मुंबई-जबाबदार कोण?

मुंबई ब्लास्ट!! या सगळ्या ब्लास्ट साठी जबाबदार कोण? कोणाची जबाबदारी आहे जनतेच्या सुरक्षेची? हा प्रश्न मनात आला. कुठल्यातरी आतंकवादी संघट्नेवर या  ब्लास्टची जबादारी टाकून आपला पदर झटकण्याचे  काम सरकार  करणार आहे हे मी आजही सांगु शकतो.

सहज विचार मनात आला की  कालचा ब्लास्ट जर लोकल मधे झाला असता तर?? आणि पुन्हा एकदम अस्वस्थ वाटायला लागलं. लोकल मधे होणारं नुकसान हे खूप जास्त असतं. एका बंद जागेत केलेला स्फोट हा नेहेमीच जास्त परिणाम कारक असतो.माझ्या डोळ्यापुढून सगळी लोकलची स्टेशन्स वरची सुरक्षा व्यवस्था गेली .

प्रत्येक स्टेशनच्या प्लॅटफॉर्म एक एक टेबल आणि बेंच ठेवलेला असतो, त्यावर एक-दोन पोलीस उगाच पेंगत बसलेले असतात. मधेच टाइम पास म्हणून एखाद्या माणसाला बोलावून त्याच्या हातातल्या प्लास्टीकच्या पिशवीत हात घालून काहीतरी शोधल्या सारखं करतात. नाही तर इकडे तिकडे पहात टंगळ मंगळ करत बसलेले असतात. पोलिसांना प्लॅटफॉर्म वर बसवल्याने काय होतं हो??

कधी तरी एखादी बातमी येते की सुरक्षा व्यवस्था वाढवलेली आहे , म्हणजे याच अर्थ काय घ्यायचा- तर प्लॅटफॉर्म वर दोन ऐवजी चार पोलीस बसवले आहेत. त्या पोलीसांनी प्लॅटफॉर्म वर बसून काय काम करताहेत? माहीत नाही.. हातात दांडू घेऊन उभे रहाणे. हल्ली हातात मशिनगन पण दिसते. सुरक्षा ठेवायची म्हणजे नेमकं काय करणं अभिप्रेत आहे त्या प्लॅटफॉर्म वरच्या  पोलीसांनी  हे काही समजत नाही मला?

काही दिवसा पुर्वी तर दादरच्या एका प्लॅटफॉर्म वर महिला पोलीसाला चक्क मटार सोलत बसलेले पाहिले आहे मी ! असो. मुद्दा पोलीसांवर दोषारोप करण्याचा नाही, तर खरंच सुरक्षा व्यवस्था कशी  अस्तित्त्वात नाही हे दाखवण्यासाठी हे पोस्ट आहे. चर्चगेटच्या प्लॅटफॉर्म वर आणि सिएसटी वर मेटल डीटेक्टर्स लावलेले आहेत. तुम्ही त्या मेटल डिटेक्टर्स च्या चौकोनी फ्रेम मधून पास होता. उगाच बिप आवाज येतो, एखादा पोलीस बाजूला उभा असला, तरीही तुमच्याकडे  लक्ष देत नाही, तुम्ही निघून जाता.

रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या प्रत्येकच माणसाच्या खिशात सुटे पैसे, पेन वगैरे असणार, मग हा बिप आवाज हा येणारच! आणि जर आवाज कसला आला हे जर तो पोलीस पहाणार नसेल तर काय फायदा ह्या मेटल डिटेक्टरचा?? दुसर्‍या बाजूने विचार केला तर, प्रत्येकाच्या खिशात काय आहे, ते पाहून जर प्लॅटफॉर्म वर जाऊ द्यायचं हे ठरवलं तर स्टेशनच्या बाहेर लाखो लोकांची रांग लागेल, तुम्ही सकाळी सात वाजता स्टेशन ला पोहोचलात तर मग रात्री पर्यंत तरी तुमची तपासणी होईल की नाही ही शंकाच आहे. मग अशा या परिस्थिती मधे हे  अजिबात शुन्य उपयोगाचे मेटल डीटेक्टर्स  का बसवण्यात आले?   पैसे खाण्यासाठी    केलेला हा उपद्व्याप दिसतो.

तसं म्हटलं तर मुंबईच्या सुरक्षेची  आणि कायदा सुव्यवस्था ठेवायची जबाबदारी पोलीसांवरच आहे. मी पण काल ह्या घटने  साठी  “फक्त” पोलीसांनाच दोष देत होतो. गहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा,  असे विचार माझ्याही मनात येत होते.  पण तेवढ्यात वर लिहिलेल्या फॅक्ट्स पण आठवल्या आणि लक्षात आलं की ह्या सगळ्या प्रकारासाठी  फक्त  पोलीस नाही तर फक्त आणि फक्त राजकीय नेतेच   जबाबदार आहेत.

आज मुंबईची कित्येक करोड असलेली लोकसंख्या, अस्ताव्यस्त पणे फोफावलेली झोपडपट्टी! दर वर्षी सरकार काही झोपडपट्ट्या अधिकृत करते.  एकदा सरकारने डिक्लिअर केले की आता २००५ पर्यंतच्या झोपडपट्ट्या अधिकृत झाल्या आहेत, की मग  सरकारी खर्चाने मतं मिळवण्यासाठी या अनधिकृत झोपडपट्ट्यांना  अधिकृत करण्याचे काम रा्जकीय पक्षच करतात.

काही वर्षांनी हीच  जागा बिल्डर्स ला देऊन  त्याच जागी झोपडपट्टीवासीयांनी घरं फुकट  बांधून दिली जातात. बिलडर कडून होणारा फायदा (!)   वेगळाच. जी घरं झोपडपट्टीवासीयांना फुकट दिली जाते त्यांचा पैसा तुमच्या आमच्या कडून  उरलेल्या घरांसाठी दाम दुप्पट भाव लावून वसूल केला जातो. हे चक्र अव्याहत पणे सुरु आहे गेली कित्येक वर्ष. मग सरकार भाजपा शिवसेना असो की कॉंग्रेस असो. सगळे जण हे काम अगदी मनलावुन करतांना दिसतात.

अशा तऱ्हेने  झोपड्या रेग्युलराइझ  करण्यापेक्षा जर सगळ्या झोपडपट्ट्यांच्या वर सरळ बुलडोझर फिरवला, आणि ह्या सरकारी जागेवर झोपडपट़्टी लावायची नाही , असे ठणकावून सांगितले तर पुन्हा कोणी अशा प्रकारे  झोपड्या उभारण्याचे धाडस करणार नाही. पण दुर्दैवाने तसे होत नाही. सरकारचे हे तमाशे असे किती दिवस सुरु रहाणार आहेत ते देवच जाणे.

आजही मुंबई मधे असे बरेच भाग आहेत की जिथे झोपड्या उभ्या होऊ दिल्या जात नाहीत.  यावरून हे सिद्ध होते की जर सरकारने मनात आणले तर झोपडपट्टी होऊ न देणं हे सहज पणे करू शकतं.पण दुर्दैवाने प्रबळ इच्छाशक्तीची कमी , किंवा नोकरशाही ला मिळणारा पैशाचा मलिदा , तयार होणारी नवीन व्होट बॅंक,  ह्या मुळे झोपड्या उभ्या  होऊ देत असावे.

हा झोपडपट़्टी रेगुलराइझ करण्याचा खेळ  भाजपा, कॉंग्रेस, शिवसेना तिन्ही पक्षांनी खेळला आहे.  या मुळे मुंबईची मुळात जास्त असलेली लोकसंख्या शतपटीने वाढलेली आहे. तितकं इन्फ्रास्ट्रक्चर  वाढवण्याकडे लक्ष दिलं जात नाही- आणि मग लोकल , बस, बाजारातली गर्दी वाढते आणि अशा  प्रकारे ब्लास्ट करणाऱ्या लोकांचं फावतं..

वरचं सगळं वाचल्यावर कोणाला दोष द्याल? पोलीसांना? की ज्यांना आपण सुरक्षा व्यवस्था ठेवायची म्हणजे फक्त हाता मधे दांडकं धरून उभं रहायचं इतकच ठाऊक आहे, की राजकीय नेते की इथे वाढलेली अव्वाच्या सव्वा लोक संख्या आणि ढेपाळलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरला? 

माझ्या मते मुंबई आजही शंभर  टक्के असुरक्षित आहे.   ज्या प्रमाणे दररोज एक या प्रमाणे रेल्वे मधे दररोज एक ब्लास्ट होत होता,  आणि सरकार काहीच करू शकत नव्हतं, त्या प्रंमाणे अशा  प्रकारच्या   होणाऱ्या ब्लास्ट वर , नियंत्रण  ठेवणे अजिबात शक्य होणार नाही. यावर इथली  लोकसंख्या कमी करणे, अनियमीत झोपडपट़्यांना सरकारी संरक्षण  न देणे हा एकच उपाय दिसतो.

मढ्यांच्या टाळूवरचे लोणी तर बरेच जण खाणार आहेतच. मुख्यमंत्र्यांच्या बायकोची पर्स काय चोरीला गेली तर इतका गाजावाजा…. पण इतके सुरक्षा रक्षक असूनही जर असे घडू शकते तर मग सामान्य माणसाचे काय? त्याने फक्त करच भरायचा का? आणि तोही हे दिवस पाहण्यासाठी…..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय.. and tagged , . Bookmark the permalink.

56 Responses to मुंबई-जबाबदार कोण?

 1. काय बोलू…सगळी खेळी ही या राजकारण्यांची आणि मरणार तो सामान्य माणूस. असे स्पॉट झाल्यावर मुंबईच्या वाट्याला काय येत? एक सलाम, मुंबईने दाखवलेल्या स्पिरीटसाठी.. आता हे स्पिरीट घेऊन जाळा सगळ्यांना बस्स !!

  • Nachiket says:

   मूळ पोस्टला कॉमेंट देता येत नाहीये म्हणून रिप्लाय मधे देतोय.

   अगदी मनातलं बोललात. शब्दाशब्दाशी सहमत.

   काल काही चॅनेल्सवर उत्तेजित रिपोर्टर्स गळ्याच्या शिरा ताणताणून ओरडत होते, “ये खून जो रस्तेमें गिरा है वो आम आदमीका है. सरकार क्या कर रही है आम आदमी की सुरक्षा के लिये. आम आदमी का सरकारने विश्वासघात किया है.. उनका पर्दाफाश होगया है..” वगैरे भडकावणे चालू होते.

   आपण मुंबईसारख्या शहरात आणि फॉर दॅट मॅटर भारतासारख्या देशात कितीही सुरक्षितता ठेवायची म्हटले तरी प्रत्येकाची पिशवी, छत्री, खिसे चेक करणे चोवीस तास शक्य नाही. त्याउप्पर पोटात बाँब लपवून हाराकिरी करणारे दहशतवादीही आहेतच (नाईन इलेव्हन आठवा.. विमानासोबत स्वतःचाही जीव दिलाच की..) तेव्हा काय काय चेक करत बसणार. निराशाजनक आहे सगळं.

   आणी आता फोरेन्सिक तज्ञ येऊन त्यांनी म्हटलंय की या स्फोटांत काहीतरी आयीडी की तत्सम तंत्र वापरलंय.. मी म्हणतो की असले शोध लावून पुढे काय होणार? समजा अगदी सापडले आर्डीएक्स.. किंवा कळले की १००% हे काम अल कायदाचे आहे, तरी आपण अफगाणिस्तान्-पाकिस्तानात शिरुन त्या अल कायदाची दाढी धरणार आहोत का?

   काय उखाडणार आपण.

   जाऊ दे. संताप आणि निराशा एकाचवेळी ओव्हरव्हेल्मिंग होत आहेत.

   • सुहास , नचिकेत
    आभार. बॉम्ब बनवणं सगळ्यात सोपी गोष्ट आहे, आणि ज्याने थोडं फार रिसर्च केलं तर अगदी कोणीही बॉम्ब बनवू शकतो. क्रूड बॉम्ब, आणि टायमर.. मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक ट्रिगर.. जर जवळ दहा एक हजार रुपये असतील तर कुठल्याही माइन्स वर जाउन डीटोनेटर घेतला जाऊ शकतो ( लिगली नाही, इल्लिगली) असो..
    सेफ्टी बद्दल पुढल्या उत्तरात लिहितो.

 2. Gurunath says:

  मग सरकार भाजपा शिवसेना असो की कॉंग्रेस असो. सगळे जण हे काम अगदी मनलावुन करतांना दिसतात

  अन सभ्यसमाज पण काही कमी दोषी नाही दादा, “काय कटकट आहे” म्हणुन हवालदाराच्या हातात १०० ची पत्ती कोंबणारी वृत्ती पण मला जबाबदार वाटते, तुम्ही आम्ही व्होट केले म्हणुन आपण बोलु तरी शकतो, बहुतांशी मध्यमवर्ग ते पण करत नाही, झोपडपट्टी व्होटबॅंक मधुन निवडुन आलेले नेते म त्यांना रेग्युलराईज न करतील तर नवलच ना. फ़्लॅट च्या रजिस्ट्रेशन अन खरेदीच्याच आधी नेमकी खरेदी कितीची व कॅश काउंटर किती हे ठरवणारे आपण बिल्डरांच्या व पर्यायाने राजकारण्यांच्या नरड्यात अजुन किती दिवस स्वतःच्या कष्टाचे पैशे घालत बसणार हा पण एक प्रश्न आहेच. सालं एक आयुष्य अख्खं लागतं एक घर बांधायला, सामान्य माणुन तरी काय करणार?? ज्युडिशियल कोड्स बदलणे हाच आता एक उपाय दिसतो, पण तो दुरदुरपर्यंत योजलेला दिसत नाही हेच खरे!!!!!!…..

  • गुरुनाथ
   माझा मुळ मुद्धा सुरक्षिततेचा आहे. सुरक्षितता आणि कायदा सुव्यवस्था का जागेवर नाही याचा विचार करायला हवा. कायदा व्यवस्था जागेवर आणण्यासाठी ज्युडीशिअरी कोड बदलण्यापेक्षा इतरही बऱ्याच करता येण्या सारख्या गोष्टी आहेत असे मला वाटते.

 3. माझ्या मते सेना+भाजपा दोष देण्या पेक्षा आता हे सरकार जाउन सेना+भाजप चे सरकार कसे येईल या साठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सगळेच चोर असे म्हणुन घरि बसण्या पेक्षा ज्यांच्या हातात ६३ वर्षे सत्ता दिली त्यांच्या विरोधात आता मतदान करण्याची वेळ आलि आहे. माझ्या मित्राचे ऐकायचे झाल्यास पुन्हा ब्रिटिश लोकांच्या हवाली हा देश देऊन आपल्या राजकारण्यांना ऑन जॉब ट्रेनींग त्यांच्या कडे ठेवले पाहिजे…. बघा आणि शिका असा चालवायचा असतो देश. असो हे जरा अति झाले पण सर्वांनाच शिव्या घालुन उपयोग नाहि, या काँग्रेस+ राष्ट्रवादिला आता घरी पाठवुनच दिले पाहिजे.

  • मी भाजपाचा जरी नसलो तरी मी आरएसएसचा असल्याने भाजपाला मत देतो. याचा अर्थ हा नाही की त्यांनी काही चूक केली तर त्यांना मी जाब विचारू नये.. त्यांची ही अशी चूक राष्ट्राला किती महाग पडते आहे हा माझा मुद्दा होता.
   किती लाख लोकांच्या मागे एक पोलीस आहे मुंबईला? हा रेशो किती आहे? अनधिकृत झोपडप्ट्ट्यात किती बांगला देशी, पाकिस्तानी रहात आहेत ह्याची कोणालाच काळजी नाही. किती लोकं अनधिकृत झोपड्या बांधून रहातात? या अशा प्रकारे वाढलेल्या लोकसंख्येला आणि तिथल्या अनैतिक कारवायांवर ………. असो असे अनंत प्रश्न माझ्या मनात येतात .. तेच इथे लिहिले आहेत.

 4. Audumber says:

  Aplya matashi me sahmat ahe, apaly lekh facebook var share kela ahe.

 5. प्रसाद थरवळ says:

  काका.. या सर्वाला जबाबदार तुम्ही…! मी…! आणि आपण सर्वच….!!! कारण हे राजकारणी गेली कित्येक वर्ष हे असंच राज्य चालवतायत कारण आपण गप्प बसतो..! १२२ कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात खरंच… चांगल्या आणि ईमानी माणसांचा एवढा तुटवडा आहे का…??? का नाही ते लोक समोर येत.. कारण तुमच्या आमच्या सारखी “चांगली” (?) माणसं फक्त सरकारवर दोष लावण्यात दंग असतो..! का? तर याशिवाय आपण करणार काय..?? आपलं कुटुंब आहे नोकरी आहे.. नसत्या उठाठेवी करायला वेळ आहे कोणाकडे…?? पण जरा विचार केला तर कळेल कि हे सर्व सांभाळून हि करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो!
  गरज आहे ती फक्त चौफेर विचार करण्याची….

  • प्रसाद यांच्याशी सहमत. काका, आपणच आपले जीव यांच्या हाती सोपवून कुठ्ल्या भ्रमात जगतो आहोत कुणास ठाऊक आणि तो भोपळा इतक्या वेळा फूटूनही आपण जागे का होत नाही ही आणखी नवल..
   पुण्यातही मागे बॉम्बस्फोट झाला होता.. त्याचेही पुढे काही नाही.. इकडे कोणा नेत्याने भेट द्यायची तसदीही घेतली नाही. मॅच पहायला बेळ असतो यांना वर्किंग डे ला.. संतापच येतो.. पण आपली जबाबदारीही आपण ओळखायला हवी.

   • Nachiket says:

    आणि तो भोपळा इतक्या वेळा फूटूनही आपण जागे का होत नाही ही आणखी नवल..

    ..आपली जबाबदारीही आपण ओळखायला हवी.
    >>>>>>>>>>>>

    म्हणजे नेमके काय करायचे… ? स्वतःवर आसूड ओढत बसण्याचे बाजूला ठेवून काही प्रॅक्टिकल सुचवण्या करता येतील का?

    धन्यवाद..

    • http://pallavikadadi.com येथे काही सुचविले आहे .. बघा पटतयं का ते.

     • प्रणव says:

      प्रसाद १०१% सहमत
      “लोकशाहीत, तुमची जी लायकी असते तसंच सरकार तुम्हाला मिळतं.” या अर्थाचं जोसेफ हेलर या अमेरिकन कादंबरीकाराचं एक वाक्य आहे. आपल्या भारतातली सध्याची परिस्थिती पाहिली की मला हे वाक्य अगदी तंतोतंत पटतं.

      • Gurunath says:

       जोसेफ़ हेलर नाही बहुतेक प्रसिद्ध ब्रिटीश निबंधकार अन लेखक जॉर्ज बर्नार्ड शॉ ह्यांचे आहे बहुतेक हे वाक्य…… असो कोणाचे पण पण मासला उत्तमच आहे

     • Nachiket says:

      वाचले. दुर्दैवाने तिथेही अगदी जेनेरिक वाटले. ठोस काही आढळले नाही. मतदानाचे कर्तव्य.. नाकर्त्यांना निवडून देणारे आपणच.. अवती-भवती काय सुरू आहे याबाबतीत नागरिक म्हणून जागरूक रहाणे .. वगैरे हेच सर्व छापील ब्लॉक टेक्स्ट.

      अहो राज्यकर्त्यांचे आणि राजकीय पक्षांचे वेगवेगळे ऑप्शन्स यापूर्वी निवडून दिले गेले आहेत. राज्याराज्यांत सत्तांतरे झाली आहेत. काही काळ तरी काँग्रेस सोडून इतर कोणी केंद्रीय पातळीवरही पूर्वी आले आहे. त्याने अशा मुरलेल्या दहशतवादावर काय परिणाम होणार?

      आपण सामान्य नागरिक जीव मुठीत धरुन जगतोय.. त्याला कारण देशविदेशातले उलट्या खोपडीचे दहशतवादी आहेत.. त्यांना मुंबईत रोखणे म्हणजे मुंगीला जंगलात शिरण्यापासून रोखणे आहे. प्रत्येकाची बॅग, छत्री, कपडे चेक करणे अशक्य आहे. मग बीजेपी असो, काँग्रेस असो किंवा महेंद्रजी किंवा मी पंतप्रधान आणि तुम्ही खुद्द राष्ट्रपती असोत. तेवढे केले तरी ऑपरेशन करुन पोटात बाँब ठेवून गर्दीत घुसायला अतिरेकी कमी करणार नाहीत. हाराकिरीचे तंत्र ९/११ मधे वापरले आहेच.

      एवढी सगळी कारणमीमांसा असूनही त्याउप्पर आपणच (सामन्य नागरिक) दोषी असं म्हणून स्वतःकडे गिल्ट घ्यायची ही मानसिक गुलामी झाली.

      माफ करा. तुमच्या लेखात जे लिहीलंय त्याहून काहीतरी नेमके ठोस मत कोणाचे असेल तर त्याची वाट पाहूया.

      • ठोस मत म्हणजे “अमुक एक करा आणि दहशतवादापासून मुक्त व्हा” असे काही अपेक्षित असेल तर ते कधीच नाही मिळणार. आणि “स्वतःकडे गिल्ट घ्यायची ही मानसिक गुलामी झाली.” ते गिल्ट नाहीये, पण आपण या व्यवस्थेचा भाग आहे आणि तो भाग म्हणून आपलीही जबाबदारी आहे,
       त्यांचे वर्चस्व मान्य करायचं आणि किडे-मुंग्यासारखं मरायचं.. करायचं काही नाही, असे नाही करू शकत ना आपण, इतकेच म्हणणे आहे.
       मतांची वाट पहाण्यापेक्षा आपल्यापुरता बदल आपण केलाच पाहिजे, नाही का? याव्यतरिक्त आपली मर्जी.

      • प्रसाद थरवळ says:

       माफ करा नचिकेत.. पण मग हे सर्व असंच चालत राहणार का…?? दगड आहोत का आपण..?? ऊन, वारा, पावसाचा मारा झेलत…झिजत राहायचं आणि कधीतरी मातीत मिसळून जायचं एवढंच का..??
       किती दिवस हे असं भिजंत घोंगड ठेवायचं…??? नो दौब्त दहशतवाद मुरलेला आहे इथे.. म्हणून का आपण हि त्याचा बळी पडण्याची वाटचं बघत राहायची का..??
       हि सर्व जी गरम गर्मी चालू आहे.. ती अजून ३ – ४ दिवस फक्त… फार फार तर १ – २ आठवडे.. त्याउपर काही नाही… येरे माझ्या मागले…! पुन्हा केव्हातरी ब्लास्ट होणार पुन्हा चर्चा होणार.. पुन्हा सर्व थंड होणार..आणि हेच सत्र सुरु राहणार…

       • Nachiket says:

        प्रसादजी..नाही नाही.. असंच भिजत घोंगडं पडावं असं मुळीच म्हणायचं नाही.

        फक्त त्याविषयी (आणि फॉर दॅट मॅटर भ्रष्टाचार वगैरेसाठीही) दुरित घटकांऐवजी स्वतःलाच जबाबदार धरुन स्वतःच्या पाठीवर कडकलक्ष्मी सारखे गाठ नसलेले पण फडाड फडाड आवाज करणारे व्यर्थ आसूड ओढत राहण्याला विरोध आहे.
        तुम्ही हा दहशतवाद वैयक्तिक पातळीवर टाळू शकत नाही. जिथे लपतात ते देशच्या देश उध्वस्त झाल्याशिवाय ही वाळवी मारणे शक्य नाही. आणि ते वैयक्तिक कर्तव्ये, निवडणुकीत मतदान १००% वगैरे बंब सोमेश्वरी मार्गांनी तर मुळीच शक्य नाही.
        केवळ “काय करायचे” कळत नाही म्हणून स्वतःलाच जबाबदार धरा आणि इतरच कोणत्यातरी गोष्टीतली स्वतःची नाकर्तेगिरी उकरुन स्वतःला गिरमिट लावत बसा हे मान्य नाही.

        तयार उपाय माझ्याकडेही नाही पण तसा मिळेतोवर हे स्वपीडन आणि स्वताडन थांबवावे एवढीच इच्छा.

        • Nilesh says:

         “I think its limit…” as I always think when blast occurs every time in Mumbai !!!

         Its WAR …. Sounds funny ?
         Difference is that in common WAR, People/soldiers fights from both sides but in this WAR only one side making attacks and other side has to take their attacks.

         I really want to know as we really I have guts to fight the terrorism ?
         Well this sounds bod and weird …
         Do we have a guts to kill Kasab ? (By going into Cell and Kill him)
         No ?
         So Why do you expect form government to go and destroy the terrorism by going across the country ?
         They don’t have Guts…

         As Pallavi says… “लोकशाहीत, तुमची जी लायकी असते तसंच सरकार तुम्हाला मिळतं.”

         I am surprised that there is no one psycho in India to go and Kill Kasab.
         Well, there will not be a 1% possibility of decreasing terrorism By Killing Kasab but somehow anybody successful to kill him then, their will be message to all terrorism groups that we are involved in this WAR…

         I don’t know when we wake Up…Its not the responsibility of Police to check every inch of the city, we have to be involve in this WAR….after all they are attacking on us not on police nor politicians isn’t it ?

         We have millions of Software engineers or Programmers in this country I don’t remember that any of them hacked or destroyed their network or website ?
         are we ?
         This is a one way I am telling the strategy to fight with terrorism, there are lots of ways to do other stuffs to against them …

         I believe this is WAR, Either you fight or be ready to get KILL…

         • मला असं वाटतं की या सगळ्यांसाठी आपण स्वतःला जबाबदार मानणं चुकीचे आहे. मी मतदान करतो, पूर्वी भाजपाचं पण राज्य होतं, तेंव्हा त्यांनी पण जे कॉंग्रेस करते तेच केलं. प्रमोद महाजन यांचं पण नांव आहेच त्या २ जी मधे.
          आपल्या कडे एक पद्धत आहे. की एखादा कॉंग्रेसवाला भाजपा मधे आला की तो शुद्ध होतो, पवित्र होतो, मग त्याला कोणी काही बोलायचं नाही. जसे अम्मा जेंव्हा भाजपा कडे आली तेम्व्हा तिच्या सगळ्या गुन्ह्यांकडे कानाडॊळा केला गेला. तसेच सुखराम हा कॉंघ्रेस मधे असे पय़ंत त्याच्याविरुद्ध रान उठवणारे लोकं, एकदा तो भाजपा मधे आल्यावर सगळं विसरले.

          आपण लोकं पक्ष मोठा मानतो.. माणसापेक्षा! ही मानसिकता बदलल्याशिवाय आपल्याला चांगलं सरकार कसं मिळणार?

 6. Rohit says:

  Politicians are indeed responsible for the situation that has led to the loose security and improper intelligence sharing among the different agencies… but this time, after looking at the reactions of the government on the Lokpal bill and the scams, I cant help to think that maybe, just maybe, are these blasts supported by or brainchild of any politician to divert the attention? Why target Mumbai again? With its “high security” and everything? All the headlines for the past few weeks were regarding the scams and Lokpal.. suddenly, now, I can see that for the next weeks the headlines will be regarding the Mumbai blasts. The short term memory of the public will be flooded by by the blast news and the Lokpal and scams news will fade away to the last pages or some corners of the newspaper and the people’s attention will be diverted from those important issues. We can see it on Facebook immediately. All the appeals, all the discussions and even the jokes surrounding the scams are replaced by the discussions and emotions about Mumbai blasts. It is obviously justified that people will be worrying about their loved ones in Mumbai, but, the attention has diverted. Mumbai has become a soft spot, in the hearts of the Indians as well as a target for such activities. It is easy to divert people’s attention by disrupting the life and pace of Mumbai. I just wish what I am thinking is not true, else, the life of the common man has absolutely zero value in our country!!

  • रोहित
   ह्या शॉट टर्म मेमरी मुळेच तर ह्या नेत्यांचं फावतं.
   लोकपाल वगैरे फार्स काही फार चालणार नाही. तसं म्हणाल, तर अण्णा हजारेंना हल्लीं मिडिया बरोबर मॅनेज करता येतोय. असो, त्यावर एक लेख उद्या सकाळी लिहितो.
   प्रतिक्रियेसाठी आभार.

 7. प्रणव says:

  आपण मरण यायची वाट पहात बसायचे, तेच आपल्या हातात आहे.. 😦

  • प्रणव..
   नाही इतक्या लवकर हत्यार टाकण्यात काय अर्थ आहे? काही तरी तर मार्ग निघेलच.

 8. Ninad says:

  Yala apan sagle jababdar ahot! As a citizen of this country we are failing to elect right people. Mag apan mhanu ki amhi kuthe nivdto ya netyana! Yachach artha chukiche manse nivdun yetat ani apan kahich karu shakat nahi. Yachach artha asa ki apli Lokshahi USELESS ahe. Gavandal ani Anpadh lokan sathi Lokshahi Pranali kahi kamachi nahi. electionchya adlya divashi Kombadi ani Daru dili ani Paise mojle tar votes miltat. Kuthe accountability ahe netyana?

  • निनाद
   आपण लोकशाही साठी लायक आहोत का? हा मुद्दा दिसतोय तुमचा. माझं उत्तर आहे नाही!

 9. भ्रष्ट्राचार बेईमानी काला बझार लोकपाल कायदा ईन सबसे जनता का ध्यान दूसरी तरफ लगाना, और अपनी भ्रष्ट्राचारी, बेईमानी की पाठशाला बरक़रार रखना यह भी मकसद इस हादसे के पीछे हो सकता .क्यों की इस देश में कुछ भी हो सकता, मुंबई के लोकप्रतिनिधि आमदार , नगर सेवक नौकरशाही खासदार पंतप्रधान और मंत्री मंडल ने सभी ने इस दुर्घटना की जबाबदारी लेते हुवे अपने अपने पद से इस्तीफे देना चाहीये.
  एक दो हमले तो होते ही रहते है ?… हर धमाके को तो नहीं रोका जा सकता ? —– राहुल गाँधी का ये बेवकूफी भरा बयान
  ये अभी अभी राहुल गाँधी ने उड़ीसा में प्रेस के सामने बोला है ! इन नोसिखऐ मनचले ने ये भी कहा कि काफी दिनों बाद हुए हमले से सिद्ध होता है कि देश का ख़ुफ़िया तंत्र मजबूत पहले से मजबूत हुआ है !….कांग्रेस के उमीद का सितारा यही नहीं रुका आगे बोला धमाके तो सारी दुनिया में हो रहे है …अफगानिस्तान में हो रहे है …. पाकिस्तान में हो रहे है .उसके रेल मंत्री लाल बहादुर शास्त्री ने रेल दुर्घटना होते ही त्यागपत्र दे दिया था ?… हमले नहीं रुकते तो गध्ही छोड़ दो ? ये है कांग्रेस कि नयी पीडी कि देश के बारे में सोच ?..जिनको अफगानिस्तान , पाकिस्तान और भारत में फर्क ही नहीं मालूम है ?….

 10. savitarima says:

  नचिकेत , आपले म्हणणे पटले , आपण काही करू शकत नाही म्हणून स्वत:लाच का आसूड मारून घ्यायचे ? या सगळ्याला जबाबदार निश्चितच राजकारणी आहेत , आपण त्यांना निवडून देत असलो तरी !! ते कोणत्याही पक्षाचे असोत , वागतात अगदी एकसारखेच . काल हे घडत असताना हे काय करत होते , तर एकतर मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळाले म्हणून जल्लोष किंवा नाही मिळाले म्हणून दुखावटा !! दहशतवादी संघटना पण अगदी हुश्शार ….ते या नेत्यांच्या केसालाही धक्का लावत नाहीत 😦
  आपापल्या ठिकाणी आपण जागरूक , सावध राहणे इतकेच आपल्या हातात आहे , असे वाटते .

 11. झालेल्या ब्लास्ट्सचा दोष कोणाला द्यायचा? कोण कारणीभूत आहे? आणि असा अनर्थ परत होऊ नये म्हणून काय करायचे? सगळेच फक्त प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं मिळणं कठीण आहे….
  स्वपीडन न करण्याचे जितके पटते तितकेच हे ही पटते की , ना परिस्थिती बदलण्याचे ना सकारात्मक बदल घडवण्याचे सामर्थ्य आपल्यात आहे….
  सगळ्या मुंबईकरांना सलाम आहे….. इतकं असुरक्षित वातावरणात कसे राहू शकता तुम्ही?

  • प्रज्ञा,
   असुरक्षित वातावरणार, कॊणी बाय चॉइस रहात नाही.. नाईलाज आहे हो, किती दिवस घरी बसणार? कधी ना कधी तरी कामावर जावे लागेलच.. काही लोकं या मजबूरीला मुंबई स्पिरिट म्हणतात.. 😦

 12. महेश कुलकर्णी says:

  आरोप प्रत्यारोप राजकीय पक्ष नेहमीच करीत असतो,यात सामान्य माणूस भरडला जातो,हे नक्कीच ,सर्वाना (राजकीय पक्षांना )त्याची कल्पना असते सगळ्या मुंबईकरांना सलाम आहे,….मुंबईच्या लोकांनी दाखवलेल्या स्पिरीटसाठी.त्यांना सलाम

 13. मनोहर says:

  अफझल गुरूची फाशी अमलात यावी यासाठी इंटरनेट माध्यमातून चळवळ उघारणे शक्य आहे काय?

  • मनोहर..
   हो शक्य आहे. पण राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज पेंडींग आहे काही वर्षापासून, आणि राष्ट्रपती त्यावर काही निर्णय घेत नाहीत हा खरा प्रॉब्लेम आहे.

 14. aruna says:

  सगळेच राजकीय पक्ष याला जबाब्दार आहेत असं नाही का वाटत? देशाची काळजी करण्यापेक्षा ते स्वतःची तिंबडी भरण्यात आणि एकमेकांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढण्यात दंग असतात. इथे देशाच्ची आणि सामान्य लोका>ची पर्वा कुणाला आहे?

 15. अतिरेक्यांच्या स्टाईलमधेच विधानभवनावर हल्ला करायचा आणि जोवर कसाबला आणि गुरूला भर चौकात नागडं करून उलटं लटकावून फटके मारून ठार केलं जात नाही तोवर सगळ्या नेत्यांना ओलीस ठेवायचं आणि दररोज एका नेत्याला मारायचं. जोवर कसाब आणि गुरूच्या शिक्षेची अंमलबजावणी होत नाही तोवर.. !!!

  आणि त्या दोघांना मारलं की ओलीस ठेवलेल्या सगळ्या नेत्यांनाही उडवून टाकायचं !!

  म्हणजे मग दहशतवादी काय त्यांच्या मागच्या आणि पुढच्या चाळीस पिढ्याही हल्ला करायला धजावणार नाहीत !!!!!!!!

 16. ” रोज मरे त्याला कोण रडे ” अशीच अवस्था राज्यकर्त्यांनी आपल्या सर्व मुंबईकरांवर आणली आहे. ९३ च्या बॉंबस्फोटानंतर जर अत्यंत कडक धोरण ठेवले असते, दहशतवाद व दहशतवाद्याला कुठलीही सहिष्णूता न दाखवता लगेच कठोर शिक्षा केल्या असत्या तर कदाचित त्यांनाही किंचितसा विचार करावा लागला असता. इतके निरपराध जीव निष्ठूरपणे मारलेल्या कसाबला शिक्षा करण्यासाठी इतका उहापोह होतो इथेच दहशतवाद्यांचा होसला अजून अजून बुलंद होतोय. त्याचे फळ त्यांनी लगेचच दिलेही.

  सगळी जनता आता पेटलेली आहेच. तिला हवी आहे दिशा…. आणि तो देणारा एक चेहरा. जनतेचे पैसे व येन केन प्रकारे जीव घेऊन पोसलेल्या एकाही नेत्यात ती धमक नाही. सत्तेचे व सहज मिळणार्‍या पैशाचे इतके मिंधे झालेत की ही सुवर्णधनुष्य स्वार्थापोटीही पेलायची त्यांची तयारी नाही.

  ९३ च्या ब्लास्ट नंतर दुसर्‍या दिवशी नेहमीची ८.४२ पकडली तेव्हां, ’ आम्ही मुंबईकर डगमगणारे नाही, एकजूट करून सामना करू. पुन्हा असे कधीच तुम्ही आमच्यावर भेकडपणे वार करू शकणार नाही असा पक्का बंदोबस्त करण्याचा निकराचा प्रयत्न करू “, असा विश्वास आपल्या राज्यकर्त्यांच्या बळावर वाटला होता. मात्र आज केवळ पोटाची खळगी आणि देवावर हवाला इतकेच उरले आहे….

  • कसाबला शिक्षा होणं बहूतेक शक्य नाही. राजकीय नेते होऊ देणार नाहीत. आज कॉंग्रेसचं राज्य असूनही राजीव गांधीची मारेकरी जिवंत आहे, यावरून काय ते समजा!!

 17. Nilesh says:

  “I think its limit…” as I always think when blast occurs every time in Mumbai !!!

  I really surprised abt Mumbai spirit, its really spirit or we don’t have any option to face the next day after blast…. This Spirit going to KILL Mumbai I belive,
  Cant we stop the Mumbai for One Day ? To get seriousness of the blast ?

  Its WAR …. Sounds funny ?
  Difference is that in common WAR, People/soldiers fights from both sides but in this WAR only one side making attacks and other side has to take their attacks.

  I really want to know as we really I have guts to fight the terrorism ?
  Well this sounds bod and weird …
  Do we have a guts to kill Kasab ? (By going into Cell and Kill him)
  No ?
  So Why do you expect form government to go and destroy the terrorism by going across the country ?
  They don’t have Guts…

  As Pallavi says… “लोकशाहीत, तुमची जी लायकी असते तसंच सरकार तुम्हाला मिळतं.”

  I am surprised that there is no one psycho in India to go and Kill Kasab.
  Well, there will not be a 1% possibility of decreasing terrorism By Killing Kasab but somehow anybody successful to kill him then, their will be message to all terrorism groups that we are involved in this WAR…

  I don’t know when we wake Up…Its not the responsibility of Police to check every inch of the city, we have to be involve in this WAR….after all they are attacking on us not on police nor politicians isn’t it ?

  We have millions of Software engineers or Programmers in this country I don’t remember that any of them hacked or destroyed their network or website ?
  are we ?
  This is a one way I am telling the strategy to fight with terrorism, there are lots of ways to do other stuffs to against them …

  I believe this is WAR, Either you fight or be ready to get KILL…

  • लोकशाहीत तुमची लायकी असते तसंच सरकार तुम्हाला मिळतं, हे पण एक प्रकारे तुमच्या राजकीय नेत्याच्या नाकर्तेपणामुळे केलेले स्वताडन आहे.
   आपले नेते हलकट आहेत, म्हणून आपली लाय़की कशी काय कमी होऊ शकते? ते नालायक आहेत, कारण त्यांची मनोवृत्तीच तशी आहे..

   मला वाटतं की शासानाच्या नाकर्तेपणामुळेच नक्षलवाद फोफावतो आहे. बरेचदा नक्षलवाद बरा म्हणायची पण इच्छा होते.

 18. hemant2432 says:

  रागावून चिडून काहीच उपयोग नाही. आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर चाचा नेहरूंनी सांगितल्या प्रमाणे आपण पंचशील वर विश्वास ठेवलाच पाहिजे. शांततेचा मार्ग आपण जगाला दाखवला आहे. आणि तेच महत्वाचे आहे. बॉम्ब स्फोटामुळे नुकसान झाले आहे, व त्या बद्दल संपूर्ण राष्ट्राला काय वाटते हे डॉ. मनमोहन सिंह, चिदंबरम, यांनी अत्यंत कडक शब्दात ” हे असले भ्याड हल्ले भारत कधीही सहन करणार नाही” हे संपूर्ण जगाला वारंवार (२००१ पासून) सांगितले आहे. रामदेव बाबांप्रमाणे काहीतरी करून वेळा घालवू नका. आपल्या सक्षम सरकारवर संपूर्ण विश्वास ठेवा. शिशुपालाचा वाधाप्रमाणे दहशतवाद्यांना कडक शिक्षा होणार आहे. एकदा त्यांची शंभरी भरली कि झाले!
  श्रीकृष्ण जन्माला नक्की येईल. याच युगामध्ये. आपल्या तिहार मध्ये खूप गर्दी झाली आहे.
  डोकं शांत ठेवा आणि कामाला लागा. कामे केल्यानेच भारताचा GDP सुधारेल व एक दिवस आपण अमेरिकेला फ्रान्सला ब्रिटनला मुलभूत सुविधांसाठी कर्जे देवू शकू. काका, शांततेच्या मार्गाने उपोषण केले तरी पोलीस सरकारच्या आदेशा नुंसार मारतात, निमूट काम केलेतर दहशतवादी मारतात. आपण सर्व गरीब बिचारे शेपूट तुटके जीव. शांत भारत! उभारता भारत! जयहिंद!

  • हेमंत आठल्ये says:

   🙂 gr8!
   एक काम करूयात, दहशतवाद्यांना आपण सांगूनच टाकूयात की, तुम्हाला हवे ते करा. आम्ही आपली प्रगती करतो. आणि इतर देशांना कर्ज वाटतो. रागावू नका, पण सर्व कॉमेंट्स सोडून याच कॉमेंट्सवरच बोलावेसे वाटते आहे.
   आपली लोकं मारली गेली. अजून २६/११ च्या हल्ल्यातील गेलेल्या लोकांना ‘मदत’ मिळाली नाही. आणि आता हे. मला माफ करा परंतु तुमच्या घरातील एखादी व्यक्ती अशा दुर्दैवी घटनेत गेल्यावर तुम्हाला अस कोणी तुमचे शब्द दिले तर नक्कीच तुमचा राग तळपायातून मस्तकात जाईल.

   ‘मलाही’ अस म्हणण्यापेक्षा सर्वांनाच हताश वाटते आहे. सरकार दोषी, पोलीस आणि सर्व सुरक्षा यंत्रणाच दोषी आहे. पण मला एक गोष्ट कळत नाही. जर दहशदवादी, आमच्या घरात घुसून मारू शकत असतील. तर त्याचा बदला आपण नुसताच स्वत:च रक्त आटवून का करायचे? नुसतीच चिडचिड. आणि सरकारला शिव्या शाप. बस!

   ह्या कॉमेंट बॉक्स मधून मला व्यवस्थित सांगणे कठीण वाटते आहे. पण थोडक्यात फक्त मला अस म्हणायचं आहे की, आपणही तेच करूयात. त्यांना प्रत्युतर दिल्याशिवाय हे थांबणार नाही. त्याचं नुकसान झाल्याशिवाय त्यांना याची जाणीव होणार नाही. कदाचित हसू येईल.

   पण मला अस बिलकुल नाही म्हणायचे की, बॉम्ब घेऊन तिकडे स्फोट करूयात. हे पहा, इतका मोठा आयटी वर्ग इथे आहे. प्रत्येकाला इथे नेटच्या भाषांची माहिती आहे. स्पष्ट शब्दात ‘सायबर वॉर’. बस, जे चीनी करतात तेच. करणे शक्य आहे इतकेच!

   बाकी सरकारवर विश्वास ठेवून अथवा त्यांच्याकडून यापुढे अपेक्षा ठेवानार्याला यापुढे काय म्हणावे हे समजत नाही.

   • hemant2432 says:

    श्री आठल्ये साहेब आपली प्रतिक्रिया वाचली. खूप छान आहे. मुंबई स्फोटांवर आपण देखील चिडला आहात. सत्य परिस्थिती हीच आहे कि १. असे स्फोट होण्यास भारतातलेच काही फितूर लोक कारणीभूत आहे. २. स्फोट केलेल्या दोषींवर कारवाई काय करणार, कोण करणार, कधी करणार हे कोणालाही माहित नाही. ३. कोठेवाडी अकोले बलात्कार दरोडा प्रकरण हि देशांतर्गत जखम अजून वाहते आहे त्यावर काय औषध? आदर्श घोटाळ्यातील आरोपी बाहेर फिरत आहेत त्याच्यावर खटले कधी? त्यांच्या मालमत्ता सरकारजमा कधी होणार?हिंदू धर्मा प्रमाणे राजद्रोह व देशद्रोह करणाऱ्यांवर देह दंडाचीच शिक्षा आहे, परतू भारतात हिंदू धर्म आहे कोठे? दस्तूर खुद्द न्यायालयाने पवित्र गीता ग्रंथावरच आरोपींचा हाथ ठेवायची प्रथा चालू केली आहे. कासाबच्या सुरक्षे साठी मशीन-गन घेवून अहोरात्र पोलीस तैनात आहेत. त्यातल्या एकालाही आपला सहकारी मारल्याची खंत नाही कि चीड नाही.
    तेंव्हा, आठल्ये साहेब आपला देश का महान आहे जगात, आणि ब्रिटीश जावून चौसष्ठ वर्षांनंतर अजूनही आपण सेकंड-थर्ड world countries मधेच का गणलो जातोय याची उत्तरे मिळतील काय?

    • हेमंत आठल्ये says:

     सगळ मान्य. मला फक्त अस म्हणायचे आहे की, आता यापुढे, सरकार काही करेल अशी अपेक्षा चुकीची आहे. मी सरकारची बाजू मुळीच घेत नाही. जगातील सर्वात नालायक आणि बिनडोक सरकार ‘भारत सरकार’ आहे.

     मला अस वाटत आपण आयटीवाले नुसत्याच लँग्वेजेस शिकून आणि स्वतः पुरती भल्या मोठ्या लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या सोडून अजून काय करतो आहोत?

     चीनी चिंग चॉँग जर आय इ सिक्स वापरून गुगल हॅक करू शकत असतील. तर आपण डॉट पीके उडवू शकत नाही काय?

 19. shubhalaxmi says:

  hello kaka,
  ekdam barobar bolalaat tumhi aapan nemka konala dosh denar.?????
  ani tumhi asa santap vyakt kelay ki mazya kade kahich nahi bolayla……. pan aso,,,,,
  he sarv chalnar, aapan ha vishay parmeshvaravar sodane bare! mazya mate………

  by tc

 20. हेमंत आठल्ये says:

 21. Bhushan Shirgaonkar says:

  Hello i like you blog. My name is bhushan shirgaonkar. I am a marathi but i have never visited maharashtra as i live in Punjab all my life. I can speak little marathi. I want to know how to blog in marathi or use marathi font.

  • भुषण
   ब्लॉग वर स्वागत. तुम्ही बरहा डॉट कॉम या साईट वर जाऊन फ्री सॉफ्ट वेर डाउनलोड करु शकता.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s