खरं सांगायचं तर चव ही आपल्या जिभेवर नसते तर ती मेंदू मधे कुठेतरी दडलेली असते. लहानपणी कधी
तरी अनुभवलेल्या चवी या मेंदू मधे घट्ट बसलेल्या असतात. मग तुम्ही कितीही वर्षाच्या गॅप नंतर ती चव पुन्हा अनुभवायला मिळाली, की मेंदू ताबडतोब त्या जुन्या रजिस्टर्ड चवीशी आजच्या चवीची तुलना करतो. आवडीची वस्तू एकट्याने जाऊन खाण्यापेक्षा आपल्या बेस्ट कंपनी सोबत खाण्यात जी मजा आहे ती वेगळीच! प्रत्येक शहराची आपली एक वेगळी खाद्यसंस्कृती असते, तशीच अमरावतीची पण आहे.
आमच्या कुलकर्ण्य़ांच्या घरात जवळपास १६-१७ वर्षानंतर लहान मुलाचा जन्म झाला. चुलत बहीणीला मुलगी झाल्याने, एक आनंद सोहोळा म्हणून आम्ही सगळे भावंडं एकत्र जमलो होतो. असा योग फार कमी वेळा येतो. आता सगळे जातीवंत खवय्ये एकत्र जमल्यावर सगळ्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत लहानपण पुन्हा एकदा जगायचं हे तर न ठरवताच ठरलं !लहानपणी उन्हाळ्याच्या सुटी मधे आम्ही सगळी भावंडं अमरावतीला जमायचॊ आणि उन्हाळा भर धमाल चालायची. सकाळी घराबाहेर पडलो तर “बाहेर काही खाऊन येऊ नका रे, सरळ घरीच पॅक करून आणा” म्हणून इन्स्ट्रक्शन्स मिळाल्या.
शाम टॉकिज जवळ असलेले एक लहानसे रघुवीरचे कचोरी, समोसा आणि सांबरवडी मिळण्याचे दुकान.ह्या दुकानाला हॉटेल म्हणणे पण योग्य होणार नाही- कारण बसण्यासाठी पण पुरेशी जागा नाही. मी लहान असतांना पासून या ठिकाणी जायचो- शाम टॉकिज मधे सिनेमा पहायचा आणि इथे कचोरी खायची हा शिरस्ता होता. आज इतक्या वर्षानंतर पुन्हा तिथे गेल्यावर पण त्या हॉटेल मधे काहीही फरक जाणवला नाही. समोर असलेले काचेचे डिस्प्ले युनीट, आणि त्यातून डोकावणाऱ्या कचोरी -समोसे….गेल्या ४० वर्षा पूर्वी हे दुकान जसे होते, आजही तसेच आहे. ह्याच दुकानातून मिळवलेल्या प्रॉफिट वर नंतर रघुवीरने दोन तिन मोठी दुकानं सुरु केली, पण मूळ दुकान मात्र अजिबात बदलेले नाही.
दुकान सकाळी साडे आठ वाजता उघडते. कचॊरी म्हणजे माझा विक पॉइंट. प्रत्येक ठिकाणची कचोरी ही वेगळी असते. मुंबईला मिळणारी चिंच चटणी , दही, हिरवी चटणी आणि शेव घातलेली गुजराती पद्धतीची कचोरी मला फारशी आवडत नाही. त्या पेक्षा इंदौरची प्याजी, आलु कचोरी, किंवा रघुवीर ची मुंगडाळ कचोरी , किंवा राजस्थानी उडीदडाळीची खस्ता कचोरी ही जास्त आवडते. कचोरीला आपली मूळ चव म्हणजे स्वतःची चव असावी , त्या वर दही, चटणी वगैरे काही न घालता तिची ती अंगची चव असली की मग सोबत फक्त तळलेली मिरची असली तरीही पुरते. किंबहुना कचोरी सोबत मिरचीशिवाय इतर काही लागू नये हीच अपेक्षा असते माझी.
रघुवीरच्या कचोरी मधे फक्त मुगाचं सारण भरलेले असते. याची स्पेशालिटी म्हणजे वरचं कव्हर. अतिशय खुसखुशीत असलेले पण अजिबात तेलकट नसलेले बाह्य आवरण म्हणजे या रघुवीरच्या कचोरीची यु एस पी. आत शिरल्यावर फक्त चार पाच टेबल बसतील एवढी जागा, आणि वर पोटमाळ्यावर तळणाची केलेली सोय- हे असे रघुवीरचे दुकान.इथे आल्यावर ३-४ कचोरी कशा संपवल्या जातात तेच लक्षात येणार नाही.
इथली कचोरी तर प्रसिद्ध आहेच, पण त्याच सोबत इथे मिळणारी सांबरवडी पण तुम्हाला स्वतःची चव विसरू देणार नाही. विदर्भात कोथिंबीरीला सांबर/सांभार म्हंटले जाते. सांबरवडी मधे किंचित आंबटगोड चव असलेले खोबरे आणि कोथिंबीरिचे सारण भरलेले असते. तुमच्या हातातली सांबरवडी संपल्यावर पण त्याची चव ही जिभेवर रेंगाळत रहाते, आणि आपसूकच दुसऱ्या वडीकडे हात वळतो. खरं सांगायचं तर त्या सांबरवडी खातांना थोडी थॊडी चितळ्यांच्या बाकरवडीची चव आठवते. गेली चाळीस एक वर्ष तरी एकच चव मेंटेन करून ठेवली आहे रघूवीर ने.
रघूवीर मधून कचोरी आणि सांबरवडी पॅक करून घेतली आणि घरी निघालो, तर माझ्या भाचीची डिमांड होती ती आलूबोंडा रस्साची! आलूबोंडा – रस्सा म्हणजे ” कट वडा, तर्री वडा” सारखा प्रकार असतो . आलुबोंडा आणि बटाटे वडा पूर्ण पणे वेगवेगळे असतात. आलुबोंड्यामधे लसूण , आल्यासोबतच कांदा आणि मसाला पण घातलेला असतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आलूबोंड्य़ाचं वरचं कव्हर हे बटाटे वड्या पेक्षा थोडं जास्त जाड असतं. तर हा असा आलूबोंडा एकदा तर्रीवाल्या रश्श्यात बुडवला, की याचं कव्हर सगळा रस्सा शोषून घेतो आणि एक अफालतून टेस्ट चाखायला मिळते.
अमरावती रेल्वेस्टेशनच्या समोर असलेल्या जलाराम मधून आलुबोंडा रस्सा पॅक करून घेतले. इथल्या रश्श्या मधे आलं लसूण सोबतच पुदिन्याचा भरपूर वापर केलेला असल्याने मस्त फ्लेवर येतो. घरी पोहोचल्यावर वडे , कचोरी, काढून टेबल वर ठेवले, आणि केवळ पंधरा मिनिटात किती तिखट रे …. म्हणत नाकं पुसत सगळ्यांचा मिळून फडशा पाडला .
अमरावतीला फक्त रघूवीरची कचोरी ,सांबरवडी एवढंच फेमस नाही, तर गिला वडा नावाचा एक खास प्रकार पण इथे मिळतो. जवाहरगेटच्या आत असलेल्या एका लहानशा दुकानात सकाळी ८ च्या सुमारास ते दुकान सुरु होते. हा गिला वडा म्हणजे एक मस्त प्रकार आहे. या मधे दोन प्रकारचे वडे असतात . एक म्हणजे चपटे आणि दुसरे म्हणजे गोल. दुसऱ्या प्रकारच्या वड्याला मंगूस म्हणतात. हा वडा आंबवलेल्या उडदाच्या डाळीचा बनवलेला असतो. मस्त पैकी खरपूस तळल्यावर पाण्यात कमीत कमी अर्धा तास तरी घालून भिजत ठेवला जातो. अर्ध्या तासाने वडे पाण्यातून काढून पिळून त्यातले पाणी काढून डिश मधे त्यावर लाल मिरची, लसूण, पुदीना यांची चटणी पसरली की हा गिला वडा खाण्यासाठी तय्यार. आणि जर फार तिखट नको असेल तर थोडं दही ( एक लहान चमचाभर) आणि गोड चटणी घालून खायला दिले जाते. हा गिला वडा फक्त अमरावतीलाच खाण्यात आलाय माझ्या तरी. तसं म्हंटलं, तर हा प्रकार खरा राजस्थानातला. यावर लाल तिखट चटणी सोबतच कधी तरी आंबाडीची फुलं वापरून केलेली तिखट चटणी पण दिली जाते. तिचा स्वाद तर अविस्मरणीय़ आहे. मी सुरुवातीला म्हंटलंय ना, की सगळ्या चवी आपल्या मेंदूमधे नोंदवलेल्या असतात- तशी ही चव पण. या वेळी मात्र आम्हाला आंबाडीची चटणी मिळाली नाही. 😦 त्यामुळे फक्त लसूण पुदीना आणि लाल मिरचीच्या चटणीवरच समाधान मानावे लागले.
ह्या सगळ्या गोष्टी तर आहेतच, पण अमरावती म्हंटलं की मटका कुल्फी ला पर्याय नाही. इथे मिळणारी मटका कुल्फी गेल्या कित्येक वर्षात आपली वेगळी ओळख आणि चव टिकवून आहे. गेल्या पन्नास वर्षात या कुल्फीच्या चवीत काही फरक पडलेला नाही. एका मोठ्या रांजणात बर्फ, मिठ घालून त्या मधे कुल्फीचे मोल्ड ठेवले जातात. मोल्डचं झाकण रबरच्या तुकड्याने बंद केलं असतं. मी लहान असतांना ही कुल्फी पळसाच्या पानावर तुकडे करून दिली जायची, पण हल्ली मात्र या कुल्फी मधे लाकडी काडी घुसवून दिली जाते. आजपर्यंत बऱ्याच ठिकाणची कुल्फी खाल्लेली आहे, पण अमरावतीसारखी कुल्फी मात्र कुठेच खायला मिळालेली नाही. बरं किंमत पण अगदी माफक असते फक्त १० आणि २० रुपये. हे कुल्फी वाले राजकमल चौक च्या फ्लायओव्हर वर रात्री बसलेले असतात, पण जर तुम्हाला दुपारी ही कुल्फी खायची असेल तर जयस्तंभ चौकात कोपऱ्यावर एक लाल रंगाचं रांजण घेऊन बसलेला एक भैय्या दिसेल कुल्फी विकताना.. तोच आमचा नेहेमीचा कुल्फीवाला.

अमरावतीची मटका कुल्फी. हल्ली मागणी इतकी वाढली आहे की मटक्याच्या ऐवजी चक्क रांजण घेऊन बसतो तो भैय्या विकायला.
हे सगळं तर नेहेमीचंच.. पण इथे आल्यावर आठवण होते ती खारवडीची. खारवडी आणि लाह्यावडी हा एकेकाळी खास विदर्भात घरोघरी केला जाणारा पदार्थ आज व्हिंटेज पदार्थांच्या लिस्ट मधे जाऊन बसलाय.
खार वडी म्हणजे वाफवलेली बाजरी, तिळ वगैरे घालून सुकवलेली वडी. ही वडी नुसती तळून जरी खाल्ली तरी छान लागते.अमरावतीला कोर्टाच्या रस्त्यावर एक मायबाईचे दुकान म्हणून सुरु झालेले आहे, तिथे खारवड्य़ा , आणि इतर अनेक घरगुती वस्तू ज्या काळाच्या ओघात विसरल्या गेल्या आहेत त्या मिळतात. तिथे जाऊन दोन पाकिटं आणली खारवडीची, पण लाह्यावडी जी ज्वारीच्या लाह्यांची केलेली असते ती मात्र मिळाली नाही.
अमरावतीला गौदुग्ध सागर हॉटेलच्या मागच्या गड्ड्यातले हॉटेल बंद झाल्याने तिथले पळसाच्या पानाच्या द्रोणात मिळणारे गुलाबजाम मात्र खायला मिळाले नाही. केवळ दोन दिवस असल्याने दोन दिवसातच सगळ्या जागी भेट देता आली नाही याची रुखरुख मनात घेऊन मुंबईला परत आलो.
व्व्वा व्व्वा !!!
एकदम माझ्या गावी खादाडी मज्जा आहे. अमरावतीची कुल्फी आणि खारवडी माहित आहे, पण बाकी ठिकाणं पहिल्यांदा कळतायत 🙂 🙂
सुहास
अमरावतीला काकांचं घर आहे, अमरावतीच्या अजून अनेक जागा आहेत, त्यातली मुंगोडी +जिलबी वाली जागा राहून गेली या वेळेस.. मस्ट ट्राय आहेत सगळ्या जागा. कोर्टासमोरच्या कॅंटीन मधली झुणका भाकरी पण मस्त असते…:)
spellbound.
हर्षद,
धन्यवाद.. 🙂
मस्त, चविष्ट लेख 🙂
खादाडी वरचा लेख बरेच दिवसात लिहिला नव्हता- म्हणून हा लेख. प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार.
kharach tondala pani sutale….photo baghunach….D:
अरे सुपर टेस्टी प्रकार आहेत सगळे. 🙂 बरेच दिवसांनी ब्लॉग वर आलास?? प्रतिक्रियेसाठी आभार!
अत्यंत चवदार लेख. प्रत्येक ठिकाणी पदार्थांचे असे वेगवेगळे प्रकार असतात. हे मी प्रथमच पाहातो आहे. असो, एकदा अमरावतीला आलं पाहिजे.
मंगेश नाबर.
मंगेश
प्रत्येक ठिकाणची काहीतरी स्पेशालिटी असते, अमरावतीची पण आहेच.. काही हरकत नाही एकदा जाऊन यायला.. 🙂
झक्कास ..प्रत्येक ..भागाची खाण्याच्या पदार्थांची स्वतःची स्टाईल ..चव असते ..आणि तिथे जाऊन तो पदार्थ खायची मजा काही औरच आहें ..फोटो सकट पदार्थ असल्याने तोंडाला पाणी सुटल ..ऑन..लाईन वास येण्यासाठी काहीतरी डेव्हलप केल पाहिजे ..आय टी..वाल्यांनी च्यालेन्ज घ्यायला हरकत नाही ..खूप स्कोप आहें ….!!!
फक्त वास का? चव पण घेता आली तर मजा येईल ना. आयटी वाल्यांनी कामाला लागायला हरकत नाही.. 🙂
ALUBONDA RASSA, GILA VADA, MANGUS HI NAV JARA NAVIN VATTAT, BAKI HE PADARTH AMCHYA KOLHAPURCHYA KATVADA, DAHIVADA, SAMBAR VADA YANSARKHE TIKHAT ANI CHAVISHTA ASNAR. VIDARBHATALE LOK KHANYACHE PHAR SHOKIN AHET ASA AIKUN HOTE. AAJ HE SARV PADARTH BAGHUN KATRICH PATALI. BAKI LEKH SUNDAR ANI CHAVISHT
खरंच चविष्ट लेख आहे.
सोनल
धन्यवाद.. 🙂
काका, जस्ट एक ट्रीव्हिया म्हणुन आपण ज्याला गिल्ला वडा म्हणतो ते मुळात एक राजस्थानी प्रिपेरेशन आहे, त्याला कांजीवडा असे पण म्हणतात, तुम्ही सांगितलेत तसेच उडदाचे वडे तळतात पण ते ज्या पाण्यात भिजवतात ते साधे नसते…. मिर्चीचे लोणचे घालायच्या आधी जसे मोहरीची डाळ लिंबू-पाण्यात घालुन फ़सफ़सवतात घुसळुन रवीने ते पाणी असते ते, मुळ रेसीपीत भिजवलेले वडे मातीच्या सुगडात (लाल रंगाचे मटका सुगड काळे वाण वाटायचे सुगड नाही) असे मोहरीच्या पाण्यात भिजवुन त्या मडक्याचे तोंड करकचुन बांधतात अन ते मडके दिवसभर आपल्या अकोला/अमरावती स्पेशल उन्हात ठेऊन एक पुरा दिवस आंबवतात त्यामुळे वडे फ़ुगतात व ते पुर्ण मोहरीचे पाणी पिऊन मस्त तेज होतात खाण्याच्या आधी त्यावर चिंचेची खटाई पुदिना चटनी शेव वगैरे गोड चटण्या घालुन देतात… म्हणजे उद्या वडे खायचे असले तर ते आज पहाटे बांधुन उन्हात ठेवा व उद्या सकाळी नाश्त्यात खा अस, पण व्यावसाईक लेव्हल वर ह्या पद्धतीने भरपुर प्रोडक्शन होऊ शकत नाही त्यामुळे मोहरीच्या पाण्यात आंबवण्याची प्रोसेस कटशॉर्ट करुन ते फ़्रेश तळुन लगेच साध्यापाण्यात अर्धातास भिजवुन तुम्ही बोलले तसे देतात व्यावसाईक ठीकाणी, मुळ कांजीवडा खायचा असल्याच अस्सल अमरावतीकर असणा~या एखाद्या मारवाडी स्नेह्याला सांगा “जमुन जाईन तुमचे काम!!!!!!”….. नेक्स्ट ट्रीप मधे अंजनगाव बारी रोड वर “रानमाळ” ढाबा नक्की ट्राय कराच करा!!!!!!!
टीप :- मोहरीच्या फ़ेसण्यावर वडा खाताना डोळ्यातनं पाणी यायचे प्रमाण अवलंबुन असते भाऊ!!!!!
लई..भारी माहिती मिळाली ..
गुरु
वाह.. क्या बात है.. मला माहिती नव्हतं.. पण आता आठवलं की वड्याला एक पंजंट टेस्ट होती, ती बहूतेक तळल्यावर बुड्वलेल्या मोहरीच्या पाण्याची असावी. अरे अस्सल मारवाडी आहे ना आमचा मित्र चांडक. नेक्स्ट टाइम आठवणीने गळी पडतो त्याच्या..
काका खाणेपिणे वो भी अकोला अमरावतीत!!!!!……. एम.पी + महाराष्ट्र + ए.पी +छत्तीसगढ +मारवाडी +गुजराती असला मिक्स इफ़ेक्ट आहे राव!!!! “अंतरभारती” म्हणा ना हवे असल्यास!!!!!
आपण मराठवाड्यात शिरलो की ही आंतरभारती सुरु होते.. ह्याच्यामुळेच..आपल खाद्यजीवन समृद्ध झालंय ..मी विदर्भात फारसा फिरलो नाहीये ..पण आता महेंद्रजीनी माझी उत्सुकता ..आणि जीभ दोन्ही चाळवल्ये..आणि तुम्ही खवय्ये ..त्यात फोडणी देताय …खमंग होतोय लेख ..त्यात तो ६०० वा ..म्हणजे खरपूस..होणारच …
राजकमल चौक च्या फ्लायओव्हर वर रात्री बसलेले असतात,
कारण तिथे रात्री बरेच “डबलसीट” आलेले असतात!!!!….. ;)…. काका राजकमल फ़्लायओव्हर अमरावती का नया मिलनेजुलने का स्पॉट है!!!!!!
गुरु
रात्री पण गेलो होतो एकदा, तेंव्हा दिसले सगळे जोडीने.. पण ” तसं ” ( बांद्रा बॅंड स्टॅंड सारखं)काही करत नाहीत ते लोकं.. 🙂
काका, बिचारे आपले अमरावती मुळात बांद्रा-कुर्ला एकत्र इतके असेल साईझ नी!!!!!, पोरे खुल्ला बायको/गर्लफ़्रेंड घेऊन निवांत बसतात हेही नसे थोडके ना!!!!!!! मला तर वाटते माझ्या नातवाचे अन नातसूनेचे सुत जुळेल तेव्हापण अमरावती तितके पुढे गेलेले नसेल अन तेच बरंय राव!!!!!!
shewti gadya…aapla gawch bara…Jay Ho Amravati…
कुशल ,
बरोबर.. शेवटी आपलं गांवच बरं वाटतं..
वा वा!!! गरम्याच्या दिवसात कुल्फीचे दर्शन देखील सुखावह आहे. एकदम गारेगार…
दुपारच्या दोन वाजताच्या उन्हात ( ४३ डिग्री ) तर कुल्फीची मजा काही औरच!
अहाहा.. बऱ्याच दिवसांनी खादाडी पोस्ट आल्याने णो णीशेढ !! 🙂
एकेक वर्णन वाचूनच तोंडाला नुसतं पाणी सुटलंय !! एक अमरावती तरीप नक्की आता.. स्पेशल रघुवीर साठी 🙂
वाह काका … सगळ्या आठवणी ताज्या केल्यात तुम्ही. काढतोच आहे वारी अमरावतीची आता.
गड्डा हॉटेल मी कधी बघितलं नाही, ऐकलं भरपूर आहे त्याबद्दल. श्याम थियेटर आणि रघुवीर ची वारी माझी पण नक्की ठरलेली रहायची. आता थियेटर बंद झालं आहे. पण रघुवीर जसेच्या-तसंच!
राजकमल चौकात , थियेटर च्या बाजूला उन्हाळ्यात पायन्यापल ज्यूसचं एक दुकान सुरु होतं बघा. तो ज्यूसही झक्कास असतो. कधीही जा …. सेम टेस्ट!
लेख आवडेश. 🙂
वैभव
अगदी अगदी.. जाऊन येच एकदा… 🙂
वा! मस्त लेख. फोटोमुळे अधिकच रूचकर झाल आहे. 🙂
राज
प्रतिक्रियेसाठी आभार…
Tondala pani sutl ho kaka….. Tasty lekh… Hya solid unnhat tar kharach roj matka kulfichi aathavan yete… Lahanpani aai ordaychi jast kulfi khau naka tabyet bighdel pan aaicha orda aikunhi ti kulfi khan ek veglich maja asaychi….
massstttchhhh…. kaka..mipan aamachya gavi gelyawar thithalya special dish ghalyashivay parat yet nahi….
Thanks for posting this along with nice photos. I was wondering whether you will cover the small hotel behind Gau Dugdha Sagar. Their Sambar Vadi used to be called HoldAll. Gau Dugdha Sagar itself was a great place for bangali mithai. The GADDA hotel, famous for Dahi Misal was in Rajkamal chowk. Now it is closed, I hear. The Kailas and other tea/ coffee shops near Shyam talkies were favourite places for student community. Nice to hear that they are still there. The ubiquitous ‘kharmure’ and ‘chheetewale kele’ was also a staple diet for many alongwith Allobonda and Kachori. Good you brought all the memories back to life.
गडडा हॉटेल मधे पळसाच्या द्रोणातले ते गुलाबजाम अजूनही आठवतात. तसेच गौदुसा पण एकदम मस्त आहे, अजूनही तिच क्वॉलिटी टीकवून आहे. प्रतिर्कियेसाठी मनःपुर्वक आभार.
थोड अगोदर माहिती असत तर स्वतः तुम्हाला अख्खी अमरावती दाखवली असती..असो परत आले कि कळवा ..
कुशल,
अरे माझं लहानपण अमरावतीलाच गेलं.. 🙂 पण पुढल्या वेळॆस नक्की सांगीन आधी.
कुशल,
अरे माझं लहानपण अमरावतीलाच गेलं.. 🙂 पण पुढल्या वेळॆस नक्की सांगीन आधी.
मस्त लेख वाचून तोंडाला पाणी सुटल..
पुढल्या वेळेस अमरावतीला जाणे झाले, तर नक्कीच हा लेख रेफर करा.. 🙂 प्रतिक्रियेसाठी आभार.
i have miss to Amravati I from Amravati. But currently jobs in pune persistent system ltd software engineers really miss to Amravati gila vada and kachori sambhar vadi
Gila vada ha keval Amravati madhe milato. Me bharatat barech varshapasun nahi. Pan tumhi matra ha Exclusive prakar avashya chakha.