अहमदाबाद – वर्धा

अहमदाबादचा साबरमती गांधी आश्रम

टिपिकल गुजराथी पद्धतीचे सुंदर पांढऱ्या रंगवलेल्या भिंती, लाल रंगात रंगवलेले ते छप्पर असलेले  ते लहानसे घर एखाद्या सुखवस्तू शेतकऱ्याचे  घर वाटत होते. पायातले बुट मोजे काढून त्या पायऱ्यांवर चढलो, उन्हामुळे तापलेल्या पायऱ्यांचा स्पर्श नेहेमी पायात बुट घालून चालण्याच्या सवयी मुळे  हुळहुळ झालेल्या तळपायांना नकोसा वाटत होता. पटकन पाउल उचलत सावली कडे सरकलो. समोर एक सतरंजी अंथरलेली होती, एक चरखा बेवारस पडल्याप्रमाणे तिथे पडलेला होता. त्या सगळ्या सेट अप मधे तो चरखा  पाहिल्यावर  , “हा इथे काय करतोय?? ” असे वाटत होते.

बाजूलाच एक बैठक,पांढरी शुभ्र खोळ घातलेला मोठा चौकोनी तक्क्या, आणि समोर एक लिहीण्याचा एक मेज. गांधींजी  इथे बसून लिखाण काम करायचे असे म्हणतात . थोडं आत शिरल्यावर एक खोली-  दहा बारा लोकांचा  एक ग्रूप उगाच मोठमोठ्याने बोलत इकडे तिकडे फिरत होता.  एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, की इतक्या सुधारणा केल्या गेल्या आहेत, की  गांधी आश्रमाची ओरिजिनॅलिटी अजिबात शिल्लक राहू दिलेली नाही. खाली लावलेली फरसी, प्लास्टर, त्यावरचा सुबक रंग , छान लाल रंगाचं छत हे सगळं जरी छान दिसत असलं, तरी त्यात काही तरी चुकल्या सारखं सतत जाणवत होतं. सगळ्या मॉडीफिकेशन मुळे ओरिजिनलिटी हरवल्यासारखी वाटत होती आश्रमाची.

हेरीटेज वास्तू चा किंवा ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वास्तूचा एक वेगळा बाज असतो. त्या वास्तू “जशा आहेत तशा” स्वरूपात पुढल्या पिढीसाठी जतन करून ठेवायला हव्या असे माझे मत आहे.   अहमदाबादच्या गांधी आश्रमात गेल्यावर तो  जास्त चांगला दिसावा म्हणून त्याच्या मूळ स्वरुपात खूप जास्त बदल केल्याने  तो  आश्रम   महात्मा गांधींचा  आहे ह्याची जाणीव  फक्त त्या कपाटात ठेवलेल्या गांधीजींच्या काही वस्तू ( काही प्रतिकृती) पाहून वाटतं.खरं तर समोर मांडून ठेवलेला चरखा , जो स्वातंत्र्यपूर्व काळात  ’स्वातंत्र्य चळवळीश” निगडीत होता, तो पण तिथे प्रवचना मधे मारून मुटकुन बसवलेल्या लहान मुलासारखा वाटत होता.  येणारे जाणारे व्हिजिटर्स त्या चरख्याजवळ बसून फोटो काढून घेत होते.

गांधी आश्रम सेवाग्राम वर्धा

हे पाहिल्यावर काही दिवसांपूर्वी वर्ध्याच्या गांधी आश्रमाची भेट आठवली. वर्धेचा गांधी आश्रम अजूनही जसा होता तसाच मेंटेन केला आहे. शेणामातीच्या सारवलेल्या भिंती आणि जमीन. ज्यावर पाय ठेवला की जमिनीशी असलेल्या नात्याची एक वेगळीच जाणीव होते. गांधीजींच्या वापरातल्या वस्तू मग ते अगदी पाणी पिण्याचे भांडे असो की त्यांच्या वापरातले गहू -ज्वारी दळायचे जाते , उखळ, आणि इतर साध्या गोष्टी  असो,  तिथे अजूनही अगदी त्या काळात होत्या तशाच सांभाळून ठेवलेल्या  आहेत.

मी स्वतः दोन्ही आश्रम पाहिलेले आहेत. पण मला वर्धेचा आश्रम जास्त आवडला, कारण तो आश्रम  पहातांना गांधीजींच्या जवळ पोहोचल्याचा, किंवा त्यांची जीवनशैली जवळून पाहिल्या सारखे वाटते .

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , , . Bookmark the permalink.

10 Responses to अहमदाबाद – वर्धा

 1. arunaerande says:

  The Ahamadabad Ashran is more of a museum than a heritage sight.

  • अरुणा
   आश्रम दोन्ही चांगले आहेत, माझा आक्षेप फक्त रिनोव्हशन करण्यावर आहे. वर्धेचा जिवंतपणा इथे का वाटत नाही हे मात्र कळत नाही.

 2. alka patil says:

  maza anubhav yapeksha agdich nirala hota. mi ahamabad chya ashramat gele hote tenvha tethe neerav shantata hoti, Baherchya ovarit pochlyavar eka veglya shanta bhavnene maan bharoon gele.bhovatali jhadanchya savlya ani ti sadhi kuti mala kharokhar tapovanasarkhi vatli hoti ani ajunahi tya vatavarnacha thasa manavar aahe.

  • अलका
   ब्लॉग वर स्वागत.. कदाचित मी गेलो तेंव्हा असलेला तो जर जत्था नसता तर शांतता वाटली असती.

 3. Guru says:

  इतिहासाचा वानरविचका म्हणतात काका त्याला, कंझर्वेशन चा बेस्ट इलाज म्हणजे मंदिराला सरळ ऑईल पेंट मारतात हे दिड शहाणे लोक, अभी क्या बोलने का!!!!!!. ज्योतिबाच्या डोंगरावर तर फ़ोडलेल्या नारळाच्या पाण्याने ही करोजन झालेले दिसते मंदिराचे आता बोला!!!!

  • कंझरवेशन हा एक वेगळा विषय आहे. खजूराहोच्या मंदीराचं काम होत असताना मी तिथे गेलो होतो. खास केमिकल्स वापरून ते मंदीर स्वच्छ करत होते. आता मंदीराला ऑइल पेंट मारणं म्हणजे खरंच अतीप्रसंग आहे..

 4. mau says:

  मी वर्ध्याचा आश्रम पाहिला नसल्याने त्याबद्दल काही लिहु शकत नाही. अहमदाबादचा गांधी आश्रम जास्त आवडलाय. असो !!! लेख चांगला आहे नेहमीप्रमाणे.

  • उमा,
   दोन्ही आश्रमात गांधीजींचे वास्तव्य राहिल्याने दोन्ही सारखेच महत्त्वाचे आहेत. पण मला जो काही फरक जाणवला तो लिहिलाय. 🙂 धन्यवाद.

 5. shubhalaxmi says:

  hello kaka,
  nehmi pramane lekh changla ahe, mi ajun tari gele nahi tithe pan tumhi je photo ghalte ahet na te pahun jaun alyasarkh vatal..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s