ऐका हो ऐका..

तुम्ही पुस्तकं वाचता का?? आता तुम्ही म्हणाल हा काय  प्रश्न झाला का? अहो सुशिक्षित आहोत आम्ही, निश्चितच वाचतो पुस्तकं. कदाचित काही लोकं मराठी तर काही इंग्रजी पुस्तकं वाचत असतील.

प्रत्येक पुस्तक वाचल्यावर आपल्या मनावर एक छाप सोडून जाते, आणि ते पुस्तक आवडते , किंवा अजिबात आवडत नाही. कधी लेखक खूप छान आहे म्हणून वाचायला घेतलेले पुस्तक पण एकदम रटाळ निघतं आणि एखाद्या नवोदित लेखकाचं पुस्तक एकदम मनाला भिडत. पुस्तक वाचून झाल्यावर पण खाली ठेवावसं वाटत नाही.असं वाटतं की ह्या लेखकाने अजून काहीतरी लिहायला हवं होतं .

एखादं खूप गाजलेलं  पुस्तकं  मुद्दाम म्हणून वाचायला घेता, आणि वाचायला सुरु केल्यावर अर्धवट वाचून ठेऊन देता.कारण तुम्हाला ते अजिबात आवडत नाही. माझा  रॉबर्ट लुडलुम चं बॉर्न सिरिज न आवडलेला एक मित्र आहे, तेंव्हा गाजलेलं पुस्तक हे आवडलं पाहिजेच असे नाही. अहो लोकांच्या आवडी आणि तुमच्या आवडी सारख्या असल्याच पाहिजे असे कोणी सांगितले आहे ? प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. प्रत्येकाच्याच आवडीचा आदर केला पाहिजे.

एखादं पुस्तक वाचताना असंही वाटतं की  ह्या पुस्तकात काही फारसा दम नाही,    लेखकाला वाजवीपेक्षा जास्त प्रसिद्धी देण्यात आलेली  आहे- पण  तुम्ही तुमचे विचार तुमच्या मनातच ठेवता कारण , एक मन म्हणत असतं की जर ते पुस्तक आवडलं नाही असं लोकांसमोर बोललो तर  लोकं काय म्हणतील ?वेड्यात काढतील राव! इतका मोठा नावाजलेला लेखक, त्याचं पुस्तक आवडलं नाही म्हणणं म्हणजे पापच.. नको, त्या पेक्षा गप्प बसलेलेच बरे.  म्हणून तुमच्या मनातले विचार तुम्ही मनातच दफन करता.

जेंव्हा आपण गप्पा वगैरे मारतो, तेंव्हा आपलं बोलणं सगळ्यांनी ऐकावसं वाटत की नाही? तसंच आपले  एखाद्या पुस्तकाबद्दलचे विचार पण  स्वतःपुरते  मर्यादित न ठेवता सगळ्यांबरोबर शेअर करावेसे वाटते ना? मग त्याच साठी एक संधी आहे. मी मराठी या संकेत स्थळावर एक  स्पर्धा आयोजित केलेली आहे.

तर  स्पर्धा कसली? तुमच्या  मनात दफन झालेले पुस्तकांच्या संबंधीचे विचार उकरून काढण्याचा एक प्रयत्न म्हणजे ही स्पर्धा! नाही लक्षात आलं? अहो तुमच्या  आवडीच्या/ किंवा न आवडलेल्या पुस्तकांच्या बद्दल तुम्ही लिहायचं आहे. एकदम तुम्हाला ” काय वाटेल ते” . अगदी कोणाचाही मुलाहिजा  बाळगायची गरज नाही. पुस्तक वाचायला घेतल्यावर लेखकाकडून तुमच्या काय अपेक्षा होत्या? वाचल्यावर त्या पुर्ण झाल्या की नाही?   वगैरे वगैरे ….  एकदम ’थेट दिल से’ लिहायचं. एखादे पुस्तक तुम्हाला का आवडले / आवडले नाही? हे अगदी कोणाला काय वाटेल याचा विचार न करता, स्वतःशी प्रामाणिक राहून तुम्हाला बिनधास्त पणे  कागदावर उतरवायचे आहे. भाषा- तुम्ही आम्ही बोलतो तशी असली तरी चालेल. फार साहित्यिक भाषा अपेक्षित नाही.

त्या साठी काही लेखक वगैरे असायची गरज नाही. उचलायचा पेन आणि जे काही मनात येईल ते लिहून काढायचं. एकदम सोपं आहे, स्वतःशी प्रामाणिक राहून लिहिलं की ते कागदावर पण  चांगलंच उतरतं.

बक्षिसं अर्थातच असेलच ! चांगलं भरघोस असेल. पण बक्षिसासाठी थोडेच लिहीणार आहोत? आपण तर केवळ आपल्या मनात काय दडलंय ते बाहेर काढण्याची संधी मिळाली म्हणून लिहीणार आहोत – नाही का?? स्पर्धेचे नियम तुम्हाला विशालच्या ब्लॉग वर  , किंवा  सुहासच्या ब्लॉग वर किंवा मी मराठी साईट वर  पहाता येतील.

चला, आता  उचला पेन, आणि तुमच्यातल्या त्या झोपलेल्या लेखकाला जागा करा.. आणि जगाला पण कळू द्या तुमचे विचार, जग वाट पहातंय तुमचे विचार समजून घ्यायला.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मराठी, Uncategorized and tagged , . Bookmark the permalink.

2 Responses to ऐका हो ऐका..

  1. raj jain says:

    धन्यु साहेबा!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s