कुरकुरे-कुरकुरे

फेसबुक वरून साभार..

मी इथे या ब्लॉग वर का लिहीतो??  यावर एकच उत्तर म्हणजे मला लिहावंसं वाटतं म्हणून लिहितो!. एखाद्या पेपर मधे ब्लॉग बद्दल छापून यावं म्हणून    म्हणून काही लिहीण्याचा उद्देश नसतो माझा. म्हणूनच  लोकसत्ता मधे ’काय वाटेल ते ’ चा उल्लेख ज्या  कुत्सित पद्धतीने करण्यात आला, ते पाहिल्यावर निश्चितच  थोडं वाईट वाटलं .  काय मनात आलं कोणास ठाऊक, पण मला गिरीश कुबेरांना (लोकसत्ताचे संपादक) पत्र पाठवण्याची दुर्बुद्धी सुचली, आणि मी त्यांना माझ्या मनात जे काही आलं ते लिहून पाठवलं, या अपेक्षेने की , ते मला नक्कीच उत्तर देतील.  पण…….मी  पाठवलेल्या वैय्यक्तिक पत्राला त्यांनी पुढल्या सोमवारच्या लेखात वापरलेले दिसल्यावर तर मनःस्ताप अजूनच वाढला. एवढे  करुन   त्यांचे समाधान न झाल्याने,  त्या लेखाखाली माझ्या विरुद्ध असलेल्या कॉमेंट्स ( बहुतेक स्वतःच समीक्षा देशमुख नावाने लिहून) केवळ प्रसिद्ध करून आपल्या मनाचा ’कोते’ पणा लोकसत्ताकारांनी अधोरेखित केला.

लोकसत्ता सारख्या पेपरने  “सायबर बुलींग” सुरु करावे ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. सायबर बुलींग  चे जगात बरेच बळी पडलेले आहेत.  अशा तऱ्हेच्या सायबर बुलींग मुळे जगभरात कित्येक लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत.   अर्थात मी काही तसे करणार नाही , पण पेपरमधे काहीही छापताना आणि  आपण सायबर बुलींग तर करत नाही ना? याचा विचार प्रत्येक पेपरने करणे आवश्यक आहे. सायबर बुलींग हा  ’येलो जर्नॅलिझम’ चा हा एक भाग आहे ह्याची जाणीव लोकसत्ताला  असावी अशी किमान अपेक्षा करतो-आणि जर ती जाणीव  नसेल तर वडापाव गाडी किंवा भेळ-पुरीचा पर्याय आ्हेच.

प्रतिवाद, तर्क, समर्थन किंवा संतुलन  वापरून लिहीणे  म्हणजे वृत्तपत्रीय लेखन असा माझा (गैर) समज होता, हे त्या सदराने  सिद्ध केलेले आहे. ’डोके’ वापरून ’धड’ न लिहीण्याचा पण केल्यावर आणि  पेपरचा एक कोपरा आपल्या ताब्यात आहे, काय छापलं जातय याकडे संपादकाचे काही लक्ष नाही,  तेंव्हा आपल्याला जी काही गरळ ओकायची आहे ती ओकून , आणि आपल्या  अल्प मती वर बौद्धिक सृजनशीलतेची पुटं चढवून किंवा नसलेली सर्जनशीलता अंगी बाणवून काही तरी अगम्य लिहिणे, आणि एखाद्याचा अपमान करणे हा आपला  अधिकार आहे असा समज   या लेखकाचा झालेला आहे असे दिसते.     या वाक्यातून तुम्हाला काय बोध होतो? ह्या अशा तऱ्हेने लेख लिहिला जातो लोकसत्ता मधे वाचावे नेटके सदरात.अशी वाक्य लिहायला फार अक्कल लागते असे नाही, पण नाळ तुटल्या सारखी वाटते मातृभाषेबरोबरची,  आणि कृत्रिम पणा पण येतो लिखाणात.त्याच सदरातील एका लेखात खुसखुशीत लिहीण्याच्या प्रयत्नात डोकं आणि धड यांच्यावरच्या ओढून ताणून केलेल्या कोट्या वाचल्यावर कपाळ भिंतीवर आपटून घ्यायची इच्छा  झाली होती.

विचारांची बैठक, खंबीर पणा, आणि विस्तृत वाचनामुळे “लेखनाला ” एक  योग्य वळण लागते. पण जर   वाचन विस्तृत असेल आणि ’वैचारिक बैठक’ जर पक्की नसेल तर मग ’वाचावे नेटके’ लिहिले जाते.

अशाच काही  ’स्वयंघोषित साहित्यिक पंडितांनी” काही वर्षापूर्वी पुलं, वपुं, सुहास शिरवळकर, चिंतामणी लागू वगैरे अनेक लेखकांना  साहित्यिक म्हणून अनेक वर्ष मान्यता दिलेली नव्हती. मध्यमवर्गीय संस्कृती वर लिहीतात म्हणून वपु वर पण खूप टीका करण्यात  यायची.  अर्थात त्यांच्या मान्यता न देण्याने, किंवा टीका करण्याने  काही फारसा फरक पडला असे नाही, जनतेने तर ह्या सगळ्या लेखकांवर आणि त्यांच्या लिखाणावर मनापासून प्रेम केले. याचं  कारण  एकच- ते म्हणजे त्यांच्या लिखाणात नेहेमीच साधीसोपी  आणि मनाला भिडणारी भाषा.

बाबुराव अर्नाळकरांनी  हजाराच्या वर रहस्यकथांची पुस्तकं  लिहिल्यावर सुद्धा त्यांना लेखक, साहित्यिक म्हणून आजही मान्यता  दिल्या गेलेली   नाही. अहो निरनिराळ्या विषयांवर हजारो रहस्यकथा लिहीणे म्हणजे काय चेष्टा नाही.  ही उदाहरण देण्याचा अर्थ मी स्वतःला साहित्यिक वगैरे समजतो आहे असे नाही- तर हे टीकाकार ज्या प्रकारे टीकांकडे   लोकं  लक्ष देत नाहीत हे सांगणे आहे.

मी स्वतः विचार केला की मला वाचायला काय आवडेल? रंजनात्मक, ज्ञानात्मक की माहिती पूर्ण ?? स्वतःच विचार केल्यावर “मला जे काही माहिती नाही ते मला वाचायला आवडेल” – मग रे कुठल्याही प्रकारचे ले्खन असले तरीही चालेल. हा ब्लॉग  लिहित असतांना  मी हेच तत्व पाळून मला स्वतःला जे काही आवडेल ते्च लिहत आलो आहे..

काही लोकांना प्रत्येकच गोष्टीला नावं ठेवायची सवय असते. मग तो एक प्रकारचा स्वभावच होतो . प्रत्येकच गोष्टी बाबत कुरकुर करण्याचा स्वभाव.  असं पहा , सकाळी बायकोने मस्त चहाचा कप समोर आणला, आणि नेमकी साखर कमी झाली… यावर कुरकुरे महाशय नक्कीच ” काय हे? इतकी वर्ष झाली लग्नाल, तरीही चहा करता येत नाही का तूला” म्हणून कुरकुर करत चहाचा कप समोर धरेल. बायकोने टाकलेली एक चमचा साखर अगदी चहा थंड होई पर्यंत ढवळेल, आणि मग पुन्हा चहा गार झाला म्हणून कुरकुर करत बसेल..

याच परिस्थिती मधे दुसरा एखादा म्हणजे (नॉन कुरकुरे) मात्र बायकोला समोर बोलावून, एक घोट घे गं चहाचा, म्हणजे पुरेसा गोड होईल म्हणून बायकोला सांगेल.. चहाकडे पाहून बायको हसली,किंवा तिने एक घोट घेतला  की चहाची गोडी वाढेल असं म्हंटल्यावर बायकोला पण चहात साखर कमी झालेली आहे हे समजेल, आणि  तिचा पण मुड खराब होणार नाही. जीवनातला आनंद जर टिकवून ठेवायचा असेल तर कुरकुर करणे सोडणे, आणि जगात अस्तित्वात असलेल्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे एवढे केले तरीही पुरेसे आहे.

माझा अनुभव असा आहे, की बहुतेक जगात जितके ’लुझर्स ’आहेत ते कुरकुरे   असतात. असाच एखाद्या कुरकऱ्या जेंव्हा जेंव्हा संधी मिळते  तेंव्हा त्याच्या ह्या कुरकुरीत स्वभावाचे यथार्थ दर्शन त्याच्या अगम्य आणि जडजंबाळ शब्द वापरून तसेच शब्दच्छल करून   लिहिलेल्या लेखातून घडवतो.

कुठल्याही गोष्टीला चांगलं न म्हणता येणं  हा यांचा दोष असला तरीही त्याला   आपला गुण समजतात.  एखाद्या गोष्टी मधे वाईट काही सापडले नाही तर हे लोकं अस्वस्थ होत असा्वे. स्वतःबद्दल उगाच काहीतरी भ्रामक कल्पनांचा डॊंगर डोक्यात घेऊन  हे  समाजात वावरत असतात.” बहुतेक प्रत्येक चांगल्या गोष्टी मधे वाईट काय आहे, हे शोधायचं, आणि मग त्या बद्दल  कुरकुर करत रहायचं” असा स्वभाव असतो यांचा.  पेसिमिस्ट+सॅडीस्ट अशा प्रकारच्या  (अव)गुणांचे कॉंबीनेशन म्हणजे हे कुरकुरे.

एक कविता होती, गोविंदाग्रजांची , चिंतातूर जंतू नावाची.   त्या कविते मधे गोविंदाग्रज अशा कुरकुऱ्या लोकांची मस्त उडवलेली आहे, ” सूर्याचे तेच उजाड उघड्या माळावर उगाच सांडते, ते बघवत नाही” असं म्हणणाऱ्या कुरकुऱ्याला ते म्हणतात, “मग डॊळे फोडून घेच गड्या”.

जेंव्हा तोच कुरकुऱ्या म्हणतो, झाडावर एवढी हिरवी पानं उगाच निर्माण केलीत, त्यांचं मातित पडल्यावर काय होत असेल? तर यावर गोविंदाग्रज म्हणतात, ” जा मातीत मिसळुनी पाही ”

” निंदकाचे घर असावे शेजारी”  म्हणतात,  म्हणूनच  लोकसत्ता मधल्या काय वाटेल ते च्या निंदाजन्य उल्लेखावरून  चांगलं काय ते घ्यायचं असा विचार केला तर एक गोष्ट लक्षात आ्ली,  की  आपला ब्लॉग  कसाही असला तरीही दुर्लक्ष करण्यासारखा निश्चितच नाही, “लव्ह मी ऑर हेट मी, यु कान्ट इग्नोअर मी” !.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , , , . Bookmark the permalink.

101 Responses to कुरकुरे-कुरकुरे

 1. shamikaa rohan says:

  Tumche articles mi nehemi vachte. Khup chan ani specific lihita tumhi. We get something positive from ur articles everytime. Youngsters get really good lessons from your experiences esp about relations. Keep writing….

  • शमिका
   तुझ्या सारख्या वाचकांमुळेच तर आजपर्यंत इथे टीकुन आहे. तिन वर्ष झाली , आणि हे ६०१ वे पोस्ट, हे पोस्ट विनोदी, हलके फुलके असावे अशी इच्छा होती, पण काही गोष्टी ापल्या हातात नसतात… 🙂

 2. सट्ट्याक एकदम.. !!!! कुरकुरे… अगदी चपखल नाव आहे त्याला… उगाच वैचारिक लेखनाचा आव आणून आणि लोकांना नावं ठेवून ट्ट्यार्पी वाढवणारा दुर्दैवी इसम !!! जोपर्यंत तो सुधारत नाही तोपर्यंत आपण आपल्या ब्लॉगवरून त्याला झोडत राहिलं पाहिजे !!

  • गुप्ताच्या मते, आशय अभिव्यक्ती,आशयानुभवाला विकसित करीत जाणारी , द्वंद्वात्मकता,दृष्यानुसंधान,आत्मनिष्ठ, वर्तमानकालीन सापेक्ष, प्रागैतीहासिक कालापासून ,स्वायत्त अनुभव,संरचना, स्थूल, भाषाशैली साठी दृष्यानुसंधानाद्वारे , सूक्ष्म संरचनातंत्र,लेखनतंत्र, कला तंत्र, वर्तमानाचा , साठोत्तरीचे साहित्य, ललीत कलांची माध्यमद्रव्य,गुणवैशिष्ठ्य, रचनाबंध,अधिक एकात्म अनुभव,एकात्मिक प्रभाव, अभिव्यक्ती,कालनिष्ठ, व्यक्तिनिष्ठ,गुणसमुच्चय, कल्पनेचा रम्यविलास, मनोविश्लेषणप्रवणता,सुक्ष्म आणी तरल करून, वगैरे वगैरे.. शब्द वापरले कीलिखाण समृद्ध होते. आणि मग तो धड आणि डोक्याचा जड विनोद पण करतो.

 3. Pramod Mama says:

  Dear Mahendra Kaka,
  Khoop Senti zalele Distay, Ekach manat Theva “HATHI CHALE BAZAR TO KUTTE BHUKE HAZAR”. Tumhi & tumche Vividh Likhan Amha Sarvana Khooop Khoop Khooooop Awdate. Baki Sarv Forget it ,Ani Roj Tumhi nave nave lihit jaa hi Deva kade Prarthana.BE HAPPY SIR. THANKS

  Pramod MAMA

  • प्रमोदमामा,
   तुम्ही नेहेमीच आवर्जुन प्रतिक्रिया देऊ्न उत्साह वाढवता. जर त्यांनी माझ्या पत्राचे उत्तर दिले असते तर कदाचित हा लेख लिहिला पण नसता. असो
   एक्सप्रेस मधे विद्याधर गोखलेंची, आणि अरुण शौरींची भेट झाली होती, पण तेंव्हा वय खूप कमी होतं, पण ते एक मोठे माणूस आहेत याची जाणीव होती. काही वैय्यक्तीक कारणांमुळे एक वेगळीच जवळीक आहे या पेपर बद्दल. पण अशा मुर्खसारख्या लेखांनी पार वाट लावुन टाकताहेत हे पन्नास- शंभर शब्दांचे धनी.

 4. Pankaj Z says:

  सट्ट्याक !!
  अगदी इथपर्यंत आवाज आलाय. फक्त लाल झालंय की वळही उमटलेत?

  • पंकज
   अंधारात तीर चालवलाय.. तो कोण हे माहिती नसल्याने पहाता आलं नाही .. :)वळ: उमटले की नाही .

 5. कुणीतरी विव्हळल्याचा आवाज आला खरा. तो कुठून आला हे आत्ता कळाले… पोस्ट वाचून 🙂

 6. Naresh says:

  Nice write up! Last line is fantastic…

 7. Tanvi says:

  🙂 … तरीही बराच सौम्य झालाय लेख असे म्हणेन मी 🙂 … कुरकुरे…. आवडलं…. बाकि एकच सांगेन तुम्ही ब्लॉगिंगमधले आम्हा सगळ्यांचे आदर्श होता आणि रहाल…..

  लिहीत रहा ,आम्ही वाचतोय अगदी मनापासून… जय ब्लॉगिंग!!! 🙂

  • ्तन्वी
   ्सौम्य मुद्दाम ठेवलाय. मनातला उद्रेक बराच शांत झालाय लिहिल्यावर.. 🙂 हा लेख लिहीणार पण नव्हतो, पण तो सायबर बुली आपलं साम्राज्य स्थापित करतांना दिसतोय म्हणून.. खाली प्रकाश घाटपांडेंच्या कॉमंट वर विस्त्रूत लिहीतो.

   • काका, काळजी नको. आपण असेपर्यंत हे संस्थळांच्या मुखवट्याआड लपणारे टोणगे आपलं काहीही वाकडं करू शकणार नाही. आपला स्वतःचा ब्लॉग आहे आपल्या हातात. जास्ती नाटकं केली त्यांचे मुखवटे उडवायला असा कितीसा वेळ लागणार आहे आपल्याला??

 8. Gouri says:

  काका, मला बरेच दिवसांपासून तुमच्या ब्लॉगवर कॉमेंटता येत नाहीये.
  आजची पोस्ट सही झालीय. अरूण दाते एक पुलंचा किस्सा सांगतात, तो आठवला.
  अरूण दाते भक्तीसंगीत गात नाहीत अशी कुणीतरी टीका केली. त्यामुळे त्यांनी भजनं म्हणयला सुरुवात केली. हे समजल्यावर पु ल त्यांना म्हणाले, “अरे, हे टीकाकार म्हणजे बोहारिणीची पोरं असतात. नवा कोरा शालू जरी त्यांना दिला, तरी नाक मुरडतील, आणि म्हणतील, अजून काही बरा कपडा नाही का? तेंव्हा तू तुला आवडेल तेच गा.”
  🙂

  • गौरी
   आ्ता सेटींग बसलले आहे, यानंतर कॉमेंट द्यायला त्रास होणार नाही..
   पुलंचा किस्सा भावला. एकदम विषयाला धरून .

   • या अडाणी टीकाकारांपेक्षा त्या बोहाराणीच्या पोराची लायकीही जास्त आहे हे माझं वैयक्तिक मत !!!

 9. ngadre says:

  अत्यंत संयत लेख. तुम्हाला कशा प्रकारचा मनस्ताप झाला असेल ते पूर्ण समजू शकतो. आम्हा वाचकांचा तुम्हाला प्रतिसाद हीच खरी पावती. पढिक भाषेत लिखाणाला उंची नाही, खोली नाहीलेखनात जाणीव आहे पण नेणीव नाही अशा कसरतपूर्ण लिहिणार्‍या टिपिकल टीकाकारांची गणती कमी नाही.

  • नचिकेत,
   माझे रागाच्या भरात लिहिलेले पत्र छापुन त्यांनी आपली पातळी दाखवली. असो. मी काही या ब्लॉग वर लिहून पैसे कमावत नाही, किंवा आपले पोटंही भरत नाही, तेंव्हा आय एम लिस्ट बॉदर्ड..

 10. Dipak says:

  आपलीच लाल करणार्‍याचा गालही लाल केलात.. सॉलिड!

  • दिपक
   उद्देश तसा नव्हता, फक्त माझे डीस्प्लेझर त्याच्यापर्यंत पोहोचवायची इच्छा होती.जे झालं ते आपोआप झाले.

 11. raje says:

  झक्क्क्क्क्क्कास!

 12. <>
  मी हेच म्हणतो कि आपण असे लिखाण एवढे मनाला लागुन घ्यायला नको होते.आपला वाचकवर्ग वेगळा आहे. आपण वाचावे नेटके दुर्लक्षित केल असत तर बर झाल असत. जो देगा उसका भला जो नही देगा उसकाभी भला!
  http://aisiakshare.com /node/743 इथे यावर चर्चा झालेली आहे.

  • प्रकाशजी
   मी ती चर्चा वाचली, म्हणूनच तर हा लेख लिहायला घेतला. त्याने स्वतःच ( माहितीगार नावाने) ती चर्चा तिथे सुरु करवली आहे. लोकांना स्वतःच्या ब्लॉग बद्दल चांगलं छापुन यावंसं वाटत असेल, म्हणून तिथे पण त्याची चमचेगिरी करणे सुरु आहे. खबरी…. मला काही फरक पडत नाही. त्याचे लांगुलचालन करायचे असेल तर खुश्शाल करू द्या लोकांना.
   सायबर बुलींग चा आधुनीक नमुना…

   • सहमत.. त्याने स्वतःनेच मुद्दाम तिकडे ती चर्चा सुरु केलेली आहे. आणि त्यांच्यातलाच असल्याने त्या संस्थळवाल्यांना झक मारत त्याच्या हो ला हो करत त्याची बाजू घेऊन भांडावं लागतंय. भिक्कार सदर चालत नसलं की “घटं भिंद्यात पटं छिंद्यात” करत काहीही करून प्रसिद्धी ही मिळवावीच लागते.. नाहीतर सदर बंद पडायची भीती. सर्व्हायवल इश्यु आहे त्याचा बिचाऱ्याचा !!!!!!

    • लोकसत्ताच्या संपादकांना माहिती असेल का? की संपादकही यात सामील आहेत?? जर त्याला हिट्स हव्या असतील तर मी माझ्या ब्लॉग वर दर सोमवारी त्याच्या लेखाची लिंक द्यायला तयारआहे. राघव म्हणतो, तो नवीनच जॉइन झालाय तिकडे- म्हणून सर्व्हायवल के लिए कुछ भी करेगा सुरु आहे त्याचे.

 13. Shradha B says:

  kaka,bhunkanari kutri bhinkatach rahatat……aapan aaplyala patel tech karave…….

  • श्रद्धा
   अहो, मी विसरलो पण होतो, पण हा मूर्ख माणूस वेगवेगळ्या साईट्स वर जाऊन अशा काहीतरी चर्चा सुरु करतोय म्हंटल्यावर लेख लिहायला घेतला…

 14. Anonymous says:

  तुमच्या ब्लोग बद्दल अस काही लिहिण्याची गरज नवती लोकसत्ताला…..तुमच लिखाण हलक-फुलक, माहितीपूर्ण असल्यामुळे वाचायला नेहमीच आवडतं.

 15. Poorva Kulkarni says:

  तुमचे लेख हे नक्कीच चांगले असतात. विविध विषयावर असतात . informative असतात. वाचून समाधान मिळते. प्रत्येक लेखावर मला comments नाही देता येत… पण मी आवर्जून वाचते.. तुम्ही इतर लोकांकडे लक्ष देवू नका. चांगले लिखाण, चांगले कार्य हे समाजाला योग्य दिशा देते.

  • पूर्वा
   त्याला प्रसिध्दी हवी आहे, ती दिलेली आहे मी माझ्या तर्फे. पण मनःस्ताप तर आहेच नां.. मनःपूर्वक आभार.

 16. Rajeev says:

  अरे, कुत्रे ते कुत्रे… आपल्या पेक्शा (बौधीक रीत्या) उंच, आणी वर उजेड( डोके) असले की ह्यान्ची तंगडी वर !!

  • राजीव,
   अत्युच्य ! बरेचदा वाटतं की विख्यात आर्किटेक्ट होण्यापेक्षा तू लेखक का झाला नाहीस? सगळ्यांची सुट्टी करून टाकली असती.

 17. महेंद्र….. अरे दुर्लक्ष हा एकच उपाय आहे ह्यावर.

  • जयश्री
   दुर्लक्ष केलं तर काही साईट्स वर जाऊन स्वतःच आपल्या लेखाची जाहिरात करतोय तो.. असो.. दुर्लक्ष करणार आहे , जो पर्यंत तो माझ्याबद्दल कुठल्या तरी सोशल साईट्स वर जाऊन काही बरळत नाही तो पर्यंत. नाही तर सोडणार नाही त्याला हे नक्की.

 18. Sheldon Cooper says:

  जोरदार सिक्सर..:-)

 19. राघव says:

  काका,
  छान दिली आहे कानाखाली. नेटके पर्यंत मेसेज नक्कि पोहोचेल, कारण रात्रंदिवस तो सोशल मिडिया वर पडिक असतो. हेरंबच्या ब्लोग वर दीलेल्या वोर्निंग मुळे तो आजकाल थोडा सुधरलेला दिसतो आहे नाही तर त्याचं कव्हर ब्लो अप केले असते.. दुर्लक्ष करा. त्याला त्याचा सदरासाठी वाचक हवे होते, म्हणुन त्याने तुमच्यावर टिका केली.तुम्ही लिहालच, आणि त्याला प्रसीद्धी मिळेल. हाच प्रकार आज एका संस्थळावर सुरु आहे. भरपूर प्रसिद्धि मीळवतो आहे तो.

  • राघव
   हिंट साठी आभार.
   अभिनव गुप्ता म्हणजेच माहितीगार हे समजले, पण माहितीगार म्हणजे कोण हे तू कधी सांगणार?
   लोकसत्ताच्या संपादकाला हा अभिनव गुप्ता अशी चीप पब्लिसीटी करतोय हे माहिती असेल का रे राघव? इतक्या लो लेव्हलला लोकसत्ताला आलेला पाहून मौज वाटली. कुठे एकेकाळची परंपरा असलेला पेपर, आणि कूठे हे असे ऽ‍%॓॓॑॑ *&^&#@ लेखक.
   मी चॅलेंज वर सांगतो, त्या ठिकाणी या गुप्ताबद्दल चांगलं लिहिणाऱ्यांच्या ब्लॉग ची तो नक्की तारीफ करणार हे नक्की.

   • >> त्या ठिकाणी या गुप्ताबद्दल चांगलं लिहिणाऱ्यांच्या ब्लॉग ची तो नक्की तारीफ करणार हे नक्की.<<

    काका, तेही नाहीये.. कारण तिथे गुप्ताबद्दल चांगलं लिहिणाऱ्यांचे स्वतःचे ब्लॉग्ज आहेतच कुठे. ते सगळे फक्त प्रतिक्रियाबहाद्दर !!!

    • हेरंब
     मग त्या सायटी बद्दल चांगलं लिहिल तो.. 🙂

     • हो बरोबर.. नाहीतरी ती साईटही नवीनच आहे बिचारी. सायटीचाही सर्व्हायवल इश्युच आहे म्हणा. नगाला नग चांगले मिळालेत !!! चालू द्या.

 20. काय बोलू…. दंडवत 🙂 🙂

 21. Aparna says:

  काका, संयत लेख…त्यांनी छापलेल्या तुमच्या पत्रापेक्षा खूप खूप चांगला हे नक्कीच म्हणेन..
  आणि ब्लॉगर आणि लेखक यातला हा एक सुक्ष्म फ़रक आहेच नं की लेखकाला कदाचित स्वतःच्या पोटापाण्यासाठी (पण) लिहावं लागतंय पण माझ्या माहितीतले ब्लॉगर्सतरी स्वतःसाठी लिहितात..
  वरचा गौरीचा किस्सा झकास आहे…च प ख ल…..:)

  • अपर्णा
   ते पत्र मी पत्र म्हणून लिहिले होते, अजिबात काही विचार न करता एक पर्सनल पत्र म्हणून. लोकसत्ता मधे ते प्रसिद्ध व्हावे असे मला कधिच वाटले नव्हते. पण त्यांनी कंबरेखाली वार केला .असो..

 22. arunaerande says:

  मी स्वतः विचार केला की मला वाचायला काय आवडेल? रंजनात्मक, ज्ञानात्मक की माहिती पूर्ण ?? स्वतःच विचार केल्यावर “मला जे काही माहिती नाही ते मला वाचायला आवडेल” – मग रे कुठल्याही प्रकारचे ले्खन असले तरीही चालेल.
  अगदी १०० टक्के बरोबर. आणि म्हणूनच तुमचे लेख सगळ्यांना आवडतात. हे कुरकुरे तर नुसते पोकळ ! त्यांना काही substance असतो का? आणि शेवटी काय, हाथी चाले अपनी चाल्से, कुत्ते भौकते है तो भौकने दो!

  • अरूणा
   धन्यवाद. अहो जर एखादा लेख आवडला नसेल तर तशी कॉमेंट द्यायची, त्या पेक्षा सरसकट टीका करण्यात काय अर्थ आहे?

   • अहो आणि पूर्ण ब्लॉग वाचतातच कुठे ते? सगळा अर्ध्या हळकुंडाचा कारभार !

    • चक्क कबुल पण करतोय की एक दोन लेख वाचून तो सदर चालवतोय म्हणून. या वरून आठवले, बेशरमाने सिताफळाची बी गिळली, त्याचं झाडं निघालं मागून, तर तो बेशरम म्हणतो बरं झालं, उन्हाची सावली मिळेल.

   • arunaerande says:

    ते माहित्गार का कोण त्यांचा पत्त तर द्या. बघु त्यांचा काय वज आहे! नाहीतरी असे म्हणतातच ना की स्वतः काही क्रियेटिव्ह लिहिता आले नाही म्हणजे तो टीकाकार बनतो!!

    • जाऊ द्या हो, काय करायचं तो कोण आहे ते समजून? तोंडं लपवून फिरणारे लोकं ते.. स्वतःवर अविश्वास असलेले असे लोकं काय करू शकतात?

 23. Sadhana Raje says:

  Hi Sir,
  Me tumche lekh roj vachate, comments lihit nahi, pan mala tumche likhan avadate, koni kahi lihile tari tumhi lihit raha.

  • साधना मॅडम
   धन्यवाद.. अहो तुमच्यासारख्या वाचकांच्याच भरवशावर तर हा ब्लॉग अजून टिकून आहे. त्या गुप्ताची कॉमेंट वाचल्यावर तर दोन आठवडे काही लिहीण्याचा उत्साहच वाटत नव्हता. पण मग ठरवलं, ह्या अशा तोंडाळ माणसाकडे लक्ष देणार नाही आणि पोस्ट टाक्ली. 🙂

 24. हल्ली पत्रकारितेला ग्लॅमर आलंय, आणि त्यासाठी प्रसिद्धी ही आलीच…. मग ती कुठल्याही मार्गाने का मिळवू नये?

  लोकसत्ताचे हे सदर म्हणजे एक केविलवणा प्रयत्न प्रसिद्धीसाठी आणि त्यासाठी सोशल साईट्सचा सहारा.. 🙂 🙂

  चालू द्या म्हणावं त्यांना……

  • आणि नवख्या सोशल साईटला लोकप्रिय पेप्राचा सहारा.. हरी ओम !!

   • अरेरे.,… काय दिवस आले आहेत लोकसत्ताचे. एक भंगार सदर चालवायला सोशल साईट्स चा सहारा?.. यावर एक लेख मस्त होऊ शकेल. एका पत्रकाराची एक फालतू सदर चालवण्यासाठी चाललेली धडपड.अरे कोणी वाचत नाही तर सोडून दे लिहीणं. आणि स्वतःबद्दल जर इतका माज आणि क~ऒन्फिडन्स असेल तर एक ब्लॉग चालू करून , वर्षभरात एक लाख तरी हिट्स मिळवून दाखव म्हणा, मी लिहीणं सोडून देईन!

 25. डॉ अभिषेक मुळे says:

  महेंद्रकाका जाऊद्या

  तुमचे लेख सुंदर असतात असे लेख आमची जीवन प्रेरणा आहेत तुम्ही कोणाच्याही बोलण्या कडे लक्ष देऊ नका. लिहित राहा, लिहीतच रहा ; पुढील लेखनासाठी शुभेछ्या!!

  • डॉ. अ्भिषेक ,
   एकदा मनातलं सगळं ब्लॉग वर लिहिलं की माझं डॊकं शांत होतं. आता हा विषय संपलाय मा्झ्यामते..,

 26. Kanchan says:

  वृत्तपत्रामधे बातम्या छापताना नावं, स्थळ, काळ इ. तपशीलासकट छापतात. काही “चतुरंग” सदरं असतील तर सेलिब्रिटींच्या नावाने लेख प्रसिद्ध होतात. मग अशा नेटक्या सदराखालीच लेखकाचं नाव न छापण्याचा फाटकेपणा लोकसत्ताने का करावा बरं? इ-पेपरातील लेखाखालीदेखील त्यांना हव्या त्याच प्रतिक्रिया छापल्या जातात. जर नीरक्षीरविवेकबुद्धीने जनजागृती घडवायची असेल, तर हा पक्षपात का? याचा अर्थ काही ठराविक विचारांच्या लोकांसाठीच हे वृत्तपत्र सुरू आहे. कदाचित म्हणूनच प्रसिद्धी मिळविण्यासाठी त्यांच्यावर आता ब्लॉगिंग आणि ब्लॉगर्सवर वादग्रस्त लेख लिहिण्याची वेळ आली असावी. बिचारे लोकसत्ता!

  • कांचन,
   काही ठरावीक ब्लॉगर्स साठीच हे सुरु केलं असावं. प्रत्येक पत्रकार स्वतःला ठणठणपाळ, आणि तंबी दुराईचा समजत असतो. . आता तो त्या लेव्हलचा आहे हे सिद्ध करणं कठीण जातंय त्याला.

 27. अरे सर तुम्ही तर आमचे गुरु आहात ब्लॉग विश्वातले … कायम लिहित राहा असच छान !!

  • आदिती,
   कसले गुरु.. फक्त एक आहे, काय वाटेल ते चा ट्रेंड सुरु केला मी. पूर्वी ब्लॉग जरा उच्च प्रतीचे लिहिले जायचे. कठीणशब्द, अलंकारीक भाषा वगैरे. तो ट्रेंड सोडून हा वेगळा ट्रेंड सेट केला बस!

   • तुमचे लेख वाचले ना मला हि काहीतरी छान लिहावं असं वाटत म्हणून “गुरु” म्हणाले आणि काहीतरी उगाच अलंकारिक आणि कारण नसताना अवघड अवघड लिखाणापेक्षा तुमचा हा सध्याचा ट्रेंड खूप छान आहे अगदी सरळ सध्या आणि सोप्प्या भाषेतला आणि अचूक गोष्टी मांडणारा त्याचमुळे ते लिखाण खूप जवळचं वाटतं असच लिहित राहा खूप शुभेच्छा !!!

 28. mau says:

  mast lekh !!!!
  durlaksh karave ha ekach upay !!!!

  • नाही. माफी वगैरे मागावी अशी अपेक्षाही नाही माझी, फक्त असे पुन्हा इतरांच्या बाबतीत करू नये म्हणून हे पोस्ट>

 29. बिनधास्त लिहा हो…घाबरू नका….

  • जयंतजी
   धन्यवाद.. घाबरायचं काय या लोकांना? आपण काही पैशासाठी लिहित नाही? आपलं लिखाण स्वान्त सुखाय का काय म्हणतात ते.. 🙂

 30. राजन महाजन says:

  महेंद्रजी, नमस्कार.

  तुमच्या या लेखावर जेवढ्या प्रतिक्रिया आहेत तेवढी संख्याही ‘वाचावे नेट-के’ सदर वाचणार्यांची नसेल.
  तुमच्यामुळे उगाचच या सदराला प्रसिद्धी मिळत आहे. तुमचे ब्लॉग नियमित वाचणार्यांना इथूनच त्या
  सदराची माहिती मिळाली असणार यात शंका नाही. “आजचे कार्यक्रम” अशी दुर्लक्ष करण्यासारखी
  जी सदरे आहेत, त्यात अजून एकाची भर.

  दुर्लक्ष करा. “किल हिम बाय, इग्नोरिंग हिम”

  राजन महाजन

  • राजनजी नमस्कार.
   ही अशी प्रसिद्धी लोकसत्ताला लागते यातच त्यांचं फेल्युअर आहे.

   संपादक पण अशा लोकाकडे का लक्ष देत नाहीत हे समजलं नाही.
   दुर्लक्ष करणं हाच उपाय करतो बस्स..

 31. sagarkokne says:

  गाढवाला गुळाची चव काय ? नाही आवडत एखादा ब्लॉग तर सोडून द्या ना…जे चांगले लिहितात (त्यांच्यामते) त्यांच्याबद्दल लिहा…अशा टीकेमुळे ब्लॉगिंग विषयीची प्रतिमा बिघडू शकते हे नाही का लक्षात येत त्यांच्या?

 32. Santosh Kudtarkar says:

  Mi tya “Murkha”Panditache abhaar manato 😛

  Tya mule tar ha itka “Churchurit” lekh zala tumcha Kaka… Lage raho!!! 🙂
  Apan sundar lihita yaad waad nahi… amhala bhidata mhanun amhi daad deto… Jiyo Jiyo aur Aur Likho!!! 😉 🙂

  Keep it UP UP and Above ALL!!!

 33. Amol Suroshe says:

  “कुरकुरे”..हा हा एकदम छान बारसं केलं काका तुम्ही ! हे सगळे कुरकुरे असले तेडे मेडेच ! हा जरा जास्तच तेडा दिसतोय.
  पण असल्यांना सरळ करण्याचे काम आपल्या या लेखाने केले आहे, असेल हिम्मत तर छाप म्हणाव आत्ता.

  या नेटके ला आपण दिलेले फटके योग्यच.
  आम्ही आपल्या सोबत आहोत. जय ब्लॉगिंग

  • अमोल,
   लहान मुलं जशी कुरकुर केल्याशिवाय दुध घेत नाहीत, तसंच याचं ब्लॉग च्या बाबतीत झालेलं दिसते.

 34. महेश नाईक says:

  तुमच्या लेखावर केलेल्या टीकेवरील माझी प्रतिक्रिया लोकसत्ताने छापली आहे. ती पुढील लिंक वर पाहता येईल

  http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=216543:2012-03-18-19-14-17&catid=404:2012-01-20-09-49-09&Itemid=408

  महेंद्र
  तुम्ही छानच लिहिता आहात. कोणत्याही टीकेकडे लक्ष न देता लिहीतच जा.

 35. Anonymous says:

  Hi Sir,
  Please ignore the comments what media people are thinking about.

 36. Ketan says:

  can u pls send the link of that loksatta post ? but dontt worry sir they are more ppl who enjoy ur post:)

 37. त्याच्या मुस्कटात मारल्यासारखा लेख झालाय, एक-दोनदा त्याचं ब्लॉगपरीक्षण (परीक्षण कसलं ते मराठीतले सगळे अवजड शब्द एकत्र करून त्याची भेळ त्या पानावर ओतल्यासारखी वाटत होती ) वाचलं होतं ते हि ऑनलाईन (पुणेकरांच्या घरात लोकसत्ता येणं तसं अवघडच 😛 ) .
  ब्लॉग म्हणजे स्वतः साठी लिहिणे या संकल्पनेचा आणि याच्या लिखाणाचा ताळमेळ कुठेच बसत नव्हता त्यामुळेच ते तथाकथित परीक्षण
  फार ‘अभिनव’ वाटलं.हा असाच लिहित राहिल्यास हे सदर लोकसत्ता मधून लवकरच ‘गुप्त’ होईल असे वाटते.
  बाकी तुम्ही ब्लॉगर्स चे सेनापती आहात त्यामुळे असल्या राळ उडवणार्यांना घोड्याच्या टापेखाली टाका !

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s