नतमस्तक

दिवाळी म्हंटलं की  फटाके, मस्त पैकी फराळाचे पदार्थ, दिवाळी अंक, सुटी वगैरे आठवायला हवे, पण आजकाल, दिवाळी आल्याची चाहूल मला ज्या गोष्टी मुळे लागते ती म्हणजे शारिरीक दृष्ट्या अपंग पण मानसिक दृष्ट्या सबल असलेल्या मुलांमुळे. गेली काही वर्ष मला दिवाळीच्या  साधारण पणे पंधरा दिवस आधी  एक पत्र येतं, सोबत काही ग्रिटींग कार्ड्स असतात. ते पत्र वाचलं, आणि सहा कोरे ग्रिटींग कार्ड्स पाहिले, की मला उगाच स्वतःचे  धडधाकट शरीर असून सुद्धा अंगात भरलेल्या    आळशी पणाची लाज वाटते.

समाजात सध्या खूप जास्त प्रमाणात कॉम्पिटीशन वातावरण आहे.प्री प्रायमरी शाळा  ते अगदी कॉलेज किंवा नंतर नोकरी मधे पण सारखी कॉम्पिटीशन असते. अशा जगात रहायचं तर मग नक्कीच आपणही या वेगाशी जुळवून घ्यावं   लागतं .. आणि तसे झाले नाही, आणि आपण कुठे कमी पडतो का असं वाटत रहातं. बरेचदा तर   लहानशा गोष्टींमुळे आपण  इतके निराश होतो की खूप वैफल्य येतं, आणि त्यातून आत्महत्येचे विचार मनात येतात. अहो, जगण्यातला आनंदच गमावून बसतो आपण! हे असं वैफल्य येण्यासाठी काहीही कारण चालतं. नोकरी मधे वार्षिक इनक्रिमेंट अपेक्षेपेक्षा कमी मिळाले, परीक्षेत मार्क्स कमी पडले,  गर्ल फ्रेंडने लग्नाला नाही म्हंटले, अशा असंख्य लहान सहान गोष्टींसाठी जीवनातला आनंद गमावून बसतो आपण.तसा विचार केला तर या सगळ्या गोष्टी जरी मिळाल्या नाही तरीही काही फारसा फरक पडत नाही. आज नापास झालात, उद्या पास व्हाल, इन्क्रिमेंट पुढल्या वर्षी नक्की मिळेल याची खात्री बाळगायला हवी.,  कुठलीही गोष्ट शाश्वत नाही.  पण मानवी स्वभावाला औषध नाही.

त्या मुलांनी तोंडात ब्रश धरुन केलेली पेंटींग्ज..

एक आठवड्यापूर्वीच गोष्ट आहे, पेपर मधे एक बातमी वाचली, ” ३० वर्ष वयाच्या एका आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरूण आणि तरुणीने आत्महत्या केली. ते दोघंही म्हणे चांगल्या नोकरीवर होते, सगळं जग पाहून झालं होतं, पुढे काय करायचं? पण तरीही त्यांनी गोव्याला एका खोली मधे गळफास लावून आत्महत्या केली होती. या घटने मुळे थोडा नर्व्हस झालो होतो. जगातली प्रत्येक ऐहीक सुखाची गोष्ट जवळ असताना पण का म्हणून त्या दोघांना जीव द्यावासा वाटला असेल? असो विषयांतर होतंय, पण याच पार्श्व भूमीवर मला आलेले नदीम शेख चे पत्र मला एकदम अंतर्मुख करून जाते. 

नदीम शेख!  दोन्ही हात नसलेला हा एक मुलगा. पत्रामधे लिहितो, की “बरेच लोकं काही कारणाने

मराठी

त्या पत्राच्या मागचा भाग.. सगळ्या मुलांचे चित्र काढतांनाचे फोटो आहेत इथे..

जन्मापासून किंवा काही आजाराने आपले हात वापरू शकत नाहीत.  हात वापरता येत नाहीत, म्हणून आपल्या पायाच्या बोटात ब्रश धरून किंवा तोंडात ब्रश धरुन  तो पेंटींग करतो. त्याच्यासारखीच अशी बरीच मुलं तोंडात किंवा पायाच्या बोटात ब्रश धरून पेंटींग करतात.ह्या अशा सहा पेंटींगचा एक संच आणि सोबतच गिफ्ट  वर लावण्यासाठी  कार्ड साठी सहा लहान कार्डस आणि दोन बुक मार्क्स.. इत्यादी सगळ्या गोष्टी पाठवीत आहे. जर तुम्हाला ही ग्रिटींग कार्डस आवडली तर त्यांची किंमत ३९५ रुपये  इंडीयन माउथ ऍंड फुट पेंटींग आर्टीस्ट या नावाने पाठवावे ही विनंती. तुम्ही पैसे पाठवणे कम्पलसरी नाही. पण जर तुम्ही पैसे पाठवले तर आमच्या सारख्या हात नसलेल्या मुलांना सेल्फ रिस्पेक्ट आणि डिग्निटी ने जगण्यास मदत होईल. आणि खाली सही होती”.. नदीम शेख!

पत्र वाचले , एका पेक्षा एक सुंदर असलेली ती   ग्रिटिंग  कार्डस मला वेडावून दाखवत होते. एकाही चित्रावर नजर ठरत नव्हती. इतकी सुंदर चित्रं पाहिल्यावर ज्या माणसाने ही चित्रं काढली त्याला हात नाहीत, आणि त्या माणसाने ही चित्रे तोंडात ब्रश धरून काढली आहेत, किंवा पायाच्या बोटात ब्रश धरून काढली आहेत,  ह्या गोष्टी वर विश्वासच बसत नव्हता. डोक्यात विचारांचा गोंधळ  माजला होता. नकळत त्या हुसेनच्या करोडो रुपयांच्या चित्रांशी तुलना केली ह्या चित्रांची.. आणि वाटलं, की” त्या हुसेनने यांच्याकडे येऊन शिकावं, चित्रं म्हणजे काय – पेंटींग म्हणजे काय असतं   ते ! असो..   त्या पत्राच्या मागच्या भागात काही अशाच चित्रकारांची चित्र काढतांनाचे फोटो होते.  एक लहानसा मुलगा  के जगनार्थनन चे तोंडात ब्रश धरून चित्र काढतानाचा फोटो पाहिला आणि उगाच वाटले, की  दैव किती क्रूर असतो बरेचदा नाही?  

एक संस्था आहे, शारिरीक दृष्ट्या अपंग, वर दिलेल्या प्रकारातले , म्हणजे हात नसलेल्या लोकांना मदत करणारी ! त्या संस्थे तर्फे भारतामधल्या अशा १७ लोकांना निवडून त्यांनी तयार केलेले पेंटींग प्रॉडक्ट्स मार्केटींग करुन त्यांना नियमित पणे पैसे मिळवून देण्याचे काम करते. एक जागतीक संघटना आहे माउथ ऍंड फुट पेंटींग आर्टीस्ट वर्ल्ड वाईड नावाची.  या संस्थेने  भारता मधे पण आपली शाखा सुरु केलेली आहे.ही संस्था ७४ देशामधे पसरलेली आहे. जवळपास ७००  आर्टीस्ट या संघटनेचे मेंबर्स आहेत आहेत. ह्या मेंबर्सच्या  कलाकृतीना ही  संस्था बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न करते. खरंच कौतुकास्पद काम आहे, पण एक प्रश्न आहेच.. फक्त १७ लोकंच का निवडले यांनी भारतातले?मी इंटरनेट वर शोधले असता असे अनेक व्हिडीओ सापडले की ज्या मधे बरेच लोकं तोंडाने किंवा हाताने पेंटींग काढतात.असे अजून बरेच लोकं आहेत  भारतामध्ये- म्हणून १७ ही संख्या वाढायला हरकत नाही.

शारिरीक   दुर्बलता असलेलया या  लोकांच्या जगण्याच्या लढ्याला मनःपुर्वक  अभिवादन !जगण्याची नवीन दिशा   – कुठलेही संकट आले तरीही न घाबरता कसे सामोरा जायचे   याचे उदाहरण  घालून दिलेले आहे या लोकांनी.  थोडं काही झालं की आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या लोकांच्या तुलने मधे या लोकांची  स्वाभिमानाने जगण्द्दयाची जिद्द पाहिली की नतमस्तक होतो.  

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कला and tagged , . Bookmark the permalink.

49 Responses to नतमस्तक

 1. _/\_ _/\_ _/\_ ह्या मुलांच्या जिद्दीला आणि चित्रकला कौशल्याला सलाम…

  तुम्ही ह्या संस्थेचे मेंबर आहात काय? ही ग्रीटिंग्ज ऑनलाईन किंवा पत्र पाठवून मागवता येतील का?

  काका, धन्स ही माहिती शेअर केल्याबद्दल… 🙂

  • मिळाली साईट… धन्स 🙂 🙂

   • ्सुहास
    मी ह्या संस्थेचा मेंबर नाही. एक दिवस आकस्मात पणे हे कार्ड्स पोस्टाने आले माझ्याघरी. त्यांना माझा पत्ता कसा समजला हे पण एक आश्चर्यच आहे. त्यांच्या साईट वर जाऊन ऑर्डर दिली जाऊ शकते. गेले तिन चार दिवस प्रवासात असल्याने, आणि लॅप टॉप चोरीला गेल्याने नेट वर नव्हतो- म्हणून उत्तर देण्यास उशीर होत आहे.

 2. hemant2432 says:

  अतिशय छान पोस्ट आहे हि. काका हा विषय आमच्या पर्यंत पोहोचविल्या बद्दल शतश: धन्यवाद !

 3. >> या लोकांच्या जगण्याच्या लढ्याला मनःपुर्वक अभिवादन!!! ++
  पोस्ट वाचून झाल्यावर त्यांची साईट पाहिली. पेंटींग पाहून थक्क व्हायला झाले.

  • सिद्धार्थ
   यांची वेब साईट नक्की पहा. खूप सुंदर पेंटींग्ज आहेत. तोंडाने किंवा पायाने काढली आहेत यावर विश्वास ठेवणे कठीण आहे..

 4. गौरी says:

  काका, ही कार्ड आईकडेही येतात. हात नसताना या कलाकारांनी काढलेली चित्र बघून खरंच थक्क व्हायला होतं … त्यातली कला बघून, आणि लोकांच्या दयेवर नव्हे, तर आत्मसन्मानाने जगण्याचा त्यांचा लढा बघून.

  • गौरी
   बऱ्याच लोकांना ही कार्ड्स पाठवली जातात.. मला वाटतं की प्रत्येकच माणूस त्यांना पैसे पाठवत असावा..

 5. सगळ्यात मोठे मंद अपंग तर आळशी लोकच असतात! अजून वाईट आहे कि त्यांना त्याचा काहीच त्रास नसतो 😦
  कौतुकास्पद काम आहे. माहितीपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद

 6. तुम्ही त्यांचा पत्ता देवु शकता का..? माझि मदत करायची इच्छा आहे..!

 7. सर तुम्ही हि माहिती शेअर केल्याबद्दल खरच धन्यवाद, तशी मलाही चित्रकलेची आवड आहे पण ह्यांची चित्र पाहून खरच मी नतमस्तक झालो आणि आत्महत्या करणाऱ्यांच्या विरोधात मी देखील आहे मुळात आपले शरीर हे आपले नसून देवाने आपल्याला दिलेली एक सुंदर भेट आहे म्हणून अशी आत्महत्या करण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही.
  सर मला तुम्ही ह्यांचा पत्ता किंवा वेब साईड चे नाव सांगू शकता का ?

  • श्रीकांत
   आपल्या लहानसहान प्रॉब्लेम्सचा आपण उगाच बाऊ करतो असे वाटायला लागते. त्यांच्या साईटची लिंक खाली दिलेली आहे.

 8. Pankaj Z says:

  यांची साईट आहे का? मला असे खूप कार्ड्स हवेत.

 9. Pankaj Z says:

  मला साईट सापडली. छान आहे. ऑर्डर केली.

 10. mau says:

  महेंद्रजी,
  खुप आवडला लेख !! तुम्हाला एक सांगु का?? ह्या फोटोत जे अमिताभ बच्चन बरोबर जी व्यक्ती उभी आहे नां..ते माझे गुरु आहेत..मांजीभाई रामानी…ह्यांच्या कडुनच मी माझे स्केचिंग आणि ऑईल पेंटींगचे शिक्षण घेतले…अतिशय उत्कृष्ट कलाकार…मला त्यांचा नेहमी अभिमान वाटतो..कधी इथे आलात तर तुमची नक्की भेट घालुन देइन…अशा लोकांकडे बघितल्यावर आपल्याला स्वतःच्या जगण्याची लाज वाटेल….
  मस्त वाटले लेख वाचुन…धन्यवाद !!!

  • उमा
   मला त्यांना भेटायला नक्की आवडेल . जर आणखीन काही माहिती मिळाली तर कदाचित त्यांच्या सेंटरला भेट पण देईन .धन्यवाद.

 11. Sudeep Mirza says:

  can you please provide contact details of this organisation?
  sudeepmirza@gmail.com

 12. Tanvi says:

  खरच नतमस्तक… दुसरा शब्द नाही!!!

 13. अप्रतिम पोस्ट !! खरंच नतमस्तक… दुसरा शब्दच नाही.. माझ्या फडतूस तक्रारींबद्दल माझी मलाच लाज वाटतेय आता..

  • हेरंब
   मला पण एकदम गिल्टी वाटायला लागतं ही ग्रिटींग्ज आली की> आधी चेक बनवून पोस्टात टाकायला देतो मुलींच्या हातात…. 🙂

 14. नितिश says:

  अप्रतिम पेंटींग आहेत!

  • नितिश
   खरंय तुमचं.. खूप सुंदर पेंटींग्ज आहेत. मला वाटतं की त्या हुसेनला यांच्याकडे पाठवायला हवे होते पेंटींग शिकायला… 🙂 थोडं शिकला असता तो पेंटींग कसे करायचे ते. जी गोष्ट दोन्ही हात असतांना पण करू शकला नाही, ती या लोकांनी करून दाखवली आहे.

 15. mau says:

  http://imfpa.co.in
  ही आहे ती साईट..नक्की बघाल.

 16. bolMJ says:

  अप्रतिम……

 17. Please Contact contact@imfpa.co.in or visit our website for more information.

  If you need immediate assistance please call on +91 22 40098888

  Regards
  MFPA India

 18. Madhuri Gawde says:

  diwali pahaat che invitation aale. chaan saari nesun morning 7.30 laa pohachle. karyakram suru zaala. bhavgeet, bhaktigeet aiktana tallin zaali. samor handicapped, blind, cancer patient gaat hote. promotion delay zaalyaamule nervous zaaleli me hyaa life laa struggle karta kartaa jivnaacha jo anand swata ghet hote aani dusryana det hote. thanchyapude me kiti khuji yaachi jaaniv zaali. tyana dengi deun maazya lekaacha birthday saajra kela. aapla ha lekh mhanje mazya manatle vichar janu

  • माधूरी
   सुंदर अनुभव. शेअर केल्याबद्दल आभार. या सगळ्या लोकांची जगण्याची आणि ते पण स्वाभिमानाने जगण्याची जिद्द पाहिली की नतमस्तक होतो..
   या पुढे ग्रिटींग मागवायचे तर यांच्याकडूनच हे ठरवलं आहे मी ..

 19. kiran says:

  sir,
  thanks for nice article
  very good paintings, whenver i receive these greetings/painting my daughter try to copy/paint it.

  and realise talents of these painters

  hats off!

 20. खरच नतमस्तक …!!!

 21. शिरीष दवणे says:

  खरचं काका, अश्या लोकांची जगण्याची चिकाटी, आत्मविश्वास आणि जिद्द पाहिली की आपले लहानसहान प्रोब्लेम्सपण डोंगरासमोर राईच्या आकाराचे वाटु लागतात. 😦

 22. Aparna says:

  ह्या मुलांच्या जिद्दीला, कौशल्याला सलाम

  काका दिवाळीच्या निमित्ताने एक अत्यंत उपयुक्त माहिती, विषय समोर आणलात. उमा, साइटबद्द्ल धन्यवाद.
  बाबांना यांचा पण पत्ता देते. मागच्या वेळी त्यांनी माझ्यासाठी आनंदवनात बनवलेली कार्ड्स आणली होती. त्याबद्दल पण तुम्ही उल्लेख केला होता असं वाटतं…
  मी भारतात असताना दिवाळीच्या आसपास पार्ल्यात भरणार्‍या कुठल्यातरी एका प्रदर्शनात अशा प्रकारची कार्ड्स होती आणि त्यानंतर जेव्हा ही अपंगांनी जिद्दीने बनवलीत तेव्हा खरंच स्वतःच्या फ़ुटकळ रडारडीची लाज वाटली होती…
  धन्यवाद काका…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s