आज सकाळच्या टाइम्स मधे वाचलं की म्हणे पैशाने सुख मिळते. आता ही गोष्ट खरी असली की जर रडायचं असेल तर ते मर्सिडीज च्या स्टेअरिंग वर डॊकं ठेऊन रडावं, रस्त्यावर कुठेतरी कोपऱ्यात किंवा आपल्या घरातल्या फाटक्या उशीवर डोकं ठेऊन रडण्यात काय फायदा? तर म्हणून मला वाटतं सुखाची परिभाषा टाइम्स ने अशी केली असावी.
सुख, समाधान, आणि आनंद या तीन गोष्टीं आणि दुःख ही चौथी गोष्ट! या गोष्टींच्या आसपास आपलं आयुष्य फिरत असतं. तसं म्हंटलं तर सुख , आनंद आणि समाधान हे तिन्ही शब्द एकसारख्याच अर्थाचे वाटतात – पण तसे नाही. एखाद्या गोष्टी मध्ये सुख जरी असले तरीही त्यात समाधान असेलच असे नाही.किंवा एखादी आनंद देणारी गोष्ट सुख देईलच असे नाही. सुख आणि आनंद हा क्षणिक असतो, पण समाधान हे तसे नसते. असो विषयांतर होतंय..
एक गोष्ट बघा, समजा तुम्ही लोकलच्या प्लॅटफॉर्म वर उभे आहात, समोरून दोन गाड्य़ा अगदी इतक्या गच्च भरलेल्या होत्या की तुम्हाला आत शिरायला मिळाले नाही. मग तुमच्या मनात विचार येतो, की जर आत शिरायला मिळालं , तरीही पुरेसे आहे. तुम्हाला तिसऱ्या लोकल मधे आत शिरायला मिळतं. तुम्ही दोन सिटच्या मधे जाउन उभे रहाता. पुढला मनातला विचार जर जागा मिळाली तर? अगदी चौथी सीट जरी मिळाली तरीही हरकत नाही- तुमचं नशीब आज अगदी जोरावर असतं,समोरच्या सिटवरचा माणूस उठून जातो आणि तुम्हाला जागा मिळते आणि तुम्ही बसता, आनंद वाटतो तेवढ्यापुरता, पण शेजारचा माणूस साला किती जाड आहे, किती गर्दी होतेय नां?? असे विचार सुरु होतात. म्हणजे इथेही तुम्ही सुखी नसता फक्त तेवढ्यापुरता आनंद असतो. तुमच्या मनात विचार असतो, की जर विंडॊ सिट मिळाली तर?? काय आश्चर्य, पुढल्याच स्टॉप वर तिथला माणूस उठून उभा रहातो, आणि ती सिट तुम्हाला मिळते. मस्त पैकी हवा खात आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांकडे पहात, तुम्ही प्रवास करत असता, आणि तुमचं लक्ष शेजारच्या रस्त्यावरून जाणाऱ्या कार कडे जाते तुमच्या मनात विचार येतो, ” सालं, काय हे आयुष्य,रोज धक्के खात प्रवास करायचा- त्या पेक्षा एखादी मस्त पैकी एसी कार असती तर?” थोडक्यात या मटेरिअलिस्टीक गोष्टी तुम्हाला क्षणभर आनंद अवश्य देतील पण सुख आणि समाधान??
आयुष्यभर आपण एखाद्या सुखासाठी धडपडत असतो, पण ते मिळाल्यावर, अरे यात तर काही विशेष सुख नाही, कशाला आपण या गोष्टीसाठी इतका अट्टाहास केला होता? हा असा अनुभव आपल्याला बरेचदा आला असेल. शिक्षण, पैसा,सुंदर बायको/मैत्रीण, शरीरयष्टी सलमान खान सारखी या पैकी कशामधे सुख आहे असे तुम्हाला वाटते? विचार करा- वरची कुठलीही एक गोष्ट तुम्हाला सुखी ठेऊ शकेल ?. मानवी स्वभावानुसार या सगळ्या गोष्टी एकत्र मिळाल्या तरच तुम्ही आनंदात राहू शकाल.. सुखी म्हणत नाही मी ,किंवा समाधानी पण नाही..सुख म्हणजे नेमकं काय?पैसा??
पैसा म्हणजे सुख देईलच असे वाटत नाही. तसं म्हंटलं तर आज इतक्या मोठ्या इस्टेटीचा मालक असलेला टाटा खरंच सुखी म्हणता येईल? त्याला पण अपत्य नाही याचं दुःख असेलच- या वयात एकटेपणाचा अभिशाप भोगण्यात कितीही पैसा असेल तरीही काय सुख?. प्रिंयंवदा बिर्ला यांचं मृत्युपत्र आणि त्यावर झालेला घाणेरडा आरोप प्रत्यारोपाचा खेळ पाहिल्यावर पैशात सुख आहे हे काही पटत नाही.
ज्याला सगळं काही अगदी घरबसल्या आयतं मिळतं तो किती सुखी आहे असं नेहेमीच वाटत असतं आपल्याला नाही का? जन्मल्यापासून तोंडात सोन्याचा चमचा असलेला संजय दत्त पण नंतर वैफल्याने ग्रासल्या जाऊन ड्रग्ज च्या आहारी जातो आणि नंतर टेररिस्ट अॅक्टीव्हीट्ज मधे ओढला जातो – हे असे का व्हावे? त्याला काय कमी होतं? सगळी मटेरिअलिस्टीक सुखं हात जोडून समोर उभी होती , पैसा, अडका, बापाचं नांव तरीही तो अशा भानगडीत पडलाच. पैसा, वडिलोपार्जित असला तरी तो तुम्हाला सुख देऊ शकत नाही – कारण तो पैसा मिळवण्यासाठी तुम्ही हातभार लावलेला नसतो/ प्रयत्न केला नसतो.
एक प्रसिद्ध म्हण आहे, पैशाने गादी विकत घेता येईल, पण झोप नाही.पैसा मिळवण्यासाठी काही कष्ट करावे लागले नाही, तर पैसा कमावण्यातले सुख कसे काय अनुभवास येईल? जो पैसा मिळालेला असतो, त्यावर कुठलेही नियंत्रण नसते, त्या साठी काहीच कष्ट केलेले नसते, त्यामुळेच असेल की त्यात काही फारसं सुख वाटत नाही. स्वतःच्या पैशाने विकत घेतलेली सेकंडहॅंड स्कुटर चालवतांना वडलांच्या पैशातून घेतलेल्या नवीन कार पेक्षा नक्कीच जास्त आनंद होइल.
सुख ही एक मानसिक सवय आहे, ती लावून घेणं आपल्याच हातात आहे. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल, तितकंच सुखी तुम्ही रहाल . तुमच्या सुखी रहाण्यावर केवळ तुमचाच अधिकार असतो. इतर लोकं तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीत ही गोष्ट एकदा लक्षात आली की जगणं फार सोपं होऊन जाईल असं वाटत नाही का? .
टिव्ही वर एक कार्यक्रम बायको नेहेमी पहाते. भांडा सौख्य बरे नावाचा. एकदा त्या कार्यक्रमात एक सासू मुलाच्या लग्नात २२ वर्षापूर्वी पायघड्या घातल्या नाहीत म्हणून सुनेला बोलतांना दिसली.सगळं लग्न व्यवस्थित केलं, मान पान वगैरे सगळं केलं, फक्त पायघड्या घातल्या नाही म्हणून हे इतक्या वर्षानंतर पण ती सासू मुलाच्या लग्नातले आनंदाचे क्षण लक्षात ठेऊ शकली नाही, तर तिच्या लक्षात राहिल्या न घातलेल्या पायघड्या! छान झालेला स्वयंपाक, इतरांनी केलेले किती सुंदर आहे हो सून म्हणून केलेले कौतुक, आलेल्या सगळ्या लोकांनी केलेलं सुंदर अरेंजमेंट्सचं कौतुक वगैरे…. सगळं काही त्या सासूबाई विसरल्या होत्या.
लग्ना नंतर पैशाची ओढाताण असल्याने तो बायकोला तो हनिमूनला नेऊ शकला नाही, नंतर या प्रसंगामुळे त्यालाही कायम गिल्टी वाटायचं म्हणून नंतर परिस्थिती सुधारल्यावर काही वर्षांनी अगदी नियमित विमानाने बायकोला फिरायला न्यायचा. चांगल्या हॉटेल मधे नेऊन सुटी एंजॉय अगदी नियमित करायचा.पण- तरीही तुम्ही मला लग्नानंतर हनिमूनला नेले नव्हते ही गोष्ट मात्र ती कधी विसरू शकत नाही, आणि येताजाता त्याला टोमणे मारत असते. ती हे विसरते की जो हनिमून मिस झाला तो त्याचाही हनीमून होता – तिचा एकटीचाच नाही. असो. म्हणून वाटतं की सुख ही एक मानसिक अवस्था आहे.
सहज आठवलं म्हणून लिहीतो, अनील अंबानीच्या घरी काम करणारा नोकर ( स्वयंपाकी) अनील व कुटुंबीयां साठी जे अन्न शिजवतात तेच खात असतो , त्याच अंतालिया मधे रहात असतो, पण तो त्याच्या इतका सुखी असेल का? अर्थात नाही- कारण त्या आयुष्यावर त्याचे नियंत्रण नसते, – त्याचे आयुष्य हे आश्रिताचे असते. स्वतःच्या आयुष्यावर स्वतःचे असलेले नियंत्रण सुख देईल!
आयुष्यात आपण सगळ्यांकडून काही ना काही तरी अपेक्षा करत असतो. ही माझी बायको, तिने असे असे वागले पाहिजे, ही माझी मुलगी तिने असे असे वागले पाहिजे. असे काही ठोकताळॆ आपल्या मनात तयार असतात. आपण स्वतःला रींगमास्टरच्या भूमिकेत ठेवतो आणि सगळ्यांनी कसे वागावे ह्याचे मनातल्या मनात आराखडे बांधत असतो. आपल्या अपेक्षेपेक्षा कोणी वेगळं वागला, की आपली चिडचिड होते. अपेक्षापूर्ती हीच खरे सुख देते, मग ती अगदी लहान गोष्टीतली – जसे सकाळी बायकोने तो न मागता सॉक्स ची पेअर हातात द्यावी ( कारण नेहेमी एक सारखे दोन सॉक्स तुम्हाला कधीच सापडत नाहीत) अशी अपेक्षा असली तरीही!
अपेक्षा किती होती, आणि किती मिळालं यावर खरं सुख अवलंबून असते का? म्हणजे मला असं म्हणायचं आहे, की जर तुमचा रिव्ह्यु झाला, आणि तुमची अपेक्षा आहे की मला साधारण विस टक्के पगार वाढ मिळावी, तुम्हाला मिळते १८ टक्के, आणि मग दोन टक्के अपेक्षेपेक्षा कमी, की तुम्हाला सुख मिळणार नाही.
कुठलीही गोष्ट करतांना आधी जर समस्या काय येतील याचा विचार केला, तर आधी पासूनच त्यावर काय उपाय करायचा हे ठरवता येऊ शकते, जेंव्हा एखादा प्रॉब्लेम येतो, तेंव्हा तुम्ही तो आला तर काय करायचं याचा विचार आधीच केलेला असतो, त्यामुळे तुमची अपेक्षा आणि प्राप्ती मधलं अंतर नक्कीच कमी होऊन, नंतर होणारा मानसिक त्रास वाचतो.सेल्फ एस्टीम नावाचा एक प्रकार आहे, की जिला कधीही कोणाच्याही वागण्याने धक्का बसु शकतो. आपण जर सेल्फ एस्टीम चा बाऊ केला नाही तर त्या कारणाने दुःखी होण्याचे काहीच कारण शिल्लक राहू शकत नाही.
जर फळाची चिंता न करता नुसते कर्म करत राहिलो तर? विद्यार्थ्याने फक्त अभ्यास करत राहिला, आणि किती मार्क मिळायचे ते मिळॊत, असं म्हणून त्याने फक्त कर्म केले तर त्याला मिळणारे मार्क्स आणि त्यातून मिळणारा आनंद हा नक्कीच जास्त असेल. इथेच समजा त्याने काही ध्येय डोळ्यापुढे ठेवले आणि त्या ध्येय प्राप्तीपेक्षा कमी मार्क्स मिळाले तर त्याला इतकं वर्षभर केलेल्या कर्माचा आनंद उपभोगता येणार नाही – खरं की नाही? म्हणूनच मला बरेचदा गीते मधला कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेशू कदाचन हा श्लोक खूप आवडतो.
शेवटी स्वर्गाचा नरक आणि नरकाचा स्वर्ग बनवण्याची क्षमता आपल्या मनात असते. तुमच्या मनाला सुख ओळखता आलं पाहिजे, म्हणजे लक्षात येत नाही?? समजा तुमच्या घरात चोर आला आणि त्याने दोन सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या, पण इतर बरंच सोनं जे दुसऱ्या ठिकाणी ठेवलं होतं ते काही नेलं नाही, तेंव्हा गेलेल्या सोन्या बद्दल दुःख करायचे की चोरीला न गेलेल्या सोन्या बद्दल आनंद मानायचा? असे प्रसंग अनेकदा येतात, तुमची अपेक्षा असते ९७ टक्के मार्क मिळायची, पण मिळतात ९४ टक्के.. मग त्याचं सुख मानायचं की दुःख? एखाद्या काटेरी जंगलातून जाणाऱ्या पाउल वाटेने जातांना, ती वाट आहे यात सुख मानायचे की आजूबाजूला किती काटे आहेत याचे दुःख करायचे?? असे अनेक प्रश्न आहेत, की ज्यांची उत्तरं आपणच शोधायची आहेत आणि ठरवायची आहेत.
सुख हे आयुष्यात बरेचदा निरनिराळ्या वेषात येते. तुम्ही आपली एखाद्या खास वेषात ते येईल म्हणून वाट पहात असता, पण ते नाठाळ सुख तुमच्या पुढे कधी कुठल्या वेषात येईल ते सांगता येत नाही. तुम्हाला फक्त त्या सुखाला ओळखता आलं पाहिजे, नाही तर ते तुमच्या दारात कुठल्यातरी वेषात येईल आणि तुम्ही त्याला न ओळखता दार बंद करून घ्याल. कदाचित ते दुःखाचा झगा पण घालून येईल- तुम्हाला त्याला फक्त ओळखता आलं पाहिजे आणि त्या साठी तुमचे मन खरं तर तुम्ही ट्रेन करायला हवे. इंग्रजी मधे एक म्हण आहे, ऑपोर्च्युनीटी नॉक्स युवर डोअर, बट यु शूड आयडेंटीफाय अॅंड ओपन द डोअर”
शरीराचा सगळ्यात जड आणि हलका अवयव कुठला ? असा प्रश्न विचारला तर माझ्या मते उत्तर एकच असू शकते, ते म्हणजे सगळ्यात जड अवयव डोकं, आणि हलका अवयव म्हणजे कान. कुठलीही गोष्ट ऐकली की त्यावर फारसा शहानिशा न करता विश्वास ठेवतो आपण. सुखी रहाण्याचा एक मुळ मंत्र या दोन्ही अवयवांचा व्यवस्थित केलेला वापर- जर हे तुम्ही करू शकलात तर आयुष्यात बऱ्याच गोष्टींमधे सुख- आनंद शोधू शकाल.हा विषय खरं तर खूप मोठा आहे , ह्याची व्याप्ती पण इतकी मोठी आहे, की ती शब्दात मांडता येणे शक्य नाही-आणि माझी पात्रता पण नाही . पण तरीही हा लेख लिहीण्याचे धारिष्ट्य केले आहे .
रामदास स्वामींचा हा श्लोक लिहितो आणि लेख संपवतो.
” जगी सर्व सुखी असा कोण आहे,
विचारी मना तूच शोधून पाहे”
Me aapala blogcha niyamit reader aahe …aapale lekh chan aasatat….
Sir please listen about our old bharat…..
गणेश
आभार..
खरं सुख आपल्या मानसिक अवस्थेवर अवलंबून आहे, असं मी मानत आले आहे. त्यागामधेदेखील सुख असतंच. आयुष्याची काही वर्ष तारे गर्दिशमें होते, तेव्हा खूप दु:खी वाटायचं पण आता असं वाटतं की त्या कठोर वर्षांनीच मला घडवलं, म्हणून मी आज सुखी आहे. ज्याप्रमाणे अंधार नसेल, तर प्रकाशाचं महत्त्व कळणार नाही, त्याचप्रमाणे दु:ख नसेल तर सुखाचं महत्त्वदेखील कळणार नाही. आयुष्यात कशा ना कशाची तरी उणीव हवीच. सर्वांगसुंदर सुखी आयुष्य असलेला माणूससुद्धा त्याच्या जीवनात काही एक्साईटिंग घडत नाही म्हणून दु:खी होतच असेल.
कांचन
ज्याप्रमाणे अंधार नसेल, तर प्रकाशाचं महत्त्व कळणार नाही, त्याचप्रमाणे दु:ख नसेल तर सुखाचं महत्त्वदेखील कळणार नाही. आयुष्यात कशा ना कशाची तरी उणीव हवीच. अप्रतीम वाक्य! धन्यवाद.
Kanchan;
Apla abhipray chaan ahe!!! 🙂
अप्रतिम पोस्ट !! खूपच आवडली… अगदी खरंय !!
हे सगळं कधीच न संपणारं आहे. अजून अजून अजून…गोल्डन ट्रॅप अक्षरशः.. या एवढ्या सगळ्या जंजाळात आपण स्वतः आवर्जून, जाणीवपूर्वक असेल त्यात समाधान मानून घ्यायचं ठरवलं नाही तर आपण कधीच सुखी होणार नाही.. तुम्ही मागे लिहिलेल्या ‘आनंद’ पोस्टची आठवण झाली 🙂
हेरंब
आताच ती जूनी पोस्ट शोधली , चेक करायला की ही पोस्ट त्या जुन्या पोस्टचे रिपिटेशन तर नाही.. पण नाही तसे नाही. जुन्या पोस्टची लिंक देतोय इथे..http://tinyurl.com/85hyhy3
अरे हो.. महत्वाचं राहिलं… तिसऱ्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन !!
प्रथम ब्लोग च्या तिसऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि अभिनंदन काका,
खरे सुख तर आपल्या मान्यावर आहे. आणि अपेक्षा भंग हे सगळ्यात मोठे दु:ख आहे.
गंणेश
मनःपूर्वक आभार.
महेंद्रजी मनापासून आवडली पोस्ट….
ब्लॉगच्या तिसऱ्या वाढदिवसाबद्दल खूप खूप अभिनंदन आणि मन:पुर्वक शुभेच्छा!!
तन्वी
धन्यवाद.. 🙂
sukh kuthe aahe?
Shodhala tar tumachya javal……. nahi tar kuthech nahi!!!
बागेश्री
दृष्टीकोन सकारात्मक हवा बस्स..
वाह .. वाह ..
खुप छान.
सुख ,आनंद आणि समाधान या सर्व गोष्टी मनावर अवलंबुन आहेत. मनावर कंट्रोल करणे अवघड आहे, पण अशक्य मुळीच नाही.
<>
हे कसं काय बुवा?
मला सांगा मला सांगा प्लीज… खुप गरज आहे सध्या !
एक खुप छान लेख आहे. बघा वाचुन ..
http://abhayjoshi.net/other/mkrp.htm
वेदांत
लेख वाचला. एक सांगतो आपण नेहेमीच सुखात दुःख शोधत असतो. प्रत्येक जण दुःखी असतो – कारण नसताना. फेअर अॅंड लव्हली ची जाहिरात पहा, त्यांनी सावळ्या मुलींचा जाहीर अपमान करण्याचा ठेका घेतलेला आहे. सावळा वर्ण म्हणजे वाईट ही गोष्ट इतकी बिंबवली केली आहे की ज्या मुलीचा रंग गव्हाळ जरी असला तरीही तिला वाटतं की आपला रंग सावळा आहे, असलेली सुंदर फिगर, शार्प फिचर्स यांच्याबद्दल आनंद न मानता ती नेहेमी आपला वर्ण थोडा गोरा असता तर? या गोष्टीचा विचार करत असते. ही गोष्ट तिच्या हातात नाही – तरी पण!
काका,
हे सर्व मनाचेच खेळ आहेत. त्या मुलीच्या मनाने असे मानले असते कि, मि जशी आहे तशीच खुप सुंदर आहे तर ………….
बरोबर.. मला पण तेच म्हणायचंय.. पण आपल्याकडे जे नाही त्याबद्दल खंत करत बसणे आपला स्वभाव झालेला असतो. म्हणूनच म्हणतात- ” सुख खुपतं” बऱ्याच लोकांना.
sukh he mananyavar asta na???
सारीका
बरोबर आहे. मानण्यावरच असतं. प्रत्येक गोष्टीत ते असतंच फक्त पहाण्याची दृष्टी हवी.
वाह काका, अगदी सहज सोप्या भाषेत आणि रोजच्या उदाहरणातला लेख आहे! कळत पण वळत नाही… अस होत बऱ्याच जणांच.. आता मलाच नाही का ही पोस्ट अजून अजून वाचावीशी वाटतीये! 🙂
ब्लॉग च्या ३ वर्ष पूर्ततेच अभिनंदन!
अभिषेक
अवश्य वाच आणि स्वतःच विचार करून सुखी कसं रहायचं याची दिशा ठरवू शकतो आपण.आता असं पहा मिळणाऱ्या पगारात कोणीच सुखी नसतो , अजून थॊडा जास्त पगार असता तर? त्या पेक्षा मिळणारा पगार जरी फार नसला तरी कोणापुढे हात पसरावे लागत नाहीत ना?? आणि आपण खाऊन पिऊन सुखी आहोत असा विचार केला तर नक्कीच सुखी राहू शकू. मनाला ट्रेन करण्याची आवश्यकता आहे बस्स.
Vichar karayla lavnara lekh. Surekh.
Thanks
पूर्वा
ब्लॉग वर स्वागत..आणि आभार.
मला तर वाटतं की, समाधान आणि आरोग्य या दोन गोष्टी जर माणसाकडे असतील ना, तर माणूस सर्वात सुखी असतो.
अभिषेक
या मधे असा कूठलाच फॉर्म्युला नाही की हे असं असं असलं की सुख मिळेल, समाधान मिळेल.. व्यक्ती परत्वे ते बदलत जाणार. जीवना कडे पहाण्याचा दृष्टीकोन जसा तशी तशी सुखाची व्याख्या बदलेल. पण शेवटी एक गोष्ट कुठल्याही बाबतीत खरी ठरेल की अल्पसंतुष्टी सदा सुखी.
Kaka!!!!
Tumhi “Lekhako-ttam” ahat!!! 🙂
Dhanya zalo wachun 🙂
संतोष
लेखक हा वेगळी ब्रिड असतो. मी आपला एक तुमच्या सारखा सर्वसाधारण माणूस.अलंकारिक भाषा,सरस्वती्ची ज्याच्यावर कृपा तो लेखक. आभार.:)
अंतर्मुख करणारा लेख …. अप्रतिम …. असच लिहित रहा……
तुषार
धन्यवाद..
Kaka
Apratim Lekh.
अमोल
मनःपूर्वक धन्यवाद..
सुंदर …अप्रतिम लेख ..खूप आवडला ..ब्लॉग ला ३ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !!
कल्याणी
धन्यवाद..:)
खुप छान लिखान आहे. अगदी व.पुंची आठवण आली.
श्री
आभार.
APARTIM LEKH AAHE
रुबिया
ब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठ आभार.
Kaka, mi nehmi note kelay ki mala je prashan chalayla lagtat na tech prashn yoga yogane tumchi post banun yetat ani ho uttar hi astatch tyat…..Kanchan ani Heramb mhantlya pramane…sukh ani dukh aplya manaya war ast….ani nakkich ha golden trap bhednyachi kshmata aplyat havi…..
अश्विनी
स्वतःच्या सुखाची तुलना आपण नेहेमी दुसऱ्याच्या सुखाशी करतो. ( आपल्या दृष्टीने- सुख म्हणजे मटेरिअलिस्टीक गोष्टी) मग माझ्या कडे फक्त आय टेन आहे, त्याने होंडा सिटी घेतली.. असे विचार मनात आणून आपण घेतलेली नवीन कार पण सुख देऊ शकत नाही) नेहेमी इतरांच्या दुःखाशी आपल्या सुखाची तुलना करायला आपणच शिकायला हवं. एक म्हण आहे, पायात नसलेल्या बुटांचे मला काही वाटेनासे झाले, जेंव्हा मी पाय नसलेला माणूस पाहिला..
mahendra ji mala ha lekh khup aawadala, agadi barobar sukha he apalya mananaytach asate aani aapan jar apeksha thewalyach naahi tar apekshaya bhangache dukha honarach nnai, phakta anandach milel. kuhup sundar tumache abbhar
साक्षी
एक उदाहरण देतो
मुंबईच्या भर उन्हाळ्यात लोकं लग्नात सुट घालतात घामाच्या धारा वहात असतात, पण तरीही सुट घालतात. मुली चक्क पैठणी घालतात. त्या मधे सुख कसलं असतं? आपण चांगलं दिसायला हवं ही भावना असते. तुम्हाला माहिती असतं की ह्या पैठणी मुळे गरमी होणार आहे, पण तुम्ही ती नेसताच – खरं की नाही??? हे का शक्य होतं?
कारण तुम्ही पैठणीला किंवा सुटला त्यांच्या गुणदोषासकट स्विकारलेले असते . सुंदर दिसणे हा गुण झाला- आणि गरमी होणे हा दोष.
हा एक सगळ्यात सोपा सुखी रहाण्याचा मंत्र!
सुंदर,मस्त,छान,खुपच अप्रतिम लेख आवडला.
महेश
धन्यवाद.. 🙂
काका,
रोजच्या दैनंदिन जीवनातील उदाहरणान वरून आपल्या मनात सुखदुखा बद्दल जे वादळ उभे राहते, हा लेख वाचून नक्की ते वादळ शांत होणार..
प्रियंका
एक साधी गोष्ट करायची. सकाळी उठल्यावर ठरवायचं की आजचा दिवस छान घालवायचा. आवडत्या मित्र मैत्रिणींबरोबर मस्त पैकी भटकायला जायचं, दिवसभर ऑफिस असेल दुपारी टिफिन मधे चक्क गुळतूप पोळी आणि लिंबाचं लोणचं न्यायचं ( जे तुम्हाला आवडत असतं, पण लोकं काय म्हणतील म्हणून डब्यात कधीच नेत नाही ते>>) संध्याकाळी कुठला तरी गाण्याचा कार्यक्रम किंवा खूप दिवसात न भेटलेल्या मित्राला भेटायचं.. आणि बघ दिवस कसा मस्त जातो ते.. ट्राय कर एकदा. आनंद मिळवणं फार सोपं आहे. आपलं मन एकदम वेडं असतं बघ!
दिवसभर लहानपणीच्या गोष्टी आठवायच्या, एखादं आवडीचं गाणं गुणगुणायचं, आवडता ड्रेस घालायचा.. आनंदी रहाणं एकदम सोप्पं आहे!
धन्यवाद काका.. नक्कीच ट्राय करेल 🙂
खर आहे ; “सुख” किंवा “दुःख” उकल काढणारे कुणी दुसरे नाही तर आपलेच “मन” आहे…!!
🙂 🙂
श्वेता
आपल्या इच्छेविरुद्ध आपल्याला कोणीच दुःखी करू शकत नाही. आपल्याच मनाला सुखात दुःख शोधायची वाईट खोड जडलेली असते.
मला उमगलेली गोष्ट:- छोट्या अपेक्षांची पूर्तता झाल्यावर आनंद होतो (its an impulsive time based feeling). छोटे छोटे आनंद मिळत गेल्याने समाधान (Its relative time base feeling-for shorter time) मिळते व ते केवळ वैचारीक असते. असे समाधान सतत लाभल्याने सुख (It’s a relative time based feeling-for longer duration)अनुभवायला मिळते. उदाहरणार्थ:- कॉलेजमधले हलकट मित्र भेटल्यावर आनंद होतो. पुढचे काही तास त्यांच्याच्या सोबत टिंगल-टवाळ्या करीत घालवल्याने समाधान मिळते. व असे नालायक व टाकाऊ मित्र आपल्यला आयुष्यभर पुरणार आहेत या विचारांनीच जीव सुखावतो! काका तुमचा अनुभव काय म्हणतो?
हेमंत
या लेखात मुद्दामच समाधान हा विषय घेतला नाही, या विषयाची इतकी जास्त व्याप्ती आहे, की लिहायला बसलो तर मोठा प्रबंध होईल. आनंद, सुख आणि समाधान ह्या तिन्ही गोष्टी पूर्ण वेगळ्या आहेत. समाधान देणारी गोष्ट आनंद देईलच असे नाही. थोडा विचार करून पहा तुमच्याच लक्षात येईल मला काय म्हणायचंय ते. धन्यवाद.
नेहमी प्रमाणे च लेख अगधी सुंदर झाला आहे सर. शेवटचा रामदास स्वामी चा श्लोक एकच सांगून जातो की सुख, आनंद, ह्या सर्व गोष्टी आपल्या मनावर अवलंबून असतात. ज्याचा आपल्या मनावर ताबा आहे तो ह्या जगात सर्व काही जिंकु शकतो.
श्रीकांत
आपल्या मनात खूप जास्त शक्ती आहे, पण आपण ती ओळखू शकत नाही. मनावर ताबा मिळवण्यासाठी बरेच प्रकार आहेत, त्यातला सगळ्यात सोपा प्रकार म्हणजे ’आस्तिक’ होऊन कुठल्या तरी देवाची उपासना करणे. असो. प्रतिक्रियेसाठी आभार.
” ब्लॉगच्या तिसर्या वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा ! ” 🙂
शेवटी ’सुख’ हे मानण्यावरच असतं. नाहितर तू लिहीलसं तसंच मिळत असूनही हाव माणसाला करंटाच ठेवते. महेंद्र लेख आवडला. उदा आवडली. माणसाचा स्वभाव… गंमतच आहे सगळी. नेमके जे मजपाशी आहे ते सोडून समोरच्याकडे पाहून दु:खी होण्याची हौस कायमची जडलेली. आणि हौसेला मोल नसते…. हे इथे सार्थ होते. 😦
वाह, काय बात है! ही दुःखी होण्याची हौस- खरं आहे अगदी. दुसऱ्या शब्दात सुख बोचतं माणसाला. तो प्रत्येकच गोष्टीत काय कमी आहे हे पहात असतो. जेवायला बसल्यावर भाजी मधे मीठ जास्त झालं म्हणून कुरकुर करत जेवण्यापेक्षा , बरेच दिवसात पैकी गुळांबा पोळी खाल्ली नाही, तेंव्हा गुळांबा, बटर, चटण्या, लोणची आणि फ्रिझ मधे जे काही असेल ते आज खाऊ या – म्हणून डोकं शांत ठेवलं तर? मी एकदा केलाय हा प्रयोग – आणि खारट भाजी पण त्या दिवशी इष्टापत्ती वाटली. 🙂
तिसऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि अभिनंदन !!
आत्ता बाबांना विमानतळावर सोडून परत येतेय आणि हा लेख वाचला ….गेले कित्येक महिन्यांनतर अशी रिकाम्या घरात शिरतेय….काहीच लिहिवत नाहीये…
अपर्णा
सहाजिक आहे सहा महिने गेले इतक्या लवकर?
आभार.
मस्त लेख….! खूप आवडला…!
प्रशांत
मनःपूर्वक आभार.
अप्रतिम लेख महेंद्र !! मनापासून पटला 🙂
वपुंची आठवण आली. स्वर्गसुख तुमच्या मानण्यावर असतं आणि त्या त्या वेळेच्या गरजेनुसार त्याची व्याख्या पण बदलत असते 🙂
आवड्या एकदम 🙂
जयश्री
सुखाची परीभाषा करतांना समाधान पार विसरूनच गेलो . समाधान हे सुखापेक्षा जास्त महत्त्वाचे वाटते नाही का?
नमस्कार,
तुमचे सगळे ब्लॉगस मी आवडीने वाचते. छान लेख आहे. खुप काही शिकायला मिलते तुमच्या लेखातून.
सोनल
आवर्जून दिलेल्या अभिप्रायासाठी आभार- आणि ब्लॉग वर स्वागत .
MAHENDRA KAKA,
MI TUMACHYA LEKHANCHI NIYAMIT VACHAK AHE.
HA LEKH PHARACH CHHAN AHE. MANSACHYA MANCHA YATHARTH DARSHAN GHADAVANARA AHE.
सोनिया
ब्लॉग वर स्वागत. तुझ्या सारख्या उत्साह वाढवणाऱ्या कॉमेंट्समुळेच तर ब्लॉग सुरु आहे अजूनही.
माणसाच्या अपेक्षा कधीच संपत नाहीत, आणि कोणतीही गोष्ट मिळाली, कि त्याची किंमत शून्य असते…… आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे दुसऱ्यांच्या सुखात आपले सुख असते……. तुम्ही जेव्हा कळत किवा नकळत दुसर्यांना दुक्ख देता तेच दुक्ख तुम्हाला पण मिळते…
खूपच मस्त महेंद्रजी! आवडलं!
विनायक
थोडा वेगळा प्रकारचा लेख झालाय नेहेमीपेक्षा. सिरियस लिहायचं ठरवलं नव्हतं पण झाला सिरियस नोट वरचा लेख. आभार.
मस्त लेख! लहानपणी वाचलेली “सुखी माणसाचा सदरा” ही गोष्ट आठवली.
निरंजन
धन्यवाद..
chhan ahee ……
mala ase read karayala avadate……
आर्णव
ब्लॉग वर स्वागत आणि आभार..
काका..may be.. मी चुकतोय..पण तुम्हाला असं नाही वाटत कि, आहे त्यात समाधान मानल्याने…माणसाच्या प्रगतीचा वेग मंदावतो….ह्या greediness.. मुळे किवा असमाधानी वृत्तीमुळे आपलं ध्येय गाठण्याची जिद्द आणखीनच बळावते..! म्हणजे.. तुम्ही दिलेलं उदाहरणंच.. घेतो… ज्या मुलाला..परीक्षेत…९८% ची अपेक्षा होती त्याला ९४% मिळाले.. पण त्याने जर त्यातच समाधान मानलं तर कदाचित तो ९८% पर्यंत कधी पोहोचणारच नाही…!! माझा मत आहे..समाधान हे क्षणिक असावं… माणसाने.. नेहमी असमाधानी राहावं..आणि रडत न राहता.. चिकाटीने आपल्या ध्येयाच्या मागे लागावं…..
क्षमस्व…शुभेच्छा द्यायच्या…राहिल्या…. 🙂 ३ वर्ष पूर्ण केल्याबद्दल.. (Of course.. Blog ची..) खूप खूप शुभेच्छा…..!
आभार…
प्रसाद,
९४ टक्के आणि ९८ टक्के.. समजा १०० टक्के.. या सगळ्या गोष्टींना काही अंत आहे की नाही? प्रगती म्हणजे नेमकं काय? आज ९८ मिळाले, उद्या ९९ हवे म्हणाल, परवा १०० का नाही??? या सगळ्या गोष्टींना कुठेतरी अंत हा हवाच. जर कितीही मार्क मिळवून जर असेच रहायचे असेल तर सुख कधी मिळणार तुम्हाला? आयुष्यभर सुख म्हणजे काय याची केवळ कल्पनाच करत रहाणार का आपण??
गीते मधे सांगितले आहे, कर्मण्ये वाधिकारस्ते माफलेषू कदाचन.. कर्म करत रहा, फळ म्हणजे मार्क किती मिळतील या कडे लक्ष देऊ नका. तुमच्या हातात आहे अभ्यास करणे, तो नेटाने करा- ते कर्म आहे… फळ जे काही मिळायचे ते मिळेलच. काय मीळावं यावर तुमचा अधिकार नाहीच…
काका,
डिसेंबर मध्ये एक ब्लोग लिहिला होतात ‘ लोक लग्न का करतात?’ त्यावर comment करताना मी तुम्हाला विचारला होतं कि “3. ata tari sukhi ahes na? ” ह्या विषयावर काहीतरी लिहा. तुम्ही अप्रत्यक्षपणे माझ्या तिस-या प्रश्नाचं उत्तरंच ह्या लेखातून लिहिलंत.
लेख सुंदर . खरंतर मन म्हणजे वाळलेल्या पाल्या पाचोळ्यासारख च आहे. Control मध्ये ठेवून वापरलं तर शेकोटी म्हणून पण वापरता येइल नुसतंच उधळलं तर नुसतीच वावटळ.
एका ‘yet another ‘ चांगल्या लेख साठी आभार.
मिलिंद
धन्यवाद.. “खरंतर मन म्हणजे वाळलेल्या पाल्या पाचोळ्यासारख च आहे. Control मध्ये ठेवून वापरलं तर शेकोटी म्हणून पण वापरता येइल नुसतंच उधळलं तर नुसतीच वावटळ. ” हे वाक्य अप्रतीम आहे. आभार.
‘आयुष्यभर आपण एखाद्या सुखासाठी धडपडत असतो, पण ते मिळाल्यावर, अरे यात तर काही विशेष सुख नाही, कशाला आपण या गोष्टीसाठी इतका अट्टाहास केला होता?’ हे अनुभवलंय म्हणूनच मनोमन पटलय . लेख खरंच अंतर्मुख करणारा आहे.
काका,खूप छान झालीय् पोस्ट. गेल्या काही दिवसांत काही अड्चणींमुळे मी खूप नकारात्मक विचार करायला लागले होते. मलाही ते जाणवत होतं पण सगळ्या विचारांतून बाहेर कसं पडायचं हे कळत हे कळत नव्हतं. आणि अचानक तुमची ही पोस्ट वाचली. त्यातले विचार एकदम पटले. शेवटी सुख हे मानण्यावर असतं आणि सुख शोधायची सवय लावून घ्यावी लागते या शब्दांनी मला मार्ग सापडला. अगदी मनापासून धन्यवाद काका. 🙂
प्रज्ञा
लिहिलेलं कोणाला तरी उपयोगी पडलं.. खूप बरं वाटलं. मनःपुर्वक आभार.
Bap re ya subject madhe pan masterki….. Great
दामोदर
ब्लॉग वर स्वागत आणि आभार.
भरपूर गैरसमज करण्यापेक्षा थोडे समजून घेतले तरी बरेचसे दुखः कमी होईल आणि हे करणे फुकट आहे याला पैसे लागत नाहीत.
चंद्रशेखर,
ब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार.. 🙂
Koni tari mhantale aahe :
Tuz aahe tuzhapashi, pari tu jaga chuklasi…..
Aapan dusryache sukh pahun dukhi hoto ha basic problem aahe & aapan nehmich relative vichar karto to pan ek problem aahe ase vatat mala…
Nice article…
हि पोस्ट वाचताना कोणालाही अगदी जवळची वाटेल एवढी सहजतेने आणि छान लिहिली आहे
आणि अगदी मनापासून पटलं की , खरच माणूस आपल्याजवळ जे आहे त्याचात समाधानी होण्यापेक्षा जे आपल्याकडे नाहिये
याचा विचार करण्यातच जास्ती असमाधानी असतो आणि त्याचमुळे कायम सुखाच्या मागे धावत असतो !!
Chaan !!!
Khup chan!!!
्सुनीता
ब्लॉग वर स्वागत .. आणि आभार.
sukh kasha madhe asta ? ya prashnache ekach shabdat uttar ahe… samadhanat !
sukhacha shevat samadhan hach ahe. samadhan nasel tar ant kay asel kahich sangu shakat nahi. nepoleon bonapart, jarmanycha hitler, irakcha saddam, osama, asha diggajancha shewat asamadhanatunach zala. samadhani rahile aste tar hich manse kadachit devatvala prapt zale aste nahika ?
किशोर
ब्लॉग वर स्वागत आणि आभार..
aaplyla jya goshtitun aanad milto tyalacha sukh mahantat………… pan………” sukh he nehami kshanbhagur aaste ”
सुख कशात आहे ? ह्या प्रश्नाचं उत्तर ज्याला सापडलं, तो खरा सुखी.
khup chan post ahe…khup awadali…asech lekh lihit ja…
dhanyawaad
अमोल,
प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार.
Kaka .. short and sweet “Samdhanatch sukh aahe”
Dear Sir,
jivan ek geet ahe,Ganare sagalech ahe pan,sukh kasha madhe asta ? ya prashnache ekach shabdat uttar ahe… samadhanat ! keshav tharat yani yogya dilele ahe sukh he phoolat, phalat, mansat,kontyahi gostit ahe.pan hi gost manane kabul keli pahije! Mag sagalikade shantateche vatavaran rahin.
Regard
Amol Shinde
jo nehami sukha chya shodhat asto to dukhi,ani jo aplya kade aahe tyat samadhan manun nahami ananda ne karya kart asto to sukhi.
सुख हे आयुष्यात बरेचदा निरनिराळ्या वेषात येते. तुम्ही आपली एखाद्या खास वेषात ते येईल म्हणून वाट पहात असता, पण ते नाठाळ सुख तुमच्या पुढे कधी कुठल्या वेषात येईल ते सांगता येत नाही. तुम्हाला फक्त त्या सुखाला ओळखता आलं पाहिजे, नाही तर ते तुमच्या दारात कुठल्यातरी वेषात येईल आणि तुम्ही त्याला न ओळखता दार बंद करून घ्याल. कदाचित ते दुःखाचा झगा पण घालून येईल- तुम्हाला त्याला फक्त ओळखता आलं पाहिजे आणि त्या साठी तुमचे मन खरं तर तुम्ही ट्रेन करायला हवे. इंग्रजी मधे एक म्हण आहे, ऑपोर्च्युनीटी नॉक्स युवर डोअर, बट यु शूड आयडेंटीफाय अॅंड ओपन द डोअर”
mala ha prara khup aavadala….
gairsamaj aani sanshay yapasun pratek goshtitun manvala dukhach milale…
मीना,
हा पॅरा लिहितांना डोळ्यासमोर उदाहरण होते ते म्हणजे वडील आणि मुलगी यांचे. मुलीचे लग्न होतंय , तो एक आनंद पण ती नंतर सासरी जाणार म्हणून दुःख… इथे पहा दुःखाचा चेहेरा घेऊन सुख कसं तुम्हाला सामोरा येतंय ते.
Pingback: दुःख… | काय वाटेल ते……..
khup sunder , ayusha khar sukh kale, many many thanks
धन्यवाद.
अप्रतिम पोस्ट………खूपच आवडली……
खरंतर काय प्रतिक्रिया द्यावी सुचत नाहीये
अगदी पांडुरंगाच दर्शन झाल्यावर काहीच हव्यास राहू नये अजून…. फक्त अलौकिक समाधन मिळतं अगदी त्यासारखीच भावना आहे मनात लेख वाचल्यावर …
अजून एक नमूद करावसं वाटतय कि हा लेख बुकमार्क करून ठेवलाय जेव्हा जेव्हा अगदी low वाटतं कि हा लेख न प्रतिक्रिया सगळ्या वाचून काढायच्या खूप magical feeling आहे … मला खरंतर नीटसं express करता येत नाहीये …
सोनाली,
ब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार
सोनाली
मनःपूर्वक आभार.
Khup chan lekh ahe….jakkas…
Very nice
Thank u mala khup bars watala khup chan lihilay