सूर्य मंदीर -मोढेरा

 सूर्य मंदीर म्हंटलं की कोणार्क आठवतं. पण तितकंच सुंदर असलेले एक सूर्य मंदीर अहमदाबाद जवळ आहे म्हणून सांगितलं तर कदाचित विश्वास बसणार नाही.  बऱ्याच गोष्टी आपल्या जवळ असल्या की त्याकडे दुर्लक्ष  केले जाते. हे पण तसंच..

हेरिटेज वास्तू या मला नेहेमीच भुरळ घालत आल्या आहेत. हेरीटेज वास्तूंची कला कुसर पाहिली किंवा मोठमोठे दगड वर कळसा पर्यंत चढवलेले पाहिले की  हे  काम ” त्या” काळी   कसं  बरं केले  असेल हा प्रश्न पडतो. भारता मधे सर्वसामान्य जनतेला जरी हेरिटेज वास्तूंची पर्वा फारशी नसली, तरीही पुरातत्त्व विभाग आपलं काम चोख करित असतो.

अशा पुरातन वास्तू जो पर्यंत कोणी जाणकार दाखवत नाही, तो पर्यंत त्यामधला आनंद तुम्हाला मिळू शकत नाही, जर या वास्तूंची माहिती सांगणारा कोणी नसेल तर मग उगाच काहीतरी कोरीव काम केलेलं मंदीर पाहिलं, बस्स्स, यापेक्षा जास्त काही समाधान मिळत नाही. पण तेच जर एखाद्या जाणकार व्यक्तीने दाखवले की त्या  वास्तूला एक वेगळंच परिमाण (डायमेन्शन) प्राप्त होतं. या बाबतीत मी थोडा नशीबवान आहे असे म्हणायला पाहिजे. पूर्वी एकदा शिरपूरजवळ उत्खनन सुरु असतांना श्री अरूण कुमार शर्मा हे जागतिक ख्यातीचे आर्किओलॉजिस्ट भेटले होते, आणि त्यांनी उत्खनन सुरु असतांना कसे काम केले जाते ते प्रत्यक्ष दाखवले होते. त्या बद्दल पण पूर्वी या ब्लॉग वर” उत्खननाच्या साईटवर” म्हणून  लेख  लिहिला होता. या वेळेस पण जेंव्हा सूर्य मंदिराजवळ पोहोचलो, तर तिथे एक जाणकार आर्किओलॉजिस्ट पटेल साहेब भेटले, त्यांनी  आम्ही कोण कुठून आलो ही प्राथमिक चौकशी केली आणि अजिबात काही आढेवेढे न घेता मंदीर दाखवायला आमच्या सोबत आले.

मेहसाणा ! अहमदाबाद पासून  ७० एक किमी असेलेले एक शहर. मेहसाणाचं औद्योगिक दृष्ट्या असलेले महत्त्व हे त्याच्या आसपास असलेल्या  ओ एन जी सी च्या ऑफिस/साईट्स  आणि    अमूलचे   कलेक्शन सेंटर  मुळे आहे. इथे येणारे बहुतेक  लोकं याच ऑफिसच्या कामासाठी येत असतात. पण माझ्या मते, अहमदाबादला  फिरायला म्हणून आल्यावर इथे सूर्य मंदिर, रानीका वाव,  आणि पटोला साडी , पाहिल्या  शिवाय अहमदाबाद भेट पूर्ण होऊच शकत नाही.

पुष्पावती नदीच्या किनाऱ्यावर अहमदाबाद  पासून साधारण ८०-९०  किमी अंतरावर  मांढेरा गावात इ.स.१०२२ साली एक  सूर्य मंदीर बांधले गेले.  सोलंकी वंशाचे राज्य  असतांना  आणि हिंदू धर्माच्या भरभराटीचा काळ असतांना जे काही बांधकाम झाले, त्या मधले हे एक! मंदिर पाहिले, की त्याकाळच्या हिंदू डायनेस्टीची किती भरभराट झाली होती हे लक्षात येते. मंदिराच्या बांधकामासाठी  जयपुरचा सॅंड स्टॊन वापरला गेला आहे. इतक्या दुरून त्या काळी हा सॅंड स्टोन कसा आणला असेल हा प्रश्न मनात येतोच.    मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी ३८ वर्ष लागली असे म्हणतात.

मंदिर बांधण्यासाठी ही अशी लाकडी पाचर वापरलेली आहे. दोन दगडांच्या मधे..

ही अशी कोरीव काम केलेली असंख्य मंदिरं भारतात आहेत, मग या मंदिरात विशेष काय? मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यावर मोठा बगिचा आहे. हे मंदीर तसे लोकवस्ती पासून त्या काळी दूरच असावे. इथे आल्यावर देवदर्शनापूर्वी लोकांना अंघोळ वगैरे करता यावी म्हणून नैसर्गिक पाण्याचे एक कुंड बनवलेले आहे. त्या काळी खरं म्हंटलं तर ’वाव’ म्हणजे विहीर बांधण्याची पद्धत होती- पण इथे मात्र एक मोठे कुंड बांधलेले आहे.  पाण्यापर्यंत पोहोचता यावे म्हणून पायऱ्या बांधलेल्या आहेत. दोन दग एकत्र ठेवण्यासाठी   लाकडी पाचर वापरली जायची त्याचे खूणा अद्यापही काही ठिकाणी दिसतात. चौकोनी आकाराच्या या कुंडाला सौंदर्य लाभले आहे ते सभोवताली असलेल्या पायऱ्यांनी आणि त्या पायऱ्यांवर असलेल्या १०८ मंदिरांच्या मुळे. चारधाम यात्रा करणे प्रत्येकाला शक्य होत नसल्याने ह्या १०८ मंदिरातील देवतांचे दर्शन घेतले की झाले, अशी भावना होती.

सूर्य मंदिरातला सगळ्यात आवडलेला भाग म्हणजे हे कुंड..

कुंडाच्या पायऱ्यांचे एक्झॅक्ट चोकोनी असलेले आणि अगदी शेवटच्या मिलिमीटर पर्यंत  एकसारखे असलेले आकार, आणि रचना खरंच मनमोहक आहेत. मंदिराच्या जवळ पोहोचलो, की इथेच आपण त्या वास्तुच्या प्रेमात पडतो.

सगळयात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या मंदिराचा कळस हा अगदी बरोबर “कर्क वृत्ता”वर येतो. सूर्य मंदीर आहे म्हणून तसे बांधले असावे.कुंडा शेजारी  एक ५२ खांब असलेला सभामंडप आणि नंतर त्या  मागे   सूर्य मंदीर बांधलेले आहे.एका वर्षाचे ५२ आठवडे असतात, म्हणून मंदिरासमोरचा हा सभामंडप   ५२ खांबावर बांधलेला आहे!प्रत्येक खांबावर धर्म, अर्थ, काम मोक्ष अशा जीवनातल्या चारही महत्त्वाच्या गोष्टींचे शिल्प कोरण्यात आलेले आहेत.  दुर्दैवाने ह्या साठी सॅंड स्टॊन वापरल्याने सगळ्या मुर्त्यांचे कोरीव काम  बरंच झिजले  आहे.

ह्या मंदिराची उंची! ती  देखील बरोबर ५२ फुट आहे. मंदिराच्या ईशान्य दिशेला एक स्टेज बनवलेले आहे. या स्टेज वर पूर्वीच्या काळी नाच गाण्याचे कार्यक्रम  किंवा ईश स्तवन होत असावे.

मुख्य मंदिरामध्ये एक सूर्य मूर्ती पूर्वी होती ती बहुतेक नंतरच्या काळात कुठे गेली याची माहिती उपलब्ध नाही. ( आख्यायिका नुसार मुसलमानांनी ती तोडली – पण याला काहीच आधार नाही) . कर्कवृत्तावर असल्याने दर वर्षी एक दिवस म्हणजे २१ जून रोजी सूर्याच्या मूर्तीच्या चेहेऱ्यावर गाभाऱ्यात प्रकाश पोहोचतो. ह्या दिवशी सूर्य प्रकाशाचा खेळ पहाण्यासाठी बरेच लोकं येतात.

श्रुंगार करतांना.. खांबावर कोरलेली प्रतिमा

प्रत्येक खांबावर धर्म,अर्थ काम मोक्ष- या चार मूल भूत गरजा कोरल्या आहेत. धर्म – म्हणजे एखादा रामायण महाभारताचा प्रसंग, अर्थ- ज्या मधे त्याकाळच्या  धंद्याच्या देवतांचा म्हणजे विश्वकर्मा आणि  जसे शेती वगैरे करणारी माणसं, झाडं तोडताना शिल्प वगैरे इतर दररोज केली जाणारी कामं कोरलेली आहेत. काम म्हणजे काही संभोग क्रिया करतानाची शिल्पं कोरलेली आहेत. आणि मोक्ष म्हणजे विष्णू , सूर्य, कुबेर , शिव इत्यादी देवांची शिल्पं कोरलेली आहेत. प्रत्येक शिल्प हे वेगवेगळ्या विषयाला जरी वाहिलेले असले, तरीही ते एकाच खांबावर कोरले आहे हे विशेष. थोडक्यात , पूर्वी च्या काळी धर्म अर्थ काम मोक्ष या सगळ्या बाबींना काही ठिकाणी अगदी सारखे महत्त्व दिले जायचे.

मंदिराच्या बाहेरची शिल्पं ही थोडी वेगळी आहेत. विद्या सगळ्यात मह्त्त्वाची , ही गोष्ट  हजार वर्षापूर्वी पण सर्व मान्य होती, म्हणून विद्येच्या   देवतेचे सरस्वतीचा शिल्प   मंदिराच्या सर्वोच्च म्हणजे  कळसाच्या जवळ कोरलेले आहे.   , म्हणजे सर्वोच्च ठिकाणी विद्येच्या देवतेचे सरस्वतीचे चित्र कोरलेले आहे.

मंदिराच्या बाहेरच्या भागाकडे पाहिले तर सगळ्यात खालच्या भागात म्हणजे पायाजवळ १०८ हत्ती कोरलेले आहेत, आणि प्रत्येक हत्तीची सोंड ही वेगवेगळ्या दिशेला वळलेली  कोरलेली आहे. या पैकी बरेच हत्ती खराब झाले असले तरी अजून काही हत्तींचे सौंदर्य मात्र अजूनही दिसून येते. लहान मुलं जेंव्हा मंदिराला प्रदक्षिणा घालतील तेंव्हा त्यांच्या नजरेच्या टप्प्यात  येतील अशा तऱ्हेने ही हत्तीची  शिल्पं कोरली आहेत .

पूर्वीच्या काळी साधारण चौदा वर्ष वयाच्या मुलाला स्त्री पुरुषांच्या संबंधातील  ज्ञान मिळावे अशी अपेक्षा असायची. त्यामुळे चौदा वर्षाच्या मुलाच्या  नजरेच्या उंचीच्या टप्प्यावर येईल अशा तऱ्हेने मंदिराच्या चारही बाजूने  संभोग चित्रे कोरलेली आहेत – ज्या मधे समूह संभोग , किंवा त्या संबंधातील इतर विषयही वर्ज नाहीत. आजच्या युगातसुद्धा  आपण सेक्स एजुकेशन असावे की नसावे या बद्दल चर्चा करतो,पण कुठल्याही निर्णयावर येऊ शकत नाही,  पण पूर्वीच्या काळी मात्र  ते  अस्तित्वात होते ही वास्तविकता किती अविश्वसनीय वाटते नाही??

याच्या चित्रांच्या वरच्या उंचीवर, म्हणजे तिसऱ्या टप्प्यात  मोठ्या आकारात    सूर्य देवाची सात घोडे असलेल्या रथावर बसलेली प्रतिमा, तसेच कुबेर , अप्सरा इत्यादींचे कोरीव काम केलेले आहे. इथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, की संभोग चित्रे ही अतिशय लहान आकारात, तर इतर देवांची आणि अप्सरांची चित्रे ही त्यापेक्षा दहा पट किंवा त्याहूनही जास्त मोठ्या आकारात आहेत, म्हणजेच शारिरीक गरजांपेक्षा आध्यात्मिक गरजांना मोठेपण दिले गेलेले आहे.

समुद्र मंथन,सीतेचे अपहरण, हनुमानाच्या संजिवनी आणण्याचा प्रसंग वगैरे बरेच प्रसंग पण चित्रित केलेले आहेत- पण सॅंड स्टोन वापरल्याने नैसर्गिक झिज झाल्याने नीट कोणीतरी दाखवल्याशिवाय आणि समजून सांगितल्याशिवाय  समजत नाही. पटेल साहेब सोबत होते, म्हणून  त्यांनी सगळं काही व्यवस्थित समजावून सांगितले,

पटेल साहेब म्हणाले की परतीच्या रस्त्यावर एक  “वाव” म्हणजे स्टेप वेल च्या उत्खननाचे काम सुरु असलेले दिसेल . ही स्टेप वेल पूर्वीच्या काळी गावातल्या लोकांच्या पाण्याचे साधन होती. इथे सामान्यपणे विहिरींची खोली ७० फूट ते १०० फूट असायची- हल्ली आपण बोअर वेल पण तितकीच खोल करतो, आणि साधी विहीर ही २५ फुटा पर्यंत खोल असते. असो..हे पोस्ट फार मोठं होतंय-  या विषयावर आणि “रानीका वाव” वर  एक वेगळं पोस्ट  याच पोस्टचा दुसरा भाग म्हणून   लिहीन..

तुम्ही कधी तिकडे गेलात, तर पहातांना काही गोष्टींची माहिती असावी म्हणून हे पोस्ट!

This slideshow requires JavaScript.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in प्रवासात... and tagged , , , , , . Bookmark the permalink.

48 Responses to सूर्य मंदीर -मोढेरा

 1. सुंदर माहितीपूर्ण लेख. फोटो सुद्धा सुंदर आले आहेत.

 2. Mangesh Nabar says:

  आपण जो पुढील लेख ‘रानीनु बाव’ वर लिहिणार आहात, त्याची वाट पाहू. कारण प्रस्तुत लेख सूर्य मंदिरावरील अत्यंत वाचनीय आहे. छायाचित्रे उत्तम आहेत. मी रानीनु बाव ही विहीर पाहिलेली आहे. असेच लिहित राहा.
  मंगेश नाबर.

  • मंगेश
   रानीनू बाव पण सुंदर आहेच. तिचे आर्किओलजिकल महत्त्व वादातीत आहे. पण मला स्वतःला अहमदाबादची वाव जास्त आवडते. ही रानिनूं वाव खूप मोठी आणि अवाढव्य आहे. पण एक बाकी आहे, की इथले कोरीव काम जास्त सुंदर आहे.

 3. Guru says:

  यु.पी.एस.सी च्या आमच्या सिलॅबस मधे सोलंकी राजवंशावर २ चॅप्टर आहेत अख्खी!!!!!, अन सुर्यमंदीरे, त्यांची स्थापत्यकला, पोझिशनिंग, त्यांचे सोलर कॅलेंडर सोबत असणारे जबरदस्त सिंक्रोनायझेशन हा माझा पुढच्या ४ वर्षांसाठी रिसर्च सब्जेक्ट असणार आहे पी.एच.डी चा!!!!! त्यामुळे लेख आवडलाच आवडला हो काका, शिवाय फ़ोटो फ़ारच भारी आहेत

  • गुरु
   मेस्मरायझिंग अनूभव आहे इथे भेट देणे म्हणजे. मस्ट सी लोकेशन आहे हे. बरेचदा वाटतं की जर सॅंड स्टॊन न वापरता ग्रॅनाईट सारखे द्गड वापरले असते तर कदाचित सगळ्य़ा मुर्त्या छान राहिल्या असत्या.
   आणि कर्क वृत्त इथूनच पास होतं, हे कसं काय समजलं असेल? आपण पूर्वजांच्या ज्ञानाला फार कमी लेखतो बरेचदा! नाही का?
   आणि तुला आता पिएचडी ची काय गरज आहे? झालं, नोकरी लागली नां.. चालू दे की व्यवस्थित.. 🙂

   • Guru says:

    काका इतिहास हे पॅशन म्हणुन मला पी.एच.डी करायची आहे, नोकरी तर आहेच पण प्रगती करायचीच असली तर कंफ़र्ट झोन मधे बसुन नाही होणार अन माझे डीपार्टमेंट मला स्टडी लीन द्यायला तयार आहे म तर अजुनच इच्छा बळावली माझी डॉक्टरेट साठी!!!!

 4. savitarima says:

  केवढा अनमोल ठेवा तुम्ही सर्वांसमोर मांडला आहे, अतिशय सुबकपणे …धन्यवाद.

  • सुमेधा
   प्रतिक्रियेसाठी आभार. एखादी गोष्ट खूप आवडली की तिच्याबद्दल लिहून शेअर केल्याशिवाय चैन पडत नाही मला. ब्लॉगिंगचा परीणाम! 🙂

 5. संजीव says:

  मी मोढेरावर लिहिलेलंसुद्धा वाचून पहा. कदाचित आवडेल..!
  http://chalatmusafir.wordpress.com/2011/11/14/sun-temple-at-modhera/

 6. Tanvi says:

  महेंद्रजी आज तुम्हाला विचारणारच होते की सुर्य मंदीरावर पोस्ट लिहिणार होतात ती कुठेय ?? 🙂

  खूप सुरेख माहिती…. आणि फोटोही…

  ही अशी मंदीर खरं तर अगदी शांत वातावरणातच जास्त मोहक वाटतात… तसे त्र्यंबकचे मंदीरही खूप सुरेख आहे पण गर्दीत अगदी नको वाटते… जुन्या नाशकात फारशी प्रसिद्ध नसलेली दगडी बांधकामांमधली अतिशय सुरेख मंदीर आहेत….
  या मंदीराचे बांधकाम आणि त्यातले बारकावे खरच पहात रहावे असे आहेत….

  • तन्वी
   कामाच्या व्यापात राहून गेलं होतं. मागचा आठवडा मस्त गाणी ऐकण्यात घालवला. लाइव्ह कॉन्सर्ट्स ऐकल्या .त्यामुळे ब्लॉग कडे दुर्लक्षच झालं होतं. आता पुढला लेख पण लवकरच पूर्ण करतो. त्र्यंबकचं मंदीर पण सुंदर आहे, पण त्याची काहीच माहिती मिळाली नाही. मी गेलो होतो तेंव्हा पण बराच तपास केला होता.
   सुपर्णा सध्या वाईच्या वाड्यांमधल्या भित्तिचित्रांच्या पुस्तकाचे परिक्षण करते आहे. अतीशय सुंदर आहे वाई सुद्धा. एकदा मुद्दाम पहायला जाणार आहे मी… मी सांगतो पुस्तकाचे नाव नंतर..

 7. नेहमीप्रमाणेच अत्यंत माहितीपूर्ण पोस्ट.. अगदी तिकडे जाउन आल्यासारखं वाटलं..

  >>अशा पुरातन वास्तू जो पर्यंत कोणी जाणकार दाखवत नाही, तो पर्यंत त्यामधला आनंद तुम्हाला मिळू शकत नाही.

  अगदी खरंय. आणि तुम्ही त्याबाबतीत फारच नशीबवान आहात 🙂

 8. Madhuri says:

  Photo ani mahiti uttam.
  Kalach ethe Science channelwar what ancient Indians gave to world asha aashayachi film pahili ani aaj he post wachle. Tyat tyani water conservation madhe asha kundacha ullekh kela ahe ani agdi thodkyat kase va kuthe bandhat he dakhvun dile ahe. ekhadya zadacha adhar samjun tithe U shape madhe khali jaat ani nantar bajune kund purna karat. tyasathi mothe dagad khali neun payrya banwawya lagat.

  Dusre example Konark Surya mandirache dile ahe. I think te ata UNESCO chya under yete. Tyana tyachi blue print sapadli ahe bhurjapatrawar. tyat heavy wastu uchalayaa hatti ani taraf yacha wapar nondawlela aadhalla mhanun bahutek sarwa mandirat he hatti distat.

  Actually ase documentation aplya pratyek puratan vastupashi hawe nahitar kahi samjat nahi. ek choto film kinwa chote falak kam kartat ani mahiti milte….

  Tumhala ti documentary nline milali tar paha…Scify channel war hoti…aaple numbers, astronomy, architecture, Jantar Mantar, ayurwed atc sangitle ahe

  maza unicode chalat naslyane englishmadhun lihite ahe.
  Madhuri(mpmate@blogspot.com)

  • माधुरी
   शोधतो ती डॉक्युमेंट्री -पण जर नक्की नांव सांगितलं तर डाउनलोड करता येईल. आयएमडीबी वरची लिंक दिली तरीही चालेल.
   ’एनशिएंट एलियन्स’ नावाची एक टेलिव्हिजन सिरिज आहे ती पण पहा. खूप सुंदर आहे. मी टोरंट वर डाउनलोड करून पाहिली होती.
   आपल्याकडे पुरातन स्थळी साधी माहिती देणारे बोर्ड पण लावलेले नसतात. इव्हन एखादा गाईड पण सापडत नाही. हा अनुभव बरेचदा आलाय मला.

 9. GanesH says:

  काका मस्त माहिती दिलीत …
  फोटो खूप सुंदर आले आहेत.
  कोणता कॅमेरा आहे काका तुमच्या कडे ?

 10. नमस्कार दादा,
  मस्त झालाय हा लेख. मोढेराला काही भेट दिलेली नाहीये अजुन. पण “कोनार्क’ला जाण्याचा मात्र एक योग आलेला होता काही वर्षांपुवी. तो अनुभवही असाच थक्क करणारा होता. त्यावेळी त्यावर एक लेख लिहीला होता मी माझ्या ब्लॉगवर.
  इथे पाहता येइल : http://yedchap.blogspot.in/2010/07/blog-post_21.html

  • कोनार्कचंम ्मंदिर मी पण पाहिलं होतं, पण बऱ्याच वर्षापूर्वी.. लेख वाचतो .. 🙂 धन्यवाद.

 11. आजच्याच वर्तमानपत्रात एक बातमी आलीय. कोनार्कच्या मंदीराच्या गर्भगृहाचे (जगमोहन) थ्री डी लेझर स्कॆनींग करण्यात येणार आहे लवकरच. काही दशकांपूर्वी जगमोहनच्या भिंतींचे काही दगड खचायला सुरूवात झाली होती. तेव्हा ब्रिटीशांनी संभाव्य धोका लक्षात घेवून मंदीराचा तेवढा भाग बंद करुन टाकला होता. आता नव्याने ’जगमोहन’ दालनाचे तसेच मंदीराच्या काळ्या पाषाणात घडवलेल्या कळसाचे थ्री डी लेझर स्कॅनिंग करण्यात येणार आहे.

  • कोनार्कच्या मंदीराचे समुद्राच्या हवेमुळे बरेच विघटन झाले आहे. अशीही अख्यायिका आहे, की पूर्वी या मंदीरात एक मुर्ती हवेत तरंगत ठेवली होती- वर आणि खाली मॅग्नेट लावून मध्ये मुर्ती होती. एकदा एक जहाज किनाऱ्याकडे ओढल्या गेले, आणि मग म्हणून ते मॅग्नेट्स काढण्यात आले. ( मला गाईड ने सांगितल्याचे आठवते. )

   • हो मलाही तसेच कळाले होते. असे म्हणतात की ते चुंबक इतके शक्तीशाली होते की ती मुर्तीच नव्हे तर मंदीराचे छत देखील त्याच्याच आधाराने तग धरुन होते. ते चुंबक काढल्यावर कालौघात ते ढासळायला सुरुवात झाली, म्हणुनच ’जगमोहन’ बंद करण्यात आले होते.

    • विशाल,
     अख्यायिका बऱ्याच असतात, बऱ्याच तर गाईड्स मुद्दाम तयार करतात – लोकरंजनासठी म्हणून. या मांढेराच्य सूर्य मंदीरात अल्लाउद्दीन खिलजी येऊन गेला अशी अख्यायिका आहे. पण जर तो आला असेल तर त्याने केवळ लहान मुर्त्या का फोडल्या? सूर्याची मोठी मुर्ती, कुबेर आणि अशा अनेक मुर्त्या का फोडल्या नाहीत?? तरीही जूनी मुर्ती कुठे गेली? मला वाटते बहूतेक चोरीला गेली असावी आणि एखाद्या संग्रहाकाच्या खजिन्यात असेल पडलेली – भारतात किंवा भारता बाहेर सुध्दा शक्य आहे.

 12. ruchira says:

  Namskar kaka, post khup aavdli, as an architect ,ashya barych buildings cha abhyas kela pan tumhi khup sunder varnan kel.

 13. सोनल says:

  तुमची शेअर करण्याची सवय चांगली आहे त्या मुळे आम्हाला हि माहिती मिळते. बाकी लेख खूप चांगला आणि माहिती पूर्ण आहे.

 14. दीपाली says:

  हे पुरावे पहिले कि असा नक्की वाटतं कि आपले पूर्वज आपल्या पेक्षा खूप प्रगत होते. आपल्या सभोवती अश्या बर्याच अर्तक्य गोष्टी आहेत कि ज्या आपल्याला समजू शकत नाही. ह्या करता “पृथ्वीवर माणूस उपराच” आणि “अज्ञाताचे विज्ञान” हि दोन पुस्तकं आवश्य वाचायला पाहिजे. दोन्ही पुस्तकांचे लेखक आहेत डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी. फार मोठी नाहीत हि दोन्ही पुस्तकं. लेख नेहेमी प्रमाणेच मस्तं आणि माहितीपूर्ण.

  • दीपाली,
   जर पृथ्वीवरचा माणूस आवडलं असेल, तर एनशिएंट एलियन्स ही सिरीज नक्की पहा. टोरंट वर डाउनलोड करायला उपलब्ध आहे. अप्रतीम सिरीज आहे ही.

 15. mau says:

  अतिशय सुंदर माहिती..खुप आवडला लेख..तुमच्यामुळे इतकी छान माहिती मिळाली..धन्यवाद !!

 16. aruna says:

  महेन्द्रजी
  तुमचे सगळेच लेख नेहेमी महितीपूर्ण आणि अभ्यास्पूर्ण असतात. महिती तर मिळतेच, पण तिथे जाऊन बघण्याची इच्छा प्रबळ होते. मला पण जिथे जईन तिथली माहिती जमवायला आवडते. नेहेमीच यश मिळते असे नाही. पण कधी कधी काही gems अचानक सापडतात. राजस्थान मधे गेले असता होटेल मधे एक फोटो होता of a young boy on horse and an old retainer with him. out of curiosity i asked about it. the story surprised me. i think it is Jessalmer, not sure but will find out again, it seems that the young boy was the prince. his father was killed in a war against the Mughals. the faithful Sardar Durgadas saved the prince. took him out through forest,all the way to Maharashtra, to Shivaji Maharaj. the young prince was given refuge, training and all the help to return to his principalily . he foufgt and won back his seat.
  quite a story! and i got it confirmed again from our tour guide. no one knows about it here. any other confirmations?
  sorry for writing in English.

  • यातल्या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या सहभागाबद्दल काही माहिती नाही, पण ही कथा जोधपुरच्या महाराणा अजीतसिंगाच्या आयुष्याशी मिळती-जुळती आहे. तिथेही एक दुर्गादास राठौर आहेतच. पण अजीतसिंगजींचे पिताश्री महाराणा जसवंतसिंग हे औरंगजेबाच्या दरबारचे एक अधिकारी सदस्य होते. (मांडलिक राजा) त्यामुळे मुघलांबरोबरच्या त्यांच्या युद्धात मारले जाण्याचा प्रश्न येत नाही.
   पण त्यांच्या म्रुत्युनंतर (त्यावेळी त्यांना अजुन मुलबाळ नव्हते) औरंगजेबाने त्यांचे राज्य ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या मृत्युनंतर काही दिवसांनी त्यांच्या दोन्ही राण्यांनी मुलांना जन्म दिला. त्यातील एक जन्मत:च मरण पावला, जो जगला ते अजीतसिंग ! पण बादशाहाने अजितसिंगाला वारस मानण्यास नकार दिला, त्यामुळे त्याला अद्न्यातवासात जावे लागले. नंतर काही वर्षांनी दुर्गादास राठौरच्या मदतीने अजीतसिंगाने आपले राज्य परत मिळवले अशी काहीशी कथा आहे.

   • शिवाजी महाराजांकडून सहाय्य मिळालेला राजपुत्र म्हणजे बुंदेलखंडाचे महाराणा छत्रसाल होत. तुम्ही म्हणताय ते छत्रसाल असु शकतात, पण जेसलमेर आणि बुंदेलखंड हे सुत्र काही जुळत नाही. 🙂

   • aruna says:

    विशाल
    तुमचे बरोबर आहे. जोधपूरकी जेसलमेर या बाबतीत खात्री होत नव्हती. बाकी तुम्ही दिलेली सगळी माहिती बरोबर आहे. शिवाजी राजांच्या बाबतीत मी दोन दोनदा विचारले. ती माहिती पण करीच असण्याचा दाट संभव आहे.

 17. अभिषेक says:

  छान माहिती काका.
  अशा पुरातन वास्तू जो पर्यंत कोणी जाणकार दाखवत नाही, तो पर्यंत त्यामधला आनंद तुम्हाला मिळू शकत नाही. >> आणि अशी जाणकार माहिती तुम्ही आम्हाला देता या सारखा आनंद नाही! धन्यवाद!

 18. महेश कुलकर्णी, says:

  माहितीपुर्वक लेख सुंदर,सही,

 19. Archana Sujit says:

  very very informative………. Simply wonderful

 20. Thanks for information….

 21. खूप छान सर तुमची प्रत्येकच पोस्ट खूप Unique आणि काहीतरी ज्ञानात भर पडणारी असते !
  सर मी अगदी थोडे दिवसांपासून ब्लोग लिहायला सुरु केलय तुम्हला वेळ मिळेल तेंव्हा
  Pls have a look on below link :
  http://perfectkidegiri-adi.blogspot.in/

  तुमच्याकडून लिखाणासाठी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन नक्की आवडेल !!

  • आदिती,
   प्रतिक्रियेसाठी आभार. ब्लॉग पाहिला.. छान सुरुवात आहे. पु्ढील ले्खनासाठी शुभेच्छा..

 22. खूप खूप धन्यवाद सर !!

 23. suneeta says:

  khupach chhan,second sun temple ahemdabad jawal ahe ani photos pahun khup awadle.waiting for your next raniki wava

 24. Meena Thayalan says:

  Tumcha blog asech Sardesai’s varun sapadla, vachat gele, chchan lihita, mahiti perfect aste mi Ahmadabad paryant jaunhi Suryanarayanana nahi bhetu shakle pahu kadhi yog yeto te pan pahin teva tumcha lekh najre samor nakki yeil, aajhi mandir pahun alya sarkhech vatte ahe, tarihi yachi dehi yachi dola pahile pahije . Thanks a lot.

  • मीना
   ब्लॉग वर स्वागत. आणि अभिप्रायासाठी आभार.
   अहमदाबाद मधे सहा म्युझियम्स आहेत. तसेच हुसेनची गॅलरी पण आहे. अशा अनेक गोष्टी असूनही तिकडे कोणी लक्ष देत नाही. ठरलेल्या चार पाच ठिकाणी भेट देऊन परत येतो आपण. कॅलिको ची कपड्याचे म्युझियम पण पहाण्यासारखे आहे. तसेच मोहंजोदारोहरप्पा संस्कृतीचे उरले सुरले अवशेष पण मस्ट सी आहेत.. 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s