एका लग्नाची दुसरी गोष्ट

चांगल्या मराठी मालिकांची कमतरता आहे हे कोणीही मान्य करेल, आणि म्हणूनच लोकं टोरंट वरून डाउनलोड करून इंग्रजी मालिका पहातात.हल्ली मराठी   मालिकेमधून जे काही   दाखवले जाते   त्याच्या जाहिराती मधे एकमेकांच्या कानाखाली खाड कन आवाज करणारी  पात्रं नेहेमीच दाखवली जातात. त्यामुळे बऱ्याच लोकांनी  मराठी चॅनल्स पहाणे पण बंद केले होते- मी पण त्यातलाच! अर्थात एमएम जीजी (म्युझिक मस्ती गप्पा गाणी) हा अपवाद.

काही महिन्यापूर्वी पार्ल्याला मॅजेस्टीक गप्पांचा कार्यक्रम झाला , त्या मधे  एका लग्नाची दुसरी गोष्ट चे डायरेक्टर   राजवाडे पण आले होते.त्यांची झी टीव्ही वरची कुठली तरी एक मालिका नुकतीच संपली होती. ( मी टॊरंट वाला असल्याने शक्यतो मराठी मालिकांच्या वाटेला जात नाही.) तिथे त्यांनी मान्य पण केलं की जी चूक असंभव मधे झाली, ती आता पुन्हा होऊ देणार नाही, आणि ही जी नवीन मालिका आम्ही सुरु करित आहोत, ती आम्ही बरोबर १२०-३० भागात संपवु. राजवाडेंच्या या आश्वासनावर विश्वास ठेऊन ही मालिका पहाणे सुरु केले. तशीही सौ. मुक्ता बर्वेची फॅन असल्यामूळे तिची मालिका पहाणारच ही काळ्या दगडावरची रेष !

सुरुवात तर अगदी उत्कंठापूर्ण केली होती या मालिकेची. घना- राधा ही दोन्ही पात्रं एकदम त्यांच्या रोलसाठी बिलकुल पर्फेक्ट  म्हणायला हवी. “आमचं वेगळंच आहे” म्हणत सुरुवात झालेली मालिका सुरुवातीला तर खूप मनात भरली होती, अगदी मी  स्वतः मराठी मालिका न पहाणारा पण आवर्जून ठराविक वेळेला  टिव्ही समोर बसायला तयार व्हायचो. काही दिवस बरं चाललं होतं .

लवकरच मूळ कथानकाला फाटे फुटणं सुरु झालं, एक नवीन व्यक्तीरेखा या सिरियल मधे आली, तो कोण असेल बरं ? हा सस्पेन्स फारच थोडे दिवस  टिकला, ( प्रेक्षक पण लै हुश्शार, त्यांनी पण आधिच ओळखलं होतं की आजी का बरं पुण्याला गेल्या ते !) पण नंतर लवकरच तो सस्पेन्स  संपला ऑफिशिअली संपवला गेला, आणि सिरियल ने राम म्हणायला सुरुवात केली.

खरं तर तेंव्हाच ही सिरियल संपायला हवी होती, पण टीआरपी च्या जोरावर, उगाच खेचायची म्हणून काहीही दाखवणे सुरु केले . एकदम फालतू जाहीराती (आइस्क्रिम, हेअर डाय वगैरे) कथानकात घुसडून  आपण पै्शा साठी आपल्या व्यवसायाशी पण प्रामाणिक राहू शकत नाही,  हे दाखवून दिल्या गेले.   बौद्धिक दिवाळखोरी लेखक दिग्दर्शकाने जाहीर करण्याचा प्रयत्न  म्हणायचा का ह्याला?? कारण, इतका मूर्खपणा कधीच पाहिला नव्हता, पैशासाठी काही पण हेच एक ब्रिद वाक्य  असावे प्रोड्युसर डायरेक्टरचे.

तसं म्हटलं, तर या सिरियल मधे स्पृहा जोशी ला पहाणं हा सुरुवातीला निर्भेळ आनंद होता, पण काही दिवसानंतर म्हणजे गेला महिनाभर,   तिचा अभिनय  पण भोळसट पणा पेक्षा ……असो! तसेच विनय आपटे, मोहन जोशी, आसावरी जोशी वगैरे सगळ्यांचीच कामं आपापल्या जागी ठिक आहेत, फक्त वाढवलेल्या एपीसोड मुळे  सगळेच जण थोडे डोक्यात जायला लागले होते.

इतकं जरी झालं, तरीही या सिरियलने सुरुवातीच्या काळात चांगली करमणूक केली हे मात्र नाकारता येत नाही. मुक्ता  एक गुणी अभिनेत्री आहे यात संशयच नाही, आणि तिनेही नेहेमीप्रमाणेच छानच अभिनय केलेला आहे, पण गेल्या काही दिवसापासून तिचा अभिनय पण फारच प्रेडिक्टेबल होत चाललाय.

कालचा एपीसोड म्हणजे लेखक दिग्दर्शकाच्या मानसिक गोंधळाचा अत्युच्च बिंदू होता. ह्या सिरियलचा मुख्य मुद्दा असा की घना ला अमेरिकेला जायचं आहे, त्या साठी तो काहीही करू शकतो. कालच्या एपीसोड मधे तर त्याने अमेरिकेला जाण्यासाठी घटस्फोट घेणार आहे हे पण आपल्या बॉस ला सांगितले. म्हणजे या बिंदूवर त्या राधापेक्षा अमेरिका महत्त्वाची वाटत होती. पण दुसऱ्याच क्षणी जेंव्हा बॉस म्हणतो, की तुला इथेच म्हणजे भारतात पॅकेज दिलं तर?? आणि दुसऱ्याच क्षणी तो पटकन तयार होतो.. मला वाटतं लेखक दिग्दर्शकाला शेवट नीट करता आलेला नाही. सगळं कसं कन्फ्युजन आहे.ज्या गोष्टीवर दिडशे भागाचे कथानक  बेतले होते, ती गोष्ट एकदम कचराकुंडी मधे टाकून दिली. घना पण बॉस समोर शेवटी हात जोडून ज्या पद्धतीने दररोज माझी बायको बिरड्याची उसळ करून खाऊ घालीन म्हणाला, ते पाहून खरंच कीव आली बिचाऱ्या राजवाड्यांच्या कल्पना शक्तीची.  त्यांचीच पात्रं त्यांना नीट समजली नाही असे दिसते.

या कथेमधली सगळी पात्रं अगदी घरच्या सारखी वाटायला लागली होती- श्रीयुत गंगाधर टिपरे या सिरियल प्रमाणे.  पण दुर्दैवाने जी उंची गंगाधर टिपरे या सिरियलने गाठली होती, ती या सिरियलला गाठता आली नाही.प्रेक्षकाला मायबाप म्हणण्याची बालगंधर्वांची परंपरा होती, ती कधीच मोडीत काढल्या गेलेली आहे, आणि प्रोड्य़ुसर डायरेक्टर ने प्रेक्षकांना  गृहीत धरणे   सुरु केले आहे.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मनोरंजन and tagged , , . Bookmark the permalink.

105 Responses to एका लग्नाची दुसरी गोष्ट

 1. अगदी योग्य विश्लेषण केलयं काका..
  उगाच नको तिथे नको ते प्रकार सुरु केले त्या मालिकेमध्ये आणि त्या जाहीराती तर कहरच..
  घनाच्या कॅरॅक्टरची तर संपूर्ण विल्हेवाट लावली दिग्दर्शकाने.. त्याचं स्वप्न अमेरिका की पैसा? आणि पैसाच होता तर मग तो बायकोला घटस्फोटही द्यायला तयार होता..
  एकदम फालतु कॉन्सेप्ट !

  बाकी आपलं टोरंट जिंदाबाद:D:D:

  • दिपक,
   तेच तर म्हणतोय, काल पर्यंत एका वेगळ्याच वाटेने कथानक जात होतं, पण काल एकदमच सगळा सूर बदलला. तो स्वप्निल बॉस समोर हात जोडून उभा रहातो ते दृष्य तर अशक्य होतं! टोरंट तर बेस्टच. सध्या मी सिझन चार पहातोय हाऊस एमडी चा.. 🙂

  • swatee says:

   The initial review is perfect and the last three months were unnecessarily dragged. The end of the serial was very very immature.

 2. raj jain says:

  संपली का एकदाची 😉

 3. Anonymous says:

  🙂 kharach changli hoti serial….shevati shevati farach predictable jhali.

 4. फार काही एपिसोड पहिले नाहीत. गेला महिनाभर मात्र पहावे लागले. (घरच्यांची कृपा) कदाचीत तेव्हा पासूनच डाळीत पाणी वाढवणे चालू झाले होते. त्यामुळे हीच का ती मालिका जिच्या बद्दल इतकं कौतुक ऐकत होतो? असा प्रश्न पडला होता.
  असो आता उलगडा झाला. धन्स. 🙂

 5. Tanvi says:

  संपुर्ण पोस्ट पटली महेंद्रजी… राजवाडे-मांडलेकर जोडीचे हे नेहेमीचे झालेय आता, मालिका बरी सुरू असताना शेवट कंटाळा येइल इतपत ताणायचा….
  एलदूगो मी गेल्या तीन महिन्यांपासून पहायला सुरूवात केलीये (आजारपण आल्यामूळे वेळ घालवायला हल्ली मी भरपुर टिव्ही पहाते 🙂 ) …. नको झालाय पण आता हा प्रकार…. त्या घनाला अमेरिकेला न पाठवण्याचं त्याच्या बॉसनी सांगितलेलं अतर्क्य कारण, मधेच केलेली गार्नियरची जाहिरात सगळचं अशक्य आवरा 🙂 😦

  • तन्वी
   आमच्या कडे रतीब लागला होता या सिरियलचा. पण तरीही ठिक आहे, त्या मिठाईवाल्या सिरियल पेक्षा बरी म्हणायची!

 6. pravin says:

  kharach m shevti shevti hyani ase karyla nako hote ! eka chnglya malikeche hyani shevtala vaet karun thevle

  • प्रविण
   एक लहानशी सुंदर प्रेमकथा होती, तिला किती मोठं करू शकणार होते ते? बरेचसे लुझ एंड्स तसेच सोडले आहेत. असो.

 7. डेली सोप नावाच्या प्रकाराला मी नेहमी फाट्यावर मारतो. टिपरे, ४०५ आनंदवन, प्रपंच… अश्या सिरिअल्स ने एक वेगळी उंची दिली आहे, आणि आता ती कोणालाही गाठता येणार नाही हेही निश्चित. 🙂 🙂

  • Anagha says:

   टिपरे, ४०५ आनंदवन, प्रपंच आणि झोका. कोणीतरी गोड्बोलेकाकाना त्यांच्या जुन्या चांगल्या सीरिअल दाखवा बरे पुन्हा, स्वत;च्या जुन्या चांगल्या सीरिअल पाहून कदाचित चांगली एखादी बनवावीशी वाटेल त्यांना!

 8. Anagha says:

  खरंच कहरच….गेले दोन आठवडे काय वाटेल ते दाखवत आहेत. अतिरेक! वर्षभर मी घरातून टी. व्ही. ला हद्दपार केलं होता ते किती छान होतं. सुखी दिवस होते ते, गेले ४ महिनेच मी ती सीरिअल पहिली… फार इच्छा होती त्या राजावाडेला एकदा आय. टी. इंडस्ट्री कशी असते ते नेऊन दाखवायची, काही ही दाखवतात……..
  पुन्हा टी. व्ही काढूनच टाकावा म्हणते….कारण बंद होणाऱ्याच्या जागी तर अजूनच भयंकर कथा (कथानक नसलेल्या?) असलेल्या दोन येणार असे दिसते.

  • अनघा,
   म्हणजे काय , नवीन सिरियल्स पहाण्याचा उत्साह अजूनही शिल्लक आहे तर?? बापरे , माझा तर कानाला खडा, या पुढे आपलं टॊरंट बरं आणि आपण बरं. सुट्स चा दुसरा सिझन संपत आलाय, तो पहायचाय आता.

 9. anaghan says:

  मला वाटतं थोडी गडबड होतेय…घना राजीनामा देतो आणि त्यानंतर त्याचे साहेब त्याला अमेरिकेइतकेच पॅकेज मुंबईत देऊ करतात.
  थोडी एडिटिंगची गडबड मला देखील वाटली…तितकंसं स्पष्ट नाही झालं हे.
  🙂

  • Hemant says:

   Namaskar. Blog vachun episode baghitala. Ghana aadhi rajinama deto aani tyach velela he pan sangto ki tyacha ghrachyanvar khup prem aahe (including Radha). Tyachananatar tyache saheb tyala tichkyach package offer India madhe kaam karnyasathi offer kartat.

   • हेमंत
    शेवट बऱ्याच प्रकारे करता आला असता, पण लेखकाचा गोंधळले पणा दिसुन येतोय ..त्यालाच कसं काय आवरावं हे समजलं नसावं.

  • शेवट करायचा म्हणून गुंडाळलंय . काहीही विचार न करता शेवट केला गेला आहे. घनाचं अमेरिकेच स्वप्न, ज्या साठी तो डिव्होर्स द्यायला तयार झाला असतो, तो कसा काय पैशाकडे बघून जाणं कॅन्सल करतो? सगळं काही कनफ्युजन आहे .

 10. Vishal Dhadge says:

  namskar kaka, pan aapan kahihi mhanalo tari survatila hi mahila etar suru asalelya malikanpeksha vegalich hoti & mhanunch ti lakshvedhi hoti he manya karaylach have na…. malikeche tital song madhech dhakhvlele surprising song ‘tuzya vina’ tyamule marathi malikanmadhehi thodasa vegla prayog pahayla bhetala…
  & mala nahi vatat maliket dadhavleli friendly family punha kuthe pahayla bhetel, shevti ti kalpanik familych ahe hehi visarata yenar nahi.. 🙂

  shevat kahihi zala tari – I’ll miss this serial….

  • विशाल
   बरेच लोकं मिस करतील, कारण रोजच्या संध्याकाळच्या हॅपी फॅमिली टाइम ची सोबतीण होती ही मालिका..

 11. snehal sanas says:

  hmm…sarvat adhi…blogcha lekhakahi gondhalalela aahe..mhanje tyala nemaka kautuk karaychay ki tika…he kalla nahi….aso…….kasa ahe chagala aani kaltmak kaam …..vyavasayik pathabalashivay aaplyaparyant pochu shakat nahii…tyamule ice-cream aani hair bran vagaire….I am ok with it……rahila prashan kathecha….serial suru jhali tevhapasunach katha kahi far unpredictable navhatich….pan ticha sadarikaran atishay uccha darjacha hota aani te ajunahi ahe….mala farshya TV serials aathavat nahit jyanni ‘daily soap’ sathi ek sampurna navin sumadhur gaana compose karun ….tyala swatantra shoot karun dakhavalay…pan ELDG cha tuzyavina ek shravaniya anubhav ahe….cinematali gaani udharivar gheun serial cha special episode banvanare khup ahet….pan ELDG tyatali nahi…..hyavarun SR aani team ELDG la tyanchya audinace baddal kiti aadar ahe he sujan mansala kalata…..mala hya showne khup khup entertain kelay…aani me pudhe kadhihi ha show parat baghu shakate….jara mothi jhali ka reaction….aso…..ELDG ha ek sukhad anubhav ahe aani asel!!!

  • Snehal, मॅडम तुम्ही या मालिकेच्या स्वतंत्र गाण्याबद्दल बोलताय???
   मालिकेच्या पहिल्या पहिल्या भागात हे लोक शहारुख ची गाणी बॅकग्राउंडला वाजवत होते.
   त्यांच्या फेसबुकच्या पेजवर जाउन मी विचारणा केली,…की, मराठीमध्ये रोमँटीक गाणीच नाहीत का?
   तसंच ते पहिलं पोस्टर होतं ते “The Ghsost OF My Girlfriend’s Past” या इंग्लिश चित्रपटावरुन जसंच्या तसं कॉपी केलं होतं.
   असो.. मालिका पहिल्यापासुन खरंच छान होती पण नंअतर साफ गुंडाळली //

 12. Quit it.. Let’s be happy with our Dexter, Suits, BBT :))

 13. shubha says:

  IT madhye kam karnare jar birdyachya uslivr aplya boss war chap padat astil tar wa….he jara atich zal…ani tyat package ..wa wa kya bat hai

  • शुभा,
   खरच अशक्य दाखवतात काही तरी. शेवटी घनाला जेंव्हा युएस मधलं पॅकेज भारतात ऑफर केल्यावर त्याची अ‍ॅक्टींग एखाद्या भिकाऱ्याच्या ताटात लाडू टाकल्यावर जशी त्या भिकाऱ्याची असते तशी होती. अगदी डायलॉग सुद्धा तसेच भिकाऱ्या सारखेच.

 14. दिपक says:

  काका एकदम मनातले बोललात. सुरवातीला ही सिरियल प्रचंड आवडली होती. उगाच कर्णकर्कश बॅकग्रांऊड संगीत नाही. आडव तिडवे कॅमेरा फिरवुन घेतलेले क्लोझअप नाहीत. सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे प्रत्येक सिन हे मोठे मोठे शूट केले होते. ’राधा, घना, ज्ञाना, कुहू पासुन मानव पर्यंत सगळ्या कॅरेक्टरने प्रेक्षकांच्या मनात घर करायला सुरुवात केली होती. ही सिरियल आता ’प्रपंच’ आणि गंगाधर टिपरे’ सारखी होणार असे वाटले होते. पण गेल्या महिन्यापासुन उतरती कळा लागली. आयस्क्रिम ची जाहिरात एका एपीसोडमध्ये केली तेव्हाच ती डोक्यात गेली. अगदी तुम्ही म्हणतात तसे किव आली.

  • दिपक
   त्या भिकारड्यांनी शेवटल्या एपीसोड मधे पण गार्नियरची जाहिरात दाखवलीच. खरंच एकदाची संपली ते बरं झालं असं वाटायला लागलंय..

 15. पात्रांमाधला मानसिक-भावनिक कल्लोळाने तर कळस गाठला होता अगदी. सुरुवातीला एवढी छान पकड घेतली होती पण शेवटी ‘हम नही सुधरेंगे’ चा नारा. पण वचनाप्रमाणे राजवाडेनी थोडक्यात संपवली हे एक बरे झाले.

  • श्रध्दा ,
   तरीही दिड महिना खेचली सिरियल.. सहनशक्तीचा अंत होण्यापूर्वी संपवली हे बरं केलं..

 16. मी देखील राधा आणि घनाच्या लग्नापर्यंत आवर्जून ही मालिका पाहिली पण नंतर पुन्हा हाफिसातला ताप बरा वाटू लागला.

  बाकी अमेरिकेतील पॅकेज भारतात घेणे हे फक्त रजनीच्या बाबतीत शक्य आहे. घनाच्या बाबतीत हे आवरा आहे…

 17. १००% पटलं काका…!! सुरुवातीला एवढी अप्रतिम Star Cast आणि अगदी त्यांना साजेलसे रोल घेऊन सुरु झालेली ही Serial…हल्ली हल्ली खरच डोक्यात जाऊ लागली होती… गोष्टी उगा..च…रबरासारख्या ताणल्या जात होत्या .. Specially आज्जीचं कॅरेक्टर भलतंच आवडलं होतं सुरुवातीला.. पण गेल्याकाही दिवसात सीरिअल खरच.. ‘राम’ हरवून बसली.. त्या उमेश कामत ची Entry & Exit अजून ही प्रश्नचिन्हातच आहे..त्यात त्या Ice-cream & Beauty Products चा Promotion म्हणजे तर कहरचं!! बरं झालं Finally बंद होतेय Serial ते…………….

  • प्रसाद,
   रेखा कामत ह्याच काय त्या सिरियल मधला एक दिलासा होत्या. त्यांचं प्रसन्न अस्तित्त्व खरंच छान वाटायचं पडद्यावरचं.

 18. Seeya K says:

  Kaka tumcha lekh khup chaan aahe..
  The points you mentioned are very true.. I stopped watching the maalika when I realised it was getting dragged from all the sides… 🙂

  • सीया
   मोह सोडता आला पाहिजे, पण सर्वसाधारण लोकांच्या बाबतीत हे शक्य होत नाही. इतके एपीसोड्स पाहिलेले असतात, की मग शेवट काय असेल ह्याची उत्सुकता असतेच, आणि मग सगळेच भाग पाहिले जातात. याचाच गैर फायदा डायरेक्टर घेतो.

 19. Anonymous says:

  या serial चा शेवट अजिबात जमला नाहीये. आदल्या दिवशी घना अमेरिकेला जाण्यासाठी राधाला divorce द्यायला तयार असतो. एका दिवसात त्याला राधा आवडायला लागते कि काय… काहीही दाखवतात हे लोक… त्याचं आयुष्यभराच स्वप्न असं एका दिवसात बदलेल काय? मला तर वाटत होतं कि त्याचा बॉस राधाबरोबर त्याला US ला पाठवेल एका प्रोजेक्ट्पुरता..

  • Anagha says:

   malahi asach watat hota…..jya padhatine “Atyane” boss kade fielding lavalee asavi te pahun…..boss sangel ” Ghana, Company tula U.S. la pathavannar ani te suddha Radhasah” ….kadachit ha shevat jast changala watala asata.

   • Anonymous says:

    aho pan radha la US la jaychach navhta…tila ghanasaha sasarchya lokanbarobar bharatat rahayacha hota mhanun tar haa gondhal zaala na…ghana che swapna he phakta Americach hote aani tyasaathi to wattel te karayala tayar hota…hyamulech radha jari tyachya premat padali aani tila sasarcha jivhala hawe asuanahi divorceshivay tichyakade dusra paryay urala navhta.

    Ghana ti awadat asunahi to kuthalach nirnay gheu shakat navhta kaaran tyala phakta americach disat hoti…mag jari tyachya boss ne tyala radhala gheun US la projectsaathi jaa asa saangitla asta tari tyacha pariwar aani radha tayar zaale naste kaarana pariwarala hi bheeti ki to udya america hya deshat gela tar tikadcha houn rahil..aani radha la hi nako hota..

    shevat titkasa jamla nasla tari serial hi mala tari khup aawadli…gelya ek don athavdyat thodi jastach kantalwaani zaali hoti pan thik aahe nehamichya saas-bahu serials peksha he nakkich wegla hota

  • मला पण हेच खटकलं.. गेला एक महिना तर नुसता छळवाद मांडला होता. एका एपीसोड मधे राधा घरीजाते, आणि मग कॉफी घेऊन घरी जायचं असा काहीसा सिन होता- तो चक्क १० मिनिटे दाखवला..

 20. Sheldon Cooper says:

  अगदी मनातलं बोललात काका. मी पण यामुळेच torrent वाला झालोय. सुरुवातीला वाटलेलं की ही तरी serial चांगली असेल निदान रडारड नसेल. पण इथेही तेच चालू झाल्यावर मी तर सोडूनच दिली बघायची. आठवड्यातून एक एपिसोड बघायचा तोही जेवताना काहीतरी हवं डोळ्यासमोर म्हणून.आणि तो बघताना घरातल्यांना विचारायचं की काय काय आठवड्यात झालं रडारड सोडून. आणि मग त्यांनाही २ मिनिटात स्टोरी सांगताना कळायचं की अरेच्चा इथे तर काही झालंच नाही. हल्ली तर तीच तीच background music ऐकून serial च्या जाहिराती लागल्या तरी मी बदलतो. खासकरून ती तू तिथं मी. तिचा मी एक भाग सुद्धा पूर्ण बघू शकलो नाही. अरे जीव देईल एखादा ती सेरीअल सहन न झाल्यामुळे.

  • अभिषेक says:

   काका अहो आख्खा शेल्डन कूपर चा रिप्लाय आलाय! राधा-घनाची जोडी किती फेमस आहे बघा!
   🙂 ह्.घे.!

  • मला पण सुरुवातीला बरी वाटली होती. 🙂
   मी सध्या इतर कुठलीही सिरियल बघत नाही, फक्त मास्टर शेफ, आणि टीएलसी पहातो. 🙂

 21. आल्हाद alias Alhad says:

  विंग्लीश सिरीयल्स सारखी सीझन्सची सिस्टीम यायला हवी आपल्याकडे पण… टिपरे, वरचा क्लास वगैरे सिरीयल्स ना खूपच सूट करेल. महिनाभर दाखवून बंद करायची. पुढच्या वर्षी पुढचा सीझन… खूप डायनॅमिसिटी येईल अशाने. 🙂

  • आल्हाद
   आपल्याकडे वर्षानुवर्ष सिरियल्स चालत असतात. काही सिरियल्स तर चार पाच वर्ष पण चालल्या आहेत.
   तुझी आयडीय़ा सहज चालू शकेल, पण त्या साठी प्रत्येक एपीसोड स्वतंत्र असूनही सिरियलचा भाग असायला हवा.. बिबिटी प्रमाणे, म्हणजे मधले एक दोन भाग सुटले तरीही चालतं.

   • आल्हाद alias Alhad says:

    करेक्ट बिबिटी प्रमाणेच. म्हणूनच टिपरेचं उदाहरण घेतलं… 🙂

 22. Prasad Patil says:

  काका,अगदी मनातल लिहिलंय.मी ही सुरुवातीला ह्या मालिकेचा मोठा चाहता होतो.सध्या फार विरस होतो.मालिकेत जाहिरात केल्याने तर फारच अप-सेट झालोय.असो!
  काका,मागच्या वर्षभरापासून तुमचे ब्लॉग-पोस्ट करणे थोडे कमी झालंय…मागच्या महिन्यात तर एकच पोस्ट होत.काही विशेष कारण? तब्येत ठीक आहे ना? ह्या महिन्यात त्या मानाने खूप वाचयला मिळाले…काका,कृपया आमच्यासाठी लिहित जा.

  • प्रसाद
   हल्ली कामामुळे लिहीणे कमी केले होते. मागचा महिना खूप जास्त बिझी गेला, म्हणून काही लिहीणे झाले नाही .

 23. पेनी says:

  सगळ्या सिरीयल्स की नाई आमच्या बिबिटीसारख्याच पाहिजेत, हो क्की नाई रे लेनर्ड?

 24. सहमत
  मी काही डाऊनलोड च्या भानगडीत पडत नाही.इंग्रजी मालिका थेट ऑन लाईन पाहतो
  सध्या फ्रिंज मालिका पाहत आहे. मात्र ती केट सोबत पाहण्या अगोदर मी एका लग्नाची दुसरी गोष्ट नक्की पाहायचो.
  आज मुंबईत भांडूप ला दातार कॉलनीत एका मजल्यावर माझे दोन्ही काका आणि आजी आजोबा राहतात. तो पूर्ण मजला जवळपास आमचा आहे. सयुक्त कुटुंब पद्धती
  मी खूपच मिस करतो.
  मात्र लेखाशी सहमत
  आपल्या माजी मैत्रिणीला आपण अमेरिकेसाठी जन्माला आलो आहे. म्हणजे धनाची खरी जागा अमेरिकेत आहे असे तिला वाटायचे.
  आणि त्यासाठी तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ह्याचा अमेरिकेचा ध्यास आणि म्हणे ह्याचे घरच्यांवर भारी प्रेम ज्याचा पान्हा त्याला साहेबांसमोर फुटतो.
  आणि तो अमेरिका नाकारतो.
  सगळाच हास्यापद.
  मात्र ह्या मालिकेने आयडी वैनुडी शब्द लोकप्रिय झाले आहेत.

  आपली मराठी ह्या वेब साईट वर त्याच दिवशी एपिसोड ऑन लाईन पाहण्याची सुविधा असल्याने मालिका सलग पहिली. एक गोसीप असे कानावर आले. की स्वप्नील ला हिंदी धारावाहिक करायची होती जिचे प्रोमो टीव्हीवर झळकले व येथे मराठी मालिका गुंडाळायला सुरवात झाली.
  पण
  मात्र टिपरे सारखी लोकप्रियता ह्या मालिकेला गाठता आली नाही हे खरे.
  प्रभावळ कर हे लेखक म्हणून ग्रेटच आहेत.
  अवांतर म्हटल्यास ताजा कलम
  आमचे वेगळच आहे.
  हे वाक्य ह्या मालिकेत येण्या अगोदर माझ्या लग्नाच्या बाबतीत मी पूर्वी म्हणायचो.
  लिव्हिंग रिलेशन शिप हे दहा वर्षापूर्वी तरी मध्यमवर्गीय समाजात मानसिक रीत्या रुजले नव्हते.
  माझ्या आंतर्राष्ट्रीय लग्नाची दुसरी गोष्ट, थोडक्यात जुन्या आठवणींना उजाळा द्यायच्या म्हणून माझ्या ब्लॉग वर लिहिणार आहे.
  असामी असामी मधील बेमट्या चा काका कीर्तनाला सुरुवात करतांना जे प्रास्ताविक करायचे तेच माझे आहे.
  एका साध्या., सरळ मराठी मुलांच्या लग्नाची बखर ( च्यायला काय भारदस्त शब्द आहे ) मी लिहिता होणार आहे. ह्याची आज काकांच्या ब्लॉग ह्याची आता अनौपचारिक घोषणा करत आहे.)

 25. Aparna says:

  मी मालिका पाहिलीच नाही आहे. खरं तर मुक्ता बर्वे आहे तेव्हा सुरू करायची असा विचार होता पण डेली सोपबरोबर माझं सूत सहसा जुळत नाही त्यामुळे पण राहिलंच. 😉
  ही पोस्ट वाचून मला किनै त्या आय टी कंपनीचा पत्ता हवाय..अमेरिकेतलं पॅकेज भारतात घेण्यासाठी 😉 ते “कहा मिलते है ऐसे दोस्त?” सारखं “कहा मिलती है ऐसी आय टी कंपनीयां?” असं म्हणावसं वाटतंय.
  नशीब बारावीवाल्यांच्या अ‍ॅडमिशन झाल्यानंतर लावलेला शोध आहे नाहीतर उगाच आय टी ब्रांच हाउसफ़ुल्ल गेली असती 😛 (आवरा)

  • अपर्णा
   अमेरिकेतून भारतात परत यायचा विचार आहे का?
   माझी पण मोठी यावर्षी बिई होते आहे, दुसरी एफई ला आह, दोघीही आयटी मधे , म्हणजे काय दोघीसांठी मलाही त्या कंपनीचे नाव लागेल.. 🙂

 26. santosh says:

  mala he serial khup awadali.

  • संतोष
   सुरुवातीला नक्कीच चांगली वाटत होती, पण नंतर मात्र सगळा गोंधळच झाला . प्रतिक्रियेसाठी आभार.

 27. Vivek Naralkar says:

  BLOG che likhan agadi barobar vatle, Rajvadechi pudhchi malika aata bghnar nahi ! shevat etka vaet karaycha hota tar to aadhi sampvaycha hota. eka Ravivari 5-7 tas mhane tich malika dakhvili,
  Mulga aaila mhanala tu ugach etke mahine vel ghalvlas ! tyana english malika ka aavdtat tyache uttar asha sarva coments mule kalto. kahi aathvde malika band honar hoti pan 4-5 episod vadhvayla sagnyat aale, ase samjte ! pan shevad etka poor ka asu shkto ? productcha jahirati
  karun Rajvadechi keev kravishi vatle, aajpasun tyanna Tata kele !!

 28. Anonymous says:

  Hi, Nice post. mala pan asa marathi blog wordpress var suru karaycha asel tar kay karava lagel ? can you please guide me in this regard ? mi ek domain register kelela aahe. Hosting package jar veglya web design compnay kadun ghetla, tar mala wordpress var tumchyasarkha blog suru karta yeil ka ? ka wordpress varach hosting ghyava lagel ? krupaya margadarshan karal ka ?
  dhanyavd !

 29. sumit says:

  Kiman satish rajawade kadhun tari hi apekasha navhati ……..

 30. anil dixit says:

  Mi tumchya blog var first time aloo ahe , asoo… Mi 1982 madhe!!! TV ghetla ani kadhi cha “Daily soap” bagitale nahi pan When ELDG chy review roja amchya office madhe “Lunch table ” var dicussus !!! hoth hota ma thoda akarashan zala ani suru keli bagagchi. Kuhp avadali ho!! Sagle character apalya roja cha sarkhe hote. Acting zabardstat except Ghanna. Day one pasun end was predicatble pan to Rajwade ne jamla nahi asoo ani ek chan serial cha END kela.

  • अनिल
   ब्लॉग वर स्वागत. डेली सोप फक्त घरातल्या स्त्रिया पहातात, म्हणून पहावे लागतात, मुद्दाम कोणी पुरुष टीव्ही लावून डेली सोप पहात नाही. पण या सिरियल ची सुरुवात तशी बरी असल्याने हा कार्यक्रम पाहिला गेला. गोष्ट प्रमाणाबाहेर ताणल्याने पचका झाला, नाही तर तशी कथा एक एम अ‍ॅंड बी च्या स्टाइल मधे ठिक होती. कदाचित एखादं एम अ‍ॅडं बी च्या पुस्तकावरुनच बेतली असावी.

 31. अनघा says:

  मला वाटतं…बाकी सगळ्या माध्यमांतून ज्यावेळी, कपट कारस्थाने, खून, चोऱ्यामाऱ्या दाखवल्या जात आहेत अशा वेळी जेव्हां एक सुखी एकत्रित कुटुंब तरुणवर्गाला बघावयास मिळते ही समाजाच्या दृष्टीने सद्य परिस्थितीत फार मोठी गोष्ट आहे.
  आणि ती ह्या मालिकेने साधली आहे. हे मी माझ्या तरुण लेकीच्या प्रतिक्रियांवरून ठामपणे सांगू शकते.
  बाकी मालिकेतून जाहिरातबाजी जी त्यांनी दोनदा केली, ती देखील ह्या एका मोठ्या फायद्यापुढे दुर्लक्षिण्याजोगी आहे असे मला वाटते.

  • anaghan says:

   आणि एक लिहायचं राहून गेलं. माझी लेक तुम्ही उल्लेखिलेल्या इंग्लिश सीरियल्स, मास्टर शेफ ऑस्ट्रेलिया, शेरलॉक होम्स सर्व देखिल तितक्याच उत्साहाने बघते. 🙂

   • खरं आहे, सगळ्याच प्रकारच्या सिरियल्स पहायला हव्या.
    त्या सिरियल्स साठी हेरंबचे खास आभार.. तोच सांगतो चांगली कुठली आहे ते., आणि मग आम्ही डाउनलोड करतो.

  • अनघा
   अगदी खरं आहे. सध्या मराठी सिरियल्स चक्क आवरा झाल्या आहेत, भडक मेकप, आणि खाड कन एकमेकाच्या कानाखाली आवाज काढणारे पात्रं! त्यातल्या त्यात हे सिरियल गंगाधर टिपरे नंतर जरा जवळचं वाटत होतं.. 🙂

 32. मिलिंद : says:

  काका –
  लेख चांगला झाला आहे.
  खरतर सीरिअल छोटी असणार आहे हे दिग्दर्शक आणि टीम ने आधीच घोषित केल्याने माझ्यासारखे खूप जण हि सीरिअल बघत होते हे नक्की.
  घना – राधा , आजी , आई -बाबा, कुहू -ज्ञाना, काका-काकू , राधा च्या घरची मंडळी हि सगळी मंडळी आपली करमणूक करत होती हे पण खरय .
  मुळात एक गोष्ट सगळ्याच दिग्दर्शकांनी लक्षात घ्यायला हवी आहे आणि ती म्हणजे जेव्हा मालिकेतल्या पात्राच्या office मधले प्रसंग दाखवता तेव्हा पात्रांच्या एकंदरीत पेशाचा अभ्यास करा.
  जर नायक software professional आहे असा दाखवता आहात तर त्याच्या बोलण्यात – वागण्यात ते उतरवा. इथे स्वप्नील जोशी बराच बरा वाटत होता. पण त्याचा manager अजूनही ‘गुंतता हृदय हे…” मधले कोट घालून दाखवून नाही चालणार. visa बद्दल बोलताना आधी B१, L1 , H1B बद्दल बोलताना दाखवा मग ‘ग्रीन कार्ड’ विषयी बोला. एखाद्याला अमेरिकेला पाठवताना किवा त्याची प्रोसेस सुरु करताना किती गुप्तता पाळली जाते? उगाच office मधले मित्र घना ला phone करून ‘अमेरिकेला जाणाऱ्या ३ जणांची नावं आज घोषित होणार आहेत मला खात्री आहे कि तुझा number लागेल ‘ असं दाखवू नका. अमेरिकेला कोणाला पाठवायचा हा बॉस साठी जरी draw असला तरी ती बाकी staff साठी काही महाराष्ट्र राज्य lotteri ची सोडत नाहीये कि आपलं लोक फोन करून सांगत आहेत “आई जगदंबेच्या कृपेनं ह्या वखताला तिकीट तुलाच लागेल बघ घना ” . software company मध्ये मैत्री कितीही झाली तरी अमेरिकेच्या मुद्द्यावर चढा ओढच असते. उगाच ‘he is a jolly good fellow …’ वगैरे कधी होत नसतं ह्या सगळ्याचा जर सतीश राजवाड्यांनी अभ्यास केला असता तर ६ महिने मस्त आवडलेली serial संपताना टीकेची धनी झाली नसती.

  बाकी सर्व छानच होतं हे नक्की . केलेल्या मनोरंजनासाठी सगळ्या team चे खूप आभार !!!

 33. महेश कुलकर्णी says:

  . सुरवातीला ही सिरियल चांगलीच होती पण नंतरचे भाग मनाला पटले नाही.इतर मालिका पेक्षा बरी म्हणावी लागेल लेख चांगला झाला आहे.गुपित जरी बाजूला ठेवले तरी शेवटचे भाग मनाला पटत नव्हते,हे नक्की

 34. shekhar says:

  agadi yogya vishleshan kele ahe .

 35. aditi says:

  mala nahi vatat ase zale ahe may be maze misunderstanding asel pan ghana ase mhanto ki tyala baghayache hote ki tyala usla jayla milate ki nahi karan every time tyala usne nakarlele asate pan hyaveles sagale nit asunhi nakarle jatey he baghun to tyachya bossla sangato ki to divorse detoy aani confirm karun gheto ki actually tasa to javu shakala asata hya veles pan tyalach ata jaychi iccha nahiye karan tyala tyachi manse havi ahet.to fakt check karato ki hyaveles chance hota tyachi capacity hoti pan tyane swatahun nako mhantale aani preference change kelay.

  • आदिती,
   ब्लॉग वर स्वागत.
   तसं असायला हवं होतं. पण मला तो शॉट आठवतो, घना म्हणतो, जर मी घटस्फोट घेतला तर?? आणि ्बॉस म्हणतो, मग नोकरी तुझीच! आणि मग हा म्हणतो मी घटस्फोट घेणार आहे.
   काही तरी मोठ्ठा घोळ करून ठेवलाय लेखकानी- स्वतः पण कन्फ्युज झालाय, आणि प्रेक्षकांना पण त्याहून जास्त कन्फ्युज करून ठेवलंय..

 36. तरुण says:

  खरं आहे काका.. आधी आधी आवडली होती सिरीयल.. पण शेवट निरर्थक लांबवला.. स्पृहाचे पात्र तर मला सुरुवातीला फारच आवडले होते, पण नंतर इतकं सगळं डोक्यात गेलं थोडक्यात आटोपलं असतं तर तुम्हा-आम्हा सारख्या लोकांचा निरर्थक जळफळाट झाला नसता.

  लेख आवडला

 37. चांगल्या विषयाचे आणि चांगल्या मालिकेचे वाटोळे केले.
  प्रोडक्ट जाहिरातीचे खूळ झी मराठीनेच डोक्यावर घेतले आहे.
  मधली सुट्टी मध्ये सुद्धा ओडोमोसची जाहिरात केली.
  खरं तर इतर सासू-सुनांच्या मालिकांत खुषक कराव्यात अशा जाहिराती. आपण पाहतच नाही त्या.
  चांगल्या कार्यक्रमात रसभंग करणे टाळावे.

 38. sagarkokne says:

  मेल-आयडी शोधण्यापेक्षा राजवाडेंना एफबी वर मेसेज पाठवा.
  https://www.facebook.com/satish.rajwade.5

 39. मुळात मालिका हा प्रकार असा आहे की रोज काही न काही दाखवावा लागतो. आज च्या काळातील तीव्र आणि गळेकापू स्पर्धा पाहता आपले प्रोडक्ट म्हणजेच आपली मालिका मागे राहू नये असे प्रत्येक दिग्दर्शकाला आणि निर्मात्याला वाटले तर त्यात चूक नाही. पण म्हणूनच त्यांनी जो हा बाजार मांडलाय मालिकांचा तो निव्वळ गल्ला भरू आहे. आपल्याकडची मालिका प्रेमी जनता पहिली की त्यांच्या फडतूस मालिका पण कशा चालतात ते टी आर पी च्या calculation वरून कळेलच.आपल्यासमोर त्या मालिका न पाहणे हा उत्तम पर्याय आहे . आपोआप टी आर पी कमी होईल आणि मालिका बंद पडतील. मी तोच मार्ग प्रामाणिक पणे अवलंबते.

  • साधना
   संध्याकाळी घरी आल्यावर काहीतरी करमणूक हवी म्हणून हल्ली वाचन वगैरे बंद झाले आहे. राहता राहिला टिव्ही, त्या मधे मग कुठली तरी टूकार हिंदी किंवा मराठी मालिका लावून ठेवली जाते.या मालिका न पाहिल्या तरीही चालूच असतात, कारण प्रत्येक मालिकेसाठी एक वेगळा क्लास टार्गेट ऑडियन्स असतो, आणि तो त्यांना मिळतोच. चांगली सिरियल लवकर संपवून दुसरी सुरु करणं यांना माहितीच नाही, कारण या डायरेक्टरला स्वतःवर विश्वस नसतो, की आपली नवीन सुरु केलेली सिरियल चालेल की नाही याचा, म्हणूनच पॉपुलर झाली, की ती सिरियल उगीच वाढवली जाते.

 40. P K Phadnis says:

  तुमचा लेख लिहून बरेच दिवस झाले आता त्यावर अभिप्राय देणे उचित आहे का ही शंका वाटते आहे तरीपण …. सीरियलची मुख्य कल्पना – कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करणे व अमेरिकेचे तिकीट हातात पडले कीं घटस्फोट घेणे – ही हास्यास्पद आहे. अगदी परस्पर संमतीने घटस्फोट घ्यायचा म्हटले तरी कमीतकमी दीड वर्ष अडकून पडावे लागेल हे सुविद्य राधेला माहीत नव्हते काय? अशी कोणती अडचण तिच्यासमोर उभी होती कीं तिने आपल्या आयुष्यातील दोन-अडीच वर्षे या विवाहात अडकणे पत्करले? हा सर्व मला आचरटपणाच वाटला होता. या मुद्द्याला कोणी स्पर्श केलेला नाही म्हणून इतक्या उशीरा लिहिले आहे. बाकी गुणावगुणांबद्दलचे अभिप्राय वाचनीय आहेत.

  • काका,
   धन्यवाद.. अहो मला पण असाच काहीसा प्रश्न पडला होता. आमचं सगळं वेगळं आहे म्हणून शेवटी सगळं काही इतरांसारखंच होतं..

 41. ni3more says:

  ekdum chan mala awadala tumcha ha artical

 42. ” दररोज माझी बायको बिरड्याची उसळ करून खाऊ घालीन ” खरय बरं, अगदी भिकार पद्धतीने हे वाक्य घुसवलं होतं .. नसता घनाला गप्पा बसायला लावला असतं तर लई बरं झालं असतं ! पण ओव्हर ऑल तसं ठीक होतं सीरिअल .. बाकी मालिकांपेक्षा तर बरंच बरं !

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s