पुरस्कार.

पुरस्कार कोणाला आवडत नाहीत? प्रत्येकालाच पुरस्काराबद्दल एक खास आकर्षण असतं. एखादी लहानशी ट्रॉफी जरी मिळाली, तरी ती घरात समोरच्या खोलीत शो केस मधे सजवून ठेवण्यातला आनंद काही निराळाच असतो. शाळेत आठवीत असतांना स्नेहसंमेलनात मधे मिळालेले प्रशस्ती पत्र मी अजूनही जपून ठेवलेले आहे.

सिनेमा साठी ,पूर्वी फक्त फिल्म फेअर पुरस्कार होता, आता त्याच स्वरूपाचेच निरनिराळ्या नावाने चार पाच तरी नवीन पुरस्कार दरवर्षी दिले जातात. ज्यांना फिल्म फेअर मिळाला नाही, ते ह्या पुरस्कारावर समाधान मानताना ्दिसतात. टीव्ही चं पण तसंच, स्टार टिव्ही तर केवळ स्वतःच्याच चॅनल वरच्या कार्यक्रमांवर पुरस्कार देत सुटलाय. मग त्या मधे अगदी बेस्ट बहू, बेस्ट लडकी, बेस्ट दादी वगैरे असंख्य पुरस्कार आहेत- असे की ज्या मुळे प्रत्येकी एक तरी मिळतोच.

शाळेत जाणारा अगदी केजी मधे शिकणारा मुलगा पण बक्षीस या संकल्पनेने  भारावलेला असतो. मला आठवतं, एकदा माझी धाकटी मुलगी शाळेत असतांना तिच्या शाळेत राखी मेकिंग काँपीटीशन होती. राखी घरून बनवून न्ययची होती. सौ. ने एक सुंदर तिरंगा झेंड्य़ाच्या रंगाची राखी बनवून दिली. त्या राखीला मिळालेले पहिले बक्षिस घेऊन जेंव्हा मुलगी घरी आली, तेंव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी लपवता येत नव्हता. पण आई जवळ जाऊन म्हणाली, ” अगं पण हे बक्षिसं तुलाच मिळालंय, कारण ती राखी तूच बनवली होती  ना?” . हे वाक्य ऐकून खरंच खूप बरं वाटलं, की  त्या लहान वयातही ही जाण होती, की बक्षिस जर मिळवायचं, तर त्या साठी आपल्या स्वतःच्या कर्तुत्वाने! असो, विषयांतर होतंय.

हल्ली बरेचदा पेपर मधे कुणाला तरी कसला तरी पुरस्कार मिळाल्याचे छापून येत असते. कुठली तरी स्वयंसेवी संस्था जीवन गौरव, किंवा इंजिनिअरींग/मेडिकल,/समाजसेवा / किंवा इतर कुठल्याही क्षेत्रा मधे केलेल्या योगदानाबद्दल  पुरस्कार मुक्त हस्ते वाटत असतात. आणि हे करत असतांना आपण हे एका सामाजिक जाणिवेतून करीत आहोत हे सारखे ठसवण्याचा प्रयत्न पण करत असतात. हे पुरस्कार ज्याला मिळतात, बरेचदा त्याला स्वतःला पण आपण काय योगदान दिलेले आहे हे माहिती नसते.

या पुरस्कार देणाऱ्या संस्थांची नावं पण कधी कोणी आयुष्यात ऐकलेली नसतात,  पण तुम्हाला एखादा इ मेल येतो, की तुमच्या अमुक अमुक क्षेत्रातल्या  भरीव योगदाना बद्दल तुम्हाला आम्ही एक पुरस्कार  देण्याचे योजले आहे,  तेंव्हा तुम्ही पुरस्कार घेण्यासाठी येऊ शकाल का? पुरस्कार वितरण  मुंबई, किंवा दिल्ली वगैरे सारख्या कुठल्यातरी ठिकाणी अमुक अमुक तारखेला आयोजित केलेला आहे . आता हा असा इ मेल पाहिल्यावर कोणीही नक्कीच भारावून जातो आणि  आपल्या कार्याची कोणीतरी नोंद घेतोय, हे पाहून कृत कृत्य होतो.

इ मेल पाहिल्यावर आधी त्या संस्थेच्या वेब साईट वर जाऊन तुम्ही चेक करता, की ती संस्था खरंच अस्तित्वात आहे की कोणी तुमच्यावर प्रॅक्टिकल जोक करतोय. वेब साईट वर संस्थेद्वारे पुरस्कृत केल्या गेलेल्या व्यक्तींचे फोटो, आणि पूर्वी झालेल्या कार्यक्रमाचा लेखाजोखा असतो. ते पाहिल्यावर विश्वास बसतो, आणि तुम्ही  ताबडतोब उत्तर पाठवून मग तो मी हा पुरस्कार स्वीकारण्य़ास येत आहे, हे कळवून मोकळा होता.

होता होता पुरस्काराचा दिवस उजाडतो, तुम्ही पुरस्कार स्वीकारण्यास जाता. छानसा कार्यक्रम होतो एखाद्या हॉल मधे. शंभर दोनशे लोकं आलेले असतात. तुमच्या प्रमाणेच इतरही २०-२५ लोकं असतात की ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे असे.   कार्यक्रम सुरु होतो, तुम्ही दिलेल्या तुमच्या क्षेत्रातल्या योगदाना बद्दल एक लहानसं भाषण करून एक ट्रॉफी आणि  मान पत्र  तुम्हाला दिलं जातं. कुठल्या तरी चॅनलचे कॅमेरामन आलेले असतात, शुटींग , फोटोग्राफी होते, वृत्तपत्राला पण या कार्यक्रमाची प्रेस नोट पाठवली जाते.  सगळं काही कसं व्यवस्थित होतं. दुसऱ्या दिवशी पेपरला पण बातमी येते, बातमीचे कटींग नंतर तुम्हाला आवर्जून पाठवले जाते, टिव्ही वर पण लहानशी बाईट दाखवली जाते .

या  अशा कार्यक्रमासाठी खर्च किती होत असेल? एक हॉल संध्याकाळ साठी भाडे- साधारण दहा हजार, आणि इतर खर्च ( अल्पोपहार वगैरे) दहा हजार म्हणजे एकंदरीत तीस हजार. असो.

कार्यक्रम झाल्यावर ,  अल्पोपहारानंतर त्या संस्थेचे संचालक , सेक्रेटरी म्हणतात, की आमची ही संस्था असे उपक्रम नेहेमीच राबवीत   असते- आणि स्वयंसेवी संस्था असल्याने खर्चाची मोठी ओढाताण होते.  ते असंही म्हणतात, की हे जे काही सुरु आहे, ते केवळ तुमच्यासारख्या लोकांच्या मुळेच. कारण दर वेळी आम्ही जेंव्हा कोणाचा सत्कार करतो, तेंव्हा ते अशाच पुढील कार्यक्रमासाठी म्हणून दहा विस हजाराची मदत संस्थेला करून जातात. सेक्रेटरी हे पण सांगायला विसरत नाहीत, की  कोणा एका माणसाने एक लाखाची मदत पण केली होती.   तुम्हाला ते पूर्वी ज्या लोकांनी मदत केलेली आहे, त्यांची छायाचित्रे आणि चेक चे फोटो दाखवले जातात.

हे सगळं पाहिल्यावर तुम्ही पण आपले चेक बुक काढून लोकलाजेस्तव का होईना ,रु. २००००/-   चेक देता आणि ती पाचशे रुपयांची ट्रॉफी, मानपत्र आणि काही फोटो  घेऊन घरी येता, स्कॅन केलेले पेपर कटींग सोबत  फेस बुक वर  पोस्ट करण्यासाठी.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , . Bookmark the permalink.

25 Responses to पुरस्कार.

 1. uday kshirsagar says:

  excellent post depicting the real truth behind the many secrets of award winner.

  • उदय,
   असे पायलीचे पन्नास अवॉर्ड दिले जातात. सगळा पैशाचा खेळ आहे हा, आणि मोठमोठी माणसं याला बळी पडलेली मी स्वतः पाहिली आहेत.

 2. खरंच की काय?? माझ्यासाठी ही एक बातमीच आहे….
  बाकी यावरून उगाच शाळेत असताना मिळालेली बक्षिसं आठवली…भाबडे दिवस आणि काय….

  • अपर्णा
   दुर्दैवाने हे खरे आहे. सगळेच सत्कार असे नसतात, काही लोकं अगदी मनापासून काम करणारे असतात, जे पदरचा पैसा खर्च करून अशा काही खरे काम करणाऱ्यांचा सत्कार करतात.. पण असे फारच कमी.

 3. Guru says:

  pu.la nchi “TO” hi katha athavli vyakti an valli madhli, kaka kharach ashi bhashne lihun denare lokanna samajik repute milavun denare, biz mhanun karat asatil nahi he sagale ??

  • गुरु
   अरे हो.. अगदी नेहेमी असं होत असतं. कुठल्यातरी नावाने एक एनजीओ सुरु करायची, एक वेब साईट- जिचा खर्च वर्षाला ५०० रुपये.मस्त बिझीनेस आहे हा. सुरु करायचा का आपण? पहिला सत्कार तुझाच करतो, सीबीआय मधे इतक्या लहान वयात ऑफिसर आहे म्हणून.:)

 4. खरय दादा ! हे असले प्रकार खुप चालतात. ते लकी ड्रॉमध्ये तुमचा नंबर लागलाय, तुमचा फ़ोन नंबर सिलेक्ट झालाय वगैरे सांगुन बोलावणारे आणि नंतर ५ हजाराच्या ट्रॆव्हल पॆकेजच्या बदल्यात कुठल्यातरी रिसोर्टची काही लाखाची मेंबरशीप गळ्यात मारणारे तरी कुठे वेगळे असतात? सगळे एका माळेचे मणी. फ़सती है दुनीया फ़सानेवाला चाहीये म्हणत अव्याहतपने हे उद्योग चालु असतात. आणि गंमत म्हणजे त्यांना बकरे मिळतच राहतात 😦

  • विशाल
   लहान लहान पोस्ट्स नेहेमी पहातो आपण फेसबुक वर, कोणी तरी स्वतःच्या सत्काराचे फोटो चिकटवतो , स्वतःचा उदो उदो करून घ्यायला.. वैताग येतो यार , हे सगळे प्रकार पाहून..

 5. Its A business of Business mr. Mahendra. Ur article is saying the truth about the things.Thanx for sharing valuable things with us.

  • अहो, हे प्रकार मी बरेचदा पाहिलेले आहेत. ह्या अशा सत्कारांना अजीबात काही अर्थ नसतो.
   नुकताच फेसबुक वर एक पोस्ट व्हायरल झालेले पाहिले. गॅसीफायर साठी म्हणून पांडे यांचे काम खूप अ‍ॅप्रिशिएट केले आहे, कुठल्या तरी संघटनेने. खरं तर ही टॆक्नॉलॉजी भारतात डॉ. जैन यांनी डेव्हलप केली. त्यासाठी त्यांचा राष्ट्रपती आणि पंतप्रधानांतर्फे सत्कारही केला गेला होता. असो.. माझे त्या पांडेंशी काही वैर नाही, पण उगाच काहीतरी हायरल झालेले दिसले,तेंव्हा हे पोस्ट सुचले.

 6. बरोबर आहे तुमच आजकाल सगळा पैशाचाच खेळ चालू आहे.its a business of business.

 7. mazejag says:

  Baap re….baki business chi idea ekdam fakkad aahe….accha accha ata ukal hotey…madhe kahi varshyanpuri ek young entrepriners sathi asach ek puraskar sohla zala…ani tynanatar tyach maidanat ek top class club ubha rahila….solidch….

  • आता थोडा वेगळा विचार केला की असे अनेक पुरस्कार मिळालेले लोकं, डॊळ्यापुढे येतील.. 🙂

 8. Anonymous says:

  kai lihnar mi ase anubhav aayushyat etar babtit pan yetatch ki sodun deto tase sodun dyayche n pudhche post lihayla aagar vachayla ghyayche.

 9. rajesh khedekar says:

  dhanyawad dada ha lekh wachun barech lok aata shahane hotil ase watatay ani ha tyanchyasathi ek puraskarach asel

 10. प्रणव says:

  एकदम खरंय काका,
  असे पुरस्कार सोहळे स्वतःच्याच पैशांनी आयोजित करून वर परत स्वतःचाच सत्कार करून घेणारे काही महाभाग असतात.
  सबसे बडा रुपैय्या हेच खरा आजचं धोरण झालाय.

 11. अगदी खरं आहे .. छान पोस्ट… ! अरे सर तुमची एक “Dream world ” ची पोस्ट वाचल्यासारखी वाटते ती अजून एकदा वाचायची होती पण सापडतच नाहीये ..त्या पोस्ट ची link send करता का ? Pls …………….

 12. ganesh says:

  sir me pan aasach vichar kartoy tumala purskar denyacha , yetay ka tumi..pan check book naka visaru……………..

  just kidding…

 13. sneha says:

  sir aaj maharashratil puraskar ya vishayi mahiti search kartana navinach mahiti milali…… asahi hote yavar vishwas basat nahi.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s