ठाण्याचं महेश.

लोब्स्टर.

खाण्याची खरी मजा कुठे आणि कधी येते? प्रश्न अगदी सोपा असला, तरी मला अभिप्रेत असलेले उत्तर थोडे वेगळे आहे. तसं या प्रश्नाचं उत्तर अगदी काहीही असू शकतं. आणि प्रत्येकाच्या मते आपण दिलेले उत्तर बरोबर  आहे असा विश्वास पण असतो. काही  लोकं, म्हणतील, की खाण्याची खरी मजा खूप भूक लागल्यावर , तर काही लोकं म्हणतील घरी किंवा  कुठल्या तरी खास हॉटेल मधे, वगैरे वगैरे. अशी  अनेक प्रकारची निरनिराळी   उत्तरं  जरी दिली गेली, तरी  पण सगळ्यांचंच एक कॉमन उत्तर असेल,  ते  म्हणजे मित्रांसोबत  किंवा कुटुंबियांबरोबर!

माझ्या साठी ,मित्रांबरोबर मजा वेगळी , आणि फॅमिली बरोबर मजा वेगळी,  कारण मित्रांसोबत-  गेलो की नॉनव्हेज खाता येतं.  परवाच  रोहनचा इ मेला आला, की शनिवारी ठाण्याच्या महेश लंच होम मधे जेवायला ये म्हणून. आता रोहन जातोय युकेला तीन चार वर्षांसाठी, त्यामुळे हा जाण्यापूर्वीच  हा एक शनिवारी एकत्र घालवायला   म्हणून ही खास इव्हेंट ऑर्गनाईझ केली होती. तसेच त्याच दिवशी रोहनचा वाढदिवस पण होता. महेश लंच होम ( फोर्ट मधलं) माझं फेवरेट, पण ठाण्य़ातलं महेश कधी पाहिलं नव्हतं. आजचा लेख म्हणजे  त्याचं शीर्षक हवं ” आमचा हल्ला,  पुन्हा एकदा महेश लंच होम वर – मित्रांसोबत”!

हॉटेल मधे जाऊन खायचं, तर हल्ली एकट्याने गेल्यावर थोडा प्रॉब्लेमच असतो. कारण एकाच डिशचे पोर्शन्स इतके जास्त असतात, की एक डीश मागवली , की तीच संपवता संपवता जीव मेटाकुटीला येतो आणि  इतर काही मागवता, येत नाही. म्हणूनच रोहनचा मेल आला,  आणि मेल मधे इतर १६ नावं पाहिल्यावर एकदम बरं वाटलं. म्हंटलं, आता आज व्हरायटी खादाडी होणार तर!

साडेअकरा वाजता, घोडबंदर रोडचा ट्राफिक चुकवत महेश लंच होम मधे पोहोचलो, तर तिथे सगळे जण आधीच पोहोचले होते, आणि सगळ्यांच्या समोर कमी जास्त लेव्हल असलेले सोलकढी चे ग्लासेस दिसत होते. महेशची सोलकढी थोडी स्ट्रॉंग असते, पण बेस्ट अ‍ॅपीटायझर!

आम्ही जागेवर बसे पर्यंत स्टार्टर म्हणजे लॉब्स्टर घेऊन वेटर समोर आला होता. मोठ्ठा लॉब्स्टर , चायनीज स्टाइल मधे बनवलेला, डिश मधे पहुडला होता .तसा मी शेल्स ला अ‍ॅलर्जीक आहे, पण आज मात्र फारसा विचार न करता  डिश मधल्या लॉब्स्टर चा  एक तुकडा जिभेवर ठेवला, आणि क्षणात त्याच्या चवीचा गुलाम झालो.  त्याच्या ज्युसी फ्लेश ची चव,  जिभेवर रेंगाळत असतांना हलकेच  चायनीज फ्लेवर पण जिभेवर चारही बाजूने  ढुशी मारून गेले, आणि चवीच्या घोटाळ्या मधे वेगवेगळ्या चवी ओळखण्याचा खेळ  सुरु झाला.

क्लिअर सुप.लॉब्स्टर्स खाण्याची ही पहिलीच वेळ . आजपर्यंत फार तर टायगर प्रॉन्स कधी तरी खाल्ले होते एवढेच. सेनापतींनी तो पर्यंत कॅप्टनला बोलावून क्रॅब आहेत का म्हणून विचारले, आणि   तो थोड्याच वेळात  दोन जिवंत  क्रॅब घेऊन आला. जिवंत क्रॅब दाखवण्याचे कारण हे की तुम्हाला जे काही मिळणार आहे ते फ्रेश आहे याची खात्री पटायला हवी म्हणून! आता याचं काय करायचं?? करी? की सूप? की तंदुरी?? शेवटी सुप आणि तंदुरी क्रॅब ची सर्व मताने ऑर्डर दिली गेली- आणि आमच्यासाठी ( शेल अ‍ॅलर्जी वाले ) चटपटा सुरमाई कबाब आले.

तंदूरी क्रॅब

ही सगळी ऑर्डर दिल्यावर पण गप्पा सुरु होत्याच.अजिबात कोणाला घाई नव्हती लवकर जेऊन बाहेर पडायची. समोरचा सोलकढीचा ग्लास हळू हळू रिकामा होत होता. थोड्याच वेळात  वेटर हिरवे गार क्रॅब जेंव्हा पूर्ण पणे तंदूर रोस्ट झाल्यावर केशरी रंगाचे झाले होते ते घेऊन आला. या क्रॅब चं एक असतं, जास्त रोस्ट झाले की आतलं मांस कोरडं पडतं, आणि कमी वेळ ठेवला तर कच्चं रहातं- पण इथला क्रॅब अगदी पर्फेक्ट रोस्ट झालेला होता. जसा तो टेबलवर विराजमान झाला तसे  सेनापती गळ्याभोवती रुमाल बांधून आणि हातात  क्रॅब चे तुकडे करण्याचे आयुधं घेऊन तयार होते.  काड काड आवाज करत क्रॅब चे तुकडे करून प्लेट्स मधे सर्व्ह केले, आणि सगळ्यांच्या गप्पा बोलणं एकदम थांबलं. एक लहानसा तुकडा तरी खाऊन पहायची इच्छा होत होती, म्हणून समोर बसलेल्या रोहनच्या प्लेट  मधला एक लहानसा तुकडा उचलला.एक गोष्ट पक्की, की महेश मधल्या तंदूर क्रॅब  एकदम लाजबाब असतो. इथे गेल्यावर, जर शेलची अ‍ॅलर्जी नसेल  ह्या क्रॅब ला पर्याय नाही.

चटपटा सुरमाई पण अफलातून चवीची होती. मॅरिनेट केलेले बोनलेस फिशचे पिसेस, गोवनिज स्टाइल मधे रवा फ्राय केलेले होते  , जिभेवर ठेवल्यावर वेगळीच टॅंगी चव जिभेवर येत होती, आणि सोबतीला बोंबिल फ्राय ( पार्शी स्टाइल मधे नाही, तर कोंकणी स्टाइल मधे पाट्या खाली दाबून पाणी काढून मस्त पैकी कडक फ्राय केलेले ) होतेच. बोंबिलाची चव तर अप्रतिम होती.

गप्पांमध्ये किती आणि  कसा वेळ गेला तेच समजलं नाही. फोन वाजला, सौ चा फोन होता, म्हणाली, ”  घरी केंव्हा येताय? सकाळी १०-३० ला घरून गेले आहात, आता तीन वाजले आहेत ?” माझं प्रामाणिक उत्तर की जेवतोय, तर तिचा अजिबात विश्वासच बसला नाही. ” इतका वेळ??” आता   काही न बोलता फोन बंद केला.

सुरमाई गस्सी, केरळ करी अप्पम, मेन कोर्स मधे काय मागवायचं काही ठरत नव्ह्तं. खरं तर ,  स्टार्टर्स इतके जास्त झाले होते की काही फार जास्त  खाण्याची इच्छा नव्हती.  शेवटी दोन ग्रूप करून दोन वेगवेगवळ्या डीशेस ऑर्डर केल्या.  महेश मधे कुठलंही सी फुड चांगलं असतंच. पण त्यातल्या त्यात मंगलोर  हॉटेल असल्यामुळे ’फिश गस्स” ही डिश तर नक्की  ऑर्डर होतीच.  सोबतच  रावस केरळी करी  आणि ज्यो ने  प्रॉन्स करी मागवली ( जी तिला शेवटी तिच्यापर्यंत पोहोचलीच नाही)

ही ऑर्डर दिल्यावर वेळ काढायला म्हणून रोहनचा तीन किलोचा केक वेटरने समोर तुकडे करून ठेवला , आणि सहज गप्पा मारता मारता केंव्हा संपला हेच लक्षात आलं नाही. जेंव्हा रोहनने केक कापला, तेंव्हा खरंच वाटत होतं की इतका केक कोण खाणार? पण आमची खवय्यी गॅंग एकदा खायला बसल्यावर भस्म्या रोग झाल्याप्रमाणे जे काही समोर येईल ते संपवते 🙂

फिश करी सोबत नीर दोसा आणि अप्पम मागवलं होतं. इथल्या नीर दोशापेक्षा अप्पम जास्त बरं वाटलं. अप्पमचा जाळीदार जाड भाग   फिश करी मधे बुडवला की मस्त पैकी करी मधे भिजल्यावर   चवींचं युद्ध जिभेवर सुरु होत होतं.सुरमाई गस्सी म्हणजे मंगलोरी पद्धतीने शिजवलेली सुरमाई, आणि दुसरी डिश केरळा रावस म्हणजे कढीपत्ता घालून शिजवलेला रावस मासा. केरळी फिश करी किंचित आंबटसर चव असणारी , नारळाच्या दुधात बनवलेली करी  अफलातून लागते. ही केरळी करी आणि बॉइल्ड राइस एकदम बेस्ट कॉम्बीनेशन!  दोन पिसेस रावसचे, दोन पिसेस गस्सी चे आणि सोबत निर दोसा , आप्पम एवढंच खाऊ शकलो. सगळ्याच फिशची  टेस्ट छान  होती.

फिश शिजवताना  जर फिश “जस्ट पर्फेक्ट ” शिजवलेली असली तरच छान लागते. ओव्हर कुक केलेले फिश खाणं म्हणजे एक वैताग ! मला अजिबात आवडत नाही. मुंबईला बहुतेक ठिकाणी फिशचा शिजवून शिजवून  अगदी लगदा करून टाकतात. पाप्लेटच्या बाबतीत तर हे हमखास होतंच. केवळ  याच कारणासाठी मी हॉटेल मधे पाप्लेट खाणं टाळतो . तसं कधी तरी तंदूर रोस्ट पापलेट काही ठरावीक ठिकाणी खातो.

कार्मेल कस्टर्ड

इतकं सगळं खाऊन झाल्यावर पण शेवटी स्विट डिश हवीच, म्हणून कार्मेल कस्टर्ड मागवले. कस्टर्ड तर बरं होतं, पण कार्मेलायझेशन व्यवस्थित झालेले नव्हते. साखर व्यवस्थित जळलेली नसली की मजा येत नाही कार्मेल कस्टर्ड ची.

मनातल्या मनात एक पक्कं ठरवलं, की कार्मेल कस्टर्ड फक्त इराण्याकडेच खायचं!

महेश लंच होम, एक सुखद खादाडीचा अनुभव देणारी जागा. एवढंच सांगता येईल- फक्त जातांना मस्त पैकी मित्रांच्या ग्रूप मधे जा म्हणजे जास्त एंजॉय करता येईल. माझं तसं खाण्यावर थोडं जास्तच प्रेम असल्याने पोस्ट लिहितांना थोडा वहावत गेलो असेन..  🙂 बाय द वे, आम्ही सगळे १६-१७ जण एकत्र भेटलो ते सगळे ब्लॉगर्स मिट मुळे.   🙂

 

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in खाद्ययात्रा and tagged , , , , . Bookmark the permalink.

44 Responses to ठाण्याचं महेश.

 1. Pramod Mama says:

  Dear Mahendra Kaka

  Tumhi Khadya Padarthanche Ruchkar & Masaledar Warnan Etke karta ki Vachata Vachata Tondatooon Laal Galayala Lagali….& Pota Madhe Bhukecha Domb Usala Ahe..Nakkich Sunday La Mahesh Lunch Home , Pune la bhet deto…Arthat Sarv Tawal & Khadad Mitra barobar. Thanks & Utkrushta Mahiti dilya baddal Abhari Aahe. Thanks

  Pramod Mama

 2. mazejag says:

  Kaka, mi agadi ithech rahate…mazi potti swimmingla hyach club madhe aahe….mast ast ithla jevan….mahit ast tar nakki aale aste….hangout chi ani ek jaga sangu….tumhala avdel ki nahi mahit nahi…Yeoorch Exotica, Sat and Sunday la guitarist asto…service thodi slow aahe pan pavsat solid majja yete ithe….next time yal na please kalva

  • येऊर ला कधी गेलेलो नाही, पण जायला नक्की आवडेल.. :० पुढल्या वेळेस ठाण्याला आलो की नक्की आधी फोन करीन. 🙂

 3. snehal says:

  It was Mad saturday……. Mast

 4. Shubhalaxmi says:

  hello kaka gm,
  mast ahe post nehmi pramane, tumhi ithk chan varnan kel ahe ki pot-bhar jevlela manus pan punha jevel.. non veg. aslyamule vachtana thoda prblm zala pan non veg. khanaryanchya tondala nakkich pani sutel… maze frnds tar koni khadad nahit mhanun amhi baher gelyavar ashi maja yet nahi kaka… kharch maja aali post vachun…
  bye tc

  • शुभलक्ष्मी
   व्हेज खाण्यामुळे थोडे निर्बंध येतात. पण तरीही जातांना सोल्जर पेमेंट आहे हे आधीच ठरवलं की सोपं पडतं , आणि मित्र मैत्रिणी पण येतात.युजवली, बिल कोण देईल ? हा प्रश्न नसला की मित्रांसोबत मजा येते.. म्हणून सोल्जर पेमेंट म्हणतोय. पण आमची मात्र ही पार्टी रोहन कडून होती.. 🙂

 5. अनघा says:

  खादाडी आणि छान मित्रमैत्रिणींसोबत ! म्हणजे…सोलकढीबोंबीलयोग म्हणायचा ! (हे ‘दुग्धशर्करायोग’च्या धर्तीवर वाचावे ! भावना अगदी त्याच आहेत ! :p )

  • अनघा
   अगदी बरोबर..बोंबिल सोलकढी योग्य! अगदी बरोबर.. खादाडीची मजा मित्रमैत्रिणीं बरोबरच!

 6. पोस्ट वाचून सकाळी सकाळी “मांसाहारी” भावना दुखावल्या गेलेल्या आहेत याची नोंद घ्यावी 😉

  • सिद्धार्थ,
   मुंबईला आल्यास, ्दुखावलेल्या भावनांवर फुंकर घालण्यात येईल.. कधी तरी वाट वाकडी करणे ही विनंती 🙂

 7. अविस्मरणीय दिवस होता तो… खाण्याच्या बाबतीत आणि आपल्या सगळ्यांच्या भेटी बाबतीतही 🙂 🙂

  • सुहास
   नक्कीच.. मस्त दिवस गेला.आयुष्यभर सेनापतींचा हॅपीबर्थ डे विसरणार नाही आपण.. 🙂

 8. mau says:

  Wahhh wahhhh !! Mastch disatay sagal .:-)

  • उमा
   मस्त दिवस गेला.सगळे ब्लॉग बंधू एकत्र भेटले होते . मजा आली . एक अविस्मरणीय़ पार्टी होती .

 9. Poorva Kulkarni says:

  Vaw tari bare SHRAVAN sampla aahe… mast mast…Mahesh Lunch home chi add jhali…tumhi Murud janjira madhye Patil Khanavali madhe kivha Palghar madhye Fatak madam chya hotel madhye ja.. You will enjoy it….

  • पूर्वा
   पालघरला कधी जाणं होत नाही, पण कधी गेलो तर लक्षात ठेवीन. पत्ता काय आहेत ्या फाटक मॅडमचा?

 10. Archana says:

  खरंच…खूप खादाडी केली त्या दिवशी, खूप मज्जा आली…अनघाताई च्या म्हणण्याप्रमाणे अगदी ‘दुग्धशर्करायोग’ होता 🙂

  • अर्चना
   जवळपास सगळ्या प्रकारचे सी फूड एकाच दिवशी खाऊन झाले.मस्त दिवस गेला होता. एकदा फ्रेश कॅच चं प्लानिंग करू या.. 🙂

 11. Rajeev says:

  ह्या खाण्यात कसली मजा रे……थू…..
  सरकार, अधीकारी आणी राजकारणी , दलाल जातीय पूढारी यांच्या वतीने तूझा धीक्कार… धीक्कार.. धीक्कार… त्यांचे खाणे बघा.

  पोळी खावी तर दंगलीत पेटलेल्या घरांवर भाजलेली..
  बरोबर शेतकर्यांच्या मढ्याच्या टाळूवरचं लोणी फ़ासावं..
  सैनीकांच्या वीधवांच्या अश्रूंच मीठ चवीला असाव.
  सारा देश जळूदे आपण नीवांतच बसावं.

  मासे असावे नीवडणूकिंच्या गळाला फ़सलेले,
  खाणारे मीत्र असावे सर्वराजकारणी नासलेले..
  रेशनच्या धान्याची …मदीरेने व्हावे मस्त..
  पैसेखाउ कीडीला पकडणारे क्रॅब चखण्याला मीळतात स्वस्त.,

  नडलेल्या आदीवासिंची लेक…
  त्या समोर झक मारतो चोकलेट केक..
  त्यांच्याच अनूदानांची हीरव्या नोटांची चटणी ,
  आपल्या भडव्यांच्या पापडाला फ़ासावी…

  BOT ची बोटी , TOLL चा रोल,
  पो ली सां च्या JACKET चा नीधि केला गोल..
  झक मारते तूझे जेवण ,
  हा फ़क्त आमचा breakfast आहे आता बोल…..

  • राजीव
   वेगळ्याच विश्वात घेऊन गेलास..
   खरं आहे.. त्यांची बरोबरी कशी करता येईल? आणि येऊ पण नये हीच इच्छा.

 12. jyoti says:

  मस्त धमाल शनिवार होता सुपर धमाल गॅंग बरोबर ….

  आणि काका….इतकी मस्त गॅंग तुमच्यामुळेच मिळालीये मला…. 🙂 🙂

 13. मस्त पोस्ट ! सगळा दिवस धम्माल गेला..
  The Best party I ever Had in my entore Life 🙂

  • दिपक
   अगदी अगदी.. माझं पण तेच मत आहे. आज पर्यंत हजारो पार्ट्या झाल्या असतील,पण प्रत्येक वेळी ऑफिशिअल पार्टीच असायची ही पार्टी केवळ मित्रांसोबत, त्यामूळे इथे मस्त वाटलं, कुठलीच कोणाचीच काळजी न करता मस्त खायचं प्यायचं आणि एंजॉय करायचं एवढंच केलं. 🙂

 14. santosh says:

  काका कुठे आले हे महेश ?

 15. bhanasa says:

  अर्धा तास का होईना आल्याने अत्यल्प खादाडी यंजॉय करता आली. 🙂
  केक खरेच अफलातून होता. जिभेवर ठेवताच विरघळायचा. खासच ! आणि पालकसूपही झकास !

  तुम्ही सगळ्यांनी माशांचे काम जीव लावून तमाम केलेले पाहून ( प्रत्यक्ष आणि फोटूतही ) माझा जीव गपगार पडलाय ! 🙂

  • त्या माशांनी /खेकड्यांनी आपल्यासाठी जीव दिला म्ह्टल्यावर त्यांच्याकडे दुर्लक्ष करून कसे चालले असते?? पण मजा आली..

 16. आल्हाद alias Alhad says:

  पार फोर्टात जाऊन खायच्या कंटाळ्यामुळे जवळच्या जवळ ठाण्याच्याच महेश मधे गटारी साजरी केली… रावसाची मंगलोरी करी आणि नीर दोसा… स्वर्गच!
  आणि हो, सोलकढी स्ट्रॉंगच असते… 🙂 परत जायचा प्लान बनवायला हवा लवकरच.

 17. Aparna says:

  Wow. Mast mast mast aani Nishedh Nishedh Nishedh 🙂

  • अपर्णा,
   पुढल्या वेळेस आली की नक्कीजाऊ.. आम्ही तुझ्या त्या पंगत मधे पण जाऊन आलो बरं कां..(बोरीवलीच्या)

 18. वा … खुपच छान … आता एकदा जायलाच हवे ‘महेश’ मधे..

 19. काका ब्लॉगर्स मिट झक्कास झालेली दिसते, पण असे फोटो टाकत नका जाऊ हो….जीव तडफडतो उगाच…आणि गोव्याला जाऊन मार्टिन’s ची वाट पकडावीशी वाटते…btw पुण्यात काही शक्यता आहे का अश्या डिशेस मिळण्याची ?

  • पुण्याला लालन सारंग यांचं आहे ना एक हॉटेल .. मासेमारी नावाचं.. 🙂 ट्राय कर 🙂

   • मासेमारी बद्दल ऐकलं होतं…पण काही विशेष नाही असे बरेच नकारात्मक रिव्हू मिळाले, कोस्टल शॅक चे मासे जबरी आहेत असं ऐकलय..कोथरूड सिटी प्राईड जवळ आहे…भेट देऊन येतो 🙂

 20. ni3more says:

  wow kaka ekdum nice ha artical tumcha

 21. amol says:

  kaka, tumchi post pahun mala 2008 madhale diwas aathawale..mi US la 1 varsha rahun india la alo hoto ani mitranbarobar malwan la gelo hoto…mi walwantamadhun alyasarkha jewalo…majhya mitrancha jewan zalyanantar mi jawal jawal ajun 45 min. jewat hoto….
  amhi eka mast malawani gharghuti hotel madye gelo…ani 7-8 mitra milun mast jewalo…crab, surmai, pamlet, kolambi….wah….wah
  kaka…asech phost takat ja…

  • अमोल,
   अरे जागा महत्वाचं नसतं, मित्र सोबत असले की मग कुठेही गेलो तरी मजा येते. 🙂

 22. Shrikant Vishnu Phansalkar says:

  Mahendra……

  Zakkaas ! (27th April’s Lakasatta supplement had your Blog’s mention in it – Narendra Prabhu’s article… which I read today & briefly visiting all the sites. Now I am hooked & will read ALL in detail later.
  Many Thanks & Best Regards

  Shrikant Phansalkar
  97694 86197

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s