लोकं लग्न का करतात?

लेखाचे हे  हेडिंग वाचल्यावर तुमच्या  पैकी जवळपास ९० टक्के लोकांच्या मनात हे काही उत्तर आले असेल ते उत्तर मला अभिप्रेत नाही. लोकं  लग्न का करात ? तसं म्हंटलं तर याचं उत्तर प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळे असणे अपेक्षित आहे. पण बहुतेक लोकांचं उत्तर एकच असावं असं वाटतं- पण खरंच तसं असतं  का?

जेंव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी आपलं शिक्षण पुर्ण करतो आणि नोकरीला लागतो, तेंव्हा साधारण २३-२४ वय असतं. हातात मस्त पैकी पैसा खुळखुळत असतो. कॉलेज मधे शिकत असतांना बाबांच्या कडून मिळणारा लिमिटेड  पॉकेट मनी आता एकदम मल्टीफोल्ड मधे वाढलेला असतो.

नवीन मित्र मैत्रिणी झालेल्या असतात. मस्त पैकी सिनेमे, नाटकं, ट्रेकिंग वगैरे सुरु असतं. आठवडाभर काम करायचं आणि विकएंडला मस्ती करायची… असा प्रोग्राम सुरु असतो. सुरुवातीला काही दिवस तरी घरचे लोकं काही म्हणत नाहीत, पण लवकरच, म्हणजे एक दोन वर्ष झाली की मग  जर मुलगी असेल तर आई वडिलांना तिच्या लग्नाची काळजी वाटायला लागते. किती दिवस उंडारू द्यायचं हिला असं? आता लवकर  उजवून  टाकायला हवं!घरच्या लोकांची सारखी भूणभूण सुरु होते. मुलींना मात्र अजून काही दिवस तरी एकटं रहायची इच्छा असते. स्वातंत्र्य इतक्या लवकर संपावं अशी इच्छा नसते. पण……… आई वडिलांच्या इच्छे पुढे काही फारसं चालत नाही आणि चहा पोहे सुरु होण्याची लक्षणं दिसू लागतात.

मुलाच्या बाबतीत थोडं वेगळं सुरु होतं. आता २५ चा झाला, म्हणजे अजून दोन तीन वर्ष तरी लग्नाला वेळ आहेच. पण घरचे लोकं मानसिक तयारी व्हावी म्हणून येता जाता टोकत असतात. एखादी चांगली दिसणारी मैत्रीण वगैरे असेल तर ,” काय रे तसं काही आहे का तुझं? असेल तर सांग, आम्ही भेटतो तिच्या आई बाबांना” असं आई बाबा म्हणाले की मग मात्र ” अरे हो यार.. खरंच आपलं लग्नाचं वय होत आलं की आता” ही चाहूल लागते.

इथपर्यंत सगळ्यांचे सारखंच असतं. त्याला पण आपण लग्न का करायचं हे काही लक्षात येत नाही. फक्त इतर मित्रांची- मैत्रिणींची लग्न झाली म्हणून आपणही  करायचं का?  सोशल अ‍ॅक्सेप्टन्स सा्ठी-की कोणी तरी हवी मागच्या सिट वर बसायला म्हणून अजिबात काही समजत नसतं. घरचे लोकं मागे लागले, की आता लग्न करा,म्हणून करायचं? त्याला थोडी भिती वाटत असते, लग्न करायचं म्हणजे  आपल्या बरोबर ती पण रहाणार, म्हणजे तिची पण जबाबदारी आलीच.काय करायचं?

तिच्याही मनात साधारण असेच  विचार येतच असतात, की कसं एखाद्या अनोळखी मुलासोबत रहायला जायचं? अख्ख्या आयुष्यात आई बाबांना सोडून कुणाकडे रहायला गेले नाही, आता हे कसं जमेल आपल्याला? लग्न करायलाच हवं का??

दोघांनाही आपला प्रेम विवाह व्हावा असे वाटत असते. पण  हिम्मत दोघांचीही होत नसते.. तिला पण तो बरा वाटत असतो, त्याला पण ती छान दिसायला लागते. मैत्रिणींकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलला जातो. अगदी निर्भेळ मैत्री असते ती थोडी पझेसिव्ह व्हायला लागते. ट्रेक ला जातांना बस मधे तिच्याच शेजारी बसायला मिळावं म्हणून धडपड सुरु असते, तिला पण हे सगळं समजत असतं, पण ती मात्र अजिबात काही लक्षात न आल्याप्रमाणे वागत असते. वाट पहात असते, ’हा येडा’ कधी काही बोलतो का ह्याची!

पण ” हा येडा” मात्र कुठलाही धोका पत्करायला तयार नसतो. समजा विचारलं, आणि मग ती नाही म्हणाली तर? असे प्रश्न भुंग्या सारखे डोक्यात पोखरत असतात. काय करावं बरं?? विचारावं की नको?  बरोबरच्या मित्रांच्या पण लक्षात आलेले असते हे सगळे, पण कोणी तसं बोलून दाखवत नाही. हे दोन्ही  प्राणी आपलं मुकत जीवन एंजॉय करत असतात. बरेचदा तिला पण वाटत असतं, की ह्या मुखदुर्बळ माणसाने कधी तरी विचारावे, पण हा मात्र   ढीम्म पणे बसलेला असतो- आणि कधीच काही विचारत नाही.

असेच काही दिवस जातात. तिचे चहा पोह्यांचे कार्यक्रम सुरु होतात, त्याचं अजून मुली पहाणं सुरु झालेले नसते.  मधल्या काळात ,  एक तर  तिचे लग्न ठरते किंवा  तिला कोणी  पसंत पडलेला  नसतो  .

हे वर जे काही लिहिलंय ते बऱ्याच लोकांच्या बाबतीत घडतं. लग्न का करायचं? हा कन्सेप्टच क्लिअर नसतो.वर ज्या घटना लिहिल्या आहेत, त्या सर्वसाधारण  पणे मुलांच्या  जीवनात घडणाऱ्या घटना असतात. या सगळ्या काळात एकदाही लग्नाचा विचार मनात आलेला नसतो, पण नकळत सामाजिक जाणीव लग्नाच्या दिशेने मन तयार करत असतं.

****

लग्नाचं पहिलं कारण म्हणजे एखादी व्यक्ती तुम्हाला अगदी मनापासून आवडत असते. एक मैत्रीण म्हणून किंवा मित्र म्हणून. ती   ्दुसरया कोणाशी तरी लग्न करून ,आपल्या पासून दूर जाणार ही कल्पनाच सहन होत नाही, आणि मग नेहेमी साठी तिच्या  बरोबर रहायला  हवं ना? म्हणून मग लग्न केले जाते.. !

दुसरा कन्सेप्ट म्हणजे , दोघंही सगळीकडे आपल्या स्वप्नातला राजकुमार किंवा राजकन्या पाहून दमलेले असतात. मग दोघंही एकमेकाला कॉम्प्लिमेंट करायला म्हणून एकदम साक्षात्कार झाल्या प्रमाणे ” अरे आपल्याला तर हीच आवडत होती?” असे लक्षात आल्याने लग्न करतात.

काही लोकं असेही म्हणतात की मुली फायनान्शिअल सिक्युरीटी साठी लग्न करतात. पण तसे नाही. कारण आज मुली पण मुलांच्या इतक्याच शिकलेल्या असतात, आणि मुलांच्या बरोबरीने पैसे कमवायची धमक बाळगून असतात, तेंव्हा हे फायनान्शिअल सिक्युरिटी चे कारण मला तरी पटत नाही. अहो जर हेच कारण असते, तर ऐश्वर्या रायला लग्न करायची काही गरज होती का?? तिच्याकडे करोडो रुपये आहेत, कशाचीच कमतरता नाही .. पण तिलाही लग्न करावंसं वाटलंच ना?

पण याच गोष्टीवरून एक  लक्षात येतं की फायनान्शिअल सिक्युरीटी जरी असली, तरीही समाजातलं अ‍ॅक्सेप्टन्स मिळायला हवं म्हणून तिने लग्न केले असेल का? ति्चे एकटी असतांना लग्नापूर्वीचे स्टेटस आणि आजचे स्टेटस या मधे पडलेला फरक पहाता हा मुद्दा पटतो.

काही मुली कार्पोरेट वर्ल्ड मधे चांगले पैसे कमावत असतात, बरोबरचे  सगळे  लग्नाळू मुलं मागे लागलेले असतात, पण नंतर काही दिवस यांच्याकडे दुर्लक्ष केल्यावर ,  आणि बहूतेक दुसरी एखादी मुलगी आल्यावर पली एक हॉट गर्ल ची इमेज जेंव्हा थोडीविस्कळीत व्हायला लागते, तेंव्हा आपल्यापे क्षा जास्त पैसे मिळवणारा मुलगा बघून लग्न ठरवले जाते.

बरेचदा नोकरी निमित्य एकटे रहावे लागते, मग त्या  एकटेपणातुन बाहेर पडण्यासाठी , निःस्वार्थी प्रेम , की जे आजपर्यंत केवळ आई , वडील, भावंडं यांच्या कडूनच मिळालेलं असतं, ते   शोधण्याचा प्रयत्न सुरु केला जातो,आणि मग ते न मिळाल्यास, वैफल्य आणि सरळ मुलगा बघून लग्न करण्याचे ठरवले जाते. अगदी हीच गोष्ट मुलांच्या बाबतीतही घडते.

अजून एक कारण म्हणजे आई वडलांच्या बंधनात रहाण्याचा कंटाळा आलेला असतो, आणि मग त्या बंधनातून सुटण्याचा मार्ग म्हणून लग्न करणारे पण काही लोकं असतात.

दोघांचेही एकच करिअर असतं (डॉक्टर, इंजिनिअर, नाटक वगैरे), आवड पण जुळते, जसे नाटक, सिनेमा, संगीत, वगैरे आणि मग असं वाटायला लागतं की आपण बरोबर रहायला हरकत नाही, म्हणून मग लग्न!!!

धार्मिक बंधनं, म्हणून – म्हणजे धर्मात सांगितले आहे की लग्न  रिप्रोडक्शन साठी करा म्हणूनही लग्न करणारे लोकं आहेत.

या सगळ्या गोष्टी शिवाय एक गोष्ट म्हणजे जीमी पहिल्या पॅरीग्राफ मधे तुमच्या मनात पहिले आली होती ती – म्हणजे शारिरिक गरजा ! हवं तर बायोलॉजिकल निड्स म्हणता येईल त्याला.  सेक्स हा पण  उद्देश आहेच. पण केवळ सेक्स साठी म्हणून लग्न केले जात नाही, तर सेक्स हा एक लग्न केल्यावर होणारा अनुषंगाने येणारा भाग आहे.   सेक्स साठी म्हणून कोणी लग्न करत नाही.

जसे सिनेमाचे हिरो हिरोईन्स, काही देशांचे प्रेसिडेंट्स, ब्रिटनचा राजकुमार, विजय मल्या,   वगैरे की ज्यांनी मनात आणले  आणि त्यांनी फक्त हो जरी म्हंटले, तरीही त्यांची सोबत करण्यास बऱ्याच स्त्रिया तयार होतील.  त्यांना तर आयुष्यात लग्न करायची गरज पडायला नको. पण केवळ सेक्स हा एकच मुद्दा लग्ना करण्यामागे कधीच नसतो. एक कमिटेड रिलेशनशिप, होणाऱ्या बाळाला वडिलांचे नांव, हे मुद्दे पण आपल्या कडे फारसे महत्त्वाचे वाटत नाहीत. कारण विवाहपूर्व संबंध अजून तरी सर्वमान्य झालेले नाहीत.

जेंव्हा कोणाचं लग्न होतं, तेंव्हा तो कोणाचा तरी कोणी तरी होतो. म्हणजे बघा, ऐश्वर्या राय बच्चन ही अभिषेकची  बायको , अमिताभची सून, त्या बाळाची आई.. इतके काही झाली लग्नानंतर.  हा जो सामाजिक रिस्पेक्ट मिळतो तो मिळवण्याची प्रत्येकाचीच धडपड असते -आणि म्हणून लग्न केले जाते.

सगळ्यात शेवटी एकच सांगतो, लग्न का करतात लोकं?? यावर एकच उत्तर आहे, ते म्हणजे बस्स्स!! करायचं म्हणून करतात .

जर तुमचे लग्न झालेले असेल तर आपण लग्न का केलं?  हे   आठवुन बघा, आणि जर लग्न झालेले नसेल तर आपण लग्न का करणार आहोत याचा विचार करून पहा….  जर काही वेगळं सुचलं तर इथे कॉमेंट लिहा… 🙂

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , , , . Bookmark the permalink.

231 Responses to लोकं लग्न का करतात?

 1. harshal jawale says:
 2. mau says:

  mast lekh !!

 3. प्रसाद says:

  सुंदर लेख ….
  हाच प्रश्न मला पण पडलेला आहे परंतु लग्न का करावे याचे खरच उत्तर काही मिळत नाहीये…
  सध्या घरातले सगळेजण हात धुऊन मागे लागले आहेत की लग्न कर म्हणून पण मला आजून तरी समाधान कारक उत्तर काही मिळाले नाही…
  आणि तुम्ही पण “शेवटी एकच सांगतो, लग्न का करतात लोकं?? यावर एकच उत्तर आहे, ते म्हणजे बस्स्स!! करायचं म्हणून करतात . ” असेच म्हणत आहात…
  अजून तरी प्रश्न अनुत्तरीत आहे..
  ज्या दिवशी उत्तर मिळेल त्या वेळी नक्कीच कॉमेंट करेन…

  • प्रसाद
   लेखात लिहायचा राहिलेला हा मुद्दा :-

   बरेचदा तर घरच्या लोकांनी म्हंटलं म्हणून त्यांना खूष करायला लग्नासाठी होकार दिला जातो. आई वडील आपलं चांगलंच करतील ही भावना असतेच, आणि मग त्यांनी विचारले की सरळ हो म्हणून मोकळे होतात दोघंही. आणि साधारणपणे असेच होते.. 🙂
   बेस्ट लक ..

   • manish says:

    he tar agadi khare ahe tyala kinva tila mulat phar lagnachi haus naste pan gharchyansadhi mahnun to kinva ti lagnala hokar detat. pan he kharech barobar ahe ka?

   • ajinkya says:

    Sir kharach chhan lekh lihila ahe…
    Majhe baba ata last month madhe off jhale…tar AAI ektich ghari aste.
    Tar tichi kalji ghenyasathi var tila madatisathi lagna kar…
    Pan mala he patat Nahi.
    Pan ase hi hot asel baryach jananchya babtit.
    Thanku

  • s says:

   Fakta karaych mhanun karne. Ok

  • Datta Mudgule says:

   Lagn manje hava(Air) asate and apan manje Sharir (body) asto ani shwas ghetla nahi tr jagnar ks.. Lagn manje sharing aste… be+ :-0

 4. Chetan says:

  Mast Jamali ahe Post, kaka.

 5. Hemant Pandey says:

  मला वाटते आपल्या आयुष्यभर एक खास समाजमान्य मित्र-मैत्रीण मिळावा हा हेतू असावा. काका, शेवटी A person who gets a good wife is always happy in his life, otherwise a person becomes a philosopher! अतिशय सुरेख लेख आहे.

  • हेमंत
   समाजात लग्नानंतर मिळणारी प्रतिष्ठा ही दुसऱ्या कशानेच मिळू शकत नाही हे पण नक्की./
   आभार.

 6. हा हा हा … अगदी माझ्या मनातले विचार… 🙂

  म्हणून मी अजुन लग्नाचा विचार केला नाही…बाकी संसारी मित्रांच्या कमेंट्सची वाट बघतोय, बघू त्यांची कारणे काय होती ते 😉

  • सुहास
   विस खांडेकर म्हणतात, ” थोडं अविचारी व्हा” नुसता विचार करत बसू नका… 🙂 लवकर अ‍ॅक्शन घे आता..

 7. Sadhana Raje says:

  HI Sir,
  Masta Lekh aahe

 8. काका… मी ही हा.. प्रश्न बऱ्याच लोकांना विचारलाय.. अगदी…सुखात लोळंनार्यांना & दू:खाने रडणार्यांनाही… (लग्न झाल्यानंतर)….!! समाधानकारक उत्तर.. अजून कोणीही दिलेलं नाही……….
  @list तुम्हीतरी द्याल अशी अपेक्षा होती.., पण.. “करायचं म्हणून करतात …” (???) Disappoint 😦

  • ्प्रसाद
   आंबा चवीला कसा लागतो हे कोणी सांगू शकणार नाही. त्या साठी स्वतःच चव घेऊन पहावी लागते. इथे पण तसेच आहे, प्रत्येकाचे उत्तर निराळे असणार.. पण बहूतेक कोणालाच काही उत्तर सापडत नाही- की आपण हे लग्न् का केलंय?

 9. savitarima says:

  अतिशय उत्तम विश्लेषण केलेले आहे.
  यातील शेवटून दुसरे जे कारण आहे सेक्स त्यात थोडा बदल करून मी असे म्हणेन की आपल्याकडे सेक्स ला समाजमान्यता मिळावी म्हणून लोकं लग्न करतात. आपण कधीही शारीरिक गरजा उघडपणे मान्य करत नाही . मग विवाहसंस्थेमुळे ही सोय आपोआपच होते कसलीही थेट मागणी न करता /थेट उल्लेख न करता .
  आणि दुसरे म्हणजे आपल्या मालमत्तेला वारस हवा असेही वाटत असते. अगदी गरिबाची झोपडी असली तरीही तो मृत्यूसमयी जे काही किडूकमिडूक असेल ते आपल्या मुलाबाळांना वाटून देत असतो. आपले स्वत:चे असे कुणीतरी असावे ही नैसर्गिक इच्छा असते. कदाचित निर्मितीचा आनंदही हवा असेल काहीजणांना.
  विवाहसंस्था कशी सुरु झाली असावी यावर लेखिका मंगला सामंत यांचे अतिशय उत्तम पुस्तक आहे . एक मात्र खरे की आधी आपण कृती करतो अर्थातच लग्नाची आणि मग जस्टीफिकेशन शोधत बसतो.
  या लेखामुळे किमान काहीजण तरी लग्न करण्यापूर्वी ते का करायचे आहे याचा नक्कीच विचार करतील.

  • धन्यवाद.. खूप छान मुद्दे अ‍ॅड केलेत

  • greenmang0 says:

   आपल्याकडे सेक्स ला समाजमान्यता मिळावी म्हणून लोकं लग्न करतात. आपण कधीही शारीरिक गरजा उघडपणे मान्य करत नाही . मग विवाहसंस्थेमुळे ही सोय आपोआपच होते कसलीही थेट मागणी न करता /थेट उल्लेख न करता .

   बऱ्याच महिन्यांपूर्वी मी कुठेतरी वाचले होते की काही वर्षांपूर्वी लग्नपत्रिकेत “अमुक अमुक आणि तमुक तमुक यांचा शरीरसंबंध करण्याचे योजिले आहे” असे वाक्य असायचे.

  • Satish londhe says:

   तुमचं लग्न झालं आहे का तर बोलयाला नायतर ते कळणार नाही तुम्हीAला

  • avi says:

   छान आवडले आपले मत

  • Manish says:

   I completly agree with you.
   Jeewan sathi milawanyasathi milawnyasathi kartat lagn ani tyacha khara arth kalato 50 nantar … कमी अपेक्षा ठेवल्या तरच लग्न सुखाचे.

  • Manish Pune says:

   I agree completly … Hakkache asawe ase watane haa ek bhag … Aapli samajik wyawastha tikun thewaychi mhanun.

 10. Santosh Kudtarkar says:

  Hahahahahahahahaha…

  Kaka… Bhawana samjun ghya ho!!! 🙂

 11. काका….टिवटर वर चर्चा वाचली तेव्हाच लक्षात आल होतं की तुमची चांगलीच फ़र्मास पोस्ट येणार आहे ती 😉

  @सुहास….समजेल समजेल लवकरच 😀 😀

  • योगेश
   सकाळी ऑफिसला जातांना हा प्रश्न डोक्यात आला होता, म्हणून ट्विट केला…. पण नंतर मग हे पोस्ट लिहायचं सुचलं ..

 12. aruna says:

  most of them do it because it’s the ‘done thing’, i guess !

 13. Snehal says:

  Ha ha ha 😀 😀 kaka awesome………. Ye apna dil to awara na jane kisape aayega B-)

  • स्नेहल
   दिल की नहीं, दिमागकी सुननेका….
   क्या ???? समझी क्या?? नै तो फोन करनेका मेरेको…:)मै समझाऊंगा दिमाग की कैसे सुननेका ..:D

 14. कदाचित काहीही अपेक्षा न करता आयुष्यभर तिला निस्वार्थी प्रेम देण्यासाठी..

  • निनाद,
   मला वाटतं की देण्या साठी नसावं, तर ते मिळवण्यासाठी असावं. कारण आयुष्यभर लहानपणापासून आपण निःस्वार्थी प्रेम मिळवत असतो, मोठ झाल्यावर त्याची कमतरता जाणवतेच. म्हणून लग्न असेल का??

   • निनाद होंबळकर says:

    काका,
    मिळण्याची अपेक्षा ठेवून जर वागत राहिलो तर कदाचित एकतर्फी निस्वार्थी प्रेम करण्याची मजाच हरवून जाईल.. कदाचित आपल्या एकतर्फी निस्वार्थी प्रेमाने ती पण प्रेम करू लागेल आपल्यावर..

 15. Nikhil Bellarykar says:

  सगळ्यात शेवटी एकच सांगतो, लग्न का करतात लोकं?? यावर एकच उत्तर आहे, ते म्हणजे बस्स्स!! करायचं म्हणून करतात .

  The best sentence so far.

  • निखील
   बरीच उत्तरं ट्राय केल्यावर माझं उत्तर ते वर दिलेले आहे..:) प्रतिक्रियेसाठी आभार.

 16. Chintamani says:

  लेख वाचुन विचार करायला लागलो. पण ते शब्दात कसे उतरवायचे ते नाही कळत.

  जाउ देत. आपण भेटु तेँव्हा चर्चा करू.

 17. raj says:

  jo shadi ka laddu khaye wo pachataye…
  aur jo na khaye wo bhi pachataye…
  ….khaun pachatavanyasathi lagn karayala pahije !
  –raj

  • सही.. पण इथे लग्न करावे की नाही हा विषय नाही. लग्न करायचा निर्णय घेतात त्या मागच्या कारणाचा मागोवा घेण्याचा केलेला प्रयत्न आहे .

 18. Atul Ranade says:

  माझी लग्न करण्यामागच कारण म्हणजे,

  एखादी व्यक्ती तुम्हाला अगदी मनापासून आवडत असते. एक मैत्रीण म्हणून ती ्दुसरया कोणाशी तरी लग्न करून ,आपल्या पासून दूर जाणार ही कल्पनाच सहन होत नाही, आणि मग नेहेमी साठी तिच्या बरोबर रहायला हवं ना? म्हणून मग लग्न केले जाते.. !

 19. अच्छा म्हणजे परवा ट्वीटरवर म्हटल्याप्रमाणे लग्नावर पोस्ट आली म्हणायची 🙂 छान मुद्दे मांडले आहेत. हल्ली फेसबुकवर “स्टेटस” अपडेट करायला मिळावे म्हणून देखील काही महाभाग लग्न करीत असतील 🙂

  @सुहास – “प्यार का पंचनामा” आवडला होता नां? मग अनुभव नां भाऊ… 😉

 20. Sagar says:

  @nd time vachatoy hi post.
  Kay comment taku kalt nahi.

  Ek 101% khar

  Karayach aahe mhnun kartat
  SaBa

 21. Raghu says:

  Maz lagna zalya war “lagna kaa kartat” ha wichar jara sudha manala shivala nahi 🙂 .. sagalya goshti aapo aap kalalya..

 22. Nikhil says:

  Maz Lagna ajun zala nahiye pan tumhi dilelya Karnanpaiki sarwat pahila karan mala lagu padtay 😀

 23. Ashwini Mane says:

  Mala lekh avadala.. apan eakmenkana olkhat nahi.pan yache utter malahi nahi sapadale ankhin……..pan mayechi ani premachi uub kahich natyanmadhun milate…kadachit tymulehi asel……….

  • अश्विनी
   मला पण हे कारण पटतं.. बहूतेक सबॉन्शस माइंड मधे हाच विचार सुरु रहात असेल निर्णय घेतांना.

 24. Prachi says:

  काका अगदी कालच मी लिहायला घेतला होत, हाच विषय!! कारण आता माझ्या घरचे माझ्या मागे लागले आहेत लग्न कर म्हणून.. मला अजिबात काळात नाहीये कि मी लग्न का करायचं?? का मी दुसर्याच्या घरी जाऊन राहायचं? अगदी माझं नावही बदलायचं.. rather माझी आय्डेन्तिती पण बदलायची.. थोडक्यात पुसून टाकायची. इतकी वर्ष माझं घर, आपल सगळ सोडून जायचं… कुणा अनोळखी बरोबर बोलाल कि वाईट पण अशाच अनोळखी माणसात जाऊन आपल आयुष्य काढायचं!! आपला मांडलेला खेळ सोडायचा, मित्र- मैत्रिणींना सोडून जायचं, पुन्हा नवा डाव मांडायचा. का????
  A big Question mark, Why??

  • प्राची
   बऱ्याच गोष्टी घरातल्या मोठ्यांवर सोडून दिल्या की बरं असतं..
   जीवनक्रम आहे हा. हे असेच चालणार. शुभेच्छा!

  • Namrata says:

   Prachi I am writing in English as typing in English for Marathi is difficult for me. I could not stop myself replying to your why?? Had same experience, been there. Ignore if you don’t like.
   It’s something like looking at artificial tree thinking it’s real and then asking why the tree is not green?
   We girls always think while marrying that we are leaving everything behind we loved and going to some unknown place. Instead just try this, think your future husband and his family are not outsiders but extension to your current family, large family more fun more happiness and that’s how grass is green everywhere 🙂

  • kittu says:

   barobar boltes tu

 25. Milind says:

  mala vatata ayushyat 3 prashNachi uttara miLaNa kathin ahe. ti miLali tar khupse prashNach astitvat nastil…
  1. dev pahila ahe ka?
  2. lagna ka kartat?
  3. ata tari sukhi ahes na?

  Kaka, dusarya prashnavar lihilat . mala vatata pahilya aNi tisaryavar pan liha.

  • मिलिंद
   सुंदर उत्तर लिहिले आहे. पहिल्या नाही, पण तिसऱ्या प्रश्नावर लिहिलंय पूर्वी एकदा…

  • shekhar khot says:

   Lagn karyla pahije mnun karta t ekate pan kunla avdt nahi kuni tar haath darva as vat
   Partyklaa
   Ekta pana kunla j sahan nahi hot

 26. GanesH says:

  काका,
  आपण लिहिलेल्या सगळ्या मुद्दया बरोबर मानसिक आधार हे पण एक कारण आहे.
  जसे जसे आपले वय वाढत जाते तसे तसे आपल्याला मानसिक आधाराची ज्यास्त गरज लागते.
  आणि मग त्या साठी सुरु होतो प्रवास हक्काचे माणूस शोधण्याचा आणि तो प्रयत्न म्हणजे लग्न.
  काका आता तुमी अजून एक पोस्ट लिहा लग्न का करावे ते 🙂

  • गणेश
   प्रौढ वयातल्या लग्नाचा विचार केला तर वरचे उत्तर योग्य ठरते. पण मुलाचे वय २७ आणि मुलीचे २४ असेल तर -मानसिक आधाराची गरज फारशी वाटत नसावी..

  • Sir ,

   Question chan hota sir tumnca.tyace answer konalac kadacit nai sapadnar,partu lagna he ek aadhar kathi Aste ti parampara husar phude calat Aste aai baba,tai dada sathi hi vegli bandhleli aadhar kathi Aste doghancya madhye bandli janarai dhagyaci Gath mhanje lagna.

 27. सर मला तर वाटते की आपल्या आई – वडीलानंतर जी कोणी व्यक्ती आपल्याला समजू शकते , प्रेम देऊ शकते ती म्हणजे आपली बायको. कदाचित हे कारण असाव लग्न करण्याच…..

  • श्रीकांत
   धन्यवाद..आई वडीलां इतकं समजून घेणारं दुसरं कोणीच नसतं.. बायको काही अंशी समजून घेण्याचा प्रयत्न करते, पण त्यावरही लिमिटेशन्स असतातच..

 28. sakshi nerkar says:

  hello,
  mi barech diwasan pasun tumache lekh wachate. khup chan asatat te. pan ya lekhavishai thoda bolavasa watat lagna mhanaje fakta sex or financial security naahi. lagna mhanaje ke bandhan asate je aapalyala ghadawate. lagna he eka jodi darasathi kele jate jo aplyala ayushyabhar sath denar asato sukhatahi anni dukhatahi. aai, baba, bhau, bahin, he apalyala ayushyabhar purat nasatat ayushyat konachi tari sobat havi asate koni tari hakkach manus jyala aapan apala sarva kahi share karu shakel.sagalyat jast mhanaje mhatarpani. mhanun apan lagna karat aasato. ….. he maza mat aahe

 29. महेश कुलकर्णी, says:

  मस्त,सुंदर झकास,

 30. mast lekh (as usual) mi 24 yrs cha aahe ani gele 3 mahine Govt. servant mhanun laglo aahe… majhya gharche khup maage laglet pan mi saaf inkar dila. Ajun 7 yrs tari mala life enjoy karaychi aahe. I’m HIGH on LIFE!!!

  • करुन टाकायला हरकत नाही. जर सगळं काही सेट झालेले असेल तर काय हरकत आहे? आयुष्तातल्या जबाबदाऱ्या लवकर संपतात.:) बेस्ट लक.

 31. मालोजीराव says:

  “एखादी व्यक्ती तुम्हाला अगदी मनापासून आवडत असते. एक मैत्रीण म्हणून ती ्दुसरया कोणाशी तरी लग्न करून ,आपल्या पासून दूर जाणार ही कल्पनाच सहन होत नाही, आणि मग नेहेमी साठी तिच्या बरोबर रहायला हवं ना? म्हणून मग लग्न केले जाते.. ! ”

  ……….याच गोष्टीसाठी तिच्याशी लग्नाची धडपड चालूये…पण वाट खडतर आहे असं वाटतंय !

  • मालोजी राव
   शुभेच्छा. अहो काही तरी तर कारण हवं असतंच .. तुमचं तर एकदम सॉल्लीड आहे कारण.

 32. Ganesh Kulkarni says:

  vicha karayala lawnara lekh………….

 33. Gurunath says:

  काका हे पुलंच्या असामी आसामी मधल्या टू बी ऑर नॉट टू बी सारखं झालंय हो!!!!!, माझ्या मनात तर विचारांचा राडा झालाय नुसता……. अन आता तर माझे करियर वगैरे सुरळीत झाल्यावर जेव्हा सिरियसली लग्नाचा विचार मनात येतो तेव्हा कसंतरीच होतंय!!!!!!…. कोणाची तरी पोर आयुष्यभर सांभाळायची!!!!… बापरे… बेडा गर्क!!!!……… घरी गेलो आता की एकदा तो सीन होणारच आहे बघा आमच्यापण….. ५ मिनिटे भेटून चहा पोहे करुन कसे ठरवु पोरगी कशी आहे ते????? प्रेशर वाटते खुप!!!!

  • गुरुनाथ
   अरे कशाला इतका विचार करतोस. जे व्हायचं ते होईल. तुझी गर्ल फ्रेंड आता हो म्हणेल बघ तूला. ट्राय अगेन.. 🙂

 34. Prajakta says:

  na karun chalat nahi mhanun karatat.
  aai-baba na tention madhe baghayala lagu naye, tyanchya dokyala traas hou naye, lokanche prashna zelayala lagu naye mhanun.
  jagat apal sagal normal ch ahe asa sidhha kelyavar barech prashn aapoaap sutatat kinva nirman ch hot nahit.

  shevati menduvar kitihi surakutya asalya tari, degree milalyashivay sidhha hot nahi na! tasach ahe.

 35. Amit says:

  Mala Hey Sentence aawadla tumchya lekha madhun…

  मधल्या काळात , एक तर तिचे लग्न ठरते किंवा तिला कोणी पसंत पडलेला नसतो

 36. वेदांत says:

  लग्न का करतात?
  मानसिक आणि शारिरिक भुक भागवण्यासाठी !

 37. sapna says:

  lok lagn ka kartat mast question???

  mala

 38. Yogesh says:

  2012 khar vhav. Mala 2012 chya nidan varshabhar tari aadhi lagn karayach hot. Prayatn chalu aahet pan kahi julun yayana. Shevatche varsh tari aandndat jail. Langananatar varshbhar tari lok sukhi rahat astil as maza vishwas aahe. khar mi 2 varsh aadhi mhanat hoto pan aata tar varsh pan nahi rahil. Mazya mate 2 varsh tari manus lagna nantar sukhi rahat asel.

  Tumchyapaiki vivahit aslelyanni vivahanantar kiti kal sukhi hote yachi mahiti aslelyanni pratikriya dyavi mhanje mala maze mhanane kitpat khare aahe patel. Kripaya chestechya jast bhangadit padu naka 2012 thodyach divsat aahe

  Dhanyavad!

  • योगेश
   एक , दोन किंवा पाच वर्ष सुखी रहाण्यासाठी कोणी लग्न करीत नाही, तर आयुष्य एकमेकांसोबत सुखाने घालवायला करतात. उद्देश तर तोच असतो, पण सुख कशात आहे हा लेख अवश्य वाच, म्हणजे मला काय म्हणायचंय ते लक्षात येईल.

   • Yogesh says:

    mi lekh purn vachala nahi. Maf kara pan mi fakt maze mat vyakt kele. Mothe lekh sahasa mi vachat nahi. Dhanyawad.

 39. balika dhole says:

  ek way asat jyaveli aplyala konachitari sharirik mansic arthik bhautik druhstya garaj padate. ani apan he sarv ekakdunach magato kinva share karto to mhanaje apla janmach jodidar. ani mhanunach pratekala lagnachi garaj padatech

 40. laxman nijve says:

  we do it only for respect and due to it is traditional

  so

 41. Seema says:

  Khar tar khup divsani wachayla milala.Var je lihile aahe te khupach chan aahe reply tar mastach aahet…pan mala asa watata ki lagna he garaj aahe,lagnananatar khup problem pan hotat pan taripan lagna good aahe.manus ekta kadhich nahi rahu shakat anin tharavik time nanatar aata sath denare detilach ase nahi…
  Maza ajun lagna zala nahi pan I so excited about.Pan mala bhiti pan watte karach me ghetlela disicion right asel ki nahi.U know mala watata lagna mhnje sharemarket madhla asa shere aahe ki jyavar aapan aadchi progress pahun buy karto…pan taripan roj bhiti wattech nahi ka?

 42. aruna says:

  शादीका लड्डू खाये वो पछ्ताये और ना खाये वो भी पछताये! तो फिर खाकेही पछतओना! खानेका मजा तो लो.
  लग्न का करतात याची इतकी उत्तरे ऐकून ही अजून खरे उत्तर सापडतच नाही. वारस, वंशाचा दिव वगैरेच्या गोष्टी अशा लोकांनी कराव्या ज्यांचा वंश चालण्यने काही चांगले होणार आहे. बाकी मागे काय ठेऊन गेले काय नाही गेले काय, कय फरक पडतो?
  काहीजण म्हणतात म्हातारपणी कोणीतरि सोबती पाहिजे म्हणून लग्न करा. पुढच्या क्षणाची शाश्वती नाही, म्हातारपणाची खात्री कोण देणार?
  कारणे शोधू नाही आणी साण्गू नाही. आपल्याला वाटले तर करावे लग्न. what say?

 43. prachiti says:

  ‘akkal gahan padate………..bheja kamatun jato….
  takka ughadya dolyani apan chakka lagna karto’

 44. shradha says:

  jevha mala “hach”mazi aayushbar saath deil ase vatale tevha mi lagn kele………

 45. Anonymous says:

  mala vatat mansala lagnachi khari garaj tyachya mhatarpani karan tyaveli tyala adhar asava lagato tyasathi paha mhatari jodapi

  • खरं अहे, पण लग्न करतांना दोघंही तरूण असतात, तेंव्हा म्हातारपणीचा विचार केला नसतो दोघांनी पण.

 46. Anonymous says:

  kharcha majhe gharache pan lagnache baghat aahet mala pan kalat nahi ka karayache lagna.
  Madhavi

  • कशाला विचार करता, सरळ फेस करायचं .. सगळ्यांचं जे होतं, तेच आपलंही होणार हे नक्की !

 47. madhavi says:

  Kharach mala pan nahi kalat ka karatat manse lagna te.

 48. मनीष says:

  खरच काका…
  आतापर्यंत लग्न म्हणजे अपरिहार्य गोष्ट समझुन चाललो होतो…
  पण कधी मनापासून विचार नाही केला कि नक्की का करायचं लग्न?
  धन्यवाद… आता (तरी) नक्की विचार करेन !

 49. Na-mu says:

  gd evening kaka……….
  Mala tumcha lekh khup avadala.. Kharach ha prashan mala naki padala aahe…. yavar kahi answer milave mhanun me aj 1st time try kela.. barobar tyachveli tumcha ha lekh mala sapdala. Thanku so much kaka… Tumche bolne mala patale… Lagn karayche mhanun karata he mala patale nahi… pan naki jevha lagnacha vichar karen v yache answer mala milale na me naki tumala kalven….. thank u for advice kaka…… HAVE A GOOD LIFE.. 🙂

 50. Gajanan says:

  Mastach lekh aahe ….!! and very important is comments ..on this open platform .. jithe saglyanchi mann open hot ..

 51. poonam says:

  kaka,mast lekh.
  joparyant to Rajkumar milatnahi toparyant dhak dhuk aasteto kasa asel,tyache gharche kase aastil vaggere vaggere.Aani jam vaitag yete ya aasha karyakrmancha.

  • योग्य वेळी सगळ्याच गोष्टी आपोआप होतात… कळत नकळत आपणही त्यात सहभागी होत जातो. शुभेच्छा.

 52. Nilesh says:

  लग्न करन आवषक आहे का ? जर समजा नाही केल लग्न तर ? मी मानतो शारीरिक आणी मानसिक गरज ही असतेच प्रत्येकाला. (पण हे जर मुद्दे सोडले तर) लाहान पन खेळन्यात मग शाळेत मग कोलेज मग नोकरी मग छोकरी मग लग्न मग पोर मग त्यांच पालन मग त्यांच शीक्षण मग लग्न म्हणजे परत बे चे पाडे चालु . जिवणाचा का हाच उद्देश आहे ? बिना लग्न करता आंनदी राहता येत नाही का ? जे सर्वानी केले तेच आपन ही करावे का ?
  हे आणी असे बरेच प्रश्न मला पडतात . अजुन ही मनाला पटेल असे उत्तर मीळाले नाही …………!!!!!!

 53. Amol M Shinde says:

  Dear Sir,
  “koni mantat ki lagna kartat shari sukhasathi,Koni Mantat ki apla vansh pudhe chalavanyasathi,
  tar koni mantat ki manshik sukha bhoganya,parantu mala vate ki, lagna manje don jivanche milan,sat pherabarobar sat janmachya shapata khalalya jatat,lagna pratecacha jivanatil amulagra badal asto.mala yevadhech manayache lagna manje don vicharache milan hoi”.

  Regards,
  Amol Shinde

 54. jyoti says:

  Khup diwasani aaj wachtey….. Post khupach chan zaliye….
  pan ha prashn dokyatun jat hi nahi…ani tyach samadhankarak utter hi milat nahi ….

 55. ni3more says:

  kulkarani kaka tumhi ek dum masta blog lihila ahe mala awadale aatach me parwa ganpati sathi gavi gelo hoto tar amchya mamachya ganpatichi mirvnuk nighali hoti tar maja mama bolato
  nitin bhag hya madhali kon mulagi tula pasand aali tar sang apan tuje wajwun devu pan mala samjat nahi apalya lagnachi kalaji aplyala nasun apalya samjalach jasta aste. me jithe hi jato na serva relative vicharat are lagna kadhi karatos re

 56. suhas adhav says:

  masta aahe post ..
  aajun tar khup vel aahe hya goshti sathi 😛
  pan post madhye je mandlat te agdi patla
  pan lagna hi ek complicated goshtach vate kadhi kadi ..partner aaplya jatit-dharmat-lachlach aasa va
  aashya baryach goshti… koni aavadlach tar tya vyaktila aapan avdu ki nahi …varun aavadlo tari gharun permission milel ki nahi hi ek goshta 😛
  agdi loksabhet bill pass karavatasa 😛
  pan ek goshta paki … aapla man aasel tarach karava ugach koni sangtaay mhanun nahi..shevti aakha aausha kadhaycha aasta 😛 😛

  • फार कठीण प्रश्न आहे हा. प्रत्येकाने आपापले उत्तर शोधायचे असते.
   जातीधर्मातली की दुसरी?? मलाही हा प्रश्न पडला होता २५ वर्षापूर्वी., शेवटी वडिलांचे ऐकले ……. .

   • suhas adhav says:

    tumcha utar agdi patla mala …
    baryach goshti matter kartat aapla professional life kasa aasnar aahe tyanusar sudha adjust karnari vyakti milayla havi …understanding nasel tar kahi aarthach nahi
    ani aasa pan hota na adhicha kal vegla hota (me moral values vishai boltoy).
    baher je kahi chalay te distach aahe aaj..patat nahi mag.
    aaj aapan olakhto personally tyachi aapan thodi tari guaranty gheu shakto
    thodkyat aaplya aai-baban samor ekhadichi image vegli aaste ani aasa hota barech da
    pan samajat vavartana ti kashi aahe te distana aaplyala 😛
    pan ek goshta khari ki aai-babancha hokar aaslyashivay lagna karnyat aarthach nahi 🙂

 57. satish says:

  mahendra,
  thode cude vatel ,pan purush paishasathi nokari karatat aani sex sathi lagna karatat ase mhatale jate,bhale nantar te donhi babat pashatap karat asale tari.karan ya donhi garaja purna karanyacha changala paryay bahusankhya lokanna milalela nahi.

  • सतिश
   वर लेखात लिह्लेले वाक्य पुन्हा देतोय, “जसे सिनेमाचे हिरो हिरोईन्स, काही देशांचे प्रेसिडेंट्स, ब्रिटनचा राजकुमार, विजय मल्या, वगैरे की ज्यांनी मनात आणले आणि त्यांनी फक्त हो जरी म्हंटले, तरीही त्यांची सोबत करण्यास बऱ्याच स्त्रिया तयार होतील. त्यांना तर आयुष्यात लग्न करायची गरज पडायला नको. पण केवळ सेक्स हा एकच मुद्दा लग्ना करण्यामागे कधीच नसतो.”
   बरं, अमेरिकेत तर अगदी वयाच्या १६ पासून सेक्स चा अनुभव घेतला असतो, तरी पण लोकं लग्न करतात, तिकडे तर सेक्स अगदी उघड पणे अव्हेलेबल आहे., तरी पण लोकं लग्न करतातच.. 🙂

 58. Pankaj says:

  lekha mastach aahe..

 59. sharirane aani manane nirmal aaushya jagta yaave mhanun tari lagn karylach have. fakt kahi etchya manat dharun kase jagta yeyeeal mhanun tari lagn karyalach have.. kai mhantat na sara gav mamacha pan ek nahi kamacha. velela mhahatv dyaa aani lagn karach.

 60. prerana says:

  nice one..lagna ka kartat??? ha lekh kharch khup chan ahe…kadhi kadh kharch kalat nahi ki lagna ka karaych???sagle karatat manun apan hi karaych ka?? ha prashn maza manat nehmich yet asto..

 61. anjali says:

  mahendra kaka,
  mi tumacha ha blog geli char varsh vachat ahe. ha lekh vachun aj pratikriya dyavishi vatali. lagna mhanje swata cha swarth bajula theun dusaryasathi jagan. je mi geli teen varsh karat ahe ani karanar ahe. maze husband na kuthe job karu shaktat. na swatachya dainandin goshti swata karu shakat . tari hi amchya doghancha prapnch surlit ahe mi niswarthi aslyamule

 62. anjali says:

  mahendrakaka,
  maz 24 years age pahata sarv lokani mala mazya navryala sodnyacha salla dila. pan mi nahi tyanch konach ekale.mazi mulgi did varshachi hoti. barobar apamg ani nuktech 15 divasan purvi operation zalela navara gheun mi gharachi payri utarli direct station gathal ani ata mi mazya navryachya manobalamule pudhe chalat ahe busss . made for each other for ever…………………

 63. Sumit says:

  Mi eka mulivar khup prem karto. aani ti suddha karte. pan tichya gharatlyani mala nako mhanun sangitl. tar mag amhi ekmekanpasun lamb vhaych ka?

 64. भास्कर… says:

  जिवन एकाकी (वैयक्तीक द्रूष्टीने), अधूरं (कौटूंबीक द्रूष्टीने), अपूर्ण (सामाजीक द्रूष्टीने) राहू नये म्हणून.

 65. SUNIL says:

  सुनील; मला सांगायचे आहे कि, तुमच्या लेखा मध्ये आशा काही गोष्टी आहे कि त्यामुळे लग्न म्हणजे काय ? आणि त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला गेला धन्यवाद………………………….

 66. sagar says:

  chan lihalay!!!!!!

 67. सारंग पुराणिक says:

  लग्न…….. हा विषय न संपण्या सारखा आहे……आणि हा प्रश्न सुटेल असा वाटत नाही…. आज आपण लग्न का करावे….???? या प्रश्नाचे उत्तर शोधतो आहे…. लग्न म्हणजे दोन घरांचे मिलन……दोन मनाचे….lagna म्हणजे स्वप्न….. आपले लग्न झाल्यावर दोन कुटुंब एक होतात…. नाते बदलतात दीर, भावजई सासू, सासरे या सारखे अनेक नाते तयार होतात…..आणि सर्वात सुंदर नातं तयार होतं ते आई – वडिलांचं……
  आजी- आजोबांना मिळणारा नातवाचं किवा नातीचं प्रेम……
  आई वडील होण्याचं व आई वडिलांना आजी आजोबा होण्याचं….तसेच इतर नाते संबंध तयार होण्यासाठी लग्न करावा असा माझा मत आहे……..

  लग्न म्हणजे काय…..????? हे समजावणारी एक कविता पोस्ट करत आहे परंतु सदर कविता हि माझी नसून प्रसाद शिर्सेकर यांची आहे…।

  ब्लॉग वाचला…. खूप सुंदर……..

  लग्न म्हणजे काय??
  लग्न लग्न म्हणजे काय असतं??
  त्याच्या मनातल्या विचारांचं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं
  तिच्या प्रश्‍नाआधी त्याचं उत्तर तयार असतं.
  लग्न लग्न म्हणजे काय असतं??
  त्याला लागताच ठसका तिच्या डोळ्यांत पाणी तरळतं
  तिला लागताच ठेच त्याचं मन कळवळतं.
  … लग्न लग्न म्हणजे काय असतं??
  तिने चहा केला तर त्याला सरबत हवं असतं
  त्याने गजरा आणला की नेमकं तिला फूल हवं असतं.
  लग्न लग्न म्हणजे काय असतं??
  त्याच्या बेफिकिरीला तिच्या जाणिवांचं कोंदण असतं
  तिच्या खर्चाला त्याच्या खिशाचं आंदण असतं.
  लग्न लग्न म्हणजे काय असतं??
  त्याच्या चुकांना तिच्या पदराचं पांघरुण असतं
  तिच्या दुःखाला त्याच्या खांद्याचं अंथरुण असतं.
  लग्न लग्न म्हणजे काय असतं??
  कधी समझोता तर कधी भांडण असतं
  तो चिडला तरी तिनं शांत राहायचं असतं
  कपातल्या वादळाला चहाबरोबर संपवायचं असतं.
  लग्न लग्न म्हणजे काय असतं??
  कधी दोन मनांचं मीलन असतं
  तर कधी दोन जिवांचं भांडण असतं
  एकानं विस्कटलं तरी दुसऱ्यानं आवरायचं असतं
  संकटाच्या वादळाला दारातच थोपवायचं असतं.
  लग्न लग्न म्हणजे काय असतं??
  प्रेमाचं ते बंधन असतं
  घराचं ते घरपण असतं
  विधात्यानं साकारलेलं ते एक सुंदर स्वप्न असतं!

  • सारंग
   मनःपूर्वक आभार. मध्यंतरी ब्लऑग कडे अजिबात लक्ष नवह्ते म्हणून उत्तर देण्यास उशीर होत्य. क्षमस्व

 68. सारंग पुराणिक says:

  लग्न…….. हा विषय न संपण्या सारखा आहे……आणि हा प्रश्न सुटेल असा वाटत नाही…. आज आपण लग्न का करावे….???? या प्रश्नाचे उत्तर शोधतो आहे…. लग्न म्हणजे दोन घरांचे मिलन……दोन मनाचे….lagna म्हणजे स्वप्न….. आपले लग्न झाल्यावर दोन कुटुंब एक होतात…. नाते बदलतात दीर, भावजई सासू, सासरे या सारखे अनेक नाते तयार होतात…..आणि सर्वात सुंदर नातं तयार होतं ते आई – वडिलांचं……
  आजी- आजोबांना मिळणारा नातवाचं किवा नातीचं प्रेम……
  आई वडील होण्याचं व आई वडिलांना आजी आजोबा होण्याचं….तसेच इतर नाते संबंध तयार होण्यासाठी लग्न करावा असा माझा मत आहे……..

  लग्न म्हणजे काय…..????? हे समजावणारी एक कविता पोस्ट करत आहे परंतु सदर कविता हि माझी नसून प्रसाद शिर्सेकर यांची आहे…।

  ब्लॉग वाचला…. खूप सुंदर……..

  लग्न म्हणजे काय??
  लग्न लग्न म्हणजे काय असतं??
  त्याच्या मनातल्या विचारांचं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं
  तिच्या प्रश्‍नाआधी त्याचं उत्तर तयार असतं.
  लग्न लग्न म्हणजे काय असतं??
  त्याला लागताच ठसका तिच्या डोळ्यांत पाणी तरळतं
  तिला लागताच ठेच त्याचं मन कळवळतं.
  … लग्न लग्न म्हणजे काय असतं??
  तिने चहा केला तर त्याला सरबत हवं असतं
  त्याने गजरा आणला की नेमकं तिला फूल हवं असतं.
  लग्न लग्न म्हणजे काय असतं??
  त्याच्या बेफिकिरीला तिच्या जाणिवांचं कोंदण असतं
  तिच्या खर्चाला त्याच्या खिशाचं आंदण असतं.
  लग्न लग्न म्हणजे काय असतं??
  त्याच्या चुकांना तिच्या पदराचं पांघरुण असतं
  तिच्या दुःखाला त्याच्या खांद्याचं अंथरुण असतं.
  लग्न लग्न म्हणजे काय असतं??
  कधी समझोता तर कधी भांडण असतं
  तो चिडला तरी तिनं शांत राहायचं असतं
  कपातल्या वादळाला चहाबरोबर संपवायचं असतं.
  लग्न लग्न म्हणजे काय असतं??
  कधी दोन मनांचं मीलन असतं
  तर कधी दोन जिवांचं भांडण असतं
  एकानं विस्कटलं तरी दुसऱ्यानं आवरायचं असतं
  संकटाच्या वादळाला दारातच थोपवायचं असतं.
  लग्न लग्न म्हणजे काय असतं??
  प्रेमाचं ते बंधन असतं
  घराचं ते घरपण असतं
  विधात्यानं साकारलेलं ते एक सुंदर स्वप्न असतं!

 69. Gopal Pawar says:

  आयुष्याच्या शेवटी एखादा तरी जोडिदार असावा. कारण आई-वडील किती दिवस पुरणार आहेत तुमच्या आयुष्यात, ते गेल्यावर मग त्या व्यक्तीच काय? कोण आहे त्याच्या जवळच नातेवाईक, मित्र-मैत्रीण, खास व्यक्ती असतील पण किती काळ.

 70. sunil says:

  kaka mala aase sangayache aahe ki, manus janmala aalya pasun kahitari tyala step by step chalave lagate tyamule tyana lagnachi step pan karavi lagte … tyamule kadachit lok lagne kartat

 71. sir lekh khupch chhan ahe ,,,but mala tumhi ajun eka vishayavar lekh lihayla avdel,,,,lagn kanda phohe karun karaychi ji juni padhhat ahe ti kitpat yogya ahe.kai kalnar ahe 1/2 tasanchya bhetit,,,,,,,,aajkal khup varshapasun olakh asleli manase kashi astat te kalat nahi,,n ya bhetit apan aple ayushya dusryanna kase sopvave,,,,please ya var pan liha na thode,,,,,amchya sarkhya lagnalu mulansathi margadarshan tharel

  • मला वाटतं दोन्ही पद्धती योग्य आहेत. काही लोकं कधीच आपले विचार व्यक्त करत नाहीत. अशांसाठी केवळ अरेज्ड मॅरेज हाच पर्याय आहे… नाही का/

 72. surkha says:

  Aai vadilanch prem sasu sasryankadun milav mahun

 73. Rohit Khankal says:

  आयुष्यभराची सोबती मिळावी म्हणून…….

 74. kishor hakke says:

  Eakdam chhan prashn

 75. swapnil says:

  bsss khup zale aata…..ekte rahne kantala watat aahe…..kahi personal gosti share karayla have naa…….ghari kahi gosti sangu shakt nahi….jrrr sagitale tr ghari tesn yete……so aaple konitri have mhanun mi lagna karayche vichar kartoy….

 76. pranit says:

  lokanla moksha mhanje Kay he mahit naslyamule.

 77. Nikhil Jagta says:

  mala pan asa vichar karav lagel chagl ahe

 78. खर तर खुप गहन प्रश्न वाटतो हां ” लोक खरच लग्न का करतात.”एक असा खेळ ज्यात जिंकणार की हरनार याची कायम भीती आणि बांधल जाणार स्वातंत्र मग का कराव. एक नाहीत हजारो प्रश्न आहेत.ज्याला उत्तरच नाहि.एक अनउत्तरित असा प्रश्न ????????????????????? का ही जबरदस्ती ??????????

 79. Dipesh chavan says:

  Sir Khup mast lihala ahe blog manat khup kahisangun prashn nirman krun gela lagn karn jaruri ahe pan ayushy lagn n krta pan jagu sakta as pan ahe. majhya sathi tri aarange marrage aso valove marrage pratyekane lagn krun pahavjehvadon jiv ek hitat na tyacha anand khu vegala asto. .

 80. Pradnya Salunkhe says:

  आयुष्याची मजा एकट्याने जगण्यात नाही..सोबत हक्काच माणूस हवं ना..ज्याच्यासोबत प्रत्येक गोष्ट share करता येईल..त्याच्या सोबत संपूर्ण आयुष्य घालवता येईल..त्याच्या फक्त सोबत असण्यात जे सुख असेल ना ते इतर कशातही नसेल…म्हणून मी लग्न करेन….

 81. jotiba patil says:

  फार सूंदर..लिहीले. आहे.

 82. somnath says:

  Mala ek mugali havi aahe mhanun lagn karu vatat…otherwise mi adopt pn karu shakto but tichya lagnanantar sobat konitari havi na…

 83. Dhanyata says:

  Awesome…Thanks,,.
  Mummy pappa nantar konachi tri sath milavi, koni tri aasav jyala aapn aaple sukh dukh sangu shakto..jo aapli care gheil, prem karel..
  Lagn mhanje…understanding, care, love…
  Mala asa vatat…

 84. पहील्या काळापासुन ते आतापर्यंत लग्न करतात कारण यामध्ये कोणाचाही विशेष संबंध जोडीला जात नाही ..

 85. archana dhande says:

  dusar lagan ka karav pahile zala aani tay madhe vishvas tutala tar dusar karve ki nahi tumhala kay vate

  • Manish Pune says:

   Lagn kaa karawe haa prashn swathala weecharun bagha … Jar uttar milale yogya tar ani jar sathidar changla asla tar.
   Karayche mhanun karnaare khup aahet yaa jagat.
   Maza mate ek sathidar asawa jo aaplya barobarine chalel.
   Pan ekda anubhav ghetlay tyatun barech shikanyasarkhe aste … Sharir sukha peksha mansik shanti mahatwachi … Jagayala khup paisa laagat naahi … Puresa paisa laagto jar apan aplya garja maryadit thewalya tar.
   Baaki nashib …

 86. sonal says:

  Mjhya lagnala 7 month jhale ani mala lagn jhalya pasun hach prashn padala aahe Ki me lagn ka kel? Kiwa mg me mjhya nawaryla vicharte tu lagn ka kel? Tyach and as asat aai papa bolale mhnun.. Sarw karatat mg me on kel…

 87. aniket deshpande says:

  waw ! very nice

 88. Vilas Mistry says:

  Lagna ha vishay far najuk pan ahe anni samajnya sarkha pan aahe, khar tar lagna hai appan addharasathi karto (Applya swathachya) Aai, baba, bhau bhain hai sarva jan astat, pan aaushya bhar nahi (Arthat Utar vayat nahi) tya vayat aaplyala aapla manus hava aasto aani to mahanje aapla jodidar. tarun panachya sarva gamti jamti aapan sobat jagto aani shevti jodidara barobar aathavnit urlele (Shevatche) aaushya ghalvato, te uttar jeevan sukh karak honya sathi aapan lagna karto, baki sarva naysrgeek goshti apo aap ch ghadtat.

 89. vaishali says:

  apalyala konachya tari sobatichi savay zaleli asate .lahanpani aai vadil,nantar mitra maitrin mag jodidar ka nako manun karat asave lagna

 90. बाबासाहेब says:

  लग्न करने म्हणजे आपल्या आई वडीलाचा वारसा चालवणे

 91. Sachin says:

  एखादी व्यक्ती तुम्हाला अगदी मनापासून आवडत असते. एक मैत्रीण म्हणून ती ्दुसरया कोणाशी तरी लग्न करून ,आपल्या पासून दूर जाणार ही कल्पनाच सहन होत नाही, आणि मग नेहेमी साठी तिच्या बरोबर रहायला हवं ना? म्हणून मग लग्न केले जाते.. !
  As tumi matlat yach karnavarun maj lagn zal
  Pan lagna puravi je prem karaycho te aappo aspch kami zal..
  As vstayla lagl apli avd kahi veglich hoti

 92. विनायक हरळीकर says:

  तुमचा लेक खुप छान आहे
  लग्न का करायच? हा मोठा प्रश्न आहे.मला वाट याच उत्तर पाहीजे असेल तर आपला जन्म का झाला? याच उत्तरात आपल उत्तर असेल,
  अस म्हणतात कि आपला जन्म चार जागा चालवण्यासाठी झाला
  1 मुलगा-आई बाबाचा
  2 भाऊ-भाऊ बहीणीचा
  3 नवरा-पत्नीचा
  4 वडील- मुलांनाचा

 93. rajesh sabale says:

  ya jagat pahile lagan konat zale kahi mahiti ahe ka? aslyas

 94. kk says:

  आयुष्यात प्रगती करण्यासाठी, त्या प्रगतीचे कौतुक ऐकण्यासाठी आणि आयुष्यभर सोबत हवी असते म्हणून लग्न करावेसे वाटते

 95. विशाल रमेश वालझाडे says:

  लग्न करा पण समाजासाठी नाही लोकांसाठी नाही तर आपल्यासाठी करा आणि विचार बदला की आपण लग्न केले लोकांना चांगले घडवण्यासाठी सामाजीक मुल जपण्यासाठी जे लोक फक्त मुल काढुन त्याना वारर्या वर नाय सोडत पण त्या मुलांना पुढे त्रास होईल असे नका करु छोटी फाँमिली ठेवा एकच असूद्या मुलगा किंवा मुलगी बस लग्न करुन मुलांना त्रास होईल असे नको लग्न करा पण एवढे लकश्यात ठेवा ✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌

 96. Shubhangi says:

  Konitari ek compulsory ani officially in short hakkach manus milto, to pn lifetime sathi, Jo fakt apla asto mhanun kadachit lok lagn kartat. Jo maza ahe he samajat respectfully sangta yet to apla Manu’s milto n. Baki saglich naati look accept krtat as nai n

 97. manus kay zal sri kay zali he samazshil prani ahet ani tyana ayushyat samajat jagnyasati konachi na konachi tar garaj hi lagate ch karan lagn ka karav ha jari kuntabat ekala prshn padala tari bahin kay zal bhau kay zal lagn karun pudhe jatat aai ani vadil kahi ayushyala purale nahi….apan basto vichar karat vay varsh jat sarun ani rahto ekatech…. ayushyat jashi mitr maitrichi garaj aste pn kahi kalananter te hi tyanchi life jagayala survat karatat….. apn rahto vichar karat lagn ka karayach mahnun… vay varsh jat sarun… prashnacha uttar kay milat nahi… me tr mahnte lagn ka karav yapeksha lagn he kelch pahije yavar bhar dila pahije…. man ani mat n patlelya couple cha bhag soda….
  lagn pahave karun….. tyashivay tr te kalnar nahi… anubav dusryakadun eknyapeksha swata ghetalela kadhi hi uttam shevati janmala alela ekata manus ha martana hi ektach janar..
  mahnun mahnte ghya jagun aplya hakkachya mansasobat. mahnun lagn kara.

 98. sudhir....... says:

  jevapasoon manav jaat janmala…ali..tevapasoonach….lagnala..suruvat…kadachi…jhali..asavi…karan manav ha ekmev buddivan ahe…..tasa ekhada…prani nahi……

 99. शरद पवार परळी वैजनाथ says:

  लग्न प्रतेकाला कराव वाटत,पण मुलगी किंवा मुुलगा आईवडिलांना म्हणत नाही ,,माझ. लग्न करा .
  कारण तशी वेळ आल्याननंतर प्रतेकाचे आईवडिल लग्न मुला मुलिचे लाउन देतात.
  लग्न झाल्याने प्रतेक माणुस सुखी होतो असे नाही.
  पण निश्चित सांगतो जनावरा सारखा रोज आपल्या घरी वेळेवर जात असतो..
  जनार सुद्धा संध्याकाळच्या वेेळी आपोआप ज्याठिकाणी बांधतात तेथे येउन बसतात.
  माणसात व जणावरात हाच तो फरक आहे.

 100. ravindra harishchandra Shirwadkar says:

  Lagna karaych mhanun karayach bad barobar aahe tumache

 101. मनीष says:

  एक numbr 😊😊😊😊😊👌👌👌👌👌👌👍👍

 102. rajani says:

  लग्न करायचं म्हणून करतात . बहुतेकदा आईवडील मुलगा काही काम करत नसेल तरीपण त्याचे लग्न करून देतात कारण समाजातील लोक आपली निंदा करणार या भावनेने पण लोकांचा हा कुटला समज कळत नाही .

 103. rajani says:

  मला हा लेख खूप आवडला . लग्न करायचे म्हणून करतात . बहुतेकदा आई वडील त्यांचा मुलगा काही काम करत नसेल तरीपण त्याच लग्न करून देतात कारण समाजातील लोक निंदा करतील म्हणून . हा कुटला समज काळात नाही मला .

 104. govinda khedkar says:

  ek hakkachi vakti havi aste.
  ki tichya sobat sukh dukh share karu shkto. ki tichyavr ziva pad prem kara vat te. aayushya shya vatevar sobat chalayla
  asha khup sarya goshti aahet…pan tyasathi. shabdd nahi……..

 105. सुशिल घोरपडे says:

  खुप सुरेख….

 106. राहुल जाधव. says:

  लग्न का करतात लोकं?? यावर एकच उत्तर आहे, ते म्हणजे बस्स्स!! करायचं म्हणून …… नाही तर सुखासाठी करताता.

  मग ते सुख प्रत्येकाचे वेगवेगळे आसते,,….

  माझ्या मते ७०% लोक फक्त सेक्ससाठी करतात. पण तुम्ही यथे विजय मल्लाचे उदा: दिला आहे. पण प्रत्येकाची तसी आयपत नसते, त्या मुळे तो लग्नाचा विचार करतो. कारण तोच एक सोपा मार्ग त्याच्यासाठी आसतो.आणी लग्न न करता सेक्स करणे म्हणजे पाप पण आसते आसही मानले जाते.

  तर कोणी आई बाबांच्या सुखा साठी, म्हणजे इथे त्याच्या मनावर तस आई बाबाने बिबवलेल आसते की तुझ लग्न झाल तर आम्हाला सुख मिळेल म्हणून तो त्याच्या सुखासाठी……

  तर कुणी समाजात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी, म्हणजे तो नामर्द आसतो. पण तरी ही लग्न करतो. आपला नामर्दपणा लपवण्यासाठी. आता आपल्याकडे कोन बोट दाखवू शकत नाही, ही भावना त्याच्या मनाला एक प्रकारची सुखच देत आसते.
  ( हीते नानर्दपणा, एड्स, इतकेच नव्हे तर रुदय विकार छद आसणारी पण त्यांचे आई बाबा लग्न लावतात, त्यात पण त्यांना कसले सुख मिळते काय माहीत.)

  तर कोण आपल्या संपतीला वारस व आपल्याला मातारपणी आपली सेवा करण्यासाठी… मुल जन्माला घालण्यासाठी करतात….

  बाण केल म्हणून मी पण केले लग्न…
  आई बाबा कर म्हणाले म्हणून केले लग्न…
  समाज नाव ठेवतो म्हणून केले लग्न…
  सेक्स वासना भागवण्यासाठी केले लग्न….
  आपल्या मनातील सर्व भावना व्यक्त करण्यासाठी किव्हा सुख दुखात सात देण्यासाठी आसी एक मित्रीन आयुष भरासाठी हावी म्हणून केले लग्न….
  जग करत म्हणून मी पण केले लग्न…
  घर कामासाठी फ्रि मोलकरीन पाहीजे होती म्हणून केले लग्न……
  माणूस म्हणून जन्माला आलो हे सिध्द करण्यासाठी केले लग्न….
  मुल जन्माला घालण्यासाठी केले लग्न….
  स्त्रि म्हणजे काय आसते हे जाणून घेण्यासाठी केले लग्न…….
  वरिल सर्व गरजा भागवण्यासाठी………… गरज होती म्हणून केले लग्न…..

  पण माझ लग्न झाल नाही…. तुमच्या नजरत कोन सुंदर मुलगी आसली तर सांगा…….

 107. vikas says:

  लग्न केल्यमुळे ऐकटे वटून वाढणारा तणाव कमी होतो.
  समाजाचा बघण्याचा दृष्टीकोण बदलतो

 108. Krushna says:

  घरचयांनी माझ्यासोबत जबरदस्ती केली. पण आता सर्व काही ठिक चालू आहे.

 109. sonu says:

  good morning sir maz pan lagn zalel nahi mazya pan manat hech vichar yetat ki lagn ka karav pan hech sagto ki lagn he yek naisargik kriya ahe lagn he karavch lagat karan . apalya ai baba nantar apalela samaj nari hi apali bayko asate sukhat dukhat satat sobat asate apalyala savarte chuklo tari samajate chuk durast karate .mala pan vatate ki kuni tari asav aplyala samajanar ..lagna nantar kharach sarvaa kahi badalt apan pan badalto ti pan badalte tiich tar dusar janma zalell asate . sevati hechh sagto ki samjutine kadhich lagn karaych nahi karan te lagn kadhich tikat na hi lgn tyachasich karav jechavar apn manapasun prem karato
  tyachasich lagn karav maz pan manat ak mulagi ahe ti pan mazya akadam jaadchy mitra chi bahin ahe tine tar dusarya kadun sagal ki tu mala avadato pan mala bhiti vatate ki kadachi premach izhar kela tar mazya maitrit darar padel kay karav tech kadat nahi kahi sajesan dya . khar tara lok lgn karatat te haya karita ki ai baba chi seva karanar koni asav akte pana dur karanya karita apal ak navin ayusya tayar vhav

 110. Shreya shridhar thakur says:

  Affair kiti divs thewnar ani tyat to sodun gela tr ani lgn krun bndhan pdtil philyasark rata yenar nahi carrier cha nirnay ata maza asto nntr Kay mahit ashya donhi baju aahet vatty khup lvkr hoty pn vhyalahi pahijech

 111. Rekha badhe says:

  Awgad ahe lagn mhanje .zal nahi pn bhitiwatay

 112. Mrudula says:

  Oh my god…!! Majhe tar jhale ahe 20years chi astanach… and guy’s pls wicharuch naka.. Lagna ka kartat..¿¿¿¿¿¿¿

 113. Mahendra shimpi says:

  Maza nashib tichya yenyane badlat asel tar mi pan lagnala taiyar ahey

 114. MORE AJAY BALASO says:

  LOK PREMAT KA HASTAT- HE MALA AJUN TARI UTTAR N SAPADLELA UPSC LEVELCHA ANI JATIL ASA PRASHNA AHE. JAR KONI TATVADNYA ASEL TAR UTTAR PATHAVA. AAPALA PREMAT PADLYAPASUN VINAKARAN VEDYASARKHA HASNARA MITRA..

 115. nandini says:

  mazh lagna zhal nahi pn me relation madhe aahe pn mazha jodidar evdha samjutdar aahe ki to mala pudhe janyachi disha deto mazya navryapeksha te mazhe mitra aahet n lagna manje doan man ekatra yena samjun ghena n aaplya jodidarabarobar purn aayush kadhav asa saglyana vatte n jodidar aaplyala samjun ghenara asel tar mansane kharach lagnacya bandhanat adkayla kahich harkat nahi karan aaplya jodidarala kay have aahe he samjun jar prem kela tar te unsusessfull kadhich hou shakat nahi n konte bhandan tante pn honar nahi manun mala lagna karaych aahe

 116. lagan k karave? aho ek koni spl vyakati aahe jila mi mazyapasun dur nahi karushkat aani mhanun m lagn karun life cha pratek kshan tyachyasobat ghalvaycha agadi sukhat aak aandat nhanun m lagan ha uapay ki lagan kel ki spl vyati aapli jhali tumcha lagan jhale jahlel asel tar nakkich sanga ka kelat te aani nahi jhal asel tar nakkich sanga ka nahi karnar te sorry tumcha prashan tumhalach but mla hi aikaycha ans

 117. baban shinde says:

  बरोबर आहे तुमचे

 118. सुनिल says:

  लग्न ही आयुष्य गुंतवून ठेवन्यासाठी उत्तम जगण्याचा प्रकार आहे

 119. shital patil says:

  so good…and khup khup aabhari aahe

 120. या प्रश्नाचे उत्तर नाही पण त्यामागचा इतिहास सांगणारा हा लेख वाचणे सर्व लाग्नालुंसाठी मुस्तच
  ही लिंक पहा: http://www.atulkulkarni.com/images/vivahchya-utkrantiche-vartaman.pdf

 121. Bhangare kalu says:

  Lagnna ka karatat yache uttar mI shodnyacha prayantna kela karane khup milalI vatate ek pustak lihave pan aajun tyawar vichar challu aahe

 122. अजिंक्य गुमते says:

  तरीसुद्धा हा प्रश्न पुन्हा तयार होतो . अजून थांबू फार घाई होत नाही ना? कि अजून काही स्थळ पाहू? माझा इतका पगार कोण तयार होईल लग्नाला छे छे नको नंतर बघू ! बरं सगळं ठिक आहे किती पगार असला म्हणजे मला होकार मिळेल ? पर्वाच एका मित्राने लव्ह मॕरेज झालं आजच कळालं ब्रेकअप झालं डायव्हर्स झालं , सहा महिने झाले एका मित्राच काही तरी भांडणं झालं बायकोशी आणि तिनं आत्महत्या केली . आमच्या बाजूच पोरगं मुलगी नको म्हणाली म्हणून विहिरीत उडी मारुन जीवन संपवले. चूलत भावाच लग्न झालं एक महिन्या नंतर मुलगी दूसर्या मुला बरोब पळुन गेली .
  तरी सुद्धा आपण लग्न करायचं ? माझ्या बरोबर पण असे काही घडले तर? खरोखरच हा नक्कीच चर्चेचा विषय बनला आहे . लग्न का करावं लागतं? कोणासाठी लग्न करायचं ? घरचे म्हणतात म्हणून कि संस्कृती म्हणून ? रिस्क घ्यावी की नको?

 123. Khare ahe. Lagn karnyachi aavashyaktach nahi.

 124. umesh says:

  Jawalpaas sglya comments vaachlyavr asa lakshat ala ki.. Jyani ha lekh hilila tyani lagna ka kela ha prashna kunalahi ka nhi padla?!!

 125. Amol Sakhare says:

  माझ पण लग्न आहे ३० मे मिसंगतो लग्न करून उत्तर !!!!!!!!!!!!!!!!

 126. कुलकर्णी साहेब मला तुमचा मो .नं .पाहिजे होता

 127. Deepak says:

  खूप सुंदर लेख आहे माझी मनात असेच वादळ निर्माण झाले आहे जे शांत होण्याचे नाव नाही घेईना निदान तुजा लेखामुळे थोडासा मोकळे प वाट मिळाली

Leave a Reply to archana dhande Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s