रानीकी वाव – वर्ल्ड हेरीटेज

raniki vav, patan, step well

वाव चा आतून काढलेला फोटो. आम्हाला आत जाऊ दिले गेले नाही , म्हणून बिग बी ब्लॉग वरून घेतलाय हा फोटो.

नजरेसमोर ते दृष्य़ उभे रहात होते. साधारण पणे  इस. ११२२ ते ११६० चा काळ. सरस्वती नदी शेजारी असलेले एक पाटण नावाचे गांव- गुजराथची मुख्य व्यापारी पेठ. पावसाचे थैमान –  सगळीकडे नुसतं पाणी पाणी झाल्याने प्रत्येक माणूस स्वतःचे  आणि आपल्या कुटुंबियांचे प्राण वाचवण्यासाठी हाती लागेल ते सामान घेऊन त्या जागेपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असेल….. हे सगळं होत असतांना ती रानीकी वाव मात्र नदीच्या गाळाने भरल्या जात होती. ४० वर्षा्चे कष्ट हे एका क्षणात मातीमोल  झाले होते.

पण जरी या सगळ्या लोकांच्या दृष्टीने हा सरस्वती नदीला आलेला पूर आपत्ती असला, तरीही आर्किओलॉजीस्टच्या दृष्टीने   महत्त्वाचा ठरला आहे हा पूर. इतकी विपत्ती आली, घरं वाहून गेले असतील.. प्राण गेले असतील, पण या पुरामुळे एकच चांगली गोष्ट झाली, ती म्हणजे ’रानी की वाव’ नदीच्या गाळाने पूर्णपणे भरून गेली.

नंतर कदाचित पूर ओसरल्यावर तिथे रहाणारे लोकं परत येऊन त्यांनी आपलं पुनःप्रस्थापन केले असेल, पण गाळाने भरलेली ही विहीर मात्र त्यांनी स्वच्छ केली नाही. कदाचित १०० फुट गाळ काढायचा कंटाळा केला गेला असेल , किंवा या वाव च्या जवळपास रहाणाऱ्यांचे स्थलांतर झाले असेल – आणि ही वाव मात्र काळाच्या उदरात गडप झाली असावी.

पूर्ण वळसा घालून आल्यावर पायऱ्या उतरण्यासाठी पहिल्या पायरीवर उभा राहून घेतलेला फोटो

पुढे अनेक शतकं या ’वाव’ चं अस्तित्व पण लोकांच्या लक्षात राहिलं  नाही. या काळात त्या वाव मधल्या सगळ्या कोरीव काम केलेल्या मुर्त्या  वाव मधे भरलेल्या गाळाखाली -जमिनीखाली दफन राहिल्या मुळे सुरक्षित राहिल्या. मग मोगलांचे आक्रमण, मुस्लीम राजांचे हिंदूंच्या देवतांचे विटंबन करणे ह्या सगळ्या प्रकारातून या मुर्त्या आपोआपच बचावलेल्या गेल्या , आणि ही ११ व्या शतकातली एक सुंदर सांस्कृतिक  (धरोहर ) – वारसा आपल्या पर्यंत  एकदम सुस्थितीत पोहोचला. इष्टापत्ती किंवा ’ब्लेसिंग इन डिसगाइज”, म्हणजे हेच का ते?

या विहिरीचे उत्खननाचे काम पुन्हा स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजे १९५८ साली सुरु केले, आणि मग जेंव्हा एका पाठोपाठ सुंदर कलाकृती बाहेर निघू लागल्या तेंव्हा या  ’वाव’ ला राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून घोषित केले गेले.युनेस्कोने मात्र याला वर्ल्ड हेरिटेज चा दर्जा हा १९९८ साली दिला.

राणी उदयमतीने आपल्या पतीच्या  -राजा भीम देव च्या ,स्मरणार्थ  या “वावचे” निर्माण कार्य १०२२ मधे   १०६० पर्यंतच्या काळात केले, म्हणून याला रानीका वाव म्हणून ओळखले जाते. साधारण पणे ४० वर्ष  या विहिरीचे बांधकाम चालले.    पूर्वीच्या काळी दिवंगत पती किंवा पत्नीच्या स्मृती प्रीत्यर्थ समाजोपयोगी  किंवा धार्मिक वास्तू बनवण्याची  परंपरा असावी, म्हणूनच या अशा ’वाव’चे निर्माण कार्य हाती घेतले असावे. पांथस्थांना  पाणी मिळावे आणि आरामही करता यावा हा उद्देश होता या मागचा.गुजरातचा हा भाग म्हणजे तसाही पाण्याची कमतरताच. वॉटर टेबल पण बराच खाली असल्याने अगदी भर उन्हाळ्यातही पाण्याची टंचाई जाणवू नये ,  हा एक उद्देश असावा. ’वाव’ च्या भिंतीवर वेगवेगळ्या पुराणकाळातल्या मुर्त्यांचे कोरीव काम करून  सजवण्याचे कारण  धार्मिक उद्देश असावा .

तुम्ही ’वाव’ च्या प्रांगणात पोहोचलात की बऱ्याच अंतरापर्यंत  मस्त पैकी हिरवेगार लॉन दिसते. लॉन मधून चालत जाण्यासाठी एक टाइल्स लावून रस्ता बनवलेला आहे. त्या रस्त्यावरून थोडं चालत गेल्यावर तुम्ही त्या ’वाव’ च्या जवळ पोहोचता, आणि ती वाव दिसल्यावर इतकं सुंदर बांधकाम पाहून   साहजिकच तोंडातून ” वॉव” निघाल्याशिवाय रहात नाही.

तुम्ही वाव जवळ पोहोचताच तिचा २२० फुट लांब, आणि ६८ फुट रुंद असलेला आकार पाहिल्याबरोबर तिच्या भव्यतेची कल्पना येते, ही विहीर १०० फुट  खोल आहे. आणि त्या काळात केवळ मॅन्युअल लेबर ने  हे काम करायला ४० वर्ष लागले यात काहीच आश्चर्य नाही.

जमिनीच्या लेव्हल पासून सुरु होणाऱ्या पायऱ्या तुम्हाला खाली वाव मधे खालच्या लेव्हल पर्यंत म्हणजे थेट पाण्यापर्यंत  घेऊन जातात. या पायऱ्यांवरून उतरतांना एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे एका रांगेत सरळ पायऱ्या नाहीत, तर सूर्य मंदिराच्या कुंडातल्या पायऱ्यां प्रमाणे दोन तीन सरळ पायऱ्या , आणि मग आडव्या पायऱ्या अशी रचना आहे. म्हणजे पायऱ्या उतरताना तुमचे तोंड एकदा खालच्या दिशेने असते, तर दोन पायऱ्या उतरल्यावर आडव्या पायऱ्या असल्याने तुम्ही वाव च्या भिंती कडे पहाता.

पायऱ्या  अशा करण्याचे कारण पूर्वीच्या  सूर्य मंदिराच्या पोस्ट मधे लिहायचे राहून गेले, ते आता इथे लिहितोय. हे केवळ दिसायला चांगलं दिसतं म्हणून नाही, तर लोकांच्या सुरक्षिततेचा विचार यात केलेला आहे. जर उतरतांना एखाद्याचा पाय वगैरे घसरला तर एकदम विहिरीच्या तळाशी जाऊन पोहोचू नये हे कारण असावे.

पूर्वी अडाळजची वाव पाहिलेली असल्याने मनातल्या मनात त्या वाव शी तुलना केली जात होती. पण खरं सांगायचं, तर ते योग्य ठरणार नाही. दोन्ही वाव ची शिल्पकारीता पूर्णपणे वेगवेगळी आहे, या वाव मधे दशावताराचे पूण चित्रण केलेले आहे. ८०० च्या वर कोरीव कलाकृती , मुर्त्या वापरून ही वाव आतून सजवलेली आहे, तर अडाळज च्या वाव मधे मात्र कोरीव कामावर जास्त भर दिलेला आहे.

रानीका वाव मधे  द्शावताराचे पुर्ण चित्रण केलेले आहे. यातले वराहावतार आणि वामनावताराचे शिल्प अतिशय सुबक आणि रेखीव आहे. त्याच सोबत नाग कन्या, देवकन्या, श्रृंगार करणाऱी स्त्री, महिषासुरमर्दिनी, लक्ष्मी नाराय़ण, ब्रह्मा, विष्णू, गणेश अशा अनेक नितांत सुंदर प्रतीमा कोरलेल्या आहेत.

काय वाटेल ते, स्टेप वेल, रानी की वाव,

ट्रॅडिशनल गुजराथी डीझाइन.. आजही गुजरात मधे साड्य़ांवर हेच डिझाइन थोडा फार बदल करून वापरले जाते.

स्त्री वाचकांना, गुजराती साड्य़ांच्या डिझाइनचा एक खास पॅटर्न माहिती असेलच. तोच पॅटर्न इथे दगडांमधील कोरलेला दिसतो. म्हणजे आजही जे डिझाईन ट्रॅडीशनल गुजराती साड्यांमधे वापरले जाते ते दहा शतकं जुने आहे. इथे त्याचे फोटो देतोय.

या विषयावर काही जास्त लिहिण्यासारखं नाहीच, जे काही आहे, ते पहाण्यासारखं आहे ! तरीही हा एक लहानसा प्रयत्न!

This slideshow requires JavaScript.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in प्रवासात... and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

43 Responses to रानीकी वाव – वर्ल्ड हेरीटेज

 1. vivek Vatve says:

  मला ही माहिती खूप आवडली. मस्त, छान. एकदां तरी पहायलाच हवं तिथं जाऊन. या सुंदर माहितीबद्दल धन्यवाद.

  – विवेक वाटवे
  vrvatve@rediffmail.com

 2. Mangesh Nabar says:

  अप्रतिम छायाचित्रे सादर केली आहेत आपण. पण आपण लिहिता, की आत जाऊ दिले नाही. आम्ही तेथे दोन तीन वर्षांपूर्वी गेलो होतो. तेव्हा आम्हाला अगदी खाली शेवटपर्यंत जाता आले होते.
  मंगेश नाबर.

  • मंगेश
   खाली पायऱ्या उतरल्यावर बॅरीअर्स लावले होते. काही काम सुरु होतं बहूतेक. तिथूनच वर परत यावं लागलं. बहूतेक काम संपलं की पुन्हा सुरु करतील.

 3. mau says:

  सुंदर माहिती..गुजरातेत राहुन अशा बर्‍याच गोष्टी अजुन बघायच्या राहिल्या आहेत..:(
  तुमच्या लेखामुळे भरपुर माहिती मिळते आणि लवकरच बघायला मिळेल अशी आशा ही वाटते..मी नावे लिहुन ठेवली आहेत..काय काय बघायचय ह्याची..असो !!!
  धन्यवाद !!!ः)

  • उमा
   हे असंच असतं. पिकतं तिथे विकत नाही असे म्हणतात ना ते हे असं.. मी नागपूरचा , पण पचमढी काही अजून पाहिलेले नाही.. 😦

   • Guru says:

    काका कह दो की ये झूठ है!!!!!, तुम्ही पचमढी नाही पाहीले??????? बॉस एक बार देखो, ते धुपगढ चे शिखर पाहीले की कळते…. सातपुडा किंवा विंध्याचलाला “दक्षिणरक्षक” पर्वतराजी का म्हणायचे ते!!!! बेलाग बेताल…. सह्याद्री बेलगाम तरीही सहृद वाटतो, शौर्याचा कदरदान वाटतो पण विंध्यगिरी मसणातल्या बैराग्यासारखा आहे….. तिथे दयामाया नाही… अगदी भरपुर वर्दळ असणा~या पॉईंट्स वर पण थोडा वेळ मागे एकटे दुकटे रेंगाळलो तरी फ़ाटायला होते काही काही पॉईंट्स वर!!!! मस्ट सी!!!!

 4. गौरी says:

  काका, सुंदर माहिती आणि फोटो. एक नवीनच जागा समजली. आता तुमच्याकदून माहिती घेऊन एक गुजरात ट्रिप करायला पाहिजे 🙂

  • गौरी,
   गुजरात मधे गेले कित्येक वर्ष जातोय, पण बऱ्याच गोष्टी मी पण पाहिलेल्या नाहीत. पण जे काही पाहिलंय त्यांची माहिती नक्की देईन.

 5. Girish says:

  reliance var pan article liha mbk.. that also is an marvel by itself, isnt it?

  • गिरिश,
   रिलायन्सचे ते दिवस विसरला नाहीस तर ! काय वेड्यासारखं काम केलं होतं नाही ? तो रिलायन्सचा प्लांट उभा करण्यात आपलाही हातभार लागला होता. रिलायन्सवर म्हणजे तिथे केलेल्या कामाचा अनूभव लिहीला जाऊ शकेल.. पण लोकांना आवडेल तो वाचायला?? असो, तरीही एखादं लहानसं आर्टीकल नक्कीच लिहू शकतो.

 6. anuvina says:

  एखाद्या स्थळाचे इतके अप्रतिम वर्णन फारच कमी लोकं करू शकतात. उत्कृष्ठ मांडणी आणि त्याला पूरक अशी छायाचित्रांची जोड निव्वळ अप्रतिम. असेच सुंदर सुंदर वाचायला मिळून दे हीच सदिच्छा.
  अनुविना

 7. Madhuri says:

  Nice article. Last time we saw the adlaj ki bawdi. This looks wonderful. Asha sites travel channelwar takun jast lokanipahayla hawyat. Tya aplya travelcompanychya agendawar kadhich nastat. Aso.

  Etke sunder koriv kaam khup lokani baghawe ani te jatan whawe ase nehemi watte.

  • माधुरी
   अशा गोष्टी पहाण्याची आणि एंजॉय करण्याची आवडच असावी लागते. आपल्याकडे लोकांना अशी आवड कमी आहे ही गोष्ट नाकारता येत नाही.
   पण युनेस्को मुळे मात्र थोडं फार मेंटेनन्स केले जात आहे अशा साईटचे.

 8. Tanvi says:

  महेंद्रजी अहो भारतात इतके कमी दिवस मिळतात मला की कुठेच जाणं होत नाही…. आणि तुम्ही अश्या सुरेख जागांची ओळख करून द्याल …
  काय करावे आता, नासिकजवळ असूनही अजून टाकेदलाही गेलेले नाही मी 😦 … यावेळेस जरा ठरवून सगळीकडे भटकंती करावी म्हणते…

  फोटो अतिशय सुरेख आहेत 🙂

  • तन्वी
   खर्ं आहे, इथे आल्यावर वेळ मिळत नसेल. अहमदाबाद तर शक्य आहे सहज.बघ, जमव पुढल्या भारत भेटी मधे.

 9. Archana Sujit says:

  U will find my question bit silly…… But i wanted to know whether water is available at the bottom of well in summer?????

  • अर्चना,
   गुजरात मधे वॉटर टेबल खाली आहे म्हणूनच १०० फुट खोल खणलेली आहे ही विहीर. कितीही उन्हाळा असला, तरीही इथे पाणी असतेच. साधारण विहीरी २५ ते ३० फुट खोल असतात, ही विहिर तिप्पट खोल आहे.

 10. Pankaj Z says:

  To do list मध्ये टाकली आहेच.

 11. Shubhangi says:

  Khoop chaan mahiti aahe. Maze ajol pan Baroda aahe, Am’bad la jayacha nehami plan karto pan success hot nahi . Ha lekh vachun ani photo pahun aata kharch javese vatte. Mahendraji mi tumhala ek mail kela hota to milala ka?

  • शुभांगी,
   मेल नाही मिळाला, बहूतेक स्पॅम मधे गेला असावा.. जर मेल मिळाला असता, तर उत्तर नक्कीच पाठवले असते. पुन्हा पाठवू शकाल?

 12. sakshi nerkar says:

  atishay sundar mahendraji, aata asse zale aahe ki kadhi ekada ya thikani jatey, pudhe bolanyasathi mazakade shabda nahit, khukp khukp, dhanyawad.

 13. अभिषेक says:

  परत एकदा ‘खूप छान माहिती’! कलाकुसर चे फोटो बघताना एकदम आत उभे आहोत अस वाटल!

 14. पुन्हा एकदा अप्रतिम माहिती .. तुम्ही गुजरातेतल्या अशा सगळ्या छान जागांवरच्या पोस्टचा एक संग्रह करून गुजरात टुरिझमला द्या. :)) (आणि त्याच्या बदल्यात आपल्या ब्लॉगर गँगला फ्री गुजरात ट्रीप मिळवा 😉 )

  • हेरंब

   ह्या सगळ्या ठिकाणी मी चुकुन पोहोचलो- किंवा योगायोगाने पोहोचलो. ओएनजीसी ची साईट एकदम जवळ आहे इथून, मग परत येतांना इथे अर्धा तास थांबलो. मुद्दाम एकदा इथे येऊन पूर्ण गुजरात पहायचाय…
   ब्लॉगर गॅंग ची एक गुजराथ ट्रिप काढायला हरकत नाही. 🙂

 15. सागर says:

  @ हेरंब +१ .. खरच काका अप्रतिम माहिती दिलीत तुम्ही. फोटो पण अतिशय सुंदर आहेत ……

 16. प्रणव says:

  महेंद्रकाका झिंदाबाद,
  ’रानी की वाव’… खरच वॉव. फोटोग्राफीसाठी छान जागा आहे.
  मी गुजराथला गेलो होतो पण मला महित नव्हती हि जागा त्यामुळे राहून गेली. परत गेलो कि मात्र नक्की पाहणार.
  पुढील लिखाणासाठी शुभेछ्या,
  प्रणव

 17. manisha says:

  Mahendraji,

  me nuktich Ahmadabad trip keli, tya madhe amhi, Adalaj chi Vihir, Lothal, ani Ahmadabad che kahi spot keli, . Me adhi tar Adalaj lac Rani ki vav samajat hotey. tumchya mule ha samaj dur jhale.

  Thanks

  • मनिषा,
   लोथल पाहिलं, पण फार वेळ देता आला नाही. तिकडे एकदा पूर्ण दिवस घालवायचाय. पुढच्या सुटी मधे नक्की जाईन. ्लोथलचे फोटो तुमच्या फेसबुक वर पाहिले. 🙂

   • manisha says:

    nakkich paha,, arthat mala suddha far vel nahi deta ala lothal pan interesting nakkich ahe lothal, adalj baddal nakki liha vachaya avdel 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s