विषण्ण….

मी कालपासून कामानिमित्त रायपूरला आलोय. आज सकाळी बिलासपूरला टॅक्सी ने गेलो होतो, तो आता परत  रायपूरला  निघालो आहे. ब्लॅक बेरी मेसेंजर वर  दहा मिनिटांपूर्वी एक मेसेज आला  , लिहिलं होतं की जव्हेरी बझार , ऑपेरा हाऊस , दादर ला ब्लास्ट झालाय आणि शंभर एक लोकं घायाळ झाले आहेत.  वाचल्यावर एकदम छाती मधे धस्स झालं,  बायको मुलींचे चेहेरे डोळ्यासमोर आले. बायको दादरला रोज जाते, मुलगी माहीम ला… कसे असतील सगळे??

बायकोला फोन लावायचा प्रयत्न करतोय , तर तिचा फोन आउट ऑफ रीच, मुलींचा फोन पण लागत नव्हता – अजुन अनिझी फिलिंग येत होतं.घरचा लॅंड लाइन फोन पण लागत नव्हता. डोक्यात भयानक विचार थैमान घालत होते.

मी इथे टॅक्सी मधे बिलासपूर ते रायपूरच्या मधे प्रवास करतोय. कसे असतील घरचे सगळे लोकं? बायको आणि मुलींशिवाय कुठलाच विचार मनात येत नव्हता.

आजच्या  बातमी कडे तिऱ्हाईताच्या दृष्टीने पाहू शकत नव्हतॊ मी. ज्या तिऱ्हाईतपणे काल, परवाच्या रेल्वे ऍक्सिडेंटच्या बातम्या वाचून , फोटो बघून हळहळ व्यक्त केली,  आणि विसरून गेलो काही वेळा नंतर…

सध्या टॅक्सी मधे बसलोय, फेसबुकवरच्या  स्टॆटस मधे आलेले  मेसेज पेस्ट केला, ताबतडतोब काही मित्रांनी ही बातमी खरी असल्याची पुष्टी केली.   घरचा फोन अजूनही लागलेला नव्हता.

बायको घरी पोहोचली असेल नां? मुलगी कुठे आहे? घरी पोहोचली असेल का? घरचा फोन सारखा डायल करतोय, मुलींचे सेल फोन्स अजूनही लागत नव्हते.  एकदाचा घरचा नंबर लागला, आणि बायकोचा आवाज ऐकला, विचारलं की मुली घरी आल्या? तिचं उत्तर ऐकलं की सगळे घरी पोहोचले , आणि जीव भांड्यात पडला. तिला माहीत पण नव्हतं या ब्लास्ट बद्दल!

टॅक्सी मधेच बसल्या बसल्या लॅपटॉप सुरु केलाय आणि बातम्या शोधतोय. सगळीकडे हीच बातमी थोड्याफार प्रमाणात. दहशत!! मनात आलं, की मुली आणि बायको सुखरूप आहे हे ऐकल्या बरोबर मन शांत झालंय- पण जे लोकं घरी पोहोचले नसतील त्यांचं काय?? मन विषण्ण झालंय. मानवी जीवन इतकं स्वस्त झालंय का, की कोणीही असे ब्लास्ट करून कोंबडी ,बकरी कापल्या सारखे माणसं मारावे?

मला इतकं शांत कसं काय वाटू शकतं? स्वतः आणि स्वतःच्या कुटुंबियांच्या पर्यंतच माझं विश्व मर्यादित झालंय का? इतकं कोडगं झालंय माझं मन ?

उद्याच्या पेपरला सगळी बातमी येईलच, बरेच इंटरव्ह्यु वगैरे येतील, मेणबत्त्या पेटतील, काळे डीझानयर कपडे घालून शोक व्यक्त केला जाईल, एक दोन  दिवसांनी सगळं विसरून पुन्हा ये रे माझ्या मागल्या प्रमाणे मुंबई आपल्या कामाला लागेल…….

कसाबला आणि अफजल   गुरुला फाशी कधी देणार?? आज वाढदिवस आहे म्हणे कसाबचा.

केंव्हा एकदा रायपूरला पोहोचतो आणि टिव्ही पहातो असे झाले आहे.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव. Bookmark the permalink.

23 Responses to विषण्ण….

 1. Rohan says:

  हतबल…. 😦

 2. 😦
  नाही होणार कुणालाच शिक्षा. शिक्षा आपणच भोगायच्या आहेत.

 3. Dr.priyanka... says:

  :-(……sarkaar hallyancha nishhedh karnyakherij kahich karu shakat nahi………..so sad…..!!!!!!!!

 4. savitarima says:

  हा कोडगेपणा नक्कीच नाही महेंद्रजी , असलीच तर वास्तवाची जाणीव आहे , की आपल्या कुटुंबियांची काळजी करण्याव्यतिरिक्त आपण काही करू शकत नाही , खरेच किती हतबल आहोत आपण ?

 5. खरंच, कोणालाही शिक्षा होणार नाही…. आपण असेच मरणार, आता आपली वेळ नाही आली ह्यात काय ते तात्पुरते समाधान….

  कॉंग्रेस सरकारच्या…. *&^&$^%$%#%#%$(*)(*)*)

 6. amit mohod says:

  khara mhanalat suhas aapan. Kharach apan hatbal aahot… Aani congress chya sarkar la dosh deun arth nahi.. BJP aani itar virodhi paksh kaay dhugnat sheput ghalun baslet ka?? Kuthlyatari bhikkar mudya varun sansadech mhatavche taas n taas, kaamkaj chalvu n deta, gondhaL ghalun vaya ghalvtat.. Aani ya sarkhya mahtvachya muddya var ka nahi dhare var dharat sarkar la??? Saale sagLech ek jaat harami… matrugaami…

 7. या सगळ्या भ**चा वेड्नसडे केला पाहिजे !!!!!

 8. And They will say , “Spirit of Mumbai !” 😦

  ते दोघे **** बिर्यानी खाताहेत जेलमध्ये.. आपल्याच पैशांची..

 9. अश्या घटनांना रोखण्याच एकच उपाय आहे ,ते जी दहशत आपल्यात पोहोचवायचा प्रयत्न करत आहेत तशी त्यांच्यात आपल्याबद्दल पसरली पाहिजे ..पण वोटबँक साठी त्यांचा गु ही चाटणारया नेत्यांच्या ते मनातच नाही ना…
  सरकार ह्यावर जास्तीतजास्त काय पाउल उचलणार माहितेय त्या बिचाऱ्या एकट्या कंटाळलेल्या कसाबला जेलमध्ये एक नवा साथीदार मिळवून देणार…. आणि आपणही नुसता संताप संताप करणार काही दिवस बस्स …. 😦

 10. तुम्ही सगळे सुखरुप असल्याचे कळले. जीव भांड्यात पडला. झालेल्य घटनेवर आता काहीही भाष्यही करवत नाही. रोज सकाळी घराबाहेर पडताना सगळ्यांचा निरोप घेऊन निघायचे इतकेच हाती उरलेय. 😦 काळजी घ्या रे सगळे. ( म्हणजे नेमके काय करायचे हे मात्र समजतच नाही तरीही म्हणायचे एकमेकांना काळजी घ्या…. )

  अवांतर: आज कसाबचा वाढदिवस नाहीये. उगाच कोणीतरी अफवा उठवली असावी. सगळ्यांची मनं इतकी प्रचंड पोळली आणि दु:खी झालीत की जे नेमके घडायला हवेत ते या षंढ सरकारमुळे घडत नाही त्याचा राग वेगवेगळ्या पध्दतीने निघत राहतो.

 11. हेरंब+१००००००००००००००००००००००

 12. geetapawar says:

  मी सुद्धा तुमच्या सारखी हतबल झाले.
  आणि घरी मामांना भुना कॉल लावते सगळे कॉल out ऑफ रिच आणि मन 1da धाव घेत होते घराच्या रस्त्या कडे . माझा मामा हि दादर ला आसतो.. आणि भाऊ दर १ दिवसा आड दादरला वारली ला जात आसतो.. अक्षरशा हातची थरकाप आणि काळीज धड धड करत होते ३ ते ४ घंट्या nunter काल लागला सगळे ठिक आहे कळताच मन तर शांत झाले. पण आपले सरकार आणि राज्यातले राज्य करते हातावर हात ठेऊन खरच गप्प बसलेत कधी संपेल हे.. कि अजुन आपले मुंबईकर मरतच राहतील इतकी cc tv कॅमेरे लाऊन हीं. ज्याने गुन्हा केला तो अज्ञातच आहे.म्हणजे की पालथ्या घड्यावर पाणीच. म्हणे भारत महा सत्ता होणार कुठे गेली आता त्यांचे लोक? कुठे गेले आता ती दक्षता जे २४ houer on duty असतात. काही force आणि स्थापना केलेले लोक. आरे ह्या समजला चांगले सक्षम अधिकारी पाहिजेत आणि. swachatene काम करणारे लोक पाहिजे. आपला भारत आपली मायभूमी काही दिवसांनी ह्या धरित्रीला विकायला कमी मुळीच करणार नाही, २ नंच फुंड असणार ह्या मागे. १ तर gotle , आणि काही राज्य कर्त्यान वर आळ आरोप लापवन्या साठी हा आजचा स्पोट घडवला असेल kiva मग कासाब हा त्या पाक चा हेतू किवा मग गुंड जे मुंबईत निर्माण होत आहे गिर्गोव ्चौपाटी मध्ये १० दिवसा पूर्वीच लेख आला होता लोकमत वर गुंडांचे praman वाढलेय …चौपाटीवर आणि घाणीच्या साम्राज्य मुले लोक फिरकत नाहीत, त्या मुळे गुंड दिसतात आणि लोक भिऊन येत नाहीत. एखादं नवीन नाखवा फसला कि त्याला लुटता..kai करते मुंबई सरकार…आरे विसरलेत मुंबई आपली आर्थिक राजधानी आहे विसरलेत मुंबई सारखे लोक, मदतीला धाऊन येतात ते विसरलेत कि ते माणसात राहतात.. जो हीं हे वाईट कृत्य करतोय तो शांत झोपणार हीं नाही आणि निट माणसा प्रमाणे जगणार हीं नाही.

 13. Gurunath says:

  😦

 14. jagrutk says:

  Khup rag yeto :@ , asa vatat ekdach kay to soksha-moksha lavun takava ya terrorist lokancha..he rojchi tangti talvar nako dokyavar… 😦
  Bhagyashree said it correctly..”kalji ghya mhanje nakki kay karaycha…..??? “

 15. आपल्या देशाला असे षंढ नेते लाभले हे आपल्या देशाचं दुर्दैव! आपण त्यांना निवडून देतो याचीच अशी शिक्षा आपण भोगतोय!

 16. प्रसाद थरवळ says:

  मनुष्य हा गरम रक्ताचा प्राणी आहे.. या विज्ञानाच्या वाक्यावरचा विश्वास उडालाय सध्या…! इतक्या थंड रक्ताचे कसे असू शकतो आपण..??? आपल्या षंढ – नाकर्तेपणाला सो कॉल्ड “मुंबई स्पिरीट” चं नाव देऊन पुन्हा उभे राहतो आपण अन्याय सहन करण्यासाठी..!! जोपर्यंत आपलं कोणी या हल्ल्यात जखमी होत नाही किंवा मृत्युमुखी पडत नाही तोपर्यंत आपल्याला या विषयाची गंभीरता येणार नाही.. पण कदाचित तेव्हा खूप उशीर झालेला असेल..

 17. Poorva Kulkarni says:

  I am agree with both of you (Mr Mahendra Kulkarni & Mr Prasad Tharwal.) Our Political leaders are corrupted…& we have to take action against this situation.

 18. महेश कुलकर्णी says:

  दुर्दैव आपलं व हतबल होणे एवडेच

 19. hemant2432 says:

  रागावून चिडून काहीच उपयोग नाही. आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर चाचा नेहरूंनी सांगितल्या प्रमाणे आपण पंचशील वर विश्वास ठेवलाच पाहिजे. शांततेचा मार्ग आपण जगाला दाखवला आहे. आणि तेच महत्वाचे आहे. बॉम्ब स्फोटामुळे नुकसान झाले आहे, व त्या बद्दल संपूर्ण राष्ट्राला काय वाटते हे डॉ. मनमोहन सिंह, चिदंबरम, यांनी अत्यंत कडक शब्दात ” हे असले भ्याड हल्ले भारत कधीही सहन करणार नाही” हे संपूर्ण जगाला वारंवार (२००१ पासून) सांगितले आहे. रामदेव बाबांप्रमाणे काहीतरी करून वेळा घालवू नका. आपल्या सक्षम सरकारवर संपूर्ण विश्वास ठेवा. शिशुपालाचा वाधाप्रमाणे दहशतवाद्यांना कडक शिक्षा होणार आहे. एकदा त्यांची शंभरी भरली कि झाले!
  श्रीकृष्ण जन्माला नक्की येईल. याच युगामध्ये. आपल्या तिहार मध्ये खूप गर्दी झाली आहे.
  डोकं शांत ठेवा आणि कामाला लागा. कामे केल्यानेच भारताचा GDP सुधारेल व एक दिवस आपण अमेरिकेला फ्रान्सला ब्रिटनला मुलभूत सुविधांसाठी कर्जे देवू शकू. काका, शांततेच्या मार्गाने उपोषण केले तरी पोलीस सरकारच्या आदेशा नुंसार मारतात, निमूट काम केलेतर दहशतवादी मारतात. आपण सर्व गरीब बिचारे शेपूट तुटके जीव. शांत भारत! उभारता भारत! जयहिंद!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s