बंद चा तमाशा..

.

भाजपा , शिवसेना , मनसे , आणि रिपाई ने आज महागाईच्या विरोधात बंद पुकारला आहे. जरी आज पासून   ऑफिशिअल बंद सुरु होणार असला, तरीही काल रात्रीपासूनच बेस्ट आणि पिएमटी च्या बसेसची मोडतोड करण्यात आली आहे. सकाळपासून सगळ्या बातम्यांमधे ह्याच बसेसचे क्लिपिंग पुन्हा पुन्हा दाखवून वातावरण निर्मिती ( दहशतीची- म्हणजे घराबाहेर पडू नका , नाही तर हे पहा आमचे गुंड बाहेर तैनात आहेत हो.. ) केली जात होती. टिव्ही चॅनलचा प्रतिनिधी  रस्त्यावर  संपकर्त्यांनी  बसेस फोडल्या ही  गोष्ट अशा तऱ्हेने सांगत होता की जणू काही  त्यांनी   खूप मोठं समाजकार्य केलय. सारख्या अशा बसेस फोडण्याच्या, मारहाण करण्याच्या एका भागातल्या बातम्या पुन्हा पुन्हा दाखवून दुसऱ्या भागातल्या लोकांनाही असेच काही करून टिव्ही वर येण्यासाठी उद्युक्त करतात.

राजकीय पक्षाने आपला बंद पुकारणे म्हणजे, त्यांनी आपली झुंडशाही ची  ताकद दाखवून देण्यासाठी घेतलेली संधी आहे असे माझे स्पष्ट मत आहे. जेंव्हा एखाद्या गोष्टीच्या विरोधात बंद पुकारला जातो, तेंव्हा तो उत्स्फूर्त असावा अशी अपेक्षा असते, पण  प्रत्यक्षात होतं काय? तर  जे लोकं बंद मधे सहभागी होण्यास तयार नसतात, त्यांना मारहाण करून ,  बसेस फोडून , गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून त्यांना या बंद मधे सहभागी करून घेतले जाते. लोकंही आपल्या जिवाला जपायचे म्हणून सरळ या राजकीय गुंडांना शरण जातात आणि बंद मधे सहभागी होतात.

आज मुंबई आणि पुणे विद्यापीठाच्या इंजिनिअरींग च्या परीक्षा आहेत. मुंबई मधे मुलांना अगदी विरार पासून किंवा कल्याण पासून प्रवास करत यावं लागतं. या बंद च्या पार्श्वभूमी वर जेंव्हा मूळ ट्रान्सपोर्टचा म्हणजे लोकल, किंवा बसेसचा  जर काही भरवसा नसेल तर मुलं/मुली या परीक्षांसाठी कसे काय पोहोचतील?  बरं  मुलींच्या सुरक्षिततेचे काय? स्वतःच्या जीवावर उदार होऊन मुलांनी परीक्षेसाठी जावे असे मुंबई आणि पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंचे म्हणणॆ आहे असे  दिसते. शिवसेना , भाजप, किंवा मनसे कुणालाच वि्द्यार्थ्यांची काळजी नाही- कारण यांची मुलं  झेड सिक्युरीटी मधे असतात, त्यांना थोडी बसने , लोकलने प्रवास करावा लागतो? .  जर  या पक्षांना विद्यार्थ्यांची   खरच काळजी असती तर कुलगुरूंना धमकावून परिक्षा पुढे ढकलता आली असती. या कुल गुरुंच्या बुद्धीची/ चुकीच्या निर्णय क्षमतेची  पण मला खूप कीव येते-. त्यांनी खरं तर या प्रसंगाची नोंद घेऊन स्वतःच्या अधिकारात   परीक्षा दोन दिवस पुढे ढकलल्या असत्या तरीही चालले असते, पण जवळ असलेल्या अधिकाराचा ” माज” असला  की असे सामान्यांकडे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण जास्त वाढते. साडे सात रुपयांनी पेट्रोल चे भाव वाढवणारे सरकार काय किंवा हे कुलगुरु काय एकाच माळेचे मणी.

मला एक कळत नाही, या अशा बंद मधून काय मिळतं हो? आज पंधरा विस बसेस फोडल्या की उद्या साहाजिकच पब्लिक ट्रान्सपोर्टचे बारा वाजणार. नेहेमीच्या बसेस कॅन्सल करण्याशिवाय बेस्ट, किंवा पिएमटी ला काही पर्याय रहाणार नाही – म्हणजे काय तर या   पुढचे काही दिवस अजून सामान्य जनतेचे हाल होत रहाणार. बंद म्हणजे सरकारी संपत्तीचे नुकसान करणे हा एकमेव अजेंडा असतो- मग तो बंद शिवसेना-भाजपाचा  असो  किंवा कॉंग्रेसचा असो.

मुख्य ’मोठे” नेते    मात्र प्रक्षोभक भाषणं करून  मात्र लोकांच्या भावनांना हात घालून  भडकवण्याचे काम इमाने इतबारे  करून जास्तीतजास्त जाळपोळ , किंवा सरकारी संपत्तीचे नुकसान कसे होईल याची काळजी घेत रहातील. हे सगळं करण्यामागे जरी या नेत्यांचा हात असला, तरीही अटक होईल ती सामान्य कार्यकर्त्यांना आणि हे मात्र  उजळ माथ्याने उंडारत रहातील- पुढल्या बंदची तयारी करत. उद्या  पेपर मधे बातमी येईल, काही वाय झेड नेत्यांचे फोटो येतील, बंद कसा यशस्वी झाला याचे गुणगान गायले जाईल – बस्स.. झालं.  या बंदची एवढीच काय ती फलश्रुती.

राजकीय नेत्यांना जर खरंच बंद करायचा असेल तर स्वतःचे खाणे पिणॆ बंद करून आमरण उपोषण केले  म्हणजे सरकारचे   लक्ष वेधले जाईल – कारण सरकारला नेत्यांची नक्कीच जास्त काळजी आहे सामान्य जनतेपेक्षा. सामान्य जनता जगली काय आणि मेली काय , फरक काय पड्तो सरकारला?

तसंही सरकारने आधीच ठरवून ठेवले आहे , की आधी साडेसात रुपये भाव वाढवायचा, आणि आता लोकांच्या भावना लक्षात घेतल्या म्हणून दोन तिन रुपयांनी कमी करायचा.. उद्या पुन्हा विरोधी पक्ष म्हणजे भाजप, शिवसेना, मनसे सगळे या दोन रुपये भाव वाढीचे श्रेय घेण्यास तयार!!

जय हो!

 

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय.. and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

38 Responses to बंद चा तमाशा..

 1. दो पैसे का तमाशा 😦

 2. Yogesh says:

  Hi,
  Nice article..
  one thing to highlight : MNS is not involved in this strike. Mr. Raj Thakrey has already said, that MNS is not supporting this strike.
  http://broadbandforum.in/social-chat/78815-bharat-bandh-31st-may-2012-a/

  – Yogesh

  • योगेश
   मनसेचा पाठींबा नव्हता, पण सुरुवातीला आहे असे जाहीर केले गेले होते. असो. प्रतिक्रियेसाठी आभार.

 3. अजय says:

  सामान्य जनतेने या सर्वच नेत्यांना एका रांगेत उभे करुन फटके हाणावेत. हे नेते सामान्य जनतेला मुर्ख बनवतात व स्वत: मात्र आलिशान गाड्यात फिरतात.
  कुलगुरुंना राजकिय कामे किती असतात ! त्यातुन जर वेळ मिळाला तर ते विद्यार्थ्यांची काळजी घेतील ना ?
  सत्ताधारी व विरोधी पक्ष म्हणजे “चोर चोर मावस भाऊ”.
  माझा दोघांवरही विश्वास नाही.

 4. Bageshri says:

  He tar nehamiche aahe. ya lokani band karayache aani aamhi sahan karayachi yanchi mujori. kityek lokanche pot jo rojgaar milato tyavarati aahe. ek divas jar band mule (band chya dahashatimule) lokanchi kaame rahili tr lok upashi rahatil yacha andaj nasato ya lokana. he lok yanchya ‘parakramache tamashe’ todfod karun dakhavatat.

  • वाईट एका गोष्टीचं वाटतं की लोकांना अजूनही का इतकं समजत नाही , की त्यांना हे राजकीय नेते वेठीस धरताहेत ते.
   या राजकारण्यां्ना चिथावणीखोर भाषणं दिली म्हणून अटक करायला हवी.

 5. Shweta Nare says:

  नेतागिरी करून दमलेले पक्ष आता दादागिरी करत आहेत… त्याही पेक्षा चीड येते ती मेंढर चालीने चालणाऱ्या लोकांची… काही विचार न करता सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करत सुटलेल्या ह्या भेकड लोकांची… पर्यायाने झालेल्या नुकसानाची भरपाई शेवटी सर्व सामान्य जनतेलाच करावी लागणार… बंद केलाय ह्या राजकारण्यांनी.. सरकारने किंवा कुठल्याही खाजगी कंपन्यांनी लोकांना सुट्टी दिलेली नाही तेव्हा; पर्यायाने त्या सर्व सामान्य जनतेच्याच खिश्याला कात्री पडणार एवढे नक्की…!! शेवटी “तेलही गेल न तूपही गेल” अशी परिस्तिथी होणार .. 😦
  media बद्दल न बोललेलेच बरे… मढ्यावरचे लोणी खाणारी जात आहे ती.. 😦

 6. नुसतं राजकारण…. समाजकारण कशाशी खातात हे त्यांना माहित नाही 😦 😦

 7. Anonymous says:

  Sarv Paksh ….. Eka Maleche Mani …..

 8. dattatray jadhav says:

  ata hi nukasan konachi bangla ki pakistanchi ? sarkari gadya todanyapeksha satachya gadya ghare ka nahi todat ? yat kasali ali bahaduri ? he mhanaje rogapeksha ilaj trasdayak zala mhanaycha .ta udyapasun petrol swath honar ka ?

 9. arunaerande says:

  कोणी कोणी तोड्फोड केली ते चित्रित झालेले असते. आता त्या सगळ्यांकडून नुकसान भरपाई घ्यावी. आणि ज्या पक्षांनी संप पुकारला त्यांनी पण उकसान भरपाई द्यावी. असे झाले त्तरच ही नाटके थांबतील.

 10. ह्या राजकारणी लोकांच्या नादी लागून तोडफोड आणि जाळपोळ करणारी माणसेच हे संप so called यशस्वी करण्यासाठी जास्त जबाबदार असतात. कारण बसमधून प्रवास आपल्यालाच करायचा आहे हे ह्यांचा लक्षातच येत नाही. शेखचिल्ली लोकं.

 11. Pallavi Sawant says:

  पेट्रोल दरवाढीविरोधात बंद बंद म्हणून मिरवणारे ‘बाईकवरून’ स्वतःच्या पक्षाचे झेंडे घेऊन मिरवत होते आणि विद्यार्थी मात्र हतबल होऊन परीक्षेसाठी ‘चालत’ कॉलेजमध्ये जात होते.

  • पल्लवी
   मुली घराबाहेर पाठवायची पण भिती वाटते अशा दिवसात. नेमका त्या दिवशी पेपर.
   पुण्याचा मित्र म्हणतो, त्याचा मुलगा चक्का एक तास उशिरा पोहोचला परीक्षेला.

 12. shashikant balaram thombre says:

  mala band madhe samil zalelya karyakartyachi kiuoo aete , karan apan kay karto he tyanna kalat nahi ka ?nete ,midia ,police ,melelya mansacha talu varche loni khanari manse aahet .

  • शशिकांत
   अहो बरीच मंडळी केवळ दारू /मटण मिळते म्हणून जाते बंद मधे सामिल व्हायला- तोडफोड करायला.

 13. Anonymous says:

  Band he changale shastra ahe , pan te shantipurna ritine zale pahije. jo koni todfod karel tyachi sampurna estate nilaw karun takaychi,ani zalelya todfodichi bharpai karaichi, mag to konihi aso, ani sudharel ti sarkar kasali. Jar kharach garaj hoti petrol che bhav vadhvaychi, tar tyanhi te kami karu naye, ani jar kami kele tar sarkar nalayak ahe….

  • बंद चा खरंच काही परीणाम होतो का सरकारवर? गेंड्य़ाची कातडी झालेली आहे त्यांची.

 14. Guru says:

  बंद इल्लीगल केला तर ही डावी पिलावळ कळवळ करणार, म्हणे ह्यांच्या ह्युमन राईट्स चे उल्लंघन झाले, चुत्यासाले जेव्हा तिआनान्मेन चौकात ३-४००० पोरे गोळ्या घालुन ठार केली ह्यांच्या बापांनी तेव्हा का तंगड्यात शेपट्या घातल्या होत्या ह्या मायेच्या पुतांनी??? हे झाले बंगाल अन रेड कॉरीडॉर राज्यांपुरते, आपल्याकडे अजुनच वाईट, बंद म्हणजे प्रत्येक उपनगरातल्या झोपडपट्यांमधल्या मोक्कार पोट्ट्यांना रोजगार (म्हणजेच रात्री “भाऊं” कडून दारु तंदुरी चायनीज) संधी आहे बघा, आम्ही बसेस जाळणार मग रडणार डब्बा बसेस आहेत बेस्ट्च्या म्हणुन, ज्या रेट नी आपल्याकडे बसेस जाळतात त्याच रेट ने त्या परत ठोकठाक करुन दुरुस्त करणा-या बेस्ट अन पी.एम.पी.एम.एल चे मेकॅनिक्स म्हणजे खरेच इंजिनियरींग वंडर आहे, नाही म्हणायला इको फ़्रेंड्ली!!!!!. ७०% बसेस जर इन्फ़्रा मुळे खराब होत असल्या तर ३०% हे गधे जाळतात, जात-पात-धर्म-पंथ-भाषा-रंगरुप-खानपान ह्या सगळ्या बंधनांच्या पलिकडे ह्या बाबतीत मात्र भारतात जबरदस्त युनिटी अन इंटीग्रेशन आहे बरका!!!! :X :X

  • गुरु

   ह्युमन राईट्स म्हंट्लं की माझ्या डोळ्यापुढे बरीच ठरलेली टाळकी येतात. बसेस जाळण्यात काय पुरुषार्थ आहे कोण जाणे.
   हे वाक्य आवडलं ” जात-पात-धर्म-पंथ-भाषा-रंगरुप-खानपान ह्या सगळ्या बंधनांच्या पलिकडे ह्या बाबतीत मात्र भारतात जबरदस्त युनिटी अन इंटीग्रेशन आहे बरका!!!! :X :X”

 15. codef0rmer says:

  या नेत्यांनी चक्क देशाची मारुन ठेवलेली आहे. कधी कधी तर प्रश्न पडतो की देश स्वतंत्रच का झाला, इंग्रजच परवडले असते. देशात इतकी फालतूगिरी चालली आहे कि अस वाटतं कि एक एक नेत्याला पकडून SAW च्या TRAP मध्ये अडकवावं.

  • एक जोक आला होता, अफझल गुरु ने अर्धवट काम करून ठेवलंय, तेंव्हाच त्याने पुर्ण करायला हवं होतं असा काहीसा जोक होता तो. 🙂

 16. Piyu says:

  तसंही सरकारने आधीच ठरवून ठेवले आहे , की आधी साडेसात रुपये भाव वाढवायचा, आणि आता लोकांच्या भावना लक्षात घेतल्या म्हणून दोन तिन रुपयांनी कमी करायचा.. उद्या पुन्हा विरोधी पक्ष म्हणजे भाजप, शिवसेना, मनसे सगळे या दोन रुपये भाव वाढीचे श्रेय घेण्यास तयार!!>> 100% True !!!

 17. DILIP S. BHAVE says:

  बंद पुरस्कार्त्यानो : काय पेट्रोलचे भाव कितीने कमी करून दाखवले? तुमच्या पेट्रोलचे पैसे कोण देते हे सांगाल का?
  पेट्रोलच्या भाववाढीबद्दल कुरकुर करणार्यानो : तुम्ही पेट्रोल विकत घ्यायचे कमी केते का? कितीजणांनी आपल्या गाड्या विकल्या? गाड्या चालविणे खरच का आवश्यक आहे? तुमच्या मुला-मुलीना स्कुटी, स्कूटर, फटफटी, कार अशा चढत्या श्रेणीने वाहने विकत घ्यायला आणि ती चालवायला पैसे का देता? का त्यांना सार्वजनिक वाहन व्यवस्थेचा वापर करण्यास भाग पाडत. सर्वांनी खाजगी वाहनांचा वापर कमी केल्यावर सार्वजनिक वाहन व्यवस्था अधिक चांगली होईल. अपघातही टळतील.

  • ब्लॉग वर स्वागत. गेले काही दिवस फार बिझी असल्याने उत्तर द्यायला वेळ लागतोय.

 18. एखादी ५ रुपयाला विक्री मुल्ये असणारी वस्तू सेल ह्या गोंडस नावाखाली आधी ७ रुपये किमतीची आहे असे सांगून त्यावर २ रुपये सवलत म्हणून ५ रुपयाला विकण्यास ठेवायची.
  ह्यात वस्तू विकली गेली म्हणून विक्रेता
  व स्वस्तात मिळाली म्हणून ग्राहक खुश असतो.
  आता भारत बंद झाला म्हणजे विरोधक आपण आपली भूमिका बजावली म्हणून खुश तर सरकार दोन रुपये दरवाढ कमी करून जनतेला खुश करणार
  ह्यात देशाचे एका दिवसाचे उत्पादन बुडाले ह्याचे फिकीर कोणालाच नाही.
  मुळात सरकार ने ही दरवाढ कोणा एका कंपनीचे भले करण्यासाठी केली नाही. बहुसंख्य तेल कंपन्या सरकारच्या आहेत. पण प्रत्येक गोष्टीत मुद्दे उकरून राजकारण करणे हे आपल्या येथे प्रत्येक राजकीय पक्षाचे प्रमुख धोरण आहे.
  तेव्हा
  हतबल जनतेने एक दिवस सुट्टी चा उपभोग घ्यावा.

  • शेवटी जनता तेच करते. सुटी म्हणून सरकारला शिव्या घालत घरात बसते.
   झालं पण तेच.. दोन रुपये भाव कमी झाला बस्स..

 19. Manish says:

  he haramkhor kaay deshala pudhe nenar. 7 pidhya khatil yevdhe gola karun thevle aahe mug kashala deshachi chinta kartil. 65 yrs pasun sattet aslelya pakshane deshala kaay dile ho.

  • अगदी बरोबर.. मोस्ट सेलेबल कम्युडीटी म्हणतात त्यांना.

   • Anonymous says:

    नमस्कार, mala शालजोडीतून नाही मारता येत आणि या सगळ्यानच संताप येतो त्यामुळे मी थोडी खालच्या levelchi भाषा वापरली.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s