परवाचीच गोष्ट आहे. मुंबई सेंट्रलला कामानिमित्त जाणे झाले होते. तिथे रस्त्याच्या कडेला हा एक बॉक्स दिसत होता . तुटलेल्या अवस्थेत असलेला हा बॉक्स अजूनही चांगल्या स्थितीत दिसतो. कोणे एके काळी अतिशय महत्त्वाची असलेली ही वस्तू आज मात्र एखाद्या निरर्थक वस्तू प्रमाणे पडलेली पाहून खरंच वाईट वाटलं हा बॉक्स आहे फायर अलार्म चा. साधारण पणे १९०० – १९४० च्या सुमारास ह्या फायर अलार्मचा उपयोग केला जायचा. कुठे जवळपास आग लागली की ह्या बॉक्स च्या समोरची काच फोडून इथे असलेले एक हॅंडल फिरवले, की फायर ब्रिगेडच्या ऑफिस मधे घंटी वाजायची आणि पाच मिनिटात इथे आगीचा बंब ( फायर टेंडर) पोहोचायचा. इंग्रजांच्या काळात उभा केलेला तो खांब अजूनही त्यांच्या कार्यतत्पर व्यवस्थेची साक्ष देतो.
मुंबई चा फोर्ट विभाग हा इंग्लंडच्या सारखा बनवला होता ब्रिटिश लोकांनी. इथेच रहायचं,तर मग स्वतःच्या घरच्या सारख्या सुख सोयी करून का घेऊ नये म्हणून असेल कदाचित किंवा होमसिक वाटू नये म्हणून असेल!. पण सगळ्या इमारती, रस्ते वगैरे सगळे काही इंग्लंड प्रमाणे बनवले होते त्यांनी. त्या काळी टेलिफोन ची उपलब्धी सगळीकडे नव्हती, त्यामुळे ही सिस्टीम अगदी चोख काम करायची. भायखळ्याला एक टॉवर होता, त्या टॉवरच्या वर एक फायरब्रिगेडचा माणूस सगळीकडे दुर्बिणीतून नजर ठेवायचा. पूर्वीच्या काळी जी फायर टेडर दहा मिनिटात इच्छित स्थळी पोहोचू शकत असे, त्या प्रमाणे आज पोहोचू शकेल?? मला नाही वाटत!
असो , मुद्दा वेगळाच आहे. मुंबई फायर ब्रिगेड ची स्थापना ही १८५५ साली करण्यात आली.सुरुवातीला पोलीस विभागाचा एक भाग म्हणून त्याकडे पाहिले जायचे. आगीचे बंब नसल्याने, त्या काळी घोडा गाडीवर पाण्याच्य़ा टाक्या लावलेल्या असायच्या. पोलीस डिपार्टमेंटच्या अखत्यारीतले हा एक विभाग होता होते.
आजची परिस्थिती काय झाली आहे फायर ब्रिगेडची? आजकाल तर काहीही झाले तरीही फायर ब्रिगेडला बोलवण्याची पद्धत आहे. झाडावर मांजर अडकली, बोलाव फायर ब्रिगेडला, कोणी विहिरीत पडले, बोलवा फायर ब्रिगेडला, कोणी समुद्रात वाहून जातंय, बॉम्ब ब्लास्ट झालाय- बोलवा………….. ह्या अशा परिस्थिती मधे फायर ब्रिगेडचे मूळ उद्देश काय होते, हे पण जरा विसरल्या सारखेच झाले आहे.२६ जूनला मुंबई ला पावसाने पुर्ण पणे वेढले होते. सगळी मुंबई जलमय झालेली होती. फायर डिपार्टमेंट होतंच रेस्क्यु मिशन साठी! शक्य तितक्या ठिकाणी जाऊन कुठलेही काम करण्याची क्षमता या विभागाने स्वतः मधे निर्माण करून घेतलेली आहे. आजकाल ट्रॅफिक इतका वाढलाय की दोन किमी अंतर पार करायला किती वेळ लागेल हेच सांगता येत नाही. आणि जेंव्हा तिथे पोहोचेल , तो पर्यंत बिल्डींगचा कोळसा झालेला असेल. लोकसंख्या, रस्त्यावरची एन्क्रोचमेंट आणि मोठमोठ्या इमारती या सगळ्या गोष्टींमुळे आगीच्या बंबाच्या मुव्हमेंट वर बरीच बंधनं आलेली आहेत. मुंबईला चालायला फूटपाथ नाहीत.
फायर ब्रिगेड ची आज अगदी पूर्ण पणे दूरावस्था झालेली आहे. महापालिकेला तर अजिबात वेळ नाही , या विभागाकडे लक्ष द्यायला. अग्निविरोधक कपडे, नवीन प्रकारचे गॅस मास्क्स, समुद्रात काम करण्यासाठी हाय स्पिड बोटी , उंच इमारतींवर जर कधी आग लागली तर आकाशातून पाणी किंवा केमीकल्सचा वर्षाव करून आग आटोक्यात आणण्यासाठी हेलीकॉप्टर , अशा असंख्य गोष्टी आहेत , की ज्या असायला हव्या. आगीच्या बंबाचे लोकेशन्स वाढवायला हवे. शहरात जागोजागी हे बंब तैनात केले तर आग लागलेल्या ठिकाणी पोहोचायला त्यांना कमी वेळ लागेल. पण या सवतीच्या मुला कडे म्हणजे फायर डिपार्टमेंट कडे आज ना महापालिकेचे लक्ष आहे, ना सरकारचे.
उंच बिल्डींग वरच्या लोकांना वाचवायला एक्स्पांडेबल शिड्यांची आवश्यकता असते. सध्या अशा शिड्यांची पण कमतरता आहे. उद्या जर एखाद्या ३२ व्या मजल्यावरच्या पेंट हाऊस मधल्या फ्लॅट ला आग लागली, तर त्यात रहाणाऱ्याचा जळून कॊळसा जरी झाला, तरी त्यांना वाचवता येईल का याची खात्री नाही. दिवाळी मधे दर वर्षी बऱ्याच झोपड्यांना फटाक्यामुळे आगी लागतात, आणि एकदा आग लागली की कमीत कमी ३००-४०० झोपड्यांचा घास घेऊनच ती आग थांबते- याचं कारण तिथपर्यंत आगीचा बंब पोहोचु शकत नाही. अरुंद रस्ते हे याचं मुख्य कारण!.
एखादी उंच इमारत बांधायची म्हंटले तर त्या साठी फायर ब्रिगेडची परमिशन घ्यावी लागते. त्या साठी काही मुलभूत नियम आहेत. जसे त्या बिल्डींगची स्वतःची फायरफायटींगची सिस्टीम असायला हवी, बिल्डींग मधे फायर पंप असायला हवा. फायर एस्केप … अशा अनंत गोष्टी आहेत. पण त्या गोष्टींचे पालन केले जाते का? की नियमातल्या त्रुटि शोधून त्या बिल्डर्सला परवानगी दिली जाते? या मधे असलेले अर्थकारण नाकारत येत नाही.
फायर इन्स्पेक्टरचा जॉब हा वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या फायर सेफ्टी तपासणे वगैरे असतो. हॉटेल्स मधे आग लागली तर विझवण्याची व्यवस्था आहे का? पण या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून काही रुपये खिशात घालणे इतकाच उद्देश असतो. मला वाटतं की भारत देशामधे ’इन्स्पेक्टर’ या शब्दाला लागलेला हा शाप आहे. एकदा इन्स्पेक्टर शब्द आला , मग तो सेल्सटॅक्स , इनकम टॅक्स , फायर किंवा अजून कुठलाही असो.. इन्स्पेक्टर म्ह्टले की ला-लुचपत आलीच!
लहान असतांना मला पण फायरट्रक चालवावा असे खूप वाटायचे. त्या फायर ब्रिगेडच्या लोकांचे ते युनिफॉर्म, हॅट्स वगैरे पाहिल्यावर आपणही तसे रुबाबदार कपडे घालण्यासाठी का होईना पण फायर ब्रिगेड मधेच काम करावे असे वाटायचे.अहो, लहानपणी मला बरंच काही व्हायचं होतं, कधी वाटायचं की रेल्वे ड्रायव्हर बनावे, तर कधी पायलट!! :). कधी समोरून तो आगीचा बंब गेला की त्यावर मागे उभा असलेला तो माणूस, हाताने पितळी चकाकणारी घंटी वाजवत जात असे- आग लागलेली आहे हे लोकांना समजावे आणि त्यांनी मार्ग द्यावा म्हणून!

गेल्या कित्येक वर्षात रस्त्यावर भर घातल्याने रस्त्याची उंची वाढली, आणि हायड्रंट जमिनित गाडल्या गेले आहेत.
मुंबई फायर ब्रिगेड ! एके काळची एक जगविख्यात संस्था. पण त्या संस्थेचे आजच्या ब्युरोक्रसी ने केलेले हाल बघितले की खूप दुःख होते . परवाची गोष्ट आहे, मालाड स्टेशन पासून तर वेस्टर्न एक्सप्रेस हायवे कडे जातांना रस्त्यावर एक वस्तू दिसली. फोटो देतोय इथे. काय असेल बरं ही गोष्ट? नाही लक्षात येत?
हा फोटो आहे फायर हायड्रंट चा. बऱ्याच ठिकाणी असे फायर हायड्रंट्स लावलेले असतात. शक्यतो , जेंव्हा कधी आग लागेल तेंव्हा या हायड्रंट्सला होज पाईप जोडला, आणि व्हॉल उघडला की आग विझवली जाऊ शकते. ज्या ठिकाणी आगीचा बंब जाऊ शकत नाही त्या ठिकाणी हे हायड्रंट वापरण्याची पद्धत खूप उपयोगी ठरते. विशेषतः झोपडपट्ट्या मधे किंवा खुप अरुंद असलेल्या लेन मधे असे हायड्रंट लावल्या जावे गेले तर बराच फायदा होऊ शकतो. पण दुर्दैवाने ह्या हायड्रंट्स ला फक्त लावायचे म्हणून लावलेले दिसते. अर्ध्या पेक्षा जास्त हायड्रंट्स वेळ आल्यावर त्यात पाणी येईल का ? हा प्रश्न पण आहेच. बऱ्याच ठिकाणी तर हे चक्क पूर्णपणे जमिनीखाली गाडल्या गेले आहेत. वर्षानुवर्ष यांचे मेंटेनन्स न करण्याचे हे परिणाम आहेत. खाली एक दुसरा फोटो देतोय, त्या मधे योग्य हायड्रंट कसा लावावा ते दाखवला आहे.
मुंबई शहर वाढत चाललंय- अगदी चारही दिशांनी अस्ताव्यस्त पणे वाढत चाललेले आहे, पण त्या दृष्टीने इन्फ्रास्ट्रक्चर वाढलेले दिसत नाही. जागोजागी तुंबलेली गटारं काय , किंवा ट्राफिक जाम काय- ह्या सगळ्या गोष्टी याचीच ग्वाही देतात. महापालीके मधे असलेले सगळे नेते, गावगुंड हे स्वतःची तुंबडी भरण्यात आणि आपल्या नेत्यांना त्यांचा हिस्सा पाठवण्यात गुंग असतात , खरं काम करण्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ आहे?
फायर अलार्म चा व्हिडिओ इथेआहे.
हा लेख पूर्ण झाल्यावर ही प्रदिपची कॉमेंट आली. ही कॉमेंट मधे न रहाता मूळ लेखाचा भाग व्हायला हवी होती . इथे मुद्दाम पोस्ट करतोय
Pradeep says:
सुरेख लेख महेंद्र !
मी बऱ्यांच दिवसांनी प्रतिक्रिया देत आहे तुमच्या ब्लॉग वर.
खरं तर मी जवळ जवळ २१ वर्षे फायर ब्रिगेड च्या quarters मध्ये राहिलो आणि त्यातली १५ वर्षे फोर्ट मध्ये. आणखी थोडे details add करतोय तुमच्या ब्लॉग वर.
मुंबई मध्ये तीन मुख्य फायर ब्रिगेड आहेत – सर्वात मोठे आणि जुने म्हणजे महापालिकेचे फायर ब्रिगेड आणि त्यानंतर मुंबई पोर्ट trust , सरकारी आस्थापनांचे म्हणजे ONGC , Railways , Navy etc. जर दुर्घटना फार मोठी असेल – जसा BOMB BLASTS, तर हे सगळे फायर ब्रिगेड मदतीला येतात.
तुम्ही सांगितल्याप्रमाणे इंग्रजांनी १८५५ मध्ये मुंबईत पहिले फायर ब्रिगेड सुरु केले आणि साहजिकच सर्वात पद्धतशीर फायर ब्रिगेड स्टेशन्स दक्षिण मुंबईत आहेत – साधारण दर ५ KM मध्ये एक फायर ब्रिगेड. पण उपनगरात हे प्रमाण अजूनही बरेच कमी आहे.
सर्वात जुनं असल्यामुळे आणि साहेबांनी बऱ्यापैकी शिस्त लावल्यामुळे मुंबईचे फायर ब्रिगेड बाकी सर्व भारतीय शहरांपेक्षा बरेच पुढे आहे.
साधारण १९९० पर्यंत मुंबई फायर ब्रिगेड मध्ये सर्व कर्मचारी २४ तास duty वर असत, त्यातले ८ तास प्रत्यक्ष पहाऱ्यावर आणि बाकी १६ तास कुठेही असलात तरी बेल वाजल्यावर २० सेकंद मध्ये दलाची गाडी पकडावी लागायची.
त्यावेळी सर्व कर्मचारी QUARTERS मध्येच राहायचे त्यामुळे तिथले वातावरण एकदम चाळीसारखे होते आणि आम्हा मुलानाही बाबा काय करतात त्याचे खूप आकर्षण वाटायचे.
मुख्य म्हणजे कुठे CALL येऊन बेल वाजली की वयाच्या पन्नाशीतही हे कर्मचारी QUARTERS मध्ये लावलेल्या स्टील पोल ला लटकून ५-१० सेकंद्स मध्ये तळमजल्यापर्यंत पोहोचायचे आणि फायर ब्रिगेड ची गाडी २०-३० सेकंद्स मध्ये निघायची.
बाकी वेळ फायर ब्रिगेड च्या मैदानात परेड, simulation exercise वगैरे रोज ३-४ तास चालत असते. त्यातला एक प्रकार म्हणजे खास फायर exercise साठी बांधलेल्या tower च्या दुसऱ्या मजल्यापर्यंत शिडी लावायची आणि त्यावरून पूर्ण टीम ने २ च्या ग्रूप मध्ये खाली उतरायचे. त्यातल्या त्यात जो कुणी सर्वात कमकुवत असेल त्याने सर्वात जड माणसाला खांद्यावर घेऊन खाली उतरायचे. ह्या वेळी जो खांद्यावर असायचा त्याच्या डोक्यावर हेल्मेट नसायची आणि खाली कोणतेही संरक्षण नसायचे. हि exercise सुरु झाली की मग रस्त्यावर बघ्यांची गर्दी व्हायची . आम्हा मुलांपैकी ज्यांचे वडील खाली येत असायचे ते भीतीमुळे किंवा काही चुकीचे होऊ नये म्हणून नेहमी डोळे मिटून घ्यायचे.
सुदैवाने इतक्या वर्षात काही मोजके अपवाद वगळून exercise च्या वेळी एकही दुर्घटना झालेली नाही पण ह्या सरावामुळे मुंबईत फायर ब्रिगेड साधारण कमी उंचीच्या बिल्डींग्स मध्ये शिड्या लावून व्यवस्थित लोकांना बाहेर काढू शकते. हा असा प्रकार मी USA किंवा UK मध्ये अजून तरी पाहिलेला नाही, कदाचित इकडे नवीन उपकरणे आल्यामुळे हे होत नसावे.
अगदी लहानपणापासून हे पाहिल्यामुळे फायर ब्रिगेड च्या बऱ्याच कर्मचाऱ्यांची मुले पुढे त्याच नोकरीत जातात. जुन्या QUARTERS मध्ये exercise साठी भरपूर जागा असल्यामुळे कर्मचारी सुद्धा फिट असायचे.
साधारण १९९० ला फायर ब्रिगेड मध्ये मोठा संप झाला आणि कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी होती कि सलग २४ तासांऐवजी ८ तासांची ड्युटी असावी. हि मागणी मान्य झाल्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या तीन पट वाढली पण QUARTERS लिमिटेड असल्यामुळे हे सर्व नवीन कर्मचारी दुरून कामावर यायचे आणि लवकर निघून local पकडून घरी पळायचा कल असायचा. सुरुवातीला एकाच चाळीत सर्व कर्मचारी राहत असल्यामुळे जे team work असायचे ते बंद झाले आणि २०-३० सेकंद्स मध्ये गाडी CALL वर निघाण्याऐवजी दुप्पट तिप्पट वेळ लागू लागला. लहान असताना मला फोर्ट मधले बहुतेक सर्व फायर hydrants माहित होते कारण वेळो वेळी बाबांच्या तोंडून त्या जागा ऐकायला मिळायच्या . त्यावेळी hydrants उघडण्यासाठी लागणारं साहित्य फ़क़्त फायर ब्रिगेड कडे असायचं आणि प्रत्येक hydrant महिन्यातून एकदा टेस्ट केला जायचा. काही वर्षांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांकडेही ते साहित्य आलं आणि ते सर्रास रात्रीच्या वेळा hydrant उघडून पाणी घ्यायला लागले. हे पाणी विकण्याचाही धंदा जोरात चालायचा. मला नाही वाटत आता १०% hydrants मध्ये पाणी मिळत असेल.
फायर ब्रिगेड चे कमीत कमी ५०% calls हे झाडावर अडकलेले पक्षी काढण्यासाठी , रस्त्यावर पडलेली झाडे उचलण्यासाठी किंवा इतर तत्सम कारणांसाठी होतात. एखादी मोठी आग लागली कि मग दैवावर हवाला ठेवून पाण्याचा hose पकडून आगीवर पाणी फेक्ण्याशिवाय फायर ब्रिगेड च्या हाती खरं तर फारसा जास्त काही नाही. helicopters , super-ladders वगैरे गोष्टी यायला अजून भरपूर वेळ आहे . साधारण पावसाळ्याची वेळ फायर ब्रिगेड साठी असते प्रेमी युगुलांची प्रेते समुद्रातून काढण्याची. अजूनही आठवते कि लहान असताना बाबांनी CALL वरून परत आल्यानंतर सरळ घरात ना येत आंघोळीसाठी घराबाहेर पाणी ठेवायला सांगितल्यावर आम्हाला समजायचे कि कुठे तरी प्रेतांना हात लावलेला आहे. त्यातल्या त्यात JUNE जुलै मध्ये अजूनही NARIMAN POINT आणि BANDRA BANDSTAND इथे बऱ्याच आत्महत्या होतात आणि प्रेते पाण्याखालच्या दगडांमध्ये अडकून बसतात .
मुंबईत सर्वात मोठा प्रश्न आहे प्लानिंग न केल्यामुळे होणारा ट्राफिक चा अडथला, dedicated lanes आणि पार्किंग ला जागाच नसल्यामुळे अपघात स्थळापर्यंत पोहोचायला लागणारा वेळ. आणि आणखी एक महत्वाचा प्रोब्लेम म्हणजे भ्रष्टाचार. हो, फायर ब्रिगेड हि सुद्धा एक भ्रष्टाचरी सेवा आहे. इथे फरक इतकाच कि हा भ्रष्टाचार मुख्यतः अधिकारी वर्गाकडून – आणि ते सुद्धा काही ठराविक परीक्षा पास झालेल्या अधिकाऱ्यांकडून होतो. उदाहरण द्यायचे झाले तर प्रत्येक बिल्डिंग च्या प्लान ला फायर ब्रिगेड च्या प्रांतिक अधिकार्याची मान्यता असावी लागते आणि ९०% नवीन बिल्डींग्स कडे फायर protection ची कोणतीही व्यवस्था नसतानाही बांधकामाला ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते. जिथे कुठे commercial reasons साठी cooking gas वापरला जातो – म्हणजे restaurants वगैरे, तिथे प्रत्येक ३ महिन्यांनी निरीक्षण करून फायर ब्रिगेड च्या प्रांतिक अधिकार्याला safety certificate द्यावे लागते. आग लागून किंवा इमारत कोसळून नुकसान झाले कि insurance claim करताना पुन्हा फायर ब्रिगेड च्या अधिकाऱ्यांचे certificate हवे असते. मुंबईत फटाके विकण्यासाठी सुद्धा फायर ब्रिगेड चे certificate हवे असते. प्रत्यक्षात अशा inspection च्या वेळी हे अधिकारी एक मोठी suitcase घेऊन जातात आणि घरी येताना हि suitcase पुरेपूर भरलेली असते. जर एखाद्या त्रयस्थ संस्थेकडून ह्या अधिकाऱ्यांच्या संपत्तीची आणि दिलेल्या certificates ची चौकशी केली तर कमीत कमी ९०% ठिकाणी गैरव्यवहार झालेला दिसून येईल. पूर्ण मुंबई मध्ये ह्या अधिकाराचे साधारण २०-२५ अधिकारी आहेत आणि गेल्या ५ वर्षात फायर ब्रिगेड चे ४-५ वरिष्ठ अधिकारी निलंबित झालेले आहेत.. हि रक्कम इतकी मोठी असते कि बऱ्याच अधिकाऱ्यांच्या मुलांची लागणे राजकारणी घरांमध्ये झालेली आहेत. उदा – प्रमोद महाजन ह्यांच्या मुलीने ex -Head Mumbai Fire Brigade च्या मुलाशी लग्न केले. हे लिहिण्याचा उद्देश इतकाच कि रकमेची कल्पना यावी.
बाकी इतर सेवान्प्रमानेच फायर ब्रिगेड च्या बाबतीत आपल्याला दैवावर विश्वास ठेवून जगण्यापेक्षा दुसरा काही उपाय नाही
“फायर अलार्म” ची माहिती पुरविल्याबद्दल धन्यवाद काका… जन्मापासुन मुंबई मधे असुन सुद्धा ह्या गोष्टिची कल्पना नव्हती…बाकी मुंबई बद्दल जी वस्तुस्थिती वर्णन केलीय ती खरचं काळजी करण्यासारखी गोष्ट आहे…असो.
तुम्हाला आणि तुमच्या समस्त परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा… हि दिवाळी आपणा सर्वांस आरोग्याची, सुखा-समाधानाची आणि भरभराटीची जाओ हिच ईश्वर चरणी प्रार्थना. शुभ दिपावली.
शिरीष
धन्यवाद.. अरे बऱ्याच जुन्या गोष्टी अशा अवस्थेत दिसल्या की वाईट वाटतं. आपण चक्क दुर्लक्ष करतो या गोष्टींकडे..
दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना पण !
तू अश्या अचाट गोष्टी कुठून शोधून काढतोस रे?
नेहमीप्रमाणे लेख मस्त आहे..
अरे डोळॆ आणि कान उघडे ठेऊन या जगाकडे वेगळ्या नजरेने पाहिले की .. बरंच काही दिसतं असं इंटरेस्टींग.. मग तेच इथे शेअर करतो ब्लॉग वर!
Lekh mast ahe.
Khoop aawdla.
Chhan mahiti diliy. Thanks! 🙂
गायत्री
अभिप्रायाबद्दल आभार.
काका, तुम्हाला कदाचित “२६ जूनला” ऐवजी “२६ जुलै” (ref: 4th paragraph) बोलायचे होते का? चान पोस्ट झाली आहे.
दत्तात्रेय,
धन्यवाद.. मला जुलैच लिहायचं होतं..:)
वाह चांगली माहिती..
कालच मी मित्राकडे गेलो होतो तेव्हा जमिनीत पुरलेला हायड्रंट बघून हेच मनात आलं होत. चालता चालता त्याला ठोकर लागली होती. रस्त्याची ऊंची वाढवता वाढवता, त्यांनी अश्या सुविधा पुरून टाकलेल्या बघून अंमळ वाईट वाटलं… 😦 😦
सुहास
गेले बरेच दिवस हा विषय मना मधे घोळत होता. आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचं पण दुर्लक्षित विभाग म्हणजे फायरबिग्रेड म्हणता येईल.
सगळ्या जगात जुन्या फायर सिस्टीम्स सुरु ठेवण्यात आलेल्या आहेत. हवे तिथे बदल करून मुळ सिस्टीम सुरु ठेवणॆ सहज शक्य आहे. पण सगळे नगरसेवक(??) लक्ष देतील तर ना??
मस्त माहिती, काका! त्या फायर अलार्म सिस्टीममधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती खरंच काम करायची … आज देखभाल नसल्यामुळे आपल्या आपत्कालीन व्यवस्थांपैकी काय काय खरंच वेळ पडली तर काम करेल अशी शंका वाटते.
गौरी
नुकतीच एक बातमी वाचण्यात आली, करोडो रुपये खर्च करून विकत घेतलेल्या हाय स्पिड लॉंचेस , मुंबई पोलिसांनी झाकून ठेवल्या आहेत. कारण काय? तर म्हणे डिझल साठी पैसे नाहीत!!
ब्युरोक्रसी म्हणजे अक्षरशः सामान्यांचा छळ करण्यासाठी तयार केलेली आहे का? अशी शंका येते.
Very useful & interesting information. But this is one of the neglected department of Govt. Fire Brigade is the most useful dept. in any counrtry.
Wish you & your family a very hapy Deepavali sir.
अनूप
ब्लॉग वर स्वागत.. आणि प्रतिक्रियेसाठी आभार.
खरंच मोलाची माहिती… सर्वच महानगरांत ही महत्वाची गोष्ट दुर्लक्षीत आहे 😦
आनंद
धन्यवाद..
सर तुमचा ब्लॉग खरच छान आहे . गेले दोन तीन दिवस तुमच्या ब्लॉग वरील बरेच लेख मी वाचून काढले आहेत. त्या मधील मला ‘ वात्रट मुलाची कथा ‘ हा लेख फारच आवडला.
सर तुमच्या ब्लॉग वरील ‘ ब्लॉगर मित्र मैत्रीणी ‘ पाहिले. सर जर तुम्हाला माझा ब्लॉग योग्य वाटला तर तुम्ही मला आपल्या मित्र परिवारात समावेश करून घ्याल का? तुम्हाला काही हरकत नसेल तर च, कारण मी ह्या ब्लॉगिंग क्षेत्रात नवीनच आहे.
माझ्या ब्लॉग च्या लिंक : http://mankallol.blogspot.com/
http://shrikantsketches.blogspot.com/
तुम्हाला आणि तुमच्या समस्त परिवारास मनकल्लोळ कडून आणि माझ्या कडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!!!
श्रीकांत
ब्लॉग वर स्वागत. ऍड करतोय.. 🙂
धन्यवाद.
hats off to you. real good observation and research of course!
happy diwali .
अरुणा
प्रतिक्रियेसाठी आभार. अहो मला फार अट्रॅक्शन होतं या डिपार्टमेंट बद्दल!
तुम्हाला पण दिवाळीच्या शुभेच्छा!
काका, नेहमीप्रमाणेच साध्या गोष्टीकडे वेगळ्या कोनातून बघितल्याने आलेली एक छान माहितीपूर्ण पोस्ट !! आवडली. इथल्या फायर डिपार्टमेंटची सेवा, व्यवस्था पाहता आपल्या इकडचा कारभार खरोखर फारच चिंतेत टाकणारा आहे !!
हेरंब
ते हायड्रंट मला नेहेमी दिसायचं आणि सुरुवातीला मला बरेच दिवस ते काय असेल तर समजत नव्हतं. एक दिवस निरखून पाहिल्यावर लक्षात आलं, की ते हायड्रंट आहे म्हणून..आणि मग तेंव्हापासूनच मनात होतं या पोस्ट बद्दल.
सुरेख लेख महेंद्र !
मी बऱ्यांच दिवसांनी प्रतिक्रिया देत आहे तुमच्या ब्लॉग वर.
खरं तर मी जवळ जवळ २१ वर्षे फायर ब्रिगेड च्या quarters मध्ये राहिलो आणि त्यातली १५ वर्षे फोर्ट मध्ये. आणखी थोडे details add करतोय तुमच्या ब्लॉग वर.
मुंबई मध्ये तीन मुख्य फायर ब्रिगेड आहेत – सर्वात मोठे आणि जुने म्हणजे महापालिकेचे फायर ब्रिगेड आणि त्यानंतर मुंबई पोर्ट trust , सरकारी आस्थापनांचे म्हणजे ONGC , Railways , Navy etc. जर दुर्घटना फार मोठी असेल – जसा BOMB BLASTS, तर हे सगळे फायर ब्रिगेड मदतीला येतात.
तुम्ही सांगितल्याप्रमाणे इंग्रजांनी १८५५ मध्ये मुंबईत पहिले फायर ब्रिगेड सुरु केले आणि साहजिकच सर्वात पद्धतशीर फायर ब्रिगेड स्टेशन्स दक्षिण मुंबईत आहेत – साधारण दर ५ KM मध्ये एक फायर ब्रिगेड. पण उपनगरात हे प्रमाण अजूनही बरेच कमी आहे.
सर्वात जुनं असल्यामुळे आणि साहेबांनी बऱ्यापैकी शिस्त लावल्यामुळे मुंबईचे फायर ब्रिगेड बाकी सर्व भारतीय शहरांपेक्षा बरेच पुढे आहे.
साधारण १९९० पर्यंत मुंबई फायर ब्रिगेड मध्ये सर्व कर्मचारी २४ तास duty वर असत, त्यातले ८ तास प्रत्यक्ष पहाऱ्यावर आणि बाकी १६ तास कुठेही असलात तरी बेल वाजल्यावर २० सेकंद मध्ये दलाची गाडी पकडावी लागायची.
त्यावेळी सर्व कर्मचारी QUARTERS मध्येच राहायचे त्यामुळे तिथले वातावरण एकदम चाळीसारखे होते आणि आम्हा मुलानाही बाबा काय करतात त्याचे खूप आकर्षण वाटायचे.
मुख्य म्हणजे कुठे CALL येऊन बेल वाजली की वयाच्या पन्नाशीतही हे कर्मचारी QUARTERS मध्ये लावलेल्या स्टील पोल ला लटकून ५-१० सेकंद्स मध्ये तळमजल्यापर्यंत पोहोचायचे आणि फायर ब्रिगेड ची गाडी २०-३० सेकंद्स मध्ये निघायची.
बाकी वेळ फायर ब्रिगेड च्या मैदानात परेड, simulation exercise वगैरे रोज ३-४ तास चालत असते. त्यातला एक प्रकार म्हणजे खास फायर exercise साठी बांधलेल्या tower च्या दुसऱ्या मजल्यापर्यंत शिडी लावायची आणि त्यावरून पूर्ण टीम ने २ च्या ग्रूप मध्ये खाली उतरायचे. त्यातल्या त्यात जो कुणी सर्वात कमकुवत असेल त्याने सर्वात जड माणसाला खांद्यावर घेऊन खाली उतरायचे. ह्या वेळी जो खांद्यावर असायचा त्याच्या डोक्यावर हेल्मेट नसायची आणि खाली कोणतेही संरक्षण नसायचे. हि exercise सुरु झाली की मग रस्त्यावर बघ्यांची गर्दी व्हायची . आम्हा मुलांपैकी ज्यांचे वडील खाली येत असायचे ते भीतीमुळे किंवा काही चुकीचे होऊ नये म्हणून नेहमी डोळे मिटून घ्यायचे.
सुदैवाने इतक्या वर्षात काही मोजके अपवाद वगळून exercise च्या वेळी एकही दुर्घटना झालेली नाही पण ह्या सरावामुळे मुंबईत फायर ब्रिगेड साधारण कमी उंचीच्या बिल्डींग्स मध्ये शिड्या लावून व्यवस्थित लोकांना बाहेर काढू शकते. हा असा प्रकार मी USA किंवा UK मध्ये अजून तरी पाहिलेला नाही, कदाचित इकडे नवीन उपकरणे आल्यामुळे हे होत नसावे.
अगदी लहानपणापासून हे पाहिल्यामुळे फायर ब्रिगेड च्या बऱ्याच कर्मचाऱ्यांची मुले पुढे त्याच नोकरीत जातात. जुन्या QUARTERS मध्ये exercise साठी भरपूर जागा असल्यामुळे कर्मचारी सुद्धा फिट असायचे.
साधारण १९९० ला फायर ब्रिगेड मध्ये मोठा संप झाला आणि कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी होती कि सलग २४ तासांऐवजी ८ तासांची ड्युटी असावी. हि मागणी मान्य झाल्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या तीन पट वाढली पण QUARTERS लिमिटेड असल्यामुळे हे सर्व नवीन कर्मचारी दुरून कामावर यायचे आणि लवकर निघून local पकडून घरी पळायचा कल असायचा. सुरुवातीला एकाच चाळीत सर्व कर्मचारी राहत असल्यामुळे जे team work असायचे ते बंद झाले आणि २०-३० सेकंद्स मध्ये गाडी CALL वर निघाण्याऐवजी दुप्पट तिप्पट वेळ लागू लागला. लहान असताना मला फोर्ट मधले बहुतेक सर्व फायर hydrants माहित होते कारण वेळो वेळी बाबांच्या तोंडून त्या जागा ऐकायला मिळायच्या . त्यावेळी hydrants उघडण्यासाठी लागणारं साहित्य फ़क़्त फायर ब्रिगेड कडे असायचं आणि प्रत्येक hydrant महिन्यातून एकदा टेस्ट केला जायचा. काही वर्षांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांकडेही ते साहित्य आलं आणि ते सर्रास रात्रीच्या वेळा hydrant उघडून पाणी घ्यायला लागले. हे पाणी विकण्याचाही धंदा जोरात चालायचा. मला नाही वाटत आता १०% hydrants मध्ये पाणी मिळत असेल.
फायर ब्रिगेड चे कमीत कमी ५०% calls हे झाडावर अडकलेले पक्षी काढण्यासाठी , रस्त्यावर पडलेली झाडे उचलण्यासाठी किंवा इतर तत्सम कारणांसाठी होतात. एखादी मोठी आग लागली कि मग दैवावर हवाला ठेवून पाण्याचा hose पकडून आगीवर पाणी फेक्ण्याशिवाय फायर ब्रिगेड च्या हाती खरं तर फारसा जास्त काही नाही. helicopters , super-ladders वगैरे गोष्टी यायला अजून भरपूर वेळ आहे . साधारण पावसाळ्याची वेळ फायर ब्रिगेड साठी असते प्रेमी युगुलांची प्रेते समुद्रातून काढण्याची. अजूनही आठवते कि लहान असताना बाबांनी CALL वरून परत आल्यानंतर सरळ घरात ना येत आंघोळीसाठी घराबाहेर पाणी ठेवायला सांगितल्यावर आम्हाला समजायचे कि कुठे तरी प्रेतांना हात लावलेला आहे. त्यातल्या त्यात JUNE जुलै मध्ये अजूनही NARIMAN POINT आणि BANDRA BANDSTAND इथे बऱ्याच आत्महत्या होतात आणि प्रेते पाण्याखालच्या दगडांमध्ये अडकून बसतात .
मुंबईत सर्वात मोठा प्रश्न आहे प्लानिंग न केल्यामुळे होणारा ट्राफिक चा अडथला, dedicated lanes आणि पार्किंग ला जागाच नसल्यामुळे अपघात स्थळापर्यंत पोहोचायला लागणारा वेळ. आणि आणखी एक महत्वाचा प्रोब्लेम म्हणजे भ्रष्टाचार. हो, फायर ब्रिगेड हि सुद्धा एक भ्रष्टाचरी सेवा आहे. इथे फरक इतकाच कि हा भ्रष्टाचार मुख्यतः अधिकारी वर्गाकडून – आणि ते सुद्धा काही ठराविक परीक्षा पास झालेल्या अधिकाऱ्यांकडून होतो. उदाहरण द्यायचे झाले तर प्रत्येक बिल्डिंग च्या प्लान ला फायर ब्रिगेड च्या प्रांतिक अधिकार्याची मान्यता असावी लागते आणि ९०% नवीन बिल्डींग्स कडे फायर protection ची कोणतीही व्यवस्था नसतानाही बांधकामाला ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते. जिथे कुठे commercial reasons साठी cooking gas वापरला जातो – म्हणजे restaurants वगैरे, तिथे प्रत्येक ३ महिन्यांनी निरीक्षण करून फायर ब्रिगेड च्या प्रांतिक अधिकार्याला safety certificate द्यावे लागते. आग लागून किंवा इमारत कोसळून नुकसान झाले कि insurance claim करताना पुन्हा फायर ब्रिगेड च्या अधिकाऱ्यांचे certificate हवे असते. मुंबईत फटाके विकण्यासाठी सुद्धा फायर ब्रिगेड चे certificate हवे असते. प्रत्यक्षात अशा inspection च्या वेळी हे अधिकारी एक मोठी suitcase घेऊन जातात आणि घरी येताना हि suitcase पुरेपूर भरलेली असते. जर एखाद्या त्रयस्थ संस्थेकडून ह्या अधिकाऱ्यांच्या संपत्तीची आणि दिलेल्या certificates ची चौकशी केली तर कमीत कमी ९०% ठिकाणी गैरव्यवहार झालेला दिसून येईल. पूर्ण मुंबई मध्ये ह्या अधिकाराचे साधारण २०-२५ अधिकारी आहेत आणि गेल्या ५ वर्षात फायर ब्रिगेड चे ४-५ वरिष्ठ अधिकारी निलंबित झालेले आहेत.. हि रक्कम इतकी मोठी असते कि बऱ्याच अधिकाऱ्यांच्या मुलांची लागणे राजकारणी घरांमध्ये झालेली आहेत. उदा – प्रमोद महाजन ह्यांच्या मुलीने ex -Head Mumbai Fire Brigade च्या मुलाशी लग्न केले. हे लिहिण्याचा उद्देश इतकाच कि रकमेची कल्पना यावी.
बाकी इतर सेवान्प्रमानेच फायर ब्रिगेड च्या बाबतीत आपल्याला दैवावर विश्वास ठेवून जगण्यापेक्षा दुसरा काही उपाय नाही 😦
प्रदिप
फारच सुंदर आणि माहितीपुर्ण कॉमेंट! वर ब्लॉग वर पोस्ट करतो म्हणजे सगळे वाचतिल.
अगदी प्रत्यक्षदर्शी माहिती मिळाली. प्रत्येकाचे वेगळे विश्व असते. लोक कसे जगतात, त्यांच्या लाईफ़-स्टाईल किती वेगळ्याअसू शकतात! कहरच कधी कधि म्हणावेसे वाटते-‘तेहइ नो दिवसो गतः.
खरं आहे. ह्या सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या असल्यामुळे शब्दबद्ध छान केल्या आहेत.
khupach maahiti milali
धन्यवाद.. प्रतिक्रियेसाठी आभार..
मान्यवर, एकदम छान लेख !
मला प्रदीपजींच्या कॉमेंटवरील शेवटच्या भागावर तितकासा विश्वास बसत नाही. फायर ब्रिगेडच्या लोकांना तितकेसे पैसे खाण्याची संधी मिळत नसावी. एखादा अपवाद असेल.
पण बाकी लेख भारी !!
विक्रांत
धन्यवाद.. पण फायर बिग्रेड च्या लोकांना पैसे खाण्याचा मुक्त परवाना आहे हे नक्की. इन्स्पेक्टर राज एकदम फॉर्म मधे आहे. बिल्डींग च्या परवानग्या , हॉटेल्स.. अशा अनेक जागा आहेत पैसे खाण्याच्या..
maaze baalpan gavdevi, nanachowk ithle. haa lekh vaachlyavar mala lahaanpani asleli fire brigadechi utsukta aathavli. phaarach dashing life aahe tyanche. pan deshaasathi je aaple praan panala laavtat thyanchi quarters jaaun paha, hya naalayak sarkarcha karaava titka dhikkar kamich aahe.
इथे सगळ्या नगरसेवकांना विचारायाला हवे की आमच्या सेफ्टी साठी तुम्ही काय आवाज उठवता ते.. नगरसेवकांनी जर आवज उठवला तर नक्कीच काहीतरी होऊ शकेल.. 🙂
काका अतिशय सुरेख पोस्ट…कॉलेजमध्ये जाताना स्वामी विवेकानंद रोडवरच अंधेरीतल फायर स्टेशन नेहमी दिसायचं…त्यापलीकडे काही माहिती नव्हती…आणि तुम्ही म्हणता तस काही हायड्रंट्स जर गाडले गेलेत तर काही खर नाही..बाकी आप इंग्रजांच इतर बाबतीत औकारा करू पण त्यांनी ज्या काही सोयी करून गेलेत त्यांची दुरवस्था करताना मात्र सढळ हस्ते करतोय…प्रदीपजीची कमेंट वाचनीय आहे…
अपर्णा
गेले काही दिवस लॅप टॉप नसल्याने उत्तरास उशीर होत आहे.
अशा अनेक गोष्टी आहेत मुंबई मधे , जसे नवीन काही लक्षात येईल तसे लिहीणार आहे.
बालपणी चाळीत असताना balling side stump म्हणून या fire hydrant चा use करत होतो आम्ही…. बाकी यातून पाणी येताना.. आजतागायत…. पाहिलं नाही कुठे मुंबईत….!
ho barobar jevha mumbai bandh asychi tevha ha hydrant stump mhanun vaparlay.
प्रसाद
यातून केवळ आग लागली तेंव्हाच पाणी यावं अशी अपेक्षा असते. पण आजची या हायड्रंट्स ची अवस्था पाहिली तर या पुढे स्टंप्स म्हणून पण ते वापरता येणार नाहीत असे वाटते.
wah khupchan lekh thanks to sammna diwali ank mala tumchhya blog chi mahiti milali. pan ek kautuk karnay sarkha gostha hi ahe ki hey fire dept cha staff jo main operation sathi asto ha kadhich lokanshi vaiti vagat nahi , everytime they do come and help even in small cause like rescuing a bird /animal. but its rather pity situation that non of the ppl could save and maintain this good organization
Ketan
Welcome to the blog and thanks for the comment.
केतन
ब्लॉग वर स्वागत..
तुमचे म्हणणे एकदम खरे आहे, महापालीकेकडून हा विभाग काढून घ्यायला हवा, आणि एक स्वायत्त विभाग म्हणून सुरु करावा म्हणजे याचे काहीतरी होऊ शकेल . नाही तर हे असेच चालणार.
Vishal Says .
Mi pan retire person cha son aahai. Mala pan Ya Stories Mahiti aahait
Thanks Vishal. 🙂 welcome to blog.
Mahendra where are u stay ?
In mumbai fire quterus or any where ?
I also stay last 28 years mulund fire quterus
Dad retire then i will stay in thane city ?
विशाल,
मी मालाड ला रहातो. 🙂
In Malad Fire Brigade Qutterus or Malad area
Malad , western express highway
“फायर अलार्म” ची माहिती पुरविल्याबद्दल धन्यवाद अगदी प्रत्यक्षदर्शी माहिती मिळाली. प्रत्येकाचे वेगळे विश्व असते. लोक कसे जगतात, त्यांच्या लाईफ़-स्टाईल किती वेगळ्याअसू शकतात! कहरच कधी कधि म्हणावेसे वाटते-‘तेहइ नो दिवसो गतः.
धन्यवाद्
दिपक गो. पाटील