रागदारी..

भारतीय शास्त्रीय संगीत हा काही माझा अधिकारवाणीने लिहायचा विषय नाही. मला गाणं पण  म्हणता पण येत नाही.   लहानपणी जवळपास ३-४ वर्ष   हार्मोनियम शिकायला जायचो- तेवढाच काय तो संगीताशी  आलेला संबंध.  तानसेन होता आलं नाही, तरी कानसेन मात्र नक्कीच होऊ शकलो !

शास्त्रीय संगीतामधे  प्रत्येक रागाची ऐकण्याची वेळ ठरलेली असते. बरेचदा सकाळी ऐकायचा राग जर तुम्ही दुपारी ऐकाल तर  तो ऐकतांना काहीतरी बिघडलंय  याची जाणीव करून देतो, उगीच काहीतरी चुकल्या सारखं वाटतं. या उलट जर त्या – त्या वेळेसचा राग त्या त्या वेळी ऐकला तर तो सगळ्य़ा जाणीवांना स्पर्शून जातो. मी स्वतः याचा बरेचदा अनुभव घेतला आह . एवढ्यातलीच   गोष्ट आहे, अश्विनी भिडे देशपांडे यांच्या एका पहाट मैफिलीला गेलो होतो. सकाळचा गारवा.. हेमंत ऋतू असल्याने मंद वारे सुरु होते. अश्विनी भिडे यांचा “कवन बदरीया गयो माई, कौन गली गयो शाम”   रे मनवा सुमर हरी नाम.. सुरु केले आणि साधारण २० एक मिनिटांच्या नंतर आपोआपच डोळ्यात पाणी आलं. इतका आर्त स्वर लागला होता की  तो अनुभव शब्दात सांगता येणार नाही.  योग्य वेळी योग्य राग आणि उत्कृष्ट वातावरण निर्मिती यामुळे हे शक्य होऊ शकते! संगीता मधे जी शक्ती आहे ती फक्त अनुभवाने च समजते.

संगीत ऐकणारे दोन प्रकारचे लोकं असतात , एक म्हणजे तबल्याच्या ठेक्यावर ताल देणारे, आणि दुसरे म्हणजे ’समे’ वर आलो की मान डोलावणारे. गाणं म्हणणारा गायक हा त्या दुसऱ्या प्रकारच्या लोकांसाठीच गाणं गात असतो. समोर समे वर आल्यावर एक जरी मान डॊलली की तो भरून पावतो. गाणं म्हणण्याचा रियाज तर हवाच पण गाणं ऐकण्याचा ही रियाज हवा, नाही तर शास्त्रीय संगीतात काहीच रस वाटणार नाही.

एकदा एका  कार्यक्रमाच्या वेळी आरती अंकलीकर म्हणाल्या होत्या, ”  पट्टीच्या गवयाला कुठलाही नाद चालतो, मग तो पंख्याचा लयबद्ध नाद जरी असला, तरीही त्या नादावर गाणं आपोआप गुणगुणले जातं.” हीच गोष्ट पुढे नेत भाऊ मराठे यांनी सूत्र संचालन करतांना   पंडित भॊमसेन जोशींचा एक  बडॊद्याचा    अनुभव सांगितला .रात्रीची वेळ,  भीमसेन जोशी टांग्यात बसून जात होते. टांग्याच्या घोड्यांच्या टापांचा, चाकांचा- लयबद्ध आवाज, आणि निःशब्द शांतता. पंडितजींनी स्वतःच्या नकळत  पूरियाधनाश्री  गुणगुणणे सुरु केले. रात्रीची निवांत वेळ, टांग्याच्या घोड्य़ांच्या टापाचा लयबद्ध आवाज, आणि पंडीतजींचा सूर.. तेवढ्यात काहीतरी झालं  आणि टांगा थांबला.   लय थांबली, आणि त्या बरोबरच पंडीतजींचा आवाजही थांबला. टांगेवाला म्हणतो, ”  पूरियाधनाश्री क्युं बंद किया? शुरु रखिये नां”.. आता एक टांगेवाल्याने  कुठला राग आहे हे ओळखलेले ऐकून पंडितजींना खूप आश्चर्य वाटले, त्यांनी विचारले,” आपको , कैसे मालूम की  ये धनश्री पुरीया है” त्यावर टांगेवाल म्हणतो, ” बाबूजी, हम फैय्याज खां साहब के पडॊसमे रहते, है, और हमेशा उनका रियाज सुनते हुए बडे हुए  है, इतना तो मालूम रहेगाही नां…”

वरचा अनुभव म्हणजे  त्या टांगेवाल्याच्या कानावर ऐकण्याचे संस्कार झाले होते. हा प्रसंग ऐकण्याचे संस्कार किती महत्त्वाचे आहेत हे दाखवणारा आहे. गाणं म्हणणं जितकं महत्त्वाचं, तितकंच ते ऐकता येणं हे ही महत्त्वाचं.  त्या टांगेवाल्याच्या कानावर   गाणं ऐकण्याचे  संस्कार झाले होते.गाणं कसं ऐकावं यातलं मर्म त्याला समजलं होतं.  म्हणूनच तो पंडितजींना दाद देऊ शकला.

योग्य वेळी जर योग्य राग ऐकला, तर त्याचा परिणाम जास्त होतो. बरेचदा चुकीच्या वेळेस ऐकलेले राग उगाच नकोसे वाटतात. तेंव्हा, रागाची वेळ सगळ्यात जास्त महत्त्वाची. मी शास्त्रीय संगीताचा ’मास्टर’ नाही किंवा त्यावर माझे काही एक्सपर्टाइझ पण नाही, आणि म्हणूनच, माझी त्यावर काही लिहीण्याची पात्रताही नाही , हे माहिती असतांनाही एक लहानसे पोस्ट की ज्या मधे कुठला राग केंव्हा ऐकायचा याची माहिती देत आहे.

कुठला राग केंव्हा ऐकायचा ?? हा प्रश्न पडत असेल तर हा तक्ता उपयोगी पडू शकेल. या मधे काही मह्त्त्वाचे राग वेळेनुसार दिलेले आहेत.

सकाळी    २ ते ४  :- सोहिनी, पारज

सकाळी    ४ ते ६  :- ललित, भटीयार,भनकर

सकाळी  ६ ते ८  :- जोगीया, रामकली, भैरव, कलींगा,  विभास,गुनकली

सकाळी    ८ ते १० :- तोडी, कोमल रिषभ आसावरी, बिलासखानी तोडी, अहिरभैरव, नटभैरव, हिंदोल

दुपारी    १० ते १२:- जौनपुरी, अलाहिया बिलावल, देसकर, भैरव, देसी,असावरी,

दुपारी    १२ ते २ :- गौड सारंग, शुद्ध सारंग, वृंदावनी ,सारंग

दुपारी     २ ते ४  :- भिमपलासी ,मुलतानी

दुपारी     ४ ते ६  :- पटदीप, श्री, पूर्वी, धानी,्बरवा

सायंकाळी ६ ते ८  :- हमीर, शुद्ध कल्याण, यमन, पुरीया, मेघ, गौ्री, हंसध्वनी,परीय़ाधनाश्री, लक्ष्मी कल्याण,  हमीर, यमन कल्याण, कलावती

रात्री     ८ ते १० :-  देश , दुर्गा, केदार, जयजयवंती, मीयामल्हार, सुरदासी मल्हार, काफी, रामदासी मल्हार, बहार, जोग, दुर्गा, हेमकल्याण, नटभैरव, भूपाली, गारा , कामोद, तिलंग, शाम कल्याण, नंद, जोग, केदार, चांदनी केदार , देश, गौड मल्हार, तिलक कामोद,खमाज, कलावती

रात्री    १० ते १२ :- चंद्रकंस, शंकरा, बागेश्री, बिहाग, अभोगी, नायकी कन्नडा ,कौ्शिक अवनी, बिहागडा, सरस्वती,

रात्री     १२ ते २  :-अदना, शहाणा, दरबारी कानडा, आणि मालकंस

जर वर लिहिण्या मधे  काही चुका असतील तर अवश्य सांगा म्हणजे दुरुस्त करता येतील.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मनोरंजन and tagged , , , , , , , , , , , , . Bookmark the permalink.

53 Responses to रागदारी..

 1. mau says:

  खुप छान!!
  चांगली माहिती दिल्याबद्दल आभार !!

 2. shailesh says:

  वाः अतिशय सुंदर सहज सोपा लेख . मी तर तुमच्या पेक्षा पाठच्या वर्गात आहे शास्त्रीय संगीताच्या बाबतीत. कुठल्या वेळी कुठले राग ऐकावेत हे माहित होत पण कुठले exactly माहित नव्हत. खुप उपयुक्त आहे ही माहिती.
  आत्ता पर्यंत कानाला आवडेल ते ऐकत होतो आणि मिळेल ते जमा करत होतो. आता तुमच्या माहिती प्रमाणे वेगळे folder करून ठेवतो.. ऐकायची मजा आणखी वाढेल.

  • शैलेश
   नक्कीच मजा वाढेल. योग्य वेळ , योग्य स्वर, आणि योग्य गायक ( म्हणजे आपल्या आवडीचा ) .. हे रसायन एकदा जमलं की झालं!

 3. मस्त… ही माहिती पहिल्यांदाच कळतेय. अजून वाचायला आवडेल 🙂 🙂

 4. mrudula mhaisekar says:

  Mahendra kaka tumche barechse lekh me wachle aahet.. Pahilyandach comment kartiye..kahi lekh wachun sahaj dolyat pani aale tar kityek lekhani wichar karnyas bhag padle..kityek lekh wachun me khalkhlun hasle..
  Pratyek wishy agdi weglych wishwat nenara aahe..hattss off to u ..
  Me swatah shastriya sangit shikshn ghetlyane ha lekh jawlcha watla..mala lihinyas jast jamat nahi..pn asech tumche lekh wachnys nakki awdel..khup shubheccha !!

 5. अभिजित says:

  महेंद्र,”धनश्री पुरीया” ऐवजी पुरियाधनाश्री असा या रागाचा प्रचलित उल्लेख आहे. खूप आधीपासून असाच उल्लेख आहे.
  तीव्रस्तु निगमा यस्यां कोमलौ धैवतर्षभो।
  पांशा संवादिऋषभा सायं पूर्याधनाश्रिका॥
  – चन्द्रिकायाम
  पूर्वी थाटात वर्गीकृत या रागाचे नाव पूर्व्याधनाश्री->पूर्याधनाश्री व आता पूरियाधनाश्री असे आहे.

 6. Vishal Dhadge says:

  Chhan mahiti milali….
  dhanyawad.

 7. आल्हाद alias Alhad says:

  ही एक फार मोठी सोय करून दिलीत हां तुम्ही…
  आता कसं काळ वेळ पाहून ऐकता येईल… बुकमार्कतोय!
  🙂

 8. mandar says:

  दुपारी ४ ते ६ :- पटदीप, श्री, पूर्वी, धानी,्बरवा
  बरवा सकाळचा राग आहे.बाकी छानच लिहिलंय ….

  oscenofragas.com या साईट वर वेळेनुसार राग बघता येतो आणि ऐकता पण .surgyan.com वर पण बरेच काही आहे ..

  • मंदार
   दुपारी ४-६ याच वेळात बरवा आहे, पुन्हा एकदा कन्फर्म करून सांगाल का? आभार.

   • मंदार says:

    मुकुल शिवपुत्र यांच्या एका कार्यक्रमात (सकाळच्या) ते तोडी, बरवा आणि त्यानंतर देव गंधार गायले होते.

    वादी स्वर रिषभ आहे;संवादी पंचम. या रागामध्ये शुद्ध आणि कोमल दोन्ही निषाद वापरले जातात त्यामुळे पट्टीचे गाणारे त्यात पाहिजे तसा बदल करून कोणत्याही वेळी गाऊ शकतात. रशीद खान यांची प्रेम बाजे मोरी पायलिया….हि बंदिश तुम्ही ऐकलीच असेल त्यात त्यांनी कोमल निषाद विवादी स्वरासारखा वापरला आहे.
    (देसप्रमाणे म्हणले कोणत्या हि वेळेला हे राग गायले जाऊ शकतात,मारवा मात्र पूर्ण पणे संध्याकाळचाच राग आहे)

 9. माहिती आवडली ..
  भूपाली रात्री ८ ते १० हे बरोबर वाटत नाही !
  ( बिहागडा ,अडाणा आणि शहाणा एवढा बदल मात्र करा )
  रागांना फक्त काळ आणि वेळच नाही तर एक स्वभाव आणि प्रकृती आहे हे हि महत्वाचे ..
  ह्याच विषयाशी निगडीत माझ्या दोन पोस्ट्स
  http://veedeeda.blogspot.in/2012/01/blog-post_19.html
  http://veedeeda.blogspot.in/2012/01/blog-post.html

 10. Ashwini says:

  Evde raag aahet…baap re….pan Kaka mala ragatla kahi kalat nahi pan ho gan aikaila matra avdat…filmi nahi ha…tar Panditji, Rahul Deshpande, Aarti Ankalikar tar fav aahet…pan atasha vel milat nahi…ani ho headphone kanat khupsun aaikaila hot nahi karan calls gheun gheun kan gelet par….aso…Thanks…..mazya Dadala nakki avdel ha lekh….

  • अश्विनी,
   🙂 अनुभवता तर येतील, समजत नसले तरीही…

  • अभिजित says:

   अश्विनी भारतीय शास्त्रीय संगितात ४०० पेक्षा अधिक राग आहेत. रागांबद्दल जितके जाणून घ्याल तितके कमीच आहे.

 11. pkphadnis says:

  कमोद नव्हे कामोद (कमोद हे तांदळाच्या एका जातीचे नाव आहे!)

 12. SADANAND BENDRE says:

  खूपच छान ! सगळ्यांना शास्त्रीय संगीत जास्तीत जास्त एन्जॉय करता यावं ही तुमची तळमळ जाणवली. पुलंनी ट्रेनमधल्या पंख्याकडून रात्रभर ललत, तोडी ऐकल्याचं कुठेतरी लिहिलंय, त्याची आठवण झाली.

 13. Jus hatz off to u .. sir !! खूपच छान ..!! खरच या संगीतामध्ये काहीतरी जादू आहे फक्त ती अनुभवता यायला हवी …!

  • आदिती,
   मी इथे काहीच लिहिलेलं नाही, जे काही आहे, ते पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे, मी फक्त ते इथे मांडलं आहे बस्स..
   शांत चित्ताने एकदा ऐकुन पहा, शक्यतो रात्री उशीरा किंवा सकाळचा राग.. खरा अनुभव मिळेल.

 14. महेंद्रदादा, नेहमीप्रमाणेच सुंदर आणि नेटका लेख ! खुप आवडला…
  या अनुषंगाने श्री. अशोक पाटील यांनी मीमराठीवर ’रागदारी’ या विषयावर सुरू केलेल्या लेखमालेची लिंक दिल्यावाचून राहवत नाहीये.
  http://mimarathi.net/node/7678

  • विशाल,
   हल्ली, काय वाटेल ते ट्रेंड जरा मागे पडत चाललाय. थोडं जास्त विचार करून लिहायला लागलोय. पूर्वी कसं ,लिहिलं की केलं पोस्ट, असं असायचं, तसं जमत नाही हल्ली…

   • दादा, हे तर छान आहेच. पण तुमचं ’काय वाटेल ते’ पण तेवढंच छान असतं…
    तेव्हा त्यात मात्र खंड पडू देवु नका. नाहीतर कित्येक ऑफ़बीट गोष्टींबद्दल आम्हाला कसे समजणार?

    • विशाल
     काय वाटेल ते हा ट्रेंड बंद करणार नाही, पण काय होतंय, आपल्या अनूभवाच्या कुंपणात राहून किती वैविध्य आणणार लिखाणात? तेंव्हा डायव्हर्सिफिकेशन हवंच.. नाही का??

 15. खूपच सुंदर लेख महेंद्रजी! खरं तर मी केवळ कानसेन आणि कानसेनच! तुमच्या पोस्ट मुळे माझ्या माहितीत खरंच खूप भर पडली. मन:पूर्वक आभार! अगदी अलिकडे मीही अश्विनी भिडे-देशपांडे यांची मैफल रात्रीच्या वेळेला ऐकली होती. तुम्ही समेचं म्हणालात त्याचा अनुभव आलाय. आता तुम्ही दिलेल्या तक्त्याप्रमाणे येणार अनुभव ताडून बघायची उत्सुकता आहे! धन्यवाद! 🙂

  • विनायक
   २३ ते २५ मार्च, गेट वे वर एलिफंटा महोत्सव आहे . रात्री दहा पर्यंत चालणार आहे. बघा जमेल तर . मी बहूतेक असेनच तिकडे.

 16. Santosh Kudtarkar says:

  Kaka;

  Uttam… agadi chaan ahe!!! 🙂

  Khalil site cha kahi upayog hotoy ka paha;
  http://kksongs.org/raga/list/raga_list.html

  Mala Raag ani tyanche kahi audios pan ahet… Chaan website ahe!!!

 17. महेश कुलकर्णी, says:

  छान माहिती मिळाली जबरदस्त जुन्या आठवणी उजाळा दिला त्याबद्दल धन्यवाद

 18. Aparna says:

  काका, आपण पहिल्यांदी भेटलो होतो (आणि माझ्या मनात आरतीताईंची महफ़िल ताजी होती त्या पार्श्व्भूमीवर) “मी लाइव्ह म्युझिक ऐकत नाही” असं म्हणून गाडीतला प्लेयर सुरू केल्याचं इतकं घट्ट डोक्यात बसलंय की ही पोस्ट तुमच्याकडून पाहिली आणि मी उडालेच….:D
  “भेलकम टु द क्लब”…
  आपण कानसेन पण रागदारीचं सगळं लक्षात राहात नाही हेही खरंय….अर्थात या विषयावरचं अच्युत गोडबोले (आणि त्यांच्या आत्याचं नाव मी विसरलेय) यांचं एक पुस्तक आहे “नादवेध” नक्की माहितीत भर घालेल सर्वांच्या….

 19. heramboak says:

  काळानुसार राग ऐकावेत हे फक्त ऐकून होतो पण एवढी साद्यंत माहिती अजिबातच नव्हती. खूप आभार !!

 20. khup chan lekh ahe . hya raganche time table far upyukat ahe. ek request ahe jar var dilelya raganche jar ek ganna jar apan post kelat as an example we will grateful to you .

  • केतन
   मनःपूर्वक आभार.

  • केतन
   ब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार. सगळ्या रागांच्या लिंक्स यु ट्युब वर आहेत अव्हेलेबल. अगदी सहज पणे सापडतात रागाचं नाव लिहिलं आणि सर्च केलं की.

 21. मीनल नेने says:

  उत्तम माहीती.
  धन्यवाद

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s