नेव्हीचं म्युझियम .

हे काय असेल?

हा चित्रा मधे दाखवलेला ऑरेंज कलरचा बॉल कसला असावा??  मला पण हाच प्रश्न पडला होता पहिल्यांदा हा बॉल पाहिला तेंव्हा.  पण जेंव्हा तो बॉल म्हणजे आपण नेहेमी ज्याच्याबद्दल ऐकतो तो ब्लॅक बॉक्स आहे हे समजल्यावर ह्याचा रंग ऑरेंज असतांना पण याला ब्लॅक बॉक्स का म्हणतात बरं??  याचं खरं टेक्निकल नांव म्हणजे फ्लाईट डाटा रेकॉर्डर!विमानाचा अपघात झाल्यावर नेहेमी बातमी मधे सांगितलं जातं, की  विमानाचा अपघात झाला आहे, आणि ब्लॅक बॉक्स शोधण्याचे काम सुरु आहे. जरी सगळे विमानाचे भाग जळून नष्ट झाले तरीही ह्या भागाला  मात्र काहीच होत नाही आणि विमानाचा अपघात कशामुळे झाला हे समजते .  पाहिल्यावर हे काय बरं असेल हा प्रश्न पडला होता,पण   त्या फोटॊ खाली दिलेली माहिती वाचल्यावर मात्रं समजले.

पायलट सिट, आणि वरच्या भागात असलेले पॅराशुट

नेव्हीच्या विमानांचा बेस हा जहाजावर असतो आणि जहाज खोल समुद्रात! शत्रूच्या हल्ल्याने जर फायटर विमान कोसळले तर त्यातल्या वैमानिकाचे काय होत असेल? कारण विमान तर फारच लहान म्हणजे फार तर एखाद्या मिडियम  साइझ च्या ट्रक इतकच असतं. विमानावर हल्ला झाल्यावर वैमानिकाची सिट  हवेत इजेक्ट केली जाते, आणि त्याच्यावर असलेले पॅराशूट  उघडते… वगैरे सगळ्या गोष्टी फक्त ऐकूनच माहिती होत्या. त्या सगळ्या पहायला मिळाल्या.

एक नवीन गोष्ट जिच्या बद्दल कधी विचार पण केला नव्हता ती म्हणजे ,वैमानिकाच्या जवळ  असलेली खास रेस्क्यु बॅग! ही रेस्क्यु बॅग पायलटची सिट इजेक्ट झाल्यावर पण पायलट सोबत असते. त्या

हे सगळं असतं पायलटच्या रेस्क्यु किट मधे..

रेस्क्यु बॅग मधे समुद्राचे पाणी गोड करणारे एक लहानसे यंत्र, इन्फ्लेटेबल राफ्ट, फिशिंग चे सामान, पाणी , कंपास , फ्लेअर्स आणि अशा अनेक लहान लहान गोष्टी असतात. एका रेस्क्यु बॅग मधल्या सगळ्या वस्तू काढून एका डिस्प्ले बोर्ड वर लावलेल्या होत्या. जहाज चालवतांना समुद्राची खोली माहिती असणे सगळ्यात महत्त्वाचे कारण समुद्राची खोली कमी असेल तर जहाज रुतुन बसण्याची शक्यत खूप जास्त असते. समुद्राची मोजण्याचे यंत्र जे ध्वनीच्या  इको प्रिन्सिपल वर काम करते ते पण समोरच ठेवलेले होते. इतरही बऱ्याच टेक्निकल वस्तू होत्या, पण फार वेळ नसल्यात त्यात जास्त रस घेऊ शकलो नाही.

विमान प्रवास तर हजारो वेळा झाला असेल. फायटर प्लेन्स पण आधीही पाहिले होते.  पण अगदी जवळून पहाण्याचा चान्स कधी आला नव्हता तो आज आला. समोरच्याच मैदानात एक दोन पंखे असलेले ऍव्हरो

्दुमडलेल्या पंखाचे विमान

च्या सारखे एक मोठे चार इंजिन्सचे  विमान – जे सामानाची ने-आण करण्यासाठी वापरले जाते ते होते. त्या विमानाच्या आत जाण्यासाठी शिडी लावलेली होती. आत शिरल्यावर आधी कॉकपिट मधे गेलो, तर तिकडे सगळे इन्स्ट्रुमेंट्स काढून घेतलेले दिसले. आत बसण्यासाठी काही सिट्स पण होत्या.

या शिवाय एक हेलीकॉप्टर- जे सध्या नेव्ही ने डिकमिशन केलेले आहे ते आणि एक फायटर जेट विमान

फायटर जेट विमान आणि खालच्या बाजूला जोडलेले बॉम्ब दिसताहेत.

पण समोर दिसत होतं. जेट टेक्नॉलॉजी मुळे विमानाच्या इंजिनाचा आकार आणि वजन एकदमच कमी झालेले आहे. पूर्वी जी रेसिप्रोकेटींग पिस्ट्न्स ची सुपरचार्ज्ड इंजिन्स वापरली जायची, त्यांचे मॉडेल्स  पण समोरच ठेवलेले होते, आणि बाजूलाच अगदी अद्यावत अशा जेट इंजिनाचे मॉडेल पण ठेवलेले  आहेत. ही सगळी इंजिन्स अजूनही  चालू होऊ शकतात!

त्याच ग्राउंड मधे एक विमान पंख दुमडून उभे होते. हे एक खास विमान जहाजावरची हॅंगर मधली जागा कमी लागावी म्हणून डिझाiन केले गेले आहे असे समजले. ह्या सगळ्या विमानांची नांवं लिहून घेतली होती, पण तो कागद कुठे तरी हरवला, आणि आता नेट वर शोधायचा कंटाळा येतोय.:)

सबमरीन वर अटॅक करण्यात येणारा टॉरपेडॊ- क्रॉस सेक्शन

विमानाला  खालच्या बाजूला बॉम्ब  अडकवण्याची जागा दिसत होती. एका विमानाला तर मिसाइल्स अडकवलेले दिसत होते.. त्याला बॉम्ब किंवा मिसाइल म्हणण्यापेक्षा टॉरपेडॊ म्हणणे जास्त योग्य ठरेल. एक खास प्रकारचा टॉरपेडॊ – पूर्वी सबमरीन्सवर अटॅक करण्यासाठी वापरला जायचा. त्याचे डिसेक्शन करून क्रॉस सेक्शन मॉडेल पण ठेवलेले आहे. विमानातून टाकल्यावर समुद्रात अगदी सावकाश लॅंड होण्यासाठी या टॉरपेडॊ ला एक पॅरॅशुट असतं. एकदा समुद्रात पडल्यावर सबमरीनच्या इंजिनाचे व्हायब्रेशन्स सेन्स करून हा टॉरपेडो त्या सबमरीनच्या दिशेने सुटतो. ह्या सगळ्या गोष्टींबद्दल ऐकण्यापेक्षा किंवा वाचण्यापेक्षा या सगळ्या गोष्टी  पहाण्यातच खरी मजा आहे.

नेव्हल एअर फोर्स! हे एक वेगळंच प्रकरण आहे. सर्वसामान्य माणसांचा एअरफोर्स शी आणि नेव्हीशी संबंध कधीच येत नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी एकत्र पहायला मिळणे म्हणजे पर्वणीच म्हणायला हवी. साधारण  एअर फोर्स आणि नेव्हल एअरफोर्स  मधे मुख्य फरक हा की नेव्हल एअरफोर्स मधे लहान लहान फायटर  विमानं जहाजावर ठेवलेली असतात, आणि तिथल्या तुटपुंज्या रनवेवरूनच टेकऑफ आणि लॅंडींग करतात. जहाजाची लांबी साधारण ७५० फुट असते.इथे एका मोठ्या विमानवाहू जहाजाचे मॉडेल पण ठेवलेले आहे. मॉडेल टु द स्केल असल्याने पहायला मस्त वाटतं. त्या मॉडेल कडे पाहिल्यावरच त्या जहाजाच्या भव्यतेची कल्पना येते. टू द स्केल असलेल्या ह्या मॉडेल वर विमानांच्या प्रतिकृती पण ठेवलेल्या आहेत.

या वेळी  विमान तळावर पोहोचल्यावर समजले की फ्लाईट उशीरा आहे , दिड तास कसा घालवायचा हा प्रश्न होताच.  हे जवळच असलेले एक नेव्ही चे म्युझीयम आठवले. आजपर्यंत या म्युझियम समोरून बरेचदा गेलो असेन, पण दर वेळी कामात व्यस्त असल्याने कधी थांबून पहाणे झाले नव्हते- ते पहाण्याचा योग आज  आला.

आम्ही जेंव्हा या म्युझियम मधे गेलो होतो, तेंव्हा तिथे आमच्या व्यतिरिक्त कोणीही नव्हते. काउंटरवरचा माणूस म्हणाला फार कमी लोकं म्हणजे दिवसाला फार तर ५० एक लोकं येत असतिल म्युझियम पहायला.  मला वाटतं की गोव्याला गेल्यावर एकदा इथे अवश्य भेट द्यायला हवी. तुमच्या पुढच्या गोवा ट्रिप च्या वेळेस इथे जाण्याचे विसरू नका. आणि हो……….. हे म्युझियम गोवा एअरपोर्ट पासून फक्त दोन किमी अंतरावर आहे…. पहायला दिड ते दोन तास पुरेसे आहेत.

This slideshow requires JavaScript.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in प्रवासात... and tagged , , , , , . Bookmark the permalink.

32 Responses to नेव्हीचं म्युझियम .

 1. सही… अप्रतिम दिसतंय म्युझियम.
  नक्की जायला हवं… माहितीसाठी धन्स काका 🙂 🙂

 2. Chhan ch ahe lekh..
  Pudhchya Goachya trip mdhe nkki jaain..
  Thanks for information, Kaka 🙂

 3. मस्तच !! इतक्या वेळा गेलोय गोव्याला पण कधीच गेलो नाहीये इथे.. दिवसाला जेमतेम ५० लोकं ?? :((

  >> विमानावर हल्ला झाल्यावर वैमानिकाची सिट हवेत इजेक्ट केली जाते, आणि त्याच्यावर असलेले पॅराशूट उघडते…

  डाय हार्ड-२ आठवला 🙂

  • हेरंब
   अरे प्रत्येक वेळेस कामासाठीच गोव्याला गेलो होतो. पर्सनल ट्रिप च्या वेळी पण गेलो नाही हे मात्र खरं. या म्युझियम बद्दल कोणी कधी सांगितलंच नाही. टेक्निकल माहिती भरपूर आहे. पहिल्या वैमानिकाची कथा- त्याने विमान जहाजावर लॅंड केले तेंव्हाचा अनुभव.. बरंच काही आहे तिथे पहाण्यासारखं! गोव्याला गेलो की प्रत्येक वेळेस नविन काहीतरी सापडतं. मग ते शांतादुर्गा कोंकळ्ळेकरीण असो नाही तर हे म्युझियम..

 4. Ashwini says:

  excatly kuthe aahe he Govyat

  • एअरपोर्टच्या समोर रंगित झेंडे लावले आहेत . डावीकडे वास्को, तर उजवी कडे गेलो तर मडगांव पणजी येतं. सरळ जायचं… दोन ते अडीच किमी. 🙂 अगदी जवळ आहे तिथून.

 5. pravin says:

  just 3 km from my sasuraal. Next time I ll go there for sure 🙂 Thank you for letting us know about it.

 6. Tanvi says:

  मस्त… पुन्हा एकदा सुंदर माहितीपुर्ण लेख….

  >>>> विमानावर हल्ला झाल्यावर वैमानिकाची सिट हवेत इजेक्ट केली जाते, आणि त्याच्यावर असलेले पॅराशूट उघडते…

  अजिबात कल्पना नाहीये अशी काहीच…. मुळ म्युझियम कधी पहाणं होइल कल्पना नाही पण लेख आवडला!!

  • तन्वी
   मला पण ऍक्सिडेंटली शोध लागला होता या म्युझियमचा. तसं बागोमोलो बिचच्या रस्त्यावरच आहे 🙂

 7. Gurunath says:

  इजेक्शन सीट्स म्हणजे रशियन इंजिनियरींग चा एक सर्वोत्तम नमुना आहे काका, त्या म्युझियम मधे व्हर्टीकल टेकऑफ़ असणारे सी-हॅरीयर नव्हते काय????

  • Sea Land, Sea Harrier, Vampier and Sea Hawk & Sea Harrier ही नांवं आठवतात.. पुढल्या वेळेस थोडा जास्त वेळ देइन इथे.. या वेळेस फक्त एक तासहोतो.

 8. khup chan lekh ahe , gr8 informative

 9. Ganesh says:

  काका मस्त माहिती दिलीत …
  आता गोव्याला जायचा प्लान करत आहोत…
  जर प्लान झाला तर नक्कीच म्युझियम पाहून येईन

 10. hemant2432 says:

  काका, खूपच छान माहिती दिली आहे. नेव्हल एअर-फोर्स म्युसियम मी कधीच ऐकले नव्हते. गोव्याच्या पुढील भेटीत हे पाहणारा नक्की.

 11. Aparna says:

  काका मस्त माहिती…पूर्ण गोवाच लिस्टवर आहे (खादाडीसकट)…
  मागे इकडे एका एअर शो मध्ये फ़ायटर प्लेन्स पाहायचा योग आला होता आणि काही म्युझियममध्येही पाहिली गेली आहेत..एक वेगळंच आकर्षण असतं अशा माहिती मिळवण्यात…हे ब्लॅक बॉक्सच्या माहितीने सुरुवात करुन सॉलिड इंटरेस्टिंग झाली पोस्ट….

  • अपर्णा
   फायटर प्लेन पहाण्यात मजा असते. एकदा एका एअरफोर्स स्टेशनवर ( मला वाटतं भूज च्या) एक जूने नॅट ठेवलेले आहे. पूर्वी म्हणजे १९८७ मधे जेंव्हा पहिल्यांदा मिराज २००० भारतात आले, तेंव्हा सगळी विमानं सेफ्टी च्या दृष्टीने ग्वालियर एअरपोर्टला ठेवण्यात आली. एअरपोर्ट रिनोव्हेशन च्ं खूप मोठं काम करण्यात आलं तेंव्हा. पहिलं विमान आल्यावर गॅरिसन इंजिनिअर कडून खास परवानगी काढुन पहायला गेलो होत.:) प्रतिक्रियेसाठी आभार.

 12. डिप्लोमाला असताना रडारची माहिती देण्यासाठी आमच्या पूर्ण वर्गाला एकदा नेव्हीच्या जहाजावर नेले होते. तेंव्हा खूप नवीन माहिती मिळाली होती. अर्थात त्या जहाजावर विमान उतरविण्याची व्ययस्ता नव्हती. तुमच्या पोस्टमुळे ही नवीन माहिती मिळाली आणि डिप्लोमाच्या जुन्या आठवणींना उजाळा.

  • सिद्धार्थ
   अवश्य जायला हवे .. गोव्याच्या ट्रिप मधे एक दोन तास सहज निघू शकतात. बऱ्याच लोकांना माहिती पण नाही या बद्दल. दूर कशाला, गोव्याचा रहाणाऱ्या मित्राला पण या बद्दल फारशी माहिती नव्हती- म्हणाला जायचंय एकदा!!!!! 🙂

 13. aruna says:

  तुमच्या चिकित्सक दृष्टीचे कौतुक वाटते. महिती सगळ्यांबरोबर शेयर करता त्याबद्दल अभिनंदन.

 14. prasadtorgalkar says:

  खुप छान माहिती दिली काका. पुन्हा गोव्याला गेल्यावर नक्की म्युझियम पाहायला जाणार. धन्यवाद!!!

Leave a Reply to aruna Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s