.

  • देवीदास
   माध्यान्य भोजन वगैरे आपल्याकडे पण आहेच, पण अशा प्रकारच्या योजना व्यवस्थितपणे राबवण्याची राजकीय इच्छाशक्ती आपल्याकडे नाही, हे पण मान्य!
   स्थीर सरकारचा मुद्दा योग्य वाटतो. पण आपल्याकडे पण केंद्रात कॉंग्रेसचे स्थिर सरकार इतकी वर्ष होतं, पण खरा विकास जो झाला तो सारख्या संयुक्त आघाडीच्या सरकार निर्मिती नंतरच..’

 10. प्रतिक्रियेसाठी माझ्या मनात फक्त @#$#@$#@$@#$ येताहेत. आपण २०२० पर्यंत भारत सुपर पावर होण्याच्या बाता करतोय पण वास्तवता अशी आहे कि मंदी आलेली अमेरिका हि मंदी आलेल्या परिस्थितीतही भारतापेक्षा २५-३० वर्षांनी पुढे आहे. जो मुद्दा तुम्ही मांडलाय आणि जी आपली राजकीय परिस्थिती आहे ते पाहता सुपर पावर तर दूरच आपण एक प्रगत राष्ट्र तरी होऊ का याचीच शंका येतेय.

  • प्रगत राष्ट्र होण्याची ही लक्षणं नाहीत. आपला देश हा एकच देश असा असावा की जिथे दक्षिण भारतात सकाळी साडे पाच -सहा चा सिनेमाचा शो असतो, आणि लोकं तो पहायला पण जातात.

   सुपर पॉवर होण्याची फक्त स्वप्न पहाणं आपल्या हाती आहे. २जी, ३ जी घोटाळे, कलमाडी आणि असे अनेक नेते आहेत की जे काळ्यापैशांच्या राशीवर बसून राज्य करत बसले आहेत.

   सुपर पॉवर बनण्याची इच्छा फक्त सामान्य जनतेची आहे. आणि तिला राजकारणी लोकं ’स्वप्नं दाखवून’ जास्त हवा देतात. सुपर पॉवर होण्यासाठी काय करावे लागेल? त्याचा रोड मॅप वगैरे काही नाही.. फक्त सुपर पॉवर व्हायचंय म्हणे.. आणि आम्हाला सुपरपॉवर होणार ही स्वप्न दाखवणारे कोण?? तर निवडून आलेले काही गुंड मवाली , खूनाचा आरोप असलेले, , काळा पैसा बाळगणारे…… कारण त्यांना माहीत आहे की, काहीही असलं तरीही लोकांच्या मनात जर असे भाव जागृत ठेवले तरच विजय मिळेल ना निवडणूकीत!

  • geeta says:

   me sahmat aahe tumcya mahitin var..

 11. Rutuja says:

  Ha lekh vachun konala dosh dyava tech kalat nahi.ase lajirwane prakaran hovunahi jyachi laj vatavi tyala tya netyavarache prem samajnarya tya vyaktila ki ase krutya dolyandekhat hot asatana moog gilun gappa basanarya aviveki janatela…?Khare mhanaje apalya sabhovtali nivadnukichya veli 100-200 rupayanna aple mat vikanarya lachar janatecha rajkarani fayada ghetat.Tyanna unchavar pohochayla laganari shidi hi ashich lokanchya markatleelanchi tayaar hote.Misuddha aspas pahate ki aple rajkaran swaccha nahi mhanun anek sushikshit lok matadanach karat nahit.Kamit kami tya lokanni tari sudnyapana dakhavava !(Me ajun matadan karanyas patra nahi,Tarihi mazya vadildharyanna mazi namra vinanti….!)

  • ऋजुता
   तुझं वय जरी कमी असलं, तरीही मुद्दा अगदी योग्य आहे. सगळ्या लोकांनी मतदान करणे हा उपाय होऊ शकतो योग्य दिशेने जाण्यासाठी.
   पण.. इथे जो मुद्दा मांडलाय, तो असा:- की जसे आज एकाने जिभ कापली, उद्या जर अजून हजार लोकांनी जिभ कापली, तर त्यांना सगळ्यांना काय एक लाख रुपये आणि नोकरी देणार आहेत का हे लोकं?
   जीभ कापणे ही काय नोकरी मिळण्याची योग्यता ठरू शकते का?
   जर कोणी उद्या हाताची बोटं कापली, तर त्याला किती पैसे मिळतील? आणि नोकरी मिळेल का??

   हा जो पायंडा पाडला जातोय, तो अयोग्य आहे हे मला म्ह्णायचं होतं.. बस्स!

 12. mynac says:

  दक्षिणेकडच्या लोकांना राजकीय परिपक्वता थोडी कमीच आहे अशी शंका नेहेमीच येते मला!
  महेंद्रजी अजून हि शंकाच ?…अहो मठ्ठ आहेत ते मठ्ठ.अन ते फक्त सिनेमा वेडे नसून वेडे सिनेमे काढण्यात पण पटाईत आहेत.दशका नु दशके तेथे ठराविक पक्षच सत्तेत येतात स्वतःच्या तुंबड्या भरत रहातात नि अशिक्षित अडाणी जनता त्यांच्या मागे येड्या सारखी धावत रहाते नि हे दुष्ट चक्र सुरूच रहाते.
  असं म्हणतात कि मनुष्य जन्म म्हणे अनेक योन्या पार केल्या नंतर येतो, पण ज्या देशात माणूस म्हणून जगायला न लायक असलेल्या लोकांचीच जिथे भरताड होऊन बसली आहे तेथे कथा पुराणातल्या ह्या असल्या विधानावर विश्वास ठेवायला मन कचरते.अन राजकारणाचा जेव्हा धंदा झाला नि त्यात भांडवल घुसले तेव्हा तर त्याचे पुरते वाटोळे झाले आहे. काळाचा महिमा म्हणायचं नि दुसर काय?

  • “शंका” हा शब्द लिहिला, कारण खात्री असली तरीही तसं लिहायला की बोर्ड धजावत नव्हता.. राजकारणाचा जेव्हा धंदा झाला नि त्यात भांडवल घुसले तेव्हा तर त्याचे पुरते वाटोळे झाले आहे. ह्या गोष्टीशी पुर्ण सहमत. आजही लोकं आपला फुलटाइम धंदा करून बसले आहेत राजकारण म्हणजे.

   गोस्वामी नावाच्या एका मुलाने आरक्षणा विरुध्द्द स्वतःला पेटवून घेतले होते. किती लोकांना हे आठवतं आज?? एखाद्या व्यक्ती ने अशा मास हिस्टेरीया पासून स्वतःला कसे वाचवावे ह्याचे वर्ग शाळांमधे सुरु करायला हवे असे वाटते मला.

 13. Ashwini says:

  Tollywood ch saglach solid ast…..cinema=tamilnad….baapre faarch horrible astat hi lok….

  • अश्विनी
   केरळ त्यातल्या त्यात बरं म्हणायचं. पण आंध्रा, किंवा तामिळनाडू तर फारच वैचारीक दृष्ट्या मागासलेले वाटतात .

 14. Ninad says:

  “दक्षिणेकडच्या लोकांना राजकीय परिपक्वता थोडी कमीच आहे अशी शंका नेहेमीच येते मला”

  Yabaddal Dumat Nahi

  “बरेचदा तर आपण लोकशाहीला लायक आहोत का असाही प्रश्न पडतो”.
  Jeva keva Kokshahi cha vishay mitranmadhe nighto, teva mi hech mat mandto ki apli janata ajun Lokshahi sathi yogya nahi. Pahile tila tya level la anave lagel, nahitar lokshahi keval paperwar, pratykhat matra Gharaneshahich chalanar

 15. nilesh says:

  well, Its really irritating…
  But I am surprised about the South Indian peoples mentality…means literacy rate of the south Indian states are highest in India. we can say half of the IT business in India depends on south Indian people. Its terrible to know that these kind of people lives in south India.

  • तिथे पण एक्स्ट्रीमिटी आहेच.. काही लोकं एकदम तळागाळात रुतुन बसले आहेत,. आयटी बिझीनेस इतका काही त्यांच्यावर अवलंबून नाही असे मला वाटते. मराठी मुलं फार जास्त आहेत आय टी मधे.

  • geeta says:

   mr. nilesh 70 parsent your rite but. political yeahs inter fair that themain problem …

 16. हे सार बदलाव म्हणूनच तर आपली धडपड. माणसाच्या कुठल्याही कृतीमध्ये श्रध्येपेक्षा स्वर्थाचाच भाग अधिक असतो.

  • स्वार्थासाठी लोकं काहीही करू शकतात. काही दिवसापूर्वी एका चहावाल्याने आपली जीभ कापली, एकाने पेटवून घेतले होते, असे झाल्यावर राजकीय नेत्याने तरी कमीतकमी परीपक्वतेने वागावे इतकी किमान अपेक्षा ठेवायला काय हरकत आहे?

 17. खरं आहे. अम्माने निवडणूक जिंकल्यानंतर तर लॅपटॉप, गाई, मिक्सर असे काय द्यायचे वचन दिले होते. ही जीभ कापण्याची बातमी वाचून वेडा व्हायची पाळी आली होती. त्यावरून गेले दोन दिवस मी माझ्या टीममध्ये असलेल्या तमीळ माणसाला छळला पण तिथे हा प्रकार नवीन नाही. YZ लोकं आहेत सगळी.

  • सिद्धार्थ
   मला पण इतक्या उघडपणे चालणारा हा प्रकार पाहूनच थोडा संताप येत होता.. जीभ कापल्याचे वाचले आणि संतापाचा स्फोट झाला.

 18. tejaswini joshi says:

  kaka;
  tyanchyakadech kashala aaplyakadil grampanchayat nivadnukitsudha asale prakar ghadatat. fakt tikade te rajrospane ghadatat aani aapalyakade matadanachya ek divas
  aadhi dusarya pakshatil lokana ratrabhar paise vatun mate firavali jatat.
  maharashtra yahi babtit kuthehi mage nahi.

 19. tejaswini joshi says:

  kaka,
  tyanchyakadech kashala,aapalyakade he prakar grampanchayat nivadnukit hotat.
  nivadnukichya ek divas aadhi opp. pakshatalya lokana ratrabhar paise vatun mate firavali jatat.maharashtra yahi babtit kuthehi mage nahi.fakt tyanchyakade te prakar
  rajrospane ghadatat etakech.

 20. Smita says:

  yes maharashtratahee he prakar chaltaat . per person 1000 rupaye asa ‘rate’ hota gelya veLee puNyajavaLachay kheDyanmadhye.
  tikaDe sagaLyach goshTee ‘loud’ prakarat moDataat – cinematale tyanche topics, kapaDe, expressions, romance… ekuN ek hysterical prakar asato. tyanchee taste ch loud ahe . tyamuLe he ase navas puN atatayeech. puN kuNeehee tya baila thmbavala nahee he atee ahe.. mala asa vaTata kee ithe kaheetaree restrain kela gela asata. aNee agadee jebh kapepryant lok baghat basale nasate. tevaDhya bateet apun thoDe vegaLe ahot tyanchya peksha. bhrashTacharat apalya lokanna muLeech kamee samajayacha karaN nahee , atyanta nirlajja lok apuN roj vartamanpatratun muktaphaLe udhaLatana pahatoch nahee ka?

  • स्मिता
   महाराष्ट्रातच काय पण सगळ्याच ठिकाणी हे चालतं, पण चक्क जाहीराती देऊन??? इतक्या उघडपणे?? एखाद्या नेत्याने जर सगळ्यांना ह्या गोष्टी दिल्या तर ते कायदेशीर कसं ठरू शकतं?

   आणि हो, भ्रष्टाचारात महाराष्ट्रात बरेच हिरे आहेत.. 🙂 सगळ्यात पुढे…

 21. स्नेहल says:

  काका खरच माणसांनी आपली विवेक बुद्धी गहाण टाकली आहे, आणि याच गोष्टीचा फायदा इतर लोक सहज घेतात, एक सोडून हजार उदाहरणे सांगता येतील, कधी कधी काही लोकांना समजावणे म्हणजे आपण का इतका मूर्खपणा करतोय आणि आपले डोके खपव्तोय असे वाटते

  • स्नेहल,
   मानवी मन म्हणजे शेवटि असंच असतं, काहीतरी विचार सुरु असतात मनामध्ये.. सारखे.. त्यावर कंट्रोल ठेवणे महत्त्वाचे..

 22. Srinivas says:

  Ha lekh purnpane ektarfi aahe.

  NTR jevha aala hota tevha Congress sa paryay navhta. Nahi tar Chiranjeevi la ka lonki nakarave?

  Jayalalitha (tee kasi ka asena), her Existence in politics is not because she was any famous actress, but it was since she was the second in commond after MGR.

  To understand MGR-Karunanidhi-Jayalalitha one should watch Iruvar movie direceted by acclaimed director ManiRatnam.

  Didn’t we see Amitabh defeating mighty Bahuguna.

  Whoever says South is backward has to do introspection…(Response to अश्विनी
  केरळ त्यातल्या त्यात बरं म्हणायचं. पण आंध्रा, किंवा तामिळनाडू तर फारच वैचारीक दृष्ट्या मागासलेले वाटतात.)

  The politics in other states is no great (e.g. Aadarsh Gotala, fanatic Shivsena/MNS, etc)

  Yes south people are mad after movies. They have great film industry with all kind of movies masala, art, intelectual, scifi (many times better than Hindi movies).

  The remakes of all those movies in Hindi are being enjoyed by Marathi folks (Agdi Mitkya maarat…) Marathi folks don’t like Marathi cinema And they enjoy all the dubbed movies in SetMax & Zee Cinema.

  Why don’t you foget many marathi families have lost everything behing Lavani & Tamashas. Marathi Cinema could never grow beyong Tamasha.

  I am not supporter of any political party. But it hurts if you write bad about any community.

  -Srinivas

  • Srinivas says:

   Sorry for the some spelling & grammar mistakes. I wrote this reply in a hurried manner. No intention to hurt anybody. However I am hurt.

   I know both Marathi & Telugu. I love both the lanuages, love bothe the states.

   I consider myself Indian first. And proud to be an Indian. I do not hate or to criticize fellow Indians.

   • Srinivas says:

    Kahitarich…

    Ekaa murkh baeene Jibh kay kapli… Lok purn south India la criticize karu lagle.

    • श्रीनिवास

     तरीही मी स्वतःला जे काही वाटतं ते वर लिहिले आहे, कदाचित चुकीचे असेल पण लिहितांना स्वतःशी प्रामाणिक राहून जे वाटले ते लिहिले आहे. जेंव्हा ते जीभ कापल्याचे वाचले, तेंव्हा पासूनच डोकं थोडं बिथरलं होतं.. त्या भरात जे काही मनात आलं, ते लिहीत गेलो. राजकुमारच्या वेळेस मी स्वतः कर्नाटकात होतो, स्वतः सगळं पाहिलं आहे..

     जे काही लिहिले आहे, ते त्या क्षणी ( म्हणजे लिहितांनाचे) मनातले विचार आहेत. कोणाला दुखवण्याचा उद्देश नव्हता. जर तुम्ही दुखावला गेला असाल, तर क्षमस्व!

     माझा मुळ मुद्दा होता, तो जेंव्हा एक सायकीक बाई आपली जीभ कापते, तेंव्हा त्या प्रसंगी राजकीय नेत्याने कसे वागायला हवे? या घटनेचे उदात्तीकरण न करता, ( जेणेकरून इतर लोकं असे काही करायला धजावणार नाहीत) विचारपूर्वक निर्णय घेतील..

     पण तसे झाले नाही.. याचे दुःख आहे. असो. ब्लॉग वर स्वागत, आणि प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार.

     • Srinivas says:

      HI Mahendra,

      मी ब्लॉग वाचुल तितका नाही दुखावालो जीतका की लोकांच्या प्रतिक्रिया वाचून …

      त्यातल्या त्यात तुम्ही जो ‘मागासलेले’ हा शब्द वापरला. …असो

      In my opinion many times being honest with ourselves would not be enough..especially when we are writing for others to read. Please think over.

      Thanks for your reply.

      I got to know about the wordpress & Marathi blogs few weeks back. Since then I am reading most of the blogs. I really enjoyed most of your blogs. You’d say I did not appreciate that time & now I am complaining 🙂 )

      -Srinivas

      • श्रीनिवास
       काही हरकत नाही.या पुढे तुमची कॉमेंट मॉडरेशन साठी थांबवली जाणार नाही. वरच्या कॉमेंट मधलं थोडं जास्तच पर्सनल माहीती लिहिली होती, ती एडीट केली आहे. 🙂
       कम्प्लेंट केली तरीही काही हरकत नाही. विचार वेगवेगळे असू शकतात, आभार!

 23. prachi says:

  मला कधी कधी असे वाटते कि लोकशाही साठी जो मुलभूत वैचारीक पाया आवश्यक आहे त्याचा आपणा भारतीयांमध्ये अभाव आहे!
  बाकी आपला लेख नेहमीप्रमाणेच सुंदर आणि नेमका!

  • प्राची
   ब्लॉग वर स्वागत..
   २१ व्या शतकात आपण कुठे जाणार हेच समजत नाही मला.. कुठल्याही घटनेकडे पहाताना आपण त्रयस्थ पणे पाहूच शकत नाही. आपण स्वतःला कुठेतरी कोरीलेट करतच असतो. ही घटना वाचताना पण मनात कुठेतरी एक सल होताच.
   ज्या देशातले लोकं साधं मतदान करायला पण जात नाहीत, तो देश लोकशाहीचा व्यवस्थित वापर करून घेण्यास लायक आहे असे मला पण वाटत नाही.

   • prachi says:

    मतदान न करण्याचे एक कारण उपलब्ध पर्यायांमध्ये योग्य नेतृत्वाचा अभाव हेही असू शकते! पण या साऱ्याच्या मुळाशी सुमारे एक किंवा दोन पिढ्यांपासून आपल्या साऱ्यामध्ये वाढीस लागलेली “मला काय त्याचे” ही प्रवृत्ती असावी! आणि खरेच भविष्याबद्दल चिंता वाटावी अशीच परिस्थिती आहे!

 24. काका, खुपच उशीर झाला कमेंट टाकायला. त्याबद्दल आधी सॉरी. लॉंग विकांतामुळे सगळं निवांत होतं 🙂

  लेख पूर्ण पटला हे तर सांगायला नकोच. कोणी काहीही म्हणो पण मद्रासी (दक्षिणेच्या चारी राज्यातले ) लोकं निर्बुद्ध असतात याबद्दल माझ्या मनात कणभरही शंका नाही. सिनेकलावंतांची देवळं, त्यांचे मोठमोठाले फॅन क्लब्ज, अतिरेकी-निर्बुद्ध चित्रपट, ते डोक्यावर घेऊन नाचणारे प्रेक्षक, आत्यंतिक पराकोटीचं भाषाप्रेम आणि त्यासाठी इतर एकूण एक भाषेचा द्वेष, प्रत्येक निवडणुकांत केल्या जाणाऱ्या मूर्खासारख्या पांचट घोषणा, आरक्षणाच्या अतिरेकी कल्पना आणि त्यांची अंमलबजावणी या आणि यासारख्या सगळ्या गोष्टींवरून त्या जनतेचा एकत्रित आय-क्यु किती असू शकतो याची कल्पनाच केलेली बरी. त्यामुळे अशा राज्यांमध्ये जीभ, नाक, कान, केस, बोटं, अंगठा, ओठ वगैरे कापून देऊन त्याचं भांडवल केलं जातं याबद्दल काहीही आश्चर्य वाटत नाही. कारण हे सारं त्यांच्या दृष्टीने योग्यच चालू आहे !!!

 25. geeta says:

  kaka………..
  aandhr aprdesh aani cheenai, kerla hya tikani nat natina devach mantat,,, konte bhoot shirle te tahuk nahi, aani cinema hit aaso wa flop tari ped khaun yed gavala jatat. aani ha tar sangitacha public stunt samju kahi kala sathi kiva. paisa milvnya pothi hi tine aase kele aasel.aani tyat jay lalita tar aajunch mahan……….he prakarn mediya wale uchlun dhrench jasa aamir khancha ek move ala hota peepli live tashi hi gosht jhali aahe.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s