स्वामी निगमानंद

बाबा रामदेव, किंवा अण्णा हजारे यांच्यामधलं साम्य कुठलं आहे हे विचारलं तर पहिली गोष्ट जी मनात येते ती म्हणजे त्यांच्या मागचा मोठा  असलेले फॅन फॉलोअर्सचा जमावडा . त्यांनी काहीही जरी केलं तरी ती बातमी असते.म्हणजे  त्यांनी अगदी शिंक जरी दिली तरी, ” बाबा रामदेव को छिंक आई- किसका है इसके पिछे हाथ? क्या कॉंग्रेस सरकार की ये राजनीती है?  ” म्हणून तशी ब्रेकिंग न्युज पण पहायला मिळू शकेल एखाद्या दिवशी.

अण्णा हजारेंचं पण तसंच असतं की काही बोलले की मिडियाचे प्रवक्ते त्यांच्या मागे पुढे माईक धरून उभे असतात, ते काय बोलतात ते ऐकायला आणि मग त्याची चीर फाड करून लोकांपर्यंत पोहोचवायला.. या गोष्टीसाठी मिडियाला नाही, तर त्या दोघांनाही शंभर मार्क्स! मिडियाला मागे कसे फिरवायचे हे  दोघांनाही चांगलं जमतं.    आता हेच बघा नां, अण्णा हजारेंचं जे ’  किंवा रामदेव बाबांचे ’प्राणांतिक ’ उपोषण जे होतं ते फार तर चार पाच दिवस चालेल असा अंदाज होता माझा. आणि  नेमकं तसंच झालं.

या दोघांच्याही प्राणांतिक उपोषणामधे दोघांनाही काही होणार नाही, कोणीतरी समोर जाऊन लिंबू पाणी देईल आणि उपोषण सोडतील हे दोघंही ह्याची  पण सगळयांनाच कल्पना होती.तरी पण आपण सगळे हा खेळ कसा होतो हे मोठ्या उत्सुकतेने बघत बसलो होतो.

बरेच लोकं आमरण उपोषण करतात, एकदा नाही तर अनेकदा!! 🙂  आमरण उपोषणाचा हा असा फार्स मी  गेली कित्येक  वर्ष पहातो आहे! सरकारला प्रेशराईज करायला हे प्राणांतिक उपोषणाचे हत्यार वापरले जाते. आज पर्यंत उपोषणा मुळे कोणी मेल्याचे ऐकिवात नव्हते , आत्ता आत्ता पर्यंत तरी – म्हणजे जो पर्यंत स्वामी निगमानंदांचं नांव ऐकलं नव्हतं तो पर्यंत!

गंगा नदीचे पावित्र्य जो पर्यंत तुम्ही  हरिद्वारची ’गंगाजीकी आरती’ पहाणार नाही, तो पर्यंत समजणार  नाही.  गंगा नदीला आपण इतकं पवित्र मानतो की शेवटच्या क्षणी पण दोन चमचे गंगाजल आणि तुळशीचे पान तोंडात घातले, की सदगती लाभते असं आपण पूर्वापार मानत आलो आहोत. गंगेच्या पात्रातले पाणी  स्वच्छ रहावे असे सगळ्यांनाच वाटते. पण आपण काही करू शकत नाही.सध्या ,कधी गंगेवर गेल्यावर त्यातले दोन थेंब पाणी जिभेवर ठेवायची इच्छा  होणार नाही,  इतकं प्रदुषित झाले आहे ते. गंगेचं पावित्र्य का राखलं जाऊ नये?

स्वामी निगमानंद,! दरभंगा जिल्ह्यातला हा एक  स्वामी!  जेंव्हा बाबा रामदेव यांचे उ्पोषण सुरु होते त्याच  काळात ह्यांचे पण  ’आमरण उपोषणावर’ होते! तब्बल ११५ दिवस! ही गोष्ट किती लोकांना माहीत आहे? माझ्या मते अजूनही बऱ्याच लोकांना या   बद्दल काहीच  माहीत नाही.   मिडियाला पण त्याच्या ह्या उपोषणाची दखल घ्यावी असे वाटले नाही.  तो बिचारा १४ वर्ष एकटाच झगडत होता. राजकीय व्यवस्था, पोखरलेली नोकरशाही- सगळे त्याच्या विरोधात असतांना पण त्याचा  लढा सुरु  होता.

बाबा रामदेवांचे स्विस बॅंकेतला पैसा परत आणा म्हणून सुरु केलेले आमरण (!)  उपोषण किंवा लोकपाल विधेयक लागु करा म्हणून अण्णा हजारेंनी केलेल्या प्राणांतिक   (!) उपोषणासमोर ह्या स्वामी निगमानंदांच्या उपोषणाचे कारण ” गंगाजी स्वच्छ ठेवा” हे  कारण फारस ग्लॅमरस वाटत नाही  लोकांना..    इतका महत्त्वाचा मुद्दा,   पण दुर्दैवाने  हा एक हिंदूंचा ’धार्मिक मुद्दा’  झाला असावा, आणि सेक्युलर प्रेस आणि टिव्ही ला  हा मुद्दा  कव्हर करणे म्हणजे हिंदुत्वाला कव्हर करणे असे वाटले असावे.

राजीव गांधी यांनी जेंव्हा गंगा स्वच्छ करावी असे म्हटले होते, तेंव्हा बऱ्याच लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या.  पण माझ्या मते राजीव गांधींचे त्यावेळेस काहीच चुकले नव्हते. गंगे मधे अर्धवट जाळलेली प्रेतं वाहून जाताना दिसतात बरेचदा. निरनिराळ्या उद्योगांचे सांडपाणी पण प्रक्रिया न करता सोडलं जातं.तसं आपलं पोल्युशन कंट्रोल बोर्ड,  आहे, पण ते कसं काम करतं यावर मी काही टीप्पणी करत नाही.

निगमानंद!! बिहार मधल्या दरभंगा जिल्ह्यात यांचा जन्म झाला. दहावीची परिक्षा १९९५ मधे  ८० टक्के गुण मिळवून उत्तिर्ण झाल्यावर मोठ्या भावाप्रमाणेच आय आय टी मधे जाऊन शिकावे असे वडीलांचे स्वप्न होते. पण एक दिवस मात्र घरी ” मी सत्याच्या शोधात जात आहे ” असे सांगुन घर सोडले आणि मातृसदन या आश्रमात जाऊन राहिले.

उत्तराखंडा मधे नैसर्गीक संपत्ती म्हटले तर फक्त रेती, गिट़्टी  इतकेच आहे. आता इतकी सरकारी संपत्ती म्हटल्यावर बऱ्याच  माइनिंग माफियाच्या आणि   राजकीय नेत्यांच्या तोंडाला पाणी सुटणारच. सरकारचं जे काही आहे, ते आपलंच! ही गोष्ट अगदी पक्की ध्यानात ठेवली आहे राजनेत्यांनी  आणि त्यांच्याशी लागे बांधे असलेल्या लोकांनी. त्यामुळे ही संपत्ती लुटण्यासाठी सगळे सत्ताधारी  आणि विरोधी पक्ष एकत्र झाले आणि या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले गेले.

गंगानदीच्या पात्राच्या शेजारी असलेले दगड खणून बाहेर काढण्यास कायद्याने प्रायव्हेट कंपन्यांना मनाई आहे.इथले दगड काढल्याने , किंवा रेतीचा उपसा केल्याने पात्र खोल होते, आणि वॉटर टेबल खाली जातो- आणि जवळपासच्या गावात पाण्याचं दुर्भिक्ष होतं. माइनिंग करण्याची परवानगी फक्त सरकारला आहे. कायद्याने जास्तित जास्त सहा फुटा पर्यंत एक्स्कॅव्हेशन केले जाऊ शकते. असे असतांना सुद्धा इथे  लोडर्स, एक्स्कॅव्हेटर्स सारख्या मोठमोठ्या मशिन्स वापरून इथे नदीकिनारी इल्लिगल माइनिंग करुन दगड काढले जातात. नुकताच एका क्रशरवर छापा घातला असता  ४५ हजार टन अवैध रित्या काढलेले दगड सापडले.

ह्या दगडाला  क्रशर मधे घालून क्रश करणे आणि गिट़्टी वगैरे मार्केटला विकणे हा एक खूप मोठा व्यवसाय आहे . दगड क्रशर मधे बारिक केल्यावर उडणारा धुराळा हा शेजारच्या शेतीच्या जमीनिवर जाऊन बसतो आणि जमीन नापिक होते. जवळपास रहाणाऱ्या लोकांना छातीचे विकार, श्वासाचे विकार, टिबी वगैरे होणे तर नेहेमीचेच झालेले आहे. हा धुराळा एकदा जमिनिवर बसला की जमिन नापिक होते, आणि मग हीच जमीन क्रशर माफियाला कवडीमोलाने विकणे इथल्या लोकांना भाग पडते.

दगड काढतांना होणारे गंगेचे प्रदुषण हा पण  महत्वाचा मुद्दा आहेच. या लढ्याला केवळ धार्मिक  लढा  किंवा भावनीक मुद्दा म्हणून पहाणे बरोबर होणार नाही. हा एक सामाजिक लढा आहे, करोडो रुपयांच्या राष्ट्रीय खनिज संपत्तीचा केल्या जाणाऱ्या गैर वापरा विरुद्ध.

साधारण पणे १९९८ साली हा संघर्ष सुरु झाला.  महाकुंभ मेळा असलेल्या भागात नदी मधे दगड , रेती काढण्यावर बंदी घातलेली असतांना पण त्या ठिकाणी हरीद्वारला मोठ्या प्रमाणात मायनिंग सुरु होते. याविरोधात स्वामी निगमानंदांनी सर्वप्रथम आवाज उठवला  आणि कोर्टातून स्टे आणला. इथूनच खरी त्यांच्या  गंगा शुद्धीकरण लढ्याची सुरुवात झाली.

कोर्ट कचेऱ्या आणि बरंच काही झालं या चौदा वर्षात. कित्येकदा उपोषणं केली गेली, मोर्चे काढल्या गेले, पण म्हणावे तसे ह्या लढ्याला वृत्तपत्रीय, टिव्ही वर प्रसिद्धी वगैरे मिळू शकली नाही, आणि यश पण मिळाले नाही. त्या भागात असलेल्या हजारो अधिकृत आणि अनधिकृत क्रशर कंपन्या, आणि त्यांचे सरकारी नेत्यांशी असलेले लागे बांधे, या मुळे त्यांच्यावर कारवाई करण्यास ज्युडीशिअरीवर दबाव आणणे अवघड जात  होते.एका क्रशरवर सापडलेला ४५ हजार टन माल योग्य पावती नसल्याने जप्त केला जातो, नंतर तोच माल कुठली तरी पावती दाखऊन वर्षा-सहा महिन्यानंतर सोडवून घेतला जातो.असे प्रसंगही त्यांच्या समोर आले, पण त्यांनी लढा सुरु ठेवला.

मागे फॉलोअर्स फारसे नाहीत, काही न्युसेन्स व्हॅल्यु पण नाही, त्यामुळे सरकारला त्यांच्याकडे  लक्ष द्यायची गरज वाटत नव्हती. सरकारचं लक्ष वेधून घ्यायचा एकच मार्ग दिसत होतो- तो म्हणजे प्राणांतिक उपोषण! पण ते करूनही त्यांच्याकडे कोणाचेच लक्ष गेले नाही.

ज्या   हिमालयन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल  मधे बाबा रामदेव यांना ऍडमिट केले होते, आणि चोविस तास मिडिया त्यांचे उपोषण कव्हर करत होता, त्याच दवाखान्यात स्वामी निगमानंदांना पण भरती केले होते. बाबा रामदेव यांनी जुस घेऊन उपवास सोडला, आणि टिव्ही वर ब्रेकिंग न्युज झळकत होती,  तेंव्हा स्वामी निगमानंद त्याच दवाखान्यात मृत्युशी लढा देत  होते,पण कुठल्याच  न्युज चॅनललवर किंवा वृत्तपत्रात  याबद्दल काही बातमी आली नव्हती. स्वामीजींनी उपवास सोडावा म्हणून एकाही नेत्याने प्रयत्न केले नाहीत, कींवा त्यांना भेटायलाही कोणी गेले नाही.   त्याची दखल ना तर मिडीया घेतली , ना नोकर शाही, ना सरकार ने!.

ह्या एकांड्या शिलेदाराच्या मृत्युनंतर पण फक्त एक लहानशी चौकट दिसली पेपरमधे, “गंगा शुद्धीकरण अभियानाचे पुरस्कर्ते, स्वामी निगमानंद यांचा उपोषणामुळे मृत्यु झाला आहे  इतकंच!! बस्स

हा लेख इथेच संपवतो, तुम्हाला विचार करायला एक मुद्दा देऊन, मिडीयाचे हे असे वागणे का असावे?? का म्हणून स्वामी निगमानंदाकडे दुर्लक्ष केले गेले असावे? हा करोडो रुपयांच्या घोटाळ्याचा मुद्दा आणि गंगा प्रदुषण हा मुद्दा खरंच इतका दुर्लक्ष करण्यासारखा आहे का?

” मिडिया कॅन  कॅन मेक ऑर ब्रेक ”  हेच खरं!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , , . Bookmark the permalink.

41 Responses to स्वामी निगमानंद

 1. Pravin says:

  तुमच्या लेखाशी १००% सहमत. मलाही कल्पना होतीच कि या दोघांची उपोषणे मरेपर्यंत चालणारच नाहीत म्हणून. कदाचित हे controversial statement होईल, पण अण्णांच्या काही मागण्या तर मान्य झाल्या परंतू पंच तारांकित उपोषणहिरो रामदेवबाबा यांनी तर अगदी भूक सहन झाली नाही म्हणून उपोषण सोडले हे माझे स्पष्ट मत आहे. या धरती वर निगमानंद स्वामींना सलाम ठोकावासा वाटतो. त्यांच्या मृत्यू च्या दिवशीच त्यांच्या उपोषणा बद्दल कळले. माझ्या मते जोवर या भारंभार न्यूज चॅनल ची संख्या आटोक्यात येत नाही तोवर आपल्याला बातम्या न मिळता केवळ मसाला मनोरंजनच बघायला मिळणार आहे

  • प्रविण
   बाहेर देशात असलेले पैसे परत आणा हा मुद्दा मात्र एकदम तकलादू होता. अण्णा हजारे तर चक्क वहावत गेले असे मला वाटते. सुरुवात तर बरी झाली, पण पुन्हा त्यांनी जेंव्हा उपोषणाची धमकी दिली, तेंव्हा कोणीही (फेस बुक वर, पण रिऍक्शन दिली नव्हती ) लोकांना पण या अशा उपोषणामुळे काही होणार नाही हे लक्षात आले असावे.
   निगमानंदांच्या बद्दल पुढल्या उत्तरात लिहितो. आभार.

 2. काका, ही बाबा निगमानन्दांची बातमी वाचली तेव्हा असंच काहीसं मनात आलं होतं…शेवटी अण्णा काय आणि रामदेव काय बोलणाऱ्याची करवंद खपतात त्यातला प्रकार आहे…आणि कधी वाटतं की नागरिक म्हणून आपण पण या लढ्याला कितपत पाठींबा दिला? अर्थात मिडियाने हा लढा नजरेसमोर आणला नाही हे खरच आहे पण ते गेल्यावर तरी हा लढा पुढे सुरु राहावा म्हणून लोकांनी काही केलंय का हे मला माहित नाही…

  • अपर्णा
   आपण कुठल्या ना कुठल्या तरी पक्षाचे असतो. जो पर्य़ंत आपल्या आवडीचा पक्ष किंवा नेते एखाद्या गोष्टीला पाठिंबा देत नाही, तो पर्यंत आपणही देत नाही. ही वस्तुस्थिती आहे.

   हे जे आंदोलन होते ते हजारो क्रशर्स च्या मालका विरुद्ध होते. हे क्रशर्स काही नेत्यांच्या ( भाजपा सोबतच कॉंग्रेस आणि समाजवादी नेत्यांच्या) अगदी जवळच्या असलेल्या व्यक्तीची होते. काही ठिकाणी डायरेक्ट मालकीचे जरी नसले, तरी हितसंबंध जुळलेले आहेतच!

   सत्ताधारी तर होतेच की ज्यांनी काहीच केले नाही, पण इतर विरोधी पक्ष ( कॉंग्रेस , सपा, वगैरे ) काय दहा वर्ष झोपा काढत बसले होते का ? त्यांना तर या आंदोलनाला पाठिंबा देऊन सरकारला का धारेवर धरणे सहज शक्य होते. पण कुठल्याही पक्षाने या आंदोलनाला पाठिंबा दिला नाही- कारण “एकच हमाम मे सब नंगे” प्रमाणे सगळे पक्षं यात इनव्हॉल्व्ह आहेत. इलेक्शनला लागणारा पैसा शेवटी असा माफियाकडूनच तर मिळतो. असो..

 3. काही प्रश्नांची उत्तरे या माझ्या लेखातुन मिळतील बहुतेक http://shabdbramha.blogspot.com/b/post-preview?token=t0d_QjEBAAA.gaJI9NS0Q3Xuj-YWC3W0CQ.qlfLEd36Q2VcWXgIBBKBhw&postId=3952718151930689568&type=POST

  • हेमंत
   तुमचा लेख वाचला. अगदी मर्मावर बोट ठेवलं आहे. सगळी सर्कस ही करण्याचे कारण की आपण लाइम लाइट मधे रहाणॆ..तेवढं जमलं की झालं.
   आणि तुम्ही ज्या कारणासाठी भांडता त्या कारणामुळे जर एखाद्या राजकीय पक्षाला काही फायदा होत असेल तर मग क्या कहने….

 4. लेखातील प्रत्येक शब्दाशी १००% सहमत आहे दादा. मुळात आपल्याला (पब्लिकला) अजुनही चांगलं काय वाईट काय हे कळत नाही. अजुनही आपण ’चकाकतं ते सगळं सोनं’ यावरच विश्वासुन असतो. त्यात भर घालायला बेजबाबदार मिडीयावाले (अपवादाबद्दल क्षमस्व) आहेतच.

  • विशाला
   ज्या हिमालयन क्रशर्स आणि एसी क्रशर्स बद्दल भांडणं सुरु होती, ती क्रशर्स आता बंद करण्यात आलेली आहेत> पण इतर क्रशर्स मात्र तसेच सुरु आहेत.
   एक प्रश्न रहातो, की निगमानंदांचा मॄत्यु होणे खरंच गरजेचे होते का या साठी?

 5. मिडिया विश्वासार्थ राहिली नाही आहे. त्यांच्यामध्ये जीवघेणी स्पर्धा आहे मसालेदार बातम्या देऊन टीआरपी वाढवण्यासाठी… स्वामी निगमानंद हा त्यांच्या दृष्टीने इतका ग्लॅमरस विषय नाही, त्याला असलेला कमी पाठींबा हे कमी टीआरपीला कारण असतं ह्यांच्यासाठी…

  सोडा, काय बोलू ह्यांच्याबद्दल. जिथे अमिताभला ताप येतो ही ब्रेकिंग न्यूज असते, तिथे अजुन काय बोलणे?

  • सुहास
   आपण काय करू शकतो हे मात्र समजत नाही.इतक्या मोठ्या घटनेनंतर पण अजूनही जनजागृती झालेली नाही. निगमानंदांचे बलिदान वाया गेले असे वाटते.

 6. http://aarsaa.blogspot.com/2011/06/blog-post_17.html
  प्रहार” या पेपरातील “आरसा” या रविवारीय सदरात बरोब्बर महिन्यापूर्वी (१७ जून) याच विषयावारला लेख आला होता. तो आता मुकेश माचकर यांच्या ब्लॉगवरही आहे. अन्य कुणा मराठी पेपर ने हा विषय निगमान्दांच्या मृत्यूनंतर, पुढल्या महिनाभरातही हाताळला नसल्याने महेंद्र यांचे लेखन आवश्यक ठरते.

 7. प्रणव says:

  काका,
  उपोषाणावरून आठवलं, मागे एकदा डीएमकेचे सर्वेसर्वा एम करुणानिधी यांनीही असाच उपोषाणाचा ड्रामा केला होता. सकाळी नऊ वाजता चालू झालेलं यांचं तथाकथित ‘उपोषाण’ पंचतारांकित तर होताच पण तीन प्रयोगात कसा नाटक संपत तसाच तीन तासात संपलं आणि उपोषण कशासाठी तर श्रीलंकेतील तामिळ जनतेसाठी, आणि यांच्या राज्यातील जनता वारयावर. These all are not political leaders but political jockers …
  प्रणव

  • प्रणव
   ते आजोबा तर फेमस आहेत नाटक्ं करण्यात! नेहेमीच काही तरी सुरु अस्तं या तामिळ लोकांचं.जया आणि करूणा…

 8. पूर्णतः सहमत.. या बिचाऱ्या दळभद्री मिडियापायी एका निष्पाप जीवाचा बळी गेला !!

  >> ” मिडिया कॅन कॅन मेक ऑर ब्रेक “ हेच खरं!

  ग्रिशमच्या जवळपास प्रत्येक पुस्तकात प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे मिडीयाच्या या गचाळ कारभारावर, प्रभावावर आणि त्यांच्या हस्तक्षेपावर मस्ट शब्दांत ताशेरे उडवलेले आहेत त्याची आठवण आली.

 9. Rajeev says:

  अरे बाबा, स्वामी राजरत्नानंदांच एक वाक्य ऎक….
  “आपल्या देशात मातीचे सोने होते आणी सोन्या सारख्या माणसांची माती “

  • राजीव
   याला कारण शेवटी आपणच! कुठल्या गोष्टीला महत्त्व द्यायचं आणि कुठल्या गोष्टीला नाही हे ठरवणारे आपणच. लोकांचा सपोर्ट नव्हता, म्हणून त्यांचा मृत्यु झाला, जर सपोर्ट असता तर इतके दिवस सरकारने काहीतरी केले असते त्यांनी उपोषण सोडावे म्हणून.

 10. pranjal kelkar says:

  बाबा रामदेव फक्त पब्लिसिटी साठी उपोषण करत होते.
  मुळात साधूने राजकारणात पडू नये आणि नेत्याने साधू होऊ नये. चुकीच्या जागी जाऊन नको त्या लोकांना बरोबर चर्चा केल्या चे हे परिणाम आहेत.
  स्वामी निगमानंद याच्या विषयी सांगायचा तर ते कोणाचे गुरु हि नव्हते किवा तशी त्यांची संस्था हि नसावी. जो पर्यंत पब्लिसिटी होत नाही तो पर्यंत उपोषण किंवा कुठलेही आंदोलन यशस्वी होत नाही हा आत्ता पर्यंतचा अनुभव आहे.
  अश्या किती तरी आंदोलनांचा आसाच अंत झालेला आहे. आपली प्रसारमाध्यमांची सुद्धा कीव येते सकाळी भविष्याचा मारा दुपारी भपकेबाज बॉलीवूडच्या बातम्या आणि रात्री निर्थक चर्चा आणि फावल्या वेळेत ब्रेअकिंग न्यूज.
  बेभान पणे काहीतरी विधान करणे आणि नंतर स्वतः ची टिमकी वाजवत बसने यातून कुठलेच न्यूज चानेल वाले सुटले नाहीत. जिथे फक्त भंपक पण आहे तिथेच हे सगळ्यात आधी पोचतात. आणि नको त्या बातम्या अधिक प्रसारित करत बसतात.
  स्वामी निगमानंद सारख्या सध्या कार्यकर्त्याची त्यांना काहीच किमत नाहीये. ह्याचमुळे आपल्या देशाचा ह्रास होईल अशी भीती वाटत आहे.

  • प्रांजल
   गेले दोन दिवस ब्लॉग वर येऊच शकलो नाही, म्हणून उत्तरास उशीर होत आहे. क्षमस्व! ह्या गोष्टीला आणखीन एक ऍंगल आहे, तो म्हणजे राजकीय इनव्हॉल्व्हमेंटचा!
   १)त्या भागात भाजपाचे राज्य आहे, म्हणजे भाजपा सरकारने या गोष्टीला हिंदूच्या हितासाठी ( जे त्यांचं ब्रिद आहे ) त्यासाठी तरी सपोर्ट करायला हवा होता.
   २) भाजपाने संपूर्ण दुर्लक्ष केले. भाजपाच्या राज्यात एका साधूचा गंगाशुद्ीकरणसाठी मृत्यु व्हावा ही एक खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे.
   ३) बरं, भाजपाने माइन्स माफियाला सपोर्ट केला, तर मग तिथल्या विरोधी पक्षाने म्हणजे कॉंग्रेस, समाजवादी इत्यादी पक्षांनी पण या आंदोलनाला पाठिंबा देऊन भाजपा विरोधी वातावरण तयार करायल हवे होते, पण तसे झाले नाही. कारण कॉंग्रेसी आणि विरोधींचे पण या खाण माफियाशी लागे बांधे आहेत.
   ४) सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष यांची अभद्र युती इथे पहायल मिळाली, आणि त्यामुळेच निगमानंदांचा मृत्यु झाला.

   • pranjal kelkar says:

    सगळेच एका माळेचे मणी आहेत हो.
    भा ज प काय आणि कॉंग्रेस काय.
    कर्नाटक मध्ये भा ज प चे काय चालू आहे हे आपण बघत आहोतच ना????

 11. निगमानंदांच्या उपोषणाचे कारण ” गंगाजी स्वच्छ ठेवा” हे कारण फारस ग्लॅमरस वाटत नाही लोकांना.. इतका महत्त्वाचा मुद्दा, ( पण दुर्दैवाने हा एक हिंदूंचा ’धार्मिक मुद्दा’ झाला असावा, आणि सेक्युलर प्रेस आणि टिव्ही ला हा मुद्दा कव्हर करणे म्हणजे हिंदुत्वाला कव्हर करणे असे वाटले असावे.)

  kaka ekmev hech karan asave ase mala vatate 😦

  • विक्रम
   स्वामी निगमानंदांना दवाखान्यात ऍडमिट केले होते. तिथे त्यांना जबरदस्तीने घशात ट्युब घालुन जबरदस्तीने दूध दिले जात होते. अशा प्रकारे त्यांना कितीही दिवस जिवंत ठेवता येईल असे सरकारला वाटत असावे, म्हणून कदाचित त्यंच्याकडे दुर्लक्ष केले गेले असावे.
   अशा प्रकारे दुध दिल्यावर ग्लुकोजचे रकाततले प्रमाण मेंटेन होते, आणि मृत्यु होऊ शकत नाही. असेही वाचण्यात आले आहे, की एक दिवस एका नर्सने त्यांना एक इंजेक्शन दिल्यावर त्यांची तब्येत एकदम खराब होऊन त्यांचा मृत्यु झाला. खरे खोटे काय आहे ते सांगता येत नाही.

 12. geetapawar says:

  gr8 kaka.. shabdach nahi majya kade……………..

 13. अभिषेक says:

  काका details बददल धन्यवाद… मला फारच त्रोटक माहिती होती निगमानंदां बददल … आपला लेख खुपच माहितीपूर्ण
  मात्र धुसमुसाट परत वाढला… काय घोड आडवल मी हे माहीत करून…
  मिडिया चा मुळात खूप राग आहे मनात… तो अजून वाढला एवढंच
  राजकीय पक्षांचे तर काय तारे तोडू…
  कायद्याच्या देवी सारखे लोकशाही च्या देवीचे पण डोळे बांधून ठेवलेत कि काय असा प्रश्न आहे मनात 😦

  • अभिषेक, गीता
   अभिप्रायासाठी धन्यवाद..मी लिहितांना उगाच कुठल्यातरी पक्षाला सपोर्ट करणारे लिहित नाही. एखाद्या व्यक्तीला टार्गेट न करता, इश्यु टार्गेट केला तर लिखाण जास्त सहज होते असे वाटते.

 14. Gurunath says:

  बिचा~या संन्याशीबुआंसाठी मात्र जीव खरेच फ़ार तुटला राव…….., ही खदीम राजकारण्यांची जातच अशी असते, त्यांना सत्तेची धुंदी ही एकच जात धर्म उरलेला असतो.

  • त्यांना नळीने दुध पाजून चक्क अत्याचारच केले त्यांच्यावर – जवळपास महीना भर..

 15. महेश कुलकर्णी says:

  राजकीय लोकांनी जाणूनबुजून लक्ष दिले नाही,कारण त्यांना केवळ लोकाच्या भावनाशी खेळण्याचा एक छद जडलेला असतो ,सर्व राजकीय पक्ष त्याचा नेहमीच वापर करीत असतात,,आरोप प्रत्यारोप केवळ त्यांना माहित असतात,

  • महेश
   इथे करोडॊ रुपयांची हेराफेरी झालेली आहे. कित्येक कोटी रुपये सगळ्यांनी वाटून घेतले आहेत. पैसा हेच एक कारण की त्यांचा आवाज दाबून टाकला गेला.

 16. amol says:

  ” या गोष्टीसाठी मिडियाला नाही, तर त्या दोघांनाही शंभर मार्क्स! मिडियाला मागे कसे फिरवायचे हे दोघांनाही चांगलं जमतं. ”
  what do you mean by word “जमतं”
  this is TOTALLY WRONG STATEMENT YOU HAVE MADE HERE…why are you blaming anna ji.
  Anna hazare is fighting for something good…media is on fault side that they want to do postmortem of every of theirs…

  please write something sensible and constructive instead of writing some junk statments

  • अमोल,
   ब्लॉग वर स्वागत. लोकपालचं काय झालं हे पाहिलं ना? माझं मत आहे ते. अण्णा हजारे ह्यांना व्यवस्थित वापरलेलं आहे सरकारने. त्यांच्या नकळत. मिडीयाला वापरता येतं असं म्हटलं तर त्यात काय चुक आहे?ती एक क्वॉलिटी आहे.

 17. स्वामी निगमानंदांचे बलिदान वाया गेले आणि उरलेल्या मध्यमवर्गीय, नोकरदार सामान्य भारतीयांचा जन्म वाया जाणार.

 18. सचिन says:

  नमस्कार काका,

  हे नैऋत्य भारतातील उपोषण देखील असेच उपेक्षित आहे गेल्या ११ वर्षांपासून…
  http://en.wikipedia.org/wiki/Irom_Chanu_Sharmila

 19. Patil says:

  suresh chiplunkars article :-
  जस्टिस संतोष हेगडे जी ने कहा है कि यदि सरकार को न्यायपालिका और प्रधानमंत्री को जनलोकपाल के दायरे में रखने पर आपत्ति है तो उस पर पुनर्विचार किया जा सकता है… मैं अपने साथियों से इस बारे में बात करूंगा, यानी “समझौते” की की ओर पहला कदम बढ़ गया है। अण्णा जी भी फ़िलहाल 15 दिनों के अनशन पर राजी हो गये हैं, और उन्होंने यह भी कहा है कि इस अवधि को बढ़ाया भी जा सकता है… अर्थात “समझौता वार्ता” किस प्रकार आगे बढ़ती है और इसका सम्मानजनक समझौता (यानी कांग्रेस और अण्णा) कैसा और कब होगा, यह अगले 10-15 दिनों में तय होगा… मैं जानने को उत्सुक हूँ कि अमेरिका से सोनिया गाँधी के लौटने में कितने दिन बचे हैं?

  इस बीच टीम अण्णा ने पूरे देश में मीडिया मैनेजमेण्ट के जरिये ऐसा माहौल खड़ा कर दिया है कि अब अण्णा “बेकाबू शेर” के ऊपर सवार हो गए हैं। एक व्यक्तिगत सर्वे में मैंने पाया कि गरीब व्यक्ति सोच रहा है कि अण्णा महंगाई कम कर देंगे, पास की दुकान में काम करने वाला कहता है कि जनलोकपाल बिल से स्कूल में डोनेशन नहीं देना पड़ेगा, हमारी काम वाली बाई कह रही है कि अण्णा के आंदोलन से सड़कें बनेंगी और नालियाँ साफ़ होंगी…यानी किसी को असल में पता नहीं है कि “जनलोकपाल” क्या है। इस प्रकार का “भीड़तंत्रवाद” (मास हिस्टीरिया) पैदा करना तो आसान है, लेकिन बाद में उसे संभालना मुश्किल हो जाता है…।

  जिस बात की तरफ़ मैं पहले दिन से इशारा कर रहा हूँ, कि कहीं यह आंदोलन आम जनता के बीच “निराशावाद” की लहर न पैदा कर दे, हालात इसी तरफ़ बढ़ रहे हैं। टीम अण्णा की “बुद्धिमान” टीम ने अण्णा को ताड़ के पेड़ पर चढ़ा तो दिया है, लेकिन कहीं ऐसा न हो कि अण्णा को उतरने का रास्ता न मिले। इस ऊँचाई से नीचे उतरते समय “कांग्रेसी सीढ़ी” का सहारा लिया तब भी उनके लिए मुश्किल खड़ी होगी… परन्तु जन-भावनाओं का जो “ज्वार” खड़ा किया गया है उस पर “सर्फ़िंग” करते समय बेहद सावधानी बरतनी होगी, क्योंकि ज्वार को कभी न कभी तो उतरना ही है, इसी प्रकार अण्णा को भी कभी न कभी ताड़ के पेड़ से तो उतरना ही है। इस प्रक्रिया में जनता के साथ “चोट” होने की पूरी सम्भावना है, क्योंकि आम लोग तथा कम-पढ़ा लिखा वर्ग अब इस “मुगालते” में आ गए हैं कि अण्णा उसके लिए “जादू की छड़ी” लाए हैं, जिसे घुमाने पर उसे 20 रुपए किलो दाल मिलने लगेगी, उसके घर के सामने की सड़क चकाचक हो जाएगी, या भ्रष्ट नेता-कलेक्टर को फ़ाँसी हो जाएगी…

  मूल सवाल वही है, जो आंदोलन के पहले दिन से ही था… कि अण्णा जी, आप पेड़ पर चढ़ तो गये हैं (बल्कि जबरन चढ़ा दिये गये हो), लेकिन अब उतरेंगे कैसे?

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s