आले त्यांच्या मना…

राष्ट्रपती

सकाळचे साडे पाच वाजले होते.  ‘स्वतः’ गेल्यापासून मेली नीट झोपच लागत नाही, असं म्हणत मॅडमनी कूस बदलली, आणि डोळे घट्ट मिटून घेऊन  झोपायचा प्रयत्न करू लागल्या. देशाचं इतकं मोठं ओझं डॊक्यावर असतांना झोप तरी कशी येणार? राष्ट्रपती बदलायची वेळ झाली आहे, नको नको ती नांवं पुढे केली जात आहेत. काय करावे काहीच सुचत नव्हते, उठून चहा करून प्यावा का?? नको, असू दे.. थोडावेळ झोपावं अजून . नंतर मिटींग आहे हाय कमांडची दिवसभर, पुन्हा आराम मिळायचा नाही. हाय कमांडच्या मिटींग मधे   राष्ट्रपती पद कोणाला द्यायचं ( खिरापत आहे जशी ) यावर चर्चा होईल. आपण तोपर्यंत थोडा विचार करून एक नांव पक्कं करुन ठेवावं , म्हणजे मिटींग मधे लीड घेता येईल. झोप तर पार उडाली होती, पण पलंगावर लोळत पडत त्यांनी विचार करणे सुरु केले.

विद्यमान राप नी स्वतःच्या पदाचा पूर्णपणे उपभोग घेत त्यांनी पाच वर्ष काढली- खूप चांगल्या होत्या त्या. पण कधी उगाच मधे मधे केले नाही.  खरं तर त्यांची टर्म वाढवुन देता आली असती, पण   त्यांची टर्म संपत आल्यावर त्यांनी पाच वर्षात केलेल्या   कुटुंबियांच्या  सोबतच्या परदेश प्रवासा बद्दल मिडीयाने इतका  ओरडा केलाय , की आता टर्म वाढवणे शक्यच नाही .

इलेक्शनच्या काळात अमरावतीला सापडलेली कोट्यवधी रुपयांची  बंडलं डिक्की मधे असलेली  कार- आणि ती केस पण लोकांच्या अजून लक्षात आहेच.  तशा त्या राष्ट्रपती म्हणून अगदी “ग्यानीजीं” सारख्या “ग्यानी” होत्या हे नक्की. कद्धी कद्धी त्रास दिला नाही त्यांनी.उगाच अवघड निर्णय घेऊन सरकारला अडचणीत आणायचे कामही  त्यांनी अजिबात केले नाही.  अफजल गुरु पण रोज त्यांच्या फोटो पुढे उदबत्ती लावत असतो असे ऐकले आहे – खरं खोटं कोण जाणे.   कुठलाही निर्णय न घेण्याची पात्रता असलेला   दुसरा राष्ट्रपती कुठे शोधायचा बरं?? त्यांचे डोळे आता सताड उघडले होते.

त्यांना पूर्व राप आठवले. शास्त्रज्ञ असलेले  ते रा्ट्रपती असतांना त्यांनी  जनतेशी , लहान मुलांशी संवाद  साधणं, निरनिराळ्या शाळा कॉलेजेस मधे जाऊन व्याख्यानं देणं वगैरे बरीच कामं केली.  राष्ट्रपती भवनातुन आपली टर्म संपल्यावर त्यांनी  जातांना स्वतः बरोबर फक्त दोन सुटकेस नेल्या होत्या म्हणे. मॅडम  नकळत शास्त्रज्ञ आणि सध्याच्या राप ची तुलना करायचा प्रयत्न करत होत्या. ते क्षणभरच, पण लगेच तुलना करण्याचा प्रयत्न केला म्हणून स्वतःच्याच थोबाडीत मारून घ्यावी का हा विचार आला मनात.  आता कोणाला करावे राष्ट्रपती?? विचार करत पडल्या होत्या बिचाऱ्या मॅडम.

थोडावेळ शांत बसल्यावर त्यांच्या समोर दोन नावं आली, पंतप्रधान  ला  जर राष्ट्रपती केलं तर?? पण नको, मग तिथे दुसरा मुक प्रधान (पंप्र) आणायचा कुठून? त्यांना कालच रात्री वाचलेला एक रिपोर्ट आठवला. एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांचाच  तो रिपोर्ट होता.त्यात म्हंटलं होतं की त्या मुख्य मंत्र्याने इतकं काम केलं आहे आपल्या राज्यासाठी , की इतर राज्यातले लोकंही त्याच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून पहात आहेत. लोकांना असं वाटतंय की हा पंप्र  झाला तर नक्कीच काहीतरी भलं करेल देशाचं.

एक गोष्ट खास नमूद केली गेली होती, ती म्हणजे जर ह्याला  विरोधी पक्षाने  पंतप्रधान पदा सठी पुढे सरकवलं, तर त्यांच्या पार्टीला बहुमत नक्की मिळणार. खरंच काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. कारण तो आहे विरोधी पक्षाचा! जर त्याच्यामुळे जर विरोधी पक्षाला निवडणुकीत पूर्ण यश मिळाले, आणि त्यांचं सरकार स्थापन झालं तर?? थंडीच्या दिवसात अंगावर थंडगार पाण्याचा पहिला तांब्या घेतला की कसं वाटतं  तसं झालं त्यांना. काय करावं बरं? विचार करून मेंदू काम करेनासा झाला होता . आपलं तर काय, आता संपत आलंय, पण युवराजांचं ???

एकदम डोक्यात ट्युब लाईट पेटल्याप्रमाणे कल्पना सुचली, आयला, सोपं आहे की, कशाला दुर जायचं, तो जो मुख्य मंत्री आहे त्यालाच राप  करून टाकायचं, म्हणजे काय होईल की विरोधी पक्षाकडे कोणी कॅंडीडॆटच रहाणार नाही पंतप्रधान  पदाचा दावेदार, की ज्याच्या जोरावर विरोधी पक्षा निवडून येईल.  बरं विरोधी पक्षाचा माणूस निवडला, की विरोधी पक्ष पण त्यांना झक मारून सपोर्ट करेल.

दुसरा फायदा म्हणजे ज्या राज्याचा तो  मुख्य मंत्री  आहे  त्या राज्यामधे पुन्हा नेते पदासाठी लाथाळी सुरु होईल आणि तिथे पण निवडणूका घ्यायची वेळ येईल, आणि मग आपल्या पक्षाला पण चान्स मिळू शकेल- म्हणजे सगळी कशी विन विन सिच्युएशन!

त्यांनी स्वतःचीच पाठ थोपटली, आणि पलंगावरून खाली उतरल्या, खादीची साडी व्यवस्थित केली, पदर कंबरेला खोचला, केसावरून हात फिरवला, आणि गॅस कडे वळल्या चहाचं आधण ठेवायला.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय.., विनोदी and tagged , , , , , . Bookmark the permalink.

58 Responses to आले त्यांच्या मना…

 1. आल्हाद alias Alhad says:

  kaka! 🙂
  too good… join politics!! 😀

 2. Shradha B says:

  lekh chan ahe,pan konihi zale tari samanya lokanche prashn sutanar nahit………tiase te ch rahanar….

  • श्रद्धा,
   ते जरी खरं असलं, तरीही आपण या बाबतीत इंटरेस्ट घेणं सोडणं बरोबर नाही. राजकारण हे प्रत्येक सुशिक्षिताच्या जीवनाचा अविभाज्य अंग असला पाहिजे.

 3. creativemau says:

  mast lekh

 4. DBAWork says:

  काय वाटेल ते …. nav sarth zale …. Good one

 5. mrudulmahi says:

  mahendra kaka ..khup masta!!

 6. greenmang0 says:

  फार छान. राप ना म्हणे पुण्यातली लष्कराची जमीन सुद्धा हवी होती. पदावरून पाय उतार झाल्यावर उरलेले दिवस ढकलायला. अर्धी लाकडं स्मशानात गेली तरी यांची हाव कमी होत नाही.

  • राप चे बरेच उद्योग आहेत असे. जास्त लिहीत नाही इथे, कारण एका कादंबरीचं मटेरिअल आहे ते.

 7. महेश नाईक says:

  जबरदस्त लेख. फारच सुंदर कल्पना आहे. मॅडम च्या डोक्यात खरच नाही आली म्हणजे मिळवली.

  • ्मॅडमच्या डॊक्यात आली, की भाजपाचे नुकसान ! पुन्हा पुढली पाच वर्ष कॉंग्रेसच!भाजपाला जिंकवण्याचे सामर्थ्य असलेला एकच व्यक्ती आहे , तो म्हणजे नमो.

 8. Pankaj Z says:

  काय बेस्ट आहे हे. आवड्या.

 9. Shailesh Joshi says:

  छान ..उपहास ..अस झाल तरी भारत थोडा रुळावर येण्याची शक्यता ..आहें ..सर्व नेते ..आणि म्याडम ..आपले स्वप्न पूर्ण करोत ( कारण देवाला त्यांच्या मधे काहीच चान्स नाहीये )..हीच म्याडम चरणी प्रार्थना

  • नको.. नमो जर राप झाले तर भाजपाला निवडून येणं तेवढंसं सोपं रहाणार नाही. सध्या भाजपाचा फेस आहेत ते.

 10. Salil says:

  lai bhari, kaka.
  Ekdum jordar batting keliye tumhi ya lekhat !

 11. Aparna says:

  छान झालाय लेख…काही संदर्भ मला माहित नसणारेत.. (काही नाही राजकारणाबद्दलची अनास्था किंवा जे काही असेल ते) पण वाचताना तुमचा चेहरा डोळ्यापुढे आला… 🙂

  • राजकारण फारसं माहिती असायची गरज नाही. फक्त राप, मुम, मॅडम कोण ते समजलं की बाकी सगळं सहज समजू शकेल.

 12. हाहाहा लय भारी एकदम !!

 13. Suhas Hivrekar says:

  khup sunder lekh ……

 14. Anonymous says:

  Ekdam masth

 15. हे पूर्वीचे राप आणि त्यांच्या सारखी निष्कलंक माणसे म्हणजे राजकारणी लोकांच्या गळ्यातील मोठी धोंड असते.
  अरे केवळ दोन सुटकेस घेऊन जायचे म्हणजे ……….
  आता आली कि नाई पंचाईत
  ही लोक राजकारणाचे व राजकारण्यांचे कडबोळे करून ठेवतात.

  • निनाद

   खरी गोष्ट आहे . त्यांना पुन्हा एक टर्म द्यायला हवी होती असे माझे मत आहे, पण राजकारण आडवं आलं.

 16. uday s. ghawre says:

  rajkaran vishay nahi< pan lekha sundar aahe , janeev hono mahatwache.

 17. काका एकदम रापचिक! मस्तच!!

 18. Natthulal says:

  http://www.indianchild.com/india_legislative_process.htm
  Tensions between President Giani Zail Singh (1982-87) and Prime Minister Rajiv Gandhi (1984-88) also illustrate the potential power of the president. In 1987 Singh refused to sign the Indian Post Office (Amendment) Bill, thereby preventing the government from having the authority to censor personal mail. Singh’s public suggestion that the prime minister had not treated the office of the president with proper dignity and the persistent rumors that Singh was plotting the prime minister’s ouster contributed to the erosion of public confidence in Rajiv Gandhi that ultimately led to his defeat in the 1989 elections.

  जनतेची स्मृती कमकुवत असते हेच खरे. “ग्यानी”जींनी तेव्हा निमुटपणे राजीव गांधींचे ऐकले असते तर एक असा पायंडा पडला असता कि आजकाल ब्लॉग, फेसबुक, इमेल आदींवर काय परिणाम झाले असते याची कल्पना केलेली बरी

  • नथुलाल,
   ब्लॉग वर स्वागत. ग्यानीजी लक्षात राहिले कारण त्यांचा उल्लेख त्या काळी केवळ रबरस्टॅंप म्हणून केला जायचा वृत्तपत्रात. शेवटी शेवटी त्यांनी राजीव गांधींच्या विरोधात जायचे धाडस केले, पण ते तेवढ्यापुरतेच!
   आयपीओ च्या अ‍ॅमेंडमेंट बद्दल मी पण विसरलो होतो 😦
   धन्यवाद..

   • Natthulal says:

    ग्यानीजी लक्षात राहिले कारण त्यांचा उल्लेख त्या काळी केवळ रबरस्टॅंप म्हणून केला जायचा वृत्तपत्रात.
    >>contradicts with the fact that he opposed Rajiv Gandhi on the Indian Post Office amendment bill, not to mention his act of going to Golden temple and offer “Seva” as penance after operation bluestar.
    Newspaper making somebody butt of all jokes, that must be unique situation, given that the media is paragon of unbiased, balanced reporting.

 19. rajesh khedekar says:

  khup chan lekh dhanyawad

 20. Gayatri Kudalkar says:

  Lai bhaari… 😀

 21. bolMJ says:

  लय भारी. 🙂

 22. Maithili says:

  हाहाहा… मस्त…

 23. मिलिंद : says:

  नेहमी प्रमाणे जबरदस्त लिहिलं आहे…. madam ची छबी सुरुवातीला तितकीशी clear होत नाही. पण जसजसा लेख पुढे सरकतो तस तशी ती ठळक होत जाते . walt disney चा Mickey mouse का successfull झाला ह्याचं कारण उलगडलं. ह्याचं कारण त्याला मानवी भावना आणि हालचाली दिल्या होत्या. तसंच तुम्ही madam ना common man च्या भावना आणि विचारात उभं केलंत आणि लेखातली घटना एकदम समोर घडते आहे असा भास झाला.
  पण मित्रा ( मी काका नाही म्हणणार ….उगाच तुम्हाला वयस्कर का करा ?? ) असे लेख सांभाळून लिहा…. मागे लोकसत्ता ने तुम्हाला साडे तीन टाक्केवाल्यांचे प्रतिनिधी केलंय… आता एखादा madam चा ‘ शुभेच्छुक’ तुमच्यावर चिडून त्याने मोर्चा नाही काढला म्हणजे मिळवली.

  • मिलिंद

   तुमची कॉमेंट स्पॅम मधे गेली होती ., आज स्पॅम चेक केले तेंव्हा दिसली.
   चेतन कुंटेची केस चांगली लक्षात आहे. बरखा दत्त ने त्याच्यावर केस केली होती तिच्या विरोधात लिहिले म्हणून. तसेच इथेही होऊ शकते, म्हणूनच थोडं सांभाळून लिहिलं आहे. 😀

 24. shradhak says:

  काका,
  लय भारी. झक्कास लिव्हलंय बघा अक्षी.

 25. Anonymous says:

  sundar lekh

 26. ek wachak says:

  atishay chhan lihile aahe…….

 27. ni3more says:

  kaka ekdum sunder tumhi halli khup busy asata kaka watat mala reply det nahit tumhi me hi post kele ahet majya blogwar post bhaga te
  http://bedhundhmanachilahar.blogspot.in/

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s