संस्कृती

कालचीच गोष्ट आहे. मालाडच्या मार्केट मधे फिरतांना बऱ्याच ठिकाणी पाट्या दिसत होत्या . घरगुती फराळाचे मिळेल . चकली , चिवडा, करंजी , शंकरपाळे वगैरे सगळे पदार्थ दिवाळिच्या फराळासाठी उपलब्ध आहेत अशा अर्थाच्या पाट्या लागल्या होत्या. पेपर मधे पण सकाळीच बातमी वाचली की पाचशे टन फराळाचे सामान विकल्या गेले , आणि भारताबाहेर रहाणाऱ्यांसाठी कित्येक टन फराळाचे सामान एक्स्पोर्ट पण करण्यात आले. थांबा.. इथे पूर्वी आई कसे सगळे पदार्थ घरी बनवायची, वगैरे गोष्टी लिहीत नाही मी- कारण ते सगळं तुम्हाला ठाऊक आहेच.

माझ्या आजीला माझी प्रत्येक मैत्रिण ही होणारी बायकोच वाटायची. किंवा कुठलीही एखादी चांगली मुलगी दिसली, की तिचं सुरु व्हायचं ” ही छान आहे , मला पसंत आहे रे, तुझा बाबा पण हो म्हणेल- सांग काय विचार आहे तुझा? ” मी तेंव्हा तसं काही नाही गं आजी, तसं काहीच नाही म्हंटलं की मग ती उगीच मोठा उसासा सोडायची, आणि म्हणायची ” कोणाशीही कर रे बाबा लग्न, फक्त त्या साठ्यांच्या मेधा पासून जरा दूरच रहा. अरे काही करता येत नाही तिला- परवा तिच्या घरी गेले ल्होते, तिने धड चहा पण केला नाही! नुसता पाणचट ! बघ बरं, नाहीतर गोरी गोमटी बघून प्रेमात पडशील, लग्न करशील आणि मग पुढचं आयुष्य खानावळीच डबा मागवून जेवायची वेळ येईल बघ!”

बाहेर हॉटेल मधे खावं लागणं हे कमी पणाचं लक्षण मानलं जायचं.खानावळीत जाऊन जेवायचं म्हणजे किती कमी पणा !हल्ली मात्र तसं काही राहिलेले नाही. संध्याकाळी कुठल्याही हॉटेल मधे जा, तुम्हाला बहूसंख्य मध्यमवर्गीय लोकं दिसतील तिथे रांगा लावून उभे असलेले. मला असे हॉटेल समोर रांगेत उभे रहाणे खूप इरीटेटींग होते. आपलेच पैसे द्यायचे, आणि खाण्यासाठी असे भिकाऱ्यासारखे आपणच रांगेत उभे रहायचे? – ही गोष्ट मला अजिबात मान्य नाही. हे असे उभे रहायची वेळ आली की मला आपण माहिमच्या दर्ग्याजवळ असलेल्या हॉटेल समोरचे भिकारी आणि आपण या मधे काही फरक आहे की नाही याचीच शंका येते.या दर्ग्या समोरच्या रस्त्यावर काही हॉटेल्स आहेत. तिथे काही भिकारी बसलेले असतात. दर्ग्यावर दर्शन घेऊन भावीक परत जातांना या भिकाऱ्यांना खाऊ घालण्यासाठी हॉटेल वाल्याला पैसे देतो… असो, हल्ली तशीच परिस्थिती ही आपलिही झालेली आहे. आपलेच पैसे आणि आपणच बाहेर रांगेत उभे रहायचे…….

हॉटेल मधे खाणं पूर्वी फार कमी म्हणण्यापेक्षा नगण्यच असायचं. हॉटेल मधे फक्त बाहेर गावाहून कचेरीच्या कामासाठी आलेले लोकंच जेवतांना दिसायचे.आजकाल तसे राहिलेले नाही. महिन्यातून बरेचदा बाहेर जेवायला जातात लोकं . नवरा बायको दोघेही नोकरी करतात, तेंव्हा कधी ’तिला’ कंटाळा आला म्हणून, तर कधी मुलांना आज पावभाजी खायची आहे म्हणून किंवा कधी अजून काहीतरी नसलेले कारण काढून बाहेर जाण्याचे प्रमाण फार जास्त वाढलेले आहे. पिझ्झा, बर्गर संस्कृतीचे आक्रमण तर टाळता येण्यापलीकडे गेलेले आहे. पिझा विकत सारखा घरी जमत नाही म्हणून

बऱ्याच गोष्टींची चव डेव्हलप करण्यासाठी म्हणून करोडॊ रुपये जाहिरातींवर खर्च केले जातात. आपल्या कडल्या चवदार पदार्थांशी मॅगीची तुलना होऊ शकते का? अर्थातच नाही. तो अगदी बेचव पदार्थ पण मुलांना आवडावा म्हणून लहानपणापासूनच जाहिरातींचा मारा केला जातो. लहान मुलं दुकानात गेले की तो पदार्थ घ्यायलाच लावतात. कसंही करून त्याची चव डेव्हलप केली जाते मुलांमधे.-आपलं फ्युचर गिऱ्हाईक म्हणून.

२०-३० रुपये रॉ मटेरीअल कॉस्ट असलेला पिझा आपण सहजपणे चारशे रुपयांना विकत घेतोच.( मी जर मला पिझा पेक्षा आपलं कांद्याचं थालिपीठ जास्त आवडतं म्हंटलं, तर मला कदाचित तुम्ही गावंढळ म्हणाल, पण ती एक फॅक्ट आहे हे बाकी एकदम खरं) एक प्रकारे तुम्हा आम्हाला खर्च करण्याची सवय आपल्या नकळत लावण्यात येते .अती उच्च वर्गीय लोकं आपल्या ऐपती प्रमाणे पंचतारांकित हॉटेल किंवा सुपर क्लास ( महाग) हॉटेल्स मधे जातात तर काही मध्यमवर्गीय लोकं मात्र आपल्याला परवडणाऱ्या शेट़्टीच्या हॉटेल कडे मोर्चा वळवतात. मुंबईला जेवायचं तर शेट़्टीचीच हॉटेल्स जास्त आहेत.

संध्याकाळच्या वेळेस घरी टीव्ही पाहून झाला की बहूसंख्य लोकं खाऊ गल्ली वर मोर्चा वळवतात. प्रत्येकच भागात एक खाऊ गल्ली तयार झालेली आहे. तिथे स्वच्छता वगैरे गोष्टींचा विचार न करता खाणारे उच्च मध्यम वर्गीय लोकं बरेचदा दिसतात.कुठल्या तरी घाणेरड्या झोपडपट्टीत तयार केलेले पदार्थ , की ज्या मधे स्वच्छतेची अजिबात काळजी केलेली नसते अशा पदार्थांवर पण लोकं रांगा लावून तुटून पडलेले दिसतात. सांगण्याचा अर्थ एवढाच की असे रस्त्यावरचे जॉइंट्स पण खूप चालतात. रात्री दहाच्या सुमारस जर एसव्ही रोड वर मालाड ते बोरीवलीच्या दरम्यान असे असंख्य स्टॉल्स आणि त्या शेजारी उभ्या असलेल्या कार दिसतील.

बाहेर खाण्याची सवय जडण्य़ाचे कारण म्हणजे खिशात खुळखुळणारा पैसा इतकंच असेल का? नाही .. पूर्वी पण भरपूर पैसा असायचा लोकांच्या कडे, पण घरातल्या स्त्रियांना बाहेर जाऊन खाणे हे कमी पणाचे वाटायचे. कितीही पैसा असला तरीही स्वयंपाक मात्र घरच्या स्त्रीनेच करायचा असा दंडक असायचा. अगदी अपरात्री पण कोणी पाहूणे आले तर पटकन चार पोळ्या आणि पिठलं भात करतांना पण गृहीणी कधी कुरकुर करायची नाही. हल्ली कोणाला जेवायला बोलवायचं झालं तर , ” जेवण कुठल्या हॉटेल मधून मागवायचं? हा पहिला प्रश्न असतो- “अहो, जर आम्ही स्वयंपाक घरातच अडकून राहिलो तर कसं काय एंजॉय करता येईल? कशा काय गप्पा मारता येतील?” अशा सबबी असतात बाहेर जाण्यासाठी.

मी स्वतः पण चांगला १८-१९ चा होई पर्यंत हॉटेल मधे गेलो नव्हतो. आई तशी खूप सुग्रण. प्रत्येकाचीच आई ही सुग्रण असते यात वाद नाही. आईला पण बरेच वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालण्याची आवड होती. बाहेर मिळणारा जवळपास प्रत्येक पदार्थ हा घरी करता यायलाच हवा यासाठी खूप प्रयत्न करायची. मग ते अगदी कुठलेही खारे पदार्थ असो किंवा बंगाली मिठाई म्हणजे रसगुल्ला किंवा रसमलाई असो, आईच्या हातच्या सगळ्याच गोष्टी मधे र्क विशेष चव होती. कुठल्याही पदार्था मधे प्राविण्य मिळेपर्यंत पुन्हा पुन्हा करत रहायचे हा तिचा स्वभाव.

आपल्या आईच्या/ बायकोच्या हातच्या चिवड्याची चव किंवा आईच्या/ बायकोच्या हातच्या चकलीची चव म्हणजे अगदी अप्रतीम. अख्ख्या जगात तशी चकली मिळणार नाही हे असे वाक्य न ऐकू येता , आजकाल ” त्या तांबेंच्या कडचे शंकरपाळे चांगले, की पणशिकरांकडले हे असे डिस्कशन्स होतांना दिसतात. घरी अनारसे, करंजी सारखे किचकट पदार्थ बनवण्याचे दिवस आणि उत्साह हल्ली पार संपलेला दिसतो. असं म्हणतात की पुरुषाच्या हदया पर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा त्याच्या पोटातून जातो- मग आजकाल स्त्रिया तो मार्ग हॉटेल मधून शोधताना दिसतात..

घर म्हणजे केवळ चार भिंती आणि एक छप्पर नाही. तर स्वयंपाक घर हे घरातलं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण.पूर्वीच्या संकल्पने प्रमाणे स्त्रियांची कर्मभूमी ही स्वयंपाक घर होती, ती आता बदललेली आहे. घरातल्या गृहीणीने प्रेमाने करून खाऊ घातलेले पदार्थ , आणि बाजारात मिळणारे पदार्थ यांची तुलना होऊच शकत नाही.

स्वयंपाक घरात केवळ स्वयंपाक नाही तर आपली संस्कृती पण जिवंत असते. आजकाल नेमका याच संस्कृतीवर घाला घातला जातोय – तो पण अगदी कळत न कळत! तुम्ही सांगा, तुम्हाला ईद च्या दिवशी मुसलमान लोकं बाहेर हॉटेल मधे जेवायला गेलेले दिसतात? नाही नां? मग सगळे हिंदू लोकं गणपती च्या दिवसात किंवा कुठल्याही सणाच्या दिवशी हॉटेलचा मार्ग का धरतात?

कुठल्याच पदार्थाला त्याची स्वतःची चव नसते, तर त्याला आईच्या हाताची, बायकोच्या हाताची, त्यांच्या प्रेमाची चव असते. दिवस भर काम करून ऑफिस मधुन आल्यावर स्त्री जेंव्हा स्वयंपाक घरात शिरते तेंव्हा तिची इच्छा पण मुलांना, नवऱ्याला प्रेमाने काहीतरी करून घालावे अशी असते. पण जर याच वेळी नवरा बाहेर सोफ्यावर टिव्ही पहात बसला, आणि तिला एकटीलाच कामं करावी लागली तर कंटाळा येणे सहाजिक आहे. हे असं होऊ नये वाटत असेल तर स्वयंपाकात घरातल्या सगळ्यांनीच मदत केली , किमान स्वयंपाक घरात जाऊन गप्पा जरी मारल्या तरी तिचा भार हलका होतो.

केवळ कंटाळा आला म्हणून जर सारखे बाहेर खाण्याचे सुरु राहिले, तर घरामधे आणि बाहेर्च्या हॉटेल मधे काही फरकच उरणार नाही. आणि संसाराला सुद्धा चव रहाणार नाही. बाहेर सारखे सारखे हॉटेल मधे जेवायला जाणे हा एक प्रकारे आपल्या संस्कृतीवरच एक घाला आहे असे वाटते. घरातल्या कर्त्या स्त्री ने स्वयंपाक करून सगळ्यांना प्रेमाने जेवायला घालायचे ही आपली संस्कृती. आजकालच्या दिवसातला थोडा मान्य करण्यात आलेला बदल म्हणजे तिने जेवायला न वाढता कुटुंबातल्या सगळ्यांनी एकत्र जेवायला बसायचे – एवढाच!

तिची पण तुमच्याकडून फार अपेक्षा नसते, फक्त स्वयंपाक छान झालाय, भाजी छान झाली आहे इतके जरी सांगितले तरीही तिचा थकवा कुठल्या कुठे पळून जातो. पैशाच्या दृष्टीने आत्मसमर्थ होण्यासाठी किंवा संसाराची गरज म्हणून स्त्रीने नोकरी केली तरीही तिला स्वयंपाक घरातले काम करणार नाही असे म्हणता येत नाही – किंवा तिचे तिथले महत्त्वही काही कमी होत नाही .

आजकाल स्त्रिया पण नोकरी करतात, त्या मुळे दिवसभर काम करून घरी आल्यावर तेंव्हा त्यांना थकवा येणे साहजिक आहे, तेंव्हा या बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेतांना, स्वयंपाक घरात मदत करण्यात काही कमीपणा वाटता कामा नये. पूर्वीच्या काळी स्त्रीयांचे साम्राज्य फक्त स्वयंपाक घरापुरते मर्यादित होते, त्याची कक्षा आता रुंदावलेली आहे. आठ तास काम करून , दोन तास प्रवास करून घरी आल्यावर तिला स्वयंपाक घरात मदत करणे, जसे, भाजी चिरणे, टेबल वर ताटपाणी घेणे इत्यादी लहान कामात मदत जरी केली तरीही बराच भार कमी होऊन बाहेर जाण्याची इच्छा कमी होऊ शकते – संसारातली गोडी टीकून राहू शकते.

जर घर नावाची संस्था, आणि संस्कृती टिकवायची, तर स्वयंपाक घर टीकणे आवश्यक आहे.

वर हा जो लेख लिहिला आहे त्याचा असा अर्थ नाही की मी बाहेर जेवण्याच्या विरोधात आहे. बाहेर जाऊन जेवणे पण एंजॉय करणे आवश्यक आहेच.. पण ते कधी तरी. टिव्ही पहाण्यात वेळ गेला , आता कंटाळा आलाय अशा कारणांसाठी ते नसावे आणि त्याची वारंवारीता पण फार जास्त नसावी एवढेच..!

(पूर्व प्रसिद्धी मी मराठी दिवाळी अंक)

(Photo Courtsey : – http://ethnicindianhome.blogspot.com)

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , . Bookmark the permalink.

50 Responses to संस्कृती

 1. pramod mama says:

  Mahendra Kaka,
  Sadhya Nokari karnarya Ladies bharpoor paisa kamvatat & pahilya pasoon kitchen madhye bharpoor kam karnyachi , 1st class Ruchkar swaympak karnyachi savyach modali aahe, mag aplya sarvana garama garam roochkar Jevan kase milel. Poorvi apli aai , AAji khoop kashta karayachy & sarvana Chan Ruchkar Paushtik vivid padartha karoon dyachya . Ata Visara te divas ani hotelchya baher Rang lawoon bhikarya sarkhe paise dewoon jevan karne aplya nashibat ahe. Just forget old golden days& adjust with Hotel Khana whith ghaspoos & kachara khana. 10 varsha nantar Thalipit, Birdachi Usal, Masale Bhat , Aaloochi Bhaji , Thecha , Bhakari Pithale, Diwali Faral Museam mahe pahave lagel, Atta vichar sodun dya ani milel tyavar taw mara.

  Pramod Mama.

  • प्रमोदमामा
   धन्यवाद. पण केवळ पैसा कमावला तरीही घरातलं साम्राज्ञीपद सहज सोडुन देऊ नये एवढंच वाटतं. शेवटी तुम्ही म्हणता ते पण खरं आहेच.. आलीया भोगासी …. !

 2. अभिषेक says:

  आज्जीबाई +१ 🙂

  • महेश says:

   +1 indeed 😉
   माझी आईपण सुग्रण, आणि बायको मिळाली अगदी कुग्रण. 😦

   • महेश, अभिषेक
    धन्यवाद..
    🙂 आजीने सोप्या शब्दात जीवनाचं तत्वज्ञान सांगितलं होतं.. आणि मी तिचं ऐकलं सुद्धा!!

 3. Mahendraji,
  Faar change wichar mandle aahet. Baher jaun j1 karane hi apriharyata hou naye. Enjoyment mhanun thick ahe.

  Cheers
  Nilesh Joglekar

 4. Madhuri Gawde says:

  khara sangaayche mhanje mi ya lekhatil vicharaansathi sahamat aahe aani naahihi. kaaran mi nokri karte . tyamule kadhikadhi kantala yene sahajik aahe. service hours only 8 but travelling cha time pakadla tar 12 hrs. pan aata jya muli corporate madhe service kartaat – working hours la limits naahi. joint family naslayane service dekhil ghar sambhalun karaayche. mag paryaay kaay?
  thanks god, maaza lek 24 years aahe, pan ajunhi tyala gharchi bhakri aani bhaji avadte. aani fiyanci hi ashi aahe ki tiladekhil javnachya varieties yetaat. ekun kaay pratyek purushaala nehmich kahi baaherche jevan aavadtech ase naahi. pan change haa havaach.

  • मला स्त्रीया नौकरी करतात आणि मग घरी आल्यावर थकून जातात याची पूर्ण कल्पना आहे. म्हणूनच जर तर पुरुषांनी पण घरात कामाला हातभार लावावे असे लिहिले आहे .घराचं घरपण टिकून रहावं – आणि त्या साठी स्वयंपाक घर टिकायला हवं.

 5. study4mpsc says:

  khup chhan aahe lekh

 6. अजय says:

  अगदी बरोबर ! पुर्वी हॉटेलमध्ये जेवणे हे कमी पणाचे लक्षण होते, घरी खायला मिळत नाही का ? असे विचारले जायचे. मला आठवत नाही वयाच्या २२ – २३ वर्षा पर्यंत मी कुठे हॉटेल मधे जेवलो असेन. खरतर या हॉटेलचे तेवढे आक्रमणही झाले नव्हते.
  आमच्या गावात जेवणासाठी हॉटेलपण नव्हते. हॉटेलमधे फक्त वडा, समोसा किंवा कांदा पोहे मिळायचे व सोबतीला चहा.
  मात्र आज कोणत्याही गल्लीत शिरा एक तरी “तुडूंब” भरलेले हॉटेल आढळेलच !
  पण घरच्या खाण्याची चव कुठे मिळणार !

  • अजय
   मला पण हॉटेलचं खाणं अगदी २०-२१ चा होई पर्यंत माहिती नव्हतं.. सध्या नोकरी मुळे सारखे बाहेरचेच खावे लागते ( महिन्यातले १५ दिवस तरी नक्कीच!)

 7. mazejaga says:

  Kaka agdi khar khar sangu…..uttardhatla th0da jari bhag pratyek gharat aacharla gela na tari nimmi tari H0tels rikami h0til….evdha umda vichar aaj kalche kiti navre kartat….madat kartil pan swatala swaipak yet asel tar sarkh hech “Tuzya peksha mich bari kart0 Bhaji”……hya war mi kelela upay….”sakalcha Kukar lavun jane ani p0lya karne” bhaji navr0ba karit…r

  • तुझ्या पेक्षा मीच चांगली भाजी करतो.. हा हा हा.. 🙂
   खरं आहे.. मी पण हे वाक्य वापरतो कधी कधी… 🙂

 8. हा लेखही निर्विवादपणे अप्रतिम आणि सच्चा! आजकाल सगळीकडे नवीनच ट्रेंड सुरु झाला आहे, तो म्हणजे हॉटेलात जाऊन घरगुती पदार्थ खाण्याचा. पुण्यात असताना ‘मथुरा’ वगैरे हॉटेलांमधील गर्दी बघून वाटायचे कि कदाचित पुण्यात हे पदार्थ मिळत नसावे… गैरसमज काही महिन्यातच मिटला. जवळपास सर्वच घरांमध्ये असले पदार्थ बनायचेत!
  नगर मध्ये एका हॉटेलात अस्सल महाराष्ट्रीयन काळ्या मसाल्याची भाजी मिळते, ती भाजी आणि भाकरी खायला रात्री शेकडो लोकांची झुंबड उडते. अगदी ५०० रुपये मोजून घरगुती भाजी चवीने खातात.. मुर्खपणा वाटतो. म्हणजे जे पदार्थ अगदी नकटी पोरगी घरी बनवू शकते ते खायला बाहेर का जायला हवे?

  • मनोज
   कालच इद झाली. मला तरी कोणी मुस्लीम लोकं हॉटेलच्या बाहेर रांगा लावून उभे असलेले दिसले नाही. हीच गोष्ट मला नेहेमी खटकते.
   घरगुती पदार्थ बाहेर जाऊन खाण्याचे फॅड आहेच.. आणि त्याचे कारण काय ते मला तरी अजिबात समजलेले नाही. संस्कृती टीकायची तर स्वयंपाक घर टिकायला हवे हे नक्की!! नाही तर रात्री ब्रेड आणून दिवस काढायची वेळ फार दूर आहे असे मला तरी वाटत नाही.

   • bread wali savaya tar baryach ghari diste ahe , ani kharach chapati hichi jaga koni gheu shakat nahi

   • tashich gardi dadra la gomantak madhye pahili ahe roz aste , janyacha kadhi manach kela nahi

    • दादरचं गोमंतक, वांद्रे चं पण गोमंतक नेहेमी अगदी फुल पॅक असतं. मला नोकरी निमित्य नेहेमी बाहेर फिरावे लागते, त्यामुळे बाहेरचं खाऊन नुसता कंटाळा आलेला असतो . त्यामुळे मुंबईला असलो, की शक्यतो बाहेरचं खाणं टाळतो.

 9. काका, मस्त आणि पटणारं लिहलं आहे.

  पिझ्झा च्या कांद्याचे थालीपीठ वा! मस्तच…
  आणि साबुदाण्याचे मिळाले तर स्वर्गच.

  • नागेश
   दोन्ही विक पॉइंट आहे माझे.
   ( सध्या गुरुवारचा उपवास असतो त्याची मुद्दाम वाट पहात असतो मी .. थालीपिठासाठी.

 10. शिरीष दवणे says:

  “घर म्हणजे केवळ चार भिंती आणि एक छप्पर नाही. तर स्वयंपाक घर हे घरातलं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण.पूर्वीच्या संकल्पने प्रमाणे स्त्रियांची कर्मभूमी ही स्वयंपाक घर होती, ती आता बदललेली आहे. घरातल्या गृहीणीने प्रेमाने करून खाऊ घातलेले पदार्थ , आणि बाजारात मिळणारे पदार्थ यांची तुलना होऊच शकत नाही.” हे तर एक नंबर लिहिले आहे काका.

  संसाराची गोडी टिकवण्याचा मंत्र देखिल उत्तम व खरा आहे पण मी हा मंत्र वीकएन्ड पुरताच वापरतो. 🙂

  • शिरिष
   सुरुवात केली आहे ना? मग तेवढं सध्या तरी पुरेसं आहे. एकदा तिच्या त्रासाची जाणीव झाली, की आपोआप मदत करायला दिवस पहाणे बंद होईल

 11. प्रणव says:

  “केवळ कंटाळा आला म्हणून जर सारखे बाहेर खाण्याचे सुरु राहिले, तर घरामधे आणि बाहेर्च्या हॉटेल मधे काही फरकच उरणार नाही. आणि संसाराला सुद्धा चव रहाणार नाही.”
  +१ मनापासून पटल.
  आमच्याकडे आजी + आई + बायको अशा तीन तीन सुग्रण आहेत. खरच सांगतोय काका. त्यामुळे आमच्याकडे सगळेजण खाऊन-पिऊन सुखी आहोत असा म्हणायला हरकत नाही.
  काका बाकी लेख एकदम छान चविष्ट झालेला आहे…नेहमीसारखाच 🙂
  — प्रणव

  • प्रणव
   “आमच्याकडे आजी + आई + बायको अशा तीन तीन सुग्रण आहेत.”
   सुखी माणसाची लक्षणं!!
   आभार..

   • प्रणव says:

    काका, अगदी पहिल्या छायाचित्रात एक मिसळनीचा डबा (फोडणीचा डबा) आहे तसा मिळतो का हल्ली? तुमच्या पाहण्यात आहे काय? फार पूर्वी माझ्या आजोळी मी पहिला होता असा डबा.
    – प्रणव

    • प्रणव
     नाही पहाण्यात नाही. पण माझ्या आजी कडे पण असाच एक फक्त ५ खण असलेला एक डबा होता.. 🙂 लाकडी स्वयंपाकाच्या साधनांमधे फक्त लाटणं एकच प्रकार शिल्लक राहिलेला आहे असे दिसते.

     • प्रणव says:

      “आपल्या आईच्या/ बायकोच्या हातच्या चिवड्याची चव किंवा आईच्या/ बायकोच्या हातच्या चकलीची चव म्हणजे अगदी अप्रतीम.” तुम्ही पूर्वी भारत-पाक संबंधांमध्ये मध्यस्ती करायला होता काय हो? एकदम डिप्लोमेटिक* (*मराठी शब्द सापडला नाही) वाक्य टाकलय. 😀 तुमच्याकडून ट्रेनिंग घेतला पाहिजे बुवा.
      प्रणव

      • प्रणव
       काही गोष्टी आपोआपच शिकतो आपण. आता २३-२४ वर्षाचा अनूभव आहे . दोन्ही बाजू सांभाळाव्या लागतात.. 😉

     • aruna says:

      you can see such boxes in the north still.

 12. pahili gosht mhanje he je mnc companies jya ahe tyani advt chya madhyamane lokana tya chamchami khanya kadhe aakarshit kele ahe. ani aaj aaj kal kahi chalta ahe jasa wheat vale noodles , vitamin D wala bournvita kasa kay vitamin D he tar direct sunlight nich miloo shakt. kharch ahe thalipit chi chav tya pizza kadhic yenar nahi. ekda gelo hota pizza hut madhye festive mood madhye oan bramhniras zala such a bore thing and for that bill 400-500 chy darman . kadhitari naiilzza ne khane vegle ani dar ravivari savya laun ghene he vegle. lekh sundar ani arthatpurna ahe .

  • केतन
   त्या विषयवार एक ब्लॉग लिहिला होता फार पूर्वी. पिझा वर.. 🙂
   प्रतिक्रियेकरता आभार.

 13. गौरी says:

  काका, या पोस्टशी असहमत.
  तसं म्हणायचं, तर घराचं घरपण टिकवण्यासाठी खूप गोष्टी हव्यात. तिथे आलं- गेलेलं कुणी हवं, पाहुणे हक्काने यायला हवेत, सकाळ – दुपार – संध्याकाळ घरचं ताजं जेवण मिळायला हवं, सगळे सण समारंभ साजरे व्हायला हवेत … यादी न संपणारी आहे.
  आधीच नोकरी – करियर करताना घराकडे, मुलांकडे दुर्लक्ष होतंय, आपल्या आई-सासू-आजीइतका वेळ आपण घरासाठी देऊ शकत नाही असा मोठ्ठा अपराधी भाव बहुसंख्य नोकरदार स्त्रियांमध्ये दिसतो. त्याची भरपाई करण्यासाठी मग नोकरीव्यतिरिक्तचा सगळा वेळ त्या घरासाठी देतात. अगदी स्वतःची विश्रांती, व्यायाम, तब्येत याकडे लक्ष द्यायलाही त्यांना वेळ नसतो. हे बदलायला हवंय. घरातल्या सगळ्यांनीच घरपण जपण्याची जबाबदारी उचलायला हवीय. (मी इथे ‘घरकामात मदत’ म्हणत नाहीये. इतरांनी ‘मदत’ करायला हे फक्त घरातल्या बाईचं काम नाहीये.) जोवर ते होते नाही, तोवर आपल्याला कदाचित वारंवार बाहेरचं खावं लागेल. त्याला इलाज नाही.

  • गौरी
   सहमत.. एकत्र कुटूंब पद्धती नामशेष झालेली आहे. त्यामुळे बाहेरचे आणि घरातले दोन्ही कामं स्त्रियांनाच करावे लागतात. हा मुद्दा पण मी वर लिहिलेला आहेच.
   घरातल्या सगळ्यांनीच घरपण जपण्याची जबाबदारी उचलायला हवीय . हे पूर्ण पणे मान्य. मदत हा शब्द वापरलाय कारण स्वयंपाक घर हे स्त्री चे कार्यक्षेत्र आहे ही गोष्ट अजून तरी नाकारता येणार नाहीच.
   धन्यवाद.

   • aruna says:

    I agree with gouri, when she says that everyone should think the work as his own, and not some favour done to the Lady of the house! in olden days she was weddd to the kitchen, and did all the work as she had other option. Of course , most of the women did take pride in their culinary skills, and they still do. but somehow the false ides of status too, seem to be detrimental to home-cooked food. The other day i heard a college biy saying very derogatorily about his mother ‘my mother na is very –thalipeeth and pohe type! i am damn bored yaar!!!’ what can loving mother do in such cases?

    another point is as yiou have said, there is no appreciation of the hard work, efforts and love and care that goes in preparing all these dishes! very very disheartening.

    thanks for taking a balanced view.

  • suraj patil says:

   mi sahmat ahe gauri tai tumchyashi

 14. शेल्डन कूपर says:

  हॉटेल समोर उभे राहण्याच्या तुमच्या मताशी १००% सहमत.आणि थालीपीठ आणि पिझ्झा यांचे उदाहरण तर भन्नाट..मस्त वस्तवदर्शी लेख.

  • शेल्डन कूपर
   नॉक नॉक नॉक…. ब्लॉग वर स्वागत!
   धन्यवाद…. मी पण बीबीटी चा फॅन आहे बरं कां.. सगळे म्हणजे चारही सिझन झाले पाहून. 🙂

 15. Anup says:

  सर, अत्यंत समर्पक असा लेख आहे. मी तुमचा नियमित वाचक आहे आणि तुम्ही मांडलेले मुद्ये फारच खोलात जाऊन मांडले आहेत असे वाटते. तरीसुद्धा आजकाल आलेल्या सामजिक बदलांची नांदी आणि भारतीय समाजाचे झालेले globalization चाच हा सर्व परिपाक आहे अस मला वाटते. तरीसुद्धा अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विचार करायला लावणारा लेख आहे असेच म्हणेन. Hats Off To You

 16. madhuri says:

  tumche vichar kharach vichar karnyas bhag padtat. bhaher jaun jevne he ajkal lokana shremantich lakshan vatat pan tyana gharat ekatr bsun jevtana milalelya anandachi maja matr kadhi nahi samjat. swapakgharat madat karnyachya kalpneche hardik swagat ani thanx sudha

 17. प्रसाद थरवळ says:

  “..कुठल्याच पदार्थाला त्याची स्वतःची चव नसते, तर त्याला आईच्या हाताची, बायकोच्या हाताची, त्यांच्या प्रेमाची चव असते…………………………” १ नंबर….!!
  ……जी मज्जा आईच्या जेवण वाढण्यात आहे… ती…… स्वतः वाढून घेण्यात नाही…..! नुसतं पोट भरणं.. आणि तृप्तं होणं…… यात हाचं काय तो फरक….!
  & पिझ्झा पेक्षा आपलं कांद्याचं थालिपीठ Any time.. Bestचं…!! …आभार..

 18. लेख वाचून अस वाटतय की तुमचा संसारातील अनुभव अगधी तगडा दिसतोय खरच लेख मस्त झाला आहे.
  सर मला तुमची मदत हवी आहे तुमच्या ब्लॉग वरील “प्रवर्ग” चा कोड मला देऊ शकता का? तो मला माझ्या ‘ रोज एक चित्र ‘ ह्या ब्लॉग साठी वापरायचा आहे.
  इमेल आयडी – shrikantval@gmail.com
  लिंक – http://shrikantsketches.blogspot.com/

 19. मालोजीराव says:

  “मला असे हॉटेल समोर रांगेत उभे रहाणे खूप इरीटेटींग होते. आपलेच पैसे द्यायचे, आणि खाण्यासाठी असे भिकाऱ्यासारखे आपणच रांगेत उभे रहायचे? – ही गोष्ट मला अजिबात मान्य नाही. ”
  अगदी अगदी मान्य ! हा माझ्यापण attitude चा भाग करून घेतलाय….रांग लावून कुपन घेणे,बफ्फे पद्धत असलेलं जेवण इ. गोष्टी टाळतो.

 20. Gurunath says:

  बोहोत खास काका!!!!!, मान गए उस्ताद…….. बायकू तशी मिळाली पाहीजे हो काका फ़क्त नाहीतर आहेच आलीया भोगासी….. मला तेच एक टेन्षन आहे बघा, आई माझी बरीचशी तुमच्या मदर सारखी!!! तंदूरी सुद्धा ट्राय केले होते तिने घरी रोट्या (सक्सेस्फ़ुली!!) त्यामुळे खाण्यापिण्याचे स्टॅंडर्ड्स फ़ार हाय सेट झालेत आमचे त्यात आम्ही एकुलते एक लाड्या हैदर!!!!… देव जाणे आगे क्या होगा!!!!

 21. sarang says:

  chan lekh aahe, kahi padarthache naav vachun te padarth athvayla laglo tychi chav athvayla laglo ani jibhela pani pan aale. good one sir keep it up !

Leave a Reply to madhuri Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s