स्वातंत्र्यदिन

आज पंधरा ऑगस्ट. नेहेमी प्रमाणे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून बुलेट प्रुफ काचेच्या मागे उभे राहून भाषण करतील, तिरंगा फडकवतील, जनता पण भक्ती भावाने इंडिया गेट समोर सुरु असलेली परेड पाहातील. बोफोर्स च्या तोफा, ज्यांचं नांव पण पूर्वी घेतांना राजकारणी विचार करायचे, त्याच तोफा मोठ्या दिमाखात रस्त्यावरून मिरवणुकीत सहभागी होतील.

काही नेते कुरकुर करत सकाळी उठून कुठल्या तरी संघटनेच्या , शाळांच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला जातील. तिथे लोकांना   कंटाळा येईपर्यंत मोठ   मोठी भाषणं देतील. शाळेतली मुलं मोठ्या उत्साहात इस्त्री केलेले स्वच्छ कपडे घालून ध्वजारोहण करतील. त्यांच्या  डोळ्यांमधे आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्नं असतील. 

भारतात असलेले निरनिराळे गट जसे सावरकरवादी, आंबेडकर वादी, समाजवादी, कॉंग्रेस , आणि अजून कुठला वाद सुटला असेल ते वादी, आजच्या दिवसाचं औचित्य साधून आपापल्या आयडीयल नेत्याची आठवण काढतील, त्यांचा स्वातंत्र्य संग्रामातला लढा कसा जास्त प्रखर होता हे सांगून इतर नेते कसे बोटचेप्या धोरणाचे होते हे सांगतील. काही पक्षातले नेते सध्याच्या हायकमांड मधे असलेल्या नेत्यांचे गुणगान करून फक्त आरती करण्याचेच काय ते शिल्लक ठेवतील. गल्ली बोळातले  भिकार नेते,चौका चौकात आपल्या  नेत्यांच्या फोटॊ  सोबत आपले स्वतःचे पण बॅनर लावतील.

आपल्या नेत्यांची तारीफ करतांना  स्वातंत्र्य युध्दातले जे  इतर नेते होते, ते कसे देशद्रोही होते, ह्याचा पण उहापोह केला जाईल. “काही” ( समझदार कॊ इशारा काफी है) वृत्तपत्रांमधे अशाच ब्लॉग ला प्रसिद्धी देऊन प्रस्थापित विरुद्ध “पूर्व कालीन विस्थापितांच्या” लढ्याच्या राख बसलेल्या  निखाऱ्यावर फुंकर घालून पेटवण्याचं काम इमाने इतबारे केले जाईल. वेगवेगळ्या सोशल साईट्स वर  अशाच काही कारणांसाठी खूप धुमाकुळ घातला जाईल .समाजातली दुही अजून वाढवण्याचे काम अशा साईट्स वर त्या साईटच्या मालकाच्या  नकळत  हमखास केले जाते.

कॉलजची मुलं आज सुटी म्हणून सिनेमा ,नाटकं, भटकंती प्लान करतील. आजचा दिवस केवळ एक जास्तीचा सुटीचा दिवस म्हणून तरूण तरूणी एंजॉय करतील. मला खरंच प्रश्न पडतो, ” आज म्हणजे १५ ऑ्गस्टला सुटी का दिली जाते?”

नेहेमी प्रमाणे रस्त्यावर तिरंगा झेंडे विकणाऱ्या गरीब कळकट मुलांचे झेंडे विकतांना फोटो मोबाईल ने काढून लोकं फेसबुक वगैरे सोशल साईट्स वर शेअर करतील, आणि जर भारतावर खरंच प्रेम करत असाल तर हा फोटो लाईक करा, शेअर करा म्हणून भावनिक अवाहन करतील. लोकं पण , आपण शेअर केलं नाही, किंवा लाईक केलं नाही तर देशद्रोही ठरू म्हणूनही बरेच लोकं  हे असे फोटो शेअर करतील.

रस्त्यावर विकल्या जाणारे तिरंगी झेंडे , जे आज  लोकं आपल्या  लहान मुलांच्या हातात विकत घेऊन देतील, किंवा काही स्टिकर च्या रुपात   शर्ट्स वर खिशावर लावून मिरवत  फिरतील, त्यातलेच काही उद्या तुम्हाला कचरा कुंडी मधे पडलेले दिसतील.  ध्वज म्हणजे राष्ट्राची शान आहे.जर तुम्हाला त्याचा आदर ठेवता येत नसेल, तर ते ध्वज विकत घेऊन आणि एक दिवस फडकवून  आपले बेगडी देशप्रेम दाखवू नका. तुम्ही देशप्रेमी आहात हे सिद्ध करण्यासाठी  तुम्ही तो दोन रुपयांचा ध्वज विकत घेण्याची काही आवश्यकता नाही.

ध्वज खराब झाला, फाटला, तर त्याचे  काय करायचे हे  कोणालाच माहिती नसते,  आणि मुलांचे खेळणं झाल्यावर फाटके झेंडे डस्टबिन मधे फेकले जातात. ” फाटलेला, खराब  झालेला ध्वज  एकांतात नष्ट करावा “असे ध्वजसंहीता सांगते”–   एकांतात ध्वज जाळून टाकणे हा अपराध नाही हे लक्षात ठेवा,आणि कृपया राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ देऊ नका.

गेली कित्येक वर्षं स्वातंत्र्यदिन असाच साजरा केला जातो. फक्त २००८ पासून एक फरक पडलाय, “जेल मधे कसाब , अफजल गुरु   पण वाट पहात असतील, कदाचित या ३१ डिसेंबरला पुन्हा एखादं विमान पळवून आपल्याला सोडवलं जाईल याची !”

कदाचित उद्या सकाळच्या पेपरला बातमी येईल, ” कसाब ने ’मराठी” मधे जेलच्या पहारेकऱ्याला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

मेरा भारत महान.

  

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in Uncategorized and tagged , . Bookmark the permalink.

33 Responses to स्वातंत्र्यदिन

 1. बेगडी देशप्रेम, देशप्रेमाच्या ‘४७ पासून व्याख्या बदलत आलेल्या आहेत, आजच्या परिस्थितीत सगळ्याच गोष्टी बेगडी झाल्या आहेत… काही दिवसांनी ते देशप्रेम दाखविण्या साठी देश रहाणार नाही, तेव्हा किमत कळणार… शेवटी ठेच लागल्याशिवाय शहाणपण शिकायचंच नसत आपण…

 2. बाकी काही होवो न होवो पण दुर्दैवाने शेवटचा पॅरा खरा होऊ शकतो.

 3. Tanvi says:

  अगदी अनेकांच्या मनातलं लिहीलतं महेंद्रजी….
  सिद्धार्थला पुर्ण अनूमोदन… दुदैवाने शेवटचा पॅरा खरा होऊ शकतो. 😦

  • तन्वी
   सकाळपासून ते फेसबुक वरचे झेंडे विकणाऱ्या मुलांचे फोटॊ पाहून डोकं खराब झालं होतं, म्हणून हा लेख लिहिला. तो मराठी शिकतोय ही मिडीयाची बातमी झाली होती, चांगली पहिल्या पानावर होती, म्हणून ते शेवटचं वाक्य!

  • तन्वी
   दुर्दैवाने ते खरे होईल असे मला पण वाटते, आता नाही, तर कदाचित दोन वर्षानी नक्कीच..

 4. aruna says:

  सगळंच १०० टक्के सत्य आणि काळजी करायला लावणारे!
  बारताचे झेंडे विकून चीन पैसा कमावतोय!!!!!!!!

 5. हतबलता.. निव्वळ हतबलता !! 😦

 6. M. P. Kulkarni says:

  कॉलजची मुलं आज सुटी म्हणून सिनेमा ,नाटकं, भटकंती प्लान करतील. आजचा दिवस केवळ एक जास्तीचा सुटीचा दिवस म्हणून तरूण तरूणी एंजॉय करतील. मला खरंच प्रश्न पडतो, ” आज म्हणजे १५ ऑ्गस्टला सुटी का दिली जाते?” …. i and my husband, we are very agree with this point.

 7. विश्वनाथ says:

  फाटलेला, खराब झालेला ध्वज एकांतात नष्ट करावा “असे ध्वजसंहीता सांगते”. एकांतात ध्वज जाळून टाकणे हा अपराध नाही.
  — हे आजही बऱ्याच लोकांना माहित नाही, सांगितल्या बद्दल धन्यवाद.

 8. ShabdMarathi says:

  समस्या ह्या प्रत्येक काळात होत्या तशा आजही! पण आज फक्त समस्यावरच चर्चा होताना दिसते त्यावर पर्याय काय ह्यावर कदाचितच बोललं जातं. प्रत्येकाने खऱ्या अर्थाने साक्षर होणे गरजेचे इतकेच

  • शब्दमराठी,
   ब्लॉग वर स्वागत. समस्या आहेत हे मान्य केल्याशिवाय त्यांचे समाधान कसे काय शोधता येईल?

 9. सिद्धार्थला पुर्ण अनूमोदन… दुदैवाने शेवटचा पॅरा खरा होऊ शकतो.

  • श्रद्धा
   अहो काही दिवसापूर्वी बातमी होती, म्हणे कसाब मराठी शिकतोय…. म्हणून तो शेवटचा पॅरा.

 10. Manish says:

  नमस्कार,
  हे तुम्ही बोचरे सत्य लिहिले आहे. याचे कारण आहे कि आपल्याला या स्वातंत्राची किंमत नाही. मी कुठतरी वाचले होते कि जोपर्यंत स्वातंत्र्यासाठी रक्तह सांडले जात नाही तोपर्यंत त्याची किंमत काळात नाही. गांधीजीच्या अहिंसक मार्गाने मिळालेल्या स्वातंत्र्याला काय किंमत असणार आहे किवा काय किंमत आहे हे आपण रोज अनुभवतो बघतो आहे. माझ्हाकडे नेटवरून कॉप्य केलेले के ppt आहे. त्यात गांधी चा पूर्ण इतिहास आहे. तुमचा e मैल ईद द्या मी pathvato tumhala.
  Manish

  • मनिष
   माझा इ मेल आहे. kbmahendra@gmail.com

  • Pradeep says:

   मनीष,
   गांधींच्या अहिंसक आंदोलनाने भारताला स्वातंत्र्य मिळाले हे धडधडीत खोटे आहे.
   जर का दुसरे महायुद्ध झालं नसतं, जर का त्यावेळच्या भारतीय सशस्त्र दलांनी उठाव केला नसता, तर आज सुद्धा आपण अहिंसेचे तून तून वाजवत फिरलो असतो.
   मी गेली ४ वर्षे इंग्लंड मध्ये राहतोय आणि कामानिमित्त इकडे बऱ्याच नेटिव लोकांशी बोलणं होतं ज्यांचं वय आता ६० च्या पलीकडे आहे.
   मला वाटतं कि भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळण्यामध्ये गांधींपेक्षा जास्त सहभाग अडोल्फ हिटलर, क्लेमेंट atlee आणि आय्सेन्होवर ह्यांचा होता.
   १. हिटलर ने दुसरं महायुद्ध सुरु करून इंग्लंडला धुळीस मिळवलं नसतं तर?
   २. महायुद्धामध्ये चांगली कामगिरी केलेला परंतु भारतीयांबद्दल कमालीचा racist असलेला चर्चिल जाऊन मवाळ Atlee आला नसता तर? चर्चिल ने colonies ना स्वातंत्र्य द्यायला कधीच पाठींबा दिला नव्हता. खरं तर भारतीयांची स्वतः सरकार चालवण्याची लायकी नाही आणि गोऱ्या वंशाला बाकीच्या वंशांवर राज्य करण्याची देवाज्ञा आहे अशी चर्चिल ची मते होती.
   ३. महायुद्धात सगळ्यात कमी नुकसान झालेली आणि सर्वात मोठी महासत्ता होवू पाहणारी अमेरिकाला इंग्लंड चे सर्वदूर पसरलेले राज्य संपविण्याची हि नामी संधी होती.
   भुइसपाट झालेल्या युरोपला मार्शल प्लान च्या आधारे भरभक्कम कर्ज देऊन अमेरिकन दबावाखाली सर्व युरोपिअन देशांना अमेरिकेने colonies सोडायला भाग पाडलं. भारताबरोबर आशिया आणि आफ्रिका मध्ये बरीच राष्ट्रे स्वतंत्र झाली. ते सुद्धा गांधीन्मुलेच का?
   आजही म्हाताऱ्या इंग्लिश, फ्रेंच आणि डच लोकांपुढे अमेरिकेबद्दल चांगलं बोललं तर ते चवताळून उठतात! कारण अमेरिकेने आपल्या हक्काच्या colonies काढून घेतल्या हि सल त्यांच्या मनात अजूनही आहे.
   खरं तर अमेरिकेला colonies चा मॉडेल संपवून Client स्टेट (जसं जपान, जर्मनी वगैरे देश – ज्यांच्या economies भक्कम आहेत पण त्या देशात अजूनही अमेरिकाचे सैन्य आहे) मॉडेल आणायचं होतं आणि त्यांनी ते आणलाही.
   ह्या सगळ्यात गांधी कुठे होते? खरं तर कुठेच नव्हते. १९४४-४५ नंतर गांधीना स्वातंत्र्य लढ्यात फारसा स्थान नव्हतं. नेहरूंसारख्या चाणाक्ष नेत्यांना स्वातंत्र्य मिळणार ह्यची चाहूल लागलीच होती पण नौदलाचा उठाव आणि त्यानंतर वायुसेनेने आंदोलकांवर गोळीबार न करण्याचा निर्णय ह्यामुळेच इंग्लंड ला भारत लवकर सोडावा लागला. जर ह्या ३-४ कारणांपैकी एक दोन जरी घडले नसते तर आज आपण brown साहेबां ऐवजी (आणि इटलिअन मादाम ऐवजी) गोऱ्या साहेबांच्या हाताखालीच राहिलो असतो.
   १९४७ ला एकाच झालं – भारतावर राज्य करणाऱ्यांचा रंग गोऱ्या ऐवजी Brown झाला. बाकी क्रूरपणा, corruption आणि देशाला लुताण्यामध्ये फारसा फरक पडलेला नाही.

 11. bolMJ says:

  Ekdam barobar ahe…

 12. Suhas Adhav says:

  sagli satya paristhiti aahe …..ek dam barober …..pan ek goshta prakashane janavte …te mhanje fakta hyana dosh deun fayda nahi …..aaj chya tarunanchya manat aapan samajacha kahi dena lagto hi bhavna jagavna khup garjecha aahe ….aaj college madhye group madhye timepass aastana kadhi aasha vishayavar bola tar mhantat ..” bhai aap mahan ho, aapan dusra kahi bolu”…..garaj aahe ti system madhye utrun tyacha bhag banun ti swacha karaychi…..kharach jasa terrorist lok aatank vadi tayar karu shaktat ….tar ek shikshak– sujan aasa ,pramanik ani swatachya deshashi nishtha aaslela uvak ka nahi ghadau shakat ……aasa jhala tar deshachya kiti tari samasya aapoaap sut til ……pan shevatchi ol khari hounaye aasa vatat aasel tar rajkiya shketrat kranti yena far garjechach aahe….

  • pranita says:

   khar ahe… i agree with this… ajchi tarun pidhi ji ki deshach bhavishya ahe tich yakade durlaksh kartana disat ahe… as hot rahil tar BHARAT MAHASATTA 2020, he dr.kalam ch dream apurn rahil…..

 13. arunaerande says:

  pradeep has nailed it correctly. all the circumstances together were responsible for India getting its independance.

 14. swapnil mahadik says:

  kharach jo khara himdustani aasel to next time he lakshat thewel………..

 15. Sir maaje naav Pramod sutar ….
  sir me sudha khudd ek pravakta ahe.
  mala tumachi sarv lekh aavadali ….sir tumacha ha ullekhaniy pravas asach pudhe chalu rahude….

  Sir aamhala sudha etihaas tevadha ky mahiti nahi .tumhi asach aamhala help kela tar khup aabhar hotil……

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s