महागाई

पेपर मधली बातमी वाचली ३० वर्षाच्या तरूणाने आपल्या २८ वर्षाच्या पत्नी बरोबर आत्महत्या केली. दोनच दिवसा पूर्वी वाचलं होतं की एका ६५ वर्षाच्या वृद्धानी पण अशीच महागाईला कंटाळून आत्महत्या केली . त्यांनी लिहून ठेवलं होतं, की ” माझ्या मृत्युला सरकार जबाबदार आहे”  . जीव दिला, सरकारवर जबाबदारी पण टाकली, पण त्याने काय झालं? पेपर मधे मधल्या पानावर एक चौकट छापून आली!! बस्स!

काही दिवसांपूर्वी एक ९ वर्षाच्या लहान मुलीच्या आत्महत्येची बातमी पण वाचण्य़ात आली होती. आपल्या मृत्युनंतर आपली किडनी वडीलांना आणि डोळे भावाला लावण्य़ात यावे अशी इच्छा तिने लिहून ठेवली होती. घरातली गरिबीची परिस्थिती- पैसा अजिबात नाही  .वडिलांची किडनी खराब झालेली, तर भावाचे डोळे गेलेले.  आपल्या मृत्यु मुळे वडिलांना किडनी आणि भावाला डोळे मिळतील , आणि सगळेच प्रॉब्लेम्स आपोआप सुटतील  असे तिला वाटले, म्हणून तिने आत्महत्या केली होती.

विदर्भातले शेतकरी नेहेमीच आत्महत्या करतात. त्याची आता मिडीयाला इतकी सवय झालेली आहे की , त्याचे ’बातमी मुल्य’  शुन्य झाले आहे, आणि पेपर मधे त्याचा साधा उल्लेख पण नसतो. आज पर्यंत केवळ खेड्यातल्या शेतकऱ्यांमध्ये असलेला हा आत्महत्या करण्याचा मानसिक रोग हल्ली शहरातल्या लोकांमध्येही पसरला आहे.आयुष्याला कंटाळून आत्महत्या करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे.दोन उच्चवर्गीय स्त्रियांनी (त्यातली  एक चार्टर्ड अकाउंटंट) आपल्या रहात्या बिल्डींगच्या वरच्या मजल्यावरून, मुलासहीत  उडी मारून केलेली आत्महत्या पण उगाच मनाला चटका देऊन गेली.

ह्या सगळ्या आत्महत्यांच्या मागे एकच कारण आहे, ते म्हणजे महागाई!  महागाई वाढली म्हणून आपण हल्ली सगळेच ओरडा करत असतो. घराच्या काढलेल्या लोनचा वाढलेला हप्ता, पेट्रोल, कुकिंग गॅसचे वाढलेले भाव, भाजी-किराणा सामानाचे भाव- ह्या महागाईची झळ सगळ्यांनाच बसलेली आहे.पगार जरी वाढला तरी खर्च मात्र  त्या पेक्षा जास्त  प्रमाणात वाढल्याने सगळा मेळ बसवणे एकदम अवघड होऊन बसले आहे.

बाजारात मिळणारी प्रत्येक गोष्ट महाग झालेली आहे, आणि त्याची कारणं पण जागतीक , राष्ट्रीय किंवा प्रादेशिक असतात असतात असे म्हटले जाते. त्यावर आपला काहीच कंट्रोल नाही.  अमेरिकेचे  क्रेडीट रेटींग कमी झाले म्हणून आपला शेअर बाजार क्रॅश होणार, चांदी, सोन्याचे भाव एकदम वेड्यासारखे वाढणार. असो .

महागाई  वाढलेली असतांना हल्ली मुंबई आणि इतर शहरातही जागांचे भाव एकदम वर चढले आहेत. उपनगरातही एक लहानसा फ्लॅट घ्यायचा म्हटलं, तरीही ८० लाखा पासून तर कोटी रुपयांपर्यंत  भाव झाले आहेत.गेल्या वर्षभरापासून  भाव कमी होतील म्हणून ऐकतोय , पण बिल्डरलॉबी कडे असलेल्या पैशांमुळे  त्यांनी नेट  लावून जागांचे भाव वरच्या पातळीवर मेंटेन केलेले आहेत. थोडक्यात मध्यमवर्गीयांच्या हाताबाहेर गेले आहे घरं बांधणं.

पूर्वी पेट्रॊल टॅंक फुल केल्यावर १५०० रु. द्यावे लागायचे ते हल्ली २१०० पर्यंत द्यावे लागतात. तूर डाळीचे भाव काही महिन्यापूर्वी ४० रुपयांपासून एकदम ८० ते १०० पर्यंत गेले होते, ते अजूनही ७० च्या आसपास आहेत, मध्यंतरी कांद्याचे भाव पण असेच १०० रुपया  पर्यंत पोहोचले होते.

महागाई वाढली आहे म्हणून आपण सरकारने काही तरी केलं पाहिजे म्हणून म्हणत असतो, ते सरकारचं काम आहे यात संशय नाही, पण  केवळ सरकारला दोष देऊन गप्प बसण्यापेक्षा , त्याच सोबत आपण स्वतः काय करु शकतो हे पण पहायला हवे.

एक गोष्ट लक्षात आली  ती म्हणजे  बजेट!! खर्चाचं बजेट बनवून खर्च करणं हल्ली एकदम बंद झालंय. पूर्वी महिन्याच्या एक तारखेला रेडीओ वर गाणं लागायचं, खुश है जमाना आज पहली तारीख है.. कारण याच दिवशी लोकांचे पगार व्हायचे, आणि महिन्याच्या खर्चाचे बजेट बनवले जायचे. वाण्याकडले सामान, दूधवाला, शाळांची फी इत्यादी सगळे खर्च नीट लिहून त्या प्रमाणे केले जात असत. कशावर किती खर्च करायचा याचा विचार केला जात असे. गृहीणी खर्चाची बॅलन्स शिट तयार करत असे. हे केल्यावर कितीही कमी पगार असला, तरीही काही पैसा हा बाजूला शिल्लक पडलाच पाहिजे  या कडे गृहीणीचा कल असायचा. आजकाल ते बंद झालंय. कुठलाही विचार न करता, जसा वाटेल तसा , आपल्या खिशाचा विचार न करता खर्च करणे सुरु केले आहे आपण.

मी स्वतः मागच्या महीन्यात एक प्रयोग केला. महिनाभर सगळा  हिशोब लिहिल्यावर बऱ्याच गोष्टींसाठी विनाकारण केलेला खर्च माझ्या लक्षात आला. जो खर्च टाळता आला असता तो पण मी टाळला नाही असा! एकट्याला ऑफिसला जातांना कारने जाण्यात काय फायदा? विनाकारण तिनशे रुपये रोजचे खर्च करायचे ?  महिन्यात मी  मी सहा- सात  वेळा तरी कारने  ऑफिसला गेलो होतो  . म्हणजे १८०० रुपये पेट्रोल खर्च  झाला   ,तो वाचवता आला  असता. लाईटचे बिल हे महिन्याला साधारण  ३५० युनिट्स चं येतं, ते जर खोलीत कोणी नसतांना लाईट – पंखे बंद केले तर २५०  युनिट्स पर्यंत येतं हे पण अनुभवलं (मग बाबा हल्ली किती कटकट करातात, या अशा डायलॉग कडे दुर्लक्ष करावे लागतेच). बेस्ट ने विजेचा प्रती  युनिट  रेट्स वाढवले म्हणून ओरडा करण्यापेक्षा ( कारण फायदा काहीच नाही त्याचा ) विजेचा थोडा योग्य वापर   केला तरीही खर्च आटोक्यात ठेवला जाऊ शकतो हे लक्षात आलं.

भाजी आणायला गेल्यावर एकाच दुकानासमोर उभा राहून  दुकानदाराच्या हाता पिशवी देऊन, भाव न विचारता सगळ्या भाज्या न घेता , चार दुकानं हिंडून भाव करून भाजी घेतल्यावर जवळपास ३० टक्के तरी नक्कीच पैसे वाचले.

पूर्वी फक्त एक लॅंडलाइन फोन असायचा तो हल्ली प्रत्येकाच्या घरी चार पाच तरी मोबाईल असतात. फोनवर कामापुरतं बोललं तरीही  खर्च पण कमी केला जाउ शकतो. शिळोप्याच्या गप्पा मारायला फोन वापरणं बंद केलं. ऑफिस मधे बसलो असतानाही केवळ नंबर डायल करायचा कंटाळा येतो, म्हणून सेल वरून डायरेक्ट फोन करायचो ते फक्त बंद केले, मी आणि चक्क बिल  जे महिन्याला २१००- २५००  पर्यंत यायचे ते १६०० पर्यंत आलं.

प्लास्टीक मनी ( क्रेडीट कार्ड ) आल्यापासून जेंव्हा काही विकत घ्यायची इच्छा होते, तेंव्हा आपण ते विकत घेतो- पैसे खिशात नसले तरीही.  “ऋणं कृत्वा, धृतं पिबेत”, असं एक चार्वाक चं वाक्य आहे. त्याप्रमाणे आपण सगळे वागतो असे मला वाटते.खीशात  पैसे नसतांना पण आपल्याला काही कमी नाही, असा आव आणून कर्ज काढून ( क्रेडीट कार्ड ने )  खर्च करणे बंद केले तरीही बरीच बचत होऊ शकेल. ज्याच्या अंगावर कर्ज नाही, जो असलेल्या पैशात सुखाने चटणी भाकरी खाऊन  (शब्दशः अर्थ घेउ नये) दिवस काढू शकतो तो सगळ्यात जास्त सुखी असे मला वाटते.

एक लहानशी गम्मत, तुमच्या खिशातल्या पाकिटात किती पैसे आहेत असे विचारले तर मला वाटत नाही की तुम्ही सांगू शकाल ?  ,मला वाटत नाही. मी स्वतः पण सांगू शकणार नाही. खिशातली एखादी शंभराची नोट जरी काढून घेतली बायकोने तरीही लक्षात येत नाही . याचं कारण आपण पैशाची किंमत विसरलो आहे .जेंव्हा आपल्याला पैशाची किंमत लक्षात येईल, तेंव्हाच  त्याचा योग्य वापर करणे शक्य होईल.

बाहेर जेवायला जाणे हे आजकाल नेहेमीचंच झालं आहे. कधी बायकोला कंटाळा आला म्हणून तर कधी मुलांना काहीतरी खायचं आहे म्ह्णणून. दर महिन्याला जर हॉटेलिंगचा खर्च मुंबईला जर ३-४ वेळा गेलं, तर २ ते ३ हजार पर्यंत होतो ( व्हेज हॉटेल असेल तर )  तर तो नक्कीच कमी केला जाऊ शकतो, पण आपले खर्च तसेच ठेवायचे,   आणि मग महागाईला दुषणं द्यायची- असे आपण करतो.  वर दिलेली उदाहरणं फक्त  एक केस स्टडी  म्हणून दिलेली आहेत. या व्यतिरिक्त  अनेक गोष्टी आहेत ज्यांचा व्यवस्थित वापर केला तर खर्चावर नियंत्रण ठेवलं जाऊ शकतं.

आपण सरकारला पण दोष देतो- कारण ते सोपं आहे म्हणून!  पण हे असं करण्यापेक्षा थोडा आपला माईंड सेट बदलला तर जगणं एकदम सोपं होईल.  खर्चावर नियंत्रण ठेवा असे  माझे  म्हणणे नाही, पण जो  खर्च अनावश्यक आहे तो जरी  टाळला तरीही पुरेसे आहे.

काही लोकं जे खूप आशावादी आहेत ते म्हणतील , की तुम्ही आपलं महिन्याचं इनकम वाढवा, म्हणजे महागाईचा परिणाम होणार नाही तुमच्यावर. ते जरी खरं असलं, तरीही सहज शक्य नाही. आपल्या हातात जे   आहे ते  म्हणजे अनावश्यक खर्च टाळणं , एवढं जरी केलं तरीही  महागाईला सामोरा जाता येईल आणि आयुष्य सुसह्य होईल, आणि आत्महत्या करण्या सारखे  विचार मनात येणार नाहीत.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , . Bookmark the permalink.

34 Responses to महागाई

 1. Gurunath says:

  फ़ारच छान शैलीत अतिशय भेदक असले जमले आहे, प्लास्टीक मनी हा जगातला सर्वाधिक वाह्यात शोध असल्याचे वाटते कधी कधी….. ….., पेट्रोल तर दहा रुपड्यांचे घेऊन गाडी जाळायची इच्छा होते राव….. आधी बजेट (विद्यार्थी बजेट) मेस अन पेट्रोल अन रुम भाडे मिळुन ५००० मधे जमायचे पुण्यात (महिन्यात २ शनिवार टाईट होऊन सुद्धा) आता मेस पण बोंबलली अन पेट्रोल तर कधी काम असलंच तरच गाडीत टाकुन आणायचं!!! असलं झालंय, दिवसाला आधी एक शंभर ची पत्ती उडायची आता कमीत कमी १५० लागतातच डेली बेसीस वर!!!

  • गुरुनाथ
   महागाई तर वाढली आहेच, पण या विषयाच्या अनुषंगाने जे काही मनात आले ते लिहित गेलो. धन्यवाद..

 2. महेंद्रजी , ‘खर्चावर नियंत्रण ठेवणे’ हा तुमचा मुद्दा अगदी १००% पटतोय पण सध्या महागाई अशी आहे कि बहुसंख्य कुटुंबाना मिळत असलेल्या मिळकतीत त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करणे निव्वळ अशक्य होऊन बसले आहे . तुम्ही दोन -तीन गोष्टीतून ‘जी’ सेविंग होऊ शकते अस वर लिहल आहे ‘तेवढा’ मासिक पगार घेणारा मोठा वर्गही आहे समाजात… 😦

  • देवेंद्र
   मला फक्त जे काही आठ्वलं ते लिहिलं, प्रत्येकाच्या बाबतीत बचत करण्याचे प्रकार वेगळे असू शकतात. हे पोस्ट फक्त विचारांना चालना देण्यासाठी लिहिलं आहे. थोडा या दृष्टीने पण विचार करावा लोकांनी ंम्हणून..

 3. सी. रा. वाळके says:

  अगदी खरे! हे उपाय प्रत्येकाच्या हातातले आहेत आणि मनात आणले तर सहज जमू शकते. आजकाल वाह्यात खर्च बराच होतो. सवय म्हणा अथवा इतरांचे आपोपाप केले जाणारे अनुकरण म्हणा. जाहिरातींची भुरळ पडून पण आवश्यक नसलेल्या गोष्टींची ‘गरज’ निर्माण होते. 😉
  फारच छान लेख!

  • तुमचे म्हणणे खरे आहे. नसलेल्या गोष्टींची गरज जरी निर्माण होऊ दिली नाही, तरीही खर्चावर नियंत्रण ठेवले जाऊ शकेल..

 4. aniket says:

  अगदी शंभर टक्के खरे लिहिले आहे. आपणच आपला द्रुष्टीकोन थोडा बदलला पाहिजे. उगाच खर्च करण्यात काय अर्थ आहे. मी गेली ११ वर्षे नोकरी करत आहे, पण कधीही उगाच पैसे खर्च नाही केले. आज मला त्याचा उपयोग होतो. हे करायला थोडा वेळ लागतो पण जमते. एकदा जमले कि आवडू पण लागते. आणि जे पैसे तुम्ही वाचवता त्याचा सदुपयोग करा. ट्रीप काढा, छान छान चित्रपट बघा, बायकोला मुलांना चांगल्या गोष्टी घेऊन द्या, बरेच लोक पगार वाढला कि खर्च वाढवतात , ते अत्यंत चुकीचे आहे असे मला वाटते. शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे हा पण मग उगाच नंतर बोंबलू नये … महागाई वाढली म्हणून. माझ्या मते, जे पैसे आपण उगाच खर्च करण्यापेक्षा वाचवतो ते एक प्रकारचे उत्पन्नच असते.

  • अनिकेत
   पगार वाढला की खर्च वाढतात हे खरं आहे. त्यावर एक उपाय म्हणजे जितका पगार वाढतो त्यातला पन्नास टक्के तरी बचत करावा. अर्थात हे सांगणं सोपं आहे, पण करणं अवघड, तरीही प्रयत्न करायला हरकत नाही. बचतीची सवय लागली पाहिजे..!

 5. महेश कुलकर्णी says:

  सरकार महागाईला जबाबदार आहेच कारण त्याच्याकडे कुठलीही नियोजन नाही,, (आर्थिक),केवळ राजकारण सर्वजणकरीत असतात थोड्याफारप्रमाणात( विरोधीपक्षचे पण ) राजकारण ह्याला कारणीभूत आहे, टी व्ही वर चर्चा करताना मूळ प्रक्ष्न बाजूला राहतो व आरोप -प्रत्यारोपच चालू असतात,,(केवळ मनोरंजन)जो तो आपली चाबडी वाचवतो,लोकांनी (ग्रमीण किवा शहरी )आत्महत्या केली काय यांना त्याचे सोयरी सुतक नसते, लोकांनी आपल्या नियोजनात थोडयाफार प्रमाण बद्दल करून स्वताची काळजी घ्यावी,कुढल्याही राजकारणाची वाट बघू नये ,राजकारणी लोक (सरकार सुध्या ) आपली टिमकी (गाजराच्या पुग्गी )वाजवीत असतात,

  • सरकार महागाईला जबाबदार आहे यात शंका नाही. पण नियोजनात बदल करून आपणच स्वतःच्या पैशांची आणि स्वतःची काळजी घ्यावी. हे खरं

 6. RAJEEV says:

  jai 6 th pay comission

 7. mazejag says:

  Mala watat kaka ki tumhi ataryami aahat…karan jeva jeva, jya jya goshtinwar amchyat charcha kiwa chotekhani vaad zala aahe…nemka toch vishay 1 te 2 diwsat tumchya post rupane samor yeto…..co incidece solid aahe…pan dole nakkich ugaghdatat maze…..Thanks 🙂

 8. nitin godambe says:

  namskar kaka,

  aajach lekh far janivpurvak lihil ahe tyat tumhi lihilelya barik goshti sudha vichar karayala lavnara ahe
  mi sudha 2 mahinya pasun daindin kharch diary madhe note karto tyamule mala vayfal kharch talata yet ahe.
  ani bhaji ghenyasathi jevha mi bajarat jato tevha agodar market firun jethe bhaji changli va swast asel tethun gheto tyamule kay hot aapala khisa khush ani ghari mrs khush.

  Nitin Hodambe

  • नितीन
   माझा पण तसाच अनुभव आहे. एकदा लिहून ठेवणं सुरु केलं की लक्षात येतं कुठे चुकतंय ते..

 9. nitin godambe says:

  mafkara nav chukicha type zhal G ja jagi h type zhala

 10. काका तुमचे बचतीचे उपाय १०० % पटले.
  पण मला असे वाटते की महागाई नियंत्रणात आणणे हे सरकारचेच काम आहे. सरकार अनियंत्रित भाववाढ रोखू शकते . आत्ता वर जे उपाय सांगितले आहेत ते काटकसरीचे आहेत म्हणजे भाववाढ झाली आहे तर आपल्या गरजा कमी करा, खर्चात कपात करा आणि जे आहे त्याला सामोरे जा. असे आपण चैनीच्या गोष्टींबाबत करू शकतो पण ज्या आपल्या दैनंदिन गरजेच्या गोष्टी आहेत त्यांच्याबाबतीत काटकसर करायला लागणे हे सरकारच्या नाकर्तेपणाचे लक्षण आहे. तूरडाळ महाग झाली म्हणून आपण ती खायची सोडू शकत नाही नां? आपण तूरडाळ खाणे कमी करू शकतो किंवा त्याला पर्याय शोधू शकतो पण त्यालाही मर्यादा आहेत…. आणि असे आपण किती गोष्टींमध्ये करणार….?

  • दैनंदिन गरजेच्या गोष्टींबद्दल काटकसर करायला लागणे हे सरकारचे नाकर्तेपणाचे लक्षण आहे यात काही शंकाच नाही, पण आपण त्या वर काहीच करू शकत नाही.
   आपण काय करू शकतो हे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे. त्यामुळे तोच मुद्दा इथे घेतलाय लिहायला.

 11. geetapawar says:

  kharch chaan aahe leakh…

 12. smita says:

  tase barech upay ahet
  1)landline kadhun takala tari jamate
  karan pratyekakade phone ahet tyanch default bil 350 va250 ahe
  2)internet connection che swast barech paryay ahet
  3)kirana bhaji ani fale bayakola anayala sangave
  mahinyach fix rupaye tila dyave tyat ghar chalave sangave 🙂
  4)kapade sadya dress accessories var kami paise udhlavae june appliance vikun takavi
  5)car la lpg paravadate
  6)hoteling peksha gharun daba ghevun piknik kadhavi
  7)nonveg ghari banvun beer ghari pyavi
  8)kahina shoping chi savay aste ti ghalavavi
  thodkyat sadhi rahani uchch vicharsarani
  9)changalya sandhi sodu nayet bachti chya va paise investment chya
  te ek prakarach earningch ahet .plots,fund share shoping mol va ghare bhadyane dene

 13. हेमंत आठल्ये says:

  खुपच छान!
  बाकी जोपर्यंत हाताचा ‘पंजा’ महा’गाई’ला भ्रष्टा’चारा’चे खाद्य देत राहील तोपर्यंत हे असेच चालणार!
  एकूणच मनमोहन योगाचा आणि सीपीए(करपटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स)चा महिमा.

  • हेमंत
   पंजाच नाही, तर कमळ आणि इतर लोकंही त्यात गुंतलेले आहेतच.. कोणा -कोणाला नावं ठेवणार?

 14. पोस्ट वाचून बऱ्याच म्हणी आठवल्या तश्या ह्या म्हणी अमेरिकेची पत घसरली तेंव्हा पासून मनात येतच होत्या. आपल्या पूर्वजांनी जे जीवनाचे सूत्र सांगितले तेच आपण विसरलो आणि मग असा लोच्या होऊन जीवन उध्वस्त होते. हे झाले शहरी मध्यम माणसाचे तर शेतकऱ्यांचे प्रश्नच वेगळे आहेत.
  अंथरूण पाहून पाय पसरावे – ऎपत पाहून खर्च करवा नाव मोठे लक्षण खोटे – कीर्ती मोठी पण कृती छोटी .हात तोकडे पडणे कागदी घोडे नाचवणे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ – आपल्याच हातून आपल्या जातभाईंचे नुकसान होणे हपापाचा माल गपापा , बचती ने राष्ट्र मोठे होते कर्ज काढून गुंतवणूक नको! ऋण काढून सण साजरा करू नये”, ”हत्ती होऊन लाकडे फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खावी. .. उत्तम शेती, माध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. उद्योगाचे घरी रिध्दी सिध्दी पाणी भरी….उधारीचे पोते, सव्वा हात रिते. अंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं.- आगीशिवाय धूर दिसत नाही-आज अंबारी, उद्या झोळी धरी.आभाळ फाटल्यावर ढिगळ कुठे कुठे लावणार?ओल्या बरोबर सुके जळते. सगळी सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही”. आमदनी अठन्नी खर्चा रुपइया पैशाचे नाव अर्थ पण तो करतो मोठा अनर्थ (गोंदवलेकर महाराज) ..थेंबे थेंबे तळे साचे……………………..

 15. Ravindra says:

  Kaka, post khupach chhan zhali…
  Hya babtit majha anubhav asa ahe ki tumhi mahinyala compulsory saving karave…..Tya sathi ekach account madhun sagle savings che options sathi standing instructions devun thevto…mahinyala pagar ala ki tya account madhe thevdi rakkam transfer karaychi ani urlele paise mag itar kharcha sathi vaprayla kadhto.

  Me kuthe tari vachle hote ki apan sarey usually adhi karcha karto ani mag urlele paise save karto tya peksha apan adhi save karave ani urlele paise kharcha karave 🙂

  Baki money saved is money earned 🙂

  • पैसा वाचवला पाहिजे, सेव्हिंग केले पाहिजे, हे सगळ्यांनाच माहिती असते, पण बरेचदा कळतं पण वळत नाही अशी अवस्था होते.
   पगारातून सरळ पैसे वळते करण्याच्या स्टॅंडींग इन्स्ट्रक्शन्स देण्याचा उपाय पण चांगला आहे. आवडला. 🙂

 16. sandeep salunke says:

  all of mahni is very beautiful ……thank you

 17. sandeep salunke says:

  thank you…………………………………………………………….

 18. gopal patil says:

  Nice post sar

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s