फेरीवाला

एक चतुर्थांश रस्त्यावर सामान पसरवून दिवसभर धंदा करणाऱ्याला तुम्ही फेरीवाला म्हणू शकता का? अर्थात नाही!

पूर्वीच्या काळी उच्च ती शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी अशी एक म्हण होती. माझे आजोबा नेहेमी म्हणायचे ही म्हण. पण आजच्या जगात तसं आहे का? मला वाटतं या म्हणीचा थोडा क्रम बदलला आहे. उच्च व्यापार, मध्यम नोकरी कनिष्ठ शेती असा काहीसा क्रम होऊ शकेल.

उच्च व्यापार म्हंटल्यावर डोळ्यापुढे एकदम अंबानी आणि टाटा बिर्ला येतात, पण  हा लेख लिहितांना ते लोकं अपेक्षित नाहीत.   इतरही लहानमोठे धंदा करणारे लोकं आहेतच, त्यांच्याबद्दल लिहायच आहे आज. आता धंदा करायचा म्हंटलं तर,  सगळ्यात चांगला धंदा असलेला कोणता आहे?? बराच विचार केल्यावर याचं एकच उत्तर एकच लक्षात आलं, ते म्हणजे फेरीवाल्याचा  .

कदाचित थोडं आश्चर्य वाटेल, पण खरोखरच या धंद्या इतका सोपा आणि किफायतशीर धंदा कुठेच नाही.   हल्ली रस्त्याच्या कडेला फुटपाथ वर काय मिळत नाही? ज्या कुठल्या गोष्टी दुकानात मिळतात, तशाच / त्याच वस्तू फुटपाथ वर पण मिळतात. इलेक्ट्रॉनिक सामान ते कपडे किंवा भाजी, फळं वगैरे काहीही वस्तू दुकानाच्या समोरच्या फुटपाथवर मिळते. दादरच्या मार्केट मधे कधी गेला असाल तर दुकानांच्या समोरच्या फुटपाथवर अगदी दुकानाच्या प्रवेशद्वारापाशी पण हे फेरीवाले रस्ता अडवून बसलेले दिसतात.

मी फेरीवाल्याचा धंदा सगळ्यात उत्तम का म्हणालो? तर याचं कारण म्हणजे, या फेरीवाल्यांना काहीच करायची गरज नसते, सेल्स टॅक्स, इनकम टॅक्स, व्हॅट नंबर, सीएसटी नंबर, दुकानाचं रजिस्ट्रेशन,वगैरे काहीच  करायची गरज नसते.  स्वतःच्या मालकीचा धंदा असल्याने  कधी रेसेशन मधे नोकरी जाईल  का ? पिंक स्लिप मिळेल का? व्हि आर एस वगैरे   अगदी कशाची काळजी नसते.  कार्पोरेशन चा फुटपाथ आणि एक पथारी एवढ्याच गोष्टींच्या जोरावर फेरीवाले धंदा केला जाऊ शकतो.

कार्पोरेशनची फेरीवाला हटाव वाली गाडी आली की आपलं सामान उचलून पळायचं आणि ती गाडी केली की मग पुन्हा तिथेच आपली पथारी अंथरायची. मुंबईकरांना पण या कार्पोरेशनच्या तमाशाची सवय झालेली असते. उगाच काही तरी कार्पोरेशनचे लोकं ह्या फेरीवाल्यांना उठवल्याचे नाटक करतात, पण पुन्हा दुसऱ्याच दिवशी सगळे फेरीवाले त्यांच्या नेहेमीच्या ठिकाणी बसलेले दिसतात.

दादरला सुविधा मधे फक्त कपडे विकले जातात, बेडेकर फक्त मसाले , पापड लोणची विकतात, पणशीकरांकडे मिठाई शिवाय काही मिळत नाही, बजाज वाले रिक्षा विकतात, मारुती फक्त कार . कारण या लोकांना धंदा सारखा बदलणे शक्य नसते.   वर्षभर धंदा सारखाच चालत नसतो. काही दिवस खूप विक्रीचे तर काही मंदीचे असतात. एखाद्या महिन्यात मंदी असली तरीही त्यांना दुकानं बंद ठेवता येत नाहीत. लाईट बिल, फोन बिल, दुकानाचं भाडं वगैरेचा खर्च  सुरु असतोच.. खर्च सुरु आहे, म्हणून दुसरं काही विकणे सुरु करता येत नाही.

फेरीवाल्यांचं नेमकं या उलट असतं. पावसाळ्यात केवळ छत्री रेनकोट विकणारा फेरीवाला, थंडीच्या दिवसात स्वेटर्स विकतांना दिसतो. ज्या गोष्टीची मागणी , त्या गोष्टी आम्ही विकणार हा यांचा व्यापारी बाणा असतो.  आज भाजी विकणारा फेरीवाला, उद्या तुम्हाला फळं विकतांना दिसू शकतो. उन्हाळ्यात केवळ हापूसचे आंबे विकणारा फेरीवाला सिझन संपला की सिताफळं किंवा इतर फळं विकतांना दिसू शकतो. इथे बिझिनेस डायव्हर्सिफिकेशन फार सोपं असतं.

फेरीवाल्यांचं आणि तुमचं -आमचं नातं हे लव्ह-हेट रिलेशनशिप सारखं असतं. लोकल मधून उतरल्यावर, घरी जातांना पटकन भाजी , फळं घ्यायची तर तुमचं लक्ष रस्त्यावरच्या फेरीवाल्याकडे जाते, तेंव्हा तो फेरीवाला हवा हवास वाटत असतो, पण रस्त्यावरून चालतांना त्याची अडचण व्हायला लागली की त्याचा राग येतो. फेरीवाल्यांना एस्टॅब्लिश करण्यामागे आपला पण हातभार असतोच.जर लोकांनीच त्यांच्याकडून खरेदी केली नाही, तर ते आपोआपच निघून जातील.   पण तसं होत नाही, कारण आपल्याच रोजच्या जिवनाचे ते अंग झालेले आहेत.

मालाड स्टेशनच्या जवळ असलेल्या आमच्या नेहमीच्या भाजीवाल्या कडून भाजी घेतांना त्याला सहज विचारलं, की दररोज किती फायदा निघतो? तर म्हणाला की  संध्याकाळचे पाच ते आठ इथे बसतो, आणि तेवढ्या वेळात सगळा खर्च जाता  कमीत कमी   ६०० ते १००० रु. पर्यंत  तरी सुटतातच. खर्च फक्त  धंदा करण्यासाठी द्यावा लागणारा   हप्ता .

मुंबईच्या लोकांच्या नशीबात फुटपाथ वर चालण्याचं सुख अजिबात नाही. कुठल्याही भागात गेलात तरी फुटपाथ हे फेरीवाल्यांनी काबिज केलेले आहेत. इथे रस्त्यावरच्या फेरीवाल्यांचा कैवार घेणारे बरेच राजकीय नेते आहेत. फेरीवाले उठवले, की  मेघा पाटकर , शबाना आझमी ,राजकीय नेते वगैरे लोकांना एकदम यांचा कळवळा येतो, आणि मग विस्थापित झालेल्या फेरीवाल्यांचे पुन्हा प्रस्थापन करावे म्हणून आंदोलनं सुरु केली जातात. “फेरीवाल्यांना विरोध” म्हणजे “गरिबांना विरोध” अशी प्रतिमा तयार होण्याची भिती असते ना म्हणून राजकीय तुटपुंजे नेते ( गावगुंड) पण यात सहभागीहोतात .

फेरीवाला या शब्दाची शब्दशः व्याख्या ही “डोक्यावर पाटी घेऊन , आपल्या कडला जिन्नस फिरून विक्री करणारे” अशी केली जाऊ शकते. किंवा फार तर गाडी वर भाजी, वगैरे ठेऊन गाव भर भटकत विक्री करायची हा पण अर्थ घेतला जाऊ शकतो, पण हे फेरीवाल्यांच्या जागा पण ठरलेल्या असतात. वर्षानुवर्ष हे लोकं एकाच ठराविक जागेवर बसून, वाहतूकीला अडथळे निर्माण करत   अगदी ५०-५० वर्ष धंदा करतांना दिसतात. आधी वडील, आणि नंतर मग वारसा हक्काने ती फुटपाथ वरची जागा मुलांना मिळते आणि ते  पण एकाच ठिकाणी तोच धंदा ,   करताना दिसतात. रस्त्याने चालतांना पादचाऱ्यांसाठी पण जागा शिल्लक रहात नाही, आणि या गर्दी मधून कथ्थक करत आपला मार्ग काढावा लागतो.

फेरीवाले हे कायम फिरत धंदा करणारे, ते प्रस्थापित कधीच नसतात, मग ते  “विस्थापित” कसे काय होऊ शकतात हा मला पडलेला प्रश्न आहेच.  कारण रस्त्यावर बसून धंदा करणारे आणि दिवसाकाठी हजार एक रुपय कमावणारे ( गरीब) फेरीवाले..   जर एकाच जागी बसून विक्री क्रऊ लागले तर त्यांना  फेरीवाले कसे म्हणता येईल?  मेघा पाटकर ला एकदा विचारायची आहे ही गोष्टं!

“फेरीवाल्यांकडुन वस्तू विकत घेऊ नका” वगैरे उपदेश करण्यासाठी ही पोस्ट लिहिलेली नाही. अगदी सहज काय वाटेल ते लिहिलंय. एक गोष्ट सहज लक्षात आली, की जर हे फेरीवाले नसते तर मी काय केलं असतं? उत्तर सोपं आहे, ” दुकानात जाऊन चार पावलं जास्त चालून आपल्याला हवी ती वस्तू विकत घेतली असती. फेरीवाल्यांना हलवणे काही कठीण नाही.  ठाण्याला असतांना  चंद्रशेखर यांनी हे करून दाखवले, ठाण्याहून जेंव्हा त्यांची नागपूरला बदली झाली, तेंव्हा त्यांची बदली कॅन्सल व्हावी म्हणून  जनतेनेच निदर्शने केली होती.    पुढे नागपूरला गेल्यावर तिथले पण फुटपाथ मार्केट कुठल्याही राजकीय दबावाखाली न येता   हटवून दाखवले. वर्षानुवर्ष महापालिकेवर राज्य करणाऱ्या शिवसेनेचे नेते हे करू शकतील, पण त्यांच्या मधे असलेला    इच्छाशक्ती चा अभाव हेच कारण होऊ शकते.

काय पटतंय  की नाही? सगळ्यात सोपा आणि चांगला व्यवसाय हा फेरीवाल्याचाच आहे.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged , , , . Bookmark the permalink.

40 Responses to फेरीवाला

 1. yogesh D says:

  kaka khup chan ….

 2. Anonymous says:

  काका नमस्कार ,
  फेरीवाला हा एक फक्त परवान्याचा प्रकार आहे. हे तर ओपेन टु स्कय शॉपिंग आहे मुंबईत तीन लाख असे विक्रेते आहे यान्या हटवणार ??? त्यांच्या मागे चार जनाचे कुटुंब , ते कुठे जाणार ?

  • फेरीवाला हटवा वगैरे मी म्हंटलेले नाही. ते सगळॆ वाचकांवर सोडलेले आहे. नुकतेच मालाडच्या रस्त्यावर ( २० फुटाच्या रस्त्यापैकी १० फुट फेरीवाल्यानी काबीज केला आहे , आणि उरलेल्या जागेत लोकं आणि वाहनं चालतात) एका लहान मुलीचा वाहनाचा धक्का लागुन मृत्यु झाल्याने हा लेख लिहायला घेतला. माझ्या मते फूटपाथवर पहिला हक्क पादचऱ्यांचा असतो फेरीवाल्यांचा नाही.

 3. Guru says:

  बघा….. म्हणजे आज तुमचा फ़ेरीवाल्यांवरचा लेख वाचला अन काही दिवस आधी पुण्यात ऐन तुळशीबागेसमोर ऐन सकाळी झालेला डबल मर्डर आठवला, त्याचे कारण एकच त्या ठीकाणी एक फ़ेरीवाला बसायचा, तो वारीला गेला होता तोवर त्या पंधरवड्यात दुस-याने ती जागा पटकवली, परीणामी वारक-याने परत आल्यावर आपल्या मुलासोबत येऊन नवागत बापलेकांचा गेम केला.. फ़ेरी च्या धंद्यात इन्व्हेस्ट्मेंट्स तुम्ही म्हणता तसे नक्कीच जास्त नाहीए अन प्रॉफ़िट्स पण रग्गड आहेत म्हणुनच तो चॉईस ऑफ़ द मासेस आहे हे नक्की पण त्यांचे काही काही प्रॉब्लेम्स तर भयाण असतात, वास्तव चित्रपटात नाही का पावभाजीच्या गाड्य़ावर आगंतुक अन फ़ुकटखाऊ म्हणुन येणा-या दादाला वैतागुन शेवटी संजय दत्त अन नार्वेकर भाईगिरीत शिरत. बरेच से तसे……….

  • गुरु
   मी पण ती बातमी वाचली होती. सिनेमा मधे जरा अतिरंजित प्रकार दाखवले जातात हे पण लक्षात घ्यायलाच हवे. त्यांचे आपले स्वतःचे वेगळे प्रॉब्लेम्स आहेत , ते म्हणजे हप्त्ता , आणि तो पैसा पण गिऱ्हाइकाकडूनच वसूल केला जातो.

   • Guru says:

    बरोबर सॉर्ट ऑफ़ पॅरेलल टॅक्सेशन सिस्टीम…..

 4. aruna says:

  फेरीवाले हे कायम फिरत धंदा करणारे, ते प्रस्थापित कधीच नसतात, मग ते “विस्थापित” कसे काय होऊ शकतात हा मला पडलेला प्रश्न आहेच.
  हे मल एकदम पटले. विचार केला तर त्यांचा उपयोग होण्यापेक्षा उपद्रवच जास्त होतो. मला तर असे ही कळले आहे की अनेकदा दुकानवालेच त्यांचा माल फेरिवाल्यांद्वारे पदपथावर विकतात.
  पण बेकारी कमी करण्याचा तो एक मार्गा आहे असे पण वाटते. चोर्‍या, मारामार्‍या करण्यापेक्षा धंदा करणे चांगले ना?

  • फेरीवाल्यांनी फेरीमारून- म्हणजे शहराच्या निरनिराळ्या भागात फिरून विक्री केल्यास कोणाचीच काही हरकत नसावी.पण फुटपाथ वर धदा करणे कितपत योग्य आहे हा प्रश्न आहेच.

 5. manish says:

  काय राव
  १ mahinyane पोस्टिंग केले मी आपला रोज ब्लोग उघडून काही नवीन आहे का ते पाहायचो . असो फेरीवाले हे आपल्या भ्रष्ट राजकारण्याची पिल्लावळ आहे सगळ्यात जास्त सत्तेवर राहिलेल्या पक्षाने दिलेल्या अनेक चांगल्या(?) गोशितीन्पैके pheriwala हे एक आहे. काय वाटते तुम्हाला.

  • मनिष
   धन्यवाद. अहो हल्ली थोडं काम जास्त वाढलंय, त्यामुळे फारसा लिहीत नाही. सत्ताधारी लोकांनी बऱ्याच “चांगल्या” गोष्टी दिलेल्या आहेत, जसे झोपडपट्टी , फेरीवाले, वगैरे वगैरे.. 🙂 मान्य!

 6. shekhar says:

  dhanyawad. aapla blog atishay sunder ahe. aataparyanchya post pramanech ha lekhhi chanach ahe.

 7. dknotme@yahoo.com says:

  “मी फेरीवाल्याचा धंदा सगळ्यात उत्तम का म्हणालो? तर याचं कारण म्हणजे, या फेरीवाल्यांना काहीच करायची गरज नसते, सेल्स टॅक्स, इनकम टॅक्स, व्हॅट नंबर, सीएसटी नंबर, दुकानाचं रजिस्ट्रेशन,वगैरे काहीच करायची गरज नसते…………..”

  फेरीवाल्यांना कोणताही टॅक्स भरावा लागत नाही म्हणता ? एखाद्या फेरीवाल्या शेजारी संध्याकाळी थोडावेळ उभे रहा अन बघा………….किती पोलीस येऊन हप्ता वसुल करतात ! खास करुन भाजीवाल्या जवळ उभे रहा अन बघा…… पोलीस भाजी कधी विकत घेत नसावे असे माझे मत झाले आहे या वर्दीतल्या भिकार्‍यांना बघुन !

  • हप्ता! तो म्हणजे भारतात प्रोफेशनल हजार्ड म्हणावा लागेल. त्याचे पैसे पण गिऱ्हाइका कडूनच वसूल केले जातात, फेरीवाला आपल्या खिशातून हप्ता भरत नाहीत. म्हणजे शेवटी सामान्य माणूस जो कायद्याला घाबरतो , तोच सफर होतो.
   फेरीवाला पण हप्ता देतो, कारण तो नियम मोडत असतो ही गोष्ट तुम्ही का विसरता?

 8. “फेरीवाले चालतील पण मेधा पाटकरला आवरा” अशी गत झालीये सध्या !

 9. pramod mama says:

  Mahendra Kaka,
  Mast article aahe, pheriwale kadoon swast , taza & selected items ghasaghis karoon gheta yeto dukandar thyacha sarv kharch ani profit add karoon customer la loot tat , no bargaining in malls & shops. Maza ek police dost daily 2-3 Rikamya pishvya ghevoon sakali dutyla jato. Ratri ghari yetana thyachya pishvi madhe bhaji, chakana, whisky, fresh fruits, Ribbons, Toyes, Bakery products , Masalechya packets etc etc ghewoon yeto, ha sarv mal footpath chya feriwale & thanchya pathimage dookandara kadoon mofat anato. Mhanoon mala footpath war che feriwale awadtat.Tyanchya mule Mumbai madhe lakho manse pot bhartat ..asoo dyat tyana footpath war.

  Thanks

  Pramod Mama

  • प्रमोदमामा,
   तुमचे म्हणणे मान्य जरी केले, तरी ते पैसे पण आपणच देतो ना.. त्यांनी एका जागी बसून धंदा न करता फिरून धंदा केला तर लोकांची पण जास्त सोय होईल , आणि त्यांना पण नियम मोडण्यासाठी लाच लुचपत पोलिसांना द्यावी लागणार नाही.

 10. आणि हे फेरीवाले नेपाली किंवा भैयाच जास्त असतात… मराठी माणसाला ही चैन परवडण्यासारखी नाहीये…. नाही का??:)

  • Anonymous says:

   आणि हे फेरीवाले नेपाली किंवा भैयाच जास्त असतात… मराठी माणसाला ही चैन परवडण्यासारखी नाहीये…. नाही का??:)
   प्रत्युत्तर marathi manus kamchukaar aahe he jagjahir aahe

   • नेपाळी, भैय्ये जास्त असतात.. 🙂 मराठी कोळीणी पण हल्ली दिसत नाही, त्या ऐवजी मासे पाटीवर घेऊन जाणारे भैय्येच जास्त झाले आहेत.

   • धनंजय. says:

    मी एक मराठी माणुस आहे पण माझेच मराठी माणसाबद्दलचे मत अतिशय वाईट आहे. मराठी माणुस कामचुकारच नाही तर हरामखोर पण आहे. होय मी माझ्या हुद्द्यचा वापर करुन ज्या ज्या मराठी माणसाला मदत केली त्यातील बर्‍याच लोकांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे मी यापुढे मराठी मराठी करणे बंद केले आहे. ज्या माणसात लायकी आहे असा कोणताही चालेल पण मराठी नको व हेच माझ्या सोबतच्या वरच्या हुद्यावरच्या मराठी माणसांचेही आहे.
    मराठी माणसांनी सुधारावे अन्यथा पुढे कोणिही तुम्हाला उभे करणार नाही. मराठीच्या नावाने दुकान चालवणारे राजकिय पक्षही सहज विकल्या जातात हे ही लक्षात ठेवावे.

    • धनंजय
     सगळ्याच प्रकारचे लोक असतात, कदाचित तुमचा संबंध एका ठरावीक प्रकारच्या लोकांशी आला असावा.

    • arunaerande says:

     you are right. we want to be proud of Maratho manus, but rarely get a chance of it. he is not haed working or work oriented or aambitious. on top of that he wants everything without making an effort. and then he comes on road and damages public property for no apparent reason. just for enjoyment. i too am verey much disillusioned.

 11. Arvind says:

  kasala bhari lihayala lagla ahe ekdam sadetod

 12. mrs. asha dhandore says:

  feriwalyanbaddal apan je kahi mhanalat te kitpat yogya ahe sir he jara apan swatahachya manalach vichara? he feriwale rastyavar basun aisho aramat paise nahi kamavat. tyana unhacha tadhakyat, bhar pausat, kadkadit thandit rastyavar basun tyancha vyavasay karayacha asto. veloveli tyanchya manat hi bhiti asate ki kadhi polisanchya gadya yetil ani tyancha sarva maal udhavast kartil. ashya veli te tyanchya jivachi parva na karta tyancha saman gheun pal kadhanyachya mage astat. ya darmyan tyana polisanchanchya dandkyache mar sahan karave lagtat. pan te sahan kartat. ani punha tyach thikani yetat. tyanchya malachi vikri karayala. he sagala yevadha sopa nahi jevadhya sopya padhhatine apan mandalat. khup kasarat karavi lagate tyana. ani hi kasarat te tyanchya parivarachya udarnirvahasathi kartat. swatahachya hausmaujesathi nahi. jara kalpana kara tyatlya eka jari feriwalyacha dhanda band padla tar tyachya purna parivarachi kay avastha hou shakate. tumchya amchya sarakhe lok officemadhe ac madhe basun kaam karnare un-paausacha tadhakha kay asto te apalyala kase kalnar. he feriwale kashtane imaandarine paisa kamavatat. konacha lubadat nahit. jar he tyanche vyavsay band padale gele tar hi lok berojgar hotil ani yatun gunhegariche prakar wadhatil. chorya-maryanche prakar wadhatil. tyapeksha he bare navhe ka ki apalya sarkhya lokani thodasa traas sahan karayala kahi harkat nahi.

  • आशा,
   फार सेंटीमेंटल होऊन लिहिताय तुम्ही. एक सांगा, काही कायदे नियम आहेत, ते पाळा म्हटलं तर त्यात वावगं काय? फेरीवाल्यांना धंदा बंद करावा असे मी कधीच म्हणणार नाही. पण माझे स्वतःचे मत असे आहे, की त्यांनी धंदा करतांना पादचाऱ्यांना त्रास होणार नाही या कडे लक्ष द्यावे. एका जागी बसून धंदा करण्यापेक्षा फिरून धंदा करावा- ( कायद्याने पण तसेच अपेक्षित आहे) तुम्ही कधी संध्याकाळी सुविधा च्या गल्लीतून चालत गेला आहात का? एक कार जरी आली तरी पायी चालणाऱ्यांना मुश्किल होतं.

   दुसरी गोष्ट, तुम्ही समजा एक फ्लॅट विकत घेतला, घामाचे पैसे कमावून, तुमच्या कंपाउंड वॉल ला लागून जर झोपडपट्टी उभी राहिली तर तुम्हाला आवडेल का? तिथे पण त्या झोपडपट्टीतल्या लोकांच्या कुटुंबाचं काय होईल हा विचार कराल, की आधी त्यांना तिथून हटवण्याचा प्रयत्न कराल ? थोडा विचार करा, म्हणजे माझा मुद्दा लक्षात येईल.

  • Anonymous says:

   fakt aath tas AC madhe basat assal mhanje sarva kasthatun sutka hote Ka? lahan mulana gheun footpath warun chalta yete ka? jar te yevdhya kashtani udernirvaha karit aastil tar jjage saathi maramarya murder ka hotat? 8 tas AC madhe basnarana wun,wara, paoos shivat nahi ka?

   • एसी मधे बसणाऱ्यांच्या पण डोक्यावर नौकरी जाईल की काय म्हणून टांगती तलवार असते.

 13. >> जर एकाच जागी बसून विक्री क्रऊ लागले तर त्यांना फेरीवाले कसे म्हणता येईल?

  अगदी अगदी

 14. Natthulal says:

  चंद्रशेखर यांनी ठाण्यात जे “करून दाखवले” त्याला श्रीमंत थोरले ठाकरे आणि त्यांच्या ठाण्यातील आनंदी मनसबदार यांच्यामधील “कोल्ड वाॅर” चा पदर होता हे लक्षात घेतले पाहिजे.
  मनसबदार ठाण्यात आपल्या मित्राबरोबर जे डाव खरे(खोटे) करत होता ते श्रीमंतांच्या मनाशी डाचत होते, चंद्रशेखरांनी चतुराईने या भांडणाचा अंदाज घेतला, थोरल्या श्रीमंतांचा मातोश्रीवरून आशीर्वाद घेतला व ठाण्यात काम “करून दाखवले”. ठाण्यातील सर्वपक्षीय नगरसेवक (बिल्डर) आनंद-दरबारात खेटे मारत राहिले व चंद्रशेखर अनधिकृत बांधकामे पाडत राहिले. त्याच काळात गोरा खैरनार “करून दाखवले” चे फोटो वर्तमानपत्रांना द्यायचे, त्यांच्या पाठी श्रीमंतांनी कधी पाठबळ दिल्याचे ऐकिवात नाही .. असो

  • तुम्ही म्हणता ते जरी खरं असलं तरीही नागपूरला पण त्यांनी तेवढंच मोठं काम केलंय. खूप मोठ्या पोलिटिकल लोकांचे बांधकाम पाडायला पण कमी केले नव्हते.
   आता श्रीमंतांबद्दल काय बोलायचं?

 15. falguni says:

  kharach ha blogg vichar karayla lawanara aahe..yawar nakki kahitari changla todga nighayla hawa..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s