हुसेन चा मृत्यु..

हुसेनने काढलेली चित्र पहायची असतील तर  पूर्वी लिहिलेला इथे  एक लेख आहे   तो वाचा.


कोणी मेल्यावर त्याच्याबद्दल वाईट बोलू नये असे म्हणतात. माणूस मेला की त्याचं वैर पण सोबतच संपवावं असंही म्हणतात.  हे प्रत्येक वेळॆस शक्य होईलच असे नाही. विषारी साप जरी मेला तरी तो काही आपला मित्र बनत नाही- जिवंत सापाची जितकी घृणा वाटते, तितकीच घृणा मेलेल्या सापाची पण वाटत असते.कदाचित हेच कारण असेल की   एखादा माणुस आपल्या  भावनांचा इतका अनादर करतो,  पदोपदी आपल्या धर्माचा, देशाचा अपमान करतो,   अशा माणसाच्या मृत्यूबद्दल जेंव्हा समजतं तेंव्हा  बरं वाटतं.

एखादा पायातला काटा काढल्यावर पण त्याचा जसा सल रहातो, तसा त्या माणसाच्या करणीचा सल  ह्रदयात शिल्लक राहतो आणि मग त्याला माफ करणे शक्य होत नाही. हा हुसेन   पण  त्याच प्रकारातला माणूस आहे.  या माणसा विरुद्ध इतका राग मनात ठासून भरला आहे की त्याच्याबद्दल काही चांगलं मनात येणं  शक्य नाही- तो मेल्यावर सुद्धा.

हूसेन मेला! म्हणजे आता तो अल्लाह को प्यारा हूवा असे पण म्हणवत नाही!  कुठल्यातरी रौरव नरकात त्याने पडावे अशी मनापासून इच्छा.  असे विचार मनात आले आणि  ते   विचार आणि काय वाटेल ते  सरळ सरळ ब्लॉग वर  लिहावे की नाही हे ठरत नव्हते,  पण संपूर्ण पेपर जेंव्हा हुसेनला वाहिलेला  आढळला , आणि काही बुद्धी वादी निधर्मी लोकांच्या पाणावलेल्या डोळ्यातून  ओघळलेले   अश्रू जेंव्हा  त्यांच्या लेखातून   जाणवले, तेंव्हाच  आपणही थोडे   ’नक्राश्रू’ ढाळावे हुसेन साठी हे ठरवले, म्हणून हा लेख प्रपंच.

परवाच्या टाइम्स मधे फक्त हुसेनचीच  बातमी सगळ्या पेपरभर एखाद्या कॅन्सर सारखी पसरली होती. पेपर मधे इतर काही वाचायलाच नव्हते. जणू काही  हुसेन मेला ही एखादा मोठा लोकप्रिय नेता मेला   अशा स्वरूपात   या बातमीचे कव्हरेज होते. झाडून सगळ्या बुद्धी वाद्यांनी लेख  लिहिलेले होते.  इतर काही वाचायला नाही म्हटल्यावर  सगळे लेख वाचले, होय प्रितिश नंदीचा पण वाचला.

सगळ्या निधर्मी लोकांना हुसेन मेल्यामुळे झालेल्या कला क्षेत्राचे न भरून येणाऱ्या नुकसानी मुळे खूप वाईट वाटत होते . म्हणे “हा मृत्यु पावल्याने कलेचे न भरून येणारे नुकसान झाले आहे”.

माझ्या मते कसलेही   नुकसान झालेले नाही.  काही घोड्यांची चित्र काढली जाणार नाहीत , हिंदू   देवांचे विटंबन करणारी   चित्रं काढली जाणार नाहीत, या शिवाय अजून काय नुकसान झाले आहे ते मला समजत नाही .   त्यां सेक्युलर लोकांनी  केलेली हुसेनची तारिफ वाचली,  तेंव्हा माझं मन पण  ( संतापाने ) भरून आले .  झाडून सगळ्या बुद्धी वाद्यांनी   हुसेन मेल्यामुळे कलाक्षेत्राचे कसे नुकसान झाले आहे हे  लिहिले होते. कोणी तरी तर  म्हणालं की ’ पिकासो मेला भारताचा’.

राज ठाकरे म्हणतात की एक कलाकार म्हणून त्याच्या मरण्याचे दुःख झालेले आहे त्यांना .   त्याचे प्रेत आणून पंढरपूरला त्याचे अंत्यसंस्कार करा असेही म्हणताहेत  . मी  आता त्यांच्याच स्टाइल मधे विचारतो, ” मी म्हणतो कशाला? तो कोण कुठला हुसेन –  कतारचा असलेला नागरिक !  आणि आता दुसऱ्या  देशातल्या नागरिकाला   आपल्या देशात आणून त्याचे अंत्यसंस्कार का म्हणून करायचे आम्ही? कोण लागतो तो आमचा? आमच्या देवांच्या विटंबने शिवाय त्याने केले तरी काय आमच्या देशासाठी? अरे पंढरपूर हे विठोबाचे गाव आहे,   वारकऱ्यांची भूमी!  तिथे ही घाण कशाला आणायची?? काय साधणार आहे त्याने?”    या प्रश्नांची उत्तरं नाहीत. पण आपण निधर्मी आहोत हे दाखवण्याचा मोह त्यांना पण आवरता आला असता तर बरं झालं असतं. जर  ते काही बोलले नसते तरीही चालले असते माझ्या मते.

पंढरपूर आमच्या विठाईचं आहे,   नियमीतपणे    वारीला श्रद्धेने जाणाऱ्या  वारकऱ्यांचं आहे. तिथे अशा कुठल्याही प्रकारच्या राजकारणाची गरज नाही. पंढरपूर  ज्या वारकऱ्यांचं आहे, त्यांची परवानगी घ्या   हुसेनला तिथे त्याचे दफन करण्य़ासाठी आणताना.   त्यांना तरी तिथे ही अशी त्यांच्या देवाचा अपमान करणाऱ्याची समाधी हवी आहे का हे आधी विचारा , आणि  जर त्यांनी होय म्हंटले, तरच नंतर मग तिथे समाधी   बनवण्याच्या गोष्टी करा- एवढेच सांगणे आहे बस्स!

राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार   जर हुसेनला  पंढरपुरात   आणून गाडले, की काही दिवसात त्याची तिथे समाधी उभी राहील, आणि मग त्या समाधीची मजार व्हायला पण काही वेळ लागणार नाही. लोकं तिथे जाऊन नवस बोलतील, नवसाला पावणारा हुसेन म्हणून तो कदाचित प्रसिद्ध होईल लवकरच.

हे मी का म्हणतोय? कधी गेला आहात प्रतापगडावर? काय दिसतं तिथे?? अफझलखानाची पुजा करणारे लोकं, त्याची मजार?? अरे हे चाललंय तरी काय? ह्या देशामधे जर शिवाजीमहाराजांच्या पुतळ्यावरची पक्षांनी केलेली घाण सुद्धा साफ केली जात नाही, पण  त्या अफझल खानच्या समाधीवर मात्र न चुकता फुलांची चादर चढवली जाते.

अगदी सिस्टीमॅटीक पणे त्या अफझल खानाला देवाचे रुप दिले गेले अहे. ही पण एक स्ट्रॅटेजिक मुव्ह आहे, आधी एक लहानशी मजार बांधयची , मग नंतर तिथे काही दिवसानंतर  अफवा पसरवायची, की हा अफझल खान नवसाला पावतो. एकदा ही अफवा पसरली, की झाडून सगळे लोकं ( हिंदू , मुस्लिम,  बौद्धां सकट सगळे ) त्या समाधीवर पूजा करायला पोहोचतील. आणि हे झालं की मग श्री शिवाजी महाराजांची नाही तर त्या मजारीची पूजा करतील  लोकं. आणि  हुसेनच्या बाबतीतही असंच होऊ शकतं

राज ठाकरे    म्हणताहेत, की हुसेनची मुंबईला एक गॅलरी बनवण्यात यावी म्हणून.   त्याची खरंच काही गरज आहे का? हा पण प्रश्न आहेच.आता राज ठाकरेंना कोणी विरोध तर करूच शकत नाही, पण फक्त त्या गॅलरी मधे  त्याने काढलेली देवांची विटंबना करणारी  चित्र ठेऊन आमच्या भावनांचा अनादर करू नका, आणि तिथे एक मजार तयार होणार नाही याची काळजी घ्या  इतकीच विनंती!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कला and tagged , . Bookmark the permalink.

104 Responses to हुसेन चा मृत्यु..

 1. Pranav says:

  खरं आहे काका … मी नग्न चित्रां बद्दल फक्त ऐकलं होतं .पण -च्या आयचा घो… मधली चित्रं पाहून मूळा पासून हादरलो..आजचा सप्तरंग मघल्या लेखाचं नाव वाचूनच सनकायला झालं होतं. अशा वेळी ईतिहासाच्या पुस्तकातल्या “पलायन” या शब्दावरून दंगल माजवणारे मस्लिम आणि हिन्दु धर्म भ्रष्ट्या हूसेन च्या म्रुत्यू चा शोक करणारे हिन्दू डोळ्यासमोर आल्याशिवाय रहात नाहीत..
  – प्रणव

 2. Sanjivani says:

  पटताहेत तुमचे विचार ….

 3. प्रचंड प्रचंड सहमत.. मी तर म्हणतो “सुटलो.. घाण गेली च्यायला.”

  ‘मरणान्तानि वैराणी’ हा नियम लावण्याएवढीही लायकी नाही त्या #$%^#$%ची

  आणि राज ठाकरेला पंढरपूर म्हणजे काय ठाकरे कुटुंबाची प्रायव्हेट प्रॉपर्टी वाटली का? की बाळ ठाकरेंचा मित्र हे एवढं क्वालिफिकेशन पुरेसं आहे त्याचं मढं पंढरपुरात गाडायला?

  * प्रतिक्रिया जहाल झाली आहे हे मान्य आहे. पण कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर (सेक्युलर लोक हिंदूंच्या मारतात त्याप्रमाणेच) मी त्यांच्या भावना फाट्यावर मारतो !!!

  • हेरंब
   पोस्ट पण थॊडी जहालच झाली. पण जे काही मनात येत गेलं ते लिहित गेलो. मरणान्तानि वैराणी हा नियम लावण्य़ाची पण त्याची लायकी नाही +१

  • हेरंब + १

   ही लोकं स्वतःला सत्ता मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जातील.. कोण तो हुसेन आयला, त्याचं हे इतकं कौतुक बघून कीव आली मला त्या लोकांची. एक तर ह्या माणसाने विकृतपणे चुका करायच्या, मग त्याचं समर्थन आणि मग देश सोडून पळणे आणि मेल्यावर असा सत्कार… ^&%&%&%
   यझ प्राणी होता, बर् झालं मेला…

   • सुहास
    वैफल्य येतं हे असं पाहिलं की.. पहिल्या पानावर आपलं नांव यावं म्हणून काहीतरी फुकट बोलायचं झालं. त्यांना माहिती आहे की आपले नेहेमी लाइम लाईट मधे कसं रहायचं ते..

 4. Ashwini says:

  OMG….he rajkarni lok kahihi kartat nahi…..jibh aahe mhanun unchlun talyala lavaichi….pandurang tari rahila asel ka tith……badvyani aadhich tyala pandritun ghalvla aahe….pan chandra bhagela tari batvu naka re….kay he agdi thodyach diwasani varila suruwat hoil aani he bhaltach…..

 5. mau says:

  सॉलिड लेख..पुर्णपणे सहमत….एम एफ च्या गेल्याने खुप प्रतिक्रीया वाचण्यात आल्या..आजच फेसबुकवरही वाचले पिकासो गेला म्हणुन…काय म्हणावे ह्यांना…..

  • मी पण गेले दोन दिवस सारखा तेच ते वाचून वैतागून गेलो होतो. कुठेही गेलो तरी तेच वाचावं लागत होतं, दुसऱ्या बाजूचे विचार पण कोणीतरी लिहायलाच हवे होते नाही??

 6. अभिषेक says:

  गेला का .. बर झाल हीच पहिली प्रतिक्रिया…
  कलाकार म्हणून ठीक आहे … पण देवांच्या आणि भारतभू ची विटंबना करायला धजावला तेंव्हाच ध(मा?)रायला पाहिजे होता… आणि मग मेला म्हणून उदात्तीकरण करूच नये अशा लोकांच…
  प्रतापगडाच ऐकून वाईट वाटलं… महाराष्ट्र सरकार किंवा गिरी प्रेमींनी तिथे एक मोठा बोर्ड लावला पाहिजे… हे अफजलखानाच थडग तिथ कुठून आलं त्याची कहाणी सांगण्यासाठी… मग बघू अफजल पावतो कि राजे…
  ‘मरणान्तानि वैराणी’ वागून राजांनी चूक केली अस का आजच्या समाजाच मानण आहे? ते थडग अजून तिथे आहे कारण अजूनही राजां ना मानणारी त्यांच्या सारखी माणस आहेत इथे… पण म्हणून ‘राज’कारण्यानी गैर अर्थ काढू नये

  • अभिषेक
   ब्लॉग वर स्वागत.
   उदात्तीकरण करायलाच नको. आता तर तो भारताचा नागरिक पण नाही. असे असतांना पण….
   असो.. जे काही लिहायचं होतं ते वर लिहिलं आहेच.. प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार.

  • geeta says:

   hmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm really

 7. मकब्याला जर पंढरपुरात पुरला तर ओसामाला पण आपण गंगेत नाहीतर चंद्रभागेत बुडवायला हवा होता. मी तर म्हणेन हुसेनपेक्षा आमदार वांजळेच्या मृत्यूने जास्त नुकसान झाले पण ते मनसेचे आमदार असून देखील माननीय राज साहेबांची प्रतिक्रिया कुठे ही वाचनात आली नाही. बहुतेक वांजळेनां (घाणेरडी) चित्र काढता येत नव्हतीत म्हणून असेल.

  • रमेश वांजळे खरंच खूप मोठे होते त्या हुसेन पेक्षा. दुर्दैवाने त्यांच्या मृत्युची बातमी आहे चौथ्या पानावर.

   • निलेश
    आभार..

    • Nilesh b. says:

     Sorry for using abusing language….but Cant stop…Thanx for deleting….

     • Nilesh b. says:

      I was thinking, as you have deleted my abusing words…I was just wondering…that guy can do all this stuff…still cant we use abusing words for him ?
      Its true that this is nice blog and we have to behave like gentlemen as we are all educated people , but people take advantage of being good , like hussen or we still cant stand against the people like him ?

      • निलेश,
       मी दिवसभर ऑन लाइन नव्हतो, त्यामुळे काही डिलिट करायचा प्रश्नच येत नाही. प्रतिक्रियेसाठी आभार. तुमच्या इतर कॉमेंट्स डीलिट करतोय.

 8. Gaurav says:

  हुसेन मेल्यावर काहीच वाटले नाही, एक चांगला कलाकार असला तरी हिंदु धर्माचा अपमान करण्याचा अधिकार तर कोणालाच नव्हता आणि एवढे करुन सुद्धा साधी कारवाईसुद्धा नको व्हायला? सहिष्णु बनण्याचा अहिंसावादी बनुन राहण्याचा ठेका काय हिंदुंनींच घेतला आहे का? अफजल खानच्या कबरीचे कौतुक तर अतीच झालेय, काय आहे देशात दिग्विजय सिंग मनोवृत्ती वाढली आहे, तो DG काय बरळत असतो त्याचे त्यालाच कळत नाही, मध्ये तो लादेनला लादेनजी म्हणाला होता, आणि आता ज्याला त्याला हुसेनचा पुळका आलाय… पार गंडलेय सगळे, राज ठाकरेंनी एक कलाकार म्हणुन श्रद्धांजली वाहिली ते ठिक आहे पण हुसेनने जे आत्ता पर्यंत केले ते विसरुन कसे जायचे?

  • गौरव
   पैगंबराचे नुसते कार्टून्स काढले तर सगळ्या जगातले मुसलमान खवळून उठले . सॅटॅनिक व्हर्सेस भारतात बॅन केले जाते- न वाचताच..
   हुसेनने जे काही केले ते विसरण्याची गरज नाही. लक्षात ठेवायलाच हवे. आणि पुन्हा कोणी असे काही केले की त्यावर तात्काळ काहीतरी ऍक्शन घ्यायची.

 9. Kedar says:

  महेंद्र जी नेहमी सारखंच झक्कास. ती बातमी ऐकल्यावर ‘मेलं एकदाचं’ अशी प्रतिक्रिया होती हो माझी. आणि त्याच्या कले बद्दल म्हटलं तर तमाम जनतेला माझ्या मते तरी त्याची चित्र कळत असतील असं वाटत नाही. दुर्दैवानी त्याच्या चित्रांपैकी मला स्वतःला फक्त त्याचं भारत मातेचं आणि गणपतीचं आणि इतर देवतांची चित्रं कळाली. वीट आला होता हो त्याचा आणि त्याच्या बातमीचा. बाकी तुम्ही जे त्याच्या मजारी बद्दल जे म्हणता ते अगदी भीतीदायक आहे हो. खरं तर आपल्या पुढच्या पिढीला आपण त्याच्या या असल्या कलेचा आणि दुसऱ्या धर्माचा अपमान करण्याच्या प्रवृत्ती पासून लांब ठेवलं पाहिजे. आणि अशी समाधी वगैरे बांधून हे राजकारणी लोक धिंडवडे काधातीत आपल्या भावनांचे.
  कुणी तरी हा लेख लिहायला हवा होताच आणि तो तुम्ही लिहिला हे म्हणजे अजून चांगलं झालं. धन्यवाद.

  • केदार
   मी पण जितक्या लोकांशी बोललो, त्या सगळ्यांची हीच प्रतिक्रिया होती. पण जर सगळे लोकं असाच विचार करतात तर मग पेपर वाले या माणसाला हिरो बनवायला का इतका प्रयत्न करतात हे समजलं नाही. लिहीणं पण सोपं नव्हतं! पण शेवटी लेख संपवला आणि पोस्ट केला.
   या हुसेनच्या कर्माची दुसरी बाजू पण मांडणं आवश्यक होतं . बाईल वेडा विकृत माणूस म्हणून लक्षात राहील माझ्या!

 10. साहेब त्या हुसेन ला दोष देण्यात काय अर्थ ? आपलेच हिंदू लोक त्याला जवाबदार आहेत. जे मुग गिळून गप्प बसतात. दुसरीच्या पोरांसारखे रेषा काढल्या आणि अनवाणी राहून जग फिरला तर त्याला हाडाचा कलाकार म्हणून त्याचा गौरव केला जातो. त्यावेळेला आपले कला क्षेत्रातले जाणकार आणि हिंदू चे राजकारण करणारे सुद्धा कसे गप्प बसतात काय माहित?

  • आशिश
   ब्लॉग वर स्वागत.. काही चित्रात तर त्याने नुसत्या रेषा ओढल्या आहेत, खाली कोणाचं चित्र आहे हे समजावं म्हणून नांवं पण लिहिली आहेत. यावरून काय लायकीची चित्र आहेत हे समजतं..

 11. Pradeep says:

  100% agree. There is another fantastic blog on the same topic http://www.sandeepweb.com/2011/06/10/death-of-a-pervert-may-his-soul-burn-in-hell/

 12. Ninad says:

  Husain chya atmal shanit milu dya, nahi to parat Janm gheveoon itha ala tar ajun tras deyil!

  • निनाद
   खरंय .. त्याला म्हणे मुंबईचा फालूदा खायचा होता, आता फालुदा खायला पुन्हा भारतात जन्म घेतला तर??? 😦

   • Smita says:

    ithe puN eka prasidhdha aNee popular restaurant chya malakane tyala kasa mysore dosa avadayacha vagaire aThavaNe elihilya ahet… to kasa tissue paper var chitra kadhun waiters manDaLeenmadhya vaTayacha vagaire.. farach bhavaneek javaLeek sadhalee hotee tyane sagaLya kalapremee secular lokat nahe eka? swt:lach fasavat kitee divas he lok politically correct bolNar, vagaNar kaLat nahee..

    • स्मिता
     हे तो हॉटेल वाला आपल्या हॉटेलची जाहिरात करायला वापरत असावा. हे असे अनेक लोकं आता पुढे येतील.थोडे दिवस आठवण काढतील आणि मग सगळे विसरतिल

 13. Leena chauhan says:

  Aak khup mahinyani blog var pratikriya det ahe. Ya deshatalya 50% peksha jaast lokachya dharmik bhavana hurt jhalya ahet ( tathakathit secular Hindu 20% ahet Asa samaju) but they can not express their feelings who is minority in this country? Times madhe fakt ekch pratikriya mala Yogya adhalali someone called raza only living member of progressive artists group

  • लीना
   धन्यवाद.. प्रोग्रेसिव्ह आर्टीस्ट ग्रूप मधे फक्त हुसेनच समोर आला.. कसा ते आपण सगळेच जाणतो. कधी माधूरी , तर कधी दुसरी कोणीतरी.. विकृत माणुस होता हा..

 14. Smita says:

  admire your courage to go against the popular ( secular; -read anti Hindu) stance by media. kuNehee uThava aNee tumchya devadevatanchee viTambana karavee aNee mahan intelligent media ne tyanna dokyavar ghyava he chitra pahun vishad vaTat hota.. far kay rahul bajaj chee pratikriya vachleet ka?? tyanchya office madhye ek chitra tya maNasane kaDhalela ahe evaDhyavarun tyannee puN apalee loyalty to art vyakta karun ghetalee..

  shevaTee apalech lok paradharjene asaalyane ya goshTee kadheech badalaNaar naheet asahc vaTata.

  • स्मिता
   हा लेख लिहीणं खरंच खूप अवघड गेलं. कोणावर डायरेक्ट ब्लेम न करता आपल्या मनात काय आहे ते लिहायचं होतं. नाही तर मुळ मुद्दा कुठेतरी गेला असता, आणि भलत्याच मुद्द्यावर डिस्कशन सुरु झालं असतं.
   तुमचे शेवटचे वाक्य खरंच खूप पटलं.. आपलीच लोकं परधार्जिणे असल्यावर या गोष्टी कधीच बदलणार नाहीत. मिडियाने इतकी स्तुती केलेली आहे हुसेनची, की नविन हुसेन पण तयार होतील आता, त्याची जागा घ्यायला.

 15. स्नेहल says:

  अगदी पटतेय काका, हेरंब दादा +१
  खरच बर झाले तो मेला

 16. हे सर्व वाचून देखील एखाद्याला M.F. Husain बद्दल आपुलकी वाटत असेल तर ह्या link वर click करा.
  http://www.hindujagruti.org/activities/campaigns/national/mfhussain-campaign/

 17. प्रचंड प्रचंड सहमत..

 18. Nilesh B. says:

  Really nice Post…
  I really start hating that guy since I have seen his paintings…
  He is an a** ho**. (I cant stop to say this…)

  • निलेश
   ह्याची मी सिनेमाची पोस्टर्स पहायचो लहान असतांना. दोन सह्या असायच्या, एक तर जगदाळे पेंटर किंवा हुसेन…. नंतर जेंव्हा पासून हे फ्लेक्स बॅनर्स आले, तेंव्हापासून जरा कमी झालं याचं प्रस्थ!

 19. He was indeed a Genius but NOT an Indian. “He did lack sense of appointment” – Souza (Painter)
  He was NOT less thn Raavan, evn Raavan was the most intelligent man in the Universe but misused his intelligence.

  • अमित
   ब्लॉग वर स्वागत.. जिनियस असावा, कारण त्याला मिडीया आपल्या बाजूने कसा वापरायचा हे बरोबर समजलं होतं. चित्रकलेच्या बाबतित.. काय सांगावं?? मला काही समजत नाही त्या विषयातलं.

   • अमित प्रभाळे says:

    हुसैन खरच खूप चांगले चित्रकार होते कारण मी त्यांचे चित्र जवळून पहिले आहेत. पण त्यांचा मार्केटिंग सेन्स भन्नाट होता. काहीवेळेला तर काही पण फालतू काढून लोकांना येडा बनवायचे. आणि मूर्ख लोक त्याला Modern Art म्हणायचे. त्यांनी दोन तासात काढलेले चित्र फक्त पैश्यासाठी असायचे त्याला काहीच अर्थ नसायचा. एकदा त्यांनी फक्त 20 minute मध्ये एका स्त्रीचे (विद्रूप) चित्र काढले आणि म्हंटले हि ‘माधुरी’ आहे. एका राजकारणी माणसाने ते चित्र तीन लाखाला विकत घेतले!

    • अमित
     काळा पैसा गोरा करायला, टेररिस्ट फंडींग साठी हे असे हातखंडे वापरले जातात. या पूर्वीचा एक लेख लिहिला होता, त्यात सगळं काही लिहिलेले आहे. अवश्य वाचा..

 20. tejaswini joshi says:

  mi sudha sahamat aahe tumachyashi .pan kay fakkad lekh lihilay ho .kahinchya mate hussain ni vastavateshi pramanik rahun chitre kadhali .pan devi devatanchi nagn chitre kadhanyat kasali aaliye vastavata dombal
  pan lekh jahal jhala aahe.

  • वास्तवाशी प्रामाणिक?? म्हणजे नेमकं काय? हे असे जड जंबाळ शब्द वापरतात सेक्युलर लोकं, आणि आपल्याला त्याचा अर्थ समजला नाही तरी आपण उगाच मान डोलावतो. काही नसतं वास्तवाशी प्रामाणिक वगैरे. हे माझं मत!!
   थोडा जहाल झालाय? मला नाही वाटलं तसं??

 21. jori swapnil dinkar says:

  APRATIM LEKH ZALA AHE SIR.
  THNKS FOR TAKING THIS ISSUE IN PUBLIC

  • स्वप्निल
   आभार.. कोणीतरी लिहायला हवी होती दूसरी बाजू सुद्धा! कारण आपल्या संस्कृती मुळे तो मेल्यावर त्याच्या विरुद्ध कोणीच काही लिहीत नव्हतं कोणीच. त्याची आयुष्यभराची पापं केवळ तो मेला म्हणून माफ करायची का??

 22. aruna says:

  i totally agree with you on every point. I also feel that Hussain was much over rated as an artist. he used a lot of gimmicry and of course being controversial l helped him to gain (notorious) fame!
  the so called intellectuals and self proclaimed leaders are forever ready to ride on any thing that might keep them in the public eye.. they don’t think of the consequences of their spech or action as long as they get publicity .

  • अरुणा
   हुसेनला मिडीयाच्या नजरेत कसं रहायचं ते चांगलं समजलं होतं. त्याचा तो अगदी व्यवस्थित फायदा करून घेत होता. जयचंद प्रवृत्तीचे लोकं पूर्वी पण होते, आणि आजही आहेतच!! त्यांना वेळीच जागा दाखवायला हवी.

 23. महेंद्रजी नमस्कार,
  लेख अगदी जळजळीत आहे.वाचून चार ओळी उस्फुर्त सुचल्या

  “नागड्या पैगंबरास तू चितारलेस असता
  तुझा मुडदा तिथे गाडला नसता
  विठ्ठलास होती काळजी तुझ्या थडग्याची
  नव्हती करायची अपवित्र भूमी पंढरपूराची”

 24. शैलेंद्र says:

  हिंदुंची इस्लामिक प्रतिक्रिया

  • शैलेंद्र
   अगदी बरोबर.. आपल्या मधे त्यांच्यातला हा गुण यायलाच हवा, तरच ह्या हुसेनी प्रवृत्तीला आळा बसेल.

 25. Srinivas says:

  मी आपल्याशी पूर्णपणे सहमत आहे.
  माला तर ह्या व्यक्तीची पेंटिंग्स कधीच समजली नाहीत.
  मी त्या पेंटिंग्स बघितल्या नाहीत. (इच्छापण नाही.)
  लोकं कोणालाही डोक्यावर घेतात.
  माज्या मते आपला मेट ग्रेट पैटर राजा रविवर्मा. इतरही असतील…
  But I like Ravi Varma. Simple, natural, as if photgraphed.
  -श्रीनिवास शर्मा

 26. Pravin says:

  एकदम पटलं. हा एकमेव माणूस ज्याच्याबाबतीत मेल्यावरही मला आनंद झालाय (म्हणजे तो मेल्यावर :)). वर दाखवलेल्या चित्रांना आधी चित्र म्हणाव का हाच प्रश्न पडतो. ४ रेघा उभ्या आडव्या मारल्या कि चित्र होतं होय? आणि लोक असली चित्रे करोडो $ देऊन विकतच कशी घेऊ शकतात. बरं ते जाऊ दे, बऱ्याच मराठी माणसांना त्याच्यात पिकासो दिसला. हीच लोकं हुसेन एक महान कलाकार आहे आणि त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे असं मानतात. अभिव्यक्ती स्वतांत्र्याखाली यांच्या आया बहिणींची नग्न चित्र काढली तरी यांचं रक्त उसळेल कि ते माहित नाही. बरं एकदा मानलं की चूक झाली. लोकांनी माफी मागायला सांगितली. तेव्हा या हुसेनला कळलं नाही कि असली चित्र काढली कि हिंदूंच्या भावना दुखावतात मग दुसर्यांदा अशी चित्र काढण्यामागच प्रयोजन काय? आणि ह्या हुसेनच अभिव्यक्ती स्वातंत्र्य सिलेक्टिव कसं काय ह्याचं उत्तर त्याला पिकासो मानणारी लोक का देत नाहीत ? फक्त हिंदूच्या देवी देवता नग्न आणि याच्या आया बहिणी पूर्ण कपड्यात असं का? आणि मीनाक्षी मधलं गाणं मुस्लिमानी जरा आवाज केला तेव्हा एका रात्रीत उडवलं या हुसेनने. तेव्हा का डिफेंड केलं नाही स्वत:च्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला?

  तुमच्या लेखाशी पूर्ण सहमत.

  • प्रवीण
   हुसेनने ती चित्रं जी दुर्गा, गणेश, वगैरे काढली आहेत ती केवळ ;लोकांच्या भावना भडकवण्यासाठी हे माझे स्पष्ट मत आहे. त्याला त्या चित्रांवर नांवं लिहायची वेळ आली, म्हणजे त्या चित्रांची लायकी काय आहे हे लक्षात येतं. त्याला प्रसिद्धी हवी होती- ती त्याने मिळवली .
   ह्या माणसाचा इतका राग आहे मनात तो अजूनही कमी झालेला नाही. आपले हिंदू जे स्वतःला निधर्मी मानतात, त्यांच्या स्वतः मधे कुठलेही सत्त्व नसल्यासारख्या कॉमेंट्स वाचल्या की अजून संताप होतो ..

 27. Srinivas says:

  मी आपल्याशी पूर्णपणे सहमत आहे.

  माला तर ह्या व्यक्तीची पेंटिंग्स कधीच समजली नाहीत.
  मी त्या पेंटिंग्स बघितल्या नाहीत. (इच्छापण नाही.)
  लोकं कोणालाही डोक्यावर घेतात.
  माज्या मते आपला ग्रेट पैटर राजा रविवर्मा. इतरही असतील…
  But I like Ravi Varma. Simple, natural, as if photgraphed.

  -श्रीनिवास शर्मा

  • रवीवर्मा आणि चंद्रवर्मा म्हणून आणखिन एक चित्रकार होते सोलापुरचे त्याच काळातले. सौ. सध्या चित्रकला खंडाचे संपादन करते आहे, त्यात बरीच महिती आहे या बद्दल. नंतर कधी तरी लिहीन त्यावर पण. प्रतिक्रियेसाठी आभार..

  • अमित प्रभाळे says:

   Raja Ravi Varma chi jaaga Picasso pan gheu shakat nahi… Husain tar lambchi gosht!

   • अमीत
    सहमत आहे. मी स्वतः राजा रवीवर्माची पेंटींग्ज पाहिली आहेत . सगळी पेंटींग्ज बडोद्याला आहेत. अतीशय सुंदर चित्रं आहेत सगळी 🙂

 28. Srinivas says:

  I just saw च्या आयचा घो…..
  It is not easy to see those dirty pics. Blood boils.
  Bloody shame. No action was taken after all that. Good that he was thrown out.

  My likeing towards Ravivarma further increased after seeing your comparative table.

  Thanks.

  • श्रीनिवास
   राजा रवीवर्मा यांची चित्रं बडोद्याच्या महालात ( म्युझियम मधे ) ठेवलेली आहेत. तिथे खूप सुंदर चित्रं आहे, वेळ मिळेल तेंव्हा अवश्य पहायला जा. फारसं लोकांना माहिती नाही या बद्दल.. पण सगळीच चित्रं एकदम ग्रेट आहेत..माझे पण ते फेवरेट आहेत.मला वाटतं की ११ आहेत एकंदर.

 29. Vinay Garge says:

  उत्तम विश्लेषण. एका वक्त्याचे उद्गार “अफझलखानाच्या कबरीला जाऊन नवस बोलणार्यांनी हे लक्षात ठेवावे कि त्यांना त्यांच्या पोटी जन्माला येणारा जीव छत्रपती शिवाजी महाराज महाराजांसारखाहवा आहे का अफझलखानासारखा ?”

 30. मला त्या चित्रांमधला काही समजत नव्हत .. आता इतके लोक , मोठी मोठी लोक दुखाने वेडी होताहेत म्हंटल्यावर असेल मोठा कलाकार..
  माधुरी दिक्षित सारख्या लोकां पण म्हणे खूप दुख झालं..
  पण त्यानी त्याचं मोठेपणा कधी त्याच्या धर्माच्या प्रेषितांचे ‘तसले’ चित्रण करून आणखी का नाहीं वाढवला?
  साले ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ च्या नाव खाली काहीही करायचं.. आणि आमचे राजकारणी आणि तथाकथित बुद्धिवादी यांना डोक्या खांद्यावर बसून नाचवणार.. साले खांद्यावर बसून कानात मुतात, तयच यांना काहीच कस वाटत नाहीं??

  मला जर चित्र काढता आली असती ना, तर मी मस्त पैकी गाढवच चित्र काढून या डुकराच तोड तिथे लावल असत…
  ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ शेवटी.. ते काय फक्त त्यांच्या बापाची मालमत्ता आहे होय? आरे आपल्या पैकी कोणी काढा रे चित्र त्याच.. त्याची मजार बनली, की ठेवू तिथे नेऊन..

  • अमित
   प्रतिक्रियेसाठी आभार. त्याने काढलेल्या चित्रांची सगळी हेडींग्ज बदलली आहेत माझ्या एका मित्राने सागरने. पण आपणही त्याच लेव्हलला कशाला जायचं म्हणून सगळीकडे पाठवली नाहीत.

 31. kiran says:

  aaj tumacha blog vachlyavar thodas manala bare vatale
  antratmacha awaj baher ala, man shant zale

 32. tigertitan says:

  hussain and you both uses their right
  “Freedom Of Expression”.
  healthy discussion leads up to better society.

  • विक्रांत
   ब्लॉग वर स्वागत !
   तुमचं म्हणणं अगदी खरं आहे, पण आयुष्यभर तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खात रहाणं कितपत योग्य आहे??

 33. Prashant says:

  कल्पनेतले देव खरे आहेत काय ? देव कशासाठी आणि कोणासाठी ? झुंड शाहीची अरेरावी.

  • प्रशांत
   हा प्रत्येकाचा पहाण्याचा दृष्टीकोन आहे ,ज्याला जे योग्य वाटतं तो तसंच त्याकडे पहातो. झुंड शाही कशाला म्हणायचं? सलमान रश्दी च्या सॅटनिक व्हर्सेस वर घातलेल्या बंदीला? की डेनिश कार्टूनिस्टच्या खुनाची उघड सुपारी देऊन बक्षिस जाहिर करणाऱ्यांना??
   प्रत्येकाचा दृश्टीकोन वेगवेगळा असतो प्रत्येक गोष्टी कडे पहाण्याचा.
   प्रतिक्रियेसाठी आभार.

 34. swagat says:

  husain mela he khup bar zhala. Tyachi apalya devatanchi vitambana karnari khup painting me pahili
  ahet .

 35. santosh says:

  कुणाचीही उंची कशसीही मोजू नका नि जातीयतेचा रंग लावून चंद्रभागेत नाहून पान्दार्पुरकर असल्याचा आव अणु नका या मुळेच बडवे माजलेत ,२०००० ते २५००० हजार मुसलमान लोक ही वारी करतात तुम्ही मोठे आहात पण जगात प्रत्येक विषयात लोकांची उंची ही आपल्याला मोजत येईल असे नाही

  • संतोष
   ब्लॉग वर स्वागत..
   या पूर्वी हुसेन वर लिहिलेला लेख वाचा…
   लक्षात येईल माझे मत असे का आहे ते.
   मी सरसकट सगळ्या मुसलमानांच्या विरुद्ध लिहिलेले नाही. जे लिहिले आहे ते फक्त हुसेन बद्दल. जातीयतेचा रंग तुम्ही देताय मी नाही.

   तुमचे मत अगदी बरोबर आहे. आपली वैचारीक उंची इतकी जास्त आहे ,की वैचारीक दृष्ट्या खुज्या लोकांची उंची आपल्याला मोजता येणे शक्यच नाही. असो..

 36. महेंद्रजी नमस्कार,
  MHH वर खूप लेखन झालेलं आहे.प्रत्येकाने आपआपल्या दृष्टीकोनातून लिहिलेलं आहे.
  आज मलाही MHH बद्दल संदर्भ आणि वास्तव लक्षात ठेवून “काय वाट्टेल ते” लिहावं असं मनात आलं.
  “M.H.Who (in)सेन यास अनादरांजली”
  हा आजच पोस्ट केलेला माझा लेख आपल्याला वेळ मिळेल तेव्हा जरूर वाचावा.
  आपल्या ब्लॉगचे अनेक वाचक आहेत वाटल्यास त्यानीही माझा आजचा पोस्ट वाचावा.
  म्हणून आपण लिहिलेल्या लेखावर प्रतिसाद म्हणून त्या जागी लिहित आहे.

  माझ्या एका वाचकाने आपल्या अनेक मित्राना असं लिहून कळवलं आहे.

  “प्रिय मित्रहो,
  “M.H.who(in)सेन यास अनादरांजली” हा श्री. श्रीकृष्ण सामंत, मुक्काम सॅन होझे, कॅलिफोरनीया shrikrishnas@gmail.कॉम यांच्या अनुदिनीवरील लेख वाचनीय आहे. त्यात या चित्रकाराविषयी सामंत यांचे विचार समतोल वाटले म्हणून आपण त्यांच्या खाली दिलेल्या अनुदिनीच्या पत्त्यावर जाऊन वाचावे असे खास सांगावेसे वाटले.”

  http://shrikrishnasamant.wordpress.com/

  • काका
   प्रतिक्रियेसाठी आभार. दिवसभर नेट वर नसल्याने उत्तराला उशिर होतोय. लेख वाचतो आताच.

 37. तुझ्या मतांशी व हेरंबशीही १००% सहमत. अक्षरश: देवच असल्यागत डोक्यावर घेऊन जोतो नाचतोय. आणि अफजलखान कधीपासून देव झाला…. कहर आहे अगदी. नेसूचे सोडून किती काळ असेच डोक्याला गुंडाळून लांगुलचालन करत फिरणार आहेत हे राजकारणी… 😦 कधीतरी खरे, सच्चे वागा म्हणावं.

  • लांगुलचालनाची परंपरा बरीच जुनी आहे.. ती कधी संपणार कॊण जाणे. प्रत्येकच जण आपण कसे सोशलिस्ट आहोत हे सिद्ध करायच्या मागे लागलेला असतो.

 38. naresh dongrwar says:

  kaka bhawnik n hota klecha wichar kara

  • नरेश
   ब्लॉग वर स्वागत.. आणि अभिप्रायासाठी आभार.
   कलेचा विचार म्हणजे नेमकं काय करायचं? ते दुर्गा देवीचे काढलेले चित्र पाहिले की लक्षात येतं की ते केवळ अपमान करण्यासाठी म्हणूनच रेखाटले आहे. इतर चित्रंही तशीच आहेत . हुसेन स्वतः म्हणाला होता, की ज्याचा तो तिरस्कार करतो, त्याचे तो नग्न चित्रं काढतो………
   या पूर्वीच्या लेखात ( हुसेन जिवंत असताना लिहिलेल्या ) दोन्ही चित्रं आहेत, हुसेनने काढलेली आणि राजा रवीवर्माची.. ती पहा आणि मग हुसेनच्या चित्रात काय कला आहे हे सांगा. जर त्या दुर्गा देवीच्या चित्रात काही कला दिसली नाही मला तरी! ते चित्र काढल्यावर त्याने मुद्दाम खाली दुर्गा असे नांव लिहिले आहे. असो..

 39. खालील मजकूर हा एक इमेल मधील आहे….चित्रे दिसणार नाहीत पण त्याचे वर्णन वाचावे…..!चित्रांसह मेल हवे असल्यास मला आपला मेल पत्ता कळवा…
  If a person dresses like a Sikh Guru,
  Thousands of Sikhs gather and destroy their establishments, threaten to kill him, announce a bounty on his head.
  Sikhs are not criticized for being communal and intolerant,

  If a Danish journalist depicts the Prophet of the Muslims ,
  Muslims all over the world rise in anger, there is violence, a booty on the head of the Journalist –
  Muslims are not criticized for being communal and intolerant,

  If MF Hussain draws paintings depicting Hindu Gods and Goddesses in sexual positions and…
  Hindus merely protest ,
  They are called communal, intolerant and taught lessons in secularism by one and all.

  The problem apparently is not with Sikhs and Muslims,
  It is with Hindus , because Hindus are not violent, Hindu do not have the guts to say that this is wrong, Hindus seek acceptance from outsiders rather than from their conscience. They worship the same Gods and Goddesses but don’t stand up for them when the time comes.

  If you believe Hussain is wrong, forward this message.

  And ………..
  Be a judge yourself of Hussain’s paintings below.

  Goddess Durga in sexual union with Tiger

  Prophet’s Daughter Fatima fully clothed

  Goddess Lakshmi naked on Shree Ganesh’s head

  M.F. Hussain’s Mother fully clothed

  Naked Saraswati

  Mother Teresa fully clothed

  Hussain’s Daughter well clothed

  Naked Draupadi.

  Well clothed Muslim Lady.

  Naked Lord Hanuman and Goddess Sita sitting on thigh of Ravana

  Muslim poets Faiz, Galib are shown well-clothed

  Full Clad Muslim King and naked Hindu Brahmin.

  The above painting clearly indicates Hussain’s
  tendency to paint any Hindu as naked and thus his hatred.

  Naked Bharatmata – Hussain has shown naked woman

  With names of states written on different parts of her body. He has used Ashok Chakra, Tri-colour
  in the painting. By doing this he has violated law & hurt National Pride of Indians. Both these things
  should be of grave concern to every Indian irrespective of his religion.

 40. arunaerande says:

  i totally agree with you. why are we such cowards i don’t know. I would like the pictures too. I would like to forward your views to my friends if you allow it, of course with your name

 41. तुम्ही Politically correct असण्याचे दडपण घेत नाही, हे किती बरय. जे ‘काय वाटेल ते’ मनापासून लिहू शकता.
  तुमच्या काही वाचकांनी तुम्हालाही जातीय रंग द्यायचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यासाठी एका ख्रिस्ती मिशनरी स्त्रीचा या विषयावरच लेख सुचवतो – http://hildaraja.wordpress.com/2010/03/03/leter-to-the-editor-in-chief-of-the-hindu/.
  शिवाय हुसेन भारत सोडून गेला त्या काळातले हे लेखही वाचनीय आहेत.
  चो रामस्वामी: http://dc.deccanchronicle.com/blogs/others/feel-free-mr-husain-go-paint-qatari-leaders-773
  वीर संघवी : http://www.virsanghvi.com/CounterPoint-ArticleDetail.aspx?ID=445

 42. Freedom to Speak says:

  jar Hindu Hruday samtratancha bhashet utter dyayache jale tar te asea asel…,
  pandharpur kay tyancha bapachi ahe ka? ……
  ugach kuthalya nich mansala tiche anun puru naka…
  ani jar tumala tase vatat asel na tar…
  tucmachi pan tond Qatarla jaun kale kara….?
  Jar shivji maharaj ethe aste na.. tumachi jibha kapun .. gadavarun khali fekun dile aste..
  … amhi kadhi sudharnar dev jane…..

 43. sandeep says:

  नमस्कार
  मि ही हिंदु च पन कटटर नाही,दोन्ही बाजुंचा विचार करुनच मत बनवनारा, तुमच्या सारखेच मत बनले होते माझे जेव्हा भारतभू आनि हिंदु देवतान्च्या नग्न चित्र बघितली हुसेनची पन काल-परवा च देसाईंची “राजा रवी वर्मा” वाचली,
  कादम्बरी तिल पात्र रंगवने हे जरी लेखकाची कमाल असली तरी विचार पटले त्यांचे, राजा रवी वर्मानवर सुदधा खटला भरला गेला होता हिंदु देव देवतांच्या नग्न चित्रांवरुन तेव्हा पुढिल संवाद हा राजा रवी वर्मांचा आहे,
  “कला केव्हा ही भ्रष्ट नसते,व्याभीचारी नसते,ति सदैव पवित्र असते, पण कला बघायला कलाद्रुष्टी लाभावी लागते,सौंदर्य पाहाता येण,त्याच मोल जोखण ही दृष्टी पर्मेश्वर देतो,
  संत आणि कलावंत एकच असतात,हे जग मानान सौंदर्याने अधीक नटावे,त्या ईश्वराच्या देन्याचा साक्षात्कार सामान्य माणसाना घडावा,त्यातुन जिवन उन्नत व्हाव ,हाच एकहेतु संत आणि कलावंत बाळगत अस्तात,
  चित्रकलेच्या जगामध्ये श्लील अश्लील काहीच नसते ,झाकण्यातुन, दडवन्यातुन कला प्रकटत नसते अस नही,पण झाक्लेले,दडलेले सौंदर्य सुचित करन हेही एक कलेचे कार्य असते
  ती अश्लीलता चित्रात नसते, ती पाहनर्याचया मनात लपलेली असते,
  नग्नतेमधे आक्षेपार्ह्य काहीच नाही, जोजो मानूस जीवनावर उदंड प्रेम करतो,अपार आनन्द शोधतो त्या माणसाला या नग्नतेपासुन अलीप्त राहाता येनार नाही, नग्नता नसती तर जिवन निर्मळ झाल नसत.जिवन हे नुसता वस्त्र‌- अल्न्काराने सजलेले नाही त्या नग्नतेच्या शोधातून जीवनाला जिवंतपना आलेला आहे. हे जीवन जर सत्य असेल तर त्या सत्याच चित्रन करन गुन्हा ठरत नाही….
  वास्तवीक पहाता नग्न हा शब्द इत्का सुंदर आहे, खरोखर्च हा शब्द शोधुन काढनार्या माणसाच मला कौतुक वाटत,’ग्न” याचा अर्थ चिकटने असा आहे, जो कशालाही चिकटलेला नाही. किम्बहुना जो फक्त आत्म्याशी एकरूप झालेला आअहे त्याला नग्न म्हाणतात, जो सर्व चराचराला,वस्तुमानाला चिकटलेला आहे त्याला लग्न म्हणतात…
  शिल्पकला असो कि चित्रकल असो तिथ कलाद्रुष्ती बालगुन जावे लागते तर्च त्या कलेचे मोजमाप करता येत…..

  • संदिप
   धन्यवाद. पण मला वाटतं की जर हुसेनची चित्रं पाहिली तर त्याची कला ही केवळ हिंदू देवतांसाठीच नग्न पेंटींगची का असावी हा प्रश्न आहेच. जी कला ही सामान्य दृष्टी ला सुखकारक वाटेल ती कला चांगली असे मला वाटते. असो
   ब्लॉग वर स्वागत, आणि आवर्जून दिलेल्या अभिप्रायासाठी आभार.

 44. Chandrashekhar says:

  Bhartatiya Hindu mulat gaandulchi jaat aahe. Itihas bagha, amhi ladhlo te kewal rajan karita. Dharma karita kadhich nahi. Sandeep saarkhe Hindu aahet mhanun Husain saarkhyanche mahatv aahe.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s