नो कमबॅक्स….२

दुसरा दिवस उजाडला आणि मी मात्र सकाळपासूनच रात्र कधी होते याची वाट पहात होतो. एकदाची रात्र झाली. साधारण साडे नऊ वाजले होते. मी क्लबच्या बार मधे एका कोपऱ्यात एकटाच बसलो होतो. समोर व्हिस्कीचा ग्लास होता. पहिलाच पेग सुरु होता. समोरुन रश्मी मेहेराला येतांना पाहिले. आज एकटीच होती ती. सरळ चालत माझ्याच टेबलवर येऊन बसली. तिला बघून बार टेंडरने एक ब्लडी मेरीचा ग्लास बनवला आणि तिच्या समोर आणून ठेवला.

काही न बोलता दोघंही एकमेकांकडे पहात बसलो होतो. काही बोलायची गरज असते का? छेः.. अजीबात नाही. तिला जे काही सांगायचं होतं, ते मला समजलं होतं, आणि आय एम शुअर , माझ्या मनातलं पण तिला समजलं असावं. थोड्यावेळ तसेच बसलो होतो.

मी तिला विचारले,” चलायचं?”
तिने उत्तर दिले, ” हो”

कुठे ,काय ,कशाला, ही कसलीही चौकशी न करता ती सरळ हो म्हणाली. मी पार्टी मधून बाहेर पडलो. अशा ठिकाणी गॉसीप सुरु होणं फार सोपं असतं, म्हणून आधी मी निघालो. तिला सांगितलं की मी पार्किंग मधे उभा आहे. माझ्या मागोमाग ती पण तिथे आली, आणि आम्ही सरळ क्लबपासून अगदी अर्धा किमी अंतरावर असलेल्या माझ्या फ्लॅट वर गेलो. तिथून दिड तासानंतर ती परत क्लब मधे परत गेली, आणि तिथून तिच्या कारने घरी परत गेली. ते दुसऱ्या दिवशीच्या भेटी बद्दल ठरवून.

**********
एक दिवस- तिची एक भेट- तिच्याबरोबर घालवलेला तो  दिड तास  आयुष्य इतकं बदलून टाकेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. तिच्या बरोबरचा दिवस वन नाईट स्टॅंड मधे मोडणारा नाही, ते तिला आणि मला तेंव्हाच   जाणवलं होतं. सुजीत मेहेरा आल्यावर मग कसं होणार? काही तरी तर करायलाच हवे? पण काय?? सुजीत मेहेरा मरायलाच हवा!

कुठलीही गोष्ट ही पूर्ण  पणे प्लानिंग  केल्याशिवाय करायची नाही ही माझी सवय, आणि हिच ती सवय जिच्या मुळे मी आजपर्यंत सुरक्षित आहे. जर रश्मी मेहेरा बरोबर लग्न करायचं असेल तर सुजीत मेहेरा  साठी या  जगात जागा नाही…  ही फॅक्ट ऑफ द लाइफ आहे. पण कसा मरेल तो?? आपल्याकडे  पैसा तर भरपूर आहे, पण कसा काटा काढायचा याचा? मला एकदम शिवा पाटील आठवला.

शिवा पाटील . या नावाचा कोणी माणूस आहे की हे एका अस्तित्वात नसलेल्या माणसाचे नांव आहे या बद्दल बरेच समज गैरसमज आहेत. एकदा शिवा पाटील ला काम दिले की काम झालेच हे नक्की. शिवाला आजपर्यंत कोणी पाहिलेले नव्हते, पण सगळ्याच उच्चभ्रू  वर्तुळात तो खूप प्रसिद्ध होता. त्याच्या कडून जर काम करून घ्यायचे असेल तर  राघव बरोबर संपर्क साधायचा. जर राघव कन्व्हिन्स झाला तरच तुम्हाला शिवा पाटील फोन करेल, आणि मग तुम्ही शिवाला काम सांगायचं. आधी राघवला कन्व्हिन्स  व्हायला हवा   की मी जेन्युईन पार्टी आहे म्हणून.

शिवाचा फोन आला.  कामाचे ठरले. त्याला सांगितले की काहीही झाले तरी काम हे व्यवस्थित व्हायलाच हवे,  कुठलाही पुरावा मागे रहाता कामा नये. कोणत्याही परिस्थितीत ह्या खुनाचा संबंध माझ्याशी जोडल्या जाणार नाही याची खात्री करून घेणार असलास तरच ठरलेल्या रकमेच्या दुप्पट पैसे  देईन. पैसे कितीही मिळतील.. अगदी हवे तितके.. पण   “देअर शुड बी नो कमबॅक्स”! माझ्याशी या खुनाचा संबंध जोडल्या जाणार नाही! त्याने एक  पर्फेक्ट मर्डर प्लान करुन काम करीन याची गॅरंटी  दिली. मी निःसंकोचपणे पणे त्याने सांगितलेल्या अकाउंट मधे पैसे जमा केले.

****************
आता फक्त सुजीत मेहेरा परत यायचीच वाट होती. रश्मी मेहेराला जर समजले की तिच्या नवऱ्याच्या खुनाची सुपारी दिलेली आहे तर?? रश्मीला सांगावं का? की नको? सांगितलं तर कदाचित ती मला पुन्हा भेटणार पण नाही.. आणि नाही सांगितलं तर काही बिघडत नाही. सुजीत मेला की आपल्याला काही माहितीच नव्हती असे वागु आणि नंतर मग तिच्याशी लग्न पण करता येईल.  मनातला गिल्टी कॉन्शस   झटकून टाकला, आणि रोजच्या कामात मन गुंतवले.

तीन दिवस शिल्लक होते सुजीत मेहेरा परत यायला.  तो पर्यंत तरी कसलीच काळजी नव्हती. दररोज रश्मी मेहेरा बरोबर भेट होत होतीच. किती दिवस लपून रहाणार असे संबंध? आता पर्यंत तरी कोणाला कसलाच संशय नव्हता. पण कधी नव्हे ते सुजीत मेहेराने भारतात परत यावं आणि लवकर मरावं.. म्हणजे हा नेहेमीचा टेन्शनवाला खेळ संपेल.

हल्ली रश्मी बरोबरच्या वागण्यात खूप मोकळेपणा आला होता. तिला आपलं साधं आयुष्य जगायचं होतं. पण सुजीतच्या बिझीनेस साठी म्हणून तिला सारख्या पार्टीज अटेंड कराव्या लागायच्या. तिने सांगितले की तिची इच्छा आहे की गोव्याला एखादा लहानसा बंगला बांधून समुद्रकिनारी रहाणं आवडेल तिला. तिची इच्छा नक्कीच पूर्ण करीन मी. मी ठरवले मनाशी.:) लवकरच !!!!

**************

राघव सकाळपासूनच  आपल्या कामात बिझी होता. शिवा पाटील ला जी माहिती काढून द्यायची होती, ती सगळी त्याने काढली होती. सुजीत मेहेरा परत आला होता सकाळच्या फ्लाईट ने. खूप त्रासलेला दिसत होता. त्याच्या पर्सनल असिस्टंट कडून त्याच्या आजच्या रात्रीच्या प्रोग्रामची माहिती काढली होती. शिवा पाटील  राघव बरोबर  फोन वर बोलत होता. आज सुजीत मेहेरा घरीच आहे. तेंव्हा आजच काम उरकून टाकु. आणि शिवा पाटील  कामाला लागला…..

************

रात्री एक वाजत आला होता. मी क्लब मधे बसलो होतो. आता पर्यंत चार पेग झाले होते. शिवा पाटील म्हणाला होता की आज रात्रीच काम होईल . काम झाल्याबरोबर तो आपल्याला  फोन करेल की उद्या आपल्याला ही बातमी पेपर मधेच पहायला मिळेल? मनात विचार सुरु होते, तेवढ्यात फोन वाजला…
” शिवा बोलतोय, काम झालंय!  पर्फेक्ट मर्डर..   सुजीत मेहेराला गोळी घातली, तेंव्हा त्याची बायको पण बेडरूम मधे आली, त्या मुळे तिला पण शुट करावे लागले.   सो, देअर विल बी  नो कम बॅक्स! एकही पुरावा मागे सोडलेला नाही” आणि शिवाने फोन बंद केला.

*************

मूळ संकल्पना जेफ्री आर्चर

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

47 Responses to नो कमबॅक्स….२

 1. कथा खूप भावली. त्यातही कथेचा शेवट खूप आवडला…….

 2. Damodar says:

  This is an english short story by Feredric Forsyth from the book ” No Comebacks “. Credit not given to the original writer.

  • दामोदर
   ब्लॉग वर स्वागत.
   जेफ्री आर्चरची आहे मूळ संकल्पना. पण कथा मात्र पुर्णपणे नवीन लिहिली आहे.
   लेखाच्या खाली लिहिले आहे तसे.

 3. Atul Ranade says:

  END IS AWESOME & UNEXPECTED!

 4. tejali says:

  dhakkaa….!!!..bhari…

 5. Poorva Kulkarni says:

  Superb.. very interesting. mast aavdli

 6. mau says:

  End is unexpected.Too good !!!

 7. आल्हाद alias Alhad says:

  हाहाहाहाहा

  भन्नाट शेवट!

 8. शेवट एकदम पलटी मार के उलटा…
  कथा आवडली.

 9. सुदर्शन says:

  मस्तच.
  तेल गेलं… तूप गेलं, हाती धुपाटणे पण नाही राहिले. 🙂

 10. Chetan says:

  खूपच मस्त काका….

  • चेतन
   खरं तर फार जास्त लिहायचा कंटाळा येतो म्हणून नाही तर चांगली सात आठ भागा पर्यंत वाढवता आली असती. 🙂 प्रतिक्रियेसाठी आभार.

 11. pramod says:

  खूपच भारी आहे या कथेचा शेवट…….

 12. truptisalvi says:

  अनपेक्षित शेवट होता हा पण कथेच्या नावाला साजेसा. तुमचे प्रस्तुतिकरण उत्तमच.

 13. Srinivas says:

  Good adaptation. However the original writer is Frederick Forsyth. not Jeffrey Archer..

 14. Srinivas says:

  Good adaptation. However the original writer is Frederick Forsyth. not Jeffrey Archer..

  • श्रीनिवास
   बरेच वर्षापुर्वी वाचले होती. कदाचित माझीच चूक झाली असेल. फक्त मूळ संकल्पना घेतली आहे, बाकी कथा पूर्ण वेगळी लिहिलेली आहे.
   जेफ्री माझा फेवरेट!! म्हणून माझं कन्फ्युजन झालं.

   • Srinivas says:

    Mahendra,
    Your version is offcourse fascinating (not only climax but the entire story).

    No doubt Jeffery is great…There are many movie adaptations of his ‘Kane & Abel’. It is a masterpiece & my favorite .

    -Srinivas

    • श्रीनिवास
     धन्यवाद.. खूप खूप वर्ष झाले कथा वाचून.. आता पुन्हा एकदा वाचावी लागणार. जेफ्री आर्चरची केन ऍंड एबल पहिली कादंबरी वाचली होती, दुसरी प्रोडीगल डॉटर आणि मग नॉट अ पेनी मोअर…… एके काळी फक्त जेफी आर्चर आणि आयर्वींग वॅलेस वाचायचो. हल्ली चष्म्याचा नंबर वाढल्याने वाचन संपल्यातच जमा आहे.. 😦

 15. सॉलिडच एकदम.. मस्त धक्कादायक शेवट !! कथेचं नाव अगदी चपखल !

 16. S.V.TOBRE says:

  AApali katha khupa khupacha AAvadali

 17. जबरीच.
  शेवट अगदी unexpected होता.छान.उत्तमच म्हणावी लागेल

 18. Gurunath says:

  क्या बात काका मला इन्स्पायर केलेत तुम्ही आता हा जॉनर सुद्धा ट्राय करणार मी हा हा हा!!!!!!….. बिचारा राज!!!! अजुन काय म्हणणार!!!! क्लासिक शेवट!!!! गुरुदत्त मुव्ही स्टाईल!!!!!!!

  • गुरुनाथ
   बऱ्याच् वर्षापुर्वी एक कथा वाचली होती.. आणि मनात घर करून बसली होती. आज तिला मुर्त रुप दिलंय.

 19. खरच शेवट एकदम भन्नाट केलात … कथा आवडली ….

 20. Milind says:

  दर वेळेला नवीन काहीतरी कसं काय आणता ? कुठून सुचत ? असले प्रश्न नाही विचारणार तुम्हाला पण जे लिहिताय ते मस्त आहे ..अगदीच ‘वाट्टेल’ ते नाहीये .

  शेवट वेगळाच निघाला. पण मजा आली …. ह्यावर एक शोर्ट फिल्म बनू शकते.

 21. sukhada says:

  Hi,
  Nice & interested story

 22. shradha says:

  Superb!!!!!! imagine kelach navat asa shevat asel…..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s