आधार

लहानशा आधाराने पण फार मोठं काम केलं जाऊ शकतं.

बऱ्याच गोष्टी, किंवा  लोकं  आपल्या नकळत आपल्याला आधार देत असतात, आणि हे आपल्या लक्षातही  येत नाही, कारण आपण बऱ्याच गोष्टींना   गृहीत धरलेले असते.  आधार देणारी व्यक्ती मुद्दाम तुम्हाला आधार द्यायचा म्हणून देत नसते, तर तुमच्या तिच्या संबंधांमुळे आपोआपच     तिच्या वागण्या बोलण्यामुळे   तुम्हाला आधार मिळत असतो. ही गोष्ट तुमच्या-आमच्या  नकळत होत असल्याने आपल्याला तिचे महत्त्व समजत नाही.

अगदी लहानपणी ज्या आईच्या च हाताचा आधार घेऊन उभे रहाणं किंवा पहिले पाऊल टाकणे लहान मुल शिकतं, पन्नास एक वर्षा नंतर त्याला  त्याच आईला हाताला धरून आधार द्यावा लागतो. दोन्ही हात तेच आहेत, एकमेकांनी धरलेले,  फक्त आधार कोणी  कोणाला दिला ह्यात  बदललं झालाय.  हेच खरं आयुष्य असतं. ज्याला हे समजलं, त्याचं जीवन सोपं झालं असं समजायचं.

वयोमाना प्रमाणे आईला शारिरीक आधाराची जरी गरज  पडली , तरीही तिची मानसिक क्षमता आणि तुमच्याशी भावनिक जवळीक  इतकी जास्त असते,की  तुम्हाला जेंव्हा कधी  मानसिक आधार हवा असतो तर फक्त तिला केलेला एक फोन पण पुरेसा असतो, तिने नुसतं म्हंटलं,” की काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल,” की एकदम मनावरचं दडपण एकदम  कमी होतं.आईचा मानसिक  आधार अनकन्डीशनल असतो, नो क्वेश्चन आस्क्ड” . काही लोकं असेही म्हणतील की अशा वेळेस बायको कडूनही आधार मिळू शकतो, हे जरी खरं असलं, तरी  पण त्या आधी पन्नास प्रश्न, मग तुमचं कसं चुकलं ते,तुम्ही कसं वागायला हवं होतं म्हणजे अशी वेळ आलीच नसती – असे   ऐकल्यावर  ,    जेंव्हा ती आधार द्यायला तयार होते, तेंव्हा पर्यंत तुम्ही मानसिक दृष्ट्या जाम थकलेले असता.   पण आईचं तसं नसतं, ती अनकन्डिशनल आधार देत असते, तुमचं शंभर टक्के चुकलं असलं तरीही.

कुठेतरी एक वाक्य वाचलं होतं, आणि ते खूप आवडलं होतं म्हणून इथे लिहितोय. “आयुष्य म्हणजे दोन्ही कडून जळणारी मेणबत्ती” , एकी कडून तुमचं घरगुती आयुष्य, तर दुसरी कडून तुमचं प्रोफेशनल आयुष्य. दोन्ही टोकं इतक्या वेगाने जळत असतात, की मधल्या मेणाच्या भागाला   नेहेमीच आधार  हवा असतो. मधल्या भागाला आधार नसेल तर मेणबत्ती खाली पडून कुठलं तरी एक टोक  ( किंवा दोन्ही टोकं ) विझण्याची शक्यता असते. मग ते प्रोफेशनल साईडचं टोकं विझणं किंवा घरगुती आयुष्याच्या बाजूचे टोक विझले तरी नुकसान सारखेच असते. एकीकडचे टोकं जास्त वेगाने जळू लागले, की मग मधला  आधार डावी- उजवी कडे सरकवून मेणबत्तीचा समतोल साधावा  लागतो. वाचतांना जरी हे  सोपं वाटत असलं तरीही आपल्या आयुष्यात  हे साध्य करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते..

जगातले सगळेच जण आधार घेतच   आपलं आयुष्य जगत असतात. दोनशे फुट उंच असलेल्या वडाच्या झाडाला पण आधार मात्र मुळांचा घ्यावा लागतो. आपलंही तसंच असतं, जीवनाच्या सुरुवातीला आई वडलांचा आधार, मग शिक्षणासाठी  शिक्षकाचा आधार,ऑफिस मधे इनक्रिमेंट्स, प्रमोशन्स साठी बॉस चा आधार, आजारी पडल्यावर डॉक्टरचा आधार, परीक्षेच्या वेळेस साई बाबा, गणपती , लकी शर्ट चा आधार- असे प्रसंगानुसार आपले   आधार बदलत आपलं   आयुष्य जगत असतो. खरं सांगायचं तर आपण तिन्ही त्रिकाळ फक्त आधारच शोधत असतो,  एक आधार सापडला, की दुसरा  त्या पेक्षा बळकट शोधण्याचा आपला स्वभाव काही जात नाही.

बरं  आपण आधार शोधत असतो ही  गोष्ट खरी जरी असली, तरीही इतर कोणाला ती कळू नये हीच आपली इच्छा असते. “मी स्वयंपूर्ण आहे , आणि मला कोणाचीच गरज नाही” हे ठणकावून सांगायला प्रत्येकालाच आवडतं. केवळ तुम्हीच नाही, तर सगळी मानवजात जरी “स्वतंत्र” दिसत असली, तरीही  एकमेकांच्या आधाराशिवाय जगु शकत नाही .जे स्वातंत्र्य आहे असं  आपण समजतो , ते खरंच स्वातंत्र्य आहे, की एकटेपणा आहे हे समजून घ्यायची कोणाचीच  इच्छा नसते.

ज्या प्रमाणे सावली   नेहेमी बरोबर असली तरी पण  अस्तित्वाची जाणीव होत नाही, तसाच आधार पण सोबतच असतो, आणि वेळोवेळी जाणीव न होऊ देता  तो तुम्हाला सावरत असतो.  सगळ्या नात्यांमधे एक आईचं सोडलं तर केवळ पती-पत्नी चं नातंच असं असतं की ज्या मधे दोघंही एकमेकांना कुठल्याही स्वार्थाशिवाय आधार देत असतात.

कुबडीला असं वाटतं, की आपल्या आधार मुळेच माणूस चालू शकतोय, पण माणसाच्या आधाराशिवाय कुबडी पण उभी राहू शकत नाही ही गोष्ट कुबडीला माहिती नसते...

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , . Bookmark the permalink.

45 Responses to आधार

 1. AaKa says:

  Mast jamalay lekh…. Pan Adhaar cardcha ullekh raahilaa.. 🙂
  Bayakochaya aadharabaabt ek strange gosht ashi ki hich bayako mulalaa unconditional Adhaar dete pan navryaabaabat tasa naahi… 🙂 Tichya mate Navaryalaa easily aadharachi garaj nasate bahudaa.. 😉

  • आका,
   आधार कार्डाचा उल्लेख विसरलो. >> नवऱ्याला आधाराची गरज नसते>> असा “गैर”समज असतो. आधाराची गरज असली, तरी बायकोसमोर ही मॅन बनण्यामधे त्याचा “मी” पणा आडवा येतो.

 2. Guru says:

  वाह….. काका मस्त जमलंय अगदी!!!! शॉर्ट बट डीप आय मस्ट से!!!!!!….. तुम्ही म्हणता तसेच मी पण फ़ील करतो…. मस्त वाटले वाचून……

 3. जबरदस्त… एक न एक शब्द पटला !!

 4. Tushar says:

  एकदम मस्त. अगदी मनाला भिडला हा तुमचा लेख. पण जेव्हा दिलेल्या आधाराची कींमत मागितली जाते ना तेव्हा खुप वाईट वाटत …..

  • तुषार
   आधाराची किंमत म्हणजे तो व्यवहार झाला. त्याच्याकडे व्यवहार म्हणूनच पाहिलं की काही फारसा त्रास होत नाही.

 5. Suhas Adhav says:

  majhya kadun tar super-like …….udaharna ek dam jhakas aahet …jo photo tuhimhi lekhachya survatila vaparlat toch barach kahi bolun jato….mastch!

 6. Rajeev says:

  महाराज … आधार झाला… टेकूच काय ?? बरेच लोक टेकूला आधार समजतात.
  आधार (पाया) पक्काच आणी कायम असतो, टेकूहे तात्पुरते, सारे काही स्थीरस्थावर
  झाले की टेकू चे काम संपले !!
  कुबड्यांच काही पटल नाही … कारण तूम्हाला गरज आहे म्हणून तुम्ही त्यांना तयार केले …
  तूमची गरज संपली की त्यांना शोधत लंगडे येणारच….नाही तरी त्यांना उभे रहाण्याची गरज नाही, तुम्हीच त्यांना उभे ठेवता, कारण त्यांना सहज वाकून उचलाता येत नाहीत.
  कुबड्यां सारखे दूर्दैवी कोणी नाही… कारण गरज संपली की त्या फ़ेकल्याच जातात.अर्थात काही लोक कुब्ड्या फ़ेकूच शकत नाहीत हे अलाहीदा….

  बाकी सगळ्यांना उठाय-बसायला आधार हा लागतोच….वसूं”धरे”लाही त्याच मुळे नाव आहे…
  प्रत्यक्शात तीलाही स्थीर रहाण्याचा आधार हा फ़क्त आकर्शणाचाच. सारेच अं त राळात अ स ल्या ने
  कसला आधार आणी काय….आपल्याला जग सरळ आणी जगाला आपण सरळ दीसावे ह्यासाठी चाललेली धडपड…….

  स्वामी राजरत्नानंद

  • aruna says:

   आधार आणि तेकूत फरक आहे. आधार आपल्या माणसाकडून मिळतो किंवा घ्र्त येतो. टेकू कुठेही, सोयिस्कर रित्या वापरून मागे टाकला जातो. त्याची ओळख किंवा जवळिक असावी लागतेच असे नाही.
   ज्याची जरूर लागते तो आधार जास्त करून भावनिक असतो, शारीरिक आधार विकत पण घेता येतो. त्याचे महत्व नाही. माणूस कितीही मोठा असो, त्याला कोणाच्या न कोणाच्या आधाराची गरज असतेच. नाही म्हणणारा खॊटे बोलत असतो.

   • अरुणा
    अगदी अनील अंबानीला पण कोकिलाबेनचा आधार लागतोच.. 🙂 अगदी खरं आहे तुमचे म्हणणे.

  • राजीव
   फार शब्दशः अर्थ घेतला आहेस, म्हणून आधार टेकु च्या ्शब्दांमधे गुंतत गेला आहेस तू.

 7. एक नंबर !!!

 8. Manish says:

  नमस्कार
  एकदम मस्त लिहिलंय बोंस. एकदम जम्या carryon

 9. Nitin Pandhare says:

  मस्त लेख आहे!!! आई आणि पत्नी यांच्याबद्दलचे विश्लेषण एकदम छान!!! मला हे आता कळते आहे मागच्या महिन्यातच माझा तो आधार तुटल्यानंतर.माझा प्रेमविवाह २ वर्षापूर्वी झाला. त्यामुळे माझी आई माझ्यावर थोडीशी नाही खूपच रागावली होती.पण आता मला जाणीव होते आहे कि खरच आईचा आधार काय असतो ते
  धन्यवाद!!! छान लेख लिहिल्याबद्दल!!!
  -नितीन

 10. मंगेश पाडगावकरांच्या उदास बोध मध्ये मानसिकतेचे विश्लेषण करतात.
  “माणसे खपाट खंगलेली, आतुन आतुन भंगलेली
  अदृष्य्य दहशतीने तंगलेली , आधार नाही
  प्रत्येकास येथे हवा, कोणीतरी जबरी बुवा,
  जो काढील सार्‍या उवा, मनातल्या चिंतेच्या
  आधि म्हणे ‘जय साई’ मगच अधिकारी लाच खाई
  अजुन पकडला गेला नाही,कृपा म्हणे बाबांची
  आपण शोधायचे नाही, आपण लढायचे नाही
  आपण भिडायचे नाही, आयुष्याला
  कणा झिजुन गेला पार, शिरजोरापुढे सर्व लाचार
  बुवा नाम जपाचा उच्चार, नशा देई

 11. raj jain says:

  लेख आवडला व विचारपुर्ण पटले.

 12. jyoti says:

  खूप मस्त लेख काका आवडला आणि पटलाही …. 🙂

  Tushar says:
  पण जेव्हा दिलेल्या आधाराची कींमत मागितली जाते ना तेव्हा खुप वाईट वाटत …..++++

 13. Anonymous says:

  Lekh changla aahe… Mansik adharachi jeevanat khup garaj ahe . parntu manane (mind) pangu hota kama naye ani garju vruddha lokana AADHAR denyacha prayanta karne garjeche aahe …

  • आधार हा काही वेळापुरता असायला हवा, म्हणजे केवळ आधार ्घेतल्याने कोणी मनाने पंगू होणार नाही. डीपेंडन्सी नसावी 🙂 आधार हा कसा असाव? तर पाय घसरुन पडल्यावर , कोणी तरी हात देऊन उभं रहायला मदत केली असा.. पुढे चालायचं काम तर स्वतःलाच करायचं आहे ..

 14. Aparna says:

  खूप मस्त पोस्ट. शेवट तर अप्रतिम . त्या लिस्ट मध्ये एक मैत्रीचा आधार पण जोडून द्या 🙂

 15. SnehaL says:

  “आयुष्य म्हणजे दोन्ही कडून जळणारी मेणबत्ती”
  अप्रतिम .. 🙂

  • स्नेहल
   लहानपणी वाचलेलं वाक्य आहे ते.मनात अगदी घर करून बसलं होतं, ते आज लिहितांना आठवलं. 🙂

 16. Shradha B says:

  सगळ्या नात्यांमधे एक आईचं सोडलं तर केवळ पती-पत्नी चं नातंच असं असतं की ज्या मधे दोघंही एकमेकांना कुठल्याही स्वार्थाशिवाय आधार देत असतात……ekdam true….

 17. vaidehee says:

  khup masst…. patla. ani henkkich khara ahe ki, Ek aadhar milala ki dusra ani tyapeksha strong support shodhnyacha mansacha SWABHAV jat nai… (janar nai…)

 18. काका….त्रास तेव्हा होतो जेव्हा त्या आधाराशिवाय…चालणं कठीण होऊन बसतं…… नकळत का होईना, सर्व काही असून ही आपणंच अपंग असल्याची जाणीव जोर धरू लागते………
  आधाराच्या अधीन होणं कधीही चुकीचंच…

  • प्रसाद
   आधार हा मुद्दाम घेतला जात नाही, अगदी गरज पडलीच तर आधार घेण्यात काही हरकत नाही. इथे आपला इगो दूर ठेवायलाच हवा.

 19. अप्रतिम लेख..

  >> बरं आपण आधार शोधत असतो ही गोष्ट खरी जरी असली, तरीही इतर कोणाला ती कळू नये हीच आपली इच्छा असते. “मी स्वयंपूर्ण आहे , आणि मला कोणाचीच गरज नाही” हे ठणकावून सांगायला प्रत्येकालाच आवडतं.

  अगदी अगदी अगदी अगदी !!!

 20. Anonymous says:

  short n sweet खूप छान !
  “आयुष्य म्हणजे दोन्ही बाजूंनी जळणारी मेणबत्ती” अगदी बरोबर आहे.
  पण आधाराची कधी सवय होऊ द्यायची नाही, ती सवय मोडण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा त्रास होतो.

 21. अक्षता says:

  short n sweet खूप छान!
  “आयुष्य म्हणजे दोन्ही बाजूंनी जळणारी मेणबत्ती” अगदी योग्य उदाहरण आहे.
  मस्त मस्त मस्त 🙂

 22. Shubhalaxmi says:

  hello kaka,
  chan vatal vachun, ani aadhar card rahil tyavar pan ek post havich kaka…
  ani ho as sarvana manatal as lihita yet nahi…….
  bye tc

 23. andhale lahu says:

  Harvala aadhar

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s