इंजिनिअरींग -सिईटी

 १२वीचं वर्ष म्हणजे प्रत्येक मुलाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा. खरं तर ११ वी पासूनच सुरु होतं की पुढे काय करायचं? इंजिनिअरींग, मेडिकल, मास मिडीया,  बी ए  -फ्रेंच वगैरे घेऊन, की बि.कॉम. आणि नंतर सी.ए.??

नुकत्याच काढलेल्या माहिती नुसार मेडिकलचा खर्च दर वर्षी ४ ते ५ लाखा पर्यंत आहे . ह्याची जाणीव असल्याने,  मध्यमवर्गीय मुलं   मेडिकलला जायची कितीही इच्छा असली तरीही आपल्या वडिलांना फायनान्शिअल परवडणार नाही म्हणून बहुतेक इंजिनिअरींग ला जाण्याचे ठरवतात.  एकदा   इंजिनिअरींग- मेडिकलचा  नक्की झालं  की मग १२वी ची म्हणण्यापेक्षा सिईटी ची तयारी सुरु होते. नुसत्या १२वीच्या मार्कांना हल्ली काहीच किंमत नाही- कारण पुढल्या कोर्सेसची अ‍ॅडमिशन ही सिईटी  मधे मिळालेल्या मार्कांवर अवलंबुन असते.

सीईटी ची खरंच गरज काय आहे? सरळ १२वीच्या मार्कांवर प्रवेश का दिला जात नाही? तर याचं कारण म्हणजे १२वी ची परीक्षा घेणारी बरीच बोर्ड आहेत. त्यापैकी काही   अगदी सढळ हस्ते मार्क देतात मुलांना , तर काही बोर्ड अगदी हातात तलवार घेऊन कत्तल करायला बसल्याप्रमाणे मुलांना मार्क देतात. सगळ्या बोर्डांचे सिलॅबस वेगळे, परीक्षा पद्धती वेगळ्या, तेंव्हा सगळ्या मुलांना समान पातळीवर परीक्षा घेऊन मग त्यांची तयारी पहायची आणि मग   मग अ‍ॅडमिशन द्यायची म्हणून ही सिईटी( कॉमन एंट्रन्स टेस्ट)  सुरु झाली. उद्या  इंजिनिअरींग आणि मेडिकल च्या सिईटी चा निकाल! म्हणून हे पोस्ट

उद्या १२वीचा सिईटीचा निकाल. माझ्यासारखे  सगळे पालक  आता पुढे काय करायचं ?कुठल्या कॉलेजचं कट ऑफ पर्सेंटेज किती होतं ? कुठल्या कॉलेज ला प्रिफरन्स द्यायचा हा विचार करत बसले असतील.   या निकालानंतर  ऑनलाइन फॉर्म भरणे हा एक मोठा कार्यक्रम असतो.  सिईटी मधे मिळालेल्या मार्कानुसार आपल्याला कुठल्या कॉलेज मधे अ‍ॅडमिशन मिळेल ह्याचा अंदाज घेण्यासाठी  प्रत्येक कॉलेजचे  मागच्या वर्षीचे  कटऑफ मार्कस माहिती असायला हवे.   ही माहिती कुठे उपलब्ध होऊ शकेल हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो.

या प्रश्नाचे उत्तर म्हणून औरंगाबादच्या इंजिनिअरींग मधे शेवटल्या वर्षात शिकणारा विशाल् ने एक वेब साईट सुरु केलेली आहे.  या वेब साईट वर तुम्हाला इंजिनिअरींग च्या ऍडमिशनच्या संदर्भात  कटऑफ बद्दल  हवी ती माहिती मिळू शकते. त्याच्याशी  जेंव्हा बोललो, तेंव्हा तो म्हणाला की त्याला स्वतःला पण अ‍ॅडमिशनच्या वेळी खूप त्रास झाला होता, आणि अगदी इंजिनिअरींगच्या पहिल्या वर्षा पासून अशी एक साईट बनवायचं त्याच्या मनात होतं.

वेब साईट उघडल्यावर एक फॉर्म दिसतो की ज्या मधे फक्त तुम्हाला मिळालेले सिईटी चे मार्क  भरून, कुठल्या  विद्यापीठात अ‍ॅडमिशन हवी आहे ते  सिलेक्ट केले आणि  एंटर केलं की  त्या मार्कांसाठी मागच्या वर्षी  कुठल्या  कॉलेज मधे कुठल्या  राउंड ला  किती   कटऑफ  किती होतं ते समजतं  , आणि ही माहिती   वापरून तुम्ही फॉर्म भरताना आपल्या आवडीच्या कॉलेजचे ऑप्शन देऊ शकता.

१२वी पास झालेल्या विद्यार्थी आणि पालकांसाठी ही वेबसाईट कॉलेजचा प्रिफरन्सेस ठरवण्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते.  एआयईईई   चे मार्क टाकूनही  अशीच माहिती  काढता येऊ शकते.

 हा लेख कृपया  शेअर करा म्हणजे ह्या साईटची माहिती  जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. अगदी कॉपी पेस्ट करून   जरी शेअर केला तरीही हरकत नाही.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in परिक्षा.. and tagged , , , , . Bookmark the permalink.

29 Responses to इंजिनिअरींग -सिईटी

 1. DB DESAI says:

  excellent information and appropriate timing to share. Though I am not a parent of a cet student but I feel this information will help them to reduce some amount of their tension and anxiety. I welcome, appreciate and would also like to contribute to such useful sharing of information to solve practical life problems which will certainly avoid duplication of work by parents, save their time, reduce stress and everyone will be able to concentrate more on important or creative things.

  • एका इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याने ही साईट बनवणे खरंच क्रेडीटेबल आहे. खूप उपयोगी साईट आहे ही. ज्या उद्देशाने त्याने ही साईट बनवली आहे, तो उद्देश सफल व्हावा एवढीच इच्छा.

 2. आल्हाद alias Alhad says:

  विशाल आणि माझं काही दिवसांपूर्वीच याबद्दल बोलणं झालं होतं. वापरायला खूप सोपी आणि तरीही कार्यक्षम वेबसाईट त्याने तयार केली आहे. त्याच्या ह्याअ उपक्रमाला इतक्या खुल्या दिलाने साथ देताय ते पाहून अतिशय आनंद झाला.
  त्याचे अभिनंदन. तुम्हाला धन्यवाद.
  🙂

  • आल्हाद
   मला पण गरज आहे या वर्षी, आणि ही साईट खूप उपयोगी पडते आहे हे लक्षात आलं आणि म्हणून मुद्दाम इथे शेअर करतोय.

 3. अभिषेक says:

  विशाल, छान उपक्रम! काका धन्यवाद माहिती शेअर केल्याबद्दल! 🙂

 4. ह्याबद्दल बातमी पेपरात वाचली होती. अल्टिमेट वेबसाईट आहे ही.. विशाल आणि त्याच्या मित्रांचे मनापासून अभिनंदन 🙂 🙂

  • सुहास
   पेपर मधे बातमी.. आता असं पहा एका पेपरमधे आली म्हणून इतर पेपरवाले ह्या बद्दल छापायला नकार देत आहेत. लोकांना फायदा होईल ही गोष्ट सगळे पेपरवाले सोयिस्करपणे विसरताहेत, . ही साईट सगळीकडे शेअर झाली तर लोकांना निश्चितच फायदा होईल.

   • anuvina says:

    चायला ….मिडिया लोकांकरता आहे का?? …. किती अपेक्षा ठेवाव्यात याला काही सीमा …. हे हे हे

 5. याबद्दल विद्यार्थ्यांना कळणं गरजेचं, त्यांना याचा थोडा जरी फायदा झाला तरी ती आमच्यासाठी खूप मोठी बाब आहे. आमच्या परीक्षा चालू आहेत त्यामुळे सुधारणा करण्यासाठी सध्या पुरेसा वेळ देणं शक्य होत नाहीये, पण आमच्या परीक्षा संपल्यानंतर म्हणजे येत्या काही दिवसांत या संकेतस्थळावर अधिक उत्कृष्ट सुविधा देण्याचा आमचा मानस आहे, ज्या विद्यार्थ्यांकरीता फायदेशीर ठरतील.

  काका, तुमच्या या माहीतीपूर्ण लेखाबद्दल तुमचे, आणि इतर हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार. 🙂

  • विशाल
   अरे खरं कौतूक तुझंच करायला हवं . ही सगळी माहिती उपलब्ध करून देणं – आणि स्वतःचा अजिबात काही स्वार्थ नसतांना, ही गोष्ट खरंच कौतूक करण्यासारखी आहे. छान काम केलं आहेस..

  • Sandesh naik says:

   I am very happy. Because now i can achieve the information about the cet , aieee exams.
   I am very poor student. So,nobody guide me about exams.My parents thought that only “rich student can do it,because without extra classess it is impossible.” But i will show them that I can do it.
   Thanks for your online guidence.

 6. dattatarya says:

  छान उपक्रम!

 7. Anonymous says:

  Your this article is very useful for students who are jst passout cet exam. And VISHAL , who started website for which will helpful for students, so this is a social working…. we proud u vishal, keep it up. thanks mahendra sir…….

 8. Anonymous says:

  chan side ahe
  kaka tumchi mulgi hoti 12th la ?
  Nitin Godambe

 9. snehal says:

  Khup changli mahiti ahe kaka, ektar vishal late bhetla nhitar post late zali LOL

  • स्नेहल
   अगं दुसऱ्या दिवशी निकाल होता सिईटीचा म्हणजे पोस्ट एकदम वेळेवर टाकली 🙂 आधी टाकूनही दुर्लक्ष झालं असतं. 🙂

 10. मला माझ्या संकेतस्थळाच्या माध्यमातुन या साईट विषयी माहिती द्यायला नक्की आवडेल.

 11. Guru says:

  काका थॅंक्स, आमच्या घरच्या चिल्लर पार्टी ला लै कामी आली ही साईट

 12. Aparna says:

  काका, तुमच्या ब्लॉगला गुगल प्लसवर शेअर करायचा पर्याय नाहीये का?? मी तिथे केली असती…फ़ेबु बंद केलंय (केव्हाच…)
  काही लोकांना मेलने ही बातमी पाठवतेय…..

  आम्ही अजून मोठा आणि छोटा ए गिरवतोय…..:)
  आता सध्या शिक्षण पालक भूमिकेतून पाहते म्हणून आवर्जुन तुम्हाला सिईटीसाठी शुभेच्छा…(पालकांनाच द्यावात कसं….)

  निकाल/ अ‍ॅडमिशन बद्दल कळेलच लवकर…..:) बाकी स्वतः मुंबई बोर्डातून इंजिं. केल्याने
  >>काही बोर्ड अगदी हातात तलवार घेऊन कत्तल करायला बसल्याप्रमाणे मुलांना मार्क देतात
  हे वाक्य अम्मळ जास्तच ममत्व दाखवून गेलंय…:P

  • गुगल प्लस वर शेअरचं पहातो मी. काहीतरी सोय असेलच..
   मोठा ए आणि छॊटा ए ची केंव्हा ट्रोग्नॉमेट्री होते तेच लक्षात येत नाही. दिवस फारच लवकर जातात..

 13. उत्तम साईट सापडली.माझ्या भावाला या वर्षी ९३.८२% गुण मिळाले.तो सायन्स करणार आहे.त्याला नक्कीच या साईटचा उपयोग होईल
  धन्यवाद

 14. Suhas Adhav says:

  mala pan mahit navta aasha web site badal…..nahitar majhyavar majhya swatachya admissinchya veli radaychi vel aali nasti…..kay diwas hote te ….pan jhala ekdacha admission devachya krupene ….tevhatar aasa vataycha ‘ open ‘category madhye janmala aalo hech aaple durbhagya…..pan aata aasa vatat nahi ulta bara jhala open madhye alo janmala……avadla mala open madhye janma gheun …hyasathi nahi ki ucha darja aahe….khara karan mhanje ‘ sangharsha ‘ hya shabdacha pratyay aala …ani jivnat toch pudhye gheun jato…. 🙂 kharach saglyan sathi far upyogi kam kela aahe vishal ne thanks alot.

  • सुहास
   खरी गोष्ट आहे. मुंबई सारख्या महानगरातही लोकांना व्यवस्थित माहिती मिळू शकत नाही.म्हणून ही साईट खूप उपयुक्त वाटली मला.

Leave a Reply to सुहास Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s