भुत..

१ जानेवारी २०१२.. नवीन वर्ष सुरु झालं होतं. वेळ रात्रीची दिड वाजताची. राजाभाऊ आपल्या मित्रांबरोबर ( बायकोच्या शब्दात सांगायचं, तर टॊळभैरवांबरोबर )पार्टी आटपून घरी निघाले होते.त्या भल्यामोठ्या पिंपळाच्या झाडाखालून जातांना एकाएकी एक भूत समोर येऊन उभं राहिलं. राजा भाऊंकडे बघून त्याने भितीदायक चेहेरा केला, पण राजा भाऊंनी मात्र पुर्ण दुर्लक्ष केलं.

भूत आता मात्र चिडलं होतं,त्याने अजून अक्राळविक्राळ चेहेरा केला, बोटाची नखं पाजळली, आणि राजा भाउंचा गळा पकडायला धावला,पण राजा भाऊंच्या वर मात्र काही परिणाम झाला नाही, त्यांनी शांतपणे त्याचे हात झटकले आणि चालायला लागले . आपल्या कुठल्याही पद्धतीचा काही परिणाम होत नाही, हे पाहिल्यावर शेवटी अगदी अजिजीच्या स्वरात त्या भुताने राजा भाऊंना म्हंटले, की “अहो मला घाबरा हो तुम्ही. हल्ली मला कोणीच घाबरत नाही, अगदी शाळेत जाणार . आणि जो पर्यंत माझा एक लाख लोकांना घाबरवण्याचा कॊटा मी पूर्ण करत नाही, तो पर्यंत मला मुक्ती मिळणार नाही- आणि ढसा ढसा रडणे सुरु केले त्या भुताने”

या भारत देशा मधे ज्या कोणाला पहातो तो आधीपासूनच त्रस्त असतो. आता तर असं झालंय की सामान्य माणूस मला घाबरत नाही, पण त्या माणसाचा समस्यांनी ग्रासलेला चेहेरा बघितला की मलाच घाबरायला होतं. राजाभाऊ अरे खोटं खोटंच घाबर मला .. माझं काम आहे ते लोकांना घाबरवण्याचं..

राजाभाऊ म्हणाले, ” . पण त्यावर म्हणतो “अरे तुला कशाला घाबरायचं? तु करणार तरी काय? तुझ्या पेक्षा तो भ्रष्टाचार जास्त भितीदायक आहे.तू जे विनाकारण काही उद्दीष्ट समोर नसतांना अत्याचार करतोस ते म्हणजे तुझ्या वेळाची आणि शक्तीची पूर्ण बरबादी आहे. तू जे विचित्र भितीदायक चेहेरे करतोस, त्या पेक्षा जास्त भितीदायक चेहेरा आहे तो आतंकवादाचा- आणि तो तर आम्ही नेहेमीच पहातो, तूच सांगा त्या आतंकवादाला पाहिल्यावर तुझी कशी काय भीती वाटेल मला? अरे असे अनेक आहेत, की ज्यांची भिती वाटावी.. पण त्यात तू नाहीस.

मेलेल्या मढ्याच्या टाळू वरचे लोणी खाणारे सरकारी डॉक्टर्स आहेत आमच्याकडे.लाखो रुपयांची फी घेऊन पेशंट मेल्यावर केवळ काही पैसे देणे शिल्लक आहे म्हणून डेडबॉडी ताब्यात न देणारे सो कॉल्ड उच्चभ्रू डॉक्टर्स – त्यांच्या निर्लज्जपणाची बरोबरी तू कशी काय करू शकणार आहेस?

तुझं चारित्र्य कितीही वाईट असलं तरी आमच्या पोलिसाशी  तू कधीच बरोबरी करू शकणार नाहीस. तुझी बहीण डायन, चुडेल कधी काळी थोडा फार त्रास देऊ शकेल, पण बेकारी, गरीबी, महागाई यांच्यापुढे ती आपलं ग्लॅमर कसं काय टिकवेल?त्यांचं अस्तित्व केवळ बायकांना एकमेकींना भांडतांना च्या शिव्यांसाठीच राहिलेले आहे. वाईट परिस्थिती मधे रहाणारे झोपडपट्टीत दररोज जिवंतपणी मरण यातना भोगणारे लोकं तर न मरता पण मरत असतात.तुझी भीती कशी काय वाटेल आम्हाला?

आमचे नेते आमचेच पैसे खाऊन आमच्यावरच कुरघोडी करतात, त्यांची बरोबरी तू करू शकतोस? अरे उगाच कशाला तोंडाची वाफ दवडतोस? जा आपला पिंपळावर जाऊन लटक.. तुझी लायकी तेवढीच..अरे आम्ही आमचे करोडॊ रुपये खाऊन अगदी ढेकर ही न देणारे आमचे राजकीय नेते पाहिलेले आहेत. त्यांच्यापुढे तुझी काय औकात आहे? ते तर काहीही करू शकतात.

शेतकी मंत्री शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कांद्याचे भाव कमी करायचे म्हणून पाकिस्तानातून कांदा इम्पोर्ट करुन -इथल्या शेतकऱ्यांचा माल २५ पैसे किलो ने विकत घेउन सडवू शकतात.

दररोज विदर्भात शेतकरी आत्महत्या करत असतांना चौथ्या पानावर पण बातमी न देणारे आपले पत्रकार बंधू?- पैशाकरता स्वत्व विकलेले संपादक, तसेच आपल्याला हवे त्या ठिकाणी कॉलेजेस सुरु करून आपल्या पुढ्ल्या पिढ्यांच्या पोटापाण्याची सोय करून ठेवणारे शिक्षण मंत्री- . अरे भुता, मुलगा/मुलगी १२वी मधे गेली की भिती वाटते रे. मेडिकल शिक्षणाची पाच लाख रुपये वर्षाची फी , इंजिनिअरिंगची एक लाख .कशी भरायची याची .

भारतातल्या कुठल्याही गल्लीबोळात गेलास तरी तुला हे असंच चित्र आहे. सगळीकडे असेच त्रासिक लोकं आहेत. तुझ्या पेक्षा जास्त भितीदायक परिस्थितीला तोंड देत उभे आहेत- परिस्थितीने गांजलेले. तुला कोणी घाबरणार नाही भारता मधे.

भूताचं लक्ष एका खिडकी मधून दिसणाऱ्या टिव्ही कडे गेलं. एक पांढऱ्या शुभ्र कपड्यातला एक सुंदर दिसणारा युवक एका गरीब माणसाच्या घरी पिठलं भाकरी खात होता. तो सामान्य एकेकाळचा अस्पृष्य म्हणून गणल्या जाणारा माणूस प्रसन्न चेहेऱ्याने टिव्ही कडे पहात होता. दुसऱ्या एका सिन मधे तोच सुंदर युवक पाठीवर प्लास्टीकच्ं घमेलं घेऊन मजुरांबरोबरच काम करतांना दिसत होता. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पण अजिबात मावळलेलं दिसत नव्हतं. इतकं काम करूनही अजिबात थकवा, चिडचिड, राग काही दिसत नव्हतं. भुताने विचारले, राजाभाऊ, अहो तो बघ एक आनंदी माणूस दिसतोय टिव्हीवर- तो तरी घाबरेल का मला???

राजाभाऊ म्हणालो, कुठे आहे.. त्यांना दिसला तो गोजिरवाणा गोंडस चेहेरा , तेवढ्यात एक ब्रेकिंग न्युज ची पट्टी दिसू लागली, आणि ’कॊणाच्या’ तरी थोबाडीत ’कोणी तरी’ मारतांना दिसले. राजा भाऊंनी टिव्ही कडे पाहिले, आणि एकदम घाबरून पळत सुटले…..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय.. and tagged , , , , , . Bookmark the permalink.

59 Responses to भुत..

 1. खल्लास ! कानफ़टातच मारता राव तुम्ही एकदम 🙂

 2. प्रचंड… आजवर इतक्या भुताच्या गोष्टी ऐकल्या, वाचल्या पण दयनीय आणि हतबल भुताची गोष्ट पहिल्यांदाच वाचली. एकदम हटके.
  पण काही झाले तरी शेवटी खरी भूतं-खेतं प्रकट झाली तेंव्हा मात्र जरा घाबरलो. ही कलियुगातील भूतं अदृश्य नसतात. घरी असताना टीव्हीवर आणि बाहेर पडलो की रस्त्यावरच्या होर्डिंगवर हात दाखवत, नमस्कार करीत हसतमुखाने आपल्या समोर येतात.

  • सिद्धार्थ

   धन्यवाद.. कलीयुगातील भुतं सगळ्यात बदमाश असतात. आणि ते होर्डींग वर असले की अजूनच भयानक दिसतात..

 3. ketaki says:

  Mastch. khari paristhiti jhaliy ho hi.. bichare te bhoot 🙂

 4. Rajeev says:

  गोजिरवाणा गोंडस चेहेरा ( ?? or mask ),

  • राजीव
   अरे तो खरंच गोंडस दिसतो अगदी. पण म्हणतात नां, की साप पण सुंदर दिसतो म्हणून कोणी त्याला जवळ करत नाही..

 5. भानस says:

  पर्फेक्ट ! पांढर्‍या कपड्यातला सुंदर युवक…. :D:D आणि पुढच्याची कानपटीत पण झक्कच !

 6. दादा !! एकदम शाल जोडीतली दिलीत !!! खल्लास !!!
  आपला,
  (ख़ुशी) विशुभाऊ

 7. प्रणव says:

  काका, खळळळळ ssss फ ट्या क !!! हि. हा. रा. रा. मनमोहन सिंगजी राहिले हो… का ते Silent मोड वर आहेत 😀 😀
  नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेछ्या
  प्रणव

 8. Bhakti says:

  चाबूक literally !!!!

  भक्ती

 9. जब्बरदस्त!! शेवट लई भारी

 10. MK,
  एकदम डार्क ह्युमरच्या वाटेला गेला शेठ तुम्ही… एकीकडे विषण्णता आली मात्र !!
  एकाला फटकावले म्हणून कित्येकांनी गळे काढले पण रोज मरणार्‍यांविषयी कुणालाच काही संवेदना शिल्लक नाही.
  ’यथा राजा, तथा प्रजा’… आपल्या लायकीप्रमाणे सत्ताधारी मिळालेले आहेत. बहुसंख्य जनता कॊडगी आणि निर्लज्ज झाली आहे. सगळा short term चा मामला… पुढचे कुणीच बघत नाही..
  असे अनेक अतृप्त आत्मे या देशात तयार होत राहणार !

 11. लई भारी राव..!

 12. अभिषेक says:

  काका, लेख मार्मिक आहे. सुरवात शेवट अगदीच पकडलाय, राजाभाऊ घाबरून पळाले तो क्षण अगदी कळस.
  काय जिंदगानी झाली आहे सामान्य माणसाची ….
  विशालदा शी +१

  • अभिषेक
   धन्यवाद.. सामान्य आता अतीसामान्य झालाय. पातळी हळू हळू खाली उतरत जाते आहे आपली.

 13. Ashwini says:

  Khar aahe

 14. एका तीरात दोन पक्षी मारले आहेत तुम्ही बुवा ….. अगधी योग्य वेळेला योग्य विषय घेतलात . झकास झाला आहे लेख एकदम……

  • श्रीकांत
   निवडणूका जवळ आल्या आहेत , त्याची आठवण आणि आजची परिस्थिती दोन्हींचा संगम म्हणजे आजचा हा लेख ! प्रतिक्रियेसाठी आभार.

 15. shridhar B. Kulkarni says:

  circumstances expressing document.

 16. एकदम खट्टयाक !!! शेवट तर जबरीच… जबरदस्त डार्क ह्युमर.. विक्रांत म्हणतो त्याप्रमाणे एकदम विषण्णता आली !!

  • हेरंब
   लिहून झाल्यावर आधी हे पब्लिश करु की नको असे वाटत होते. ( तसं नेहेमीच वाटतं, पण आज मात्र थोडं जास्त प्रकर्षाने वाटत होते) प्रसिध्द केल्या बरोबर विशाल ची कॉमेंट वाचल्यावर लक्षात आलं की पोस्ट इतकंही काही वाईट झालेलं नाही. डार्क ह्युमर नकळत झालंय..

 17. गौरी says:

  … बिच्चारं भूत 🙂
  हेरंब + १

 18. Sandip joshi says:

  10000000000$ ईनाम
  perfect vangyakatha

 19. महेश कुलकर्णी, says:

  मस्त,सही.चाबूक.आवडली

 20. santosh says:

  काका ,नमस्कार
  माफ करा पण ,राजकारण्यावर टीका करू नका तुम्हाला ते नीट जमत नाही

  • संतोष
   धन्यवाद.. आणि ब्लॉग वर स्वागत. लिहितांना काय लिहायचं ते ठरवलं नव्हतं , जसं काही मनात येत गेलं तसं लिहित गेलो. 🙂

 21. Girish says:

  Vaah Chaan…..

 22. Shubhangi says:

  Khoop chaan.

 23. Shubhangi says:

  Mazakade ek lekh aahe tyvar tumchi pratikriya vachayla mala avdel. tari to lekh mi tumala fwd. karu shakte ka

 24. Milind says:

  kaka – khup ‘typo’ ahet hya veLela blog madhe.

  kim karaNen???

 25. dinesh says:

  dinesh
  aapanac ya goshtina khat-pani ghaltoy youva pidhinec jar anna hajare sarkhe andolan kele tar nakkic ya deshatil bhrashtachar thodya pramanat kami honyas madat hoile

 26. Raghu says:

  Parat ekda sunder lekh Kaka.. Ekhadya politician la haa lekh wachayala dya.. 🙂

 27. piyu says:

  bhoot ahet he tumhala khar kas watu shakat……..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s