परवाचीच गोष्ट आहे. निरजाच्या स्टेटस वर वाचलं की तिचा लग्नाचा वाढदिवस आहे. अर्थात तिने सरळ तसं लिहिलं नव्हतं, पण जे काही लिहिलं होतं, त्यावरून मी हा अर्थ काढला , आणि तिला सेल फोन वरूनच काँग्रॅच्युलेट करणारा मेसेज टाकला. थोड्याच वेळात तिचं उत्तर आलं- कॉग्रॅच्युलेशन्स कशाबद्दल?? बरं ही कॉमेंट वाचूनही माझ्या डोक्यात तसा काही प्रकाश पडला नाहीच. म्हंटलं, तुझा आज लग्नाचा वाढदिवस आहे ना, म्हणून मी अभिनंदन या शब्दाचं इंग्रजीत कॉंग्रॅच्युलेशन्स लिहीलं. सेल फोन वर मराठी टाइप करता येत नाही म्हणून इंग्रजी मधे.
त्या नंतर एक-दोन दिवसानंतर तिचा एक मेसेज आला, त्यात लिहिलं होतं “शुभेच्छा” आणि माझी एकदम ट्युब पेटली- अरेच्या.. तिचा लग्नाचा वाढदिवस, आणि मी वेड्यासारखं अभिनंदन काय करतोय?
शुभेच्छा देतांना पण आपण इतक्या मेकॅनिकल पद्धतीने देतो की आपण कुठला शब्द वापरतोय, आणि त्याचा काय अर्थ निघेल या कडे आपले लक्षच नसते. बरेचसे शब्द असेच नकळत वापरले जातात- नको त्या ठिकाणी. आपण अजिबात विचार न करता त्या क्षणी आठवेल तो शब्द लिहत असतो. म्हणजे याचा अर्थ आपण मनापासून शुभेच्छा देत नाही असा होतो का? नाही तसे नाही वाटत मला.
ही अशी चूक बरेचदा केल्या गेलेली दिसते. आता हेच पहा नुकतीच एक बातमी वाचली, ” जगदीश खेबुडकर यांचे दुःखद निधन” – आता हे सांगा, की निधन हे कोणाचेही असो, नेहेमीच दुःखदच असते, तेंव्हा ’दुःखद’ निधन हा शब्द वापरायची गरज खरंच आहे का? आणि नंतर पुढे दळण दळल्या सारख्या “मृतात्म्यास शांती देवो , त्यांच्या मागे एक मुलगा, दोन मुली, एक सुन आणि बारा नातवंडं असा परिवार आहे”अशाही ओळी लिहिलेल्या असतात. कोणी मृत्यु झाला की , कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण होते ( कुठे??? ) मला वाटतं की पेपरवाल्यांचा बातमीचा फॉर्मॅट पक्का असतो, फक्त मधली नावं बदलली की झालं ! बातमी छापायला तयार!
कोणीतरी एक जण बझ किंवा फेसबुक वर एक पोस्ट टाकतो, आणि इतर सगळॆ जण मृतात्म्यास शांती मिळो म्हणून खाली कॉमेंट टाकतात . ब्लॉग वर पण असंच काहीतरी पोस्ट लिहीण्याची टूम निघाली आहे. ( मी पण असे एक दोन पोस्ट्स टाकले आहेत पूर्वी) 🙂
” मृतात्म्याला शांती देवो” वाचलं, की मला एक प्रश्न नेहेमी पडतो- ’आत्मा ’हा ’मृत’ कसा काय होईल बरं? मृत शरीर असतं आत्मा नाही. आणि जरी समजा मान्य केलं , की आत्मा मृत झाला, तर मग त्याला शांती कशाला हवी ? कोणाचा मृत्यु झाला की अशी ठरावीक वाक्य बोलायची पद्धत आहे. काही शब्द उगाच आहेत म्हणून वापरायचे असा प्रघात पडलेला आहे.
मौंजी मधे तर बटूला शुभाशीर्वाद देण्याची पद्धत आहे. आता आशीर्वाद हा ’शुभच’ असतो नां?? मी आजपर्यंत कोणी कोणाला ’वाईट’ आशीर्वाद दिलेला ऐकला नाही, मग ’शुभाशीर्वाद’ लिहीण्याची खरंच काही गरज आहे का ? नुसता आशीर्वाद लिहीला तरी पुरेसा आहे.
लग्नाच्या शुभेच्छा देणाऱ्यांचे दोन गट असतात- एक म्हणजे लग्न झालेले, जे म्हणत असतात की चला बरं झालं, सारखा ट्रेकिंग काय, भटकणं काय … सुरु असायचं आता, आता लग्न झालं की हा पण आपल्यासारखाच होणार म्हणून आनंदी होणारे, आणि दूसरे म्हणजे लग्न न झालेले ” च्यायला, साली मजा आहे याची आता,मस्त, बायको येईल , छान छान पदार्थ करून खाऊ घालेल आणि इतर मजा तर आहेच” असं म्हणणारे ( घी देखा लेकीन बडगा नहीं देखा या प्रकारातले )लोकं. लग्नात विश यु हॅप्पी मॅरीड लाईफ म्हणून शुभेच्छा देण्ण्याचा प्रघात आहे. आता लग्न केलं ते काय दुःखी व्हायला का?? सुखी रहायलाच लग्न केलंय की राव, मग ह्या कसल्या शुभेच्छा?
एखादी आजी ’नांदा सौख्य भरे” म्हणून तोंड भरून आशीर्वाद देतात तेंव्हा त्यांच्या वैवाहिक आयुष्यातल्या सगळ्या कडू गोड घटनांचा पाढा त्यांच्या नजरेसमोरून जात असेल , आणि आपण स्वतः किती आनंदाने , सौख्यभरे नांदु शकलो ते आठवत हळूच पदराने डोळे टिपते, यावर माझ्या बायकोच्या कवितेच्या दोन ओळी लिहीतो..
“मग हळूच उघडला तिच्या ह्र्दयातला चोर कप्पा…..
बिलोरी वर्खाच्या त्या कप्प्यात….
होत्या खूप आठवणी
आठवली तिला गमतिची स्वतःची लग्नानंतरची पाठवणी
आयुष्यातल्या बेरजेचा न चुकता हिशेब सांगत होती….
जिवनाची वजाबाकी मात्र डोळ्यांच्या कडातुन सांडत होती”
३१ डिसेंबर पासूनच शुभेच्छा देणारे एसएमएस सुरु होतात. दुपारी तीन वाजता एसएमएस येतो, की अजून ९ तासांनी नवीन वर्ष सुरु होणार आहे, आणि मी तुला पहिला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ( हार्दिक म्हणजे काय विचारू नका राव!) देणारा पहिला असावा, म्हणून तुला हा मेसेज पाठवलाय. वाह, क्या बात है, असा मेसेज पाहिला की मला तर एकदम भरून येतं- 🙂 बरं ह्या व्यतिरिक्त कमीत कमी २००-२५० लोकं तरी शुभेच्छांचे एसएमएस पाठवतात. इतके मेसेजेस आल्यावर सगळ्यांना आपल्याला पटत असो किंवा नसो, सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्युत्तर पाठवावेच लागते . मग एकाची टॊपी दुसऱ्याला या उक्ती प्रमाणे एकाचा मेसेज दुसऱयाला, दुसऱ्याचा तिसऱयाला अशा प्रकारे आपणही या मेसेजेसच्या खेळीमधे अडकले जातो- शेवटी फायदा होतो तो सेलफोन कंपन्यांचा.
तरूणांमधे अजूनही कार्ड देण्याची क्रेझ आहेच. आर्चीस चे कार्ड्स तर लग्न होण्यापूर्वी बरीच वर्ष आणि झाल्यावर पहिल्या वर्षी तरी नक्कीच वापरले जातात. 😉 नंतर मग ’जाने कहां गये वो दिन… ’ असं होतं- किंवा जर कौतुकाने बायको साठी कार्ड आणलं, तर आधी उलटं करून आर्चीस चं आहे का ते पहाणार, आणि मग आतला मजकूर वाचणार, आणि मग जर समजा, ’आर्चीसचं’ असेल तर कशाला तू उगाच शंभर रुपये खर्च केलेस? त्या पेक्षा आईस्क्रिम आणलं असतं तर……. असं म्हणणार………….! 😀 😀
नवीन वर्ष!!काही लोकं आवर्जून हा मेसेज पाठवतात, की आम्ही हिंदू आहोत, आणि आमचे नववर्ष गुढीपाडव्याला सुरु होते,आणि म्हणून आम्ही शुभेच्छांची देवाण घेवाण करत नाही. असा मेसेज पण बऱ्याच लोकांच्या फेसबुक स्टेटस वर दिसतो. हे असं लिहील्याने काय साध्य होते तेच मला समजत नाही. जर तुम्हाला लोकांनी”नववर्ष सुखाचे जावो” म्हणून शुभेच्छा दिल्याच, तर अंगाला काय भोकं पडणार आहेत का? नाही ना? मग त्या शुभेच्छा सेव्ह करून ठेवा आणि मग गुडीपाडव्याला पुन्हा एकदा वाचा नां… किंवा फारच झालं, तर आलेल्या शुभेच्छा, तर डीलीट करून टाका. हे असे संदेश स्टेटस वर टाकून खरंच काय मिळवलं जातं ? जग जर मानत असेल तर ठीक आहे… मानू द्या नां!!मी स्वतः आर एस एस चा आहे, तरी पण हे इथे लिहतोय !मुळातच आपण उत्सवप्रिय आहोत. कुठलाही प्रसंग आपल्याला सिलेब्रेशन साठी चालतो.
बरं एक जानेवारीला नववर्ष झालं, की पुन्हा मग गुढीपाडव्याला पुन्हा शुभेच्छांची देवाण घेवाण होतेच, नंतर बलीप्रतीपदेला पुन्हा एकदा, व्यापाऱ्यांचे नवीन वर्ष म्हणून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातातच . अरे किती वेळा नववर्ष साजरे करायचे?? काही लिमीट आहे की नाही?? जर तुमचे कोणी इतर मित्र मैत्रीण असतील,तर पटेटी -पार्सी नव वर्ष, वगैरे आहेतच. ३१ मार्च नंतर एप्रील मधे पुन्हा नवीन फायनान्शिअल इयर सुरु झालं म्हणून शुभेच्छा देणारे इ मेल्स येतात. अरे किती वेळेस नववर्ष साजरं करायचं हेच मला समजत नाही.
जयंती आणि पुण्यतिथीबाबतही शुभेच्छा देण्याची पण पध्दत निघाली आहे. जो माणूस जायचा तो गेला. खूप मोठा माणूस होता, त्याने सामाजिक कार्य पण केले, जिवंत असतांना त्याचा खूप लौकिक होता , पण अजूनही जयंतीच्या शुभेच्छा कशाला ? एखाद्याला सहज विचारून पहा जयंती म्हणजे काय ते? माहीत नसेल!
हॅपी बर्थ डे, किंवा मेनी मेनी हॅपी रीटर्न्स ऑफ द डे या घासून घासून गुळगुळीत झालेल्या शुभेच्छांच्या ओळी खरंच जर मनापासून दिल्या ना, तर सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. माझ्या मते वाढदिवस म्हणजे आयुष्यातले एक वर्ष संपले, कमी झाले, याची आठवण करून देणारा दिवस , किंवा आज डायटींग विसर आणि भरपूर केक खा म्हणून सांगायचा दिवस- आणि त्याच बरोबर आता तू मोठा झालास, सुज्ञ झालास, थोडं वैचारिक उत्थापन ( शब्द बरोबर असावा) होऊ दे तुझं. जरा बाष्कळ विनोद करणं बंद कर, वयाप्रमाणे वागत जा.. हे सगळं सांगणारा दिवस! या दिवशी मात्र आपल्या संपर्कात असलेल्या प्रत्येकाला आपण शुभेच्छा या द्यायलाच हव्या असे माझे प्रामाणिक मत आहे. पण नेमकं इथे पण लोकं शुभेच्छा देण्याचा कद्रुपणा करतांना दिसतात.
काही लोकांना कुणाचा हात किंवा पाय फ्रॅक्चर झाला की खूप मजा वाटते. मग त्याला भेटायला गेल्यावर त्याच्या प्लास्टर वर गेट वेल सुन, एक स्मायली, वगैरे काढतात. इतपत शुभेच्छा देणे असेल तर ठीक आहे, पण जेंव्हा कोणी आजारी पडतो , आणि त्याला दवाखान्यात ऍडमीट केल्यावर भेटायला गेले, की त्यांच्या कोणातरी जवळच्या नातेवाईकाला किंवा मित्राला तरी हाच रोग झालेला असतो आणि तो जेंव्हा सांगतो की ” आमच्या काकांचं पण असंच झालं होतं” आणि ते आठच दिवसात गेले बरं का” तेंव्हा हा माणूस शुभेच्छा द्यायला आला, की मानसिक त्रास द्यायला असा संशय येतो..
हे सगळं वाचल्यावर आता खरंच ह्या शुभेच्छांना आवरा म्हणायची वेळ आलेली आहे असे वाटते की नाही? जर द्यायच्या असतील तर खरंच फोन करा, मनापासून शुभेच्छा द्या.. अशा वर वरच्या नकोत..
(संदर्भ :- मित्राशी मारलेल्या गप्पा )
छान लेख ,आवडला!!!!:))
धन्यवाद..
हाहाहा.. मस्तच.. शुभाशिर्वाद वरून ‘पाठीमागची बॅकग्राउंड’, ‘Reply back’ वगैरे आठवलं :))
असे खूप शब्द आहेत. बोलतांना जास्त विचार न करता बोलल्या जाणारे.
……” मृतात्म्याला शांती देवो” वाचलं, की मला एक प्रश्न नेहेमी ….
मी कुठल्याश्या चित्रपटात ऐकलं होतं – एक साधू कोणाच्यातरी मृत्यूची बातमी ऐकून – “स्वर्गं गच्छती पुण्यात्मा” – अशी प्रतिक्रिया देतो.
अभिषेक
ब्लॉग वर स्वागत!
प्रतिक्रियेसाठी आभार.
Great article.
Atmyaas shanti he observation mast ch.
Jar hindu tatvagyan ghetale tar atmyala ‘sadgati’ laabho ase mhanayala have.
Mhanaje janm mrutyu chya chakraat tyala uttam gati laabho.
Shanti laabho.. Kinva Rest in peace is Christian concept where souls are believed to wait infinitely for the DAY.
आत्म्याला सदगती लाभो हे पण म्हणताना ऐकलं आहे.
’शांती लाभो’ हे ख्रिश्चन कन्सेप्ट वर आधारीत आहे हे लक्षात आलं नव्हतं
मस्त झाला य लेख. बर्याच गोष्टींचा लॉजिकली विचार होतच नाही. एसएमएस सेवेमुळे रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या देखील शुभेच्छा येतात. आत्ता हळूहळू बैलपोळा, नागपंचमी आणि वटपोर्णिमेच्या शुभेच्छापण येतील.
कविता छानच आहे.
बैलपोळा – हे हे हे सर्व गाई बैलांस बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
बैल पोळ्याच्या शुभेच्छा वाचल्या होत्या कुठल्यातरी ब्लॉग वर . आता ब्लॉग पर्यंत तर पोहोचल्या आहेतच या बैलपोळ्याच्या शुभेच्छा, लवकरच सेल फोन वर पण पोहोचतील, आणि एकदा सुरु झालं, की साथीच्या रोगाप्रमाणे पसरत जाईल.
अंधश्रद्धा निर्मुलन समितीत असताना ’शुभ” शब्दाच एवढ वावडं कि वार्तापत्राच्या जाहिरातीत देखील शुभेच्छा शब्दा ऐवजी सदिच्छा शब्द जाणीवपुर्वक वापरला जातो. शुभेच्छा शब्द वापरणारा अंधश्रद्धाळु.
प्रकाश
खरं आहे. :०
“आधी उलटं करून आर्चीस चं आहे का ते पहाणार, आणि मग आतला मजकूर वाचणार, आणि मग जर समजा, ’आर्चीसचं’ असेल तर कशाला तू उगाच शंभर रुपये खर्च केलेस? त्या पेक्षा आईस्क्रिम आणलं असतं तर……. असं म्हणणार………”
लॉल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्झ……. दादा खरेच ह्या पोरी अश्याच असतात राव!!!!!!!, लग्न झाले नाही की “सेव्हिंग” “पुढचे बघा” “नीट वागा” वगैरे सुरु होतेच!!!! नसता पोक्तपणा आणल्यागत, आपण बापेलोक तर लग्न झाल्यावरही बहुदा १-२ वर्षे “खुले सांड” फ़ेझ मधे असतो बहुदा…..!!!!!!!, नेहमीप्रमाणे लेख काय वाटेल ते आहे पण जबराट आहे
गुरु
बघ, तुला पण अनुभव येईलच.. 😀
असे विनाकारण खर्च अजिबात आवडत नाही केलेले. 🙂
मृतात्मा शब्दाबद्दल मी देखिल आधी हेच म्हणत असे…आत्मा मृत कसा?
पण नंतर लक्षात आलं की मृतात्मा ह्या शब्दाचा संधि हा मृत आत्मा असा नसून मृत व्यक्तीचा आत्मा..जो शरीर सोडून गेलाय…तो इथे तिथे भरकटत राहू नये(हे सगळं मानण्यावर आहे बरं का) म्हणून त्या सदिच्छा…मृतात्म्यास शांति लाभो,सद्गती लाभो इत्यादि.
लग्न झालेल्या वधुवरांना आशीर्वाद द्यायचाच झाला तर तो….
नांदा सौख्यभरेच्या चालीवर..भांडा सौख्यभरे असा द्यावा. 😉
कारण ज्यांचे आपापसात कधीच भांडण होत नाही असे एकही जोडपे ह्या पृथ्वीतलावर नसेल.
हे भांडा सौख्यभरे मस्तच आहे. भांडल्या शिवाय काही मजा पण नाही आयुष्यात. दररोज इतकी वर्ष एकत्र रहायचं, मग बहूतेक सगळे विषय चर्चेला घेऊन संपलेले असतात. कुठले विषय टाळायचे, कुठल्या विषयावर बोलायचे, सगळे काही समजलेले असते. मग अशा वेळी हे भांडण म्हणजे पण एक विरंगुळा असतो असे मला वाटते.
म्हणूनच काही कारण नसतांना पण भांडणं होतातच नां..
ek check list madhala tick mark kelyasarakhya shubhechcha yetaat aajkaal.
aNee te navavarshache sandesh tar “avara” asataat kahee veLa. ekda eka junior team valyane ‘forward’ chya ghai ghai madhye malach “let me seize this magical moment with you… and wish you.. vagaire vgaire ” paThavla hota:-) chakaNee zale thoDa veL. :-)mug tyala vicharla, kay re nakkee kuNala paThavayacha hota . bichara “sorry sorry” palikade kahee bolu shakala nahee..
ekda eka rajakiya manchavarun ( local) vaDHadivasanimittta netyala shradhdhanjali vahilelee puN mee vachalelee ahe…
yes cell phone walyancha sagaLyat jasta fayada hoto ya prakarat.
हा हा हा.. वाढदिवसाला श्रद्धांजली.. प्रचंड आवरा आहे.
काही गोष्टींचा आता अतिरेक झाल्याने नकोसं वाटतं. एसएमएस मधे माझ्या मुली तिस रुपयांचे कार्ड घालतात, त्या मधे १००० मेसेजेस फ्री असा काहीसा प्लान आहे. सारखे मित्रमैत्रीणींना मेसेजेस सुरु असतात. म्हणते की बोलण्यापेक्षा स्वस्त पडतं..
सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्युत्तर पाठवावेच लागते . I totally agree with this kaka.. well said…
मग एकाची टॊपी दुसऱ्याला या उक्ती प्रमाणे एकाचा मेसेज दुसऱयाला, दुसऱ्याचा तिसऱयाला अशा प्रकारे आपणही या मेसेजेसच्या खेळीमधे अडकले जातो- शेवटी फायदा होतो तो सेलफोन कंपन्यांचा. +1
सीया
हे मेसेज मेसेज खेळायचा जाम कंटाळा आहे मला. पण जर उत्तर पाठवलं नाही, तर अरे एक रुपया पण खर्च करू शकत नाहीस तू? असे म्हणून ठणकावणारे मित्र पण आहेत. एकदा एका मित्राने असाच फोन केला, आणि माझ्या लक्षत आलं की त्याला वाईट वाटलंय म्हणून हल्ली सगळ्यांना उत्तर देतो.. काय करणार? समाजात रहायचंय नां.. सामाजिक बांधिलकी हा शब्द म्हणूनच वापरलाय.
nice 🙂
शेवटची ओळ महत्वाची.
शुभम
आभार.. पण त्या प्रमाणे वागता येत नाही हे मात्र नक्की खरं. सामाजिक बांधिलकी म्हंटलंय ना वर.. म्हणून१
काका मला कालच्या मान्सून शुभेच्या आठवल्या, हा हा हा हा
छान आहे लेख, पण खरच सांगू तुमच्या लेखातून जे वाचते त्याचे मी रिअल लाइफ मध्ये अनन्याच प्रयत्न करते जेवढा जमेल तेवढा, २० % – ४०% ( बाकी आदत से मजबूर) वगैरे कारण मला त्या खरच पटतात
स्नेहल
बरेचदा मेसेज पाठवणाऱ्यांच्या भावना पण असतात त्या मागे. आपल्या आनंदात कोणाला तरी सहभागी करून घ्यावं ही भावना असते. मेसेज किंवा एसएमएस कडे एकदम दुर्लक्षुन किंवा त्याला अगदी खालच्या दर्जाचे म्हणून ट्रीट करूनही चालणार नाही हे पण लक्षात घे. तू मला एसएमएस पाठवला, त्यामागची भावना पण होती ना< की आपल्या आनंदात सहभागी करून घ्यायची??
शुभेच्छा.. लेख छान झालाय 😉
शुभेच्छा देण्याचा प्रघातचं आहे हल्ली, हैप्पी शिवरात्री, हैप्पी बड्डे हनुमानजी असे एसएमएस आले की हसावं की रडावे हेच कळत नाही. बाकी आत्म्याबद्दल लाख बोललात…
नेहमीप्रमाणे जबरी पोस्ट !!
हो दादा अगदी खरे हे तर मी विसरलेच, हैप्पी शिवरात्री, हैप्पी बड्डे हनुमानजी
हा हा हा हाहा हा हा हाहा हा हा हाहा हा हा हाहा हा हा हाहा हा हा हा
देव पण पळणार आहे
अरे हा ह्यावरून अजून एक आठवले काकांची मागची पोस्ट, ती असेच रिप्लाय करणार्यांसाठी होती , सॉरी काका
सुहास, स्नेहल
दोघांचेही आभार. इद उप फितरत किंवा साईबाबाचा मेसेज पन्नास लोकांना एसएमएस ने पाठवा.. वगैरे पण प्रकार आहेतच..
हे अमेरिकन्स ग्लोबलायझेशन म्हणुन काय करतील नेम नाही हो!!!!!, अर्नास्तो शे गवेरा (क्युबन स्वातंत्र्ययुद्धात लढलेला अर्जेंटाईन क्रांतिकारी) ला मारले ते सी.आय.ए ने!!! ते पण हाल हाल करुन अन आता शे गवेरा टी शर्ट्स, कॉफ़ीमग्स, “रेबेल्स रेबेल” म्हणुन त्याला प्रमोट करुन गंजेड्यांचा देव म्हणुन प्रोजेक्ट करण्याचे प्रताप पण ह्याच अमेरिकन कंपन्या करत आहेत…..
हे अमेरिकन्स ग्लोबलायझेशन म्हणुन काय करतील नेम नाही हो!!!!!, अर्नास्तो शे गवेरा (क्युबन स्वातंत्र्ययुद्धात लढलेला अर्जेंटाईन क्रांतिकारी) ला मारले ते सी.आय.ए ने!!! ते पण हाल हाल करुन अन आता शे गवेरा टी शर्ट्स, कॉफ़ीमग्स, “रेबेल्स रेबेल” म्हणुन त्याला प्रमोट करुन गंजेड्यांचा देव म्हणुन प्रोजेक्ट करण्याचे प्रताप पण ह्याच अमेरिकन कंपन्या करत आहेत….. उद्या चालुन हनुमान जयंती ची आर्चिस कार्ड्स आली बाजारात तर नवल नको वाटायला!!!!!!
येतील.. नक्की येतील. अरे फ्रेंडशीप डे, मदर्स डे, फादर्स डे, असे अनेक डे सिलेब्रेट करण्याची टूम निघाली आहे. लवकरच थॅंक्स गिव्हींग पण सुरु होईल आपल्याकडे..
हे गवेरा वगैरे प्रकरण मला माहीत नव्हतं.. बरं येणार आहेस ना उद्या मुंबईला?
मी कसला येतोय दादा, मानगुटीवर वेताळ बसला आहे न UPSC चा!!!! 😀
अन आमचा झालाय विक्रम, नेक्स्ट टाईम नक्कीच!!!! ११०% 😛
चलो, नेक्स्ट टाइम..
त्याचप्रमाणे, स्वागतम म्हणजेच सु + आगतम. आणि कोणी सुस्वागतम म्हणाले तर त्याचा अर्थ= सु सु + आगतम होतो.
अभिजीत
अरे हो.. हे लक्षातच आलं नव्हतं.. धन्यवाद..
शुभेच्छा….. आजकाल शुभेच्छा या शुभेच्छा राहिल्या नाहीत, तर तो बाजारीकारणाचा, आपल्या यांत्रिक जीवनाचा एक अविभाज्य घटक झाला आहे. या शुभेच्छा फारश्या भावनाप्रधान मनाने घ्यावयाच्या नसतात.यांत्रिकपणे ओपन करायच्या वाचायच्या आणि निर्जीवपणे डीलीट करायच्या असतात. किंवा उत्सवा प्रसंगी आलेल्या शुभेच्छा तर उघडायची सुद्धा तसदी न घेतलेली बरे.. असे म्हणावे वाटते. शब्द बापुडे केवळ वारा’ अशी या FORWARD MESSAGES ची अवस्था असते.ही मेसेजस निर्लेप भांड्या च्या (NONSTICK) सारखी खोट्या खोट्या मुलामा दिलेल्या आनंदाच्या कल्पनांनी शब्दबद्ध केलेली असतात.
खरंच फोन करा,….. मनापासून शुभेच्छा द्या……..बिलकुल नको….. कालच इडीयट बोक्स दिवसरात्र बोंबलत होता…… . कोणत्या तरी नवीन संशोधना प्रमाणे मोबाईल वर जास्त बोलण्याने मेंदूचा कर्करोग होतो म्हणुन…. आता कमी बोला…. आणि जास्त मेसेजस करा….. असा सल्ला वैज्ञानिकांनी दिला आहे… … म्हणजे जीवाला जास्त ताप होणार………. . हा ताप न होऊ देण्या करता परत शुभेच्छा देवू का??????
मेंदूला कर्क रोग होतो.. खिशात ठेवला तर नपूसकत्व येतं, वगैरे आधी पण ऐकलं आहे. आणि यावर एक पोस्ट पण लिहिलं होतं. कधी ते आठवत नाही. आता हे असं झालंय की माझंच जूनं पोस्ट मला शोधत बसावं लागतं, लवकर सापडत नाही… 😦
आणि मेसेजेस डिलिट नाही हो करता येत, शेवटी पुन्हा कधी तो माणूस भेटला की काय राव एक रुपया पण खर्च करू शकत नाही का तुम्ही? म्हणून सगळ्यांमधे मापं काढतो आपली. त्यापेक्षा एक उत्तर देतो पाठवून मी.किंवा सरळ फोन करतो.
आता नुकताच फोन बदलल्याने सगळे नंबर्स गेलेले आहेत, त्यामुळे काही मेसेजेस येतात, आणि मग त्यावर नांव नसल्याने समजत पण नाही की कोणाचा मेसेज आहे ते. मी त्याला पण रिप्लाय देऊन मोकळा होतो.. काय करणार?
आपला “पी.एच्.१” नंबर नक्की काय? म्हंजे चुकूनसुद्धा काय द्यायचे नाही ते कळेल…
म्हणजे काय? पीएच व्हॅल्यु माहीत आहे, हे पीएच१ म्हणजे काय?
Khup khup chhan kaka…..tyatlya tyat lagna aadhi aani nantarch varnan.
गणेश
अनुभवाचे बोल 😉
” माझ्या बायकोच्या कवितेच्या दोन ओळी लिहीतो..
“मग हळूच उघडला तिच्या ह्र्दयातला चोर कप्पा…..
बिलोरी वर्खाच्या त्या कप्प्यात….
होत्या खूप आठवणी
आठवली तिला गमतिची स्वतःची लग्नानंतरची पाठवणी
आयुष्यातल्या बेरजेचा न चुकता हिशेब सांगत होती….
जिवनाची वजाबाकी मात्र डोळ्यांच्या कडातुन सांडत होती””
काका, काकूंना पण कवितांचा ब्लॉग काढायला सांगा…
आल्हाद, अरे सुपर्णाताईंचा ब्लॉग काकांनी आधीच सुरु केला आहे.
काचापाणी : http://www.kachapani.com/
आल्हाद
ती नेट वर नसतेच. टायपींगचा प्रचंड कंटाळा , म्हणून मलाच टाईप करून पोस्ट करावं लागायचं. बरेच लेख आहेत तिचे, पण पाहून पाहून टाईप करण्याचा येतो कंटाळा म्हणून पोस्ट करणे राहून जाते . कॉमेंटला पण प्रत्युत्तर द्यायचा येतो तिला कंटाळा. टायपींग न येण्याचे परीणाम.
तिच्या कविता म्हणजे पण कधी भांडण झालं, की कर कविता अशा प्रकारात. सध्या पिएचडी मधे बिझी आहे, म्हणून कवीता बंद आहेत, पण काही लेख आहेत लिहीलेले, ( तिन एकशे तरी नक्कीच असतील) करीन पोस्ट..
हेरंब – धन्यवाद..
Ekdam mast ahe…Avadla lekh…
आवर्जून प्रतिक्रिया दिल्या बद्दल मनःपूर्वक आभार..
🙂
mi tumacha lekh vachate na tevha 20bhar tari comment padalelya asatat.
mast jhalay lekh nehamipramanech.topic ekadamach change kelay magachya lekhavarun.
तेजस्विनी
टॉपिक जे काही मनात येईल ते असतो.. आता पुढचा टॉपीक घेऊन लिहिणं सुरु केलंय. अजूनच वेगळा असेल तो. एकच एक प्रकारचे लिहिले तरी पण वाचायला बोअर होतंच. म्हणून थोडा चेंज हवाच!
खूपच मस्त आहे लेख ……. 🙂
धन्यवाद प्रज्ञा..
छान लिहिलंय काका!!!!
आपण खूप गोष्टी काहीही कारण नसताना किंवा लोक काय म्हणतील म्हणून करतो!!!
गायत्री
मनःपूर्वक आभार.. सहज सुचलं म्हणून लिहिलं.. 🙂
Mahendra saheb pharach chaan lihita tumhi.
Kharach Nilesh Padale che Abhaar ..
tuchyamule mala tumachya site chi link milali
दिनेश
मनःपूर्वक आभार, आणि ब्लॉग वर स्वागत !
hmmmmmmm chan aahe post. pan halli subhecha denyacha trend badalyay.