नावात काय आहे?

तुमचा शिववडा, तर आमचा छत्रपती वडा. अरेरे.. हे असं काही वाचलं किंवा यावर टीव्ही वर चर्चा ऐकली की खरंच उदासीनता येते. छत्रपतींचे नांव वड्याला देण्यापर्यंत आपली मजल गेलेली आहे. काही दिवसांनी इतर प्रॉडक्ट्स ला पण हे नांव देणे सुरु होऊ शकते.   पूर्वी संभाजी बिडी होती, तिच्यावर बंदी आणण्यात आली ,ते चित्र काढून टाकायला  पण  बऱ्याच कोर्ट कचेऱ्या कराव्या लागल्या होत्या.  छत्रपती  शिवाजी महाराजांचे नांव वापरले की त्याकडे सगळ्या मराठा समाजाचे  लक्ष जाते.  मराठा हा जातीवाचक म्हणून वापरलेला नाही- मराठा म्हणजे मराठी माणूस ह्या अर्थाने वापरला आहे .

नितिश राणे यांनी आता जिथे शिव वडापावची गाडी सुरु आहे, तिथेच- त्या शेजारीच छत्रपती वडापावची गाडी सुरु करण्याची घोषणा करून राजकीय वातावरण एकदम ढवळून  काढले. गाडी लावायचीच तर ती शिव-वड्याच्या बाजूलाच लावण्याचा त्यांचा उद्देश हा केवळ    उकरून भांडण काढणे    हाच असावा असे वाटते. इथेच हे प्रकरण संपत नाही, अजून एक पक्ष म्हणतो की आम्ही कांदेपोहेची गाडी लावू! सामान्य जनता म्हणते आहे की – आवरा आता बस्स झालं हे!

शिवसेना म्हणते की त्यांनी  शिव-वडापाव सुरु केला तो मराठी युवकांना रोजगार मिळावा म्हणून- आणि स्वाभिमान ने सुरु केले ते केवळ पोलिटिकल मायलेज साठी. आता मराठी युवकांना वडापावच्या गाडी शिवाय दुसरं काही करता येत नाही का? असे प्रश्न मनात आले तरी त्याकडे दुर्लक्ष करा. मुंबईच्या करोडो लोकांमधल्या १२५ युवकांना वडा पावाची गाडी दिल्याने रोजगाराचा प्रश्न सुटला असे  आहे का?  म्हणूनच मला तरी   शिवसेना काय किंवा स्वाभिमान काय दोघांचाही उद्देश सारखाच  आहे असे दिसते.   जर उद्या कोणी छत्रपती हे नांव ट्रेडमार्क म्हणून रजिस्टर केले- आणि त्या ब्रॅंड  खाली किराणा, टुथपेस्ट, साबण , चप्पल वगैरे  वस्तू विकल्या  तर लोकांना आवडेल का? अर्थात नाही.  सावरकर,बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज  या नावांवर कोणा एका समाजाचे, पक्षाची मालकी आहे असे नाही, तर ही सगळी  नावं सगळ्या मराठी माणसांच्या हृदयात वसलेली आहे.

काही दिवसांपूर्वी  रात्री नागपूर हून मुंबईला परत येतांना, तास भर मुंबईच्या विमानतळावर घिरट्या घालून झाल्यावर एअर होस्टेस ने अनाउन्स केले, ” अबी तोडेही समय मे हमारा विमान  श्री शत्रपती ( इतकं म्हणे पर्यंत तिला  धाप लागली होती)  शिवाजी हवाई अड्डे पे उतरेगा” . त्या एअर होस्टेसचा   प्रत्येक शब्द कानाला बोचत होता. एका चांगल्या शब्दाचा विध्वंस करण्याची ही परंपरा प्रत्येकच एअरलाइन्स वाले करत असतात. दोन तिन दिवसापूर्वी नागपूरला उतरतांना पण ” अबी तोडेही समयबाद हमारा विमान बाबासाहेब आंबेतकर हवाई अड्डे पर उतरेगा” असे असेंटेड हिंदी मधे जेंव्हा ती एअर होस्टेस म्हणाली, तेंव्हा मात्र खरंच इतका सोपा शब्द पण त्यांना का येत नाही? की त्या मुद्दाम असे असेंटेड बोलतात हा प्रश्न पडला .

लोकप्रिय व्यक्तींची नांव वास्तूला, जागांना,ठेवायला आपल्याला आवडतं, पण काही दिवसांनी ते विसरलं पण जातं. याचेच एक उदाहरण म्हणजे मुंबई पश्चिम भागातला एसव्ही रोड. हा एस व्ही रोड म्हणजे नेमका कुणाचं नांव दिलं गेलं आहे, हे त्या रोडवर राहणाऱ्याला पण ठाऊक नसेल. मी त्याच रस्त्यावर रहाणाऱ्या एका मित्राला विचारले, तर त्याने स्वामी विवेकानंद रोड म्हणून नाव सांगितले, तर दुसऱ्या एकाने सरदार वल्लभभाई पटेल हे नांव सांगितले. या संपूर्ण रस्त्यावर कुठेही या रस्त्याचे पुर्ण नांव लिहिलेले आढळत नाही.

कुठल्यातरी एखाद्या महापुरुषाचे नांव द्यायचे, आणि नंतर मग त्या नावाची दररोज चीर फाड करायची हे काम नेहेमीच केले जाते.  छत्रपती शिवाजी टर्मिनस नांव ठेवलंय आपण व्हीटी चे, पण आपण ते किती वेळेस वापरतो?  तिकिटं काढायला गेल्यावर,   भाऊ,  एक छत्रपती शिवाजी टर्मिनस चे तिकटं द्या न म्हणता आपण सरळ सीएसटी चे तिकिटं द्या म्हणतो, कारण छत्रपती शिवाजी टर्मिनस   म्हणेपर्यंत लागणारा दम , आणि  ट्रेन पण निघून जाईल का ही भिती.   इतकं मोठं नांव ठेवायचं आणि मग ते नांव कधी आयुष्यभर वापरायचं  नाही, तर त्या नावाचा अपभ्रंश करून वापरायचे- मग असे असतांना   इतकं मोठं नांव ठेवायचा अट्टाहास  कशाला करायचा? हा प्रश्न पडतो मला.

बरं हे असो, थोडं विषयांतर करतोय,  तुम्ही कधी कोल्हापूरचे तिकिटं बुक केलंय का रेल्वेच्या  साईटवर?  http://irctc.com  या साईटवर जाऊन एकदा प्रयत्न करा. मला तरी आजपर्यंत ते जमलेले नाही. कोल्हापूर हे नांवच सापडत नाही साईट वर. मला वाटतं की कोल्हापूरचे नांव बदलले आहे चार पाच वर्षापूर्वी पण अजूनही ते नांव रुळलेले नाही. आजही महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांना कोल्हापूरचे नवीन नाव माहिती नाही.

मुंबई ते पुणे एक्स्प्रेस वे ला   यशवंतराव चव्हाण महामार्ग नांव दिले आहे, पण ते कोणी घेतं कां? सगळे लोकं मुंबई पुणे एक्स्प्रेसवेच म्हणतात. तसेच मुंबईचा वरळी सी लिंक  जेंव्हा पुर्ण झाला तेंव्हा त्याला राजीव गांधीचे नांव द्यायचे की सावरकरांचे यावर बराच गदारोळ झाला होता. शेवटी  राजीव गांधी यांचे नांव दिले गेले, तरी पण त्याला कोणी राजीव गांधी सागरी सेतू म्हणत नाही, तर  वरळी सी लिंक म्हणूनच ओळखले जाते.पण एखादी नवीन वास्तू तयार झाली की त्याला कुठल्या ना कुठल्या महापुरुषाच्या दावणीला बांधण्याची चढाओढ सुरु होते.

लोकांच्या भावनांना हात घालण्याचा एक सोपा उपाय म्हणजे  एखाद्या  वास्तूला, रस्त्याला, विविक्षित  नेत्याचे नांव द्यावे म्हणून एखादा नेत्याने प्रेस कॉन्फरन्स  मधे किंवा एखाद्या इंटरव्ह्यु मधे मागणी करायची. पेपरवाल्यांना, टीव्ही वाल्यांना असे मसालेदार काहीतरी हवे असतेच, मग त्यावर ते इतरांच्या  ( रस्त्यावरच्या लोकांच्या ) प्रतिक्रिया घेणे सुरु करून टिव्ही वर दाखवून वातावरण तापविण्याचे काम करतात.ते इतके तापवतात की ज्याने हा मुद्दा सुरु केला तो पण ही उष्णता हाताळू शकत नाही आणि तो पण  बाजूला होतो, आणि ही चळवळ वेगळ्याच कुणाच्या तरी –  गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या हातात जाते.

आता हे असे नामांतर केल्याने  त्या वास्तूचे महत्त्व वाढते असे नाही, पण  राजकीय मायलेज नक्की मिळते. समाजातील घटकांचे जाती नुसार ध्रुवीकरण होणे सुरु होते. एकीकडे जातीयता बंद करा म्हणायचे आणि दुसरीकडे आपणच त्याला खतपाणी घालायचे अशी ही नेत्यांची मोडस ऑपरेंडी असते.. एकदा पेपर मधे आले की  मग त्या मागणीला सगळे ’खंदे पाठीराखे’ पाठिंबा देतात. दुसऱ्या पक्षाचे ( विरोधी पक्षाचे) लोकं लगेच विरोध करायला तयार नसतात, कारण अडकित्त्यात सापडलेल्या सुपारी सारखी त्यांची स्थिती झालेली असते. धड विरोध पण करता येत नाही, किंवा धड पाठिंबा पण देता येत नाही- मग सरळ या विषयावर मुग गिळून गप्प बसणे पसंत करतात  हे  लोकं.

लवकरच ही मागणी  एका वेगळ्याच लेव्हलला पोहोचते, काही स्वयंभू नेते  काही टाळकी फुटतात, काही लोकांना अटक होते, काही लोकांचे जीव पण जातात ( आठवा मराठवाडा विद्यापीठ नामांतर)  एकदा नांव दिले गेले, की सगळे लोकं  त्या  नामांतराच्या  मागच्या कारणाला विसरतात. एखाद्या थोर व्यक्तीचे नांव दिले की त्या विद्यापीठाचे महत्त्व वाढते किंवा त्या थोर व्यक्तीला श्रद्धांजलीच दिल्यासारखे होते म्हणून   नामांतर- असं माझा एक मित्र म्हणायचा, पण खरा या मागचा  उद्देश काय होता तो अजूनही मला  समजलेला नाही. जर श्रद्धांजली द्यायचीच , तर त्या महापुरुषाने जे शिकवले आहे त्याचे पालन करणे जास्त योग्य ठरते. नागपूर  विद्यापीठाचे नांव तुकडोजी महाराज ठेवण्यात आले आहे,अमरावती विद्यापीठ हे गाडगे महाराज विद्यापीठ झाले,  त्याने पण काय साधले?  ही नावं बदलल्याने विद्यापीठाच्या गुणवत्तेत   काही फरक पडला का? की फक्त सर्टीफिकेट वर नांव बदलले ? माझ्या मते काहीही फरक पडलेला नाही. पण या गोष्टी  कडे दुर्दैवाने कोणाचे लक्ष जात नाही.

बाबासाहेबांच्या हातात नेहेमी एक पुस्तक असायचे, त्याला ते विनोदाने आपले सहावे बोट आहे असे म्हणायचे. शिक्षणाशिवाय, वाचनाशिवाय पर्याय नाही हे त्यांनी   दाखवून दिले. विद्वत्ता, शिक्षण ही एका समाजाची, जातीची  मक्तेदारी नाही हे त्यांनी  कृतीने सिद्ध करून दाखवले होते  . त्यांच्या या बाबीकडे सोयीस्कर पणे दुर्लक्ष करून केवळ हजाराच्या नोटेवर बाबासाहेबांचा फोटो छापा, ्सावरकरांचा फोटो छापा, अमुक गोष्टीला त्यांचे नांव द्या  अशा  मागण्यासाठी समाजाला आंदोलनं करण्याकडे नेते प्रवृत्त करतांना दिसतात.एखादे नांव बदला म्हणून  नामांतराची आंदोलनं करण्यासाठी दिली गेलेली चिथावणी पण अशीच वाटते. बाबासाहेबांच्या शिकवणी कडे लक्ष देऊन शिक्षण पूर्ण करणे, स्वतः मोठं होणं आणि  देशाच्या  जडणघडणीत हात भार लावून देशाला मोठं करणं   हे   जास्त योग्य ठरेल.

छत्रपती शिवाजी  महाराज,  महात्मा गांधी,  बाबासाहेब आंबेडकर असो किंवा विदा सावरकर असो, या  सगळ्या  किंवा इतरही महापुरुषांचा राजकारणासाठी वापर केला जाऊ नये एवढीच इच्छा!

 शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? पण जर त्याने भारतात जन्म घेतला असता तरीही त्याने  असेच म्हंटले असते का? 

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in Uncategorized and tagged , , , , , . Bookmark the permalink.

54 Responses to नावात काय आहे?

 1. pramod mama says:

  Mahendra Kaka
  pudhari ani gund yana phakta lokpriyta kahihi karoon milvaychi kalji aste. tyamule tyana mothya thor mansan baddal kahihi ghene dene naste. mala ani tumhala watate ki thor mansancha apman hota kama naye . Pan te shakya nahi he nalayak lok tyacha gair phayda ghenarch ani chamche mandali bhel bhatta + batli kashi milel evdhech baghnar , apan nishedh karoo shakto baas. baki sodoon dya kool down boss.

  Pramod Mama

  • प्रमोदमामा
   टीव्ही वरचा कार्यक्रम ( की भांडणं?) पहाताना नितीश ची बॉडी लॅंग्वेज खूप खटकत होती. तुमचं म्हणणं बरोबर आहे, आपण सामान्य माणसं काय करू शकतो? इथे कमीत कमी ब्लॉग वर आपल्याला काय वाटतं हे लिहू तरी शकतो, इतकंच!!

   • pramod mama says:

    Mahendra Kaka

    Bapse Beta Sawai…. Goond Bap Kaa Baap Maha Goond…bas dekhate raho…Tamasha

    Pramod Mama

 2. savitarima says:

  agadi khara aahe ha naamvantancha naammahima.
  kolhapur che naav shodhtana nehamich mazi fe fe udate. vidyapeethanchya naave baryachda DD kadhava lagato tevha ektar poorn naavch athavat nahi , aani aathavale tari te maavat nahi . CST ha aapbhransh aata itaka prachalit zala aahe ki mool naav baryach janana mahit dekhil nasate.

  • ब्लॉग वर स्वागत. मला तर कोल्हापूरचे तिकिट कधीच काढता आलेले नाही. शेवटी मी व्हायापुणे बसने जातो कोल्हापूरला. प्रतिक्रियेसाठी आभार.

 3. Avinash says:

  Me December madhe kolhapurla train ne gelo hoto, online reservation sathi kolhapur stationche naav shodhayala 2 divas lagle. stationche naav ahe Chatrapati shahu terminus & station code ahe KOP, ahe ki nahi gammat?

  • अविनाश
   धन्यवाद.. प्रतिक्रियेसाठी आभार. पण स्टेशनचे नांव बदलायची ही गरज का वाटली असावी हेच समजत नाही. जरी जुने नांव राहू दिले असते तरी चालले असते.

 4. sagarkokne says:

  महाराष्ट्राच्या राजकारणात सगळे चोर बसले आहेत…शिवसेनेला शिवाजी महाराज ही केवळ त्यांची मक्तेदारी आहे असे वाटते तर इतर पक्षांनी शिवाजी महाराजांचे ‘क्रेडीट’ घेता येत नाही म्हणून आता छत्रपती वड्याचे राजकारण सुरु केले आहे. सगळा नाटकीपणा आहे…उद्या मरणोत्तर (किंवा जिवंत असतानाही ) एखाद्या रस्त्यास शरद पवारांचे नाव ही देतील.

  • सागर
   कधी जळगांवला गेले आहात का? तिथे एका जैन चा पुतळा ( विधानसभेचे निवडून आलेले) ते जिवंत असतांना बसवण्यात आलेला आहे. आपण मेल्यावर लोकांना त्रास होऊ नये म्हणून जिवंतपणीच किती काळजी घेतो हा माणूस? असा विचार मनात आला तो पुतळा पाहिल्यावर. शरदरावांचा पुतळा पण बसवतील कदाचित , काहीच अशक्य नाही हल्ली!

 5. Santosh kashid says:

  काका,
  अगदी, अगदी! आताच काही क्षणांपुर्वी कोल्हापुरचं तिकिट बुक केले नि इकडे आलो वाचायला. ४ वेळा आतापर्यंत बुकिंग केलेय कोल्हापुरचं ह्या साईटवरुन पण अजुनही कोल्हापुरचं नाव आठवत नाही बुकिंग करताना! आणि सगळ्यात कहर म्हणजे महाराजचं स्पेलिंग! तिथे ते ’mharaj’ असं केलेय! खरतर आपण ही ’नावं’ देत नाही तर आपण आपल्याच वंदनिय व्यक्तिंना ’नावं’ ठेवतो असं मला वाटतं

  • संतोष
   ब्लॉग वर स्वागत! मला पण हेच म्हणायचं होतं, की सामान्य माणसाला या नावांशी काही घेणं नसतं, पोलिटिकल गेन साठी ह्या अशा गोष्टींखाली आग लावून निखारे फुंकत बसायची सवय नेते मंडळींना असते. अशा प्रकारे आदर देण्याची ही सरंजाम शाहीतली पद्धत आता तरी बंद झाली पाहिजे.

 6. MANDAR KATRE says:

  अगदी योग्य मुद्दा मांडलात, संभाजी- शिवाजी आणि अन्य सर्व नेत्यांच्या नावाचा गैरवापर करून महाराष्ट्रात फक्त आपली पोळी भाजण्या पलीकडे या राजकारण्यांनी काहीही केलेले नाही. सगळ्या रस्ते/ चौक यांची नावे बदलून A1 ,B2 अशी दिली पाहिजेत, ज्यायोगे कोणालाच सुखावण्याचा किंवा दुखावण्याचा /गोंजारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही

  • मंदार
   ब्लॉग वर स्वागत. अहो सिडको च्या वाशी मधे, किंवा नाशिक , औरंगाबादला सेक्टर नंबर्स, वापरले जातात आणि त्यामुळे काहीही अडत नाही कोणाचे. तशीच पद्धत सगळीकडे वापरली तर काय हरकत आहे?

 7. madhuri gawde says:

  mala niteshjina evdhech sangaavese waatle, ki tyani dusryala nyaya dyachya evji swataache kaka ankush parab yaanchya murderer na shodhaave. kendraat satta astaanadekhil te swaataachya gharaatil mansaana nyaya deu shakat naahi tar marathi tarunanvaril annyay kay dur karnaar? aani vadapav race peksha aapla pratispardhi mhanun bhaiyachya shejari dhanda laavun daakhva

  • माधुरी
   प्रतिक्रियेसाठी आभार. त्या केस बद्दल मला पण फारशी माहिती नाही. पण तुम्ही जे म्हणताय ते शोधायचा प्रयत्न नक्कीच करीन. वडापावाची गाडी लावण्यापेक्षा , सध्या अव्हेलेबर असलेल्या नोकऱ्यांमधे महाराष्ट्राचा डोमिसील असण्याची अट घातली तर प्रायव्हेट कंपन्यांमधे नक्कीच लोकल लोकांना नोकऱ्या मिळतील.

 8. काय मस्त लिहिता तुम्ही, लेख पूर्णपणे निपक्ष होता पण एक गोष्ट पटली नाही. हवाई सुंदरी जेव्हा अनाउन्स करते तेव्हा तिचा राजकीय उद्देश नसून ती तिच्या एक्सेन्त मध्ये बोलते- भारतीय हवाई सुंदरीचा Toussaint Louverture International Airport. हा उच्चार Haitian एक्सेन्त मध्ये नसेल; म्हणून तो Louverture चा अवमान समजावा का ? मला वाटत आपण या राजकीय पक्षांना धडा शिकवू शकतो; या लोकांना अक्कल येण्याकरता कुणीही अशा गाडीवरून वडा-पाव घेऊ नये. शिवाय निपक्ष लोकांनी जाहीरपणे निषेद करायला हवा.

  • भिऱ्या डोक्याचा,
   मस्त नांव आहे तुमचं> 🙂 ब्लॉग वर स्वागत!!
   अहो, मी जे लिहितोय ते लोकल एअरलाइन्स बद्दल आणि भारतीय एअर होस्टेस बद्दल. इथे कशाला उगाच असेंट हवा? भारतीय व्यक्तीला डॉ. बाबासाहेबांचे नांव किंवा छत्रपतींचे नांव उच्चारता येत नसेल ही कल्पनाच मला मान्य होऊ शकत नाही.
   तुम्ही जेंव्हा लेव्ही ची जिन्स घेता तेंव्हा कोणीतरी ताबडतोब तुम्हाला दुरुस्त करतो, लेव्ही नाही रे– लिव्हाईस म्हणायचं त्याला.. तसेच नाईक बुटांना नायके म्हणायचं असतं.. हे असे इतके लहान परदेशी शब्द , पण त्यांचा उच्चार पण आपण बरोबर करतो मग आपल्याच नेत्यांचा का करू ्शकत नाही?

 9. संभाजी बिडी च काय मटण खानावळ पासून दारूच्या दुकानांना, लाटारीच्या जुगाराला सुद्धा देव देवतांची महापुरुषांची नावे देण्याची भारतात सरास प्रथा आहे. एव्हढेच नव्हे तर शासन खुद्द स्वातंत्र्य सैनिकांना त्यांच्या लढ्या बद्दल बक्षीस म्हणुन दारू विक्रीचा परवाना देते हे आपणास माहीत नसेल. या देशाचे , या देशाच्या भाषेचे नेमके नाव काय आहे हे या शासनाला देखील माहीत नाही. या मुळे या देश्यात ना हिंदीचा योग्य प्रसार झाला ना स्थानिक भाषेचा विकास झाला. ज्या भाषेला देव भाषा म्हणतात आणि ज्या भाषेत जगातले सर्व तंत्रज्ञान आहे असे म्हंटले जाते ती संस्कृत भाषा सुद्धा मृत झाली पण याची कोणाला ना खंत ना खेद . सर्व जण राजकारण करण्यात मग्न आहे. मराठवाडा विद्यापीठाला आंबेडकरांचे नाव द्या म्हणुन पुण्या मुंबईच्या विचारवंतानी मराठवाडी जनतेच्या भावनांचा विचार न करता जरा जास्त पुरस्कार केला. पवारांनी मतांचे राजकारण करत नामांतर केले आणि आता पवारांनी परत दादरच्या नामांतराचे पिल्लू सोडले की समस्त दादरकर मुंबईकर विरोधात उभे राहिले. स्वत:वर बेतल्यावर समानतेचा सामाजिक जाणीवा आता मात्र लोप पावल्या . हे दुर्देव आपल्या देशाचे .

  • ठण्ठणपाळ

   दादरचे नांव बदलायचे चालले आहे, ते शरदरावांनी एक पिल्लू सोडून दिले आहे , पुढे कधी तरी त्यांच्या अंगावर एखादी केस आली की हा मुद्दा पुन्हा कधीही वर काढून वातावरण पेटवलं जाऊ शकतं. या नामांतराने काय साध्य होणार आहे हा मुद्दा पण शेवटी आहेच. मराठवाडा विद्यापीठाचे नांव बदलूनही काही साधले असे वाटत नाही. त्या कामामधे ज्या लोकांचे जीव गेले त्यांनी काय मिळवले ?? हा प्रश्न नेहेमीच छळतो.
   जनतेला पेटवणे सोपे आहे खूप. लहानसा जातीनिहाय मुद्दा, पण समाजाला पेटवू शकतो हे नक्की..

   • Dadar kaay- yanchya manaat aala tar udya “Bharat” yevji “Ambedkarstan” mhantil ya deshala. He sarv pahun tya thor purushacha aatma tarfadat asel…!

    • आता मोठी इंटरेस्टींग मुव्ह आहे. रामदास आठवलेंना मुंबई सेंट्रल चे नांव बदलून हवे आहे. कृपाशंकर म्हणतात की या दादरचे नांव आंबेडकर स्थानक करा.दादर कर म्हणतात , बदलू नका, दादरच ठेवा..
     यावरचा माझा उपाय..
     दादर सेंट्रल प्लॅटफॉर्म नंबर एक ते चार – एक नांव
     पाच आणि सहा.- दुसरे नांव
     वेस्टर्न साईड प्लॅटफॉर्म नंबर एक आणि दोन – तिसरे नांव
     प्लॅटफॉर्म नंबर चार, पाच ,सहा.. – चौथे नांव.

     हे सगळं करून जर देशाचं भलं होत असेल तर माझी काही हरकत नाही.. पण दुर्दैवाने तसे नाही.

     साहेबांवर वेळ आली की काहीतरी मुद्दा उपस्थित करता यावा म्हणून ते असे काहीतरी मुद्दे उकरून काढतात. आणि मग ते स्वतः कुठे अडकतो आहो असे दिसले की ह्या मुद्द्याला हवा घालून रान पेटवतात. दुर्दैवाने कोणालाच हे समजत नाही- समाज अगदी अक्कल शुन्य असल्याप्रमाणे वागतो, आणि साहेबांच्या राजकारणाला बळी पडतो. मी वर लिहिल्या प्रमाणे, साहेबांना काउंटर करता यावे म्हणून कृपा बोलला, आता आपलं स्थान डळमळीत होत आहे असे वाटले म्हणून रामदासाने काहीतरी ओल्या काड्यापेटीतल्या काड्या पेटवायचा प्रयत्न केलाय. राज , उद्धव या सगळ्यांची गम्मत पहाताहेत.. असो.. बघू या काय काय होतं ते.. हा मुद्दा असाच शेल्फ मधे टाकला जाईल, आणि मग नंतर कधीतरी पुन्हा एकदा उचलण्यासाठी…

 10. मस्त लेख तुम्ही मुद्दा अगदी अचूक पकडला आहे…..

  तुमच्या ब्लॉगचा कोड मला माझ्या ब्लोगवर टाकायचा आहे कस करू ते सांगाल का ?

  काका नवीन लेख लिहिलाय सहजच पावसावर…….कृपया वाचून बघा.

  http://manmokale.wordpress.com

  विनंती: तुमच्या जाणकार मित्रांना पण माझा BLOG विझीट करायला सांगा…..

  • मेघनाद
   ब्लॉग सुरु केल्याबद्दल अभिनंदन.. नियमीत लिहीत रहा. मी सध्या बाहेर टूर वर असल्याने काल दिवसभर ऑन लाईन नव्हतो म्हणून उत्तराला वेळ लागतोय. ब्लॉग पाहीला आहे मी.. छान आहे तुमचा ब्लॉग. आज पुन्हा चेक करतो नवीन लिखाण..

 11. nilesh says:

  I would like to know the new name of kolhapur ?

  • Sarika says:

   It’s known as ‘Chhatrapati Shahumaharaj Terminus’

   • nilesh says:

    You are suppose to write about changed name of the “Railway Terminal” of kolhapur,
    in the article.
    You forgot to add it , mistakenly you have mention that ‘Kolhapur city has changed its name’, instead of adding kolhapur’s railway terminal name has changed.
    Please do the changes immediately otherwise all the stuff of article will be apply to you, as you have also made a Mistake/Confusion to mentioning the name of the city and the railway terminal. 🙂
    Nice Article.

    • निलेश
     आभार.. माहिती नव्हते मला. मला सारखं वाटायचं की गावाचे नांव बदलले की काय. दुरुस्त करतो.

 12. विनय says:

  पुण्यात एक चौक आहे. अप्पा बळवंत चौक. ह्यातील अप्पा बळवंत कोण होते? हे बहुतांश पुणेकरांना माहित सुद्धा नसेल. केवळ महापालिकेच्याअ रेकॉर्ड्स मधे आणि इतिहास तज्ञांच्या माहितीत ही व्यक्ति असेल. बरं आता त्या नावाचा शॉर्ट-फॉर्म तयार झाला आहे. त्या चौकाला सर्व जण ABC म्हणतात. एवढे, की अनेक जणांना आता पूर्ण नाव माहित सुद्धा नाही!

  देशातील अनेक ठिकाणी असलेल्या एम. जी. रोड चं काय झालंय? ज्या गोष्टींचा पुरस्कार एम.जीं. नी केला होता त्यालाच हरताळ फासत तेथे विविध प्रकारचे छान-छोकीचे व्यवसाय टाकले आहेत.

  • विनय
   तुमचे म्हणणे अगदी खरे आहे. कुठला शॉर्ट फॉर्म कधी आणि कसा रुळेल हेच सांगू शकत नाही आपण. त्या पेक्षा नांव ठेवतांनाच फक्त शिवाजी टर्मिनस ठेवले असते तर? किंवा कोल्हापूरचे शाहू टर्मिनस ठेवले तर ते जास्त सोपे ठरेल.. आणि लोकं पण अपभ्रंश करणार नाहीत नावाचा.

 13. प्रणव says:

  महेंद्र काका,
  खरं तर आपण छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर असो किंवा विदा सावरकर अशा अनेक थोरांनी ज्या समाजहिताच्या चार गोष्टी सांगितल्या आहेत त्याच्याकडे पूर्णपणे कानाडोळा करून नको त्या वादात यांना अडकवून ठेवला आहे. सगळे फक्त या नावांचा उपयोग करून राजकीय पोळी भाजून घेत आहोत.
  जय हो !!!
  प्रणव

  • प्रणव
   अगदी खरं आहे. मला एक सांग सावित्रीबाईंच्या नावाने नेहेमी राजकारण करणारे पक्ष नेते, आणि त्यांचे कार्यकर्ते आपल्याच घरातल्या मुलींची लग्न शिक्षण पूर्ण न होऊ देता १८व्या वर्षीच करतात.. ( मुद्दाम नांव देत नाही इथे) असो..

 14. अभिषेक says:

  शेक्सपिअर ढगात हसत बसला असेल… आणि आम्ही इथ आपल्या नशीबाला कोशात… नशीब नशीब म्हणतात ते नेमकं काय ते आज उदाहरणासकट कळतंय

  • अभिषेक
   तो देवाचे आभार मानत असेल. शेक्सपिअर सराई पण आहे कुठेतरी कलकत्त्याला.. 🙂

 15. महेश कुलकर्णी says:

  केवळ राजकारण चालल आहे,राज्यात अनेक प्रश्न आहे,सोयीसाठी थोर पुरुषाचा वापर करू नये

 16. वड्याला महाराजांचं नाव देणं म्हणजे निव्वळ मुर्खपणा आहे …….. पण आता ह्यांना कोण सांगणार?

  – विनोद

  • महाराजांची शिकवण आचरणात आणणे जास्त महत्त्वाचे .. पण नेमके तेच सोडून सगळं काही केलं जात आहे. जाती नुसार लोकांना फोडा, आणि राज्य करा.. हे असेच सुरु राहिले तर पुढली पिढी स्वातंत्र्य किती काळ उपभोगु शकेल याची चिंता वाटते.

 17. saheb , ह्या राज्यात फक्त दोनच नावे बस्स आहेत राजकारण करायला. एक बाळासाहेब आणि दुसरे बाबासाहेब !!!! दोघांपैकी एकाला जरी डिवचले कि झाले अख्खा महाराष्ट्र पेटून उठतो. मग बॉम्ब फोडायची पण काही गरज नाही. आपणच एकमेकांची डोकी फोडून घेतो.

  • भोवरा
   पण हे असे लोकांना भावनिक दृष्ट्या पेटवणे कितपत योग्य आहे? हे असे केल्याने समाजात माजणारी दुफळी ही दिसत नाही का त्यांना? समाज विभागला गेला , की राज्याची देशाची प्रगती खुंटते.. म्हणून हे असे वागणे अजिबात मान्य केले जाऊ नये..

 18. geetapawar says:

  kaka hye rikam tekade aahet tyat te news walyalan tar veb masala pahije…………..bas tyat raj karnala ghus lagynya sathi vel nahi lagt………………….aaj aapan raj thakre udhav thakrechaha parivar aani rajkarna vrun olkhalya pahije. nakki hya likana pahije kay? lokshahi ki jat path panth, aani raja karn tumhich sanga…………….

  • या लोकांच्या खेळात सामान्य जनांचा जीव जातोय तिकडे कोणीच पहात नाही. हे सगळं तर आहेच , शिवाय सोबतंच एक नवीन वाद ब्राह्मण विरुद्ध इतर सुरु केलाय संभाजी ब्रिगेडने. एखाद्या नेत्याला स्वतःचं नेतेपद सिद्ध करायला हे असे धंदे करावे लागतात आज लोकशाही मिळून ६० वर्ष झाल्यावर सुद्धा!

 19. geetapawar says:

  tumch mat 100 takke kahre aahe……………..

 20. kolhapuri says:

  The station code of kolhaur is KOP. fakt te type kele tari chalate. nav yet nahi kase mhanata?

  • प्रत्येकाला कोड माहीत असेल नाही. कोड शोधण्यासाठी जर कोल्हापूर टाइप केले तर काहीच सापडत नाही , हा खरा प्रॉब्लेम आहे. एखाद्याला कोल्हापूरला जायचे असेल तर कोल्हापूर हे गावाचे नावशोधता यायला हवे.
   समजा तुम्हाला म्हंटलं, की बाबासाहेब आंबेडकर एअरपोर्टला जायचं आहे तर काही लक्षात येईल का? अर्थात नाही- त्या साठी नागपूरला जायचंय हे सांगावं लागेल.. 🙂
   ब्लॉग वर स्वागत , आणि प्रतिक्रियेसाठी आभार.

 21. तुमच्या विचारांशी अगदी सहमत…. संताप येतो ते नावांच राजकारण पाहिलं कि ….

  नावात काय आहे? च्या एका वेगळ्या व्हर्जनची लिंक देतोय खाली ….

  http://jeevantarang.wordpress.com/2011/05/22/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/

  • देवेंद्र
   पाहिला तो ब्लॉग छान लिहिलं आहे. सध्या थोडं काम वाढल्याने वाचन तसं कमी झालेलं आहे त्यामुळे सुटलं हे पोस्ट!.

  • धन्यवाद देवेंद्र… माझ्या ब्लॉगची लिंक दिल्यबद्द्ल मनापासून आभार. 🙂

 22. मालोजीराव says:

  इतकीच जर यांना तरुणांच्या नोकर्यांची चिंता वाटते तर सरकारी नोकर्यात सामावून घ्या ना !
  ४५०० पोलीस अधिकारी,१९००० राज्य राखीव आणि पोलीस जवान,२२००० लिपिक पदे विनाकारण रिक्त आहेत…
  उगाच कशाला शिवरायांच्या नावाने राजकारण खेळता.
  अवांतर: उदयनराजेंनी राणेंना धमकीवजा विनंती केल्यानंतर छत्रपती वडा मागे घेण्यात आल्याचे समजते.

  • ज्या गोष्टी मधे कुठलाही पोलिटिकल फायदा नाही, ती गोष्ट हे नेते कधीच करणार नाहीत. इथे पण फक्त राजकीय फायदा घ्यायचा इतकंच ध्येय दिसतं.

 23. प्रसाद थरवळ says:

  काका.. छत्रपती शिवाजी आणि वीर सावरकर यांचा महाराष्ट्रातला अस्तित्व हे फक्त स्टेशन्सना नाव देण्यापुरतच आहे.. कधी तरी गर्वाने म्हणायचो आपण कि शिवाजी आणि सावरकर रक्तात आहेत मराठी माणसाच्या.. हे सर्व शब्दाचे खेळ बनून राहिले आहेत आता.. आपल्या रक्तातून यांचा अस्तित्व कधीचं नाहीसं झालंय.. सध्या हि नाव फक्त घाणेरडं राजकारण करण्यापुरती उरली आहेत… “निर्लज्ज” हा शब्द सुद्धा कमी आहे आपल्यासाठी!
  ज्यांची नाव वापरतोय आपण ती दैवत आहेत आपली…आजन्म ऋणी आहोत आपण त्यांचे.. हे हि विसरून बसलो आपण..???

 24. Sanjivani says:

  पुढच्या पिढीला एक आठवण म्हणून या नेत्यांच्या नावाचा वापर करायला हरकत नसावी पण त्याच राजकारण नक्कीच होउ नये. ती व्यक्ती राष्ट्राची आहे असा त्यामागे विचार असावा .

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s