अवयव

 मानवी शरीराचे अवयव विकायला कायद्याने बंदी आहे, या विषयावर ’मी  मरा्ठी” या साईट वर  एक चर्चा वाचण्यात आली, थोडा वेळ विचार केला, आणि विसरलो सुद्धा!  दुसऱ्या दिवशी पेपर उघडला तर दोन बातम्या दिसल्या एक बातमी म्हणजे एका माणसाने बायकोला किडनी विकायला जबरदस्ती केली म्हणून तिने पोलिसांकडे धाव घेतली, आणि दुसरी बातमी , एका माणसाने बंगाल मधल्या गावातून पळवून आणलेल्या १७ वर्षाच्या मुलीला केवळ ६ हजार रुपयात कुंटणखान्यात विकले.

दर वर्षी बकरी ईद च्या दिवशी पेपर मध्ये बातमी असते, की एक कुठला तरी बकरा , की ज्याच्या पाठीवर अल्लाह लिहिलेले आहे, किंवा ७८६ ही अक्षरं आहेत, तो बकरा पाच लाख किंवा प्रसंगी जास्त  किमतीत विकला गेला. बकऱ्याचं वजन साधारण ३० किलॊ समजा, म्हणजे प्रती किलॊ काय भाव पडतो?  फार नाही , फक्त रू.१६६६६.००!

चिकन ८०-१०० रुपये किलो मिळतं.. त्या हिशोबाने त्या कुंटणखान्यात विकलेल्या मुलीचे वजन जर पन्नास किलो असेल, तर तिचा भाव साधारण पणे  १२० रुपये किलॊ पडला असेल नाही?  विचारात पडलात ना? मानवी शरीराची किंमत ही बकऱ्या पेक्षा पण कमी!

मानवी शरीराची जडणघडण हे एक  जगाच्या पाठी वरचे  एक चमत्कारच नव्हे तर एक न सुटणारे कॊडे आहे. तुम्हाला सगळं जग जरी दाखवत असले तरीही , तुमचे डोळे स्वतःला पाहू शकत नाहीत, कितीही आवाजाचा त्रास होत असला तरीही तुमचे कान  स्वतःला झाकून घेऊ शकत नाहीत – त्या साठी त्याला हातांची गरज पडते. नाक सगळे वास घेऊ शकला, तरी तोंडात असलेल्या वस्तूचा वास घेऊ शकत नाही- अगदी एक इंचावर असले तरीही. डोकं खांद्यावर मानेने जोडलेलं असले, तरीही कधी विश्रांतीची वेळ आली, की डोकं टेकायला दुसऱ्याचा खांदा लागतो, स्वतःच्याच खांद्यावर स्वतःचंच डोकं टेकवता येत नाही. शरीराचा सगळा भार उचलणारे पाठीचे मणके, स्वतःचे ओझे उचलू शकत नाहीत…

परमेश्वराने वर दिलेल्या सगळ्या अवयवांना एकत्र करून निर्माण केलेल्या या मानवाने स्वतः साठी नाही, तर दुसऱ्यांसाठी जगायचे असते .हे शरीरावर दिसणारे बाह्य अवयव, सौंदर्य वगैरे गोष्टींपेक्षा त्या मधे असलेला माणूस महत्त्वाचा – आणि त्याचं मोल कोणीच लावू शकत नाही.

कायद्याने जरी शरीराचे अवयव विकणे गुन्हा असला तरीही, काही खाजगी दवाखान्यात हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात केला जातो . त्या मधे मग बरेचदा एजंट्स लहान गावाकडे जाऊन गरीब लोकांना किडनी विकायला तयार करतात. अहो, ज्याला एक वेळ खाण्याची भ्रांत आहे, त्याला जरी ३०-४० हजार देतो म्हंटलं, तर तो ही ऑफर सहजासहजी  नाकारू शकत नाही. एकाने किडनी विकली, की तो एजंट बनून गावातल्या इतर लोकांना तयार करतो  किडनी विकायला.

जो पर्यंत एखाद्या बातमीचा आपल्यावर डायरेक्ट परिणाम होत नाही, तो पर्यंत  कुठल्याही  गोष्टीकडे  आपण अगदी मनात कुठलेही विचार न येऊ देता अगदी मुर्दाड मनाने पाहू शकतो- मग ते शेतकऱ्यांच्या आत्महत्या असो, किंवा कुठलातरी झालेल्या अपघाताची बातमी असो,  किंवा वर दिलेली किडनी चोरीची बातमी असो.

शरीराच्या आत  असलेला कुठलाही अवयव  जरे किडनी,  लिव्हर, हार्ट वगैरे माणसाचे शरीर बंद पाडू शकतो,   पण शरीराच्या बाहेरचा अवयव  फक्त सौंदर्यात भर घालतो- आणि  त्याचा  आपल्या जिवंत रहाण्य़ावर काही परिणाम होत नाही.

वर दिलेली गोष्ट जरी खरी असली, तरी आपण फक्त आपल्या  बाह्य सौंदर्याची म्हणजेच बाहेर दिसणाऱ्या अवयवांची  जास्त काळजी घेतो, मुलं पिंपल्स चेहेऱ्यावर दिसले की एकदम कासाविस होतात, निरनिराळ्या क्रिम्सचा मारा सुरु करतात, गोरं होण्यासाठी पण बरीच औषधं आहेतच,केसांचे शांपू, चेहेऱ्यावरच्या सुरुकुत्या  घालवायचं क्रिम, वगैरे आहेतच. ब्युटी पार्लर मधे जाऊन पेडी क्युअर, मॅनी क्युअर , नखांची काळजी पण घेतात हल्ली स्त्रिया… पण  गोरं होण्यापेक्षा स्किन तजेलदार दिसायला हवी, मसल्सचं टोनिंग व्हायला हवं, चरबी  कमी व्हायला हवी ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ,पण त्या कडे लक्षं दिलं जात नाही.

ज्या गोष्टी आपल्या जगण्यावर, /आयुष्यावर सरळ परिणाम करतात , जसे खाणे, वजन, त्याकडे अआपण पूर्ण दुर्लक्ष करतो. सिगरेट, तंबाखू, दारू , इतर खाणं वगैरे गोष्टींमुळे आतल्या न दिसणाऱ्या अवयवांवर (लिव्हर, किडनी, फुफुस वगैरे) टॉक्सिन्सचा मारा करत असतो आणि स्वतःचंच आयुष्य कमी करून घेत असतो. नेमक्या ह्याच विचारांमधे , जीवन शैली मधे आपण बदल घडवून आणणे आवश्यक आहे.

शरीराचे अवयव विकणे हा कायदा  नसता तर काय झालं असतं तर???मी विचार केला की जर विकायचा म्हंटलं, तर  मी  स्वतःच्या शरीराचा केवळ कापलेली  नखं आणि केस हे दोनच ( ह्यांना अवयव म्हणू शकत नाही ) विकू शकेन.. इतर एकाही अवयवाशिवाय जगणे शक्य होणार नाही मला. बिहार मधे काही शहरात तरूण मुलाला पळवून नेऊन त्याचे लग्न लावून देणे  हा प्रकार सर्रास चालतो,   त्याच प्रमाणे जर  हा कायदा नसता, तर लोकांना पळवून नेऊन त्यांचे अवयव विकायचा राजरोस पणे धंदा सुरु केला असता- आणि या मधे बिहार नाही, तर मुंबई सगळ्यात पुढे राहिले असते असे मला वाटते.

वर लिहिलेल्या  त्या सहा हजारात विकत घेतलेल्या मुलीला कुंटणखान्यात विकले म्हणजे तिच्याकडून पैसे वसूल करून घेण्यासाठी जर तिची किडनी विकली गेली, तर आजच्या बाजार भावाने एक लाख तरी मिळतील, डोळ्यांचा रेटीना , तिची स्किन जी स्किन बर्न पेशंट किंवा प्लास्टीक सर्जरी साठी वापरली जाऊ शकते, तिचं लिव्हर, तिच्या शरीराचा प्रत्येक भाग विकल्या गेला असता  …. जाऊ द्या , नुसता विचार जरी मनात आला, तरी अस्वस्थ होतंय..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , , . Bookmark the permalink.

27 Responses to अवयव

 1. shailesh says:

  माणूस अगदी ‘माणूस’ म्हणून उत्क्रांत झाल्या पासून जगण्या साठी कुठल्याही थराला जातो , त्याच हे मॉरडन् रूप आहें. दुर्दैवाने पैशाने काहीही विकत घेता येते हि गुर्मी श्रीमंत लोकांन मधे आहें , आणि पैशा साठी हपापलेले लोक त्या पेक्षा जास्त आहेत जें पैसे वाल्या लोकां पुढे लोचट असतात.

 2. Khar aahe….Sarogacy hahi hyatlach prakar aahe….madhyantari ek batmi aali hoti khar khot dev jaane…pan kahi bayka aapl garbhashay bhadyane deu laglyat…khad veles thik aahe pan 5-5 vela…ani mhante hi…mi flat ghetalay vagaire vagaire…navra pakka aidi distat hota…..

  • अश्विनी,
   हो , मी पण नुकतंच वाचलं पेपरमधे या बद्दल पण. सिद्धीविनायक मंदिराजवळ एका फ्लॅट मधे अशा बायकांना एकत्र ठेवलेले आहे. त्यावर पण एक लेख होता. हे योग्य की अयोग्य हा प्रश्न तर जगभर चर्चिला जातोय, पण उत्तर अजून तरी सापडलेले नाही.

 3. “…परमेश्वराने वर दिलेल्या सगळ्या अवयवांना एकत्र करून निर्माण केलेल्या या मानवाने स्वतः साठी नाही, तर दुसऱ्यांसाठी जगायचे असते .हे शरीरावर दिसणारे बाह्य अवयव, सौंदर्य वगैरे गोष्टींपेक्षा त्या मधे असलेला माणूस महत्त्वाचा – आणि त्याचं मोल कोणीच लावू शकत नाही…..” +1

  • प्रसाद..
   ते वाक्य सगळ्या लेखाचं सार आहे 🙂 धन्यवाद.

   • greenmang0 says:

    तुमच्या वाक्यात थोडा बदल केला तर चालेल का?

    “…वर दिलेल्या सगळ्या अवयवांना एकत्र करून निर्माण झालेल्या या मानवाने स्वतः साठी नाही, तर दुसऱ्यांसाठी जगायचे असते .हे शरीरावर दिसणारे बाह्य अवयव, सौंदर्य वगैरे गोष्टींपेक्षा त्या मधे असलेला माणूस महत्त्वाचा – आणि त्याचं मोल कोणीच लावू शकत नाही…..”

    कारण माणूस उत्क्रांती होऊन तयार झाला आहे. परमेश्वरामुळे नाही.

 4. रश्मी जोशी says:

  शरीराचे आतले भाग जास्त मह्तवाचे ही गोष्ट ऑलवेज इग्नोर केली जाते केवळ चांगले कपडे, लिप्स्टीक , वगैरे लावल्याने आपण सुंदर दिसतो असे नाही. माझे वय १७ आहे, आता हे पोस्ट वाचल्यावर पिंपल्स वर विचार करणे सो्डणार आहे…

 5. Surendra says:

  Good post

 6. का रे भुललासी वरलिया रंगा. !! खरंच सुंदर लेख.. !!

 7. Soniya says:

  Tarun taruni saundarya prasadhananvar jevadha kharch ani vel vaya ghalvatat tevdha Arogya ani vyayam yavarti kela tar kharach kiti bare hoil. nusatya chan chan kapade ani makeup kelelya pan hadkulya ani nistej muli pahilya ki kasatarich vatat.
  Lekh chaan zala ahe.

 8. “” परमेश्वराने वर दिलेल्या सगळ्या अवयवांना एकत्र करून निर्माण केलेल्या या मानवाने स्वतः साठी नाही, तर दुसऱ्यांसाठी जगायचे असते .हे शरीरावर दिसणारे बाह्य अवयव, सौंदर्य वगैरे गोष्टींपेक्षा त्या मधे असलेला माणूस महत्त्वाचा – आणि त्याचं मोल कोणीच लावू शकत नाही “” …. Supoooooooorlike stmt 🙂

  कायदा नुसता असून पण काय उपयोग पळवाटा काढतोच माणूस .. मला वाटत प्रत्येकाने वयक्तिक पातळीवर जागरूक होणं जास्ती गरजेचं आहे !!

  • आदिती,
   वैय्यकतीक पातळीवर सुशिक्षित समाज जागरुक होऊ शकतो. पण एखादा नवरा आपल्या बायकोची किडनी विकायला निघाला तर? ती बातमी वाचूनच मी थोडा अस्वस्थ झालो होतो. अशाही घटना आपल्या समाजामधे घडतात, आणि आपल्याला त्याबद्दल तर काहीच माहिती पण नसते.

 9. लेख चांगला आहे .
  अवयवांची विक्री अगदी मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा सर्रास चालू आहे. चेन्नई, गुरगाव , दिल्ली आणि हैदराबाद ह्या ठिकाणी हि असे अनेक अवैध विक्री करणारे “दवाखाने ” आहेत ! नुसते नावाला कायदे आहेत एवढेच.

  • दिल्लीची एक बातमी दाखवली होती टीव्हीवर. एका लहानशा घरात चक्क अनऑथराईज्ड हॉस्पिटल सुरु केलेले होते. तिथे सगळ्या सुविधा होत्या आणि फक्त किडनी बदलण्याचेच ऑपरेशन केले जायचे. कायदे हे मॊडले जातात हे खरं असलं, तरी जर कायदे नसते, तर नुसतं अराजक माजलं असतं हे पण तितकंच खरं. धन्यवाद.

 10. Prof R R Kelkar says:

  लेख विचारप्रवर्तक आहे. आपल्या शरिरावर आणि जिवावर कोणाचा अधिकार आहे, आपल्या स्वतःचा, परमेश्वराचा की समाजाचा, हा एक मूलभूत प्रश्न आहे. आत्महत्त्या, गर्भपात, इच्छामरण, आपला एखादा अवयव स्वेच्छेने दान करणे, अशा विषयांवर लोकांच्या विचारसरणीत आणि विविध धर्मांत खूप मतभेद आहेत. आजच्या युगात वैयक्तिक स्वातंत्र्यावर इतका भर दिला जात आहे की, समाजाने अथवा धर्माने ह्याविषयी बोलूच नये अशी भूमिका घेतली जात आहे, जी चुकीची आहे.
  – रंजन केळकर

 11. heramboak says:

  >> चिकन ८०-१०० रुपये किलो मिळतं.. त्या हिशोबाने त्या कुंटणखान्यात विकलेल्या मुलीचे वजन जर पन्नास किलो असेल, तर तिचा भाव साधारण पणे १२० रुपये किलॊ पडला असेल नाही? विचारात पडलात ना? मानवी शरीराची किंमत ही बकऱ्या पेक्षा पण कमी!

  बाप रे !! हे वाचून कससंच झालं.

  • लिहितांना पण मनात असंच काहीसं आलं होतं. लिहिल्यावर वाटलं पण होतं की डीलिट करावं, पण राहू दिलं.

 12. Rohit says:

  मला एवढच वाटतं की मानसाने कोणत्या पण थराला जाण्या आधी एकच विचार करावा….
  “आपन कमवण्यासाठी नाही तर जगण्यासाठी कमवलं पाहीजे,आणि प्रत्येकाला जगू दिलं पाहीजे”..

Leave a Reply to Aditi Chikshe Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s