नेमेची येतो पावसाळा प्रमाणे , साला बादा प्रमाणे यंदाही अर्थमंत्र्यांनी नववर्षासाठी अर्थसंकल्प संसदे मधे मांडला . या अर्थसंकल्पाला अर्थसंकल्पा ऐवजी अनर्थसंकल्पच म्हणायला हवे. या संकल्पामधे कुठलाही अर्थ नसतो.सगळे भाव वर्षभर वेळोवेळी वाढवलेले असतात, पुन्हा एकदा वर्षातून एकदा सगळे भाव सरसकट वाढवण्याचा कार्यक्रम म्हणजे अर्थसंकल्प!
या अर्थ संकल्पावर वर उद्या सगळ्याच वृत्तपत्रांमधे प्रतिक्रियांचा पाऊस पडणार आहे. अर्थ संकल्पाची पन्नास हजाराच्या वर असलेली पानं वाचायची म्हंटलं तरीही कमीतकमी एक महिना तरी लागेल. पण इकडे मंत्र्यानी आपली ब्रिफकेस उघडून वाचणे सुरु केले, की लगेच लोकांच्या, विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया सुरु होतात. रात्री घरी गेल्यावर टिव्हीचे बातमीदार हातात माईक धरून लोकांच्या मागे धावतांना दिसणार आहेत. एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधीने बऱ्याच मान्यवरांचे इंटरव्ह्यु घेतले आणि त्यांची या अर्थसंकल्पा बद्दलची मतं विचारली, त्यातले काही इंटरव्ह्यु उद्या कुठल्याही वृत्तपत्रांमधे प्रसिद्ध होण्यापूर्वी इथे काय वाटेल ते वर प्रसिद्ध करीत आहोत. साधारण याच टाइपच्या प्रतिक्रिया उद्याच्या पेपर मधे वाचायला मिळतील.
बहुतेक सगळे वृत्तपत्र संपादक या पन्नास हजार पानांना न वाचता त्यावर एक्स्पर्ट टिप्पणी अग्रलेख लिहितील.
मनमोहन:- अतिशय क्रांतिकारी विचारसरणीचा , पुरोगामी , देशाला प्रगतीपथावर नेणारा अर्थसंकल्प आहे हा.
विरोधी नेते :- ” गोरगरीबांना अधिक गरीब करणारा, आणि श्रीमंतांना अधिक श्रीमंत करणारा हा अर्थसंकल्प आहे.
दिदी:- श्रीमंत उद्योगपतींना डोक्यावर घेऊन नाचणारा व सामान्य माणसाला वेठीला धरणारा तसेच जगणे कठीण करून सोडणारा हा अर्थ संकल्प आहे. सगळं काही महाग केले आहे. हा असा अर्थसंकल्प सादर केला म्हणून अर्थमंत्र्यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे.मी सांगते सोनियाला.
लोकल पार्ट्या :- महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसणारा हा संकल्प आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या गरजांकडे अजिबात लक्ष दिल्या गेलेले नाही या अर्थसंकल्पात. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई पार दुर्लक्षित केल्या गेली आहे. पुढच्यावेळी नक्की मराठी अर्थमंत्री हवा अशी आम्ही हायकमांडला मागणी करणार आहोत.
कम्युनिस्ट :- श्रीमंतांचे लाड करणारा हा अर्थसंकल्प आहे -त्यांच्या गरजेच्या सगळ्या वस्तूंवर कर कमी केल्या गेले आहेत आणि गरीबांच्या वस्तू महाग केल्या आहेत. सगळ्या कॉम्रेडस ना एकत्र करून आता देशातल्या सगळ्या उद्योग धंद्याचे राष्ट्रीयीकरण करणे आवश्यक आहे .
समाजवादी :- अल्पसंख्यांकांच्या, मागासवर्गीयांच्या गरजांकडे दुर्लक्ष करणारा हा अर्थसंकल्प आहे. अतिशय अन्यायकारक असा हा अर्थसंकल्प मागासवर्गीयांचे कंबरडे मोडणारा ठरणार आहे. ….!
कॉलेज विद्यार्थी :- अजिबात काही धड नाही हा अर्थसंकल्प, मुलांना दिलेल्या ’पॉकेटमनी ” वर इनकम टॅक्स मधे सुट द्यायला हवी होती-म्हणजे बाबा लोकांनी मुलांचे पॉकेटमनी वाढवले असते .तरूणांच्या विरोधात असलेला हा अर्थसंकल्प आहे.
नोकरी करणाऱ्या स्त्रिया :- चिडलेल्या चेहेऱ्याने, केस विस्कटलेले, ( लोकलचा प्रवास करून जस्ट गाडीतून उतरलेली )अहो, आता कसं जगायचं हेच समजत नाही आम्हाला. इतकी महागाई वाढली आहे, आणि हा असा जेंडरबायस्ड अर्थसंकल्प. सगळी प्रसाधनं – लिप्स्टिक्स, कम्पॅक्ट्स वगैरे महागली आहेत.. स्त्रियांच्या विरोधात असलेला अर्थसंकल्प आहे हा.
मध्यमवर्गीय :- इनकम टॅक्सची लिमिट वाढली नाही. सामान्य नोकरदार वर्गासाठी एक वाईट अर्थसंकल्प. पेट्रोलचे भाव दुप्पट वाढले, मग इनकमटॅक्स रिबेट दुप्पट का नाही वाढवला? सगळा मूर्खांचा बाजार आहे झालं ( शेवटलं वाक्य सेन्सॉर )
सामान्य स्त्री :- सामान्य माणसाचे कम्बरडे मोडणारा अर्थसंकल्प आहे हा. सगळ्या महागाच्या वस्तूंवर कर सवलती दिल्या आहेत , पण सामान्य गरजेच्या वस्तू महाग केल्या आहेत. या कर वाढीच्या ओझ्याखाली गरिबांचे कंबरडे मोडणार हे नक्की. अहो मी सांगते, सगळे कर खप वाढवले आहेत- आता हे उद्या परवा सगळीकडे बोंबाबोंब झाली, की हे सगळे वाढ्वलेले कर अर्धे करतील. हे नेहेमीचेच आहे, आधी दहा टक्के वाढवायचे, आणि नंतर लोकांनी ओरडा केला त्यात तिन चार टक्के सुट द्यायची.
विरोधी नेते (लोकल ) :- हा असा अर्थसंकल्प सादर करायला तुम्हाला अर्थमंत्री कशाला हवा? त्या साठी एखादा मंत्रालयातला क्लर्क पण चालला असता.
सोनिया:-(स्वगत:- ) चला सचिनची सेंच्युरी झाली शंभरावी, आता कोण लक्ष देतं या अर्थसंकल्पाकडे?? उद्या पहिल्या पानावर सचीन असेल.. धन्यवाद रे सचीन.. वाचवलंस देवा तू या संकटातून………..
सहीये….शेवट लई आवडला…. 🙂
्देवेंद्र
आभार. अरे पहिल्यांदा तेच मनात आलं होतं, आणि आज नेमकं तसंच झालंय पहा. पहिल्या पानावर सचीननेच मोठी जागा घेतली आहे, बजेट पेक्षा..:)
काका…जबरी…एकच नंबर 🙂 🙂
्योगेश
धन्यवाद..
हाहाहा.. अगदी अगदी…
आनंद,
🙂
याला म्हणतात black humour …
तुशार
मनःपूर्वक आभार.
दादा..मस्त शेवटच्या चेंडुवर सिक्सर…
दादा,
आभार…
kaka..ata century of d century baddal pan liha na:)
its d best news of d day..isnt it? will b waiting 4 ur “lekh”:)
सचीनच्या १०० ने पुन्हा सिद्ध केलं की” सगळे भारतीय मार्च मधे टार्गेट अचिव्ह करतात- व्हॉटएव्हर इट मे बी – नेहेमीच अप्रायझलच्या पूर्वी…….” एका वाक्यातच मोठा लेख झाला 🙂
Sahi … hai ..the last line is absulutly true. Tommorow eveywhere it will be sachin … sachin
0नेमकं तसंच झालंय… 🙂
फारच छान झाला आहे लेख………
श्रीकांत
आवार्जून दिलेल्या प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार.
छान लिहिलं आहे..शीर्षक पण चांगलं आहे..!!
रंजन केळकर
रंजन,
ब्लॉग वर स्वागत, आणि प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार.
खरच अतिशय वाईट अर्थसंकल्प आहे हा. माझ्या मते आणि बाणी नंतरचा सर्वात अक्कल शून्य अर्थ संकल्प.
आता फक्त देवाची पूजा हीच सर्विस tax च्या बाहेर राहिल्ये ( माहित नाही .. हे नालायक सरकार दोन वर्षात ते पण सर्विस tax च्या अंडर आणेल )
ह्या सरकारची आणि ढ आणि मुजोर नोकर शहांची इच्छाच दिसत नाही काही सुधारायची .. फक्त सामान्य माणसाला जेवढ शोषता येईल तेवढ शोषतायत.. कारण नोकरी करणाऱ्या माणसाच्या हातात काहीच नसत.. त्याचा tax आपोआपच कापला जात असतो.
शैलेश,
मला नेहेमीच प्रश्न पडतो, की सरकार सामान्य लोकांच्या बरोबर आहे की विरुद्ध??
इकडे राजकीय नेत्यांची संपत्ती कित्येक करोड रुपयात वाढते आहे, त्यांच्याकडून किती टॅक्स घेतला हे विचारायला हवे आरटीआय मधे.
सगळंच लिहिलंत? आता आम्ही काय लिहायचं आमच्या ब्लॉगवर? 😉
एकदम छान… शेवट मस्तच….
्देवदत्त,
ह्याच विषयावर जर अर्थंमंत्री पाच हजार पानं खरडू शकतात, तर नक्कीच ब्लॉग वर पण चार पाचशे पोस्ट्स तरी नक्कीच शक्य आहेत.
नाही हो. त्यांनी फक्त ३६ पानेच खरडली आहेत 😉
http://indiabudget.nic.in/ub2012-13/bs/bs.pdf
ती ३६ पाने म्हणजे जिस्ट ऑफ द डॉक असेल.. 🙂
शेवट जबरदस्त आहे. आवडला लेख.
्सचिन,
फक्त १५ मिनिटात पोस्ट केलाय लेख..:)आभार.
सुंदर प्रतिक्रिया ,हे असच चलावाचेआहे,याला म्हणतात भारतीय राजकारण, एकदम छान… शेवट मस्तच….झकास जबरदस्तआवडला लेख ,
महेश
आभार.
ब्लॉग लिहिणारे, ब्लॉग वाचणारे व ब्लॉगवर प्रतिक्रिया व्यक्त करणारे यांनासुद्धा सर्विस tax लावायलाच पाहिजे. तसेच भिकारी, कचरा वेचणारे, हॉस्पिटल मध्ये उचार करूनही बरे न होणारे यांनाही सर्विस tax लावला पाहिजे. अखंड भारतासाठी आज पर्यंत ज्यांनी प्राणांची आहुती दिली त्यांना सुधा त्यांच्या मृत्यू पश्चात डेथ tax लावायला मागेपुढे पाहणार नाहीत ” हे-ने-ते”. अव्वल लेख.
छान झाला आहे हा लेख !! एंड तर मस्तच !!!!
शिर्षकापासून अगदी शेवटपर्यंत एकदम तूफान झालीय पोस्ट … पेपरवाले असेच एखादे टेंप्लेट वापरीत असणार हे नक्की 😉
वर्डप्रेसचं लॉगिन नेम वापरून प्रतिक्रिया देतोय. त्यामुळे देता येतेय प्रतिक्रिया…
बेस्ट आहे हे. असंच तर चालू असतं मिडियावाल्यांचं !! शेवटचा चिमटा तर एकदम कडक !!
धन्यवाद हेरंब.