मैत्रिण..

परवा नागपुरला गेलो होतो, माझी एक लहानपणीची ( की पंचविशीत असतानाची?) मैत्रीण रस्त्याने जातांना दिसली. सुखवस्तू पणाचं सुख तिच्या शरीरातून ओथंबून वहात होतं. केस डाय केलेले ब्राउन कलरचे आणि हात धरलेला एक मुलगा ४ -५ वर्षाचा असेल-कोण असावा तो? तिला पाहिलं आणि , खरंच हीच का ती ? ही शंका आली. वया बरोबरच  झालेले बदल सगळ्या शरीरावरच दिसत होते.असो… आणि तिला पाहिल्यावर सगळ्या जुन्या गोष्टी आठवल्या.  तिने मला पाहिले आणि  हसून  इकडे ये म्हणून इशारा केला.  हा नातू बरं का.. माझ्या मोठ्या मुलीचा  मुलगा. घरी नक्की ये रे.. नवऱ्याशी ओळख करून देते बघ तुझी.. पण मी मात्र कामाच्या घाईत असल्याने दोन मिनिट बोलून आणि नंतर  पुन्हा सावकाश भेटायचं प्रॉमिस  करून निरोप घेतला. एक जूनी मैत्रीण..  पण खरंच ती मैत्रिण होती का? हा  प्रशन मनात घोळवत कामाला लागलो.

मैत्रिण हे  हेडींग  वाचल्यावर तुमच्यातले अर्धे लोकं तरी या पोस्ट मधे काहीतरी मसालेदार वाचायला मिळेल ह्या अपेक्षेने वाचणे सुरु करतील- पण तसे यात काही सापडणार नाही. माझ्या वयाच्या पुरुषाने मैत्रिणी बद्दल लिहावं म्हणजे खरं तर थोडं विचित्र वाटतं नाही का? मैत्रिण हा प्रत्येकाच्याच जीवनाचा एक हवा हवासा वाटणारा अविभाज्य अंग असतो.  खरं तर मैत्रिण या शब्दा मधेच एक मोठं काव्य दडलेलं आहे- यावर खंडकाव्य नक्कीच होऊ शकतं पण आज पर्यंत तरी कॊणी मैत्रिणीवर  कविता ( मला अभिप्रेत असलेल्या)लिहिलेल्या नाहीत. नुसतं मैत्रिण हा शब्द जरी उच्चारला तरीही आवाज हळूवार होतो- कापरं भरतं.. कसं मस्त पैकी पिसा सारखं हलकं हलकं वाटतं…. खरं की नाही??

मैत्रिण या शब्दाचा आशय वयानुरुप बदलत असतो. खरं तर स्त्री कडे पहाण्याची नजर वयानुसार बदलत असते. लहान असतांना केवळ तीन रुपात मुलींकडे पाहिले जाते. पहिला आई, दुसरा बहीण, तिसरा म्हणजे बायको. पण जेंव्हा ९वीत वगैरे असतो, तेंव्हा तर बायको हा प्रकार अशक्य आणि कल्पनेच्या पलिकडचा असतो –  पौगंडावस्थेतील वय – म्हणून मग फक्त एकाच रुपात मुलींकडे पहिले जाते . मी पण याला अपवाद नव्हतो.

शाळेत तर अजिबात मुली नव्हत्या.  को एड शाळा नव्हती, पण आमचं घर कन्या शाळेजवळ असल्यामुळे दररोज आमच्या घरा समोरून सगळ्या “शिरोडकरांचा”  राबता असायचा. माझी जी “शिरोडकर” होती, ती मात्र समोरून गेली की खाली मान घालायची आणि लाजून निघून जायची. कधी तरी पुढे गेल्यावर तिने मागे वळून पाहिले की मी अगदी कृतकृत्य होत असे. त्या दिवसात   बोलणं तर दूरच पण नुसतं पाहून हसणं पण शक्य व्हायचं नाही. मुलीशी बोलतांना कोणी पाहिलं तर ?? हा प्रश्न पण असायचा.

बरं, शेजारी रहाणाऱ्या सगळ्या मुली सुंदर जरी असल्या तरी   त्या मुलींना अगदी लहानपणापासून फ्रॉकला पिनने रुमाल अडकवलेले, भरलेल्या नाकाने  पाहिलेले   असल्याने , त्यांच्या बद्दल तशी भावना कधीच निर्माण झाली नाही- त्यांच्याशी बोलणं व्हायचं, पण त्या मैत्रिणी मात्र कधीच झाल्या नाहीत.  दुसरी गोष्ट म्हणजे मुलीशी बोलणं हा कमीपणा समजला जायचा. पौगंडावस्थेतील वय, हवी हवीशी वाटणारी मैत्रिण, पण प्रत्यक्षात मात्र कधी कोणी मिळालीच नाही.. कधी खरं  बोलण्याची हिंम्मत झालीच नाही. खऱ्या मैत्रिणी मिळाल्या त्या नोकरी लागल्यावरच!

माझा एक खास मित्र होता , त्याचं नांव लिहत नाही, कारण कदाचित त्याची मुलगी पण हा ब्लॉग वाचत असेल . तर त्याचं एका मुलीवर एकतर्फी प्रेम होतं. ती तशी , त्याच्या घराजवळच रहायची, एकदा त्याने ’ ती’ ला दाखवले, आणि म्हणाला कशी दिसते? आता १५-१६ वर्ष वय असतांना कुठलीही मुलगी सुंदरच दिसणार.. पण नंतर मात्र तो जाम पिडायला लागला. ती असं म्हणते, मी तसं म्हणतो वगैरे वगैरे. तिच्या प्रेमात अक्षरशः पागल झाला होता तो! तिचं एक कोड नेम ठेवलं होतं आम्ही, की ज्या मुळे कोणाही समोर तिच्याबद्दल बोललं तरी चालायचं. असो विषयांतर होतंय, पण आमच्या वेळचे दिवस थोडक्यात लक्षात यायला हवे, म्हणून ही आठवण लिहिली आहे.

कट्ट्यावर जाऊन बसणे आणि फुल टू टीपी करणे हा एक नेहेमीचा उद्योग ! संध्याकाळचे सहा वाजले की कट्ट्यावर जाऊन बसायचे आणि गप्पा मारत उभे रहायचे. मस्ती करण्यावर पण मर्यादा होत्याच- कारण थोडाही  टारगट पणा केला, तर घरी बातमी पोहोचेल ही खात्री -आणि मग मार बसणार हे पण नक्की! कट्टा नसेल तर. किंवा समोरच्या मैदानात क्रिकेट खेळणे आणि येणाऱ्या जाणाऱ्या मुलींवर , ” ही तुझी, ती लाल वाली माझी, ती हिरवी शाम्याची ” वगैरे कॉमेंट्स तर ठरलेल्या. मला वाटतं की त्या मुलींना पण ते आवडत असायचं. कधी अरे काल तू हिरवी घेतली होतीस, आज हिरवी माझी.. वगैरे.. … पण कॉमेंट्स व्हायच्या.

त्यातलीच  एक सुबक ठेंगणी    समोरून गेली की मित्र ’अरे वहिनी  चालली बघ’ म्हणून आवर्जून  तिच्याकडे लक्ष वेधून द्यायचे- आणि ते पण तिला ऐकू जाइल इतक्या मोठ्या आवाजात. 🙂 ती लाजायची, आणि मला पण उगाच लाजल्या सारखं व्हायचं. अजून एक मुलगी होती तिच्यावरून मला मित्र चिडवायचे- एखाद्या मुलीच्या नावाने चिडवलं  जाण्यातलं सुख  समजेल आजच्या पिढीला?

माझा एक मित्र होता, नितीन ( आडनांव मुद्दाम लिहत नाही) तो तर तुझी ती मैत्रीण कोण आहे हे सांग म्हणून खूप मागे लागायचा. पुढे काही वर्षानंतर नोकरी लागली आणि मग केवळ  सुटी मधे घरी जाणं व्हायचं. मग तेंव्हा एक दिवस ती कडेवर बाळ घेऊन किंवा नवऱ्याच्या सोबत स्कुटर वर फिरतांना दिसली की -धत तेरी की.. झालं वाटतं लग्न हिचं…. छाती मधे कसंसंच   व्हायचं. ती पण पहायची , आणि हलकेच स्मित देऊन पुढे जायची. एकही शब्द न बोलता सुरु झालेली मैत्री ही अशी केवळ स्मित हास्यावर  संपायची .

मुलींशी नुसतं बोलणं पण शक्य नसायचं. एखादी सखी शेजारीण  उगाच आवडायची. सुटी मधे वगैरे सगळ्यांकडेच पाहुणे यायचे. तो म्हणजे आमचा प्रेमात पडण्याचा काळ. शक्य तितक्या प्रकारे प्रयत्न करून एका तरी मुलीशी मैत्री करायचीच हे ठरवले जायचे. सुटी लागली, की मित्रं पण ” सुटी मधे काय काय केलं ते सांग बरं का – आणि मी पण तुला सांगीन ” म्हणून आणा शपथा घालायचे.  पण त्या ही वयात काय बोलावं आणि काय बोलू नये ते आपसूकच समजत होते. 🙂 आणि कोणीच एकमेकांना काही  सांगत नसे.

नंतर नोकरी सुरु झाल्यावर खऱ्या मैत्रिणी मिळाल्या. ट्रेकिंग , हे मुख्य कारण! आमचं ट्रेकिंग गृप दर गुरुवारी ट्रेकला जायचा. नेहेमीचे ठरलेले लोकं असायचे. मुली – तसेच मुलं पण. एकाच आवडीने भारलेले आम्ही मित्र मैत्रिणी दर गुरुवारी  भेटायचो. जर ट्रेक नसेल तर कुठे तरी एकत्र जाऊन सिनेमा पहाणे वगैरे प्रोग्राम असायचा..  एक लायब्ररी होती, त्या लायब्ररी मधे पण  शेजारी रहाणारी एक मुलगी नेहेमी भेटायची,  तसं कधी बोलणं झालं नव्हतं, पण  मग समान वाचनाची आवड म्हणून तिच्याशी मैत्री झाली होती. वपुंचं पार्टनर मी हजारेक वेळा तरी वाचले असेल. तिलाही ते पुस्तक खूप आवडायचं- अगदी भर भरून बोलायची.  वपूंचं नाव  निघालं की. एक निखळ मै्त्री असलेली मैत्रिण म्हणजे काय ह्याचा अनुभव मला तिने दिला. दुनियादारी मधल्या कुठल्या पात्राशी स्वतःला कोरीलेट करतोस म्हणून तिने एकदा विचारले होते.. आणि माझे उत्तर होते श्रेयस.. 🙂

मैत्रिण म्हंटलं हल्ली लोकांच्या मनात  फक्त एकच भावना निर्माण होते. आपल्याकडे मैत्रिणी फार कमी असतात, पण मानलेले भाऊ , बहीण खूप असतात. माझं स्पष्ट मत आहे, की सख्ख्या भाऊ बहीण या  नात्यांशिवाय सगळी नाती एकदम खोटी- बेगडी असतात.कुठल्याही नात्याचे नांव न देता मैत्री होऊ शकत नाही का? सहज शक्य आहे ते- अगदी कुठलाही नात्याचा मुलामा न चढवता केवळ मैत्री नक्कीच होऊ शकते.  मग हा उगीच मनाचा खोटे पणा कशाला?? उगीच मानलेला भाऊ, मानलेली बहीण अशा नात्यांमध्ये मैत्रिणी चे नितांत सुंदर नाते लपेटून त्या मधल्या सुंदर नात्याची आहुती का म्हणून दिली जाते?  मला वाटतं की याचं कारण म्हणजे  आपण ज्या मध्यमवर्गीय परिस्थितीत वाढलो  – ते आहे.  एक मुलींशी बोलणे, मैत्री करण्यासाठी वापरला जाणारा सेफ मार्ग म्हणजे मानलेले नाते . बरेचसे लोकं हा मैत्रिण हा शब्द अगदी अस्पृष्य  असल्या प्रमाणे समजून केवळ मैत्रिण या नात्याचा – रस्ता बंद करून टाकतात आणि एका निर्भेळ आनंदाला  आपल्या आयुष्यात मुकतात.

मैत्रिण म्हंटल्यावर तिला तू आज सुंदर दिसतेस बरं कां.असं तुम्ही म्हणू शकता का?  जर उत्तर होय  असेल, तर तुमची मैत्री निकोप आहे असे मी म्हणेन. मैत्रिण म्हणजे गर्ल फ्रेंड, बाईक वर मागे बसून फिरणारी, मे बी फ्युचर लाइफ पार्टनर -असा अर्थ मनात धरणाऱ्या लोकांना मैत्रिण या शब्दाचा खरा अर्थ समजलाच नाही  . अशी मानसिकता असणारी  मुलं एका सर्वांग सुंदर वेगळ्याच नात्याला मुकतात. ज्यांच्या खऱ्या मैत्रिणी /मित्र आहेत त्यांच्या लक्षात येईल मला काय म्हणायचं आहे ते.

स्वतःला पण जेंव्हा खरंच  चांगल्या मैत्रिणी मिळाल्या तेंव्हा मात्र , – आणि निरपेक्ष मैत्री  मधला आनंद समजला. आता या वयातही मैत्रिणी मित्र असणे काही वावगे आहे असे मला वाटत नाही. स्त्री आणि पुरुष या नात्यांमधला एक वेगळा ’अनडिफाइन्ड टोन” ज्याला समजला त्याला मैत्रिणीचे हे  नाते म्हणजे काय ते समजू शकेल. सेक्स्युअ‍ॅलिटी ही फक्त सेक्स पुरतीच मर्यादित असते असे नाही.  अर्थात हे समजणे किंवा लक्षात येणे फार कठीण आहे, पण अशक्य मात्र निश्चितच नाही..

मैत्रिणीच्या नातं हे एकच नातं आहे की  ज्या नात्यातून आपली नैतिक उन्नती होऊ  शकते. नैतिकतेची खरी शिकवण ह्या नात्यातून मिळू शकते . स्त्री कडे पहातांना केवळ एकाच नजरेने न पहाता एक व्यक्ती म्हणून पहाण्याची सवय या नात्यातून कल्टीव्हेट होऊ शकते.  नैतिक उन्नती साठी का होईना, पण जसे आपल्या कडे स्त्रियांसाठी ३३ टक्के रिझर्वेशन नोकरी, शाळा, कॉलेज अ‍ॅडमिशन्स मधे ठेवलेले आहे, त्याच प्रमाणे आपल्या  जीवनात पण ३३ टक्के मैत्रिणीं साठी ठेवणे  आवश्यक आहे )

म्हणून म्हणतो,  हे नातं कसं श्री्कृष्णाच्या सखी सारखे असावे, द्रौपदीचा सखा असल्याप्रमाणे  असावे.. 🙂

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , , , . Bookmark the permalink.

112 Responses to मैत्रिण..

 1. Shailesh Joshi says:

  महेंद्र सुंदर आणि परफेक्ट

 2. Raj says:

  छान लेख. मलाही मारून मुटकून बनवलेले ताई-दादा फारसे झेपत नाहीत पण तसे स्पष्ट सांगितले तर बरेचदा लोक दुखावतात.
  यावर आनंद नाडकर्णींनी छान लिहीलं आहे, कोणत्या पुस्तकात ते विसरलो. बहुतेक गद्धेपंचविशी.

  • राज
   खरं आहे.. मारून मुटकून ताई दादा बनू शकत नाही. प्रत्येक वेळेस बॅक ऑफ द माइंड दादा भाई, नौरोजी ही फ्रेज रेंगाळत असते..

   • स्त्री पुरुष संबंधांबाबत आपल्या इतके दांभिक आपणच. श्रीकृष्ण द्रौपदी च्या नात्यावर २ पानांचा निबंध लिहायला सांगणारे शिक्षक(वा शिक्षिका) वर्गातील एखादा मुलगा वा मुलगी एकमेकांशी थोड्या सलगीने वागताना आढळले तर भर वर्गात सदर मुला/मुलीला अपमानित करताना आपल्या वागण्यातील विसंगती कधीच जाणत नव्हते. अर्थात अश्या घटना अनुभवणारी माझी कदाचित शेवटची पिढी असावी ( बहुतेक प्रत्येक पिढी हेच म्हणत असावी), पण नवीन सहस्त्रकात समाजात बराच मोकळे पणा आला आहे हे नक्की ( सास बहु आणि लग्नबाह्य संबंधांवरील मालिकांचा सुपरिणाम??) असो… चांगल्या विषयावरील लेख , सुरुवात खूप चांगली झाली शेवट उरकल्या सारखा वाटला. पण नेहमी प्रमाणे एक वेगळा विषय

    • पौगंडावस्थेत विद्यार्थ्यांवर वचक ठेवणे हे शिक्षकाचे कामच आहे. त्यात दांभीक पणा कसा काय म्हणता येईल?? कल्पना करा,की जर अशी सरसकट सुट दिली शिक्षकांनी, तर काही घटक याचा गैरफायदा घेणार नाहित हे कशावरून? त्या त्या वेळेस शिक्षकाचे वागणे काही चूक आहे असे वाटत नाही.
     सास बहू सिरियल्स..बद्दल अगदी १०१ टक्के सहमत..
     ह्या विषयावर लिहीणे सुरु केले, आणि अडिचहजार शब्दाचा लेख झाल्यावर थांबवला… ! ब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार.

     • aruna says:

      पौगंडावस्था ही एक अवघड स्थिती असते आणि ती पालक आणि शिक्षक दोघांनी पण जर नीट हाताळली तर मला वाटते, मुलांच्या वागण्यात विसंगती येणार् नाही त्यांचे concepts clear राहतील आणि त्यांना आयुष्यात काही problems येणार नाहीत.

  • +१ मानलेला भाऊ बनण्याचा नकार देऊन दुखावणारा आणखी एक “असभ्य” 🙂

 3. rajashree says:

  ekdam khara ahe……mast…..

 4. महेश कुलकर्णी, says:

  लेख झकास,मस्त,सुंदर,सही. छान.आवडला.

 5. mau says:

  Hmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm…..

 6. Amit Mohod says:

  सख्ख्या भाऊ बहीण या नात्यांशिवाय सगळी नाती एकदम खोटी- बेगडी असतात : 100% मान्य…
  एक वेळा मुलाची/ नवऱ्याची मैत्रीण चालवून घेतल्या जाते.. पण मुलीचा मित्र किवा बायकोचा मित्र म्हन्तल्या वर अनेक लोकांच्या कपाळावर आठ्या पडतात.. म्हणून कदाचित असली बेगडी नाती अस्तित्वात येत असावीत..

  बाकी पोस्ट नेहेमी प्रमाणेच मत जमलीये..

  • Amit Mohod says:

   coorection: बाकी पोस्ट नेहेमी प्रमाणेच मस्त जमलीये..

   • अमित
    लग्नापुर्वी पण अशा खोट्या नात्यांची झुल का पांघरतात लोकं ०- हा प्रश्न आहेच. एकदा लग्न झाल्यावर समजू शकेल, पण लग्ना आधी पण??

  • सोनल says:

   एक वेळा मुलाची/ नवऱ्याची मैत्रीण चालवून घेतल्या जाते.. पण मुलीचा मित्र किवा बायकोचा मित्र म्हन्तल्या वर अनेक लोकांच्या कपाळावर आठ्या पडतात.. म्हणून कदाचित असली बेगडी नाती अस्तित्वात येत असावीत..

   अगदी बरोबर, पटलं
   सोनल

 7. अगधी मस्त विषय घेतलात तुम्ही, मी पण कधी कधी मैत्रिण आणि गर्लफ्रेंड या मध्ये भरपूर गोंधळून जातो पण आता लेख वाचून साऱ्या प्रश्नाची उत्तर मिळाली …. आणि ब्लॉग लिहायला सुंदर विषय देखील मिळाला…..बाकी लेख नेहमी प्रमाणे अगधी सुंदर झाला आहे …

 8. सुंदर, छान लेख आहे…

  “शिरोडकर” बद्दल लिहावे लागेल 🙂

 9. Hemant Pandey says:

  काका! एखादीवर झुरणं व तिला स्पर्श न करता तिच्यावर जीवापाड प्रेम करणं, या साठी कमालीची हिम्मत लागते. म्हणतात नजरेत भावना असतात आणि कटाक्षात अपेक्षित संदेश. काका तुम्ही Time मशीन आहात. तुमचा लेख वाचताना कॉलेज चे गोल्डन दिवस आठवले. मस्त लेख.खूपच छान.

 10. Kanchan says:

  काही गोष्टी अप्राप्यच असाव्यात. एकदा लाभल्या की त्या हव्या असण्यातली खुमारी संपून जाते. काही दिवसांपूर्वीच आमच्या दहावीच्या बॅचची रियुनियन झाली. मस्त मजा आली. मधली वर्षं एकदम वजा झाली. त्यावेळेच्या गमती-जमती आठवून सगळेजण लहान झालो होतो. ते दिवस काही पुन्हा येणार नाही.

  • कांचन
   ती पोस्ट वाचलेली आठवते आणि फोटॊ पण पाहिले होते. जूने मित्र मैत्रिणी भेटले की कसा मस्त वेळ जातो हेच समजत नाही,.

 11. Nilesh says:

  Khupach Masta post.

  Nilesh Joglekar

 12. Maithili says:

  मस्त पोस्ट… 🙂 खूप आवडली…

 13. aruna says:

  काही काही गोष्टी दुरूनच चांगल्या दिसतात बरं का!

 14. jagrutk says:

  Sundar jhala e lekh… 🙂
  aani ho Duniyadari vachtana mala pan “Shreyas” aslya sarkhach vataycha (ajun suddha) 😉

  • धन्यवाद.. दुनियादारी म्हणजे बस्स दुनियादारी… झपाटले होते या पुस्तकाने एके काळी..

 15. “मैत्रिण म्हंटल्यावर तिला तू आज सुंदर दिसतेस बरं कां.असं तुम्ही म्हणू शकता का? जर उत्तर होय असेल, तर तुमची मैत्री निकोप आहे”
  मस्त लिहिलंय …….. 🙂

 16. Gurudutt says:

  अगदी मनमोकळ आणि ओघवतं लिखाण. ‘उपदेश’पांडे न होता, थोडसं अंतर्मुख करायला लावणारा attitude आहे तुमचा. 🙂 कीप गोईंग सर.

 17. shekhar says:

  apratim .sunder. ha lekh vachtana jynche vay aata 52 chya pudhe ahe tyanna ch navhe ta jyana nokri lagun 10 varsh kinva tyapekhsha jyada kal lotala ahe tya srvanna gents as well as ladies na ha lekh n awadel tar navalach.pratyekala tyachya collegelife cha 4 te 6 varshancha kal athawun thodefar swapnaranjan nakkich hoil yaat kahich shanka nahi. this is my first comment for ur blog. i receive yr posts on my emailid. once again i give thanxs aani abhinandan.

 18. Ashwini says:

  Nilkhal maitri far virala aahe nahi Kaka….pan mala milali aahe….patthyach nuktach lagna zaly pahuya kiti kal athwan thevtoy te….Hemu tyachyasathi Whisky galss gheun aala hota mhanala “is me jab whisky piyega na tab yaad karoge”…..pan maza sarwat javlacha mitra maza navra aahe he understands me very well….

 19. Pooja Muddellu says:

  मैत्रिण हा शब्द जरी उच्चारला तरीही आवाज हळूवार होतो- कापरं भरतं.. कसं मस्त पैकी पिसा सारखं हलकं हलकं वाटतं…. mala khoop avadlele hee vakya aahe mahendra kaka. javal javal saglyach mulana sech vatat asanar. khoop nemake aani netake lihita kaka tumhi. mustach!!!!!!!!

 20. yogseh says:

  Khar aahae tumchae…. agdi manatal bolalaat…
  mazya class madhil muli friendship dayla aamhala friendship band baandhat asat aani raksha bandhan la rakhi…. Tyana mitra banvayacha aahe ki bhau tech kalat navtae…..
  mulga – mulgi boltat yachech khup aproop vate. Ekhadya muline yeun bolale ki aapan koni tari bhari/khas maanus aahot asa feel yaaycha. aani itar mulana bolayala kahi tari subject milayacha…
  Pan mast hotae te diwas……

  • योगेश
   ते दिवस पुन्हा अनुभवायचे असतील तर अवश्य शाळा सिनेमा पहा. मी कालच पाहिला.. 🙂

   • yogseh says:

    आताच बघून आलो, खरच जुने दिवस आठवले. जोशी, म्हात्रे आणि ग्रुप सही जमलाय. शिरोडकर तर सहीच.. ग्रेट मुव्ही….

    • yogseh says:

     काका, शाळा पाहिल्यानंतर मला एक कविता आठवली ‘शेपटा’ नावाची. कवीचे नाव आटवत नाही आता.
     दहावीच्या परीक्षेमध्ये पुढील बाकावर बसलेल्या मुलीच्या (तीच नाव जोशी असते कवितेमध्ये) वेणी (शेपटा) मध्ये गुंतलेल्या मुलाची कविता आहे ती.
     ती कविता मी माझ्या कॉलेजच्या स्नेह संमेलनात सादर केली होती. सापडली तर शेअर करतो.

     • योगेश
      हे वाच… इथे आहे ती कविता .. कायवाटेलते वर बरेच वर्षापूर्वी लिहिले होते त्या कवितेबद्दल..https://kayvatelte.com/2009/11/12/4817/

     • yogseh says:

      कविता सापडली ……… ‘शेपटा’

      एस एस सी स बसलो होतो प्रथम परीक्षेस ,
      एकाग्रतेने प्रश्न सोडवा आदेश उपदेश
      पेपर पहिला, घंटा पहिली क्षण हा औत्सुक्याचा,
      अन माझ्या पुढे तो नंबर होता शुबदा जोशीचा
      मानेला ती देऊन झटका नकळत सवयीने ,
      लिहू लागली पानान वर पाने
      मऊ रेशमी मोहक काळा शेपटाचा भार तिचा,
      ततक्षणी येऊन पडला माझ्या बाकावर
      तीन तास एक चित्त मी तिच्या शेपत्यात,
      एक हि ओळ लिहिली नाही उभ्या पेपरात
      शेवटची ती घंटा होता आलो भानावर,
      कळले आता आपुले जिने गावी खेड्यावर
      शेतीवरती, मोटेवरती माझी उपजीविका ,
      शिक्षणास मी पारखा, शुबदा प्राध्यापिका
      केसांनी त्या गळा कापला अलग्द्ची माझा,
      परी बैलाचा पिळून शेपटा जगतो हा राजा…….

      reference -http://www.misalpav.com/node/2638

 21. Aniket says:

  खूप छान … मस्त वाटले वाचून आणि पटले देखील 🙂 पण एक गोष्ट मात्र खरी आहे कि जेव्हा एक मुलगा आणि एक मुलगी मित्र – मैत्रीण होतात, कधी ना कधी दोघांना “तो” विचार मनामध्ये येतोच. तो कोणी टाळू शकत नाही. काही लोक हे मान्य करतात काही नाही करत 😉

  • +१

   >>”उगीच मानलेला भाऊ, मानलेली बहीण अशा नात्यांमध्ये मैत्रिणी चे नितांत सुंदर नाते लपेटून त्या मधल्या सुंदर नात्याची आहुती का म्हणून दिली जाते?”
   कधी कधी ह्याने निदान त्या व्यक्तीसोबत एक नातं तरी टिकून राहतं. नाही तर कधी कधी ते टिकून राहणं देखील अशक्य होऊन जातं. टोमणे मारणारे कमी नसतात ना … 🙂

  • अनिकेत,
   तसं होत नाही.मैत्री मधे जेंव्हा मैत्री ही ’त्या’ संबंधाकडे नजर ठेऊन केलेली असते, तेंव्हाच असे होते, नाही तर तशा भावना मनात येत नाहीत . 🙂

  • Piyu says:

   जेव्हा एक मुलगा आणि एक मुलगी मित्र – मैत्रीण होतात, कधी ना कधी दोघांना “तो” विचार मनामध्ये येतोच.>> ह्यालाही बरेचदा आजूबाजूचा समाजच काही अंशी जबाबदार असतो हे सत्य नाकारता येणार नाही…

 22. Satish says:

  एक नंबर ..अगदी मनातल लिहिलंय ..पण ..लोक पण लगेच काहीबाही मनात भरवून देतात…मग दृष्टी तेवढी निकोप रहात नाही…पण मैत्रीण हवीच….

  जियो…

  • सतीश
   असं म्हणतात, माणसाचं मन हे माकडा सारखं असतं, दारू प्यायलेला आणि त्यातूनही विंचवाने डंख मारलेला…. नामदेव महाराजांचं एक सुंदर भारूड आहे यावर. पहिली गोष्ट म्हणजे, जर निव्वळ मैत्री असेल तर त्या मधे असे विचार मना मधे येणे शक्यच नाही. तुमच्या मैत्रीचा पायाच जर कच्चा असेल तर मग त्यावर काहीच बोलू शकत नाही आपण..

 23. सोनल says:

  मैत्रिच् नातं हे एकच नातं आहे की ज्या नात्यातून आपली नैतिक उन्नती होऊ शकते. नैतिकतेची खरी शिकवण ह्या नात्यातून मिळू शकते .

  छान, लेख आवडला, मैत्रीची अजून एक वाख्या कळली.

 24. SURAJ MOHITE says:

  SIR, THE BLOG IS FABULOUS BUT I CANT AGREE WITH (सख्ख्या भाऊ बहीण या नात्यांशिवाय सगळी नाती एकदम खोटी- बेगडी असतात)

 25. “….ती मात्र समोरून गेली की खाली मान घालायची आणि लाजून निघून जायची. कधी तरी पुढे गेल्यावर तिने मागे वळून पाहिले की मी अगदी कृतकृत्य होत असे.” … मस्त मस्त मस्त…..
  खरंच……त्या दिवसांतल्या त्या…. लपाछुपिची आणि नजरेच्या भाषेतली मजा…आज कालच्या affairs… मध्ये नाही…… 😦
  बाकी………..काका…”शाळा” पहिला…अचानक..७ – ८ वर्ष मागे गेल्यासारखं वाटलं…..शाळेतली..आमची…”_______कर” आठवली… 😉

 26. aki says:

  खरच हा लेख वाचून शाळेतले ते जुने दिवस आठवले.
  पण खरच म मैत्रीत जी मजा असते ती affairs आणि लफडी यामध्ये नसतेच.
  एकतर्फी प्रेम करणाऱ्या मित्राने propose केल्यावर दोघांमध्ये निखळ मैत्री राहू शकते??????

 27. Deepak pawal says:

  very nic. Bhau….tumhe….tar chamaklat……..

 28. yogesh bhoir titwala. says:

  agdi manatale bollat kaka ……

 29. Gurunath says:

  तिला आता काय म्हणु शाळेतली होती….. तुम्ही तरी “भाऊ” व्हायला नकार दिला असेल फ़क्त…… माझ्या जवळ तर राखीच घेऊन आली होती….. “मला राखी बांधू दे ” म्हणाली मी म्हणालो “उद्या मी मंगळसुत्र येतो घेऊन.. घेशील का बांधुन????”…… तेव्हा पासुन काही अचाट आचरट आयटम हवे असले की माझ्याकडे पोरांचा राबता सुरु झाला बघा!!!! 😀 😀 😀

 30. “….. मैत्रिण म्हणजे गर्ल फ्रेंड, बाईक वर मागे बसून फिरणारी, मे बी फ्युचर लाइफ पार्टनर -असा अर्थ मनात धरणाऱ्या लोकांना मैत्रिण या शब्दाचा खरा अर्थ समजलाच नाही . अशी मानसिकता असणारी मुलं एका सर्वांग सुंदर वेगळ्याच नात्याला मुकतात. ज्यांच्या खऱ्या मैत्रिणी /मित्र आहेत त्यांच्या लक्षात येईल मला काय म्हणायचं आहे ते…..”
  एक अप्रतिम लेख!!!

 31. ruchira2702 says:

  Kaka khup aavadli hi maitrin an achank janval ki arechha aapla hi ek asa mitra aahe ki…. Hi nikhal maitri nehmich sambhalnara

 32. sanam r yahan says:

  Kharch khup chan ahe mala khup aavdale………………

 33. Leena says:

  सख्ख्या भाऊ बहीण या नात्यांशिवाय सगळी नाती एकदम खोटी- बेगडी असतात

  Sorry .I do not agree with this…..at least in my case……..I have no real brother .and Prasanna ( my so called bro) has no real sis.He was my batchmate in Engg college. On one rakhipournima , he came to me and I tied a RAKHI to him .From that day we r enjoying our bro sis relation…..

  Anyways ……..
  the article is nice as usual…..

 34. Jyoti-Nikita Ghangurde says:

  khupch chhan…

 35. Nitin Jagtap says:

  Sundar..Apratim..

 36. gajanan says:

  khupach chhan, aathavatat te aamche shaletil divas aani angavar aatai kata yeto. kharach kiti sunder hote th diwas.

 37. yashnaik says:

  While Reading it remind the Shala… And than I keep reading and reading…My school days was wonderful days for me and I wish to be go back… pleasure to read your blog.

 38. yashnaik says:

  IT remind me Shala !!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s