मुंबई.. वॄद्धांनी रहाण्या साठी ’सुरक्षित’ आहे का?

काय वाटेल ते, mahendra kulkarni, kayvatelte.comमाणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे का वृद्धांना? आपण रहातो कसे तर कंजूष माणसासारखे.. नेहेमीच हा विचार मनात असतो, की मुलांची शिक्षणं व्हायची आहेत, आजारपण, म्हातारपण या साठी पैसा गाठीशी असायला हवा, म्हणून आज काटकसर करून पैसा जमा करून ठेवण्याकडे आपला कल असतो.

आपलं वृद्धावस्थेतलं जीवन सोपं होईल या पैशांमुळे असे वाटत असते आपल्याला. पण खरंच तसं असतं का?   हा जवळ असलेला पैसाच जिवाचा शत्रू बनल्याचे गेल्या पंधरा वीस दिवसातील सहा वृद्धांच्या दिसून येते.

चांगल्या मोठ्या हुद्द्यावर रिटायर झाल्यावर,पैसा गाठीशी असतो, भरपूर पेन्शन असते, आणि मग स्वतःच्या स्वातंत्र्यावर कुठलीही बंधन नको  म्हणून स्वखुशीने एकटे रहाणारे   वृद्ध, किंवा दुसरा प्रकार म्हणजे मुलं परदेशी नोकरी निमित्त गेल्याने नाईलाजाने एकटे रहाणारे वृद्ध, किंवा तिसरे म्हणजे निराश्रित वृद्ध.

वृद्ध मंडळींनी एकटे रहाण्यात काही  वावगे आहे असे नाही,पण गेल्या पंधरा दिवसात सहा वृद्धांची  हत्या केल्याची बातमी वाचली,  आणि वृद्धांनी एकटं रहाणं किती अवघड आहे हे जाणवलं.   ” मॅन सपोझेस, ऍंड गॉड डिस्पोझेस” किती खरी आहे -नाही का? आयुष्यभर काट कसर करून जमवलेले पैसे, एक दिवस कोणीतरी कामवाला, कामवाली घेऊन पळून जातो, आणि जाताना  आपण सापडू नये म्हणून त्या वृद्धाचा खून पण करतो.

पोलीस नेहेमी ओरडून सांगत असतात, की घरगडी ठेवतांना त्याची माहिती पोलीस स्टेशनला पाठवून त्याचा शहानिशा करून घ्या, पण तसे कोणी करतांना दिसत नाही, आणि मग शेवटी त्याचा परिणाम असा झालेला दिसतो.

पूर्वीच्या काळी शेजारधर्म होता. शेजारच्या खोली मधे काय सुरु आहे हे चाळीतल्या सगळ्यांना माहिती असायचं. कोणाकडे कोणीही  नवीन माणूस आलेला दिसला   तरी ” तू कॊण रे बाबा? ” म्हणून आवर्जून चौकशी केली जायची. आजच्या फ्लॅट संस्कृती मधे शेजारच्या फ्लॅट मधे कोण रहातं हे पण कोणालाच माहिती नसते. एखाद्या वृद्धाचा खून झाल्यावर त्याच्या डिकम्पोझ्ड शरीराचा वास येणे सुरु झाल्याशिवाय शेजारचा माणूस चौकशी करत नाही.

हे असे लोकं आपल्या सोबतीला म्हणून नोकर ठेवतात. घरकाम करायला वेगळा, स्वयंपाकाला वेगळा आणि सोबतीला वेगळा असे काहीसे स्वरूप असते. कंपॅनियन म्हणतात या नोकरांना. यांच्या आवश्यकता पण वेगळ्या असतात, या नोकरांना टीव्ही, एसी, फ्रीज चा पूर्ण असेस हवा असतो.   आवडीचे प्रोग्राम टिव्हीवर पहाण्याचे स्वातंत्र्य, जे हवे ते खाण्याचे स्वातंत्र्य.. वगैरे वगैरे नोकरीच्या सुरुवातीलाच ठरवून घेतले जाते. हे नोकर दिवसभर कंपॅनियन म्हणून असल्याने सा्रखे घरमालक सोबतच असतात- त्यांना औषध देणं, घरातली फुटकळ कामं करणं एवढंच त्यांचं काम.  सारखे सोबतच असल्याने,   घरातले पैसे काढणे, दाग दागिने काढणे  वगैरे त्यांच्या समोरच केले जाते.  घरात कुठे काय आहे , हे सगळं त्यांना ठाऊक असतं. सुरुवात फुटकळ चोऱ्या पासून होते, आणि नंतर मग …..

सगळ्या फ्लॅट्सच्या सुरक्षेची जबाबदारी वॉचमन या प्राण्यावर असते. हे वॉचमन शक्यतो बिहार किंवा युपी मधले असतात, आणि जवळ पासच्या  कुठल्यातरी झोपडीत रहात असतात. सोसायटी एखाद्या वॉचमन पुरवणाऱ्या कंपनीशी संधान बांधून हे वॉचमन भाड्याने घेते.   ह्या  वॉचमन लोकांना सप्लाय करणाऱ्या कंपन्यांचे पेव फुटले आहे.     सप्लाय कंपनी  जे वॉचमन सप्लाय करते, ते पण  सगळ्या वॉचमन बद्दल माहिती ठेवत असतील का? हा संशयच आहे .   बरेचदा तर  सोसायटी मधे  रहाणाऱ्या रहिवाशांना अडवण्यापासून तर एखाद्या भिकाऱ्याला/ सेल्स मॅनला  दारावरची घंटी वाजवून त्रास देण्यासाठी  आत सोडण्याचा  मूर्खपणा करतांना हे दिसतात.  याचे कारण म्हणजे जी कंपनी वॉचमन पुरवते ती दर पंधरा दिवसांनी वॉचमन बदलत असते, ज्या मुळे सोसायटीत रहाणारे कोण आणि चोर कोण हेच त्यांना ओळखता येत नाही.

या शिवाय घरात भांडी, धुणे, लादी कामासाठी येणारा नोकर वर्ग वेगळा. या लोकांची एक  स्वघोषितसंघटना असते. यांचे पण काही अलिखित नियम असतात. किती पैसे घ्यायचे, किती काम करायचे, वगैरे वगैरे.. एकमेकाच्या कामावर डल्ला मारायचा नाही वगैरे. चांगला नोकर मिळवणे हे पण हल्ली दुरापास्त झाले आहे. आजकाल घरातले सगळे लोकं काम करण्यासाठी बाहेर जातात. मग घराची किल्ली पण कामवाली कडे दिलेली असते. तिने यायचे आणि आपले काम करून जायचे.

घराची किल्ली एखाद्या नोकराच्या हाती देणं हे हल्ली काळाची गरज झालेली आहे असेही म्हणणारे लोकं दिसतात. पण त्यांनी घरात इकडे तिकडे पसरलेले पैसे, किमती वस्तू वगैरे समोर दिसल्यावर त्या नोकराचा स्वतःवर किती दिवस ताबा राहील? एखाद्याने चान्स नाही म्हणून चोरी न करणे वेगळे, आणि उघडी तिजोरी समोर दिसत असतांना चोरी न करणे वेगळे! घरातल्या वस्तू कुलुपात ठेवणे, घरातल्या नोकरा समोर आपल्या संपत्तीचे प्रदर्शन न करणे या गोष्टी कटाक्षाने पाळल्या तर थोडा तरी आळा बसेल या गुन्हेगारीला. ..

हल्ली प्रत्येक गोष्टी साठी कॉंट्रॅक्ट लेबर  बोलावण्याची पद्धत  सुरु झालेले आहे. त्या मधे पाण्याचा नळ लिक होणे पासून तर लाईट स्विच बदलणे, सुतार या सगळ्या कामासाठी कॉंट्रॅक्ट लेबर्स सोसायटी मधे येत असतात. या लेबर्स ला कोणी आय कार्ड वगैरे विचारत नाही.   ह्या कामांच्या बुरख्याआड    कोणीही फ्लॅट  मधे येऊन चोऱ्या करू शकतो.

एक लक्षात येतंय, की हल्ली सगळे फ्लॅट मधे  एकेकटे रहाणारे वृद्ध  लोकंच या गुन्हेगारीचे बळी ठरत आहेत. ज्या वेगाने ह्या घटना दररोज पेपर मधे छापून येत आहेत, त्यावरून संशय येतो की हे लोकं एखाद्या संघटित गुन्हेगारीचे मोहोरे तर नाहीत?? सरकार प्रत्येक फ्लॅट स्क्मिला संरक्षण तर पुरवू शकत नाही हे जरी खरं असलं, तरीही सोसायटी मधे कामासाठी येणाऱ्यांचं पोलिस व्हेरीफिकेशन आवश्यक आहे असा कायदा सोसायटीने केला तरच याला आळा बसू शकेल.

मुंबई, वृद्धांनी रहाण्यासाठी सुरक्षित आहे का? याचं उत्तर मला तरी सापडत नाही.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , . Bookmark the permalink.

22 Responses to मुंबई.. वॄद्धांनी रहाण्या साठी ’सुरक्षित’ आहे का?

 1. Gurunath says:

  इतक्यात जरा जास्त झालंय खरं पण मला तरी मुंबई भारी वाटते सेफ़्टी च्या दृष्टीकोनातुन…. ह्यातले बरेचसे खुन अपमार्केट सोशलाईट वृद्धांचे पण असतात ना……. बरेचदा नोकरांशी अरोगंटली बोलणे वगैरे नेहमीचे झाले की नुकतीच टिनेज मधुन बाहेर पडलेली ही पोरे…. रागाच्या भरात खुनापर्यंत पोचतात…. चोरी ही नंतरची प्रोसेस होऊन जाते… की बा आता खुन झालाच आहे हातुन जिंदगीभर पळायचेच आहे तर घ्या ओरबाडून मिळतंय ते….

  • अरे पंधरा दिवसात ६ खून…
   मला जाणवलं की या वृध्दांची काय मनःस्थिती असेल ते.. म्हणून हे पोस्ट लिहायला घेतलं.

 2. अभिषेक says:

  मनात काहीच हलल नाही! विचार सुद्धा! काय माहीत का?
  what these people earned/earning by so much of money? weirdo life….

  • अभिषेक
   त्यांनी पैसे कमवले म्हणून त्यांना विअर्डो म्हणता येणार नाही. हे आयुष्य प्रत्येकाच्याच वाट्याला येणार आहे, आपणही म्हातारे होऊच ना कधी तरी.. मला वाटतं एखाद्या लहानशा गावात सेटल व्हावे रिटायरमेंट नंतर..

   • अभिषेक says:

    मलाही तेच म्हणायचं होत काका, पैसे कमाविण्यासाठी त्यांना तस नाही म्हणालो मी… पण हे विकतचच दुखण नाहीये का? आधी पैशासाठी जगण घालवायचं आणि नंतर पैशामुळे कुणीतरी आपला जीव घ्यायचा!
    म्हाताऱ्यांच्या किंवा मुलांच्या प्रायवसी करिता वेगळ रहायचं हि कन्सेप्ट च अंगावर येते! किती अन्-भारतीय संस्कृती! 🙂
    तुमच शेवटाच वाक्य अगदी पटल… मीही तसाच विचार करतोय.
    माणसाच्या बेसिक गरजा किती आणि आजच्या भारतीय शहरात आपल्याला त्या किती मिळतात?
    सकस अन्न
    शुध्द पाणी शुद्ध हवा
    आवरेल इतपत निवारा
    शांत स्वच्छ मन
    शांत स्वच्छ परिसर
    आणि छंद
    ह्या गोष्टीमधील किती गोष्टी आहेत आज आपल्या आयुष्यात, आणि भरमसाट पैसा खर्च करून आपण त्यातल्या किती आपण विकत घेऊ शकतो… थोडक्यात शहरात आज आपण आपला मृत्यूच विकत घेत असतो … आणि ह्या कारणा साठी मी ‘विअर्डो’ म्हणालो… ते त्या काळच्या लोकांना नाही … तर आजच्या पिढीला जी की त्यांच्या अनुभवातून काही शिकण मागत नाही, तर फक्त ‘पैसा’च्या माग लागली आहे. आई-वडिलांना इथे एकट टाकून बाहेर पैसा मिळवण् हि त्यातच येत अस माझ मत आहे. बाकी कारण तर असतातच. शेवटी मी ही उत्तरांच्या शोधातच आहे इथे! 🙂

 3. गौरी says:

  काका, हे फक्त मुंबईपुरतंच मर्यादित राहिलेलं नाही … पुण्यातही या बातम्या ऐकायला मिळतात, अगदी मध्यमवर्गीय कोथरूडमध्ये सुद्धा. माझेही आईवडील आपल्या घरी एकटेच राहतात. घरकामाला येणार्‍या बाया अगदी विश्वासातल्या आहेत. पण वेळीअवेळी येणारे कुरियरवाले, सेल्समन … काळजी वाटते. पण पर्याय दिसत नाही.

  • गौरी
   हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पण दुर्लक्षित. थोडी जागरूकता जरी असली, तरिही पुरेसे आहे..

 4. एकदम विचार करायला लावणारा लेख… पण आपल्याकडे सगळे गोष्टी घडून गेल्यावर जागे होतात. चारकोपला जेव्हा इन्स्पेक्टर दया नायक बदली होऊन आला होता, तेव्हा त्याने वॉचमन लोकांसाठी रजिस्ट्रेशन कंपल्सरी केलं होतं , आणि तो जातीने त्यांची हजेरी घ्यायचा एखाद्या रविवारी (तसा तो कायदा आहेचं, पण पहिल्यांदा अमलात आणताना बघितलं) पण तो गेला, आता कोण विचारताय?

  मग आम्ही प्रायव्हेट कंपनीचा सिक्युरिटी गार्ड ठेवला, तर ते दर महिन्याला बदलून यायचे… मग शेवटी पुन्हा जुना नेपाली गुरखा ठेवला 😦

 5. geetapawar says:

  sir kahi mat tumche tik aahe kai mat aase aahe ki kahi rudh swathun chichid karu gharsodu aasramat aarhtata kai budhine brast hotata aani kahi vrudha suna mulanchya chuka hi kaadtata….kuthe chuktey te saanga..

 6. geetapawar says:

  kahi rudha kahi jastch sone ghalu firtana mi pahiley aahe…………………….

 7. geetapawar says:

  2 mahinya purvichi gost sangte punat son sakli chorancha sulsulat jhal aahe sir………. fc road chya pudhe 1 50 yaycha aaji baai aani tyancha sobat tyanci naat atuo riksha basnu jaat aastna aajinchya galyatili aasli sonyachi boar maal palavli….kute kuthe swat atrudh hi jimedaar aast sir…….aani ti aji ji ckaar yeun padli ghante beshudhach hoti dokya lagle hote tijya…

 8. Snehal says:

  Namaste kaka…
  Tashi mumbai tar kunasathich safe nahi pan vrudhanche pahta kharach unsafe zali ahe, jambhar kamvayche ani mag te ase pranasakat gamvayche ashi paristhiti ahe, gaava kade hi tashi surakshitta kamich ahe, hyala upay kay he sangnech kathin ahe… 😦

 9. महागड्या बाइकसाठी आजीची हत्या… 😦
  http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10043091.cms

 10. snehal says:

  Namaste Kaka,
  Vishay tar gambhir ahech, tumhala mahit ahe mumbai javalil western railway che 1 stn ahe Saphale tithe dekhil kahisa asach prakar ghadla ani tethil 1ka vrudhala jakhmi karun paise ani sarv sone lutale…. Paristiti khup bikat ahe 😦 😦

  • स्नेहल
   धन्यवाद. मला वाटतं की मुंबई च्या लोकसंख्येच्या रेशो मधे हा मृत्युचा आकडा फार नसेल, पण काळजी करण्यासारखा आहे हे नक्कीच..

 11. खूप छान लेख महेंद्रजी! तुमच्यासारखीच अवस्था माझीही झाली!
  पुढच्या दोन घडामोडी अतिभयानक वाटल्या! एक, विक्रोळीला बारा-पंधरा वर्षाच्या प्रौढ शेजारणीने खून केलाय.वर ती रडली, मृत शरीरावर झेप घेतली. दोन, नातवानं आजीचा खून केलाय.इझी मनी आणि माध्यमं? आईवडिल हा मुलगा सुटावा म्हणून त्याला डिफेंड करताएत म्हणे! 😦 😦
  ही कसली मानसिकता म्हणायची?

 12. (दुरूस्ती) ’बारा पंधरा वर्षाचा शेजार असलेली वयस्कर शेजारीण’ असं म्हणायचं आहे वरच्या अभिप्रायामधे!

  • खरं आहे,.,. दररोज ही अशी बातमी वाचून मन विषण्ण झालं होतं, दररोज एक बातमी असायची कोणीतरी मेलं म्हणून.. 😦

 13. महेश कुलकर्णी says:

  संबधित विषयाला आपण खरोखर वाचा फोडली हे वाचून बरे वाटले,खूप सुंदर लेख लिहिला त्याबदल अभिनदन कोण कोण काय करेल हे सागता येणार नाही दररोज कुठेन कुठे काहीतरी घडतच असते ह्या करणीभूत खर म्हणजे आजकालचे T V मालिका आहे,,बेकारी,व शिक्षणाचा अभाव,हि पण कारण असू शकतात,

 14. Hariom says:

  Very interesting thread; I too agree with the list, though I would add a few more events to it.

  India is a land of many festivals, known global for its traditions, rituals, fairs and festivals. A few snaps dont belong to India, there’s much more to India than this…!!!.
  visit here for India

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s