भ्रष्टाचार

जर माझ्या पिढीतल्या लोकांना  असंतोषाचे जनक कोण हा प्रश्न विचारला, तर लोकमान्य टिळकांचे नांव सांगेल, पण त्याच प्रमाणे जर आजच्या तरुण पिढीला हाच प्रश्न विचारला तर   निर्विवादपणे अण्णा हजारेंचे नांव घेईल तो!  लोकांमधे विझलेली    असंतोषाची    भावना जागृत करून तिला अत्युच्च पातळीवर पोहोचवण्याचे काम अण्णा हजारे यांनी केलेले आहे.

या सगळ्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात सगळेच सहभागी होऊ इच्छितात. एक सांगा , कोणाला हवाय हो भ्रष्टाचार?   कुणालाच नको ! अगदी गरीबात गरीब माणसाला , किंवा श्रीमंत  माणसाला पण नको असतो .  पण तरीही भ्रष्टाचार सगळीकडे फोफावला आहे असे का?  

आज मात्र प्रत्येकच जण हा भ्रष्टाचारा मधे लिप्त आहे. लाच देणं म्हणजे भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यासारखंच आहे. कुठलंही काम असो , हल्ली लाच दिल्याशिवाय पुर्ण होऊच शकत नाही, म्हणून आपण लाच देऊन काम करून घेतो, म्हणजे भ्रष्टाचाराला खतपाणी  घालतो.

मी पाहिलेले बहूतेक स्वच्छ  भ्रष्टाचारी नसलेले लोकं, असे होते की ज्यांना ,  पैसे खाण्याचा चान्सच  नव्हता.  तुम्हाला पैसे खाण्याचा चान्सच नाही, आणि तुम्ही स्वतः  ’मी भ्रष्टाचारी नाही ’ म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेत असाल तर ते चुकीचे ठरेल.पण  जर एखादा माणूस   पैसे खाण्याचा चान्स असूनही पैसे न खाणारा असेल, तर तो  खरा ग्रेट.

कोण कोण आहे अण्णांच्या पाठीशी? सगळे!! एकजात सगळे लोकं आहेत.नोकरदार वर्ग, मजुर, तळा-गाळातला वर्ग,  डबेवाले, रिक्षावाले, विद्यार्थी, शासकीय कर्मचारी , काळा पैसा गाठीशी असलेले राजकीय नेते, (ज्यांनी स्वतःच आपल्याकडे असलेल्या  करोडो रुपयांच्या संपत्तीचा लेखाजोखा निवडणूक लढवताना आयोगाकडे दिलेला आहे असे. इथे असे विचारू नका, की त्यांच्याकडे ही अशी करोडॊ रुपयांची मालमत्ता कशी आणि कुठून आली आहे ते. ) तसेच सिनेमा ऍक्टर्स, जे नेहेमी एका सिनेमात काम करण्यासाठी करोडो रुपये इनकम टॅक्स वाचवण्यासाठी, काळा पैसा म्हणून घेतात ते पण अण्णांच्या लोकपालला सपोर्ट करताना पाहून हसू येतं.

काही दिवसापूर्वी एका सिनेमात  काम केवळ  एक रुपया घेऊन केले होते एका हिरोने,( मला वाटतं सिनियर बच्चन होता)  नंतर त्या सिनेमाच्या प्रोड्य़ुसरने  एक जवळपास  करोड रुपये किमतीची एक कार भेट म्हणून दिली होती. हा असा व्यवहार सरळ सरळ भ्रष्टाचार झालाय ( इनकम टॅक्स वाचवण्यासाठी) हे सांगतो-अगदी ओरडून सांगतो..

भ्रष्टाचारासाठी जबाबदार कोण? हा प्रश्न स्वतःलाच विचारा. तुम्ही- आम्ही सगळॆ हेच उत्तर तुम्ही द्याल आणि स्वताडन करून घ्याल.  पण खरंच तसं आहे का? आणि जरी तसं असलं तरी त्याला कारण कोण?

भ्रष्टाचारी लोकांचा पहिला प्रकार म्हणजे वर दिलेले राजनेते, अभि्नेते आणि “क्रिम डे ला क्रिम ” लोकं. ह्या लोकांना भ्रष्टाचाराची सवयच लागलेली असते.  कितीही पैसा असला तरीही अजून पैसा हवा, म्हणून हाव असते. यांच्या कडे इतका पैसा असतो की, ’ किती पैसे आहेत हो तुमच्याकडे ’? असे विचारले ,तर यांना सांगता पण येणार नाही.

दुसरे  म्हणजे आपल्यासारखे मध्यमवर्गीय-जे  प्रत्येकच ठिकाणी  अडवणूक केल्या गेल्यावर आपलं काम, करून घेण्यासाठी  लाच   देणारे,  म्हणजेच  भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे. आपण सगळे अगदी लो लेव्हलचा भ्रष्टाचार करतो. माणूस जितका मोठा , तितका त्याचा भ्रष्टाचार मोठा!

मला वाटतं की लाच द्यायला कोणालाच आवडत नाही. पण आपले ब्रिटीशकालीन कायदे इतके क्लिष्ट आहेत, की ते सामान्य माणसाला समजून घेणे अतिशय कठीण आहेत. नेमका याच गोष्टीचा सरकारी लोक फा्यदा घेतात.मग ते घराचे रजिस्ट्रेशन असो, की  ऍफेडेव्हिट असो.  रजिस्ट्रार कडे कुठलाही पेपरचे  रजिस्ट्रेशन करण्यासाठी लाच द्यावीच लागते. आरटीओ मधे पण तसंच! असे अनेक विभाग आहेत आपल्याकडे, जिथे भ्रष्टाचार हा हाडापर्यंत मुरला आहे -देणाऱ्यांच्या आणि घेणाऱ्यांच्या पण.

हे असंच होतं, एकदा लोकलचा मन्थली पास संपलेला होता, आणि वर दोन दिवस होऊन गेले होते. लोकल ने जात असतांना सहज आठवलं म्हणून पास काढला, आणि तारीख पाहिली तर ही गोष्ट लक्षात आली. जो पर्यंत तुम्हाला  तुमचा पास संपलेला आहे हे माहिती नसते, तो पर्यंत तुम्हाला पुर्ण कॉन्फिडन्स असतो, पण एकदा ही गोष्ट माहिती झाली की टीसी समोर तुम्ही उगाच घाबरता, आणि तुम्हाला ३ महिने  तुमचा पास व्हॅलिड असतांना ,एकदाही पास न विचारणारा तो  टीसी ,नेमका तुम्हालाच म्हणतो “पास दिखाओ?” आणि नंतर विना तिकिट प्रवास करणे, फर्स्ट क्लास मधे बसणे असे वेगवेगळे नियम लावून ८०० रुपये दंड मागतो- पूर्वी हा दंड ५० रुपये आणि तिकीटाचे पैसे इतका होता, तेंव्हा लोकं सरळ दंड भरायचे. पण दंडाची रक्कम वाढवल्यावर मात्र मांडवली करण्याकडे लोकांचा कल जास्त वाढला आहे. एखाद्या कडे पैसे नसतील तर   त्याच्या खिशात असतील नसतील तितके पैसे काढून घेऊन मग सोडून देतांना  टीसी दिसतात.

इथे एक गोष्ट लक्षात घ्या, भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचे काम जे आपण करतो ते नाइलाजाने. कोणालाच आवडत नाही भ्रष्टाचारी माणसाला आपले निढळाच्या घामाचे पैसे देणे!

मला एकदा सिग्नल जंपिंग साठी पकडले होते, तेंव्हा त्या पोलिसाने वेगवेगळे आकडे, जसे १८९, ४८३ वगैरे वगैरे ( आकडे काल्पनिक ) कलमान्वये मला किती शिक्षा होऊ शकते ते सांगितले.   फक्त शेवटी मला १८०० रुपये दंड होऊ शकतो असे त्याने सांगितले  . त्या चलान वर त्याने जे आकडे ( कायद्यातल्या कलमांचे ) भरले होते त्याचा अर्थ काय किंवा ते आकडे म्हणजे कुठल्या नियमाला रेफर करतात , हे काही मला  समजले नाही, पोल्युशन अंडर कंट्रोल केलेले नाही?? भरा १२०० रुपये दंड. तुम्ही लेन कटींग केली, द्या तुमचे लायसन्स आणि या कोर्टात उद्या दुपारी १२ वाजता! म्हणजे एक ’कॅज्युअल लिव्ह”वाया घालवा. हे सगळं करण्यापेक्षा मला त्या पोलिसाला १०० रुपये देणं कधीही सोपं वाटलं.

जर दंडाची रक्कम कमी केली , तर जागेवरच तुमच्या कडून पैसे घेऊन पावती दिली, तर तुम्ही कशाला भ्रष्टाचाराला उद्युक्त व्हाल?  पण तुम्हाला जास्तीत जास्त  त्रास कसा होईल? आणि तुम्ही कसे मांडवली करण्यासाठी उद्युक्त व्हाल? या कडे लक्ष देऊन कायदे केलेले आहेत असा संशय नेहेमी येतो मला , ब्युरोक्रसी ऍट ईट्स वर्स्ट!  .  लायसन्स साठी दुसर्‍या दिवशी कोर्टात जायचं म्हणजे सुटी गेली एक !!

मला वाटतं जर  दंडाची रक्कम अशी   अव्वाच्या सव्वा दंड न ठेवता   कमी केली, तर आपोआप भ्रष्टाचार कमी होईल. ही दंडाची रक्कम वेळोवेळी वाढवली जाते ती केवळ  जास्त लाच मिळावी म्हणून!

अधूनमधून सरकार या इनकम टॅक्स चोरून  वाचवणाऱ्या लोकांसाठी एक स्किम काढते, त्या मधे तुम्ही आपलं काळं धन उघड करा, आणि त्यावर टॅक्स भरा. तुम्हाला कोणी विचारणार नाही , की हे काळं धन तुम्ही कुठून आणलं ते.एक प्रकारे सरकारने काळ्या पैशाना गोरं करण्याची सुरु केलेली स्कीम.. इतका मूर्खपणा मी आयुष्यात पाहिलेला नव्हता. हे प्रकार हल्ली बंद करण्यात आलेले आहेत.

तुमच्या आमच्या सारख्या लोकांच्या जीवनात नेहेमी येणारे प्रसंग आहेत वर दिलेले. रेशन कार्ड, आरटीओ, वगैरे वगैरे कुठलेही डिपार्टमेंट जरी पाहिले तरीही हे असेच असते. दुसरा प्रकार म्हणजे राजकीय नेत्यांचे भ्रष्टाचार. स्वतःजवळ करोडो रुपयांची माया असली ,तरीही त्यांचे काही पैशाच्यावरचे प्रेम कमी होत नाही, आणि ते हजारो करोड रुपयांचा भ्रष्टाचार करतात.  भस्म्या रोग झालाय आपल्या नेत्यांना. ( भाजपा, कॉंग्रेस, शिवसेना, मनसे, सगळे आले यात)

भारतीय घटनेनुसार सगळ्या लोकांना सारखेच अधिकार आहेत असे म्हणतात. पण ते खरे आहे का?  नाही! बिलकूल नाही.  खाली काही उदाहरणं दिलेली आहेत.

दिवसातून चारदा टोल टॅक्स पार केला तर तुम्हा-आम्हाला प्रत्येक वेळेस पैसे भरावे लागतात, पण करोडो रुपये खाणारे राजकीय नेत्यांना मात्र  टोल टॅक्स माफ ! का??

एमपी/एमएलए  , लोकांना आयुष्यभर विमान प्रवास फुकट करण्यात आल्याचे पण कुठेतरी वाचले होते. रेल्वे चा प्रवास तर फुकट आहेच!! का? रेल्वे आणि विमान सेवा काय यांच्या तिर्थरुपांची आहे का?

सुप्रीम कोर्टाचा जज म्हणजे तर साक्षात ब्रह्म देव.. त्याच्यावर कधीच केस केली जाऊ शकत नाही. मध्यंतरी एका  सुप्रीम कोर्टाच्या जजच्या भ्रष्टाचारा बद्दल पण एक केस वाचण्यात आली होती.त्यात दोन जज ची नावं उघड केली गेली होती, तरीही त्यावर काहीच ऍक्शन घेतली गेली नाही. असे का?

– आणि म्हणे सगळे लोक समान आहेत! कायद्याप्रमाणे सगळ्यांना समान अधिकार आहेत!! 

अण्णांचं हे लोकपाल म्हणजे एक समांतर न्याय व्यवस्थ होणार असे वाटते. सध्या अस्तित्त्वात असलेली ज्युडीशिअरी सिस्टीम पण  इतकी पोकळ वासा झालेली आहे, की त्याच कायद्यांचाच जर आधार घेतला , तर लोकपालचा पण बहूतेक काही फायदा होणार नाही. मला वाटतं की आपले कायदे पुन्हा एकदा नवीन लिहिले जाणे आवश्यक आहेत.

कायदे, आणि वकील म्हणजे वेळकाढूपणा . कुठल्याही गोष्टीवर कोर्टा मध्ये निर्णय  कसा होऊ न देता ,  तारखा घेत वर्षानुवर्ष केस चालवत ठेवायची, हे   आपल्या वकिलांकडून शिकावे.

जशी  ज्युरी सिस्टीम बाकी देशात सुरु आहे, तशीच काहीशी सिस्टीम  आपल्याकडे आपण लोकपाल म्हणून आणतोय. कायदे तेच, वकील तेच, कोर्टाच्या  जज च्या ऐवजी लोकपाल!  अहो ,पण जर असे असेल तर मग लोकपाल म्हणजे पण  कोर्टा प्रमाणेच व्यवस्था होईल की नाही? फक्त थोडे जास्त अधिकार असलेली- पंतप्रधानापासून तर एमपी, एमएलए ला पण शिक्षा करू शकणारा ! तसाही, सामान्य माणूस एखाद्या मोठ्या माणसाला शिक्षा झाली की फार  खूश होतो. जसे सलमान खानला काळवीट मारले म्हणून झालेली शिक्षा, आणि त्याला जेल मधे रहावे लागले होते .. तो प्रसंग!

समजा ,एखादा लोकपाल करप्ट असला, आणि त्याने दिलेला निर्णय जर मान्य नसेल तर   त्याच्या निर्णयावर   अपिल करण्याचे प्रावधान असेल की की नाही ? जर तेच नसेल तर लोकपाल  म्हणजे राष्ट्रपती किंवा सुप्रीम कोर्टाच्या जज पेक्षा पण मोठा ठरेल.

लोकपाल मधे पंतप्रधान, एम पी आणि एमएलए यांच्यावर पण कारवाई करण्याचा अधिकार असायला हवा, म्हणून अण्णा हजारेंचे उपोषण सुरु आहे. सध्या मंजुरीला दिलेले लोकपाल बिल मागे घेण्यात यावे असेही अण्णा म्हणतात. हे बिल मागे न घेता, या मधे अमेंडमेंट्स केल्या ( पी एम आणि एमपी एमएलए  यात समाविष्ट करून ) तरीही चालण्यासारखे आहे. कारण एकदा बिल मागे घेतले की मग पुन्हा नवीन बिल  सरकार दफ्तरी रुजू  करायला कमीत कमी वर्ष तरी जाईल, आणि या संघर्षातील सगळी हवा निघून जाईल.

का कोणास ठाऊक, पण मला जयप्रकाश नारायण, महेंद्र सिंह टिकेत  आठवतात , पाच लाखाचा मोर्चा घेऊन राजधानीवर धडकणारे. पण नंतर त्यांचं जसं झालं, तसं अण्णांचं होऊ नये  असे सारखे वाटते. जो काही व्हायचा आहे, तो निर्णय लवकर झाला तरच काही तरी अर्थ आहे, नाहीतर रामदेव बाबा प्रमाणे दवाखान्यात नेऊन सलाइन चढवून  किंवा नाकातून ट्युब घालून अन्न सुरु करेल हे सरकार.

एक विचार मनात आला, की आजही बऱ्याच स्वायत्त संस्था ( शब्द बरोबर असावा)  जसे सीबीआय, ऍंटी करप्शन ब्युरो, निवडणूक आयोग  आणि तत्सम बऱ्याच काही , अस्तित्वात आहेत. ह्या संस्था सगळे ब्युरोक्रॅट्स चालवतात.  आजही कुठल्याही गोष्टीची चौकशी निष्पक्ष पणे करायची म्हटली की सीबीआय कडे तपासणी सोपवला म्हणजे त्यातल्या त्यात निष्पक्ष तपास होईल अशी  ८० टक्के तरी खात्री असते. इतके असूनही सीबीआय किंवा ऍंटीकरप्शन ब्युरोच्या कामगिरीवर ताशेरे ओढणारे आहेतच. ब्युरोक्रसी ही जो पर्यंत अस्तित्त्वात आहे तो पर्यंत, हे असेच चालणारच असे मला वाटते.या  संस्थांचे उदाहरण डोळ्यापुढे असतांना अशाच प्रकारची आणखी एक संस्था म्हणजे लोकपाल सुरु केल्यावर त्या संस्थेचे काय होईल हा प्रश्न आहेच.

हा लेख संपवता संपवता एक प्रश्न मनात येतो,  जर भ्रष्टाचार  खरच बंद झाला तर आपण  केलेल्या लहान लहान चुकांसाठी इतका मोठा दंड  खरच भरू शकू का?

मी हा लेख लोकपाल विधेयक बरोबर की नाही यावर लिहिलेला नाही. केवळ मला  भ्रष्टाचार या विषयावर काय वाटते हे लिहिण्यासाठी हा उपद्व्याप!! लेख फार मोठा झालाय ह्याची कल्पना आहे , पण मुद्दे इतके जास्त होते, की दोन पानात संपवू शकलो नाही.. क्षमस्व!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

54 Responses to भ्रष्टाचार

 1. सध्या रोजगार हमी कायद्याचे मराठीत भाषांतर करत आहे .पण ते भाषांतरही इतके क्लिष्ट आहे की ज्या ग्रामीण मजुरांसाठी तो आहे त्यांना मराठीतूनही त्याचा अर्थ लागणार नाही.त्यांना कायद्याने दिलेले अधिकार कसे कळणार?
  इथेच नोकरशाही आणी राजकारण्यांचे फावते.

  • हेमंत
   मराठी मधले शब्द रुळणे गरजेचे आहे. अजूनही मला बरेचदा लिहितांना मराठी शब्द सुचत नाहीत. सोप्या शब्दांमधे जर भाषांतर करण्यात आलं, तर सगळ्यांनाच तो कायदा समजू शकतो.
   जर कायदाच कोणाला समजत नसेल, तर नोकरशाहीचं फावतं हे खरं!

 2. दंड कमी केल्याने भ्रष्टाचार कमी होईल हे मुळीच पटलं नाही. उलट अशाने गुन्हे करण्याची प्रवृत्ती वाढेल. पीओसी नसल्याबद्दल किंवा लायसन्स नसल्याबद्दल समजा २०-३० रु दंडठेवला तर कोणीच पीओसी किंवा लायसन्स काढणार नाही. कारण २० रुपये दिले की झालं. उलट माझ्या मते जास्तीत जास्त दंड असायला हवा आणि टो योग्य रीतीने वसूलही केला जातो हे पाहायला हवं. आपण सतत अमेरिका किंवा तत्सम प्रगत देशातल्या लोकांचं कौतुक करतो किंवा तिथल्या वाहतूक व्यवस्था, कायदे इत्यादीचं कौतुक करतो. पण इअकादाचे लोकही कायदे पाळतात ते छोट्या गुन्ह्यांमागे असलेल्या जबर दंडाच्या भीतीनेच. आणि पुन्हा एखादा छोटा अपघात तुमचा इन्श्युरन्स प्रीमियम काही पटींनी वाढवू शकतो. थोडक्यात जबर दंड आणि इन्श्युरन्सच्या भीतीनेच नियम पाळले जातात इथे. आपल्या इथेही असं करून बघायला हरकत नसावी !

  • हेरंब
   भारता मधे जास्त दंड सांगितला, की चिरीमिरी देऊन सुटण्याची धडपड करताना लोक दिसतात. सगळे विभाग इतके करप्ट झाले आहेत की ते कुठलाही कायदा झाला की त्यातून स्वतःसाठी पैसे कसे काढता येतील ते पहात असतात.
   दंड जास्त केल्यावर जर तो वसूल केला जात नसेल तर जास्त दंडाचा फायदा लोकांना नियमाचे पालन करण्यासाठी उद्युक्त करण्यास होऊ शकत नाही. आपल्याकडे दंड वाढवला, तर चिरीमिरी वाढते- हे रेलवेच्या उदाहरणावरून लक्षात येते.

   इन्शुरन्स चा मुद्दा पटतो.

   • Ravindra says:

    Alternatively, the fine should not be in terms of money but should defeat the purpose of violating the rule. For e.g park the vehicle jumping the traffic signal for an hour, thereby the sole purpose of violating the traffic signal (lavkar jaychi ghai) will be defeated. This should be along with huge penalties to deter people from committing it.

    Baki corruption var kaal Nandan Nelkani che interview khup kahi topics var vichar karayla bagh padto. Pan ek nakki ki Annan chya andolanane samanya jante la ek platform milala ahe tyanchya bhavana vyakt karayala. His novel ways of protesting (dharna in front of the MPs & MLAs) should be lauded.

    Hey ithech thambu naye ani asech saglya bharatiyane pratyek goshti var jagruk rahilo tar we have good future.

    • रविंद्र
     जर नुसतं रस्त्याच्या कडेला एक तास उभं करून जरी ठेवलं, तरीही ती शंभर रुपयांपेक्षा जास्त शिक्षा वाटेल, आणि पुन्हा पुन्हा अशा चुका करण्याचे तो टाळे.
     अण्णांमुळे संपुर्ण भारतातली जनता एकत्र आली, हे याचे श्रेय. हीच वाटचाल पुढे अशीच चालू राहो , म्हणजे काहीतरी होईल.

 3. भ्रष्टाचार “मला चांगले हवे” या इच्छेपासून सुरू होतो. लोभ, मोह आणि आपण अगतिक आहोत किंवा आपण एकटे पडू नये अशी जाणीव देखील भ्रष्टाचार सहन करण्याच्या मुळाशी असते असा स्वानुभव आहे.

  • अभिजीत
   एकटे पडू नये ..!!
   लोभ आणि मोह- तर आहेच. सगळेच जण भ्रष्टाचाराने पैसे घेत असतील तर तसे वाटणे सहाजिक आहेच.

   बऱ्याच विभागात पैसा विभागून वाटला जातो. त्या मधे एकदम इमानदारी असते असे म्हणतात. पिडब्ल्युडी, वगैरे वगैरे.. डिपार्टमेंट्स मधे.

  • अजित
   आभार. इतका कमी दंड आहे हे मला माहीती नव्हते. पोलिस जेंव्हा पकडतो तेंव्हा नेहेमी घाबरवून टाकण्याचे काम करतो, आणि आपण शे दोनशे देऊन सुटायचा प्रयत्न करतो.

   • Ajit Ghodke says:

    इतका कमी दंड आहे हे मलाही माहीती नव्हतं. आता मीपण ठरवलं आहे की पुढच्या वेळेस जर पोलिसानं पकडलं तर जो काही रीतसर दंड आहे तो भरेन आणि पावती घेतल्याशिवाय हलणार नाही तिथून! कुठेतरी सुरुवात झालीच पाहिजे आपल्याकडून..

    • ्लहान मोठ्या गुन्ह्यांना कमी शिक्षा आहे, पण आपल्या अज्ञानाचा फायदा घेऊन ते घाबरवतात. फक्त पियुसी नसेल तर मात्र ६०० रुपये दंड आहे. ( पियुसी चा फायदा आहे की नाही, या गोष्टीचा विचार न केलेला बरा)

  • अभिजित says:

   अजित जबरदस्त माहिती. धन्यवाद . मला तर वाटते या पेजची प्रिंट मारुन प्रत्येकाने सोबत ठेवावी. पोलिसाने पकडल्यावर त्याला ती दाखवावी.

 4. ssjadhavdhav says:

  नमस्कार महेंद्रजी,
  आन्नांनी प्रत्तेकातला असंतोष तर जागा केला आहे, पण खरी गरज आहे ती आपण स्वतः आपल्यातील स्वाभिमान आणि देश प्रेम जागरुक करण्याची. तेव्हाच प्रगतीच मार्ग सोपा असेल.

 5. madhuri gawde says:

  samanya maanus dekhil bhrashtaachar madhe saamil asto, kaaran aata college admission che example bagha. ase kititari paalak aahet ki je aaplya palyaana kami percentage asun dekhil engg.side madhe admission milave mhanun collegena ekprakare laach det astaat. mala vaatle annanchya pathi asnare 25% to 50% lok bhrashtaachari aahet. pan tyala kaaran aaple sarkar. kaaran sadya A.Raja, Kalmadi, Kanimoli ase anek khaasdar turungaat aahet. kala paise asha anek goshi aata sahanshakti baaher aahet.
  pan male maatra praamanik pane vaatle ki yaat pantapradhan aani nyayapaalikecha samaavesh asu naye. kaaran he lokshahi la ghaatak aahe.

  • आपल्याकडे कुठल्याही विभागात करप्शन हे आहेच! मग ते शिक्षण विभाग असो, की नेव्ही, मिल्ट्री असो! लोकपाल विधेयकामुळे सगळ्यांवर कार्यवाही करता येणार आहे. पण माझा प्रश्न हा की, लोकपाल हा राष्ट्रपती पेक्षा पण मोठा असेल का? की सुप्रीम कोर्टाच्या जज पेक्षा पण मोठा असेल ??
   जर कायदे तेच असतील तर दोन वर्षात सुनावणी संपणे अवघड आहे. तरी पण बघु या काय होतं ते!

 6. मला असे वाटते की आपण फ़ार मोठा विचार करतोय. रोग्याला कॅंसर झाल्यानंतर डॉक्टर विचार करत बसण्यापेक्षा इलाज करणे सुरू करतो.

  अण्णाच्या आंदोलनाकडे उपाय शोधण्याची सुरुवात म्हणून पाहिले गेले पाहिजे. यातूनच उद्याचे मार्ग गवसतील. 🙂

  • गंगाधरजी
   खरंय हो, काही तरी तर होतंय, यातच समाधान मानायचं.
   जनता सध्या पूर्णपणे विटलेली आहे या करप्शनला. कधी तरी यातून बाहेर पडू आणि चांगले जीवन जगु अशी इच्छा प्रत्येकाच्याच मनात आहे. या सुप्त इच्छे ला अण्णांच्या आंदोलनाने, एक आशेचे किरण दाखवले आहे .

 7. प्रणव says:

  >> एक विचार मनात आला, की आजही बऱ्याच स्वायत्त संस्था ( शब्द बरोबर असावा) जसे सीबीआय, ऍंटी करप्शन ब्युरो, निवडणूक आयोग आणि तत्सम बऱ्याच काही , अस्तित्वात आहेत. ह्या संस्था सगळे ब्युरोक्रॅट्स चालवतात. आजही कुठल्याही गोष्टीची चौकशी निष्पक्ष पणे करायची म्हटली की सीबीआय कडे तपासणी सोपवला म्हणजे त्यातल्या त्यात निष्पक्ष तपास होईल अशी ८० टक्के तरी खात्री असते.
  — जर अशा संस्था आहेत तर मग आतापर्यंत भ्रष्टाचार एवढा का फोफावलाय? याचं खरा कारण मला वाटत कि अशा संस्थामध्ये असणारा राजकीय हस्तक्षेप… प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या सोयीप्रमाणे या संस्था चालवू पाहतो म्हणून मग आपल्या मर्जीतील लोक अशा संस्थात ठेवतात आणि एखाद्या हत्याराप्रमाणे यांना वापरतात.
  >>या संस्थांचे उदाहरण डोळ्यापुढे असतांना अशाच प्रकारची आणखी एक संस्था म्हणजे लोकपाल सुरु केल्यावर त्या संस्थेचे काय होईल हा प्रश्न आहेच.
  — लोकपाल हि या संस्थापेक्षा खूप वेगळ्या तर्हेने काम करेल ज्यामध्ये राजकीय हस्तक्षेप नसेल तसेच एखाद्या निर्णयासाठी वेळेचे बंधन असल्यामुळे कुठलाही निर्णय रखडणार नाही अशी आशा आहे.
  >> भ्रष्टाचारी लोकांचा पहिला प्रकार म्हणजे वर दिलेले राजनेते, अभि्नेते आणि “क्रिम डे ला क्रिम ” लोकं. ह्या लोकांना भ्रष्टाचाराची सवयच लागलेली असते. कितीही पैसा असला तरीही अजून पैसा हवा, म्हणून हाव असते.
  — ११०% खरं
  >> मला वाटतं जर दंडाची रक्कम अशी अव्वाच्या सव्वा दंड न ठेवता कमी केली, तर आपोआप भ्रष्टाचार कमी होईल. ही दंडाची रक्कम वेळोवेळी वाढवली जाते ती केवळ जास्त लाच मिळावी म्हणून!
  — उलटपक्षी दंड कमी केला तर नियम तोडणाऱ्यांची संख्या वाढेल कि हो काका… १००/- रुपये देऊन लायसन काढण्याएवजी, पकडेल तेव्हा दंड भरून मोकळा होईल कोणीही!!! त्यापेक्षा जसा परदेशात असता कि तुम्ही तीन वेळा नियम मोडलात; अपघात केलात तर लायसन काही कालावधीसाठी किंवा कायमस्वरूपी जप्त…

  — प्रणव

  • प्रणव
   या सगळ्या स्वायत्त संस्था ज्या प्रमाणे ब्युरोक्रसी मधे काम करू शकत नाहीत, तशीच तर अवस्था लोकपालाची पण होणार नाही ना? ही भिती वाटत होती मला. म्हणून ते वाक्य!
   दंड कमी केला तरीही कोणी दंड भरणे पसंत करणार नाही. लायसन्स नसताना कार चालवणे ह्या गुन्ह्यामुळे एखाद्याचा जीव पण जाऊ शकतो. अशा गुन्ह्याला शिक्षा किंवा दंड भरपूर असावा, पण साधे नकळत घडणारे गुन्हे, जसे पास संपलेला असताना रेल्वेने प्रवास वगैरे, लेन कटींग, पियुसी, वगैरे॰साठी मात्र दंड कमी असावा असे वाटते.

 8. Gurunath says:

  सगळ्यांच्या खुंट्य़ा कुठेतरी अडकल्या आहेत, निलाजरेपण अन अगतिकता ह्याच्यामधले आंदोलन म्हणजे भ्रष्टाचार!!!!!!!……..

 9. मनोहर says:

  लोकपाल ज्या कायद्यांच्या आधारे भ्रष्टाचार झाला अथवा नाही हे ठरविणार ते कायदे आताही अस्तित्वात आहेत. लोकपालाच्या निर्णयाला कोर्टात आव्हान दिल्यावर भ्रष्टाचारी सुठून जाऊ शकतील.

  • हो, मलाही हिच शंका आहे. चोरी, खून, दरोडे याबद्दल कायदे अस्तित्वात आहेत पण तरीदेखील ह्या प्रकारांना आळा बसलेला नाही. कसाबसारख्या दहशतवाद्याच्या शिक्षेची अंमलबजावणी आपण करू शकत नाही तर नविन कायदे करून काय फायदा? आपण जर आहेत त्या कायद्यानुसार जरी कठोर कारवाई केली तरी खूप फरक पडेल. गुन्हेगारांवर कायद्यापेक्षा शिक्षेच्या अंमलबजावणीची भीती हवी.

   • मनोहर, सिद्धार्थ
    लोकपालाच्या निर्णयाला आव्हान करता येईल का+ हे अद्याप क्लिअर झालेले नाही. जर लोकपालच्या निर्णयाला कोर्टात आव्हान करता आले तर, त्याची केस कमीत कमी ४०-५० वर्ष पण चालू शकते, आणि दोषी व्यक्तीला शिक्षा देण्याचा मूळ उद्देश पूर्णपणे खुंटतो.

 10. भ्रष्टाचाराच्या बाबतीत माझा अजून एक अनुभव असा की RTO, कलेक्टर ऑफिस, पासपोर्ट ऑफिस अश्या ठिकाणी आपण नेहमी नेहमी जात नाही. लायसन्स, पासपोर्ट, नॉन क्रिमिलीअर असो किंवा कलेक्टर ऑफिस मध्ये जावून काढावे लागणारे सर्टिफिकेट हि कामे आपण एकदाच करतो, त्यानंतर १५-२० वर्षांनी ती Re-new करावी लागतात. तिथले फॉर्म भरणे आणि इतर लोकाभिमुख प्रक्रिया तश्या किचकट आणि वेळकाढू असतात, किंबहुना तश्या किचकट केलेल्या असतात. आत्ता सगळ्यांनाच काम धंदे असतात त्यामुळे बरेचदा आपण २००-४०० रुपये देवून आपले काम करून घेतो. पण जर सगळी माहिती काढून, पुरेसा वेळ देता आला तर हि कामे आपण करू शकतो. मी एजंट न वापरता माझ्या लायसन्सचे काम पूर्ण केले होते पण अर्थातच सगळ्या खिडक्यांवर चौकशी करून, रांग लावून, चुका झालेला फॉर्म दोनदा भरून. एक दिवस रजा लागली. पण हे एकदाच घडले. पुन्हा कधी शक्य झाले नाही.
  दंडाच्या बाबतीत म्हणाल तर हेरंबचा मुद्दा पटला. माझेच घ्या नां, बाईक चा इन्शुरंस आणि PUC दोन्ही मार्चमध्ये संपले आहेत पण आज करू उद्या करू करीत पाच महिने झालेत. दंडाची भीती मनात असली की कामे बरोबर होतात. साधेच उदाहरण द्यायचे तर लाईट आणि टेलिफोनची बिले कशी लाईन कट होण्याच्या आत बरोब्बर भरली जातात.

  • सिद्धार्थ
   पियुसी पेक्षा इन्शुरन्स महत्त्वाचे आहे. कारण जर कोणाचे काही नुकसान झाले, तर त्या साठी तुम्हाला स्वतःच्या खिशातून पैसे द्यावे लागतील. पोलिस केस जर झाली तर फार महागात पडेल. इन्शुरन्स मस्ट आहे! बरेच कायदे हे आपल्या सेफ्टी साठी असतात, त्यातलाच हा वाहनाच्या इन्शुरन्स चा.

   क्लिष्ट केलेले फॉर्म्स जर सोपे केले तरीही त्रास आणि एजंटशाहीला आळा बसेल.

 11. खरतर जोवर आतून तुम्हाला भ्रष्टाचाराबद्दल काही वाटत नाही आणि प्रत्येक जण स्वतः जेव्हा ह्यासाठी कटिबद्ध होईल,तशी मानसिकता निर्माण होईल तेव्हाच त्याची पाळेमुळे इथून उघडता येतील अन्यथा जन लोकपाल वैगेरे जेवढ वाटतेय तेवढ काही करू शकणार नाहीये… त्या आयोगातले लोकही भ्रष्टाचारी होणार नाहीत कशावरून… अनेक सरकारी सेवांची जी गुंतागुंतीची कार्यपद्धती आहे ती सुद्धा भ्रष्टाचाराला पोषक आहे तीच्या बद्दलही सर्वांगीण विचार व्हायला हवे….

  • देवेंद्र
   भ्रष्टाचारा बद्दल प्रत्येकाचे एकच मत असते, ते म्हणजे जो काही करायचा तो मी करेन, इतरांनी मात्र स्वच्छ चारित्र्याच रहायला हवं.

 12. amol says:

  उत्तम लेख आहे…विचारांशी सहमत आहे

 13. महेश कुलकर्णी says:

  लेख उत्तम झाला, लोकपाल बिल लोकांना माहित नाही ते कसे आसवे हे सुध्या लोकांना माहित नाही,पण सर्व लोक भष्ट्राचारसाठी एकत्र आहे ,हे काही थोडे नाही खर म्हणजे देऊ पण नये,व घेऊ पण नये, हीच मुख्य बाब आहे,लोकांमध्ये जागृती झाली व त्यामुळे अण्णांनापाठीबा मिळाला आहे,,मुख्य म्हणजे कायदा जरी केला तरी त्याची अंमलबजावणी कठोर झाली पाहिजे,

  • महेश
   मला पण वाटत होतं, की असलेले कायदे जरी आपण नीट पाळले, तरीही भ्रष्टाचार कमी होऊ शकतो. पण आपले कायदेच इतके लवचिक आहेत, की जर ह्याच कायद्यांवर विसंबून निवाडा करण्याचे ठरवले,तर वेगळं काही होईल अशी अपेक्षा कशी करता येईल?
   असलेल्या कायद्यांची जरी अंमलबजावणी कठॊर केली तरीही पुरेसे आहे! पण तेच होत नाही, म्हणून तर अण्णांना इतका पाठींबा मिळतोय.

 14. Nilesh B. says:

  “मी पाहिलेले बहूतेक स्वच्छ भ्रष्टाचारी नसलेले लोकं, असे होते की ज्यांना , पैसे खाण्याचा चान्सच नव्हता. तुम्हाला पैसे खाण्याचा चान्सच नाही, आणि तुम्ही स्वतः ’मी भ्रष्टाचारी नाही ’ म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेत असाल तर ते चुकीचे ठरेल.पण जर एखादा माणूस पैसे खाण्याचा चान्स असूनही पैसे न खाणारा असेल, तर तो खरा ग्रेट.”
  Like this….
  We really want to ask our-self abt this, If we are in service or in Job where we get chance to get big bribe how many of us we denies to take bribe, its easy to say “we will not take bribe” but how long we can control our self to avoid taking bribe, if our colleagues taking bribes and becoming rich , in some point of time we will also become one of them.
  we really want to think abt this.

  • निलेश
   स्वतःवर कंट्रोल असायलाच हवा. जर आपण स्वतःच असे भ्रष्टाचारी होऊन वागायचे ठरवले तर इतरांना बोलायचा काय अधिकार आहे आपल्याला?हे अर्थात खूप कठीण आहे. पण अशक्य नाही हे पण तेवढंच खरं!

 15. महेन्द्रजी, लेख अप्रतिम….. तुमचं म्हणणं खरं आहे. राजकारणी, अभिनेते वगैरे वगैरे कोणतीही प्रत्यक्ष गुंतवणूक न करता अफाट पैसा असलेल्यांची संपत्तिची हाव म्हणाल तर त्याला जबाबदार आपणच नाही का? आपण सर्वच मोहाचे बळी आहोत आणि मध्यमवर्गी माणसाचं वेळ वाचवणं ही काही त्याची अगतिकता तर असू शकत नाही ना? आपण सारेच आपला मोह दडवण्यासाठी वेळ वाचवण्याचं ढोंग करत असतो. अहो जीवन-मरणाच्या प्रसंगात असा वेळ वाचवला तर ती अगतिकता मान्य आहे हो!, पण स्वतःच्याच कामासाठी एक दिवसाची रजा खर्चीक वाटत असेल तर काय म्हणावं? भ्रष्टाचार हा काही करवला जात नाही, तो आपण समजून-उमजून करत असतो. “मी अण्णा हजारे” असं केवळ कपाळावर मिरवून भ्रष्टाचार मिटणारा नाही. त्या करता अण्णा बनावं लागेल. उद्या आंदोलन शंभर टक्के यशस्वी झालं तरी त्या लोकपाल अथवा लोकायुक्ता समोर जाण्याकरता पुन्हा रजा नाही का काढावी लागणार? प्रत्येकालाच शिवाजी शेजार्‍याच्या घरी जन्माला यायला हवा असतो. परमेश्वर करो आणि ह्या वेळी सर्वांना अण्णा हजारे स्वतःच्या घरी जन्माला यावासा वाटो.

  • एक दिवसाची रजा खर्च करूनही काम होईल असे नाही. तुम्हाला पुन्हा तारीख देऊन नंतर बोलावले जाते. ( अनूभव आहे हा माझा)
   कोर्टात जाऊन पैसे भरण्यापेक्षा पोलीस चौकीवर जसे टो केलेली कार परत घ्यायला आपण ३०० रुपये भरून पावती घेतो, तसेच अशा लहान सहान गुन्ह्यांसाठी पण पोलिस चौकीवर काउंटर उघडले जाऊ शकते. कायद्या मधली पण ब्युरोक्रसी बंद केली तरी बरंच सुसह्य होईल.

 16. geetapawar says:

  hi sir.
  aajcha lekha munje aagdi aam aadmichya hitacha aani tyacya parsticha aahe mala khup aawdla………. nice sir…….. tumche mat kharach kuthech chukat nahi khaas karun RTO office baddal je namud kele te.

 17. http://onpoint.wbur.org/2011/08/25/hunger-strike

  Nice discussion. The problem is not as simplistic as team Anna projects. For every finger that we point at system, three fingers point at we the people.
  The corruption that we face on day to day basis is perpetrated on us by common people like us, the cops, the government employees are common people like us.

  Its just that when we have common people don’t mind violating rules flagrantly in our day to day lives expect morality and ethical behavior from our Politicians and beaurocrats…

  Take time to listen to the podcast.

 18. Aparna says:

  काका, या विषयावरचा लेख मोठाच होणार…मी स्वतः हेओ आणि सिद्धार्थबरोबर सहमत आहे…
  स्वयंशिस्त जी आपण पाश्चिमात्य देशात पाहातो ती आपण अंगी बाणवणे महत्वाचे आहे…कारण सुरुवात आपल्यापासुन होते न? बाकी तुम्ही सगळं कव्हर केलंच आहे…

 19. Priyan says:

  हा भ्रष्टाचार मुळापासून उपटून टाकायला आपला लेख अत्यंत उपयुक्त आहे. आपले अभिनंदन. २०२० सारखे एक टारगेट ठरवून तोपर्यंत हा भ्रष्टाचार किंचीतसा देखील राहणार नाही याची तयारी आजपासूनच सुरु करायला हवी.

 20. priyan says:

  धन्यवाद. मला अस वाटत आहे भ्रष्टाचार सर्वांनी सोडायला सुरुवात केलं असणार.

 21. geetapawar says:

  aase bolun aaplayach manala samadhan karu ghave…………………………… aase mala waatae………….. samnya manusa pasun desh brast hoto he visrun chalnaarnahi………………..

 22. amey says:

  jevha brastachar sampel tevha bharat kharokhar swatantra hoil.

 23. suraj makode says:

  you are a briliant

 24. suraj makode says:

  ganesh festival sathi ya madhil thode vichar, ganesh mandlani pradarshanat mandle tar ajun lokana mahiti hoyel

  • सुरज
   ब्लॉग वर स्वागत.
   ह्या गोष्टी सगळ्यांनाच ठाऊक आहेत, फक्त प्रत्येकाला वाटतं की भ्रष्टाचार हा मी एकट्यानेच करायचा, आणि बाकी सगळ्यांनी मात्र अगदी काटेकोर पणे नियमाने वागायचे.. असो.
   प्रतिक्रियेसाठी आभार.

 25. suchita says:

  marathi lekhat english che shabdha kashala hawe aahet. aapla lekha ha purna marathi bhaishikan sathi aahe na. chans la marathi madhe sandhi aase mhantat. tasa lekha khup chan aahe.

  • सुचिता
   ब्लॉग वर स्वागत. मी शक्यतो मराठी शब्दच वापरायचा प्रयत्न करतो, पण बरेचदा लिहित असतांना शब्द सुचत नाहीत, तेंव्हा प्रचलित असलेले शब्द वापरले जातात.
   प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s