फिअर इज द मोटीव्हेटर.. २

रात्री बराच वेळ मरीन लाइन्सच्या कठड्यावर एकटाच बसला होता . दिवसभर आपण काय केलं याचा विचार करत. काय वाईट केलं आपण? काही नाही- योग्यच केलंय. असं काही केल्याशिवाय कोणी घाबरणार आहे का? तो पहिला टॅक्सीवाला नाही, कसा म्हणाला, की जाओ पुलीस को बुलाओ…बरोबर केलं आपण.नकळत आईची आठवण झाली , डोळे भरून आले. तिला समजलं की आपल्याला एच आय व्ही आहे तर काय वाटेल तिला? हे रोगाचे जे संक्रमण झाले आहे, ते दिलेल्या रक्तातून ह्यावर विश्वास ठेवेल ती? तिथून उठला आणि चालत निघाला. टॅक्सी थांबवली, आणि घरी निघाला.

घरी जाण्यापूर्वी एका हॉटेल मधे जेऊन घेतलं, आणि घरी पोहोचल्यावर टीव्ही सुरु केला. सगळीकडे तो ’ पोस्ट ईट’ किलर ची बातमी सुरु होती. कोणालाच काही सांगता येत नव्हतं . पण काही लोकं मात्र उगाच टिव्हीवर यायचं म्हणून पोलिसांना आपण त्या पोस्ट इट किलरला पाहिल्याचे सांगत होते. काही लोकं तो सहा फुट उंच आणि सावळा आहे म्हणत होते, तर काही चांगला गोरा पान आहे हो, पण अंमळ बुटकाच.. म्हणत होते. टिव्ही चॅनलचा प्रतिनिधी मात्र रस्त्यावर दिसेल त्या माणसाला थांबवून विचारत होते, की ’ या खुन्याबद्दल तुम्हाला काय वाटते?”  जवळपास ९५ टक्के लोक या खुन्यावर एकदम खुष होते, म्हणत होते, हे असंच व्हायला हवं!

शांतपणे झोप लागली आज रोहनला. रात्री ११ वाजता जाग आली .   जे काही झालं, ते इन्स्टंट रिफ्लेक्स होतं, पण या पुढे मात्र प्रत्येक गोष्ट करायची ती पूर्ण विचार करून. नगर सेवकांचे बोर्ड दिसत होते त्याला सगळीकडे लागलेले. काही ठिकाणी तर सोन्याने लडबडलेले नगर सेवक, त्या पोस्टर्स मधून अंगावर आल्यासारखे दिसत होते. बस मधे कंडक्टरला एका वयोवृद्ध माणसाने ति्कीट मागितले आणि दहाची नोट दिली. नेहेमीप्रमाणे कंडक्टर खेकसला, आणि “खाली उतरा चिल्लर नाही’म्हणून त्या माणसाच्या आईबहिणींचा उद्धार करत म्हणाला. जवळपास ७० तरी वय असावं. रोहनला वाटलं आपण द्यावे पैसे, पण नको.. उगाच नजरेत भरायला नको कोणाच्या. एका तरूणीने , काका, थांबा मी देते, म्हणून त्यांचे चार रुपये दिले तिकीटाचे.  बस सुरु झाली, लहानसा प्रसंग, पण कोणी इतका मनावर घेतला नाही.

शेवटच्या स्टॉप चं तिकिट घेतलं रोहनने, आणि शेवटल्या स्टॉप   येण्यापूर्वीच सगळे लोकं उतरून गेले. फक्त रोहन , कंडक्टर आणि ड्रायव्हर होता.  रोहनने पिस्तुल काढले, आणि कंडक्टरच्या  कपाळावर टेकवून हलकेच ट्रिगर ओढला. खिशातून आधीच लिहून ठेवलेली पोस्ट ईट त्याच्या शर्टवर मागे चिकटवली , आणि काही झालेच नाही  अशा आविर्भावात चालत पुढे निघाला. त्या पोस्ट ईट वर लिहिलं होतं,” जर हा वयोवृद्ध लोकांशी नीट वागला असता, तर अजून नक्कीच जगला असता”

रात्री उशीरा फिरणे धोक्याचे आहे. जागोजागी पोलीस बंदोबस्त असतो, उगाच एखाद्याने पकडले तर मग आपल्याकडे असलेल्या पिस्तुलाबद्दल काही जस्टीफिकेशन देऊ शकणार नाही.तो घरी गेला आणि शांत पण झोपला. आज मात्र खरंच शांत झोप लागली होती रोहनला.

दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता जाग आली, त्याने दार उघडून कडी मधे अडकवलेला पेपर काढला, त्या मधे फक्त टॅक्सीवाल्यांच्या खुनाची माहिती होती. दोन टॅक्सी वाले आणि एक बस कंडक्टर. त्या पोस्ट ईट बद्दल बहुतेक पोलिसांनी गुप्तता पाळलेली दिसत होती, पण टीव्ही वरच्या बातमीचा हवाला देऊन मात्र त्यांनी उल्लेख नक्कीच केला होता. कोण असेल हा पोस्ट ईट किलर? म्हणून खूप चर्चा केली गेली होती. काही लोकं तर असे अजून काही पोस्ट ईट किलर्स तयार व्हायला हवे असेही म्हणत होते.

दवाखान्यात जाऊन डॉक्टरांना रिपोर्ट दाखवायचा होता. त्याला दवाखान्यात दिल्या गेलेला त्रास आठवला. पैसे जास्त काढायचे म्हणून विनाकारण कराव्या लावलेल्या टेस्ट्स, आणि देण्यात आलेले एच आय व्ही + रक्त! ह्या दवाखान्याप्रमाणेच सगळीकडे सुरु असतं . पॅथोलॉजीस्ट! खरं तर त्याने रक्त देण्यापूर्वी चेक करायला हवं होतं, पण नाही, त्याने न केल्यामुळॆ आपल्याला हा रोग झालाय. तो सरळ डॉक्टरच्या केबिन मधे गेला, आणि आतून दार बंद केले. डॉक्टर एकटेच बसलेले होता. हातातले पिस्तूल काढून समोर धरले, आणि  खिशातून मॉर्फिन भरलेली सिरिंज काढली. जवळपास २० एमएल मॉर्फिन होतं त्यात. ते टेबलवर  ठेवले, आणि डॉक्टरला टॊचलं. एक पोस्ट ईट ठेवली ” जर याने आपलं काम व्यवस्थित केले असते,  तर आज हा मेला नसता”  आणि तिथून बाहेर पडला.

पुढचे दोन तिन दिवस नुसता घरात बसून होता रोहन. फक्त सारखा बातम्या पहात होता तो.
रोहनने जवळ असलेले काडतूसं मोजले. जवळपास ९३ शिल्लक होते अजून. ठरवले की अजून कमीत कमी ९२ लोकं तरी संपवायचे. आणि आता हेच आपले जीवित कार्य.

काही दिवसापूर्वी आपण जेंव्हा बाईकच्या रजिस्ट्रेशन साठी गेलो होतो, तेंव्हा झालेला आरटीओ मधला त्रास, कार्पोरेशन मधला त्रास, घराच्या केस साठी वकिलांनी दिलेला त्रास,आपलं घर फोडलं गेलं होतं, तेंव्हा पोलीस कम्प्लेंट करायला गेलो असता, तिथे पोलिसांनी आपल्याला चोर असल्याप्रमाणे  दिलेली वागणूक, कॉलेज मधे वडीलांना द्यावे लागलेले डोनेशन, शाळां मधले भ्रष्टाचार, अशा अनेक गोष्टी नजरेसमोर आल्या, आणि  आपल्या जगण्यालाही काही तरी अर्थ आहे, हे वाटायला लागलं.

पुढच्या काही महिन्यात रोहनच्या जवळच्या जवळपास ६८ बुलेट्स संपल्या होत्या . सगळीकडे त्या पोस्ट इट खुन्याची चर्चा होत होती. कोण असेल तो? पण जे काही करतोय ते बरं करतोय., असाही सुर असायचा लोकांचा. पोलिसांचं पण काम कमी झालेलं होतं. रोहन  नोटीस केलं होतं, की   कंडक्टरचे वागणे, शाळांच्या मालकांचे वागणे, , शिक्षण सम्राटांचे पैसे मागणे,आरटीऒ, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, सरकारी नोकर , व इतर सरकारी विभागातले लोकं, व्यवस्थित वागू लागले होते. पोस्ट ईट किलर चा सगळीकडे उदो उदो होत होता.

आजकाल   मात्र  रोहन घरीच बसला होता. आजकाल सगळे लोकं एकमेकांशी चांगले वागत होते. कोणी कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेत होते. “काय सांगावं, आपण एखाद्याला त्रास द्यावा, आणि नेमका तोच पोस्ट ईट किलर निघाला तर?”  जग सुंदर आहे याची प्रचिती येत होती.

“फिअर इज द की” एकदा लोकांना कशाची तरी भिती असली, की लोकं व्यवस्थित वागतात. आपले कायदे इतके कुचकामी आहेत, की कायद्यांना कोणीच घाबरत नाही. लाच, लुचपत, वगैरे गोष्टी अगदी पोलीसा पासून तर राजकीय नेत्यांपर्यंत सगळेच करप्ट आहेत. काय करणार? आता उरलेल्या बुलेट्स वापरायची वेळ येते की नाही? हा विचार आला होता मनात. आता दुसऱ्या शहरात जायचं का?? ह्या विचारत असतांनाच .. दारावरची बेल वाजली आणि कोरीयरच्या मुलाने एक पाकिटं हातात दिले आणि सही  घेतली.

 सोफ्यावर बसला, आणि त्याने ते पाकिटं उघडले., त्यात लिहिले होते, की तुम्हाला पूर्वी  दिल्या गेलेला एच आय व्ही + चा रिपोर्ट हा तुमचा नसून दुसऱ्याचा आहे, आणि चुकिने तुमचे नांव टाईप केल्या गेल्याने तुम्हाला दिला गेला होता. सबब, तुम्ही  तुमचा खरा रिपोर्ट (एच आय व्ही – निगेटिव्ह असलेला ) सोबत पाठवत आहे, आणि सोबत रिपोर्ट जोडलेला होता …रोहन कपाळाला हात लावून बसला.

फिअर इज द पॉवर फुल मोटीव्हेटर.. जर आपल्याला आपण मरणार आहोत ही भिती नसती तर आपण हे सगळं केलं असतं का??  कदाचित नाही.  फिअर इज द की….!!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in साहित्य... and tagged , . Bookmark the permalink.

72 Responses to फिअर इज द मोटीव्हेटर.. २

 1. जबरदस्त…. एकदम वेगवान कथानक आणि एक सत्य उलगडून सांगितलं कथेने..

  का कोण जाणे, पण हा शेवट प्रिडीक्ट झाला होता डोक्यात… खूप आवडली कथा 🙂 🙂

  • सुहास
   सध्या डेक्स्टर पहातोय.. त्याचा परीणाम झालाय बराच. आणि काल हेरंबचं स्टेटस वाचलं, आणि ही कथा सुचली. शेवट करतांना फारसा विचार केला नव्हता. 🙂 जे मनात आलं ते लिहून टाकलं..

   • Rajendra says:

    Katha awadali…
    maaf kara…
    Pan Hi Katha ya agodar pan vachaleli aahe.. Nav athavat nahi pan sadharan 7 te 8 varshaadhi kuthlyatari diwali ankat hi katha vachali hoti.Mala vatate katheche nav hote ” Jar tumhi yogya vagala asta….”

    tyat sagale sandarbh hech hote ani shevati nayak ha nayikecha muddam apaman karto,Nayika radat jaate he baghun Konitari porga yevun nayakala goli ghalun jato ani tyala chit jodun jato ki ”Tumhi yogya vagala asta tar tumhi Jivant Rahila asata”
    Pan nayak jivant rahto ani tyala hospital madhey kalate ki tyala kahihi aajar zala nahiye.

    • राजेंद्र
     ब्लॉग वर स्वागत. हे वाक्य जे डेक्स्टरचं आहे. ही कथा पण डेक्स्टर वरच बेतलेली आहे. कदाचित माझ्या आधी पण ज्याने लिहिली असेल त्याने डेक्स्टरचाच आधार घेतला असावा.. 🙂 मनःपूर्वक आभार.

 2. madhuri says:

  chhan. mrutyu samor dislaa mhanun evdhi himmat aali. aata me naahich jagnaar. mag hi nako waatnari system tari badluya. waa

  • माधुरी,
   मृत्यु समोर दिसत असेल तर माणूस काहीही करू शकतो… There is nothing to loose.. मग खूप जास्त धैर्य येतं, आणि कदाचित एखादा वेडा पीर असं वागुही शकेल.

 3. सुंदर कथा..! as the say in BATMAN..! FEAR is something u need to conquer..! मरणाची भिती नाही राहिली की असा आत्मविश्वास येतो..!

  • विश्वास ,
   ब्लॉग वर स्वागत.. आणि प्रतिक्रियेसाठी आभार. अहो , कथा वगैरे लिहीणे माझा प्रांत नाही, पण कधी तरी एखादी अशी कथा लिहायचा प्रयत्न करतो. 🙂

 4. सातारकर says:

  कथा वेगवान, पण शेवट अपेक्षित… 😦

  जाता जाता
  Dexter चे चित्र कथानायकाच्या अनुषंगाने दिल आहे का?

  • सातारकर,
   होय, डेक्स्टर डॊळ्यासमोर होता लिहीतांना… 🙂 आता पर्यंत एकच सिझन पाहून झालाय. दुसरा पहाणे सुरु आहे… 🙂 शेवटी , त्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणे, किंवा दुसऱ्या शहरात जाऊन पुन्हा काही लोकांना मारणे असा करणार होतो, पण शेवट मुद्दामच अर्धवट ठेवला- हिंदी सिरियल प्रमाणे, सिक्वेल लिहायला सोपं जातं.. 🙂

 5. Aditya Shinde says:

  Too Good Really Too Good

 6. mazejag says:

  Kaka is this a movie….

  • नाही , सिनेमा नाही. डेक्स्टर नावाचे एक सिरियल आहे, त्यावरचं एक स्टेटस पाहिलं, हेरंबचं, त्यावरून सुचली कथा..

 7. Ganesh says:

  काका खुप मस्त आणि वेगवान कथा…..

 8. Tanvi says:

  >>>जबरदस्त…. एकदम वेगवान कथानक आणि एक सत्य उलगडून सांगितलं कथेने..

  का कोण जाणे, पण हा शेवट प्रिडीक्ट झाला होता डोक्यात… खूप आवडली कथा 🙂

  +1

  शेवट आधिच जाणवला होतापेक्षा असाच व्हावा असं वाटलं होतं …. छान जमलीये कथा महेंद्रजी!!!

  • तन्वी,
   कथा लिहीणे सुरु केले तेंव्हा ठरवले नव्हते शेवट काय करायचा. फक्त एक अंधुक प्लॉट होता डोक्यात, आणि सोबतीला डेक्स्टर.. 🙂 धन्यवाद..

 9. very nice story…. too good

 10. Sushila says:

  फार छान… Fear is the powerful motivator…!!
  तुमचे सगळे ब्लोग्स नियमित वाचते आणि इतरांना सुचवतेहि… छान लिहिता.. तुम्ही अजून कथा लिहाव्यात हि आग्रहाची विनंती… 🙂
  btw, Dexter चे पाचही सीज़न बघा.. खुर्चीला खिळवून ठेवणारे आहेत… 🙂

  • सुशिला
   मनःपूर्वक आभार.
   . डेक्स्टर सुरु आहेच पहाणं सिझन चार पर्यंत डाउनलोड करून ठेवले आहेत.

 11. Poorva Kulkarni says:

  Surekh… tumhi mhanta te khar aahe…. system tar badlayla havi aahe… samajane ekjutine he problem sodvayla havet. pan maramari karun nako………..

 12. Ravindra says:

  Mastach ….. 🙂
  Heech bhiti lokanna existing system var aste tar aaj hee paristhiti zhali nasti…
  Swarthi raajkarni, brashta ani mujor establishment, ani irresponsible society che hey parinam….

 13. chetan says:

  Bhari… Kharach Asa ek Roahan Desai Pahije ata MUMBAI la. 😉

 14. मी फक्त एक साधा स्टेटस टाकला आणि तुम्ही त्याचं सोनं केलंत !!! डोंबिवली फास्ट आणि डेक्स्टरचं कॉम्बो :))) मस्तच !

  रच्याक, कथेतल्या हिरोचं नाव रोहन देसाईच्या ऐवजी दक्षेश मोरकर कसं वाटतं?? इंडियन डेक्स्टर मॉर्गन 😉 😛

  • दक्षेस मोरकर.. सही.. अरे आधी सुचले असते तर वापरले असते.. 🙂
   पण सिरियल एकदम मस्त आहे. त्यातलं ते वाक्य आठवतं कां? ” लॉयन इन द फॉरेस्ट डू नॉट अफ्रेड ऑफ जॅकल”… त्यावर पण एक लिहायची आहे कथा..

 15. Gurunath says:

  लै भारी, रोहन मरु नये असे मनापासुन वाटतच होते मला पण, बरे झाले एच.आय.व्ही (- व्ह) रिपोर्ट काढलात !!!!!…… मला पण एंड थोडा अंदाज आलाच पण तो हवाहवासा असल्यामुळे वाचला पण खुप चवीने!!!!!!….

  बाय द वे डेक्स्टर सुरु केलेत….. वा वा वा, प्रिझन ब्रेक संपले का????………. डेक्स्टर नंतर अजुन एक सजेशन आहे आवर्जुन सांगेन बघा म्हणजे बघाच, जर शेरलॉक होल्म्स आवडत असला अन तो वैद्यकीय पेशात कसा असेल हे पहायला क्युरियस असाल तरी अन नाही तर माझा बालसुलभ हट्ट म्हणुन तरी “हाऊस एम.डी” ही सिरिज नक्की म्हणजे नक्की बघाच्च्च्च्च्च…… ह्युज लॉरी (स्टुअर्ट लिटील उंदराच्या वडलांचा रोल करणारा) ह्या ब्रिटीश कलाकाराच्या अदाकारी साठी तरी बघाच, शिवाय अजुन एक आकर्षण म्हणजे “लिसा एडलस्टीन” ने केलेला “डॉ. लिसा कडी” हा रोल…. आता अधिक नाही बोलत डाऊनलोड करा अन नक्की बघाच ….. हाऊस एम.डी……..

 16. Anand says:

  Mrutyu tar samorach aahe ki .. fakt javal aalaay he kalalyavar asa ved yeta !
  thodasa calculation kelat tar samjel mrutyu tasa vatato titka laamb nahi javalach aahe 🙂
  fartar 1500 te 2000 aathvade lamb , so do whaever you want now, now is the right time for everything !
  – Anand

 17. सागर says:

  एकच शब्द..’सुंदर’..!!

  • सागर
   धन्यवाद… सगळं क्रेडीट डेक्स्टर ला.. 🙂 आणि हेरंब ला. जर हेरंब ने स्टॆटस टाकले नसते ( ह्या कथेचे हेडींग) तर कदाचित सुचले पण नसते..

 18. Pooja Muddellu says:

  नमस्कार महेंद्र काका,
  तुमच्या blog ची नियमित वाचक आहे. एक चित्र उभे राहिले होते blog वाचताना. तुम्ही कथा छान रंगवली आहे.
  मी वेगळा विचार केला होता शेवटा बाबत. तुम्ही वर्णन केलेले incident खरच आपल्या बाबतीत घडत असतात. पण त्या वेळेला आपण हतबल असतो, म्हणून आपण काही करू शकत नाही. blog चे नाव पण एकदम fantastic. तुम्ही ज्या serial बाब्रीत बोलत आहात ती कुठे मिळेल बघयला?

  • पूजा

   टॊरंघ वर डाउनलोड करता येतील सगळे भाग.. मुंबईला असशील तर माझ्याकडून घेऊन जाऊ शकतेस. ८ जिबीच्या वर आहेत.

 19. जबरदस्त कथा काका, मुळात कथेचा जो प्लॉट आहे तो खूपच मस्त आहे. खरंच भीती ही माणसाला काम करायला उद्युक्त करत असते. एखादा पाण्यात बुडत असला तर तो आधी धीर सोडतो, मदतीची याचना करतो, पण जेव्हा असं लक्षात येतं की मदत मिळण्याची आशा सर्व बाजूंनी संपुष्टात आली आहे तेव्हा तो स्वत: जोरजोरात हातपाय मारुन पाण्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो. खरंच माणसाला एखादा धक्का आवश्यकच असतो झडझडून कामाला लागण्यासाठी! नेहेमीप्रमाणे मस्त लेख!

 20. एकदम जबरदस्त आहे ही कथा….. खूप म्हणजे खूप आवडली…..

 21. Srinivas says:

  Good one.

  Everybody sometime in their life dreams to be like this character.

  I liked the climax…although expected.

  What I liked most is the end is kept open (fate after so many murders…)

 22. मस्त मस्त महेंद्रजी! आशय, शैली सगळंच अप्रतिम! 🙂

 23. जबरी कथा. हिंसक मार्गे का असेना होईना पण नायकाच्या हातून काहीतरी ठोस समाजकार्य घडले. उद्याच्या आशेवर आपण किती मनाविरुद्ध जगत असतो नां?

 24. छान जमलीय्‌ कथा. शेवट असाच अपेक्षित होता. मला ही कथा थोडीफार ‘डोंबिवली फास्ट’ सारखी वाटली. (डेक्स्टर ऑफकोर्स पाहिली नाहीय्‌)

 25. Sourabh says:

  mastch….. khup aavadali katha……. Fear is the Motivator…… 100% true…..

 26. poonam says:

  mast aahe katha.Karan aaj kal lok itke swarthi zale aahet ki tyana manuskichi janch rahili nahi.Relation sudha ek formality mhanun paltal she kiti murkh aastat lok .& je lok saral marge jagtat tyanach ha tras.baki nirlajj mast jagtat.

 27. विशाल कांबळे says:

  कथा छान आहे पण; शेवटी हि एक कथा आहे….
  कथा वाचल्यावर एक मिनिट वाटून गेल की खरच अस झाल तर…( डोंबिवली फस्त पाहिल्यावर तर असंच काहीतरी करावं असं ठरवलं पण होत ) , पण असं होत नाही, माणूस हातात पिस्तुल नकीच घ्रतो पण तो संपवतो मात्र स्वतःला. तो उपोषणाला पण बसतो पण शेवटी भूकच जिंकते… पण हे खरय की ‘ फिअर इज द मोटीव्हेटर ‘ …..

 28. writetopaint says:

  आवडली कथा. शिवाय ‘ मनात आलं ते लिहून टाकलं ‘, हा प्रांजळपणा आवडला.

 29. कथा भारीच.. फार पूर्वी मला अनेकदा असा विचार मनात येऊन गेला आहे ,जे जे वाईट वागताहेत ,ज्यांच्यामुळे मला/समाजाला त्रास होतोय त्यांना असच उडवून टाकाव … पण अर्थातच ‘मोटीव्हेटर’ नाही मिळाल… 🙂

 30. Raghu says:

  Kaka… ek number.. mastach aahe.. vegawan ani bhannat.. khup divasani tumacha blog open kela ani aaj kahi tari mast wachayala milanar he mahit hote ani te milale..

 31. Shubhangi says:

  Mahendraji,

  Khoop chaan story aahe. Mi nehami tumcha blog vachte, tumi chhan lihita.

 32. vijay says:

  Its really nice to read……very very nice..!!!!!!!!!!!

 33. vijay devale says:

  Khupach chaan

 34. Vishal Vinayak says:

  Superb..
  End khup aawdla.
  Chhan..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s