मार्टीन्स कॉर्नर..

सचिन तेंडूलकर, विजय मल्ल्या , शरद पवार, मास्टर शेफ संजय कपूर, संजय दत्त, ह्रितिक रोशन, बिपाशा बासू आणि अनेक सिलेब्रेटीजचे गोव्यातले आवडते रेस्टॉरंट कुठले- हा प्रश्न विचारला तर एकच उत्तर दिलं जाऊ शकतं ते म्हणजे…….. .

गोव्याला आल्यावर कितीही घाई असली तरीही एकदा तरी या रेस्टॉरंटला भेट दिल्याशिवाय  गोव्यातून माझा  पाय काही बाहेर पडत नाही. संध्याकाळी आणि  सिझन मधे गेलात तर नंबर लावून बसावे लागते. बरेचदा तर अर्धा – एक तास तरी थांबावं लागतं. इथे जवळच एक सनसेट बिच आहे बेतिम नावाचा, नंबर लावायचा आणि बिच वर एक चक्कर मारून यायची – म्हणजे वेळ पण बरा जातो. ( ही माहिती फक्त नवीन लोकांसाठी)  नंबर लागला नाही म्हणून कंटाळून परत निघून जाण्यापेक्षा हे बरं! इथे जायचं असेल तर शक्यतो दुपारच्या वेळेसच जाणे योग्य!

गोव्याचे हे एक  एकेकाळचे लहानसे रेस्टॉरंट !  कोणे एके काळी इथे गावातली मुलं कॅरम खेळायला एकत्र जमायची, मग मार्टीन ने कोल्ड ड्रिंक्स वगैरे विकता विकता लोकांना घरगुती पदार्थ देण्यासही सुरुवात केली. आणि म्हणता म्हणता हे रेस्टॉरंटच्या रुपात कन्व्हर्ट झाले.एका टिपीकल गोवनिज घरासारख्या  एका घरा मधे  सुरु करण्यात आलेले हे रेस्टॉरंट आज जगातल्या चांगल्या रेस्टॉरंट्सच्या रांगेत जाऊन बसले  आहे. कुठल्याही जातीवंत खवय्याची गोवा भेट ही इथे आल्याशिवाय पुर्ण होऊच शकत नाही.  या रेस्टॉरंट्चा उल्लेख मी लिहिलेल्या जुन्या   गोव्याच्या इतर पोस्ट मधे बरेचदा आलेला आहे. पण आज मात्र वाटलं, की ह्या बद्दल एक वेगळं पोस्ट निश्चितच होऊ शकतं!

हे रेस्टॉरंट सचिन तेंडुलकरचं पण फेवरेट! इथल्या मेन्युकार्ड मधे सचिनची फेवरेट   डिश क्रॅब मसाला, त्या डिशला   सचिनचे नावाने दिलेले आहे.सचिन १९९० पासुन गोव्याला आला की या रेस्टॉरंट मधे न चुकता एकदा तरी  येतोच.क्रॅब मसाला ही त्याची फेवरेट डिश. इथले क्रॅब त्याला इतके आवडते की   मुंबईला परत जातांना तो नेहेमी   पार्सल करून नेतो असं वेटर सांगत होता 🙂 . सचिनच्या आवडीमुळे सचिन हा मार्टीन्सचा यु एस पी झालेला आहे.  बरेच लोकं तर केवळ सचिनचे आवडीचे हॉटेल पहायचे म्हणून पण इथे येतात.

मी   उतरलो होतो ते आहे केळव्याला. आणि तिथून फार तर पाच एक किमी अंतरावर  हे मार्टीन्स आहे. दुपारी जेवायला तसा थोडा वेळच झाला होता, अडीच वाजून गेले होते. मिटींग इतकी लांबली की जेवायची पण शुद्ध नव्हती. लंचला कुठे जायचं तर मार्टीन्स की अशोका?? पण उद्या सकाळी अनंताश्रमाला जायचं आहेच, मग  म्हणून लंच साठी इथे मार्टीन्स कॉर्नर नक्की केले.

मझोर्डा बिच रेसॉर्ट  च्या रस्त्यावर असलेले- बेतिम बिच जवळचं  हे मार्टीन्स कॉर्नर. समोर बऱ्यापैकी पार्किंगसाठी जागा आहे. पण संध्याकाळी गेलात तर तुम्हाला पार्किंग मिळेलच याची खात्री देता येत नाही. हॉटॆलच्या  कोपऱ्यावर एक लहानशी पाटी लागलेली आहे- मार्टीन्स रेस्टॉरंटची.समोर दोन तिन फ्रेम्स मधे बऱ्याच सिलेब्रिटीजचे फोटो लावलेले आहेत. इतके हायप्रोफाईल क्लायंटल असलेले हॉटेल मात्र एकदम साधे आहे.

हॉटेलच्या  मुख्य प्रवेश दाराजवळ- आत शिरतांना समोर मारिओच मिरांडाची चित्रं लावलेली  आहेत. रंगीबेरंगी  मारीओ मिरांडा एकदम गोव्याच्या वातावरणात आणून सोडतो. टिपिकल गोवनीज घर वाटतं हे. खरं म्हणजे हे रेस्टॉरंट फार पुर्वी मार्टीनने आणि त्याच्या बायकोने   केवळ दोन टेबल घरासमोर लावून सुरु केले होते,  आज जवळपास  ३० टेबस आहेत आणि रेस्टॉरंट त्याची   मुलं सांभाळतात. दोन पायऱ्या चढून आत शिरलं की   एका काचेच्या पेटी मधे ठेवलेले मासे आणि टायगर प्रॉन्स, लॉब्स्टर्स लक्ष वेधून घेतात.   ताजे फडफडीत मासे पाहिले की भूक चाळवली जातेच.

आत शिरल्याबरोबर आधी हे नजरेला पडते. मस्त बर्फात सजवून ठेवलेले मासे, प्रॉन्स वगैरे..

रेस्टॉरंटचं ऍम्बियन्स एकदम टिपिकल गोवनीज  खेड्यातल्या घराप्रमाणे आहे . कौलारू छत असलेले, आणि लाकडी खांब वगैरे वापरून केलेले बांधकाम एकदम पन्नास वर्ष आधीच्या काळात  नेऊन पोहोचवते.    प्रवेशद्वाराजवळ असलेल्या त्या काचेच्या पेटीतले मासे , खेकडे, किंवा लॉब्स्टर्स तुम्हाला हवे असल्यास तयार करून दिले जातात. इथली सिग्नेचर डिश ही क्रॅब मसाला ! पण मला स्वतःला क्रॅबची फारशी आवड नाही म्हणून आम्ही सरळ फिशवर सेटल झालो.

दुपारची वेळ, पाऊस पडतोय बाहेर, कसा तरी पाऊस चुकवत आत शिरलो. नाही म्हट्लं तरी थोडे कपडे ओले झालेच. पण किंचित थंडी, ओलसर कपड्यांचा दमट पणा , हॉटेल मधलं उबदार वातावरण एकदम मस्त वाटत होता. आधी बिअर  मागवली आणि सेटल झालो.ऑर्डर देण्याचे काम आमच्या गोवेकर मित्रानेच केले. वेटर सारखा म्हणत  होता की तुम्ही एक तरी क्रॅबची डीश घ्या म्हणून.

इथे प्रत्येक फिशची प्रिपरेशन ही वेगवेगळी केली जाते. थोडी पोर्तुगिज टाइपची फिश मसाला ही पण एक मस्त डीश आहे इथली. आम्ही आधी चणक रवा फ्राय आणि मोडसो मसाला फ्राय मागवली. रवा फ्राय टिपिकल गोवा स्टाईलची डिश, चांगली बनवली होती.बिअर बरोबर बेस्ट कॉम्बिनेशन!

रवा फ्राय फिसचा पहिला घास घेतला आणि मला  एकदम माहिमचं गोवा पोर्तुगिजा आठवलं. तिथे रवा फ्रायचं नांव क्रिस्पी फिश (???) ठेवले आहे आणि भरपूर लसूण आलं लावतात त्यामुळे फिशची ओरिजिनल चव शिल्लकच रहात नाही. तिथल्या शेफला इथे ट्रेनिंग साठी …………………..!!!! असो.. काही पण आठवतं मला – आणि कुठेही… असो.

एकदा मसाला फ्राय म्हंटल्यावर सावंतवाडी मसाला नजरेसमोर आला असेल तर तुमच्या. पण नाही, तसे नाही, इथे मसाला म्हणजे  मसाला वापरलेला नसतो, तर पोर्तुगिज स्टाइलचा सॉस वापरून त्यामधे फिश बनवलेली असते.  सॉस मधे सगळीकडून भिजलेले त्या मोडसो माशाचे नरम तुकडे खूपच छान लागतात. त्याची चव इथे सांगता आली असती तर…? पण नाही , ते शक्य नाही, त्या साठी मार्टीन्सलाच भेट द्यावी लागेल. 🙂

माझी ऑर्डर.. यातली कालमरी एकदम अफलातून. सगळीकडे चिल्ली स्किंट मिळते, इथे फ्राईड.. अप्रतीम

दोन्ही डिश संपायच्या आत पुन्हा वेटरला एक प्लेट सुरमई पण ऑर्डर केली. सुरमई मसाला रवा फ्राय- म्हणजे मसाला ( तेच पोर्तुगिज सॉस )लावून वर रवा लावलेली सुरमई मागवली.  सॉस ची चव त्या रव्यामुळे मारल्या गेल्यासारखी वाटत होती. पुढल्या वेळेस फक्त मसाला फश मागवायची हे मनातच ठरवलं.   इथे आल्यावर एक गोष्ट लक्षात आली, की प्रत्येक माशाचे टेक्श्चर वेगवेगळे असते. आतापर्यंत फक्त सुरमई आणि पापलेट मधला फरक ओळखता यायचा आता त्या मधे नवीन भर पडलेली आहे. सुरमई ची प्रिपरेशन पण छान वाटली, पण मसाला मोडसो ची सर नव्हती त्याला. फ्राय फिश बरोबर टार्टर सॉस दिलेले होते. मस्त कॉम्बो आहे हे.

तिन प्लेट फिश आणि दोन बिअर संपवल्या होत्या तिघांमधे. बरोबर असलेला मित्र म्हणाला की आता कलमारी मागवू या.. कलमारी म्हणजे जेली फिश. जेली फिश चे तुकडे करून त्यांना कुठल्यातरी पिठात बुडवून तळलेले असतात.वेटरने समोर डिश आणून ठेवल्यावर त्या ओनियन रिंग सारख्या दिसणाऱ्या रिंग्ज पाहिल्यावर त्या कुठल्याही अंगाने फिश सारख्या दिसत नाहीत . जेलीफिश चे तुकडे करून तळल्यावर ते थोडे मसल्स सारखे होतात. जेली फिश खाण्याची ही पहिलीच वेळ. पण पहिला पिस उचला आणि मग  समोरची डीश कधी रिकामी झाली ते लक्षातंच आलं नाही.  आवडीच्या पदार्थांमधे ही डिश पण जोडल्या गेली आहे.

इतकं सगळं खाऊन होई पर्यंत जवळपास तास गेला होता आणि पोट पण भरलं होतं. आपली एक सायकॉलॉजी असते , कितीही खाणं झालं, तरी जो पर्यंत भात किंवा चपाती खात नाही तो पर्यंत काही जेवल्याचे समाधान होत नाही. म्हणून शेवटी प्रॉन्स करी राईस ची ऑर्डर केली. प्रिपरेशन अर्थातच उत्कृष्ट होती. प्रॉन्सचा आकार पण चांगला अंगठ्याइतका जाड होता. इथे टायगर प्रॉन्स छान मिळतात. ( मला ऍलर्जी आहे तरी पण दोन पिस खाल्लेच 🙂 )तुम्ही ऑर्डर केली की तुमच्या समोर तो जिवंत  असलेला टायगर प्रॉन्स, किंवा खेकडा आणून दाखवतो  आणि तुम्ही सिलेक्ट केल्यावर तयार करून तुमच्या टेबलवर ठेवतो.

जेवण तर झालं. बिबिन्का घेणार? उपेंद्रने विचारले, नाही म्हणणे जिवावर आले, आणि मग बिबिन्का आणि आइसक्रिम ची ऑर्डर दिली. इथे कार्मेल कस्टर्ड पण छान मिळतं. पण इतकं सगळं खाल्यावर पॊटात जागा नव्हती, म्हणून ते काही खाता आलं नाही. पुढ्ल्या वेळेस बिबिन्का ऐवजी कार्मेल कस्टर्ड. हे बिबिन्का म्हणजे खास गोवनिज डिश. सात लेअर्स असलेली लोकल केक सारखी डीश असते ही. एक खास लोकल डेलीकसी म्हणून अवश्य ट्राय करायला हवी.

तसं म्हंटलं, तर हे हॉटेल गोव्याच्या मानाने थोडं महाग आहे. पण मुंबई च्या कम्पॅरिझन मधे एकदम स्वस्त वाटते. आम्ही तिघं, वर दिलेल्या सगळ्या डीश आणि तिन बिअर आणि डेझर्ट्स इतकं सगळं संपवल्यावर पण बिल मात्र फक्त १८३३ रुपयेच आलं!!! तेंव्हा मंडळी गोव्याला याल, तर इकडे नक्की भेट द्या मार्टीन्स वाट पहातोय गोव्याला तुमची…

मी ऑर्डर न केलेले, दुसऱ्या एका ब्लॉग वरून घेतलाय हा फोटो..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in खाद्ययात्रा and tagged , , . Bookmark the permalink.

42 Responses to मार्टीन्स कॉर्नर..

 1. वाह वाह… गोवा, मस्त खादाडी आणि थंड बियर 🙂

  मस्त पोस्ट. एक एक डिश भरभरून खावी असं वाटतंय…. मला तो चणक खायचं आहे, मागे पण तुम्ही त्यावर लिहीलं होत. फिशचे फार कमी प्रकार ट्राय केले आहेत, पण तुमची पोस्ट बघून अजुन प्रकार ट्राय करायला हवेत 🙂

  जबरी पोस्ट !!

  • नक्की.. गोव्याला गेल्यावर मार्टिन्सला नक्की भेट दे.. सगळे प्रकार ट्राय करता येतिल. कलमरी हा प्रकार चिली फ्राय पण मिळतो. त्याला जेली फिश मी दिलेले नांव आहे. बोंबला सारखा एकदम नरम असतो हा फिश, पण एकदा शिजवला की वेगळीच चव लागते..चणकचं टेक्स्चर एकदम मस्त असतं.. मला पाप्लेट आवडत नाही फारसं.. पण चणक मात्र दिलसे आवडतो.

 2. jagrutk says:

  Kaka…baslya baslya marla ho tumhi aaj…ek se ek dish aahet ya..aani tondatun pani nadi sarkha vahatay… 😛
  need to find some place in Ahmedabad ASAP.. ekdam “chavishta post” 🙂

  • ब्लॉग वर स्वागत.. या वेळेस दुपारी काम झाल्यावर थोडा रिकामा वेळ होता म्हणून थोडा जास्त वेळ बसलो, नाहितर नेहेमी आपली एक फिश करी +राईस घेऊन बाहेर पडतो.. 🙂 मस्त जागा आहे ही. गोव्याची या पूर्वीची पोस्ट खाद्ययात्रा मधे आहे. दोन तिन पोस्ट्स असतील.:) स्वस्त आणि बेस्ट फुड साठी.

 3. ngadre says:

  savistar pratikriya denaar aahe. Aflatoon post aahe.. Ya veli tumheech goa madhe majhi mast soy kelit.. Tevhaachyaa khadadi vishayi lihin. Martins corner miss jhale. Maheetach navhate. Kenchuky maheet aahe.

  Ya veli ratri colva beach che shawarama haanale feni sobat.

  • नचिकेत
   नंतर आपलं बोलणं झालंच नाही.. नाहीतर त्या भागातली सगळी हॉटेल्स अगदी तलहाताच्या रेषांप्रमाणे माहिती आहेत. केंच्युकी तसं बरं आहे, पण महागडं वाटतं गोव्याच्या मानाने. मी पण त्याच ठिकाणी उतरलो होतो. कितीही सिझन असो, माझ्या साठी कायम ऑफ सिझन रेट्स असतात तिथे.
   वाट पहातोय पोस्टची.. येऊ दे लवकर..

 4. काका, स्क्विड-फिशला कोकणात म्हाकुल असे म्हणतात. त्याच्या रिंगा तळलेल्या खाल्ल्या नाहीत कधी, आमच्याकडे ते मटणासारखे करतात. मस्त लागते. मागे एकदा मी पोस्ट लिहिली होती त्यात उल्लेख आला होता पण मला त्याचे इंग्रजी नाव माहीत नव्हते.
  बाकी पोस्ट मस्त. एकदम तोंडाला पाणी सुटणारी. फोटो जबरी आहेत. विशेषतः मोठी चिंगळे (Tiger Prawns)

  • गोव्याला त्याला कलमारी म्हणतात. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नांवं असतात. खरं म्हणजे हा म्हावरं म्हणजे ऑक्टोपसच्या जातीचा एक प्रकार आहे ( हे नंतर समजलं )

 5. आल्हाद alias Alhad says:

  kaka map kinva going directions dya na…
  preferably panjim/madgaon asha mothya shaharapasun…

  • आल्हाद
   अरे अगदी सोप्पं आहे.आणि फेमस जॉइंट आहे, कोणीही सांगेल. मडगांव पासून अगदी जवळ आहे.

 6. s.k. says:

  tondala paani sutla… 🙂

 7. महेश कुलकर्णी says:

  सुंदर हॉटेलची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद मस्त,

 8. महेश कुलकर्णी says:

  मस्त माहिती दिली आवशकभेट देऊ,धन्यवाद,

  • महेश
   नक्की भेट द्या.. गोव्याला गेल्यावर इथे एकदा तरी जायलाच हवे. एक स्पेशॅलिटी जागा म्हणून तरी!

 9. mazejag says:

  Kaka, promise me , next time Govyala janyadhi tumhla jara traas denar aahe….hya veles Goa swataha car drive karat hindaych aahe….tumchi madat lagel changlya thikanansathi…

  tumhi sangitalelya jagi zabrat food ast he try keley mi…..

  • अश्विनी
   कधीही फोन कर.. नंबर आहेच तुझ्याकडे. आणि या पूर्वीची गोव्याचे खादाडीचे पोस्ट्स वाचले तरीही बरीच माहिती मिळेल. सगळे बेस्ट ठिकाणं एकत्र करून पोस्ट केले होते एकदा. 🙂

 10. pan jaam mahag asel ho…… parvadnar nahi

 11. प्रसाद थरवळ says:

  Shukravari sakali sakali asli post wachun “Taste buds chalavalet”… chala aaj duparla Fresh Catch nahitar Malwani Kinara Fix……. 😉

 12. geetapawar says:

  tumhi mashychi naav sangtay ithe majhya tondala pani sutay. aaj me hi mashyacha beat kelay me mumbai kar mhanlyawr… masoli mala navi nahi…pan problem haa aahhe ki punyat taazhe mase bhetne thode awghd aahe………………..pan chan sir………… tumchi khanya babatchi oursikta khup mala aawdle…. chan enjoy.kakunla sngiley na tas tumhi nahi tya ragwtil tumhala……………. have gr8 day sir.

  • माझ्या घरी मी एकटा सोडून सगळे शुद्ध शाकाहारी आहेत. मी मासे खाऊन आलो, इतकं जरी समजलं तरी बायकोला चार दिवस माशांचा वास येत असतो 🙂 जोक अपार्ट, मासे खायचे तर मुंबई किंवा गोवा!! नदीतल्या माशांची इतकी चांगली व्हेराय़टी मिळत नाही.

 13. तुझे जबरी वर्णन वाचूनच माझ्या काहीही उपयोगाचे नसले तरी जायचा मोह झाला बघ. त्यानिमित्ते सचिनचे फेव पण पाहून होईल आणि तू नेहमी सांगतोस तो हा बेतिम बिचही. 🙂

  सगळ्या फिशचे फोटू एकदम चकाचक आलेत. आणि तुझी खुशी पोस्टमधून ठायीठायी दिसतेय. 🙂

  • बेत्लबेतिम बिच वर जाण्याचे कारण वर दिलेले आहेच. इकडे नंबर लाऊन ठेवायचा आणि तासभर फिरून यायचं! संध्याकाळी सिझन मधे खूप गर्दी असते इकडे, तेंव्हाचा हा कार्यक्रम असतो.
   खाण्याची पोस्ट असल्यावर खुशी तर असेलच……!!
   तू आलीस वाटतं नेट वर परत. बोलू या नंतर. 🙂
   आणि शुद्ध शाकाहारी लोकांनी इथे येऊच नये. त्यांच्यासाठी काहीच ऑप्शन्स नाहीत फारसे !

 14. Smita says:

  hmmm goa is partial to non vegetarians. pun pavasaLyatala tithala nisarg doLysamorun halat nahee, we visited just a week back aNee punha lagech javasa vaTatay..

  • शाकाहारी अतिशय वाईट मिळतं. तशी काही हॉटेल्स आहेत बऱी.. पण फार कमी. मी असतांना सारखा पाऊस सुरु होता, त्यामुळे खूप कंटाळवाणं झालं होतं.

 15. Smita says:

  BTW diet chalu ahe ashee kaheetaree afava ya blog var madhyantaree pasaralee hotee…:-)

  • अफवांवर विश्वास ठेऊ नये.. 🙂
   सध्या सारखा प्रवास सुरु असल्याने थोडं दुर्लक्षं केलं जातंय. पण आता पुन्हा सुरु करायचं आहेच. गेला महिना भर फक्त शनिवार रविवार घरी असतो, बाकी सगळॆ दिवस बाहेर..

 16. heramboak says:

  >> सचिन तेंडूलकर, विजय मल्ल्या , शरद पवार, मास्टर शेफ संजय कपूर, संजय दत्त, ह्रितिक रोशन, बिपाशा बासू आणि अनेक सिलेब्रेटीजचे गोव्यातले आवडते रेस्टॉरंट कुठले-

  काका, सगळ्यात मोठ्या सेलिब्रिटीचं नाव राहिलं… रारा महेंद्र कुलकर्णी 🙂

 17. sumedha says:

  खादाडी पोस्ट लय भारी !! गोव्याला गेल्यावर जायला हवं नक्की. आमच्या मालवण ला ‘काळुंद्रे ‘ नावाचे पापलेट सारखे दिसणारे , पण एकदा खाल्यावर आयुष्यभर पापलेट ला विसरायला लावणारे खाडीचे मासे मिळतात . ट्राय करून पाहा एकदा ….

  • सुमेधा

   कोंकणात फार तर रत्नागिरिला कधी तरी येणं होतं. पण एकदा नक्की आवडेल सुटी मधे फिरायला जायला . काळूंद्रे ट्राय करणारच तिकडे कोकणात आल्यावर. बहुतेक लवकरच होइल व्हिजीट..

 18. Rohit says:

  Mama, excellent post!!! I am not a fan of seafood, but tried calamiri once in Pondicherry and liked it.. The photos and other description reminded me of what i had had there… the Surmai masala fry really looks delicious… I am still hanging on your offer to take me to good hotels once im there!!!! :):)

  • रोहीत’
   ये रे, इकडे आला की मला फोन कर .. मुंबई, गोवा सगळीकडली बेस्ट ठिकाणं दाखवतो.. कधी येणार आहेस परत?

 19. तोंडाला पाणी सुटल्यावाचून राहील नाही …. 🙂

  • मस्त आहे रे. नक्की जा नेक्स्ट टाइम .. एकदा तरी इथे गेल्याशिवाय गोवा ट्रिप पुर्ण होत नाही.

 20. Ashok Patil says:

  महेन्द्रजी ~ जाऊन आलो आणि किती तृप्त झालो हे नेमक्या शब्दात प्रकट करणेही मुश्किल वाटत आहे यावरून तुम्हीच ते ताडू शकाल. आपल्या ब्लॉगवरील हे लिखाण मी पाहिले वाचले होतेच, शिवाय एक जालीय मित्र नचिकेत गद्रे यानी दोन मराठी संस्थळावर असेच फोटोसहीच ‘मार्टिन्स कॉर्नर’ विषयी लिहिलेले लेख वाचले असल्याने उत्सुकता अधिकच वाढली {भूकही प्रज्वलित झाली}. मग प्रोप्रा. मि.जो परेरा याना एक सुरेख ई-मेल केले आणि त्याला उत्तर म्हणून त्याच संध्याकाळी खुद्द परेरा यांचाच ‘मि.पाटील आम्ही तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहोत’ असा आपुलकीचा मेलही आला. शिवाय व्यक्तिगत मोबाईल नंबरही त्यानी दिला. ‘शुभस्य शीघ्रम’ या वचनाला जागून आम्ही तीन मित्र कोल्हापुरातून सकाळी ८ ला बाहेर पडलो व दुपारी १३.२० ला मार्टिन्स कॉर्नर इथे सहज पोचलोही. कुठेच रस्ता विचारण्याची वेळ आली नाही. हॉटेलमध्ये प्रवेश केल्याक्षणीच थेट मि.परेरा यांचीच चौकशी करतोय असे दिसल्यावर सदैव हसर्‍या चेहर्‍याने वावरणार्‍या असंख्य वेटर्सपैकी एकाने ‘टू मिनिट्स सर, अ‍ॅण्ड यूवर गुड नेम प्लीज ? !” असे म्हणून आतल्या खोलीत जाऊन मि.परेरा याना माझे नाव सांगितले. त्या क्षणीच ते आपली खुर्ची सोडून आमच्या स्वागतासाठी अगदी पोर्चमध्ये आले. मेलबद्दल धन्यवादही दिले. स्वागत आणि नंतरच्या जेवणाच्या गोष्टी तर मस्तच पार पडल्या. मी त्याना तुमच्या लेखाची ही लिंक तसेच श्री.गद्रे यांच्याही लेखाची लिंक दिली जी त्यानी तात्काळ आपल्या अन्य कर्मचार्‍यांच्यासमवेत स्क्रीनवर टेस्ट करून एंजॉय केली आणि तुम्हा सर्वांचे आभार मानले; हे विशेष कळवित आहे.

  अशोक पाटील

  • अशोकजी
   माझं फेवरेट ठिकाण आहे ते. कितीही वेळ कमी असला तरी एकदा तरी इकडे भेट असतेच.आम्ही गेलो, की सरळ खाणं आवरून बाहेर पडतो, पण पुढल्यावेळेस परेरांना नक्की भेटीन. प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार

Leave a Reply to भिर्‍या डोक्याचा Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s