मटाबाबा डॉट कॉम

ऑफिसमधे लंच टाइम मधे मटा उघडून बसलो होतो. तेवढ्यात एक मित्र आला, आणि कॉंप्युटरमधे डोकावून म्हणाला, काय रे मटा बाबा डॉट कॉम वाचतोस काय? आणि  मला हसू आवरणं शक्य झालं नाही. हे मटाबाबा  ऐकल्यावर.   देशीबाबा  च्या रांगेत नेऊन बसवलं होतं त्याने मटाला.

आजकाल ह्या वर्तमान पत्रांची पातळी इतकी    खालावली आहे की सगळ्यांसमोर हा पेपर नेट वर उघडून वाचणे पण कठीण झाले आहे . एके काळी गोविंदराव तळवलकर,  कुसुमाग्रज, दुर्गा भागवत, पुलं देशपांडे सारख्या  मातब्बर लेखकांच्या लेखांनी नटलेला दर्जेदार पेपर   होता मटा. आज त्याची जी विपन्नावस्था झालेली आहे , ती बघून वाईट वाटते.  पेपरची अशी दुर्दशा होण्याचे कारण काय ते काही समजत नाही. चांगले लेखक नाहीत?  की अजून  दुसरं काही??

टीआरपी साठी ज्या प्रमाणे इंडिया टीव्हीवर बातम्या दाखवल्या जातात , त्याच प्रमाणे पेपर मधे पण टीआरपी साठी काय वाटेल ते छापण्याची पद्धत सुरु झाली  आहे.  यलो जर्नॅलिझम म्हंटलं तरी  हरकत नाही याला.  सेक्स, नग्न स्त्रिया, असं काहीतरी छापलं  की लोकं धावत येतात पहायला. पेज हिट्स वाढले की झाले. चांगलं लिहून  पेज हिट्स  वाढवण्यापेक्षा हे  सोपं अहे.बस्स!!

ऑन लाइन पेपर उघडल्यावर पेपर वाचता वाचता   पेपरवर असलेल्या बऱ्याच लिंक्स पैकी एखाद्या लिंक वर क्लिक केल्यावर  जर डोळ्यासमोर एकदम नग्न स्त्री चा फोटो आला, आणि तेवढ्यात शेजारी कोणी आलं   तर तुम्ही काय कराल?   एकदा मी लंच टाइम मधे  मटा वाचत होतो, बहुतेक कुठेतरी क्लिक झाले असावे, आणि समोर एकदम एक स्त्रीचा अर्धनग्न फोटो आला. शेजारच्या क्युबिकल मधल्याने पाहिले तर नाही? म्हणून एकदम मागे वळून पाहिले. कसं तरी करून पेपर चे ते पेज बंद केले. तो पेपर होता अर्थात मटाबाबा.  तो फोटो जेंव्हा एकदम समोर आला तेंव्हा   बसलेल्या  धक्क्यातून  मी लवकर सावरू शकलो  नाही.

एखाद्या विवाहित   स्त्रीने योनी शुचिता सांभाळावी अशी अपेक्षा असते. वेश्ये मधे आणि घरंदाज स्त्री मधे फक्त तेवढाच फरक असतो.  त्याच प्रमाणे पेपरने पण एक स्टॅंडर्ड मेंटेन करावं अशी अपेक्षा असते.  काय छापावे काय छापू नये यावर स्वतःचे स्वतःच नियंत्रण ठेवायला हवे .  नाहीतर मस्तरामच्या पुस्तका मधे आणि पेपर मधे काय फरक शिल्लक राहील? पेपरवर हल्ली सेन्सॉरशिप नाही.  पण आजकाल पेपर वाल्यांनी  जर  सामाजिक बांधिलकीची जाणीव सोडून, कंबरेचे गुंडाळून डोक्याला बांधलेले  पाहिले  की मग मात्र सेन्सॉरशिपची खरंच  आवश्यकता आहे असे वाटायला लागते.

महाराष्ट्र टाइम्स  बद्दल  एकेकाळी एकप्रकारचा आदर होता. मी लहान असतांना नागपूरला मटा दुसऱ्या दिवशी मिळायचा, तरीही  आमच्या घरी घेतला जायचा कारण उच्च दर्जाचे लेख. उशीरा मिळाले तरी पण वडिलांना खूप आवडायचा. तसं म्हटलं तर मटाचं आणि माझं वय एकच! अगदी लहानपणापासून हा पेपर मी बघत आलो आहे. अगदी लहान असतांना पासून आयफल टॉवर वाचायला आवडायचे.   एकेकाळच्या इतक्या चांगल्या पेपरची सध्या  जी दयनीय   अवस्था झालेली आहे ती पाहून वाईट वाटतं.   वाचक मिळावे म्हणून चांगले वैचारिक लेख लिहण्यापेक्षा चक्क    पोर्नोग्राफी   आधार घ्यावा लागतो या पेपरला, ही कल्पनाच सहन होत नाही.

पेपर हा घरातल्या सगळ्यांनी वाचायचा असतो.  घरच्या कॉम्प्युटर वर मराठी पेपर वाचणारी   मुलं आहेत. मटा ची ऑन लाइन एडीशन म्हणजे एखाद्या पोर्नोग्राफी साईटला लाजवेल अशी आहे. काय छापावं- आणि काय नाही ,नग्नता किती प्रमाणात दाखवावी,याचा विधिनिषेध न बाळगता, चीप, व्हल्गर, आणि सेक्स ने परिपूर्ण असलेले काही फोटो तरी  पेज हिट्स वाढवायला छापायचे – असे प्रकार मटा ने सुरु केलेले आहेत.

२१ तारखेच्या मटा मधे सिलेब्रेशनच्या   नावाखाली जे काही फोटो मटा ने दिलेले आहेत ते सगळ्यांसमोर पहाण्याच्या लायकीचे नाहीत.   फोटोमधे काय दाखवले आहे हे सुद्धा इथे लिहीण्याची मला लाज वाटते, त्या साठी ही लिंक पहा असे फोटो छापण्यासाठी निर्लज्ज पणा  लागतो . इतका निर्लज्ज पणा अंगी मुरवायला पण खरंच गेंड्याची कातडी लागते,  वर सिलेब्रे्शन मधे दिलेल्या फोटो मुळेच हा लेख  लिहायला घेतला.   माझ्या तर्फे नो कॉमेंट्स!!

एका लेडी कॉन्स्टेबलच्या पार्श्वभागाचे छायाचित्र या पेपरने वेब मसाला मधे छापले होते.

बरं हे झालं ते  फोटो बद्दल. मटा वरचे लेख आजकाल कसे असतात हे सांगायची गरज नाही. अशुद्ध भाषा, जागोजागी इंग्रजी शब्दांचा केलेला विनाकारण वापर, वगैरे वगैरे.. शुद्धलेखन कशाला म्हणतात हे बहुतेक विसरले असावे मटा वाले. मुद्रितशोधन पण केले जाते की नाही याची  पण मला शंकाच आहे .

भाषा इतकी  अशुद्ध / चुकीची वापरलेली असते, की वाचतांना भातामधे खडे लागावे तसे ते   शब्द  वाचून अडखळायला होतं .  थोडी फार चूक एखाद्या ब्लॉगरची झाली तर समजल्या जाऊ  शकते, पण चक्क राष्ट्रीय दर्जाच्या  पेपर मधे पण चुका अजिबात क्षम्य नाहीत.

चांगले लेख न लिहिणे, चांगली भाषा “ न वापरणे “ , सेक्सी चित्र देणं, झणझणीत वेब मसाला   म्हणून पोर्नोग्राफी च्याही थोबाडीत मारेल असे फोटो लेख, फोटो छापणं, हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, आणि आम्ही असेच  करणार,  हे  यांचे ( मटाचे) ब्रिद  आहे की काय असा संशय येतोय हल्ली.

आमची निवड मधे( लिंक इथे आहे) हे लोकं अक्षरशः सिंगल/डबल एक्स रेटींगचे फोटो देतात. आणि वर शीर्षक काय तर म्हणे “आमची निवड’- वाह! क्या बात है.कपाळावर हात मारून घ्यावासा वाटतो. पेपर हा   १३ वर्षाचा मुलगा ते ८० वर्षाचे आजोबा कोणीही वाचतो-.  त्या मुळे जे काही असेल ते सगळ्यांना पहाता येण्यासारखे,  वाचता येण्यासारखे  असावे असे वाटते. ज्याला पोर्नोग्राफी पहायची आहे त्यांच्यासाठी अनेक साईट्स आहेत नेट वर.

काही दिवसा पूर्वी  हेरंब ओक ने  एक बझ सुरु केला  होता. त्यावर दररोजच्या मटा मधल्या चुका लिहिल्या जात होत्या.  त्या चुकांच्या बद्दल   इथे लिहायला जागा पण पुरणार नाही, म्हणून इथे त्या बझची लिंक देतो आहे. हा  बझ नक्की पहा   . बझ पहाण्यासाठी तुम्हाला फक्त जी मेल वर लॉग इन करावे लागेल, आणि नंतर मग लिंक उघडेल. एखाद्या राष्ट्रिय पातळीवरच्या एखाद्या वृत्तपत्राला स्वतःच्या लिखाणाच्या क्वॉलिटी बद्दल काही खात्री नसल्याने   पेज हिट्स साठी अशा प्रकारचे फोटॊ पोस्ट करावे लागत असावे, या पेक्षा दुर्दैवाची गोष्ट काय असेल ?

’मटाबाबा डॉट कॉम’  चा पुन्हा लवकरच ’मटा, पत्र नव्हे मित्र ’व्हावा या अपेक्षेत  असलेला एक मटा वाचक………

सकाळ पण काही या बाबतीत मागे नाही. तुम्हाला स्वतःचा अपमान करून घ्यायचा आहे का? मग सकाळमधे लेख लिहा.

नेट वरच्या सकाळ मधे आलेल्या लेखावरच्या कॉमेंट्स लेखकाचा पुरेपूर अपमान करणाऱ्या असतात. कॉमेंट्स साठी पण मॉडरेशन आहे, तरीही मुद्दाम मॉडरेट करुन  लेखकाचा अपमान करणाऱ्या कॉमेंट्स पब्लिश करण्यामधे सकाळचा कोणीच हात धरू शकत नाही.

मी मान्य करतो, की त्या कॉमेंट्स बरेचदा लेखापेक्षा पण जास्त करमणूक करतात. मला पण वाचायला आवडतात. पण  एखाद्याने आपला लेख सकाळ कडे छापायला पाठवला की त्याचा अर्थ हा नाही की लेखकाने सकाळच्या साईट वर स्वतःचा अपमान करून घेण्यासाठी लेख छापण्यासाठी सकाळला परवानगी दिलेली आहे.

आजकाल तर सकाळच्या प्रत्येकच पानावर ऍड्स लावलेल्या आहेत. कुठेही क्लिक केले की बाजूला जाहिरात उघडते. पैसे कमावण्यासाठी इतक्या लो लेव्हलला जाण्याची खरंच काही गरज नाही.प्राजक्ता पटवर्धनची एक सुंदर कविता पण या सकाळने सोडली नाही. त्यावर पण एकफालतू कॉमेंट दिलीच. अशा कॉमेंट्स साठी सोशल साईट्स आहेत. सकाळने ती कॉमेंट पब्लिश केली नसती तरीही चालले असते.पण कॉंट्रोव्हर्सी सुरु करून पेज हिट्स वाढवणे  हा मुख्य  उद्देश असतो.

मुक्तपीठ हे तर सर्वसामान्य लोकांचे लेख छापण्यासाठी सुरु केले होते. पण हल्ली काय होतं मुक्तपीठ?? मुपी वर लेख लिहिणारे सर्वसामान्य लोकं असतात, कधी पेपर मधे नांव वगैरे छापून न आलेले- आणि  लिहिण्याची सवय नसलेले, नॉन प्रोफेशनल रायटर्स. एखाद्या वेळेस पेपर मधे नांव आलं, की उगाच आनंद होतो.   आपण खूप काही मिळवलं असं वाटतं. एखादा लेख आला की ताबडतोब त्या लेखावर कॉमेंट्स चा मारा सुरु होतो.लेखकाने जर पुन्हा येऊन कॉमेंट्स पाहिल्या , तर त्याला इतकं वाईट वाटावं की आपण झक मारली आणि सकाळला लेख छापायची परवानगी दिली.मुक्तपीठ हे  नवोदिताना संधी देण्यासाठी नाही तर त्यांचा अपमान करण्यासाठी सुरु केले आहे का हा प्रश्न नेहेमीच पडतो मला!

इतरही पेपर मधे अशा प्रकारचे लेख असतातच, पण त्यावर अशा सकाळ प्रमाणे अपमान करणाऱ्या  कॉमेंट्स पब्लिश  करून लेखकाचा अपमान केला जात नाही.

हे असे चीप प्रकार सकाळ मधे नेहेमीच सुरु असतात. लेखकाची हुर्यो उडवा, अपमान करा, कशाही कॉमेंट्स पब्लिश करा,म्हणजे लोकं पुन्हा पुन्हा त्या कॉमेंट्स   वाचायला येतात . सकाळचा संपादकीय विभाग पण मुद्दाम  अशा कॉमेंट्स अप्रुव्ह करतो यावरून त्यांची पेज हिट्स वाढवायची ही स्ट्रॅटेजी आहे हे लक्षात येते. कॉमेंट मॉडरेशन एनेबल केलेले आहे, प्रत्येक कॉमेंट नीट तपासून मग नंतरच प्रसिद्ध  केली जाते.  मला वाटत की कॉमॆंट लेखकाची अपमान करणारी असेल तरच फक्त प्रसिद्ध केली जावी असा नियम आहे .सगळा संपादकीय विभागच या अशा खेळात मग्न आहे. टी आर पी , पेज हीट्स वाढवण्यासाठी अगदी  मुख्य बातम्यांवर पण अशाच चीप कॉमेंट्स प्रसिद्ध केल्या जातात.

सकाळची ही  मनोवृत्ती बदलली पाहिजे नाहीतर एक चीप थर्ड  रेट पेपर पेक्षा जास्त काही किम्मत रहाणार नाही या पेपरला – कमीत कमी माझ्या नजरेत तरी.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मराठी, सामाजिक and tagged , , . Bookmark the permalink.

106 Responses to मटाबाबा डॉट कॉम

 1. prasad says:

  महेंद्रजी,
  तुमचा लेख मनापासून आवडला. म. टा. Times of India चे मॉडेल वापरत आहे.
  तुमच्या लेखाशी संदर्भात एक अजून असा लेख आहे. त्यातला pie-chart नक्की बघा!
  http://www.fakingnews.com/2010/10/times-of-india-to-acquire-domain-rights-of-dead-desibaba-com/
  सकाळ मध्ये म. टा च्या तुलनेत कमी फालतूगिरी चालते असे मला वाटते.
  मुक्तपीठ सोडून इतर बातम्या ( जरी राष्ट्रवादी च्या असल्यातरी )तरी आपण वाचू शकतो. अजून अश्लीलतेच्या पातळीवर जायला त्यांना वेळ आहे.
  मुक्तपीठ वाचकांना चांगलेच अमुक्त व्ह्यायला संधी देते ! 🙂

  • प्रसाद

   धन्यवाद.. काय योगायोग आहे? आजच नेमका ह्याच विषयावर फेकिंग न्युज मधे पण आलाय , अर्थात तुमची लींक पाहिल्यावर समजलं. तो पाय चार्ट मस्त आहे.फेकिंग न्युज खरंच एक मस्त पोर्टल आहे..
   .
   मुक्तपीठ लेखकाला नाही तर वाचकांना अमुक्त होण्याची ्संधी देते +१ बरोबर आहे 🙂

  • aruna says:

   pan sakalmadhe vachanya sarakhe kahi nasatech muli!

 2. heramboak says:

  खरंय.. माझ्या मते जगातला सगळ्यात दळभद्री पेपर म्हणजे मटा.. काहीही अक्षरशः काहीही छापत असतात. मागेच यासंदर्भात मटाच्या व्यवस्थापनाला खरमरीत पत्र लिहिलं होतं. अर्थात अशी कित्येक पत्र आली असतील म्हणा त्यांना. पण झोपेचं सोंग घेतलेल्याला कोण उठवणार?

  आणि सकाळच्या विक्षिप्त मनोवृत्तीची तर भयंकर चीड येते. मुक्तपीठ हा प्रकार म्हणजे वर्तमानपत्रांच्या इतिहासातला सगळ्यात लाजीरवाणा प्रकार म्हटला पाहिजे !!

  • हेरंब
   ते पत्र मी वाचले होते. पत्राचे उत्तर दिले नसेल त्यांनी. निर्लज्ज पणा अंगी बाळगला की असे ” पत्राचे ” काटे बोचत नाहीत अंगाला .आजकाल मटा ची पातळी दिवसेंदिवस खालावतच चालली आहे. पण कुठे तरी थांबायला हवे हे. आता वर दिलेले ते सिलेब्रेशन लिंक मधले फोटो तर चक्क आवरा कॅटॅगरी मधले आहेत.

 3. महेन्द्रजी नमस्कार,
  अतिशय परखडपणाने, म.टा.वाचणा-या प्रत्येकाच्या मनातील भावना आपण मांडल्या त्याबद्द्ल आपले मनापासुन
  धन्यवाद.

 4. Gurunath says:

  बरेच दिवसात मटा वाचला नव्हता, आता वाटते बरे झाले नाही वाचला तेच!!!!!…. पुणे म.टा पण असलाच , पुणे टाईम्स सारखा कुठलीतरी कोरेगाव पार्कातली किंवा ए.बी.सी फ़ार्म्स मधली पार्टी छापणारा…… पेज थ्री पुणे टाईम्स इतके उत्तान कुठलेच नसेल हो!!!!

  • गुरुनाथ
   अरे या वायझेड लोकांनी लोकमान्य टिळक पुण्यतिथी बद्दल पण एक अक्षरही छापले नाही एक ऑगस्टला.. काय बोलणार या निर्लज्ज लोकांना??

 5. swapna says:

  म.टा कधीही उघडून बघत नाही.. सकाळ सवय झालीये म्हणून घरी येतो.. पण रोज शिव्या घातल्या जातातच..
  एका पानावर ८०% जाहिराती.. परत वर सण वाराला विशेष अंक… ज्यात ९०% जाहिराती.. आणि किमंत वाढीव… !!
  सगळी मजाच आहे… नेमका गेले महिनाभर कुठलाच पेपर वाचला नाही.. आणि आता वाटतंय कि फारसा काहीच बिघडला नाहीये…

  • स्वप्ना
   खरं आहे. लहानपणापासून मी धावते जग आणि आयफेल टॉवर नियमीतपणे वाचत आलो आहे. अगदी आठ नऊ वर्षाचा असतांना पण नीट वाचता येत नसतांना पण मटा मधली ही दोन सदरं मी नियमीतपणे वाचत असे. या पेपरला खूप मोठा इतिहास आहे पाठीशी म्हणून अशा तर्हेने झालेली अधोगती पाहून वाईट वाटतं.
   प्रतिक्रियेसाठी आभार.

 6. Manoj Zavar says:

  आजही तरुण भारत, केसरी सारखे वृत्तपत्र प्रसिद्ध होतात, का आपण असले नालायक वृत्तपत्रच वाचतो किंवा असल्या अश्लाघ्य वृत्तपत्रांबद्दल उहापोह करतो? तरुण भारत प्रत्येक ठिकाणी उपलब्ध का नसतो?
  वृत्तपत्रे हि समाजाची प्रतिबिंबे असतात, हेच खरे. मटाबाबा हे फक्त पेपर नसून सामाजिक विकृती आहे.. चटपटीत लेख, उघड्या नागड्या पोरी बघून १३ वर्षाच्या पोरांचे व साठीतल्या म्हतार्यांचे आंबट शोक जागे न झाले तरच नवल..

  • मनोज
   नुकताच म्हणजे साधारण पणे सात आठ महिन्यापूर्वी मुंबई तभा सुरु झालेला आहे. सुरुवातीला पहिले दोन तिन महीने तर पेपर वाल्याने पेपर येत नाही म्हणून टाकायला नकार दिला. मग आम्ही चेंबुरच्या तभा च्या कार्यालयात जाऊन सांगितल्यावर तभा मिळणे सुरु झाले आहे. सध्या तभा, लोस,डिएनए आणि टाइम्स घरी येतो.
   तभा आणि मटा अगदी लहानपणापासून घरी येतात. हल्ली नागपूरच्या तभाची आवृत्ती खूप वाचनीय असते.

 7. nitin godambe says:

  NAMSKAR,

  Aaj kal vruttapatracha darja itka khalvala gel ahe ki tyacha vichar karun laj vatate.
  he lok vruttapatra sampavaniya sathi kay kartil yacha yogya udaharan ahe he ,
  dev jano pudhe he lok kay kartil
  aajacha lekha sudha saglya lekha sarkha jhakas

  Nitin Godambe

  • नितीन
   मनःपूर्वक आभार. पुढे काय लिहिलं आहे हे आपणच ठरवायला हवं. आपण जर वाचन बंद केलं, तर ते लोकं कशाला असं छापतील?

 8. मान्यवर,
  मटा उथळ आहेच यात वाद नाही ! पण आपण कश्याला एवढे मनावर घ्यायचे?

  • aapan nahi ghenar tar kon ghenar manawar. Yaasathi pan kuna Anna hazare ne andolan karaychi waat baghayla hawi ka ?

   • विक्रांत, भिऱ्या डोक्याचा
    धन्यवाद. आपणच जर सगळ्या गोष्टी सहजपणे मान्य केल्या तर याच गोष्टी रुळतील हे नक्की. कोणीतरी तरी या विरुद्ध आवाज हा उठवायला हवाच. त्यांना कमीत कमी हे तरी समजू दे की काही लोकं अशीही आहेत की ज्यांना नग्न बायका पेपर मधे पहायच्या नाहीत.

 9. nusta mah. times nhave aaj-kal saglya paper-madhli pane Page 3 zhali aahet, mag to page 1 aso kiwwa Page 20. Haa lekh Censor board la pathvayla hawa. Mi tar mhanto sarv paper la aata Grade sysem laagu karayla hawi. Mah. Times ani Times of India la PG (parental guidance) rating dyayla hawa.

  • पेज थ्री संस्कृतीने खरंच पार वाट लावली आहे आपल्या देशाची. दररोजच्या मिडडे मधे एक मिडडे मेट म्हणून अर्धनग्न स्त्रीचा फोटॊ असतो.
   पिजी नाही, तर पेपरला टू एक्स चा दर्जा द्यायला हवा.

 10. प्रणव says:

  नमस्कार काका,
  लेख आवडला नव्हे मनापासून पटला.
  एक संध्यानंद मानून दैनिक निघत पुण्यातून. इतकं विनोदी लिखाण पु.ल. नंतर याच दैनिकातून येत. कधी मिळाल तर जरूर वाचा. मला वाटत मटा, सकाळ आणि असेच अनेक दैनिक याच वाटेने चालली आहेत. सध्या लोकांना पण हेच पाहिजे आहे असं म्हणता येईल. शेकडा ८०% लोक या अशा बातम्यासाठीच वर्तमानपत्र घेतात. एकाने सुरु केले त्याचा खप वाढला म्हणून सगळ्यांनी चालू केले, शेवटी काय ‘मागणी तसा पुरवठा’ असच म्हणावं लागेल. सध्या मी केवळ दुसरा पर्याय नाही म्हणून सकाळ घेतो.
  पुढील लिखाणासाठी शुभेछ्या…
  प्रणव

  • सकाळची प्रिंट एडिशन चांगली आहे यात काही संशय नाही.
   पण नेटवरची एडीशन मात्र आवरा आहे.
   प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार.

   • aruna says:

    the print edition is also not good. It may not give very many nude pics but nothing worthwhile to read and very biased views.

 11. एकूण प्रकरण कठीणच आहे. तुमच्या या लेखामुळे म.टा. बदललं तर ठीकच. नाहीतर देवच त्यांचं रक्षण करो. एखादा ’नकोसा’ ब्लॉग पाहिला, तर रिपोर्ट अब्युज तरी करता येतं. वर्तमानपत्राच्या साईटचं काय करायचं? “पत्र नव्हे फतरं” अशी अवस्था आहे. मी तर म.टा.बद्द्ल पहिल्यांदाच काहीतरी बोलत असेन. काही बोलण्यासारखंच नाही, तर काय बोलणार?

   • कांचन
    सहमत आहे. पेपरला पण अब्युझ रिपोर्ट करता आलं तर हजार लोकं सहज अब्युझ करतील.
    पत्रं नव्हे कुत्रं.. ते पण लुत भरलेलं अशी अवस्था आहे या पेपरची.

 12. ज ब र द स्त .. अगदी मनातलं !!

  पण मटाला काही फरक पडेल असं वाटत नाही… सगळी लाज सोडलेली आहे त्यांनी. माझ्या जुन्या ऑफिसमध्ये आयटीला, मी न्यूज पेपरच्या साईट अनब्लॉक करायला सांगितल्या होत्या, तेव्हा मटा, टाइम्स ऑफ इंडिया, नवभारत टाइम्स, ह्या साईट हाय लेव्हल पोर्न कंटेंट म्हणून अनब्लॉक करायला नकार दिला…

  ऑनलाइन पेपर सोडा, पण त्यांच्या पेपरमधल्या पहिल्याच पानावर उत्तेजक जाहिराती असतात. सगळं सगळं पैश्यासाठी..बस्स्स !!

 13. खूप चांगला विषय मांडलात.
  वृत्तपत्र ही सर्वांनाच सलणारी बाब झालीये. दर्जा सगळ्यांचाच खालवला आहे यात वादच नाही. एकेकाळी काय मस्त वाटायचे विशेषांक असले की, आता मात्र मूळात वृत्तपत्रच कशाला वाचायचे हाच प्रश्न पडतो.
  रोज सकाळी उठल्यावर मुख्य पानावरची बातमी पाहून डोकं तापवून घ्यायचेच कशाला असे वाटते.. नेहमी वाईट्च बातमी असते, चांगलं कधी घडतच नाही की वाईट बातमीच वृत्तपत्राचा खप वाढवितात कुणास ठाऊक?
  आणि आता या ऑनलाईन पेपरने तर शक्य तितका दर्जा खालावून या माध्यमाचा कसा गैरवापर करता येऊ शकेल याचा अगदी कळस गाठलेला आहे,

  • पल्लवी
   ऑन लाईन पेपरची नैतिक जबाबदारी जास्त आहे. त्यांनी उलट जास्त सांभाळून लिहायला हवे. नुकतीच एक मेजर दहातोंडे या माणसाचा सार्वजनीक अपमान करण्याची जबाबदारी सकाळने घेतलेली आहे. त्या माणसाच्या प्रत्येक लेखावर, त्या मेजर दहातोंडे, त्यांची मुलगी, आणि जावयाच्या अपमान करणाऱ्या कॉमेंट्स प्रसिद्ध केल्या जात आहेत. तो मेजर पण एक नंबरचा दळभद्री माणुस दिसतो, इतका अपमान होऊन सुद्धा पुन्हा पुन्हा सकाळला लेख देतोय छापायला. त्याची मुलगी जेंव्हा पेपर पाहिल, तेंव्हा तिला जिव द्यायची इच्छा होईल यात काही संशय नाही. असो. इथे लिंक आहे. http://72.78.249.107/esakal/20110722/5381356508710530792.htm

 14. मी वाचायला शिकलो तोच मुळी महाराष्ट्र टाइम्सचे मथळे बघत बघत. तेव्हापासुनं नियमित वाचक आहे. पण दिवसेंदिवस यांची पातळी इतकी खालावत चालली आहे, की थोड्याच दिवसात हा पेपर ‘लपून छपून’ वाचण्याच्या साहित्यात जमा होणार असं दिसतंय. आणि साईट पेरेन्टल कंट्रोल मध्ये डिसेबल करावी लागणार! शिवाय ही परंपरा निर्माण करणारे वेगवेगळया वाहिन्यांवर समाजाला नैतिकतेचे धडे द्यायला मोकळे आहेतच.

  • अतूल
   काही गोष्टी या चार भिंतीच्या आत बऱ्या वाटतात. सगळेच करतात म्हणून चार चौघात करण्यासारखी ही गोष्ट नाही. थोड्या दिवसात देशीबाबा प्रमाणे मस्तरामच्या कॅटॅगरी मधे जाईल हा पेपर.

 15. अभिषेक says:

  काका मस्त जमलाय लेख. हेरंब च्या बझ्झ पर्यंत म.टा. ची कीर्ती माहित होती, पण जे तुम्ही सांगितलंय ते नव्हत माहीत. हे म्हणजे अगदी अति झालंय. भिडो शी अगदी सहमत, आपण नाही तर कोण मनावर घेणार? वृत्तपत्र (मिडिया) लोकशाही चा ४था स्तंभ म्हणून मिरवतात, त्यांनी एवढी काळजी नक्कीच घ्यायला पाहिजे न्…

 16. mazejag says:

  Khar aahe kaka…news paper mhanun porana kay dakhawnar kapal…..

  • अश्विनी
   धन्यवाद. हळू हळू त्यांची लिमिट वाढत चालली आहे. आता इथेच त्यांना थांबवायला हवे. नाही तर आपल्या मुलांना पेपर मधून पोर्न चे ज्ञान मिळेल हे नक्की. मटा त्या मधे सगळ्यात पुढे असेल.

 17. Ravindra Jadhav says:

  अगदी मनातले लिहिले आहे . मी म.टाचा.सुरुवातीपासून वाचक आहे, परंतु आता तो खालावत चालला आहे.

 18. savitarima says:

  मी जोवर घरी म. टा. घेत होते तोवर तो वाचत होते . नंतर मुंबई टाइम्स मध्ये अशाच फोटोंची भर पडू लागल्यावर माझा तेव्हा ४-५ वर्षांचा मुलगा अनेक प्रश्न विचारू लागला , तेव्हा त्यांची उत्तरे देणे माझ्या हातात नव्हते , तेव्हा अखेर म. टा . बंद केला. ओनलाईन म. टा. तर उघडूच नये इतकी वाईट परिस्थिती आहे . ते ‘पत्रं नव्हे कुत्रं’ असेच वाटते . सकाळच्या जाहिरातींबद्दल एकदा मेल लिहिल्यावरकेवळ एक दिवस त्या बंद झाल्या , परत ये रे माझ्या मागल्या 😦

  • मी फक्त शनीवार रवीवार हा पेपर घेतो. इतर दिवशी फक्त ऑन लाइन वाचतो. सकाळच्या विरुद्ध पण काहीतरी करायला हवे. जेंव्हा संपादकीय विभाग अशा प्रकारे वागतो, आणि कॉमेंट मॉडरेट करतो तेंव्हा मात्र त्यांचा खरच संताप येतो.

 19. सागर says:

  मटा आता फालतू पेपर झालाय .
  लेख मस्त जमलाय.संपादकाना द्या पाठवून

 20. विद्याधर कुलकर्णी says:

  बरं झालं मी मटा घेत नाही.

  विद्याधर कुलकर्णी

 21. अभिजित says:

  महेंद्र,
  लेख छान झालाय. सगळ्यांच्या मनातली व्यथा छान मांडली आहे. हेरंबच्या बझवर शुद्धलेखनाची जी काही लक्तरे टांगली होती ती संपादकांना पत्रात पाठवली होती. त्यावर पानवलकरांचा दोन ओळींचा प्रतिसाद आला होता. नंतर श्री सुहास फडके यांच्याकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. मटाला याबाबद काही घेणेदेणे नसेल तर आपण कशाला आटापिटा करायचा म्हणून शेवटी चुका काढणेही बंद केले.
  अश्लील फोटो द्यावेत की नको असा एक कौल मटाने काढल्याचे आठवते. त्याचे निकाल जाहिर केल्याचे कुठे दिसले नाही. असो.दहावी बारावी पर्यंत हुशार असलेल्या मुलाने पॉर्न मासिकांचा व्यवसाय सुरु करावा अशी मटाची गत झाली आहे.

  • अभिजीत
   मी स्वतः पानवलकरांना पाठवली आहे लिंक. पण जर त्यातही काही केले गेले नाही, तर मी स्वतः या विषयाचा पाठपुरावा करण्याचे ठरवले आहे. प्रेस काउन्सिल पर्यंत तक्रार करुन इतरही लोकांना याची लिंक पाठवणार आहे. आधी थोडी वाट पहातो काही होतं का ते.

   • अभिजित says:

    महेंद्र, प्रेसकांऊंसिल मध्ये तक्रार ही छान कल्पना आहे. नक्की पाठपुरावा करा आम्ही तुमच्या सोबत आहोत. काय काय प्रगती होते या विषयावर ते कळवा.

    • नक्कीच.. मटाच्या पानवलकरांचे ट्विटर हॅंडल http://twitter.com/#!/ashokpanvalkar
     मटाचे ट्विटर हॅंडल..http://twitter.com/#!/ashokpanvalkar
     दोन्ही ठिकाणी जाऊन आक्षेप नोंदवला आहे.

     कम्प्लेंट म्हणजे काय , तर फक्त इ मेल्स तर पाठवायचे आहेत. रविवारी करणार ते काम. सगळी कडे पाठवतो. सगळ्यांचे इमेल्स शोधावे लागतील. भरत कुमार राऊत मटाचे संपादक होते काही काळ. त्यांना पण मेल पाठवतो.
     Indu Jain · Samir Jain · Vineet Jain · Sahu Jain · Sahu Ramesh Chandra Jain · Sahu Shanti Prasad Jain वगैरे लोकांचा पण इ मेल आयडी शोधावा लागेल. बघतो रविवारी.

   • सही आयडिया आहे ही.. काका, आर या पार होऊन जाऊदे.. आम्ही सगळे आहोतच. !!

 22. स्वातंत्र्य पूर्वकाळात खिशात केसरी सापडला की नोकरीवरून काढून टाकले जात असे… आत्ताच्या काळात ऑफिसमध्ये ऑनलाईन मटा वाचताना सॉरी “पहाताना” कुणी सापडला तर त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात येईल.

  • अभिजित says:

   बेस्ट कमेंट सिद्धार्थ. लय भारी.

   • सिद्धार्थ
    जोक नाही,. तसं झालंय बऱ्याच ठिकाणी. सुहास सांगत होता, त्याच्या ऑफिस मधे मटा उघडत नाही- पोर्न साईट म्हणून.

    • ssjadhav says:

     हो खरं हे, internet firewall असलेल्या बहुतेक office मधे म. टा. बघता येत नाही. आणि असला पपेर वाचण्यात पण काहि तथ्य नाही

 23. यात संपादकाचा दोष नाही दोष आहे तो मालकाचा. स्वातंत्र्य पूर्व काळातील सर्व वर्तमान पत्रांचे हेच बेहाल झाले आहे. बदलले नाही तर काळाच्या ओघात केसरी सारखे नष्ट होण्या पेक्षा तत्वाशी तडजोड करत व्यापारी होणे आणि या करता खालच्या पातळी वरचे लेखन करणे आलेच. संपादक काय his masters voice असतो . त्याने स्वतःची अक्कल वापरली तर दुसऱ्या दिवशी त्याच्या पार्श्वभागा वर लाथ मारून हकालले जाते. थोडक्यात मालकाचे गाणे गाणारा कुत्रा . नवाकाळ सारखे एखादाच पेपर हा मालक कम संपादक असतो. तेथे संपादकाचे मालकाचे प्रतिबिंब दीसते. बाकी सर्व पाट्या टाकणारे झाले आहेत.
  सर जी ते पक्के व्यापारी झालेत. मर्डोक सारखे. पैसा हेच त्यांचे देव आहे. आपण कीती ही आक्षेप घेतले तरी कांही फरक पडणार नाही त्यांना किती ही डोके फोडले तरी कांही फायदा होणार नाही. आपण महाराष्ट्रीयन मराठी माणस उगीचच भावना प्रधान होतो. सर जी ते पक्के व्यापारी झालेत. मर्डोक सारखे. पैसा हेच त्यांचे देव आहे.
  माझ्या मना बन दगड
  कर हिंमत आत्मा विक उचल किंमत!
  माणूस मिथ्या, सोने सत्य
  स्मरा त्याला स्मरा नित्य!
  भिशील ऐकून असले वेद
  बन दगड नको खेद!

 24. Bindiya says:

  mi delhit rahte tyamule net varacha marathi paper vachate mazahi ekada office madhe tasacha zal hote mata vachatana .Ata me sakal vachane nidan swachchha tari asato Aso mi tumcya blogchi niymit vachak ahe sakalmulecha kalale Hindi prantat Darjedar marathi vachanyacha Anand milato Tumachya blogala bhet devun Keep it up Thanx

 25. मटाबद्दल नो कमेंटस…. 🙂
  मी अगदी लहान असल्यापासून आमच्याकडे हाच यायचा …तीन वर्षाआधीपासून सकाळ येतोय….

 26. दुर्दैवाने मटा हा फक्त टॉयलेट पेपर म्हणून वापरायच्या कामाचा झालाय.

  • भारत
   मला वाटतं की सकाळ, लोकसत्ता, लोकमत चं मार्केट वाढतंय म्हणून हे असे प्रकार सुरु केले असावे सकाळने.

 27. दिपक says:

  एकदम खरं बोललात महेंद्रदा! मटा वाचणे कधीच बंद केले आहे. ’मटाबाबा’ हे नाव बरोबर आहे किंवा ’टाईम्सभाभी.कॉम’ पण चालेल! 😉

  • दिपक
   टाइम्स भाभी.. चालेल.. चालेल..
   त्या संपादकांनी हा पेपर आपल्या मुलांसोबत उघडून वाचावा अशी माझी खूप इच्छा आहे.

 28. आजकाल ह्या वर्तमान पत्रांची पातळी इतकी खालावली आहे की सगळ्यांसमोर हा पेपर नेट वर उघडून वाचणे पण कठीण झाले आहे . +1

  aajkal MTA vachayche sodun dile aahe tyamule jast tras nahi hot 😉

 29. nokiacy says:

  I liked your blog,but use qualipad for writing commnets.

 30. Unique Poet says:

  महेंद्रजी ! माझा एक मित्र मटाला ” पोर्नटाईम्स ” च आणि त्यात काहीच चूक नाही….

  हे थांबविण्यासाठी आपण प्रयत्न करताय ….. 🙂 आम्ही आपल्या बरोबर आहोत….! शुभेच्छा !
  ही थोडी माहिती कदाचित उपयोगी ठरू शकेल…..!

  Section 67 of the IT Act is the most serious Indian law penalizing cyber
  pornography. Other Indian laws that deal with pornography include the
  Indecent Representation of Women (Prohibition) Act and the Indian
  Penal Code.

  According to Section 67 of the IT Act
  Whoever publishes or transmits or causes
  to be published in the electronic form, any
  material which is lascivious or appeals to
  the prurient interest or if its effect is such as
  to tend to deprave and corrupt persons who
  are likely, having regard to all relevant
  circumstances, to read, see or hear the
  matter contained or embodied in it, shall be
  punished on first conviction with
  imprisonment of either description for a
  term which may extend to five years and
  with fine which may extend to one lakh
  rupees and in the event of a second or
  subsequent conviction with imprisonment of
  either description for a term which may
  extend to ten years and also with fine which
  may extend to two lakh rupees.

  This section explains what is considered to be obscene and also lists the
  acts in relation to such obscenity that are illegal.

  * Publishing cyber pornography *

  Actions covered – Publishing, causing to be published and
  transmitting cyber pornography.

  Penalty First offence – Simple or rigorous imprisonment
  up to 5 years and fine up to Rs 1 lakh

  Subsequent offence – Simple or rigorous
  imprisonment up to 10 years and fine up to Rs
  2 lakh

  Relevant authority – Court of Session
  Appeal lies to High Court

  Investigation Authorities –
  1. Controller of Certifying Authorities (CCA) ( http://cca.gov.in/rw/pages/index.en.do )
  2. Person authorised by CCA
  3. Police Officer not below the rank of
  Deputy Superintendent

  Points to mention in complaint –
  1. Complainant details
  2. Suspect details
  3. How and when the contravention was
  discovered and by whom
  4. Other relevant information

 31. Unique Poet says:

  महेंद्रजी ! माझा एक मित्र मटाला ” पोर्नटाईम्स ” च म्हणतो आणि त्यात काहीच चूक नाही….

  हे थांबविण्यासाठी आपण प्रयत्न करता आहात ….. 🙂 आम्ही आपल्या बरोबर आहोत….! शुभेच्छा !
  ही थोडी माहिती कदाचित उपयोगी ठरू शकेल…..!

  Section 67 of the IT Act is the most serious Indian law penalizing cyber
  pornography. Other Indian laws that deal with pornography include the
  Indecent Representation of Women (Prohibition) Act and the Indian
  Penal Code.

  According to Section 67 of the IT Act
  Whoever publishes or transmits or causes
  to be published in the electronic form, any
  material which is lascivious or appeals to
  the prurient interest or if its effect is such as
  to tend to deprave and corrupt persons who
  are likely, having regard to all relevant
  circumstances, to read, see or hear the
  matter contained or embodied in it, shall be
  punished on first conviction with
  imprisonment of either description for a
  term which may extend to five years and
  with fine which may extend to one lakh
  rupees and in the event of a second or
  subsequent conviction with imprisonment of
  either description for a term which may
  extend to ten years and also with fine which
  may extend to two lakh rupees.

  This section explains what is considered to be obscene and also lists the
  acts in relation to such obscenity that are illegal.

  * Publishing cyber pornography *

  Actions covered – Publishing, causing to be published and
  transmitting cyber pornography.

  Penalty First offence – Simple or rigorous imprisonment
  up to 5 years and fine up to Rs 1 lakh

  Subsequent offence – Simple or rigorous
  imprisonment up to 10 years and fine up to Rs
  2 lakh

  Relevant authority – Court of Session
  Appeal lies to High Court

  Investigation Authorities –
  1. Controller of Certifying Authorities (CCA) ( http://cca.gov.in/rw/pages/index.en.do )
  2. Person authorised by CCA
  3. Police Officer not below the rank of
  Deputy Superintendent

  Points to mention in complaint –
  1. Complainant details
  2. Suspect details
  3. How and when the contravention was
  discovered and by whom
  4. Other relevant information

 32. महेश कुलकर्णी says:

  सर्वच पेपरचा दर्जा कमी झाला आहे,चमचमीत देणे एवढच त्यांना माहिती आहे,पूर्वीची पत्रकारिता आज दिसत नाही,केवळ स्पर्धा, सकाळच्या प्रतिक्रिया करमणूक (टाईमपास)असतो, केवळ स्वताचे नंबर १ आहोत असे भासवणे हे तेथील मंडळीचे काम असावे अये वाटते,

  • महेश
   पेज हिट्स.. इज द की.. सगळ्यांना फक्त पेज हिट्स हवे आहेत, म्हणजे रेव्हेन्यु वाढतो जाहीरातींचा, जास्त जाहीराती मिळतात.. त्या साठी ते काहीही करायला तयार असतात..

 33. Gurunath says:

  मिरर, मिड्डे…. हे पेपर फ़क्त हॉस्टेलाईट पोरांसाठीच असावेत, आस्क द सेक्स्पर्ट वगैरे करमणुक असते पोट्ट्यांना!!!!…. परत रुम मधे चिकटवायला भारी भारी बेब्स मिळतात ते वेगळे, एवढं झालं की खुषाल मेस चे डबे ठेऊन जेवायच्या लायकीचे हे पेपर्स असतात!!!!….. एक ऑब्झर्वेशन….. पुणे मिरर मधे येणारे सेक्स्पर्ट हे मुंबई मिरर मधे दोन दिवस आधी झळकलेलं असतं!!!!!!…… lolllllzzz

  • गुरुनाथ
   काय करावं हेच समजत नाही. मीड डे मधे मिडडे मेट म्हणून एक अर्ध नग्न स्त्री असते. पण इथे चक्क अर्धनग्न स्त्री ला हाताळतांना दाखवलंय़? या वाय झेड लोकांना फटके मारायची इच्छा होते भर चौकात! किंवा ह्यांच्या डोळ्यादेखत ह्यांच्या टीनेजर मुलांना ही साईट दाखवावी, त्यांनाही कळू दे आपला बाप कसल्या पोर्नोग्राफिक पेपर मधे काम करतो ते.

 34. Ashish says:

  I raised my opinion about the same with a “LADY” who works with TIMES Network. What she told to me was this:
  Sex Sells and hence we sell it. These photographs give us most numbers of impressions and hence revenue through ads.

  Ata mi kay bolu sanga?

 35. Rajan Mahajan says:

  namaskar,

  Mata chi ppatali khalavali aahe, khoop khalavali aahe. ani ya babat Mata la sangun hi fayada nahi. Maza mitra Mata madhe patrakar aahe, tyachyashi hya babat bolalo. tyala e-editionche clips mail kele pna tyane tyachya seniorsla te pathavale ani tyani bahuda te delete kele. hi goshta december 2007 madhali aahe. Matachi chhapil avrutti atyant bakavas, anglaalaleli asate. hya var mitrache uttar aahe ki aamche circulation sarvat jaast ahe ani tyamule asa nishkarsha kadhala jato ki sarva chhaan/yogya chalu aahe. Ya var mazhya parine tyanche circulation kami karanyacha prayatna mhanun, me Mata 3 varshan purvi band kela ani e-paper kadhitari mahinyatun ekada vachato.

  • त्यांना फक्त पैसा समजतो.. हाच खरा प्रॉब्लेम आहे. समाजाशी काही घेणं देणं नाही. चांगल्या पेपरची वाट लावली आहे अशोकने हे खरं! संपादक चांगला हवा.. नाहीतर असं होतं!

 36. आल्हाद alias Alhad says:

  “मटा ची ऑन लाइन एडीशन म्हणजे एखाद्या पोर्नोग्राफी साईटला लाजवेल अशी आहे. ”
  फक्त मटाच नाही तर टाईम्स ग्रूपच्या सगळ्याच वेबसाईट्सबद्दल हे खरं आहे. (थोड्याफार प्रमाणात याहू ही!) इंडियाटाईम्स, टाईम्स ऑफ इंडिया आणि मटा. कंटेंट तेच. तिन्हीकडून लिंक्स…

  घाण प्रकार असतो…

  • सेक्स पर्ट ?? हा हा हा.. कसले काय अन कसले काय! सगळ्या कुक्ड अप स्टोरीज असतात! काही गोष्टी सगळेच करतात म्हणून जर उघड्यावर करणे सुरु केले तर कुत्रे आणि माणसात फरक काय रहिला?

 37. महेंद्र, आधीही दोन वेळा लेख वाचला. जणू अगदी माझ्याच मनातली मळमळ तू लिहीली आहेस. शी! खरेच पाहवत नाही रे मटा. बरं ऑनलाईन वाचण्याव्यतिरिक्त पर्याय उपलब्धही नाही नाईलाजाने चडफडत मटा, सकाळ उघडलेच जातात. मुपिच्या कमेंटस वाचून तर वाटते की संपूर्णपणे टार्गेट करण्यासाठीच केले आहे. सकाळने किमान काहीतरी अंकुश तरी ठेवावा. बाकी मटाके क्या कहने! नग्न फोटो, क्लिप्स, फालतू मालमसाला याने उजवी डावी बाजू सदैव भरगच्च. मात्र बातम्या त्याच त्या घिस्यापिट्या. अग्रलेख, ललित काही म्हणून उरलेले नाही. :(:(

  • भाग्यश्री,
   इतकं लिहिलं तरीही हे लोकं निर्लज्ज आहेत. आज पुन्हा काही फोटो पोस्ट केलेत. त्यांचा संपादक खरंच गेंड्याच्या कातडीचा दिसतो. कठीण आहे. या पेक्षा संध्यानंद किंवा रत्नागिरी टाइम्स परवडला. लख वगैरे कधीच नसतात फारसे.. संपणार लवकरच !! मी बंद केला पेपर घेणं!
   या पेक्षा सकाळ नक्कीच सेन्सिबल आहे. सगळ्या कॉमेंट्स काढल्या आहेत आता..

 38. शिरीष दवणे says:

  नमस्कार काका,

  माझ्या मनात देखील हेच प्रश्न सारखे घोंघावत होते. धन्यवाद तुम्ही माझ्या विचारांना शब्दांत मांडल्याबद्दल.
  कृपया आपण मी लिहिलेला खालील लेख वाचावा आणि आपल्या ब्लॉगवर जमल्यास ह्याच विषयावर एखादी पोस्ट करुन आणखिन जनजागृती करावी ही नम्र विंनती.

  लेख येथे आहे https://docs.google.com/viewer​?a=v&pid=explorer&chrome=true&​srcid=0B0iqwLFFmchQYzE3Njg5NmY​tYWRlYS00NjgxLWIwYmUtMjM5MjIwM​TkyN2Rk&hl=en_US

  शिरीष दवणे.

 39. मटाचं काही माहीत नाही. पण सकाळ मुक्तपीठ आणि खास करून Comments म्हणजे एकदम धमाल असते! खरं तर त्या Comments अस्सल पुणेरी असतात. Comments मध्ये अश्लीलपणा आलेला मी तरी अजून पाहिला नाही. खोचकपणा आणि टारगटपणा मात्र भरपूर असतो. मला खात्री आहे की या नवशा लेखकांनाही या Comments आवडत असणार.

  • ब्लॉग वर स्वागत!
   मुक्तपीठ वरच्या कॉमेंट्स जो पर्यंत मर्यादेत होत्या तो पर्यंत ठीक होतं, पण नुकताच एक लेख वाचला डॉ . टिल्लू यांचा, त्यांच्या चारित्र्य विषयक कॉमेंट्स पण प्रसिद्ध केलेल्या पाहिल्यावर वाईट वाटले. एखाद्याचे चारित्र्य हनन करणे, त्या डॉक्टरांचे आपल्या मेहुण्याबरोबरचे संबंध – त्याकडे वेगळ्याच दृष्टीने कॉमेंट्स टाकणे अक्षम्य आहे असे मला वाटते. नकळत घडले सारे असा लेख होता. आता त्या लेखावरच्या कॉमेंट्स काढलेल्या दिसतात.
   तसेच दहातोंडे काकांच्या मुलीवर- जावयावर केलेल्या कॉ्मेंट्स खटकल्या. तशा कॉमेंट प्रसिदध न करणं सकाळच्याच हातात होते. चेष्टा मस्करी म्हणून थोड्या फार प्रमाणात चालू शकेल, पण वैय्यक्तिक कॉमेंटस नसाव्या .

 40. amol says:

  Mahendra,
  This is the time we all have to stand for Jan Lokpal bill.
  Readers will appreciate if you could spread awareness through your blog about support to Jan Lokpal bill.
  Can we expect an article on it\

  thanks!

  • अमोल,
   लोकपाल बिलाबद्दल इतकं काही लिहून झालं आहे, की त्यातला सगळा चार्म निघुन गेला आहे. अण्णा हजारेंनी धमक्या देणं, सरकारने उपोषणाला परवानगी न देणं, हे बरेचदा झालंय. या विषयावर बरंच काही लिहिलं गेलं आहे, नवीन काय लिहायचं हा प्रश्न आहेच.
   पण माझं एक मत म्हणून सांगतो, अण्णा हजारेंना आपला फॅन फॉलोअर्स टिकवता आला नाही. हल्ली बातमी असते, की अण्णा हजारे सारेगम लिटील चाम्प्स मधे, किंवा मोटरसायकल रॅलीच्या उदघाटनामधे — ह्या अशा बातम्या वाचल्या की जाणवतं, त्यांचं आंदोलन दिशाहीन होत चाललंय..

   • amol says:

    महेंद्र,
    मला वाटतं आपला प्रश्न हा भ्रष्टाचाराशी निगडीत आहे…अण्णा १००% pure कसे आहेत ह्यावर भ्रष्टाचाराचा प्रश्न सोडवायचा का? आणि अण्णा हजारे लिटील चाम्प्स मधे गेले तर त्यात वावगं असा काय आहे ? जन जागृती करण्यासाठी शक्य तितके चांगले मार्ग अवलंबले तर चांगलाच आहे…लिटील चाम्प्स मंझे काय बिग बॉस आहे का ? आपला उभा आयुष्य त्यांनी देशकार्यासाठी अर्पण केलाय त्याची थोडी तरी आपण तमा बाळगली पाहिजे
    आज जर गांधी जन्मात असतील तर ते फक्त आणि फक्त जुन्या महात्मा गांधीजी सारखेच असावे असा आहे का ? एका कार्याक्रमामाद्ये गेल्याने आंदोलन दिशाहीन कसा होऊ शकता…
    भ्रष्टाचाराचा प्रश्न फक्त अन्नाचा आहे का ? आपला नाही का तो ?
    इथून पुढे १०० वर्ष १००% सच्चा माणूस शोधून नंतर आंदोलन करायचा का ? तोपर्यंत काय करायचा…
    काळ बदलला आहे,

    • अमोल
     दिशाहीन केवळ या कारणासाठी म्हणत नाही. लोकं त्यांना गांधी करू पहाताहेत. सरकारने व्यवस्थितपणे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे सुरु केले आहे. त्यांना लोकपालचा ड्राफ्ट बनवायला बोलावले होते, तिकडे गेल्यावर त्यांचा सहभाग पण होताच , तरीही शेवटी फायनल ड्राफ्ट बनवतांना काय झालं?
     अण्णांना आता काय करावं हे सुचत नाही असे दिसते. पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्याची धमकी दिली आहे. पण त्याने खरंच काही होईल का? एका केसची लिंक दिलेली आहे, त्या मधे एक स्त्री गेले कित्त्येक वर्ष उपोषण करते आहे अशी काहीशी बातमी आहे. ह्या उपोषणाच्या धमकीचा काही फायदा होणार नाही, हे आज ही मी सांगु शकतो.

     • amol says:

      उपोषण करणे हि जर धमकी वाटत असेल तर तुम्हाला उपोषण हे पूर्णता: कळले नाही…
      “फायनल ड्राफ्ट बनवतांना काय झालं?” ह्या तुमच्या प्रश्नांना उत्तर तुम्हीच शोधा…आता काय मग आपण थांबायचं का? जनजागृती नको करायला ? आणि तेच अण्णा हजारे करत आहेत…जागोजागी जाऊन हा प्रश्न ज्वलंत करत आहेत…लोकांना त्याची जाणीव करून देत आहेत…
      “अण्णांना आता काय करावं हे सुचत नाही असे दिसते” असा तुम्हाला एकट्याला वाटतय…
      महेंद्र, समस्या काय आहे हे सांगून काही होत नाही…ती सोडवायची कशी हे जो सांगतो तो खरा शूर…
      तुम्ही ह्यासाठी काय करताय हा प्रश्न स्वताला विचारला पाहिजे…त्यांना सुचत नाही तर तुम्ही सांगा न पुढे येऊन कि काय करायचा…
      सरकार सांगते कि तुम्ही निवडणूक लढवा आणि राजकारणात येऊन नियम बनवा…का ? ह्या देशाचा नागरिक म्हणून मला त्या देशाची प्रश्न सोडवायचे असतील तर राजकारणातच असला पाहिजे का ? नाहीतर नागरिक म्हणून मला काही हक्क नाही का प्रश्न सोडवायचा ? हि तर मक्तेगिरी झाली…
      उपोषणाच्या धमकीचा काही फायदा होणार नाही, हे जर तुम्ही सांगु शकता तर काय केल्याने फायदा होईल हे आधी सांगा…लांबून दगड फेकू नका
      धन्यवाद…!

      • मी काय करू शकतो हा प्रश्न नाही. फक्त या उपोषणाने काही होईल असे वाटत नाही असे वाटते.
       असो, जास्तच पर्सनल होत चालली आहे कॉमेंट..
       धन्यवाद.

      • अमोल साहेब,
       तुमचा आणि महेंद्र काकांचा संवाद बरेच दिवस वाचतो आहे. या blog post चा विषय पूर्णपणे निराळा आहे. लोकपाल बिलाबद्दल तुम्ही स्वतः लिहू शकता. इतरांनी लिहिले पाहिजे हा आग्रह कशासाठी?

       महेंद्र काकांनी तुमच्या सुरुवातीच्या comments ना उत्तरे दिली ती केवळ out of decency. यापुढे comments टाकताना जरा मूळ विषयाला धरून टाकाव्यात ही विनंती! राग नसावा.

 41. milind says:

  सकाळ पेपर सुद्धा राष्ट्रवादीचा घरचा पेपर आहे…तुम्ही शुद्ध भाषेत पण राष्ट्रवादी च्या किंवा शरद पवार ह्यांच्या निषेधात एखादी प्रतिक्रिया दिली कि ती लगेच काढून टाकली जाते आणि प्रकाशित करत नाहीत…
  आणि सकाळ पेपर आजकाल बातम्या सोडून बाकी सगळे धंदे करतो…जसे वास्तूप्रदर्शन भरवणे…shopping फेस्टिवल भरवणे इत्यादि…

  • मिलिंद
   ब्लॉग वर स्वागत.
   अहो ते मी स्वतः नोट केलं आहे. शरदरावांच्या विरुद्ध काहीच लिहित नाहीत ते.. बातमी पण नसते, आणि कॉमेंट्स तर नाहीच नाही.

 42. निनाद प्रधान says:

  मटा वरच्या बातम्या आणि फोटो याबद्दल नेहमीच बरेचजण शंख करत असतात. मात्र यावर उपाय काय हे कोणीच सुचवत नाही. एकूणच सर्वच वृत्तपत्रांची पातळी आता कमरेखाली घसरलेली दिसतेय. आजकाल सगळ्याच वृत्तपत्रांमध्ये सेक्स आणि जोम-उत्साह याप्रकारच्या जाहिराती छापण्यात चढाओढ चाललेय असं दिसतं. प्रिंट घ्या किंवा ऑनलाईन, या जाहिराती असतातच.

  या जाहिराती आपल्याला नको असतानाही आपल्या घरात किंवा कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर येउन पडतात आणि आपल्यालाच लाज वाटते. अशा वेळी करण्यासारखा एक उपाय सुचवतो.

  या वृत्तपत्रांच्या मालकांच्या आणि संपादकांच्या घरी, त्यांच्या बायकापोरांच्या मेलबॉक्समध्ये अशा जाहिरातींची कटींग पाठवून देत जा. त्यांनाही थोडी झळ लागू द्या ना. आजकाल या मंडळींचे पत्ते किंवा इ-मेल आयडी शोधणे सोपे झालेय. करुन तर बघा. झालाच तर थोडासा फायदाच होईल. नुकसान तर काही होणार नाही ना?

  • निनाद
   ब्लॉग वर स्वागत.
   तुमचा उपाय अगदी योग्य आहे. संपादकाच्या घरी रोज एक फोटो त्यांच्याच पेपर मधला पाठवला तरी त्यांना समजेल की ह्या सगळ्या अशा गोष्टींमुळे किती मनःस्ताप होतो ते. यावर काय करावं हे समजत नाही. आणि जे करायचं आहे, त्या साठी वेळ हवा- तो पण नाही!..

 43. Amol says:

  hello there, Indiatimes is as bad as Maha.times the whole bennet coleman group is lower at thse things. I stopped reading newspapers way back, the only realiable sources of news are BBC India & asia, partly CNN and for local news watch and learn other wise there is nothing to read about some distant BIHAR district about what happened there….

 44. THANTHANPAL says:

  नग्न मॉडेलने लपेटला तिरंगा या म टा उर्फ मटाबाबा डॉट काम ने धंद्याच्या नावाखाली चक्क पोर्न बातम्या छापण्याचा उद्योग खूप दिवसा पासून चालू केला . मध्यंतरी अनेक मराठी वाचकांनी पत्राचा पाऊस पडून याचा तीव्र निषेध केला पण कांही फरक पडला नाही. याची इंटर नेट आवृत्ती तर जास्त बिभिस्त फोटो ने सजलेली असते . ती उघडली आणि अचानक कोणी समोर आले तर मान वर करायची हिम्मत होत नाही. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9660006.cms

  • हे नेहेमीचंच झालं आहे. त्यांच्यावर काही फरक पडत नाही. उलट जास्त जोमाने नवीन न्युड्स दाखवताहेत.

 45. रोहन says:

  “थोडी फार चूक एखाद्या ब्लॉगरची झाली तर समजल्या जाऊ शकते”

  माफ करा! पण वरील वाक्य वाचून थोडीशी गंमत वाटली. इथे ‘समजल्या’ असं नव्हे, तर ‘समजली’ असं हवं होतं. पण आपण म्हणत आहात तसं, “थोडीफार चूक जर एखाद्या ब्लॉगरची झाली, तर ती समजली जाऊ शकते.” 🙂

  पण आपल्या या लेखात इतरही अनेक ठिकाणी चूका राहिल्या असून, आपण प्रत्येकवेळी लेख प्रकाशित केल्यानंतर तो पुन्हा तपासून दुरुस्त करावा ही विनंती. शब्दांमधील अंतरे, उकार, प्रत्यक्ष शब्द इ. अनेक लहान, पण भरपूर चूका आपल्या लेखामध्ये आहेत. अनेक इंग्रजी शब्द देखील वापरले आहेत, ज्यांस मराठी प्रतिशब्द अगदी सहज उपलब्ध आहेत.

  बाकी आपल्या लेखाशी पूर्ण सहमत! धन्यवाद!

 46. geetapawar says:

  sir purvi lok mahnt hote… paisa fekho tamasha dekho… aata ulte jhale……………………..tamasha dekho fir fisa fekho…. E-newespearla kahi prestige nahi rahlie……………….

 47. नमस्कार महेंद्र जी,
  मी याच विषयावर माझ्या ब्लॉगवर लेखन केले (http://vikramwalawalkar.blogspot.in/2013/04/blog-post.html) आणि प्रतिसादात श्री. अतुल पाटणकर यांनी आपल्या या लेखाची लिंक दिली तेव्हा समजले की आपण पूर्वीच या विषयावर लेखन केले आहे. बरेही वाटले की आपली सहवेदना मांडली गेली आहे. आणि एवढे विचारसाधर्म्य असू शकते याचे आश्चर्यही वाटले.
  धन्यवाद,
  कळावे, लोभ आहेच , वृद्धिंगत व्हावा.
  स्नेहबद्ध,
  विक्रम.

  • विक्रम
   गेले बरेच दिवस नेट वर नव्हतोच, त्या मूळे उत्तराला उशीर होतोय. क्षमस्व. शेवटी सामाजिक बांधिलकी असणाऱ्याचे विषय आणी विचार पण सारखेच असणार ना.. 🙂 लेख मस्त जमलाय 🙂

 48. bhushan says:

  बरोबर आहे सर्व. रोज लिंक ओपन केली का अशाच बातम्या वाचायला मिळतात. अणि काही पण शीर्षक असतात बातम्याचे. बातमी आणि शीर्षक याचा तर काहीच संबध नसतो.

  • नशिबाने केवळ नेट वरच दिसतं हे सग्गळं. प्रिंट मिडीया म्हणजे मुख्य पेपर बरा असतो, पण पेज ३, आणि मुंबई टाइम्स बद्दल तर न बोललेलेच बरे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s