जर तुम्हाला आज सांगितलं , की भारताच्या एका भागाला स्वातंत्र्य फार पूर्वी मिळालं होतं, आणि त्या स्वतंत्र हिंदुस्थान देशाला जवळपास सात देशांनी मान्यता दिली होती – ज्या मधे चीन,इटली आणि जर्मनी हे देश पण होते तर तुम्हाला खरं वाटेल??अर्थात नाही!!
कारण काही नेत्यांना , की ज्यांचा अहिंसेच्या चळवळीवर अजिबात विश्वास नव्हता, आणि जे म्हणत होते, की आम्हाला स्वातंत्र्य देणारे हे ब्रिटीश कोण? आम्ही तर स्वतंत्र आहोतच! त्यांची आठवण आपण सगळे पूर्णपणे विसरून गेलेलो आहोत. महापुरुषांच्या जिवनातला एखादा प्रसंग, किंवा एखादं वाक्य वेळोवेळी शाळेमधल्या त्या नेत्याच्या जयंती किंवा पुण्यतिथीला आळवतच आपण मोठे होतो. केवळ शाळेत शिकायचे म्हणून या नेत्यांची चरित्रं वाचणारे आपण- केवळ काही इतिहास महापुरुषां पुरताच आपला अभ्यास मर्यादित ठेवतो. आजही “स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे, ” हे वाक्य किंवा ” मी शेंगा खाल्ल्या नाहीत म्हणून टरफलं उचलणार नाही ” असे वाक्य आठवते लोकमान्य टिळक आठवले म्हणजे.लोकमान्य टीळकांनी एवढंच काम केलं का? असो..
सुभाषचंद्र बोस!! ह्यांचं नांव घेतलं की फक्त ” तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा” एवढंच माहीती आहे यांच्या बद्दल. स्वातंत्र्यवीर सावरकर काय किंवा सुभाषजी असो, काही नेत्यांना कॉंग्रेसने मुद्दामच जनमानसात रुजू दिले नाही. आज शाळे मधे नेहेरू, गांधी वर धडा असतो. सचीन तेंडूलकर, धोनी ते कपिल देव पर्यंत क्रिकेटर्स वर धडे असतात, पण ……….. असो..
या नेत्यांचं कार्य फक्त वर दिलं तितकंच आहे का? सुरुवातीला महात्मा गांधींच्या विचाराने प्रेरित होऊन स्वातंत्र्य संग्रामात उतरलेले नेताजी १९३७ मधे कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. नेमकी त्याच काळात दूसऱ्या महायुद्धाची सुरुवात झालेली होती. कॉग्रेस मधे पण सगळी अंदाधुंदी माजलेली होती. त्या मधे पण दोन गट पडले होते. एकाचं म्हणणं होतं, की इंग्लंडला जर्मनी विरुद्धच्या युद्धात सहाय्य करावे, तर दुसरी विचार धारा अशी होती, की इंग्लंड म्हणजे आपला शत्रू, आणि शत्रूचा शत्रू म्हणजे आपला मित्र- म्हणजे जर्मन आपला मित्र -तेंव्हा जर्मनीला सहाय्य करावे, आपले हे विचार उघडपणे मांडल्यावर ते अर्थातच तत्कालिन कॉंग्रेसी नेत्यांना आवडले नाहीत, आणि इंग्रज सरकारला पण , आणि म्हणूनच नेताजींना भारत सोडून बाहेर जावे लागले होते.
जर्मनी ला आपला मित्र मानल्यावर , नेताजींनी त्यांच्या कडे मदतीसाठी जायचे ठरवले, त्या साठी प्रवास कसा केला ती पण रोचक कहाणी आहे. त्याच दिवसात एक परिषद भरली होती, जपानमधे. पूर्वोत्तर आशियामधल्या सगळ्या भारतीयांना एकत्र करण्याचे काम रासबिहारी बोस करत होते. रास बिहारी हे खरे तर भारतीय, पण जपानमध्ये एका जपानी स्त्री बरोबर लग्न करून स्थाईक झालेले! अर्थात या परिषदेचे अध्यक्षपद पण त्यांच्याकडेच होते. इंडीयन इंडिपेंडन्स लिग या संस्थेने सगळ्या भारतीयांचे प्रतिनिधित्व करावे असे या परिषदेत ठरले. तसेच मोहन सिंग यांनी जपानची मदत घेऊन, भारतीय सैनिकांचे एकत्रीकरण करावे असाही ठराव करण्यात आला-तो दिवस होता १ सप्टेंबर १९४२ – आझाद हिंद सेनेच्या स्थापनेचा दिवस. याच काळात आझाद हिंद सेनेची जबाबदारी पेलण्यासाठी समर्थ माणूस हवा मग नेताजीं शिवाय दुसरा कोण?? म्हणून नेताजींना (तेंव्हा ते जर्मनीला होते)जपानला बोलावण्यात आले.
सुभाषचंद्र बोस यांनी जेंव्हा शत्रूचा शत्रू मित्र या नात्याने जर्मनीला सपोर्ट केला होता, त्या काळात नेताजींच्या जिवाला अर्थातच धोका निर्माण झाला होता. तेंव्हा त्यांनी जर्मनीला जायचे ठरवले. कलकत्ता ते जर्मनी पर्यंत त्यांनी केलेला प्रवास म्हणजे पण एक मोठी संघर्ष यात्राच होती. कलकत्त्याहून निघाल्यावर महंमद झियाउद्दीन नावाने ते रेल्वेने पेशावरला गेले , तिथून पुढे काबूल पर्यंतचा प्रवास बस, कार, आणि पायी पूर्ण केला.
एकदा काबूलला पोहोचल्यावर मात्र तिथून विमानाने ’ओर्लांदो मान्झोत” या नावाने जर्मनीला विमानाने गेले. तिथे गेल्यावर त्यांना रासबिहारी बोस यांचा निरोप मिळाला, आणि ते जपानला जायला निघाले.
कील ते साबांग पाणबुडीने आणि पुढे टोकीयो पर्यंत विमानाने प्रवास केला त्यांनी .जर्मनीतून जपानला जाण्यासाठी, सरळ रस्ता होता, पण पकडले जाण्याचे चान्सेस जास्त होते, म्हणून सरळ सरळ न जाता, युरोप आणि आफ्रिका खंडाला वळसा घालून ते जपानला गेले होते. ह्या प्रवासाला जवळपास ८८ दिवस लागले त्यांना. इतका थ्रिलिंग प्रवास वाटतो वाचतांना, पण जिवाची भिती, जागत मोस्ट वॉंटॆड स्टेटस मधे असा प्रवास करणं म्हणजे तारेवरची कसरतच.
इथेच सगळं संपत नाही. इकडे जपान मधे आशि्यन भारतीयांच्या एकीकरणाचे प्रयत्न रासबिहारी यांनी सुरु होते. आझाद हिंद सेनेचा नेता म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. या सेने मधे जपानने सोडलेले युद्धकैदी,मलेशियातले प्लांटेशन वर्कर्स, आणि इतर भारतीय लोकं होते ज्यांना भारतासाठी काही तरी करायची इच्छा होती .
सिंगापूरला एकदा सैनिकांशी बोलताना तेंव्हा नेताजी म्हणाले होते, “मी तुम्हाला उपासमार, भूक , तहान, कष्ट आणि मृत्यु फक्त देऊ शकतो पण तरीही आपण पुढे जाण्यासाठी लढणारच आहोत”. हिंदू स्थानाच्या स्वातंत्र्या शिवाय सध्या दुसरी कुठलीही गोष्ट महत्त्वाची नाही. फौज पुरेशी नसल्याने, जो पर्यंत हिंदुस्थानचे सरकार तयार केले जात नाही, तो पर्यंत आझाद हिंद सेनेला ’मुक्ती सेनेचा’ दर्जा मिळणार नाही याची जाणीव त्यांना होती. जपानचे पंतप्रधान ताजो ह्यांच्याबरोबर बोलणी करून स्वतंत्र हिंदुस्थानचे सरकार पहिले सरकार स्थापन केले. तो सुवर्ण दिवस होता २१ ऑक्टो १९४३.भारताचे पहिले सरकार!! .नेताजींनी दिलेली ’जय हिंद’ घोषणा ही त्याच काळातली, की जी आजही तितक्याच आवेशात घेतली जाते.
या सरकारने काय मिळवलं? हा प्रश्न किंवा नेताजींनी सरकार स्थापनेची घाई केली का? हा प्रश्न तुर्तास बाजूला ठेऊ. इथे कोणाचं चुकलं, की बरोबर आहे हा मुद्दा घेतलेला नाही- . याचे चर्विचवर्वण करण्यासाठी बरेच लोकं आहेत. या सरकारला मान्यता केवळ तीन दिवसात चीन, ब्रह्मदेश, जपान , थायलंड, जर्मनी ,इटली आणि इतर काही देशांनी मान्यता दिली होती ही गोष्ट महत्त्वाची.. मला वाटतं की हा एक पूर्ण पणे योग्य दिशेने चालणारा लढा होता.
जपानचे पंतप्रधान ताजो हे तर सुभाषबाबूंच्या बरोबर होतेच. त्यांनी ५ नोव्हेंबर १९४२ रोजी आझाद हिंदूस्थानला स्वतःचा म्हणून एक लहानसा भूभाग नेताजींच्या स्वाधीन केला- तो भाग म्हणजे अंदमान , निकोबार हा द्विप समूह! नेताजींचे मत होते, की आम्ही स्वतंत्र आहोतच, आम्हाला स्वातंत्र्य देणारे हे ब्रिटीश कोण?? ही भावनाच या लढ्याचा कणा होती. सरकार स्थापन केल्याबरोबर तिन चार दिवसातच इंग्लंड बरोबरचे आपले युद्ध घोषित करण्याचा आत्मविष्वास केवळ नेताजीच्या मधेच असू शकतो.
आता वेळ आली होती ती प्रत्यक्ष युद्धाची!जपानी सैन्याच्या मदतीने एक मोहीम आखण्यात आली. त्या अंतर्गत ’आझाद हिंद सेनेचे’ तीस हजार सैनिक रंगून येथे येऊन पोहोचले. रंगून ते इंफाळ म्हणजे फक्त दऱ्या खोऱ्यांचा भाग. या भागातून कोणी येऊच शकत नाही, हा आत्मविश्वास होताच ब्रिटिश सैन्याला. त्यामुळे या भागाकडे थोडे दुर्लक्षच झाले होते ब्रिटिशांचे. याचा फायदा घेत , जवळपास दोनशे ते अडीचशे किमी अंतर आझाद हिंद सेनेच्या जवानांनी दऱ्याखोऱ्यातुन चालत पार केले.एक आठवडा लागला हे इतके अंतर कापायला. पण ही सेना पोहोचली आणि इंफाळला वेढा घातला.
कोहिमा पर्यंतचा भाग जपानच्या जपानची ३३वी डिव्हिजन च्या मदतीने ताब्यात घेतला. इथून पुढे थोड्याच अंतरावर इंफाल होते,सैन्याची मनःस्थिती अतीशय उत्कृष्ट होती. इथपर्यंतचा प्रवास खूप सरळ सरळ कुठेही न अडखळता झाला होता.
ताजो , जपानचे पंतप्रधान म्हणाले होते, की हा भूभाग आमच्या अखत्यारीत आलेला आहे, आणि आता याचे प्रशासन आणि नियंत्रण आम्ही ’आझाद हिंद सेने’ कडे सोपवणार आहोत.या भागाचे प्रशासक म्हणून आझाद हिंद सरकारने आपले श्री ए सी चटर्जी यांची नेमणूक केली होती.मणिपूर आणि आसामचा सिल्हट मधला बराचसा भाग आता आझाद हिंद सरकारच्या ताब्यात आला होता.
इंफाळ एकदा आपल्या हातून गेले की आपले या भागावरचे नियंत्रण कमी होणार ह्याची पूर्ण जाणीव ब्रिटीश सरकारला होती. त्या मूळे या पुढे काहीही झाले तरीही इम्फाळ हातून जाऊ द्यायचे नाही, म्हणून ब्रिटीश सरकारने आपले ६० हजार सैनिक तिथे आणून उभे केले. अशा परिस्थितीत इंफाळ काही सहजासहजी हाती येणार नाही याची जाणीव झाली होती नेताजींना.
लेफ्टनंट कर्नल रेन्या मितागुची हा जपानी अधिकारी हा जपान्यांचा मुख्य लष्करी अधिकारी. इथे जर आपण गेलो, तर आपण इंफाळ जिंकू शकत नाही- कारण ६० ह्जार ब्रिटिश सैन्य! त्यामुळे त्यांनी दिमपूरच्या दिशेने कुच करावे असा सल्ला नेताजींनी मुतागुची ह्यांना दिला- ज्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले नितागुचीने.
दिमपूर च्या दिशेने का जायचे? तर एकदा दिमपूर हातात आले, की मग बिहारमधल्या राजमहल हिल्स पर्यंत, आपल्याला ब्रिटीश सैन्य कुठेही लष्करी आघाडी उघडून ब्रिटीश सेना, आपल्याला अडवू शकणार नाही, ही बाब लक्षात आली होती नेताजींच्या. पण मितागुची यांनी नेताजींचा सल्ला न ऐकल्याने, आतापर्यंत व्यवस्थित सुरु असलेलेले मार्गक्रमण एकदम स्पोक लागल्याप्रमाणे अडले .जवळपास एक वर्ष भर ्सेना तिथेचे मुक्काम करून होती.
अंतराष्ट्रीय बाबींचा पण यावर खूप परिणाम झाला होता.दुसऱ्या महायुद्धाचे पडघम वाजू लागले होते. पॅसिफिक मधले सैपान हे बेट आता अमेरिकेच्या ताब्यात गेले होते. एक लहानशी घतना. तसे म्हंटले तर काही फारशी महत्त्वाची वाटत नाही ना?? पण ही घटनाच सगळ्या युद्धाला कलाटणी देणारी ठरली होती.
त्या काळी विमाने सरसकट लांबचा प्रवास करू शकत नव्हते. त्या मुळे जपानवर सरळ हल्ले करण्यासाठी असे एखादे ठिकाण अमेरिकेला हवे होते – की जे जपानच्या जवळ असेल , आणि तिथुन विमानांना इंधन पुरवठा करून जपानपर्यंत विमानदलाची पोहोच वाढेल. हे बेट हातून गेल्यावर मात्र जपानचे जनमत एकदम बिथरले, कारण आता अमेरीकेची विमाने या बेटावरून जपान पर्यंत पोहोचू शकत होती- आणि अमेरिकेला जपानवर हल्ला करणे सोपे झाले होते. य सगळ्या घटनांचा परीपाक म्हणजे जपानी पंतप्रधान ताजो, यांचा राजिनामा.
इथूनच पुढे खरा संघर्ष सुरु झाला. आता भारतामधे शिरायचे तर कुठून? अफगाणिस्थानातून एक मार्ग आहे, त्या साठी रशियाची मदत पण मागण्याचा प्रयत्न केला होता, जो निष्फळ ठरला. जपानचा नसलेला सपोर्ट, अन्न धान्याची रसद मिळणे पण कठिणच झाले होते. रंगून येथे जवळपास एक वर्ष भर आझाद हिंद सेनेचा मुक्काम होता. दिल्लीच्या दिशेने कुच करणारी आझाद हिंद सेना आता थांबली होती, आणि माघार घेण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय समोर दिसत नव्हता.
नेताजींचा अजूनही स्वतःच्या आझाद हिंद सरकार/ सेने वर विश्वास होताच. हे युद्ध आपण ” शेवटचा सैनिक, आणि शेवटचे काडतूस असे पर्यंत लढू” म्हणून त्यांनी सांगितले. आझाद हिंद सेना आता निराशेच्या गर्तेत सापडलेली होती, पण हरलेली नव्हती. या पुढची रणनिती काय ठरवायची ह्याचा विचार सुरु होता, तेवढ्यात दुसऱ्या महायुद्धातला तो कलाटणी देणारा क्षण आला होता. ६ आणि ८ ऑगस्ट १९४५ रोजी अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकी वर अणूबॉंब टाकले होते, आणि याच दोन बॉंब ने जपानचे आणि हिंदुस्थानचे स्वप्न भंग झाले. या पुढचा आझाद हिंद सेनेचा प्रवास एकदम गुढते कडे जातो आणि नंतर नेताजिंचा गूढ मृत्यु वगैरे घटना घडतात.
आझाद हिंद सेना हा एक योग्य निर्णय होता का? मला वाटतं होय, त्या काळात जय हिंद ही घोषणा, प्रत्येक भारतीयाच्या मनात स्फुल्लिंग पेटवणारी, क्रांतीची ज्वाला पेटवणारी ठरली होती . आझाद हिंद सेनेला जर थोडी दैवाने साथ दिली असती तर कदाचित वेगळं चित्र दिसलं असतं .
आज एक सप्टेबर .. आझाद हिंद सेनेचा स्थापना दिवस. म्हणून या लेखाचे प्रयोजन.
अप्रतिम.. परफेक्ट टायमिंग !!
आझाद हिंद सेनेचा पराभव होण्याचं अजून एक महत्वाचं कारण म्हणजे इम्फाळ आणि आजूबाजूच्या प्रदेशातलं हवामान आणि जोरदार जोरदार पाउस.
नेताजींसारखा स्वातंत्र्यसेनानी जगाच्या इतिहासात दुसरा झाला नसेल आणि होणार नाही. महानायकमधे त्यांचा लढा, प्रखर देशभक्ती, हुशारी, हजरजबाबीपणा, आंतरराष्ट्रीय राजकारणाचं अचूक ज्ञान इ आणि एकूणच व्यक्तिमत्वाचं अप्रतिम वर्णन आलं आहे.
“जुलुमी इंग्रजी सत्तेचा बिमोड करून भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मला प्रसंगी सैतानाची मदत घ्यावी लागली तरी ती मी घेईन आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देईन.” या अर्थाचं त्यांचं एक वाक्य आहे. त्यांचा देशाभिमान किती प्रखर होता आणि भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देण्याची किती तीव्र इच्छा त्यांच्या मनी होती हे दाखवून देण्यासाठी मला वाटतं फक्त हे एकच विधान पुरेसं ठरावं.
असेच म्हणतो. अगदी परफ़ेक्ट टायमिंग !!
आझाद हिंद सेनेचा पराभव होण्याचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे तत्कालीन तथाकथित मवाळ, अहिंसावादी नेत्यांनी दाखवलेली अनास्था आणि स्विकारलेले असहकाराचे धोरण !
ज्यावेळी आझाद हिंद सेना बाहेरुन हल्ले चढवत होती, तेव्हा त्यांना जर देशातुनही तेवढाच मोठा सपोर्ट मिळाला असता. त्याचवेळी देश आतून पेटवण्याची चळवळ जर देशांतर्गत नेत्यांनी उभारली असती तर चित्र नक्कीच वेगळे असले असते.
पण निवड झाल्यावरदेखील नेताजी कॊंग्रेसचे अध्यक्ष होवू नयेत म्हणून उपोषण करणार्या गांधींच्या देशात याहुन वेगळे काय घडणार होते.
नेताजींसारखा योद्धा होणे नाही !
धन्यवाद महेंद्रदादा ! जय हिंद !!
हेरंब, विशाल
धन्यवाद. प्रतिसादासाठी खूप उशीर होतोय, थोडा कामात गुंतलो होतो.
नेहेरू म्हणाले होते, की जर नेताजी भारताच्या सिमेवर पोहोचले तर मी स्वतः तलवार घेऊन सीमे वर जाईन… 😦
नेहरु असे बोलले होते याचा विश्वासार्ह संदर्भ द्याल का, काका ? अर्थात फुटकळ ब्लॉग्सचे संदर्भ नको आहेत. प्रॉपर संदर्भ हवे आहेत.
दीपक
कुठे तरी वाचलं होतं, ते लिहितांना आठवलं .बहूतेक पाटलांच्या पुस्तकात उल्लेख असावा असे वाटते.
महेंद्र काका,
लेख एकदम छान लिहिला आहे. विश्वास पाटील ह्यांची ‘महा नायक’ चा जणू काय सारांशच. मला वाटते कि प्रत्येक भारतीयाने हे पुस्तक एकदा नक्की वाचले पाहिजे. नेताजी काय चीज आहे तेय कळते. तसेच गंगाधर गाडगीळ ह्यांचे ‘दुर्दम्य’ आणि वी.स.वाळिंबे ह्यांचे ‘सत्तावन ते सत्तेचाळीस’ ही पुसतके वाचली कि कळतेय, कि कॉंग्रेस आणि गांधी ह्या लोकांनी काय काय प्रकार केले आपले वर्चस्व आणि आपली सत्ता (हुकुमत) राहावी ह्या साठी. शेवटी सगळे प्रकार सत्ता संघर्षाचे होतेय हेच खरं.
मागेय मी कुठे वाचलेले आठवते कि भारताला जेव्हा उत्तम नेत्यांची खरी गरज होती नेमके तेंव्हाच ते नेते काळा आड गेली. उदा.. टिळक, नेताजी… हे आपल्या देशाचे दुर्दैव…दुसरे काय…
दुसऱ्या एका गोष्टीचे आश्चर्य वाटते कि ज्या बंगाल मधून एवढे प्रतिभावान नेते उदयास आले त्या बंगाल मध्ये आज सक्षम नेत्यांचा अगदीच वानवा आहे, असे का?
बाकी, नेताजी हे फक्त ‘The Unforgettable Hero’ नव्हते तर ‘The Unfortunate Hero’ होते हेच खरे.
सर्व लोकांना गणरायाच्या च्या आगमनाच्या हार्दिक शुबेच्छा
रविंद्र,
तुमचे हे वाक्य , “नेताजी हे फक्त ‘The Unforgettable Hero’ नव्हते तर ‘The Unfortunate Hero’ होते हेच खरे.” खरंच मनाला खूप लागले, पण दुर्दैवाने ते खरे आहे हे पण तितकंच सत्य!
जबरदस्त पोस्ट काका…एकदम माहितीपूर्ण !!
सकाळी तुम्ही फेसबुकवर स्टेटस टाकलं, तेंव्हाच ही गोष्ट लक्षात आली. कारण आपल्याला हा इतिहास जाणूनबुजून शिकवला जात नाही, त्यामुळे खूप जणांना त्याची आठवणसुद्धा नसते … x-(
नेताजींसारखे नेतृत्व आपल्याला फार काळ मिळालं नाही हेच आपलं दुर्दैव….त्यांना सलाम !!
सुहास,
काही लोकांकडे मुद्दाम दुर्लक्ष केलं जातं, नेताजी, आणि विदा सावरकर हे दोघं याचेच बळी आहेत.
netajinchi athawn kiti shutidayak ahe yach pratyay ala
kharokahr sundar samaysuchakta!!
किरण
मनःपूर्वक आभार. थोडक्यात माहिती द्यायची म्हणून हे पोस्ट. नेट वर नेताजी सुभाषचंद्र बोस लिह्णुन सर्च केले तर काहीच सापडत नाही. या पुढे हा लेख तरी दिसेल लोकांना.
धन्यवाद काका! इतिहास हा इतिहासा प्रमाणे शिकविला जावा, ना की कॉंग्रेस म्हणते तसा….
सुहास शी अगदी सहमत
लेख छान, आवडला
अभिषेक
धन्यवाद. इतीहास हा आजकाल राज्यकर्त्यांच्या सोयीनूसार बदलला जातो. इतीहासाचे कितिही विकृतीकरण होऊ शकते . बरीच ज्वलंत उदाहरणं आहेत- जसे दादोजी, समर्थ रामदास वगैरे..
नमस्कार काका,
नेहमी प्रमाणे उत्तम आणि माहितीपुर्ण लेख झाला आहे. आमच्या पिढीला ह्या गोष्टीचा अजिबात लवलेश देखील नाही. धन्यवाद हि महत्वाची माहिती पुरविल्याबद्दल.
कॉंग्रेसचे राजकारणी पुर्वीपासुन स्वःतचे अवास्तव महत्व दाखविण्यासाठी नेहमीच आपल्या देशातील थोर आणि कर्तुत्ववान लोकांचे कार्य जाणिवपुर्वक लपविण्याचा खटाटोप करतात हे आता जगजाहीर झाले आहे.
शिरीष
धन्यवाद. शक्य झाल्यास महानायक हे पुस्तक अवश्य वाचा.्खूप सुंदर माहिती दिलेली आहे त्या पुस्तकात.
अरे दादा क्या बात है ,बाबुजी ऑलवेज रॉक्ड!!!!!!!!!!…………………….. मला ऍनाबर्ग च्या छावणीचे प्रकरण फ़ार आवडते महानायक मधले, नेताजी माझे प्यारे नेताजी….. किती बोलु अन किती नको असे होते मला ह्या विषयावर…. ,तुम्ही महानायक वाचले आहे का दादा??? नक्की वाचा…. वाचले नसेल तर, एक आय.ए.एस अधिकारी जेव्हा पुर्ण व्यासंग करुन एक पुस्तक लिहितो तेव्हा “महानायक” प्रसवते त्याच्या साठी त्यांनी जे संदर्भ घेतले आहेत (जपानी, ब्रह्मी, उर्दु, हिंदी,मराठी, जर्मन, इंग्लिश, बंगाली इत्यादी भाषेतले ग्रंथ) व मुलाखती ह्यांचीच लिस्ट ४-५ पानांची आहे राव!!!!!…. आम्ही तरी जय हिंद भक्त म्हणवल्या जाऊ इतक्या सच्चा दिलाने विश्वास पाटलांनी ही कादंबरी लिहली आहे!!!!!!!!
.बाकी काय बोलणार डोळे भरुन आलेत आता की बोर्ड पण दिसेनासा झालाय बाकी सगळे खालील लिंक वर वसनावलो आहेच म्हणा
॥जय हिंद॥
महानायकातले प्रत्येक पानच वाचनीय आहे. यात काही संशय नाही.
प्रत्येकाने अवश्य वाचावे असे पुस्तक आहे ते.
haa lekh mala khup aavadla chhan etihasacha dusara pailu sudhha amhala sapadla tumche phar aabhar tumchasarkhyanchi khup aavashkta aahe
विवेक
ब्लॉग वर स्वागत.. आणि प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार.
!!!!!!!!!!!!!!!
अतिशय अभ्यासपूर्ण लेख..हा इतिहास कदाचित कॉलेजमध्ये शिकवत असावेत पण मला आज या लेखामुळे कळला..आभारी…आणि हो परफ़ेक्ट टायमिंग…:)
अपर्णा
इतिहासात जर कोणी बीए वगैरे करत असेल तर त्याला हे माहिती असेल, पण इतरांना म्हणजे दुसऱ्या फिल्ड मधल्या लोकांना ह्या बद्दल काही माहिती असेल असे वाटत नाही.
khup sundar lekh lihilat apan. janun bujun itihasat ashi khari mahiti samvisht karnyache talnyat yet aahe .
प्रदिपजी
ब्लॉग वर स्वागत.. इतिहास ते शिकवत नाहीत, पण आपण मात्र स्वतः वाचू शकतो. या बाबत शक्य तेवढी जनजागृती व्हायलाच हवी.
Gandhijinche Marketing(Blackmailing mhanu) Saras tharle ani itihaas veglach project kela gela! Krantikari lokanche mahatwach kadhun ghetlya gele, swatnatrachya ladhyatun.
Ninad
Agree with you . बरेचदा मला वाटतं की हे सगळं मुद्दाम केलं गेलंय सरकार कडून.
महेंद्रजी कितीतरी दिवसानी पोस्ट्स वाचायला घेतेय सगळ्यांच्या, पहिलीच ही पोस्ट….. तीच अशी खणखणीत एकदम….
हा सगळाच ईतिहास आईचे वडील सांगायचे, पण लहानपणी गांभिर्य नसावे….. आज पुन्हा सगळी माहिती वाचून, आणि गुरूनाथची कमेंट वाचून महानायक वाचायची ईच्छा होतेय….
जबरदस्त पोस्ट!!!’
तन्वी
महानायक तर वाचायलाच हवा.. :० एक उत्कृष्ट पुस्तक आहे ते. संग्रहणीय़.. 🙂
काका,
एकदम चाबुक पोस्ट… खुप छान.
प्रणव
धन्यवाद..
Bose mi farsa vachle nahit…..pan ek antarik iccha matra jagi zali aahe hya lekhamule….pan thanks kaka….
मला वाटतं की ह्या पुस्तकाची माहिती फार लोकांना नाही. ज्या प्रमाणे कर्णावरचं, संभाजी राजांवरचं, शिवाजी महाराजांवरचं पुस्तक सगळ्यांना माहिती आहे, तसे या बद्दल कोणालाच माहिती नाही. आयडीयलला आहे उपलब्ध!
अप्रतिम ,सुंदर, छान.,
महेश
प्रतिक्रियेसाठी आभार.
aati uttam sir……………………….mala lekh kup aawdla.
गीता
आभार..
Khup khup dhanyawaad kaka… Itihaas kadhi itka awadine wachala navata ani rajakaranat kadhi kahi wachaniya asel asa swapna sudhha padala navata…. Sadhya deshat ekandar je kai suru ahe tya mule ji kahi mahiti baher padatey ti jamel tithe wachatoy.
Tumchya blog warcha ha lekh No.1…. Jai Hind!!! 😥
जय हिंद..!
जय हिंद!!
Aakashwani var mahanayak ya kadmabariche wachan aktana bhan visrate v subhash babuni hindusthan swatantra vhava yasathi kelele praytna pahun tyancha baddhal manatil aathar ankhi vadhto v vishwas patil yani puravanishi lihilelya mahitipurna kadmabari baddhal tyanche manave tevdhe aabhar kamicha ahe .
Dhanyawad.
उत्तम
ब्लॉग वर स्वागत आणि आभार..
mala subhashbabu sarkhya vyakti baddhal far abhiman vtato . apan suru kelelya blogmule vichar mandanyachi sandhi milali. dhanyavad.