पोर्तुगीज भारतामधे जेंव्हा आले, तेंव्हा त्यांचा मूळ उद्देश हा धर्मप्रसार करणे इतकाच होता. इथे येऊन सरकार विरोधी असलेल्या किंवा धर्मांतरासाठी नकार देणाऱ्या हिंदूंच्या संपत्ती सरकार जमा करणे , तसेच जर एखादा हिंदू मागे वारस न ठेवता मेला तर त्याची संपत्ती सरकार जमा करणे आणि त्या पैशातून चर्च बांधणे हा एककलमी कार्यक्रम घेऊन ते इथे आले होते. एखाद्या हिंदू किंवा मुसलमान माणसाने जर ख्रिश्चन धर्म स्विकारला, तर त्याला अभय देणे , आणि सवलती देणे ही तर जुनी स्ट्रॅटेजी होती. कसेही करून ख्रिश्चन धर्म इथे रुजवाय्चा होता.या चर्च साठी किंवा गोव्यातल्या कुठल्याही चर्च साठी पैसा हा हिंदूंचा वापरला गेलेला आहे. अर्थात ही आहे १४ व्या १५व्या शतकातली गोष्ट!
सगळीकडे नुसता टुरीस्ट लोकांचा गोंधळ दिसतो. काही लोकं हातात मेणबत्त्या धरून किंवा मेणाचे अवयव, जसे हात, पाय वगैरे घेऊन चर्च मधे शिरतांना दिसतात. असे समजले जाते की, मेणाचे अवयव चर्च मधे वाहिले, तर त्या अवयवाचे दुखणे बरे होते. असो.
चर्च चे प्रांगण खूप मोठे आहे.मुख्य म्हणजे चारही बाजूला कंपाऊंड ची भिंत असल्याने कुठलेही अतिक्रमण नाही. जे काही विक्रेते आहेत ते कंपाऊंडच्या बाहेर मेणबत्त्या आणि मेणाचे अवयव विकत बसलेले दिसतात. या रिकाम्या जागेत अक्षरशः वाळवंट असल्यासारखे आहे. तिथे एखादा चांगला बगीचा करून मेंटेन केला तर ही इमारत जास्त सुंदर वाटेल. पण सरकारी मुर्खपणा आड येत असावा.
आत शिरल्या बरोबर ही जागा हेरीटेज वास्तू आहे म्हणून एक पाटी दिसते- त्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही खूण दिसत नाही. चर्चच्या समोर तोंड करून उभे राहिले असता उजव्या बाजूला नवीन बांधकाम केलेली ( म्हणण्यापेक्षा प्लास्टर केलेली )इमारत दिसते. या भागात चर्चचे म्युझियम आहे.
हे चर्च तिन मजली आहे. दुरुन पाहिले तर खूप उंच असलेली पोर्तुगीज शैलीतली एक मोठी इमारत दिसते. सगळेच चर्च असेच असल्याने ही इमारत चर्च ची आहे हे न सांगता लक्षात येते. गोव्याला मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेला चिरा ह्या चर्चच्या बांधकामासाठी वापरलेला आहे. इतकी उंच असलेली भिंत कुठलाही आधार नसलेली पाहून थोडे आश्चर्य अवश्य वाटते, पण डोरियन आणि कोरिएन्थिएन पद्धतीच्या बांधकामा मुळे हे सहज शक्य झालेले आहे. ह्या दोन्ही ग्रीक बांधकामाच्या फार जुन्या शैली आहे. या मधे खांबांचा आधार घेऊन इमारत उभी केली जाते.जर खांबांचा सपोर्ट नसला ,तर ७८ फुट उंचीची भिंत उभी करणे अशक्य कोटीतली गोष्ट आहे. या खांबाच्या आधाराच्या प्रकाराचा एक फोटो पोस्ट केलाय .
चर्चच्या समोर उभे राहिले असता चर्चच्या डाव्या बाजूला तीन भिंती परपेंडीक्युलर बांधुन अर्धवट सोडल्या सारख्या वाटतात. पण चर्चची ७८ फुट उंचीच्या भिंतीला आधार देण्यासाठी म्हणून त्या भिंती बांधल्या गेलेल्या आहेत. जर या भिंती बांधल्या गेल्या नसत्या तर कदाचित ही भिंत कधीच कोसळली असती. गोव्याच्या बहुतेक चर्च चा समोरचं एलीव्हेशन असेच आहे. उजव्या बाजूच्या भिंतीला, बांधलेल्या खोल्यांमुळे ( जिथे सध्या म्युझियम आहे ) आपोआपच आधार मिळतो.
चर्च चे पुर्ण बांधकाम हे चिरे वापरून केलेले आहे, पण समोरचा दर्शनी भाग मात्र एक वेगळा बेसाल्ट दगड वापरून बनवलेला आहे. अशा दगडाचा उपयोग राजस्थानात केला जातो. समोरच्या भागाची उंची ७८ फुट आहे. समोरचा भाग चार भागात बनवलेला आहे. खाली मुख्य दरवाजा , नंतर वरच्या म्हणजे दुसऱ्या भागात तीन मोठ्या खिडक्या , आणि सगळ्यात वर गोलाकार तीन खिडक्या आहेत. बेसॉल्ट च्या दगडाच्या वापरामुळे दर्शनी भागास खूप उठाव आलेला आहे. शक्य तितक्या ठिकाणी कोरीव काम केलेले आहे.
हे चर्च साधारण पणे १५ व्या शतकाच्या अखेरीस पोर्तुगीज लोकांनी बांधलेले आहे. या चर्चचे बांधकाम पुर्ण करायला जवळपास दहा वर्ष लागली. भारतातील हे त्या काळचे सगळ्यात मोठे चर्च!गोव्याच्या सेंट पॉल चर्च वर ह्या चर्चचे डिझान बेतलेले होते. पण नंतर काळाचा ओघात सेंट पॉल चर्च नष्ट झाले.
चर्च चा आतला भाग ’मोझॅक कोरींथिय” स्टाइल मधे बनवलेला आहे. या चर्च चे फ्लोअरींग मार्बलचे आहे. १८२ फुट लांब आणि ५६ फुट रुंद असलेला मुख्य हॉल आहे. आत शिरल्या बरोबर उजव्या बाजूला एक कन्फेशन चेंबर ठेवलेले आहे. लाकडी कोरीव काम केलेल हे कन्फेशन चेंबर १६ व्या शतकातील आहे. इथल्या दरवाजाचे कोरीव काम पण अप्रतिम कलाकाराची कलाकृती म्हणता येईल.
वर एक बाल्कनी पण आहे, ज्या मधे उच्चभ्रू लोकं मासेस च्या वेळेस बसायचे, पण सामान्य लोकांसाठी मात्र खाली बसण्याची व्यवस्था केलेली होती. उजव्या बाजूला खूप कलाकुसर केलेली एक लहानशी बाल्कनी दिसते. पूर्वीच्या काळी माईक आणि लाउड स्पिकर सिस्टीम नसल्याने प्रिचिंग करणारा प्रिस्ट त्या बाल्कनी मधे उभे राहून प्रिचिंग करायचा.
समोर सोनेरी मुलामा दिलेली सुंदर भिंत दिसते. वरून जरी ती सोनेरी पत्र्याची भिंत दिसत असली, तरीही ती भिंत म्हणजे भिंतीवर लाकडी कोरीव काम केलेले शिल्प आहे, पण त्यावर सोन्याचा मुलामा दिल्याने लाकूड अजिबात दिसत नाही. त्या चित्रामधे एक खूप लठठ माणूस दाखवला आहे, तो म्हणजे जेरोम मस्करहॅन्स! ह्या मस्करहॅन्सनेच चर्च चे बांधकाम पूर्ण केले होते. त्याची आठवण म्हणून ते शिल्प कोरलेले आहे. त्याच्या बाजूला सेंट इग्नेशिअसची दहा फुट उंचीची प्रतिमा आहे. सोन्याचा मुलामा दिलेला सूर्य पण लक्ष वेधक आहे. ही सगळी कलाकुसर ही १६ व्या शतकातली असूनही अजूनही चांगल्या स्थिती मधे आहे.
झेवियर्स चे शव ठेवण्यात आलेली शवपेटी ही व्हलेरिन रेग्नार्ट नावाच्या रोमन कलाकाराच्या डिझानवरून गोव्याच्या कलाकारांकडून फादर मार्सेलो यांनी तयार करून घेतली आहे.६ फुट लांब ३ फुट रुंद आणि तितकीच खोल असलेली ही शवपेटी चांदीने मढवलेली आहे. शव खराब होऊ नये म्हणून आत पुर्ण पणे व्हेल्वेट लावले आहे.
एक सांगावसं वाटतं, की ह्या चर्च मधली प्रत्येक गोष्ट ही खूप सुंदर आहे. चर्च मधले फोटो काढण्यासाठी मनाई नाही, पण फक्त त्या फोटो मधे तुम्ही स्वतः नसावे इतकीच माफक अपेक्षा आहे. पण लोकं मात्र ,इथे आल्यावर त्या सूचनेकडे पुर्ण दुर्लक्ष करतात आणि स्वतःचे फोटो त्या कार्व्हिंग समोर काढून घेण्याचा प्रयत्न करतात.
हेरीटेज म्हणून हे एकच नाही, तर जवळपास १८ चर्च आहेत गोव्याला.सगळे चर्च साधारण याच सुमारास बांधल्या गेले आहेत. पण इथे झेवियर्स ची ममी असल्याने या चर्चला जास्त महत्त्व मिळते इतकेच. पुन्हा एक वर्ल्ड हेरीटेज पण दुर्लक्षित ! इथे जर या इमारतीच्या रचने बद्दल माहिती देण्यासाठी असतं तर बरं झालं असतं. जे गाईड्स आहेत त्यांना पण यातलं काहीच माहिती नाही. ते फक्त झेवियर्सची माहिती सांगत असतात.
एखाद्या हेरीटेज वास्तूचे महत्त्व हे त्या वास्तूचे बांधकाम कसे केले गेले? पुर्ण करतांना काय त्रास झाला ? अडचणी काय आल्या ?या बद्दल माहिती मिळवायची इच्छा असते, पण आपल्या कडे कुठेही लिखीत स्वरूपात डॉक्युमेंटेशन केल्या गेलेले नाही याचे वाईट वाटते. ही माहिती कशी मिळवायची तेच समजत नाही. असो.
मस्तच पोस्ट आहे. आत्तापर्यंत नेहमीच सेंट झेवियर्स च्या ममी चीच खरेच माहिती होती. चर्चच्या वास्तूची माहिती नव्यानेच समजली, आभार.
प्रतिक्रियेसाठी आभार. गोव्यातल्या प्रत्येकच चर्च सुंदर आहे. इथे फक्त ममी मधे लोकांचा इंटरेस्ट असतो.
वाह.. वाह..मस्त माहिती !!
त्या चर्चमधल्या ममी पुरतंच माहित होत, बाकी सगळी माहिती एकदम नवीन आहे, धन्स काका !! 🙂 🙂
सुहास,
त्या समो्रच्या भिंतीवरची सोनेरेई शिल्प ही लाकडी आहेत ही माहिती पण नवीनच आहे लोकांसाठी. एका पोर्तुगिझ साईटवर ही माहिती सापडली , पण भारतिय़ साईट वर कुठेही ही माहिती नाही. (जय गुगल ट्रान्सलेटर..)
Kaka, ha j0 cr0ss aahe tyala “Cr0ss 0f maic” as mhantat na, as mhantat ki manapasun prarthana keli tar tyawar tumhla jesus chi chabi diste….shevti dant kathach ti…as…pan hya church madhe lagna samarambh h0t nahit pan hyach churchya0ppsite ankhiek church aahe te hi khup jun aahe tithe lagna par padli jatat as mhantat…arthat guide ne sangitlya pramane….
लेख फार छान, माहितीपूर्ण झाला आहे. फोटोही सुरेख आहेत. मी चर्च प्रत्यक्ष पाहिलेले नाहीं तरी फोटो पाहून बरीच कल्पना येते. बांधकामाचा मुख्य आधार चीर्याचे खांब (चौरस) व चीरयाच्या भिंती हेच वाटतात. आपण चित्रात दाखवलेले गोल, डोरिक खांब हे चिरे वापरून बांधलेल्या खांबांच्या मधल्या शोभेच्या भिंतीचा भाग वाटतात, मुख्य, भार पेलणारे खांब वाटत नाहीत. बाजूच्या आडव्या भिंती आधार देतात हे बरोबर, त्याना Buttresses म्हणतात.
आतील भव्यता नजरेत भरणारी आहे. लाकडावरचे काम अप्रतिमच.
या चर्चची मुळ संकल्पना ही ग्रीक इंजिनिअरची, त्यामुळे ग्रीक शैलीचा प्रभाव असणे सहाजिक आहे. मी स्वतः आर्किटेक्ट नाही, त्यामुळे आर्किटेक्चरवर अधिकारवाणीने भाष्य करू शकत नाही. लाकडी कोरीवकाम तर अप्रतीम आहे.
dhanyavaad kaka…. durmil mahiti dilit….
रमेश
आवर्जून कळवल्याबद्दल आभार.
मलाही फक्त ममीमुळेच माहित होतं हे चर्च. इतक्या वेळा जाऊनही बांधकामाबद्दल अशी माहिती मिळवावी वगैरे कधीच लक्षात आलं नाही !! And that’s where your blog differs from others !! Hats off..
हेरंब
मला स्वतःला आर्किटेक्चर मधे बराच इंट्रेस्ट आहे , म्हणून माहिती काढली. पण समोरचे कार्व्हिंग हे लाकडावर आहे ही गोष्ट कोणालाच माहिती नव्हती. एका पोर्तुगल वेब साईट वर सापडली ती माहिती.
Tumacha ha blog khup,khup mahitipurna ahe. Mi tumache 2-3 lekh vachale,va vachun khup prabhavit jalo. khup khup chan. Thanx!
अनिकेत
ब्लॉग वर स्वागत.. आणि प्रतिक्रियेसाठी आभार.
Hiiiii