पहिली कमाई..

 रोहनचं नुकतंच लग्न झालं होतं. तसं म्हटलं तर नेहा आणि रोहन काही अपरिचित नव्हते, चांगली आधीपासून म्हणजे  लहानपणापासूनच  ओळख होती दोघांची. एकत्र कुटुंबात रोहनचे आई बाबा, आणि नेहा बस्स इतकेच लोकं! त्यामुळे घरात काही फारसं काम पण नसायचं.

लग्नानंतर नेहा घरीच असायची, नोकरी करायचा विचारही कधी डोक्यात येत नव्हता तिच्या. २१वर्ष वय असतांना आणि लग्न झालेलं असतांना नोकरी बद्दल विचार डोक्यात येतील तरी कसे? .”एकदाची मुलगी उजवली की आपली जबाबदारी संपली” या भावनेतून मुलींची लग्नं लवकर करायची पद्धत तर आहेच आपल्याकडे.कॉलेजचं  शिक्षण पूर्ण  झाल्या झाल्याच नेहा साठी मुलं पहाणं सुरु केलं तिच्या वडलांनी.

रोहनची नोकरी मार्केटींग मधली, त्यामुळे  त्याला कामानिमित्त नेहेमीच टूरवर जावं लागायचं. ठरावीक भाग असल्याने फार तर ४-५ दिवसांचा टूर असायचा त्याचा. एकदा रोहन टूरला गेला की नेहाला पण मग काहीतरी करायची खुमखुमी यायची, पोस्ट ग्रॅज्युएशन करावं का? की नोकरी करावी? की एखादा बिझीनेस करावा?? नक्की काय ते कधी समजायचंच नाही. मग जाऊ दे, काही दिवस गेले की नंतर पाहू रोहन काय म्हणतो ते! घेऊ या एमएससी ला  किंवा बिएड ला ऍडमिशन. अशा विचार चक्रातच नेहाचे दिवस निघून जायचे.

शेजारच्या फ्लॅट मधल्या प्रधान काकूंचे कोणीतरी कलकत्त्याला होते, त्यांच्याकडून साड्या मागवून प्रधान काकू कलकत्ता हॅंडलूमच्या साड्या विकायच्या- फक्त संबधातल्या लोकांनाच!कधी कधी वाटायचं की आपणही तसंच काही तरी केलं तर? एकदा रोहन ऑफिसला गेला की मग घरात काय करायचं हा प्रश्न नेहेमीच पडायचा.पण शेवटी एखादं पुस्तक उघडून बसायचं वाचत आणि वेळ काढायचा असे दिवस जात होते.

रोहन टूरला निघाला की तिचे डोळे अगदी पाण्याने भरून यायचे- रोहनचा पाय पण घराबाहेर लवकर पडत नसे. पण काही न  टाळता येण्यासारख्या गोष्टी म्हणजे नोकरी! रोहन घराबाहेर तर पडायचा पण बाहेर पडल्यावर पण नेहाचे तो पाण्याने डबडबलेले डोळे  सारखे त्याच्या नजरेसमोर यायचे. मोबाईल फोन पण नव्हते त्या काळात त्यामुळे  सारखं बोलता यायचं नाही. दिवसातून एकदा कधी तरी फोन वर बोलणे व्हायचे त्यांचे.

लग्नानंतरचा पहिलाच रोहनचा टूर! सारखी बायकोची आठवण तर यायचीच, संध्याकाळी काम झाल्यावर तिथल्या मित्रांसोबत एखाद्या हॉटेल मधे बसून टाइम पास करायचा, हा नेहेमीचा कार्यक्रम पण या वेळी नकोसा वाटत होता.  रोहन बाजारात चक्कर टाकुन येऊ म्हणून बाहेर फिरायला निघाल.

एका दुकानाच्या शोकेस मधे एक सुंदर मुलीचा पुतळा ठेवला होता- मस्त पैकी आकाशी रंगाचा ड्रेस घातलेला. रोहनचे पाय आपोआपच थांबले आणि त्याने ड्रेसचे निरीक्षण केले. क्षणभर विचार करून सरळ दुकानात शिरला आणि ९५० रुपयांचा तो ड्रेस विकत घेतला नेहासाठी. किती मस्त दिसेल नाही नेहा या ड्रेस मधे? टुरवर असूनही हसू आलं रोहनला. घरी पोहोचल्यावर तर त्याला आपण आणलेला ड्रेस कधी तिच्या हातात देतो असे झाले होते.

लग्नानंतरची पहिली वहिली खरेदी! काय वाटत होतं ते शब्दात सांगता येणच अशक्य ! घरी पोहोचल्यावर दारावरची बेल वाजवल्यावर  क्षणातच दार उघडलं गेलं. समोरच्या सोफ्यावर बाबा बसले होते, नेहा कडे पाहिलं आणि बाबांच्या नकळत  तिला इशारा केला की ’ आत  चल’ !त्याच्या हातातली प्रवासी बॅग घेतली आणि रोहन पायातले बुट काढायाल सोफ्यवर बसला. बाबांच्या हातात नेहेमीप्रमाणे ज्ञानेश्वरी गुढार्थ दिपिका हा ग्रंथ होता. त्यांनी पण रोहन कडे पाहिलं, हसले, आणि पुन्हा वाचनात रंगून गेले.

रोहन बेडरुम मधे गेल्यावर त्याने आधी तो ड्रेस बाहेर काढला आणि नेहाच्या हातात दिला. तिने हातात घेतला आणि “खूप खूप मस्त आहे रे.. म्हणून घडी उघडून अंगावर घेऊन पाहिला. मस्त आहे रे.. पण जर याला मस्त पैकी रेशमी काठ असते, आणि तू आणलेला आकाशी  रंग जर थोडा जास्त डार्क असता तरी चाललं असतं!” 😀

रोहन  ने ठरवलं की या पुढे  लक्षात ठेवायचं,  की तिला काठ-पदराचे ड्रेसेस आवडतात ते. आणि ग हो.. अरे  तिच्या सगळ्याच साड्यांना पण तर काठ आणि पदर असतोच की.. अरे हो.. कसं लक्षात आलं नाही आपल्या ? तिची आवड आतापर्यंत समजायला हवी होती ना? मनात खूण बांधली की पुढल्या वेळेस नक्की काठ- पदर असलेली साडी आणायची.

तशी वेळ लवकरच आली. रोहनला कोरब्याला जायचं काम पडलं. कोरबा प्रसिद्ध आहे ते कोळशाच्या खाणींसाठी आणि तिथे तयार होणाऱ्या कोशाच्या साड्यांसाठी. जवळच असलेल्या छूर्री गावात कोशाचं उत्पादन होतं, आणि तुम्ही मागावरची साडी पण पसंत करू शकता. रोहनने कामं आटोपल्यावर एक कोशाची छानसा पर्पल कलर – किंचित गुलाबी आणि पर्पल मिक्स असा असलेली आणि  काठ पदर असलेली साडी पसंत केली.

घरी आल्यावर जेंव्हा नेहाच्या हातात साडी ठेवली तेंव्हा तिचे डोळे चकाकलेले दिसले, आणि रोहनला खूप आनंद झाला. चला, एक तरी बरोबर काम केलं आपण! असं मनात आलं तेवढ्यात नेहाचं लक्षं त्या किमतीच्या लेबलकडे गेलं. अरे काय ???????? ही साडी तू १२००ला घेतलीस? अरे इथे मृगनयनी मधे चक्क १०००ची आहे. मी कालच पाहिली होती, पण आहे बाकी छान बरं कां!! एकीकडे छान आहे म्हणायचं, आणि महाग पडली असंही म्हणायचं! रोहनला काही समजलंच नाही , यावर आपण काय बोलावं ते. 🙂  राग पण आला, अरे आम्ही इतक्या प्रेमाने काहीतरी विकत आणावं आणि त्याची इतकी चीरफाड?? किमतीचं लेबल आपण आधीच का बरं काढून टाकलं नाही?  मनात विचार आला रोहनच्या. अनुभवातूनच शिकतो आपण.

एखादी गोष्ट जर चुकीचीच व्हायची असेल तर तिला कोणीच रोखू शकत नाही. संध्याकाळी ती दोघं  फिरायला निघाले तेंव्हा नेहाने साडी घेतली बरोबर, मॅचिंग ब्लाउज पिस  घ्यायला.  रोहनचं बॅड लक, की  एकाही दुकानात मॅचिंग ब्लाउज पिस मिळत नव्हते त्या रंगाचे. इतका वेगळा रंग होता तो  की त्या रंगाचे काहीच मिळत नव्हते. सहा निरनिराळी दुकानं फिरून झाल्यावरही ब्लाऊज पिस काही  मिळाला नाही.  दुकानदार म्हणत होता की काठाच्या रंगाचे बाउज पिस मिळेल- पण नेहाला ते नको होते. जाऊ दे गं, पुढल्या वेळेसे गेलो कोरब्याला की आणून देईन ..असं म्हणून किंचित हिरमुसलेल्या नेहाला घेऊन त्याने बाईक तिच्या आईच्या घराकडे वळवली- तिचा मुड  तरी बरा होईल म्हणून.

दुसऱ्या दिवशी ऑफिस मधे गेल्यावर रोहनला पुन्हा कोरब्याचंच काम निघालं. दोनच दिवसापूर्वी कोरब्याहून परत आला होता, पण आता टेंडर ची टेक्निकल इव्हॅल्युएशन मिटींग ठरली होती म्हणजे जाणं भाग होतंच. रोहनला या वेळेस कधी नाही तो खूप आनंद झाला टूरवर जावं लागण्याचा- आणि तो पण कोरब्याला. कोरब्याला पोह्चल्यावर रोहनने एकदाचे ज्या दुकानातून साडी घेतली होती, त्याच दुकानात जाऊन  एकदाचं त्याच रंगाचं  ब्लाउज पिस घेतले विकत!

इतकं झाल्यावर सरळ बाहेर पडायचं, पण त्याची नजर एका सुंदर साडीकडे गेली. ही मात्र मस्त पैकी काळ्या रंगाची , बॉर्डर असलेली साडी बघितली आणि त्याने किंमत विचारली. १२०० रुपये फक्त . रोहनला किमतीची काही माहिती नव्हती, पण साडी तर आवडली होतीच , मग ती त्याने काही फारसा विचार न करता घेऊन टाकली. या वेळेस मात्र रोहनने एक शहाणपणा केला, लेबल काढून टाकले, आणि साडी घेतली पॅक करून.

घरी पोहोचल्यावर जेंव्हा नेहाने साडी बघितली, तेंव्हा तिच्या तोंडून काय मस्त आणलीस रे… शब्द निघाले. रोहनला अगदी धन्य धन्य झाल्यासारखे वाटले. अहो आपण आणलेली साडी बायकोला आवडली, आणि तिने काहीच नावं न ठेवता घेतली यातलं सुख तुम्हाला कळणार नाही. कितीला पडली?? तेवढ्यात नेहाचा प्रश्न ऐकु आला. पटकन उत्तर दिलं रोहनने- ८०० रुपये. तिच्या चेहेऱ्यावर अविश्वासाचा भाव दिसला, पण क्षणभरच!  🙂

दुसऱ्या दिवशी रोहन ऑफिस मधून घरी परत आला तर नेहा तयार होऊनच बसली होती. रोहनच्या काही लक्षात येत नव्हतं की नक्की कुठे जायचंय का आज ते. नेहा म्हणाली,” चल लवकर तयार हो,  आज मी तुला माझ्या  पहिल्या कमाईची पार्टी देते. ”

पहिली कमाई? कसली कमाई?? रोहन विचार करत बसला होता. तेवढ्यात नेहाने केलेला चहाचा कप हाता घेऊन तो सोफ्यावर बसला. नेहा म्हणाली, ” अरे आज दुपारी शेजारच्या प्रधान काकू आल्या होत्या, त्यांना मी तू आणलेली ती ८०० रुपयेवाली साडी दाखवली, त्यांनी किंमत विचारली तर मी चक्क ११०० सांगितली, आणि त्यावर त्या म्हणाल्या की ती साडी त्यांनाच हवी आहे, त्यांच्या मुलीच्या संक्रांतीसाठी. ” मी विचार केला, तू काय नेहेमीच जात असतोस कोरब्याला, मग देऊन टाकली साडी ११०० मधे . झाला की नाही ३०० रुपयांचा फायदा?  पुन्हा गेलास ना  कोरब्याला की अशा दहा साड्या आणून दे, त्या प्रधान काकूंची ऑर्डर आहे बघ”

रोहन ला काय बोलावं हेच समजत नव्हत. रोहन ने तिच्याकडे विचित्र नजरेने पाहिले, पण तिच्या चेहेऱ्यावरच्या त्या पहिल्या वहिल्या कमाईचा आनंद मात्र हिरावून घेणे त्याला काही जमले नाही. म्हणाला बरं केलंस.. अभिनंदन.. तुझ्या पहिल्या कमाई बद्दल, चल बाहेरच जाऊ या जेवायला… 🙂 आजची पार्टी तुझ्या कडून!

 

.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव, साहित्य... and tagged , , , . Bookmark the permalink.

66 Responses to पहिली कमाई..

 1. Aditya म्हणतो आहे:

  या रोहनला “राजू” सुद्धा म्हणतात का रे ? 😉

 2. aruna म्हणतो आहे:

  that is life or the irony of life my friend! you have brought it out beautifully.

 3. s.k. म्हणतो आहे:

  humorous.. 🙂 nice story..

 4. आनंद पत्रे म्हणतो आहे:

  हाहाहा.. शेवटाला मस्त ट्विस्ट..

 5. mazejag म्हणतो आहे:

  Engineers=Korba samikaran aahe na…..

  • महेंद्र म्हणतो आहे:

   🙂 कोरबा मस्त जागा आहे. भरपूर धूळ माती, कोळशाची काजळी, कच्चा दगडी कोळशाचा धूर.. 🙂 थोडक्यात काळं पाणी. पण खूप महत्त्वाची जागा आहे ही इंजिनिअरींग पॉइंट ऑफ व्ह्यु ने.

 6. सुहास म्हणतो आहे:

  जबरदस्त…. खुप आवडली. शेवट तर खुपचं छान 🙂 🙂

 7. rajeev म्हणतो आहे:

  dear, if you are writing like this…… close the blog !!!!!!!!

 8. Prasad म्हणतो आहे:

  Lai bhari kaka
  Kasa kay athawata ho he sagala?
  mala tar chyayla kahi ta mhanata dha athwat nahi

  • महेंद्र म्हणतो आहे:

   प्रसाद
   सगळं आठवेल नंतर.. 🙂 विसरूच शकणार नाही. फक्त एकदा बायकोचा वाढदिवस विसरला की पुन्हा नंतर कुठलीही गोष्ट विसरूच शकत नाही.

 9. greenmang0 म्हणतो आहे:

  छान आहे. 🙂

 10. manisha naral म्हणतो आहे:

  khup chan aahe lekh

 11. महेश कुलकर्णी म्हणतो आहे:

  मस्त,सुंदर,एकच षटकार .अशी हि बनवाबनवी आवडली,

 12. Maithili म्हणतो आहे:

  हाहा…भार्री… 😀

 13. Dinesh Pawar म्हणतो आहे:

  saheb kuthetari vachalya sarkhe vatate…

  • महेंद्र म्हणतो आहे:

   कसं शक्य आहे? मी कधीच कोणाचे लेख चोरून पोस्ट करत नाही. इथले सगळे लेख माझे स्वतःचे आहेत. ही कथा पण कालच लिहीली आहे. ब्लॉग वर स्वागत. आणि आभार.

 14. kalyani म्हणतो आहे:

  baykanche nature
  konala kalale na tyanche nature tr ch to dhanya….

  • महेंद्र म्हणतो आहे:

   कल्याणी
   हे तुम्ही म्हणताय म्हणून बरं आहे, जर एखाद्या पुरुषाने म्हटले असते तर … स्त्री मुक्तीवाले तुटून पडले असते. 🙂 आभार.

 15. Meghnad Godbole म्हणतो आहे:

  मस्त कथा आहे, हलकी फुलकी……

 16. Pradeep म्हणतो आहे:

  ekdam mast!

 17. anuya kulkarni म्हणतो आहे:

  kaka bhari .. swahtache anubhav bemalum vaperta kathemadhe..

  • महेंद्र म्हणतो आहे:

   अनुया
   तसं काही नाही. पण प्रत्येकच गोष्ट कुठे ना कुठे थोडी फार अनुभवलेली असतेच.. थोडा अनुभव थोडं काल्पनिक… 🙂 धन्यवाद.. आणि ब्लॉग वर स्वागत.

 18. swapna म्हणतो आहे:

  mazya navaryani jar mazya sathi ashi sadi aanali.. tarr me lakh rupaye deun sudhha kunalahi ti veiknar nahi… sadi asu de nahi tar 2 rupayacha gajara… to ghetana mazya navaryala me disale asen… mag to kasa kunala dyayacha?

 19. Chetan Chavan म्हणतो आहे:

  महेंद्र काका,
  खरच खूपच मस्त लिहिता तुम्ही मी आज वर तुमचे ब्लॉग वाचत आहे रोज ठरवायचो की आज एखादी कमेंट टाकावी आपण पण आणि राहून जायचं पण मात्र राहावालाच नाही.
  काय लिहिता तुम्ही वाचताना वाटत की खरच हे तर आपल्या आजुबुला होत असत फक्त आम्हाला जाणवत पण तुमच्यासारखे ते अस मनातल उतरवून काढतात.
  खूपच मस्त अनुभव तुम्ही शेअर केले आहेत.
  आणि वरील तर अप्रतिम आमच्या सौ असाच एक प्रोयोग केला होता वाचताना अगदी तो प्रसंग डोळ्या समोरून गेला.
  हट्स ऑफ काका..

 20. सिद्धार्थ म्हणतो आहे:

  साधीच पण मस्त जमली आहे कथा. शेवट अगदी जबरी.

  • महेंद्र म्हणतो आहे:

   सिद्धार्थ
   धन्यवाद. शेवट तसा करायचा म्हणूनच तर कथा झाली तयार. नाही तर तो एक नेहेमीचा साधारण प्रसंग झाला असता. 🙂

 21. rohit म्हणतो आहे:

  :):):)

 22. हेरंब म्हणतो आहे:

  हाहाहाहाहा काका.. एकदम जबरीच.. फसला बिचारा रोहन उर्फ ….. 😉

  • महेंद्र म्हणतो आहे:

   हेरंब
   कैच्याकैच फसला.. जास्त शहाणपणा केलेला नडला. आपण किती हुशार आहोत हे दाखवाय्चा प्रयत्न केला की नेहेमीच वाट लागते.. हे आहे मॉरल ऑफ द स्टोरी.

 23. Gurunath म्हणतो आहे:

  पोरी कधी कधी इरीटेटींग होतात ते ह्याच्यामुळेच असावे!!!! पण दुस~य़ा बाजुने पाहिल्यास ( जसे तुम्ही दाखवलेत) मौज पण वाटते!!!!!!….. थोडे तिला बरे वाटावे म्हणुन बोललेले खोटे अन नवरोबाच्या स्वतःच्याच गळ्यात अडकलेल्या तंगड्या!!! भारी सिक्वेन्स आहे!!!!

 24. प्रसाद थरवळ म्हणतो आहे:

  काका… छान.. छान… छान…..!!! 🙂

 25. samruddhi म्हणतो आहे:

  mastach…

 26. tejaswini joshi म्हणतो आहे:

  katha vachalyavar kunachya bajune vhave tech kalat nahi.bicharya rohanachya kashtanchi ki nehachya business mind chi .mast jamaliye.agadi halaki fulaki.

 27. गणेश सपकाळ म्हणतो आहे:

  हा हा हा हा….शेवटी तर खूप हसायलाच आले…खूप छान गोष्ट आहे.
  तसे तुमच्या मी बऱ्याच कथा वाचतो पण कधी कमेंट दिली नाही…
  खूप छान लिहिता तुमी…

 28. Shweta म्हणतो आहे:

  काका;
  कथा वाचल्यावर लग्न करावस वाटलं… 😉
  anyways मस्त…!!!
  अप्रतिम प्रसंग रंगवलाय… 🙂

 29. pratima म्हणतो आहे:

  pharach chhan..khupch awdali…..

 30. pramod sane म्हणतो आहे:

  mast aahe story…..abinandan…….keep writing

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s