कट्टा..

मित्र म्हणजे कोण? अगदी सोपा आणि साधा प्रश्न! पण उत्तर??  नाही इतकं सोपं नाही ते.  आजचा मित्र कदाचित उद्या एक मोठा शत्रू म्हणूनही समोर उभा राहू शकतो. कोण कुणाला कधी मित्र म्हणून हवासा वाटेल  किंवा नकोसा वाटेल हे सांगता येत नाही. पूर्वी  एक लेख लिहिला होता सखी नावाने, पण तो केवळ पत्नी या विषयावर होता.

शाळेतले मित्र वेगळे असायचे. एकदा शाळेतून घरी आलो, की आपलं दप्तर ( स्कुल बॅग नाही) कोपऱ्यात फेकले, आणि आईने जे काही खायला दिलं ते खाऊन सरळ बाहेर खेळायला पळायचो. खेळणं झाल्यावर शाखेत जाऊन पुन्हा खेळणं! सगळं करून साधारण सव्वा सात पर्यंत घरी परत यायचो.  आज सहज विचार केला की त्या पैकी  किती मित्रांची नावं  आठवतात? – तर उत्तर फारच डिप्रेसिंग आहे. 😦

कॉलेजच्या दिवसातली मैत्री ही केवळ मनातलं कोणाला तरी सांगता यावं म्हणून असायची असे नेहेमी वाटते. कारण तेव्हाची मैत्री ही शाळेतल्या मैत्री प्रमाणे निर्वाज्य नव्हती. त्या मधे माझं गुपित तू सांभाळ तुझं मी.. अशी काहीतरी भावना असायची. एखादाच मित्र असा असायचा की ज्याच्याकडे मनातलं सगळं बोललं जायचं, ( कोण मुलगी आवडते, तिच्याशी कधी  कुठे काय बोललो, काय काय केलं?किंवा कठल्या मुलीकडे फिल्डींग लावली आहे .. वगैरे वगैरे..   )  या शिवाय पण  तोंडी लावायला म्हणून  सबमिशन्स, टेस्ट्स, जीटी वगैरे वगैरे विषय असायचे.  तसेच जगातल्या सगळ्या सुंदर मुली इतर कॉलेज मधेच -आणि अगदी गाळ आपल्या कॉलेज मधे का?  बरं , त्या गाळातली पण एकही मुलगी आपल्याला भाव का देत नाही? अशा पैकी कुठलाही  विषय कधीही चालायचा.

कॉलेजच्या दिवसातल्या कट़्ट्याची एक  वेगळी मजा असायची, तेंव्हा खिशामधे   फारसे पैसे नसायचे, त्यामुळे एक कटींग चहा आणि चौघांमधे पेटवलेली एक सिगरेट, इतकं जरी असलं तरीही दिड तास सहज पार व्हायचा. एकच सिगरेट आळीपाळीने ओढण्यातली मजा वेगळीच! मग एखादा मित्र फिल्टर ओलं करतो म्हणून सगळ्यात शेवटी लहानसं थोटूक उरेपर्यंत त्याला द्यायची नाही.  ते दिवस वेगळेच होते.

होता होता कॉलेज संपतं, आणि नोकरी लागली आणि ऑफिस सुरु झालं,  आणि मित्रांचा संच आपोआपच बदलला जातो. मित्रांमधे नोकरी करणारे, आणि इतर ( पिजी करणारे वगैरे  ऍकॅडमीक किडे म्हणतात त्यांना..)  असे सरळ सरळ गट पडायचे. अभ्यासु गृप हा फार वेळ बसत नसे कट़्ट्यावर. अभ्यासामुळे त्यांना तास अन तास कट्ट्यावर बसणे शक्य व्हायचे नाही, आणि त्यामुळे हळू हळू त्यांचे येणे पण कमी व्हायचे. इतर नोकरी करणारे मात्र नियमीत कट्ट्यावर पडीक असायचे !

२५ एक वर्षापूर्वी म्हणजे  लग्नापूर्वी मित्रांसोबत  संध्याकाळी शंकर नगरच्या कट्ट्यावर  आम्ही लोकं पडीक असायचो.कटींग चहा आणि सिगरेट्स चा धूर काढत आणि नसलेल्या मुद्यांवर चर्चा करत  कसा वेळ जायचा ते समजायच  पण नाही . संध्याकाळी ऑफिस संपलं की घरी न जाता कट़्ट्यावर दिड तास तरी पक्का जायचा!तेव्हाची जी मैत्री होती, ती जरा वेगळी होती. सगळे जण नोकरी करणारे, त्यामूळे अभ्यासाचं टेन्शन नाही, की पैशाची कमतरता नाही -त्या मुळे तिथे कितीही वेळ बसता यायचं.

दर शनिवारी रात्री मात्र  मोहनसेठच्या प्रितम  हॉटेलवर न चुकता  हा ओल्ड मंकचा कट़्टा रमायचा. रात्री दहा साडे दहा वाजले तरीही घरी जाण्याची कोणालाच घाई नसायची.  सगळेच बॅचलर्स, त्यामूळे विचारणारे कोणीच नाही! काही जणांच्या तर घरी पण माहिती होतं, की शनीवारी रात्री घरी जेवणार नाही हा म्हणून! मी तर एकटाच होतो, त्यामुळे नो प्रॉब्लेम! धमाल असायची .  कट़्ट्यावरचे मैत्री काही वेगळीच!मग एखाद्या दिवशी एखादा मित्र बॉम्ब गोळा टाकायचा _ की शहीद झालो बॉस!!! आणि सगळ्यांना ओल्ड मॉंक ची पार्टी द्यायचा.

होता होता आमच्या कट़्ट्या वरचा एक एक मेंबर शहीद व्हायला लागला. एखाद्याचं लग्नं ठरलं की तो दर  शनिवारी होणाऱ्या बायको सोबत फिरायला जाणे जास्त प्रिफर करु लागला.. पण अगदीच मित्रांनी  बाईल वेडा म्हणून चिडवू  नये म्हणून कट़्ट्यावर पण  कधी तरी हजेरी पण लावायचा. नेहेमी चार पेग खेचणारा एकदम फ्रेश लाईम सोडावर यायचा . होणाऱ्या बायकोला’ वास ’आवडत नाही म्हणून पित नाही हे न सांगता , ऍसिडीटीचा त्रास सुरु झालाय असे कारण द्यायचा.

फक्त सोडा आणि चकन्या बरोबर टाइमपास करतांना त्याला पाहिलं की तो खरंच शहिद झाला म्हणून दुःख व्यक्त करावेसे वाटून त्याच्या नावे एक बॉटम्स अप – वन फॉर द रोड घेऊन त्याला श्रध्दांजली देण्याची प्रथा होती .एकदाचं लग्न झालं, की मग तर तो मित्र अगदी पूर्णपणे येणे बंद करायचा .

एखाद्याचं लग्न ठरलं किंवा झाली  की    काही दिवसात  एक मेंबर गळला आपल्या कट़्ट्यावरचा हे जाणवायचं. तो मित्र मग मॅरीड गृप मधे जायचा. त्या मधे आमच्यातलेच ज्यांचं लग्न झालं होतं, ते सहकुटुंब बाहेर भेटायचे – पाव भाजी वगैरे पार्टी (!) साठी.

ही सगळी  लग्न झालेली मंडळी चक्क सिनेमाला  किंवा बगिचात वगैरे पण जायची एकत्र. चार पाच मित्र आणि त्यांच्या बायका. आम्हा इतर लग्न न झालेल्या मित्रांच्या मते,  सगळा चार्मच गेला असायचा बॉस ’त्या लग्न झालेल्या मित्रांच्या आयुष्यातला . अरे काय हे लाईफ आहे असे वाटायचे त्यांना आणि आपोआपच  असा एक नवीन ’कट़्टा..लग्न झालेल्यांचा’ सुरु व्हायचा.हे सगळं आपोआप होत असतं. कुठलीही मैत्री ही अशीच आपोआप होत असते. सगळी मैत्री ही बहूतेक आवडीवर अवलंबुन असते. आवडी जुळल्या की मैत्री ही सह्ज होते.

लग्न होण्यापूर्वी फक्त टाइमपास हा एकच मुद्दा असायचा, पण नंतर मात्र केवळ टाइमपास नाही, तर बायकोची जबाबदारी आणि तिला पण बोअर होऊ नये  हा एक मुद्दा असल्यानेच कट्टा सुटायचा मित्रांचा .  मंगळागौरीच्या रात्री बायको माहेरी गेली की मग हे सगळे मित्र पुन्हा एकदा आमच्या बॅचलर कट़्टयावर यायचे 🙂 .किंवा- आणि त्याचं पुन्हा दर्शन व्हायचं  ते बायकोला पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी पाठवल्यावर !! 🙂

ऑफिस मधे सकाळी दहाची वेळ, ऑफिस मधे चहा पिऊन झाला की  ऑफिस मधले काही लोकं  एकमेकांना खुणा करतात, आणि एक शब्दही न बोलता सगळे बाहेर पडतात- सिगरेट ओढायला.  हल्ली जवळपास सगळीच ऑफिसेस नो स्मोकिंग झालेली आहेत, त्यामुळे सिगरेट साठी  बाहेर जाणे आलेच. चहा झाला, की ह्या स्मोकर्स बरोबर फक्त इतर स्मोकर्सच बाहेर जातात. मी स्वतः सिगरेट ओढत नाही, त्यामूळे मी त्यांच्यात कधीच नसतो.एखाद्याने ड्रिंक्स सोडले किंवा नॉनव्हेज सोडले की मग मात्र त्याचे कट़्ट्यावर येणे कमी होते हे नक्की. अहो फक्त चखणा आणि सोडा पित कोण वेळ घालवेल??

मैत्री फक्त समव्यसनी लोकांशीच जास्त चांगली होते  .सिगरेट, पबिंग, ट्रेकिंग, ब्लॉगिंग अशा अनेक व्यसनांमुळे लोकं एकत्र येतात.होय! ब्लॉगिंग हे पण एक असंच व्यसन आहे .एकदा जडलं की मग सुटणे सहज शक्य नाही . स्वानुभवाचे बोल आहेत हे. एका ब्लॉगरची  दुसऱ्या ब्लॉगर बरोबर मैत्री फार लवकर होते. मग तो जगाच्या दुसऱ्या कोपर्यात असला तरी सुद्धा. मग ब्लॉगर्सचे, ट्रेकर्स चे, खादाडी प्रेमींचे  पण असेच कट़्टे भरतात,  व्हर्च्युअल भेटी मधून सुरु झालेले असे कट़्टे , नंतर कधी  खरोखरच्या भेटी मधे परीवर्तित होतात ते समजतच नाही.

शेवटी एक झालंय. हल्ली हे सगळं कट़्टा कल्चर बरंच कमी झालेले आहे. खरोखरचा नाही , तरी व्हर्च्युअल कट़्टा हा नेहेमीच सुरु असतो. मग तो फेसबुक वर असो की बझ वर असो. आपण शेवटी सोशल आहोतच. आपल्याला एकटेपणा नकोसा होतो. अगदी जुनी  सेकंडहॅंड फियाट जरी  विकत घेतली आणि त्याचं कौतुक करायला मित्र मैत्रिणी, आई वडील असले की कसं भरून पावतो आपण नाही का? वडील गाडीत बसल्यावर, ही माझ्या मुलाची कार म्हणून अभिमानाने दाखवतात तेंव्हा त्यांच्यापेक्षा आपल्यालाच जास्त आनंद होत असतो.

कट्टेकऱ्यांची आणि कट्ट्याची  खरच आवश्यकता असतेच आपल्या आयुष्यात .कौतुक करायला, चिडवायला, तर कधी रागवायला सुद्धा!   कट़्ट्याला काही पर्याय नाही!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , . Bookmark the permalink.

53 Responses to कट्टा..

 1. शब्द न शब्द खरा आहे….
  अगदी “आजचा मित्र कदाचित उद्या एक मोठा शत्रू म्हणूनही समोर उभा राहू शकतो”. हे सुद्धा.

 2. खरच कट़्ट्याला काही पर्याय नाही….
  शाळेतल्या अन कॉलेजातल्या अनेकांना विसरलो होतो पण ऑर्कुटमुळे (फेसबुकच फॅड आताच ) त्यातल्या बरयाचजणाशी परत संपर्क झाला,त्यानंतर अनेकांना प्रत्यक्षही भेटलो…खुपच छान वाटलं त्याना भेटून अनेक जुन्या आठवणी वैगेरे निघाल्या ..मस्तच…ऑर्कुटवरील तुमच्यासारख्या मित्रामुळे ह्या ब्लॉगिंगच्या जगात आलो आणि खूप रमलो….नाहीतर अस कधी लिहू शकलो असतो कि नाही कोणास ठाऊक….
  तरी अगदी तीन चार वर्षा आधीपर्यंत अगदी खास असलेले आम्ही लहानपणापासूनचे सहा मित्र ….नेहमीच अनेक कट्टे,पिकनिक,सिनेमा …वैगेरे गाजवत आलो …पण आता कोणी नोकरीनिमित्त बाहेर तर कोणी संसारात मग्न …कधीतरी भेट होते ‘हायबाय’ होते पण ‘तस ‘ भेटण होतच नाही… त्याबद्दल खूप वाईट वाटते 😦
  पण आता नवीन मिळालेले ब्लॉगमित्र ,ट्रेकमित्र ,बझमित्रहे काही वाईट नाहीत,त्यांच्याबरोबरच्या वर्च्युअल कट्ट्यात ती बात नसली तरी आजच्या धकाधकीच्या जीवनात ते आपल ‘सोशल’ जीवन परिपूर्ण करतात …. 🙂
  खूप आठवणीना उजाळा मिळाला ह्या लेखामुळे धन्स …

  • देवेंद्र
   व्हर्च्युअल कट्ट्यावरून पण जर खरोखरचे रिअलटाईम मधले मित्र मिळत असतील तर काय हरकत आहे? प्रत्येकामधेच एक लेखक दडलेला असतो. फक्त तो योग्य वेळ यावी लागते तो लेखक बाहेर पडायला. माझ्यासाठी ऑर्कुट बंद करणं हे निमित्य झालं!

 3. kranti says:

  खास लेख!

 4. जबरदस्त आणि एकदम मनातलं…!!

  • गेला एक महिना झाला, बझ, फेसबुक सगळी कडला वावर अगदी नगण्यच झालेला आहे. कामाच्या व्यापात वेळ काढता आला नाही, आणि मग हा लेख लिहिला .

 5. aruna says:

  अगदी खरे लिहिले आहे. सगळ्यानांच कुठल न कुठला तरी कट्टा लागतो, ज्याला तो केव्हा ना केव्हा मिळतो तो भाग्यावान. पण आता नेटमुळे छान सोय झाली आहे. हा पण एक कट्टाच की!

  • अरुणा
   नेटमुळे थोडा एकटेपणा कमी होतो, पण तरीही खरोखरच्या कट्ट्याची मजा वेगळीच.

 6. जबरी… माझं अगदी इंजिनिरिंग पर्यंतचे शिक्षण रत्नागिरीलाच झाल्याने कॉलेज जीवनात कधी कट्टा वैगरे फार अनुभवता आला नाही पण रत्नागिरी सोडल्यावर मात्र जिथे जिथे राहिलो तिथे ओळखी आणि मग कट्टे जमले. जास्त आठवणी PGमध्ये रहायचो तिथल्या आहेत. चार वर्षे धमाल केली. भटकलो. शुक्रवार आणि शनिवार रात्री २-३ वाजेपर्यंत गप्पा टप्पा सुरु असायच्या. नाना प्रकारची व्यक्तीमत्व भेटली. मग हळूहळू सगळ्यांची लग्ने झाली. वर्षभरापूर्वी आमचा पण नंबर लागला. आत्ता दोन महिन्यातून एका एका मित्राकडे जेवण्याचा कार्यक्रम असतो. खरा कट्टा आत्ता केवळ बझ्झ वर अनुभवायला मिळतो अगदी २४x७.

  • सिद्धार्थ
   कट्टा हा फक्त बझवरच अनुभवायला मिळतो +११११
   मित्र बरेच दूर गेलेले आहेत, स्वतःच्याच विश्वात रममाण झालेले. त्यामुळे फक्त शनीवार, रवीवार, मुलांना वेळ असेल तर कुठल्यातरी आते, मामे भावाकडे चक्कर असते. बाकी कट्टा वगैरे बंदच झालाय.

 7. pramod mamam says:

  Mahendra Kaka
  Namskar,

  Agdi mazya manatale lihile je je mee enjoy kele tech apan lihile SALUTE BOSS, 40 varsha agodar Punya madhe Kasba pethet Bharpoor Katte Hote, Amchya wadyachya baher katyawar amcha group roj ratri basoon 1 te 2 waje paryant gappa thokaycho sagalya batmya , nako aslele dnyan mofat milayache , group madhe mawali, garib , nokariwale , paper taknare, bhaji viknare, rikshaw chalwanare ase anek mitra hote tya mule tyanche vividh anubhav , life style bhaghoon aaj 58 warsha nantar apan kon ahot & kothe ahot mala kalale. Ata owner ship zalaya mule katte kadhhon thakale aahet pan tari pan amhi NAVA POOL chya kattya war Rawiwari Bheto. Thanks Kaka.
  Mararthi madhe kase type karata yete te kalwa.
  Pramod Mama

  • प्रमोदमामा
   गेले ते दिवस! आता उरल्या त्या फक्त आठवणी. अजूनही कॉम्प्लेक्स मधे खाली टेनिस कोर्ट वर मुलं एकत्र बसतात.. कट्टा आहेच, थोडं स्वरूप बदललंय. थोडं व्हर्च्युअल झालंय..
   मराठी टाईप करायला मी बरहा वापरतो..http://baraha.com

 8. आलसस्य कुतो विद्या अविद्यस्य कुत: धनम
  अधनस्य कुत: मित्रम अमित्रस्य कुत: सुखम॥

 9. nitin godambe says:

  Namskar mahendra kaka,
  Mi Nitin Godambe, tumchya kay vatel te blogcha niyamit vachak ahe javalpas tumche sarvach lekh vachun hot ahe pan kadhi abhipray nodvala nahi.
  tumachy lekhan kaushlyat ek veglich jadu ahe ki vachkala ti jagevar khilvun thevate
  ani tumachya blog mule mala tari baherchya jaga baddal khoop kahi mahit zhal ahe tya baddal man purvak dhanyavad.
  ani aajacha lekha sudha ekdam zhakas
  tumacha ek pankha
  Nitin Godambe

  • नितीन
   ब्लॉग वर स्वागत. सगळे लेख वाचले म्हणून आवर्जून सांगितल्याबद्दल आभार. तुमच्या प्रतिक्रिया खरंच खूप महत्त्वाच्या असतात, लेखनासाठी उत्साहित करणाऱ्या!

 10. mau says:

  sundar lekh !!!

 11. tejali says:

  kaka…ekadam bhari..ani manapasun patal suddha..1 sangu ka..kharach…khara kura khatta sampla tari online katta chaluch rahato…mag te gtalk aso, yahoo..orku facebook..kinwa agdi nawin mhanje..G+..:)..n ajun 1 fayayada ya online katyacha mhanje welech bandhan nahich..koni na koni kayam padik astoch..!! jay ho katta!!

  • पण एक आहे, लग्न होई पर्यंत तरी कट्टा सुरु राहू शकतोच. सगळे लिमिटेशन्स येतात ते लग्नानंतर. इतर जबाबदाऱ्या येतात, आणि मित्र, कट्टा बाजूला पडतो. शनिवार- रविवारी तर घरची कामं इतकी असतात, की इतर कुठे जाणं इच्छा असलं तरी शक्यच होत नाही. मग उरतो तो फक्त व्हर्चुअल कट्टा..

 12. chetan says:

  एकदम जबरदस्त काका,
  आमचा पण एक कट्टा होता नाव होत “आवली कट्टा” आता सगळ्यांची लग्न झाल्या पासून कट्टा एकदम उदास झाला.
  माझ्या कट्ट्यावरच्या सर्व मित्रांना मैत्री दिनाच्या शुभेचा!!!!!

 13. swapnali says:

  Khup mast lekh aahe,100% patla,Varhadi leheja pan khup chan vatle

  • स्वप्नाली
   ब्लॉग वर स्वागत.. मी आहेच वऱ्हाडातला. सगळं लहानपण तिकडेच गेलं. 🙂 प्रतिक्रियेसाठी आभार..

 14. Manojav Karambelkar says:

  Mitra,
  ekdam masta lihil aahes… aasa vatal ki puhana ekda shala,collage la short trip marli ki kay…
  patra lihay la fakta shalet 8 markeana aasaych mhanun lihil… & net chya jagat fakta aaleli e-mails pudhye (Fw:) keli… pan kahi kadhyi lihili nahit ….. ( officical mails sodun ha… ) nahitar kay aaj kal kadhi kon kay mhanel hacha nep pan nahi….
  pan vata ki “kataa” part jamava …. part te divas yavet…. karan social sites khup aahet pan kiti jan bhetata & barech jana tar online rahun suddhya invisable mode var aasata …. ka tar nako asalea koni tari online dista mhanun….. mag kay maja tyat…. pratyasha bhetun & bolun jo anand milta ko aajkal net var nahi he marta khara… jar kadhi kharac kataa baghyacha aasel tar just mail kara…

  Note: jasa tumhi lihil aaheta tasa kataa aamhi real life mahye ( office sutlyavar 1 te 1/2 hr.) ekatr aasato pan tyat kadi vay aad yet nahi…. from 28to 65 yrs cha 10 te 20 ( jasta pan aastil ) aasa kataa aahe aamcha… just enjoy karayla bhet dya….. tar tumhala kalel ki tuhmi konta blog cha photo tar nahi na shabdat uutarvlat………

  nice one…..

  • मनोज
   ब्लॉग वर स्वागत.. कट्टा सुटला, पण हल्ली बझ कट्टा, फेसबुक वगैरे सुरु आहे. सुरुवातीला व्हर्च्युअल असलेले रिलेशन्स आता खरोखरच्या मैत्री मधे प्रस्थापित झाले आहेत.

   तुम्ही जे म्हणता, की वय वगैरे आड येत नाही हे खरं आहे. आम्ही ब्लॉगर्स पण मुंबईला बरेचदा भेटतो. वय वर्षे १६ वर्षाची मै्थिली ते ते ८८ वर्षाचे प्रधान काका सगळे लोकं एकत्र येतात. नेहेमी शक्य होत नाही, पण एखादं प्रदर्शन वगैरे असलं की आम्ही सगळे एकदम तिकडे जातो . पण नेहेमी हे शक्य होत नाही.
   कट्ट्याची कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न् आहे हा .
   आमच्या वेळ चा कट्टा अगदी वर दिलेल्या प्रमाणे असायचा. लहान पणी शाखेत जायचो , दररोज न चुकता.– त्याला कट्टा म्हणता येत नाही, पण तसाच प्रकार..

 15. मला माझ्या शाळेतल्या अन कॉलेजच्या मित्रांची नावं आठवतात.. आणि ते माझे अजुनही मित्र आहेत 🙂
  कट्टा मिसायचो पण ब्लॉग अन बझचे व्यसन लागल्यावर आता रोजंच कट्टा असतो 🙂

  • आनंद
   नशिबवान आहात. माझे तर बहुतेक मित्र विसरलो मी. तसे काही माहिती आहेत, आणि आता नुकतेच भेटले सुद्धा.. फेसबुक मुळे.. 🙂

 16. Agdi khar ahe…
  Sadhya aamche Katta days suru ahet….
  Enjoyind it to d fullest….

 17. Amit Mohod says:

  काका, खरच… आयुष्यातल्या पर्त्येक टप्प्या वर वेग-वेगळ्या कट्ट्यांचे अनुभव छानच रंगवलेत…
  BTW, जर तुम्ही नागपूरच्या शंकर नगर च्या कट्ट्या बद्दल बोलत असाल, तर टपरी कट्ट्याचे आम्ही पण सभासद होतो बर का.. 🙂

  • अमित
   होय, नागपूरचाच शंकर नगरचा म्हणतोय मी.तिथे, आणि नंतर मग लक्ष्मीनगरच्या चौकात पण बरेचदा असायचो मी.

 18. Amit Mohod says:

  काल परवाच मेल वर ही कविता कुणी तरी पाठवली.. मूळ लेखक माहित नाहीं.. पण या लेखाशी संबंधितच आहे म्हणून पोस्ट करतोय..
  मित्रांचे कट्टे आजकाल ओसंच पडतात..
  कुणी ‘orkut’ वर तर कुणी ‘Facebook’ वर जमतात..

  …प्रत्यक्ष भेटीत सगळेच बुचकळयात पडतात..
  कारण सगळे विषय ‘chat’ वरच संपलेले असतात..

  मग ‘chat’ वर भेटूच ” याचं Promise होतं..
  आणि संभाषणातून ‘Sign out’ के लं जातं. ..

  ‘लाल’ ‘हिरव्या ‘ दिव्यांच्या गर्दित मग हरवायला होतं…
  घट्ट पकडलेलया हातांनाही सैल सुटायला होतं..

  ‘Available’ आणि ‘Busy’ मध्ये
  प्रतेकाचा status घुटमळत राहतो…
  आपणहून add केलेल्या मित्रपासून लापन्यकारिता
  ‘Invisible’चा आडोसा घेतला जातो..

  ताप आल्याच आजकाल आईच्या आधी ‘Facebook’ ला कळत..
  औषध पेक्षा ‘Take Care’ च्या डोसेजनीच तापालाही पळायला होतं..

  मनातलं सगळं ‘Facebook’ वर ओकायची
  मैत्रीत गरजच का असावी?
  नात्यांना धरून ठेवायला
  ‘Net”ची जाळीच का असावी?

  कधीतरी वाटतं पुन्हा कट्ट्यावर जमावं..
  ‘chat’ ला गप्पानी आणि ‘Smile’ ना हस्यानी replace करावं..

  शब्दापेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं
  मैतीचं खरं समाधान खंद्यावरच्या हातात असतं….

  चला तर पूर्वी चे दिवस पुन्हा अनुभावुया ,
  मैत्रीला technology पासून जपून ठेवुया ……

  • ही कविता वाचूनच तर लेख लिहावासा वाटला. बरेच दिवसापूर्वी मेल मधे आली होती, आणि हा विषय सुचला लिहायला.

 19. महेश कुलकर्णी says:

  जबरदस्त सुंदर,छान, आवडला,,खर आहे,चार दिवस मित्राचे ,(चौक नाका किंवा कट्टाआठवतो)

 20. Shivaji says:

  june divas aatavale,

 21. खरच, ह्या कट्टयाची बातच न्यारी. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपले कट्टे बदलत असतात. वाचुन माठयाची पायरी, शैलेन्द्र नगरचा थल्ला…… सगळे जुने कट्टे आठवले. खुपच छान!

 22. अप्रतिम शब्दांकन काका! अगदी शब्द न शब्द खरा आहे! मी पण लग्नापूर्वी असाच कट्ट्यावर पडीक असायचो. आता बहुतेक मित्रांची लग्न झालीत आणि कट्ट्यावर येणं कमी कमी होत गेलं. अजूनही कट्ट्याच्या समोरुन गेलं आणि तिथे ओळखीचं कुणीच दिसलं नाही की कसलीतरी एक हुरहुर लागते. आपण काहीतरी खूप महत्त्वाचं मिस करतोय हे जाणवून मन उदास उदास होत जातं. कुणाचा नविन जॉब, ठरलेलं लग्न असे आनंदाचे क्षण आणि कुणाची सुटलेली नोकरी, त्याची काढलेली समजूत याच कट्ट्याच्या साक्षीने काढलेली असते. आज आम्ही कुणीच तिथे नसलो तरी कट्टा अजूनही तसाच आहे. असं वाटतं कधीकधी की सगळ्यांना ओरडून ओरडून तिथे बोलवावं आणि मनसोक्त गोंधळ घालावा! खरंच, ऑनलाईन कट्ट्यांमधे ती मजाच नाहीये जी तिथे अनुभवली. कट्टा म्हणजे एक शाळा होती जिने आम्हाला जगणं शिकवलं. जे शिक्षण जगाच्या कुठल्याही शाळेत मिळत नाही, जगात टिकून राहण्याचं, ते आम्हाला कट्ट्याने दिलं.
  तुमच्या लेखाने सगळ्या आठवणी जाग्या झाल्या! मन:पूर्वक धन्यवाद!

  • आदित्य
   अजूनही कधी त्या कट्ट्याकडे लक्ष गेलं, आणि तिथे काही वेगळे चेहेरे दिसले की आपले दिवस आठवतात. सुंदर प्रतिक्रियेसाठी आभार.. 🙂

 23. bolMJ says:

  Nehmisarkha ha lekh pan mastach ahe.. 🙂
  Mahendra dada.. friendship day var pan kahitari leha na..

 24. Gurunath says:

  लय लय भारी लेख!!!!, हसत हसत कधी अंतर्मुख झालो कळले पण नाही हो!!!!!!!!…… ब्याचलर्स चे वर्णन स्वतःला शोधावे असले नमरी आहे राव!!!!!……… मी स्वतः आजकाल तेच करतो आहे, मैत्री आवडींनुसार होते!!!! सो ट्रु!!!!…. आधी आमचे पण खुप खुप कट्टॆ होते!!!! सर्वात भारी म्हणजे पि.डी.के.व्ही चे ग्राऊंड!!!!! तिकडे आकाशाला लाखो भोकं पडल्यागत जेव्हा तारे दिसत अश्यावेळी ५ बियर ५ मित्र अन ५ कोटी स्वप्नं घेऊन बसायचो आम्ही!!!!…. , शहीद होणे पण झाले एखाद दोन मित्रांचे!!!!!….. स्मॄती चाळवतच वाचणे झाले हा लेख!!!! नेहमी प्रमाणे मजा आली!!!!!!!

 25. pranjal kelkar says:

  मस्त लेख आहे. मी पण यांत्रिकी अभियांत्रिकी केला आहे.
  diploma आणि इंजिनीरिंग मेकानिकल मध्ये. खूप मित्र आहेत.
  इंजिनीरिंग बाहेर केल्यामुळे बारा गावाचे मित्र भरपूर मज्जा तास न तास गप्पा चा फड जमायचा साथीला सिगरेटी पण.
  वेळ कसा जायचा तेच कळायचा नाही. सबमिशन च्या वेळेस तर अक्षरशः पावनखिंड लढवल्यासारखी रात्री जागवल्या आहेत.
  आमचा कट्टा म्हणजे चहा काम मिसळ पाव (पौष्टिक खाद्य) ची टपरी. समोरच आमचं वानखेडे आणि पाच मिनिटावर लॉर्डस.
  क्रिकेट म्हणजे प्राणाहून प्रिय. २००७ च्या world cup ला तर परीक्षा सुरु असताना देखील म्याचेस बघितल्या आहेत.
  आजून तरी एकत्र भेटतोय पण कट्टा सुटलाय. पुण्यात परत आलोय आता पुण्यात भेटी होतात पण कट्टा नाही आणि क्रिकेट नाही आणि गप्पा देखील तुटक तुटक.
  आता डिसेंबर मध्ये पुह्ना एकदा कट्ट्यावर भेटायचा ठरवलंय बघू काय होता ते.

 26. चांगल्या लेखावर प्रतिक्रिया द्यायला पुन्हा एकदा उशीर करण्याची चूक करतोय.. पण ब्लॉगमित्र/बझ कट्टेकरी असल्याने समजून घ्यालच :))

  खरंच बझकट्ट्याने पुन्हा एकदा ते शाळा/कॉलेजमधले दिवस नव्याने दाखवले.. धम्माल नुसती :))

  • बझ कट्ट्यावरची धमाल तर जुने दिवस आठवण करुन देते. बझ कट्टा रॉक्स! पण हल्ली सारखा प्रवास सुरु असल्याने दिवसभर लॉग इन करताच येत नाही बझ कट्ट्यावर.. 🙂

 27. कट्टेकऱ्यांची आणि कट्ट्याची खरच आवश्यकता असतेच आपल्या आयुष्यात .कौतुक करायला, चिडवायला, तर कधी रागवायला सुद्धा! कट़्ट्याला काही पर्याय नाही!

  पर्फेक्ट बॉस. आपला कट्टा राहीलाय अधुरा गेल्यावेळी आता आले की पुरा करायचा रे. 🙂 बाकी बझकट्टा भारीच चहकत असतो की… :D:D

 28. aniket says:

  महेंद्र … काका मामा काही लिहित नाही कारण मला माहित नाही तुमचे वय काय आहे. मी तुमचे ब्लॉग्स नियमित वाचतो … मस्त असतात … कट्टा हा ब्लॉग पण खुप आवडला. अजूनही कट्टे आहेत … आजकालच्या मुलांना हि कट्टा आवडतो … पुण्यात दुर्गा कॉफ्फी, वैशाली, रुपाली, डेक्कन, कॉल्लेगेस मध्ये कट्टे चालू आहेत …

  मी पण माझा कट्टा खूप मिस करतो .. सगळे जण आता गायब झाले आहेत. लग्नानंतर खूप लोक गायबच झाले. पण अधून मधून आम्ही भेटतो. मजा येते. माझ्या मते ते एक वय असते प्रत्येकाच्या आयुष्यात कट्टा जमवायचे. एकदा संसार चालू झाला कि विसरले जाते. पण माझ्या मते वेगळे कट्टे चालू होतात. बायका मुलांचे. त्यात हि वेगळीच मजा असते. कुटुंब कट्टा म्हणा त्याला. आपल्या नातेवाईकां बरोबर हि तुम्ही कट्टा जमवू शकता तुम्ही. चुलत मावस भवन बरोबर पण. नशिबाने माझे असे बरेच कट्टे आहेत. त्यात आम्ही खूप धमाल करतो. तो मग घरी असो किंवा बाहेर. कधी ट्रीप ला. मस्त मजा येते. त्याने माणूस एकदम ताजा तवाना होतो. नेट वरच्या कट्ट्याला ती मजा अजिबात नाही. हे माझे मत आहे, प्रत्येकाची आवड वेगळी असू शकते.

  पुन्हा एकदा धन्यवाद. असेच किहीत राहा.
  अनिकेत

  • अनिकेत
   ब्लॉग वर स्वागत.. कट्ट्यांची मजा ती वेगळी – अजूनही मिस करतो . एखाद्या वेळेस कट्टेकऱ्यांना बोलवायचे म्हंटले तर काही तरी कारण निघतं आणि सगळे मित्र काही एकदम येऊ शकत नाहीत. पण जेंव्हा कधी भेटतो, तेंव्हा नुसती धमाल असते, वय, हुद्दा वगैरे सगळं काही विसरून.

 29. वेदांत says:

  मैत्री फक्त समव्यसनी लोकांशीच जास्त चांगली होते .सिगरेट, पबिंग, ट्रेकिंग, ब्लॉगिंग अशा अनेक व्यसनांमुळे लोकं एकत्र येतात.

  एकदम बरोबर! तुमचा लेख वाचला आणि माझ्या कॉलेजचे दिवस आठवले. तेव्हा चहाच्या कटिंग चे पैसे नसायचे आणि आज पैसे आहेत तर सगळ्याना एकत्र जमण्यास वेळ मिळत नाही.

  • वेदांत
   अगदॊ अगदी… ते दिवस कसे मस्त असायचे नां? पैसा कमी पण समाधान, जास्त!! खरंच की, यावर एक मस्त लेख होऊ शकेल. सुख , समाधान आणि आनंद…
   मनःपूर्वक आभार.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s