बॉलीवुडची शंभरी .

बॉलिवुड ला आज शंभर वर्ष झाली आहेत.   दादासाहेब फाळके यांनी पाया रचलेल्या हिंदी चित्रपट सृष्टी कडे जर आज नजर टाकली तर एक गोष्ट लक्षात येईल की गेले कित्येक वर्ष या चित्रपट सृष्टी वर फक्त खान मंडळीचे राज्य अबाधित आहे. परवा दादासाहेब फाळके  यांचा हरिश्चंद्राची फॅक्टरी पाहिल्यावर   त्यांनी किती प्रतिकूल  परिस्थितीत या चित्रपट सृष्टीचा पाया रचला   याची जाणीव झाली.

जुन्या सिनेमाचा विचार कराल, तर त्या मधे दामूअण्णा मालवणकर , आणि भालचंद्र पेंढारकरांपर्यंत बरेच मराठी  मातब्बर ध्येय वेडे  कर्तृत्वाच्या बळावर अत्युच्च शिखरावर पोहोचले, पण   त्यांना तिथे  फार काळ रहाता आले नाही , आणि  ते लवकरच लयाला ही गेले. या क्षेत्रात    टिकाव धरून रहाणारे घराणे म्हंटले तर केवळ कपूर घराण्याचे नांव घेता येईल,पण त्यांनाही या क्षेत्रावर निर्विवाद ताबा काही मिळवता आला नाही. व्ही. शांताराम  यांच्या सिनेमा प्रेमाबद्दल काही संशय नाही, आणि त्यांनी  या क्षेत्रात जरी बरंच काम केलं, तरी पण   त्यांचं पण राजकमलचं साम्राज्य फार काळ टिकलं नाही. याचं कारण काय असेल बरं??

गेल्या साठ एक वर्षातला इतिहास बघाल, तर या  क्षेत्रामधे बहुसंख्य मुस्लिम कलाकारांनी (मुख्य अभिनेते दिलीप कुमार, नर्गीस , सायरा बानू , वहिदा रेहमान, शाहरुख खान, अमीर खान ) अबाधित राज्य केले हे लक्षात येईल. तसेच, दुय्यम दर्जाचे अभिनेते पण( जसे  रेहमान,मेहमुद, जॉनी लिव्हर, जॉनी वॉकर ,ज्यु.मेहमुद , जलाल आगा ) वगैरे लोकांनी दुसरी फळी अडवून धरली होती.   या मंडळींनी  दुय्यम भूमिका साठी पण पण इतरांना चान्स न मिळू देण्यासाठी भरपूर लॉबिंग केले. इतकं असतांनाही अमिताभ बच्चन ने आपलं एकछत्री साम्राज्य बरीच वर्ष सांभाळलं. पण  बच्चनची दुसरी पिढी मात्र तितकासा प्रभाव टाकू शकली नाही.

असं जरी असलं, तरी भारता मधे  जनतेने कधीच  कुठल्याही  कलाकारांची तारीफ करतांना   त्याची जात , धर्म काय आहे हे कधीच पाहिले नाही. आजही हिंदू आधिक्य असलेल्या भारत देशातही शाहरूख खान, आमीर खान  अतिशय आवडीचे म्हणून लोकांच्या गळ्यातले ताईत झालेले आहेत. दि्लीप कुमारने पण अनभिषिक्त राज्य केले भारतीयांच्या मनावर, पण त्याने मात्र ” शाने पाकिस्तान” हा किताब स्वीकारून  भारतीयांच्या  प्रेमाचा अपमान केला असे वाटते. ( फिरोजखान ने मात्र हा बहूमान नाकारला होता )

सुरुवातीच्या काळात, म्हणजे जेंव्हा नुकता च सिनेमा बनवणे सुरु झाले होते तेंव्हा कलाकारांना महिने वारीने पगार दिला जायचा, या काळात फक्त ध्येय वेडे लोकं सिनेमा बनवायचे-  या उद्योगातून पैसा मिळवावा, खूप श्रीमंत व्हावं अशी मनोधारणा   कधीच नसायची.  कलेवरचं निर्व्याज  प्रेम  हेच कारण असायचं . प्रसंगी घरावर तुळशी पत्र ठेऊन सिनेमाची निर्मिती करणारे दादासा्हेब  फाळके हे त्याचेच एक उदाहरण. तेंव्हा कलाकारही वेडे, आणि प्रोड्य़ुसर्स ही वेडे-  चित्र निर्मितीच्या ध्येयाने पछाडलेले  होते.

सिनेमा बनवायचा म्हंटलं, तर त्या मधे तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात- एक म्हणजे पैसा   दुसरे म्हणजे कलाकार आणि तिसरी म्हणजे काळा पैसा! ह्या तिन्ही पैसा हातामधे असलेले लोकं होते ते म्हणजे डॉन आणि त्यांचे साथीदार!!

करीम लाला हा एकेकाळचा मुंबईचा डॉन.पैसा तर लागणारच सिनेमा बनवायला, मग  स्मगलर्स लोकांनी आपले पैसे या व्यवसायात गुंतवणे सुरु केले.  आणि एकदा पैसा गुंतवल्यावर मात्र मग या या व्यवसायाच्या सगळ्याच नाड्या आपोआप त्यांच्या हाती गेल्या.  कोणाला काम द्यायचे- कोणाला नाही, कोण स्टॊरी लिहीणार कोण डायरेक्ट करणार या सगळ्या बाबींमधे त्यांनी   हस्तक्षेप सुरु केला. प्रसंगी नट्य़ां कडून अवाजवी मागण्या, सेक्स्युअल ग्रटीफिकेशनची  मागणी पण केली जाऊ लागली. मंदाकिनी नावाची एक नटी डॉन च्या भावाची बायको झाली असे वाचण्यात आले होते. दुसरी ती अबू सालेम बरोबर  परागंदा झालेली आणि नंतर पोर्तुगाल मधे गेलेली मोनिका बेदी म्हणजे पण  एक मोठे प्रकरण !

आजकाल तर प्रत्येकच कलावंत हा कोट्यावधी रुपये घेतो सिनेमा मधे काम करण्याचे. हा इतका पैसा येतो कुठुन? काळा पैसा, तसेच खंडणी उद्योगातून मिळवलेला पैसा याच धंद्यात गुंतवल्यास चांगला पैसा मिळतो हे लक्षात आल्यावर, करीम लाला नंतर  , डॉन दाऊद इब्राहीम , छोटा शकील, अमीर झा सारखे  बरेच लोकं या क्षेत्राकडे वळले.

दाऊदचे वर्चस्व बॉलीवुड वर वाढले, आणि दुबईचा हस्तक्षेप वाढल्यावर मग या सगळ्या सिने कलावंतांनी डॉन च्या इशाऱ्यावर नाचणॆ सुरु केले. आपला मेंबर ऑफ पार्लमेंट गोविंदा पण एकदा या डॉनच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत नाचल्याचा व्हिडीओ टीव्ही वर  दाखवला गेला होता.  एकीकडे  तो डॉन ’इंडीयाज मोस्ट वॉटॆड” आणि त्याच्या पार्टी मधे पैशासठी नाचणाऱ्या गोविंदाला पाहिल्यावर त्याची दया आली.   काही हिरोईन्स तर नियमित पणे डॉनची सोबत (?) करण्यासाठी म्हणून दुबईला जाऊ लागल्या .  मंदाकिनी (राम तेरी गंगा मैली) हिला  तर शेवटी डॉन च्या भावाशी लग्न करावे लागले. एका हिरोईनला सारख्या येणाऱ्या डॉन बरोबर शैय्या सोबत करण्यासाठी येणाऱ्या धमक्या मुळॆ तिने आपल्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली होती , अशीही बातमी वाचनात आली होती.

बऱ्याच हिंदी सिनेमा प्रोड्यूसर्स, डायरेक्टर्स ला धमक्यांचे फोन जाऊ लागले. कोट्यवधी रुपये खंडणी गोळा करून  ज्याच्या कडून  खंडणी घेतली, त्याच्याच सिनेमात गुंतवायचं हा एक नवीन धंदा सुरु झाला. कोणी पैसे दिले नाहीत की त्याची गोळ्या घालून हत्या करायची ही मोडस ऑपरंडी  . गुलशन कुमार ची भर दिवसा गोळ्या घालून घालून केलेली हत्या अजूनही आठवणीत आहे.

बॉलीवुडचा अंडरवर्ल्ड बरोबर असलेला संबंध जगजाहीर आहे.   संजय दत्त च्या घरी एके ४७ सापडल्यावर त्याला टाडा मधे आत टाकणे  असो, किंवा होणाऱ्या बॉम्ब ब्लास्टची मला माहिती होती, आणि शकील, डॉन माझ्या भावासारखे आहेत म्हणणारा सलमान खान – असो, हे असे लोकं पाहिले की  संताप येतो. ता सगळ्या लोकांची ही मुजोरी कोणाच्या जिवावर चालते?? अर्थात डॉनच्या! जरी आज तो पाकिस्तानात, दुबई ला असला, तरीही डॉनचे चमचे इथे भारतात राहून  बॉलीवूडच्या नाड्या आवळत असतात.

थोडं विषयांतर. ह्या बॉलिवुडच्या कॅंडल संस्कृती बद्दल न बोलणे  योग्य. कधी तरी ( बहुतेक त्यांचा सिनेमा रिलीज व्हायची वेळ आली की मग )यांना एकदम सामाजिक जाणीव होते .  हे सगळे सिनेमा नट नट्या जो पर्यंत यांचा सिनेमा  रिलीज व्हायची वेळ येत नाही   तो पर्यंत  बेडका प्रमाणे सुप्तावस्थेत असतात, पण एकदा का सिनेमा रिलीज व्हायची वेळ आली की यांचे तमाशे सुरु होतात.   शाहरूखचा ” माय नेम इज खान” रिलिज व्हायचा होता, तेंव्हा त्याने   अमेरिकेत नेवार्क  एअरपोर्टवर केवळ मी मुसलमान आहे म्हणून मला अडवले  असे म्हणून ओरडणे  सुरु केले.   मिडीयाने पण   ही बातमी  खूप उगाळली , आणि फिल्मची बिना पैशाने  पब्लिसिटी करण्यास मदत केली.

विक्षिप्त पणा मधे तर बॉलीवुडचा हात कोणीच धरू शकत नाही. तुम्हाला ती अक्षय कुमारची  एका  फशन शॊ  मधे  स्टेज वर ट्विंकल कडून पॅंट चे बटन उघडून घेणे   आठवते का?   विक्षिप्त म्हटल्यावर टिव्ही वर लग्न करणारी राखी सावंत चा उल्लेख के्ला नाही तर   लेख अपूर्ण राहील.

या शंभर वर्षात,  बॉलीवुड सरळ सरळ अंडरवर्ल्ड  च्या हातात गेलेले आहे,   पुढे  या व्यवसायाचं काय होईल ह्याची  कल्पनाही करवत नाही. गे्ल्या शंभर वर्षात बॉलिवुड ने  काय दिले हा विचार केला,त र एकच उत्तर सुचतं- फक्त “स्वप्नरंजन” दिले. उपासमारीने, दारिद्र्याने , गरीबीने गांजलेल्या जनतेला स्वप्न  दाखवली- आणि जगण्यासाठी कारण दिलं… बस्स…

इती लेखन सीमा.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मनोरंजन and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

6 Responses to बॉलीवुडची शंभरी .

 1. झणझणीत लेख !
  <>>
  खरोखरीच काळ खुप बदलला आहे. 😦

 2. deopramod says:

  भालचंद्र नव्हे..भालजी पेंढारकर.
  भालचंद्र पेंढारकर हे संगीत नाटकवाले…ललितकलादर्श ह्या संस्थेचे मालक.

 3. समीर says:

  दिलीपकुमारला दिला गेलेला किताब निशान-ए-पाकिस्तान होता असा उल्लेख दोन-तीन ठिकाणी सापडला, आणि विकिपीडिया निशान-ए-इम्तियाझ दाखवीत आहे (http://en.wikipedia.org/wiki/Dilip_Kumar#Legacy_and_awards)…

 4. राजेंद्र मेंगाने, मडगाव, गोवा. says:

  खरंतर बॉलीवूडच्‍या या मसाला सिनेमांच्‍या दणदणाटात चांगलं, वेगळं काही देऊ पहाणा-या, सामाजिक जाणिवा जागृत करणा-या चांगल्‍या समांतर सिनेमांचा आवाज मात्र दिवसेंदिवस क्षीण होत चाललाय हेच खरं. मात्र या दोन्‍हींतली सिमारेषासुदधा पुसट होत चालली आहे् व आजकाल वेगवेगळया विषयांवरील आशयसंपन्‍न चित्रपट हिंदी व मराठीतसुदधा येत आहेत ही सुदधा एक सुखद गोष्‍ट आहे असंच म्‍हणावं लागेल, नाही का?

 5. Piyu says:

  महेंद्र काका.. आज नुसती बॉलीवूडची शंभरी नाही… साऱ्या चित्रपट सृष्टीची शंभरी आहे… अर्थात या लेखाचा विषय फक्त बॉलीवूड पुरता सीमित असेल तर ठीक आहे.. पण इतर प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांवर देखील काही लिहिले असते तर फार आनंद झाला असता… (कारण तुम्ही एवीतेवी दामूअण्णा मालवणकर, भालजी (भालचंद्र नव्हे) पेंढारकर आणि व्ही. शांताराम यांच्याविषयी लिहिलेच आहे)

  आज मराठी चित्रपट सृष्टी देखील नव्या जोमाने पुढे येते आहे.. किंवा लोकांना आपल्या भाषेतील चित्रपटांवर आणि कलाकारांवर विश्वास वाढू लागला आहे हि खूप अभिमानाची बाब आहे…
  आणि बॉलीवूडचे म्हणाल तर बॉलीवूडचा गवगवा फक्त आपल्याला आहे.. तिकडे दक्षिणेकडील राज्यात त्यांना तमिळ वैगेरे सिनेमांचा किती अभिमान आहे.. अगदी हिंदी सिनेमांना त्यांची स्पर्धा वाटावी इतका..

  असो.. पण लेखात तुम्ही म्हटल्याप्रमाणे खरंच तिथले (बॉलीवूड मधले) कलाकार असे धर्मनिहाय लॉबिंग करायचे का?? कुठे तसा उल्लेख आला आहे का? आणि डॉन लोकांचे म्हणाल तर त्यांचा हस्तक्षेप असेल अजूनही बॉलीवूडमध्ये.. पण म्हणून “या शंभर वर्षात, बॉलीवुड सरळ सरळ अंडरवर्ल्ड च्या हातात गेलेले आहे” असं काही मुळीच वाटत नाही.. हे म्हणजे बॉलीवूड मधल्या प्रत्येक नटीने डॉन ची शय्यासोबत केली आहे हे म्हणण्याइतकेच हास्यास्पद आहे..

  आणि “गे्ल्या शंभर वर्षात बॉलिवुड ने काय दिले हा विचार केला,त र एकच उत्तर सुचतं- फक्त “स्वप्नरंजन” दिले” असं म्हणून तुम्ही समाजप्रबोधन करणाऱ्या किंवा काहीतरी सामाजिक संदेश देणारया सर्वच चित्रपटांचा (भले त्यांचे प्रमाण तुलनेने कमी का असेना) अपमान करताय असे वाटते.. असे चित्रपट पूर्वीही बनत होते आणि आजही बनत आहेतच… उदा. बॉर्डर, सरफरोश, तारे जमीन पर, थ्री idiots , चांदनी बार, रंग दे बसंती, स्वदेस, लज्जा, लगे राहो मुन्नाभाई, मुन्नाभाई एमबीबीएस, नायक, एड्स वर आलेला “फिर मिलेंगे” यांची दखलच घेतलेली नाहीये…

  आणि जसा कोणताही धर्म वाईट नसतो.. त्यातले काही लोक वाईट वागू शकतात.. त्याप्रमाणे काही माथेफिरू नटांच्या कृष्णकृत्यांमुळे चित्रपट सृष्टी किंवा बॉलीवूड वाईट कसे बरे ठरावे? उलट आपल्या चित्रपटांना आज आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा खूप मान्यता (किंवा ज्याला आपण “रेकग्निशन” म्हणतो) ते मिळते आहे..

  त्यामुळे तुम्ही म्हणता तसे “पुढे या व्यवसायाचं काय होईल ह्याची कल्पनाही करवत नाही”
  असं काहीही होणार नाही… काळजी करू नका…

  (बापरे.. प्रतिक्रिया मूळ लेखापेक्षा मोठी झाली कि काय? 🙂 🙂 🙂 )

 6. सगळा आनंदीआनंद आहे..आणि दुर्दैवाने मुंबई बॉम्बस्फोटांना अप्रत्यक्षरीत्या जवाबदार असणारा संजय दत्त, महेश मांजरेकर, काळवीट हत्याप्रकरणी दोषी असलेले सलमान, सैफ, सोनाली, स्वतःच्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी खोटेपणाच्या कुठल्याही थराला जाणारा शाहरुख, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा डोक्यावर घेऊन दबंगपणे मिरवणारा सलमान या सगळ्यांना आपण अजूनही डोक्यावर घेतो आणि त्यांच्या चित्रपटांना गर्दी करतो. असो !

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s