कळपशाही..

‘भेड चाल’ म्हणून एक शब्द हिंदी मधे प्रसिद्ध आहे. असे म्हणतात, की जेंव्हा एखादा मेंढ्या चारणारा  ४०० मेंढ्यांचा कळप घेऊन जातो, तेंव्हा त्याला फक्त एका मेंढीला दोरीने बांधून न्यावे लागते, बाकीच्या ३९९ सरळ त्या एका मेंढीच्या मागे चालत येतात.एक मेंढी विचार करते, आणि बाकी सगळ्या मेंढ्या अजिबात विचार न करता तिला फॉलो करत  जातात.  अगदी हाच प्रकार हल्ली बऱ्याच ठिकाणी  काही सुशिक्षित म्हणवणाऱ्या लोकांतही पहायला मिळतो.

नुकताच एका पुस्तक प्रकाशन संस्थेने एक जागतिक स्तरावर ( म्हणजे “फेस बुक” च्या जागतिक स्तरावर ) एक साहित्य संमेलन ठेवले आहे . खरं तर त्याला साहित्य संमेलन का म्हणायचे हा पण एक प्रश्नच आहे, कारण त्या मधे   केवळ स्वतःची जाहिरात करून  पुरस्काराचा पैसा वाटणे एवढाच उद्देश दिसतो-  .असो..  तर- तुम्ही करायचं काय तर   त्यांच्या साईट वर जाऊन उत्कृष्ट लेखक वगैरे अशा कॅटॅगिरी मधे जाऊन तुमच्या आवडीच्या लेखकाचे नाव लिहून यायचे, किंवा जर तुमच्या आधीच कोणीतरी ते नाव  लिहिले असेल तर ते लाइक करून यायचे. ज्या नावाला सगळ्यात जास्त  लइक , त्याला बक्षीस मिळणार १०००१ रुपयांचे.

आता १०००१ रुपयांचे बक्षिसं मिळणार म्हंटल्यावर काही स्वयंघोषित साहित्यिकांच्या तोंडाला पाणी सुटणे  स्वाभाविकच आहे. .या साहित्यिकांनी फेसबुक वर काही कळप (गृप) करून ठेवले आहेत.  अशाच एका   साहित्यिकाच्या कळपामध्ये  मधे  एका भिकारी मनोवृत्तीच्या चमच्याच्या  मध्यस्थीने  आपल्या   कळपा मधल्या सगळ्या लोकांनी  ” त्या “ सो कॉल्ड साहित्यिकांचे   नाव लाईक करून यावे म्हणून जाहीर आवाहन  केले आहे.

तसेच  त्याने स्वतःच्या वॉल वर पण जसे इलेक्शन साठी मत मागितले जाते, तशी ह्या “___” साहित्यिकाला (?) लाइक करा म्हणून भिकारी  जसे भिक मागतो तशी  “लाइ्क” ची भिक मागणारी पोस्ट टाकली आहे. योगायोगाने , तो भिकारी माझ्या  फ्रेंड लिस्ट मधे असल्याने, त्याच्या वॉल अपडेट्स वर  जाऊन मी त्याला जेंव्हा असे लॉबिंग करणे योग्य नाही असे म्हंटले, तेंव्हा त्याने माझ्या नावासकट एका कळपा मधे   मला विकृत वगैरे अनेक शिव्या घातल्याचे समजले.  मी कुठल्याच कळपात नसतो, त्यामुळे मला ही गोष्ट समजायला थोडा वेळच लागला. आता एखाद्या भिकाऱ्याच्या क्षुद्र मनोवृत्ती नुसार तो वागला, या मधे त्याची काहीच चूक नाही,म्हणून मी त्याला माफ केलंय- पण ह्या अशा झुंडशाही बद्दल लिहिणे गरजेचे वाटले म्हणून हे पोस्ट.

मला आश्चर्य याचं वाटतं, की सगळे शिकल्यासवरले   लोकं  पण  वर पहिल्या  पॅरीग्राफ मधे लिहिल्याप्रमाणे , कळपातल्या   मेंढ्यां प्रमाणे,  त्या स्पेसिफिक साहित्यिकाला “लाइक” ची भिक घालून आले आहेत.सुशिक्षित लोकांनी पण असे झोपडपट्टीतल्या लोकां प्रमाणे गठ्ठा मतदान केलेले पाहून खरंच खूप वाईट वाटले.सुशिक्षित लोकं म्हणविता ना?? मग स्वतःची आवड/निवड वगैरे काही आहे की नाही? स्वतःच्या आवडीच्या  लेखकाला मत देण्या इतकेही जर तुम्ही प्रगल्भ नसाल, तर  खरंच दुःखाची गोष्ट आहे.  तुम्हाला पण कुठला लेखक   आवडतो हे सांगायला पण तुम्हाला दुसरा कोणी तरी का बरं  लागतो?  स्वतःच जरा विचार करा, आपण हे असे जे भेड बकऱ्यां प्रमाणॆ स्वतःची बुद्धी न वापरता वागतो ते योग्य आहे का? सुशिक्षित लोकं समाजाचे आधार स्तंभ म्हणविले जातात, तेंव्हा त्यांनी पण जर विचार करणे सोडले तर कठीणच आहे.. इंटलेक्च्युअल्स नी इंटलेक्च्युअल्स प्रमाणे रहावे/वागावे अशी  सर्वसाधारण  अपेक्षा   आहे..

शिक्षण आणि स्वतः निर्णय घेण्याची क्षमता या मधे अजिबात काही संबंध नाही, आणि असलाच तरी तो व्यस्त आहे हे मला प्रकर्षाने जाणवले. जी लोकं स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकत नाहीत, किंवा ज्या उच्चशिक्षित लोकांनी कोणीही सोम्या गोम्या आपल्या मनाप्रमाणे वागायला  लावतो, तेंव्हा खरोखरच या सुशिक्षित लोकांचे स्वतःच्या वैचारिक क्षमते  बद्दल प्रश्न पडतो.

कदाचित तुम्हाला गम्मत वाटेल, पण मी सांगतो, या सगळ्या प्रकारामधे कोणीतरी सोम्यागोम्या  लेखक  पण  जगातील उत्कृष्ट साहित्यिकांचे १००००१ रुपये   घेऊन जाईल. आणि सध्याचा मतदानाचा रोख पहाता तसेच होणार आहे हे निश्चित. जर कोणाला असे लॉबिंग करून पैसे मिळणार असतील तर तो एका डिझर्विंग लेखकावर अन्याय असेल हे नक्की.

आणि ज्याला हे पैसे मिळतील त्याला पण मनातून एक सल राहिलंच , की हे जे पैसे मिळाले आहेत, ते माझ्या लायकी मुळे नाहीत. ते  माझे नाहीत, तर मी दुसऱ्याचे चोरलेले आहेत.

फेसबुक वर केवळ लाइक च्या आकड्यावरून उत्कृष्ट लेखक वगैरे निवडणे किंवा एखाद्याला पुरस्कार देणे हे माझ्या मते अयोग्यच आहे.  एखाद्याची साहित्यिक लायकी तुम्ही केवळ  त्याला फेसबुक वर मिळालेल्या लाइक वरूनच कसे काय ठरवू शकता? दुसरी गोष्ट म्हणजे , एक लहानशी स्क्रिप्ट लिहून (बॉट बनवून ) पण जर रन केले, तर कुठल्याही नावाला हजारो लाइक्स दाखवता येणॆ सहज शक्य आहे.

साहित्य जो पर्यंत वाचले जात नाही तो पर्यंत ते चांगले की वाईट हेच ठरवले जाऊ शकत नाही.  फेसबुक वर या लाइक बटन वर क्लिक करण्यासाठी तुम्ही पुस्तक वाचलेले असणे आवश्यक नाही. कंपुगिरी करून ही बक्षिसं कोणीही अजिबात लायकी नसलेला माणसालाही मिळवून दिली जाऊ शकतात – आणि आता नेमकं हेच होतंय, आणि कदाचित आयोजकांच्या ते लक्षातही आले असावे, पण दगडाखाली हात सापडल्याने काही करता येत नसावे..

ही अशी कळपशाही इंटरनेट वर फेसबुक वरच्या कळपात आणि इतर काही साईट्स वर पण सुरु असते. त्या साईट्स वर बरेचदा खूप चांगलं वाचनीय लेखन पण असते, म्हणून या अशा कळपशाही कडे दुर्लक्ष करून वाचन मात्र  जात असतो. असो  विषयांतर होतंय. हा लेख जो लिहायला घेतलाय, तो केवळ त्या भिकाऱ्याने माझ्याबद्दल  त्याचा काहीही संबंध नसतांना शिवीगाळ करणारी पोस्ट लिहिली म्हणून आहे.

जाता जाता, ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे, त्यांना जाहीर आवाहन करतो, की स्पर्धा कॅन्सल  करून ,नंतर पुन्हा नवीन नियमावली बनवून घेण्यात यावी. माझ्या मते प्रस्थापित साहित्यिकांकडून   बेस्ट दहा/विस लेखकांची नावे घेऊन त्यापैकी एकाला निवडून द्यायचे अवाहन करा. हाच नियम इतर सगळ्या कॅटॅगरी मधे पण लागू करू शकता. असे केल्याने “त्या कळप शाही ” झुंड शाही  करुन लायकी नसलेल्यांना निवडून आणता येणार नाही. अर्थात शेवटी, निर्णय तुमचा– कारण पैसा पण तुमचाच!

कुठल्याही प्रकारचे लॉबिंग न करता मिळवले जाणारे यश , सहज शक्य आहे, त्या साठी मला श्वास या सिनेमाचे उदाहरण द्यावेसे वाटते.  मूळ कलाकृती जर चांगली असेल तर कुठलेही लॉबिंग न करता यश मिळू शकतं.

 

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , . Bookmark the permalink.

51 Responses to कळपशाही..

 1. 🙂 de phatyaak….
  Akkal gahan thevalel mahabhaag.. ajun kaay bolnar yaannaa…
  Publicitysathi hapaapalele sanketsthal ani ashi bindok lok jamali ki Khichadich tayaar honaar..

  • आनंद,
   कदाचित हे पोस्ट बऱ्याच लोकांना कदाचित समजणार नाही, पण ज्यांना समजावे अशी अपेक्षा आहे, त्यांच्यापर्यंत जरी पोहोचले तरी पुरे!

 2. Shantisudha says:

  खूप छान! कंपूशाही मोडून काढलीच पाहीजे. वेबसाईटवर मिळणार्‍या लाईक्स च्या संख्येने एखादा साहित्यिक उत्तम हे कसं ठरवणार बुवा? म्हणजे अप्रत्यक्षपणे कंपूशाही करणार्‍यांना मोकळं रानच दिलं आहे.

  • आयटी मधे काम करणारे लोकं बॉट्स बनवून एखाद्या नावाला लाखो लाइक्स मिळवून देऊ शकतात . तेंव्हा फक्त लाइक वर चांगला साहित्यिक ठरवण खरंच अशक्य आहे . जरी समजा आपण असं समजलो, की कोणी बॉट बनवणार नाही, पण अशी कंपुशाही तर सगळीकडेच असते. त्यावर काहीच कंट्रोल केला जाऊ शकत नाही.

 3. आल्हाद alias Alhad says:

  ह्याला म्हणतात democracy gone wrong!

 4. मी तर म्हणतो जिथेजिथे ‘कंपूबाजी’ सुरु आहे ते सगळे प्रकार बंद झाले पाहिजेत !!!

  • हेरंब
   बऱ्याच ठिकाणी हेच सुरु असते. एक ग्रुप बनवून एखाद्याला टार्गेट करणं, आणि मग शेवटी तो नामोहरम होऊन ग्रुप सोडून गेला की मग सिलेब्रेट करण! हे बंद होणं गरजेचे आहे, पण शक्य होईल का??

 5. हाण तिच्यामारी !!

  तुम्ही स्क्रीनशॉट टाकायला हवा होता… अश्या लोकांची लायकी आणि नावे सगळ्यांना कळायला हवी…. झाला तो प्रकार निंदनीय आहे आणि त्यांचा निषेध त्या पोस्टवर केलेला आहे.

  अवांतर – त्या पोस्टवर माझ्या कमेंटला १०-१२ लाईक आहेत. मी लेखक होऊ शकेन का? :p

  • सुहास
   विनाकारण एखाद्याची बदनामी करण्याची माझी इच्छा नव्हती, जर मी पण त्यांच्याप्रमाणेच वागलो, तर त्यांच्यात आणि माझ्यात काय फरक ?? सगळी नांवं त्या बेब साईट वर आहेतच. अगदी सहज लक्षात येईल, एकच ठराविक नाव सारखे लाईक केले गेले आहे..

   आणि लेखक तर नक्की होऊ शकशिल.. आणि जर एक ग्रुप बनवला, तर नक्कीच बक्षिसही मिळवशील.

 6. Abhay Mudholkar says:

  मी तुमचे पोस्त न चुकत वाचतो. य वेळचा पण वाचला आणि खरच छान वाटले. लोक स्वतःसाठी काय काय करतात ते वाचून. असो. परंतु तुमची ही जी साईट लेखामध्ये रेफर केली आहेत त्याचे connection दिलेत तर बरे. हे माझ्यासारख्या फार नेटिंग न करणाऱ्या लोकांना कळेल कि हा कोण लेखक आहे कि ज्याला हा १०००० रुपयाचा पुरस्कार हवा आहे. जगाला कळू देत कि या सारखे लोक सुद्धा आपल्या आजूबाजूला असतात.
  अभय मुधोळकर

  • अभय
   हा लेख एका व्यक्तिच्या विरोधात लिहिलेला नाही, तर एका विशिष्ठ मनोवृत्तीच्या विरोधात लिह्लेला आहे, म्हणून कोणाचेही नाव दिलेले नाही> पण जर खरंच इच्छा असेल तर मेल मधे कळवतो ..

 7. anuvina says:

  मला खरंच आश्चर्य वाटले त्या ऑनलाईन साहित्य संमेलनाबद्दल वर्तमान पत्रात वाचून आणि काही वाहिन्यांच्या बातम्यात बघून. आधीच आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने साहित्यिकांनी जगभरात हसे करून घेतले आहे आणि या निमित्ताने लेखकू देखील स्वतःला साहित्यिक समजू लागतील आणि जोगवा मागत फिरतील. खरंच या सगळ्याची गरज आहे का?

  • प्रसिद्धी साठी काहीही केले जाऊ शकते. दहा हजार जरी ठेवलं बक्षिसं , तरी पण खूप जाहीरात होते. टिव्ही, पेपर,या केस मधे निरनिराळी सगळी बक्षिसं फक्त ५०- ६० हजार! आणि जाहिरात कव्हरेज . ही स्पर्धा फक्त प्रसिद्धी साठी ठेवली जाते. जागतिक ऑन लाइन सम्मेलन म्हंट्लं की चांगलं कव्हरेज मिळतं. सोपी आयडीय़ा आहे, आणि खूप इफेक्टीव्ह पण!

   • आयडीया सोप्पी आहेच…पण ती देखील ओरीजनल कुठे आहे? मीच दिलेली *आयडीया* चोरली गेली आहे. मी ३० ऑगस्ट ला माझ्या फेसबुक वॉल वर ही पोस्ट टाकली http://goo.gl/DHR1h. आयोजक माझ्या मित्र यादीत आहेत, त्यांनी ही वाचली असणार…..हातात पैसा आहे, योग्य ते ज्ञान आहे…..आणि जालावर याधीच पुस्तक विकायचा धंदा उघडून ठेवला आहे,,,,,,त्यातून एक फेसबुक पेज उघडणे/असणे…काही इमेजेस बनवणे काय कठीण! हे असे म्हणायला वाव आहे कारण….आयोजकांनी ४ संप्टेंबरला एक पोस्ट तडकाफड्की आधीपासूनच असलेल्या फेसबुक पेज वर टाकली आहे http://goo.gl/RNg5z. हे संमेलन देखील……. मी ज्या प्रमाणे फेसबुक पेज उघडून त्यावर करा असे म्हटले होते…..त्याच पद्ध्तीने आयोजित होते आहे. फरक इतकाच की पेज आधीपासूनच अस्तित्वात आहे. पण ४ तारखेला पोस्ट टाकून…आधी त्याबद्दल कुठेही सूतोवाच न करता लगेच दुस-या दिवसापासून संमेलन सुरू करणे म्हणजे मला माझ्याच आयडियेची चोरी वाटते. च्यामारी, इतके दिवस साहित्य चोरी होत होती पण आता कल्पनांची देखील चोरी व्हायला लागली? कल्पना कॉपीराईट करण्याची काही पद्धत आहे का हो? 😉

    • श्रेया

     होय, मी पण ही फेसबुक वरची नोट वाचली होती. काही न करता आपल्या पदरी प्रसिद्धी पाडून घ्यायची, हे अगदी बरोबर उचललं आहे त्यांनी. साहित्य वगैरे कशाचा काडीचाही संबंध नाही या स्पर्धेत. असो.. माझ्या कडून त्यांना प्रसिद्धी न मिळू देण्याचं मात्र मी प्रकर्षाने पाळले. इथे जर त्यांची लिंक दिली असती, तर हा लेख वाचणारे १२२९ लोकं त्या साईटला भेट देऊन गेले असते.. 🙂 असो.

 8. vinod apshinde says:

  sir, jagat ashach “me me me main main” karnarya lokanchi chalti ahee. hi nalayak lok mi ani maze yachya palikade vichar karu shakat nahit ani jyala protsahan milayla pahije tyala nirash kartat.

 9. अभिषेक says:

  योग्य मुद्दा

 10. suresh says:

  आपल्या मराठी साहित्याचे राज्य पुरस्कारही कंप्पूशाहीनेच मिळवले जातात…

 11. Pankaj Z says:

  ट्विटर फॉलोअर्सच्या संख्येने विजेते ठरवले तर पूनमपांडे आणि शिरलिन चोप्राही १०००१ चा पुरस्कार मिळवतील.

 12. raj jain says:

  आयला,
  हे १०००१ मध्ये पब्लि’शिटी’ करून घेण्याची स्टाईल चांगली आहे, आम्ही उगाच ३-४ परिक्षक शोधा, ७-८ परिक्षकांनी निवडलेल्या लेखकांना पुस्तके भेट म्हणून द्या असले विकतचे दुखणे अंगावर राबवत असतो, दहा हज्जार फेकले की शेकड्यानी लेखक येतात हे माहीतच नव्हते 😉

  mimarathi.net वरील पुढील सर्व स्पर्धांना पुढे कॅश बक्षिस ठेवले जाईल याची नोंद घ्यावी 😛

  • राज,
   अरे शिका काही तरी यांच्या कडून.. नाही तर तुम्ही.. !

  • राज, त्याच्याही पुढची पायरी म्हणजे……त्या लेखकाला पुरस्कार देण्याआधी त्याच्याकडूनच मानधनाची रक्कम घ्या. पाच पैशाचा खर्च नाही, फेसबुक पेज आहेच दिमतीला, ना नफा ना तोटा तत्वावर मीमराठी.नेट चे चांगभलं होऊन जाऊ द्या !

 13. suhas adhav says:

  mahendra ji aaj pariyat jevdha kahi vachlay me tumchya blog var tyavarun tari etkach mhanto
  “jo best aahe ,chan lihito tyala dusryan kade bhik magaychi garaj padat nahi 🙂
  tumche etke kahi lekh vachle pan pratek lekhat kahi navinach goshti anubhavlya …aavadna jyala mhantat na te mana pasun aasta… 🙂
  tumchya blog varche post vachay la me utsuk aasto ….. hyala mhantat khara vijeta …jyala garaj padat nahi bhik-magaychi….. lok tyachi vat pahtat ”
  ani facebook he kahi konachi patrata tharvaycha madhyam mulich nahi …..karan ethe like kaenare he jasta karun कळपशाही.. hech follow kartat 🙂

  • सुहास,
   अरे मी स्वतः लेखक नाही, म्हणजे मी त्या रॅट रेस मधे नाहीच.. पण ज्या चांगल्या लेखकांना हा पुरस्कार मिळाला पाहिजे त्यांच्यावर अशा कळपशाही मुळे अन्याय होतो. मला स्वतःला असे ग्रुपिझम आवडत नाही. 🙂

   • suhas adhav says:

    manya aahe sagla …tumhi mhanta tumhi lekhak nahi ……peshane lekhak nahit mhanun kay jhala….tumche post mala vachayla far aavadtat …kon mhanta lekhak honyasathi moth mothi pustakach lihayla havit mhanun …… tumche chote chote post pan vachnaryala khush kartat…mag jhalach kisagla …… ani em kahi tumhala compare nahi karat konashi ……tumhi chan lihita etkach ….mala mhanaycha hota
    ki mala je tumche post vachun vatata te shrotyani feel karna mhat vacha aasta …aasa jevha vata tevha khara to changla lekhak …. 🙂
    idont expect ki tumhi kahi motha motha lihava pan je lihita te chan aasta 🙂
    changlya lekhakana nyaydyala aastatach ki aaplya sarkhe khare jankar 🙂

    • माझा हा व्यवसाय नाही, एक जनरल हॉबी आहे लिखाण म्हणजे. आजपर्यंत जे काही लिहिलं आहे, ते फक्त अनुभव या एकाच गोष्टीवर बेतलेलं आहे. अनुभव संपले की लिखाण थांबणार 🙂

     • suhas adhav says:

      mala aasa mhanaychay hobby aasli tari tumacha likhan chan aahe ….
      mala sangaycha hota ki ” kon shreshta or winner he tya vyakti cha kartutvach taravta
      mag kalapshahi matter nahi karat ”
      aasha karto ki tumche anubhav sampnar nahit 🙂 😛

      • सुहास..
       धन्यवाद. ५२ वर्षाच्या आयुष्यात खूप कडू गोड आठवणी आहेत, बघु या किती लिहिल्या जातं ते..

 14. वाईट या गोष्टीचे वाटते की यातुन आपण एक अनिष्ट पायंडा पाडतो आहोत हे या तथाकथीत प्रकाशन संस्थेच्या गावीही नसेल आणि असले तरी ’तो ज्याच्या त्याचा प्रश्न आहे, आम्ही थोडीच जबरदस्ती केलीय कुणाला?’ असे म्हणून आपल्या कृतीचे निर्लज्जपणे समर्थन करायला देखील ही मंडळी हिरीरीने पुढाकार घेतील.

 15. असते एकेकाला आवड नाहीतरी सरळ मार्गाने ह्यांना कुठून पुरस्कार मिळणार म्हणा?

  • खरं आहे, कोणालाही माहिती नसलेला तो कोण माणूस लेखक आहे, तो स्वतःची लाल करून घेतोय बस्स..

 16. मिलिंद : says:

  काका,
  मस्त लिहिला आहेत लेख. खूप दिवसापासून एक सल मनात होती . तुमच्या लेखानी त्यावर विचार करायला भाग पाडलं. त्यातून काही मुद्दे पुढे आले. कश्यामुळे होतंय हे सगळ? मुद्दे एकमेकात असे गुंतलेत कि मांडणं कठीण आहे. पण प्रयत्न करतो.
  १. वाढत चाललेलं शहरीकरण आणि औद्योगीकरण हा एक मुद्दा. १९९० पासून जे औद्योगिक धोरण सरकार ने ठरवलं त्यात मुंबई व्यतिरिक्त पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर ही ४ शहरं औद्योगिक शहरं म्हणून विकसित करायला सुरुवात झाली. मग त्यात उद्योजक आले , जमिनी ची खरेदी – विक्री आली , मग ह्या व्यवहाराचे मध्यस्त जन्माला आले. टेबला वरून आणि खालून देवाण घेवाण सुरु झाली, पैसा वाहायला लागला आणि बघता बघता मोठ्ठा झाला. जमिनी च्या एका फुटाला सुद्धा किमत आली आणि मग माराम-यांना सुरुवात झाली. हळू हळू माणूस mean minded झाला. अश्या mean minded लोकांकडे पैसा आला . शेतीची जमीन हातातून गेल्यावर शेतकरी मोकळा झाला. त्याला काही काम नव्हतंच. त्यातले जे हुशार होते त्यांनी पैसे धंद्यात लावले , मुलांना शिकवण्यासाठी वापरले. उरलेले रिकामे होते त्यांना राजकीय पक्षानी उमेदवार बनवायला सुरुवात केली. मग गुंठामंत्र्यांची एक फौज तयार झाली. मग ‘असतील शिते तर जमतील भुते’ ह्या न्यायाने त्यांचे शुभेच्छुक आले. मग प्रत्येकाने स्वतःच्या नेत्याला मोठा बनवायला सुरुवात केली त्यातून ह्या सगळ्या लोकांना एक अहंगंड आला आणि ‘नेता बोले जनता हले’ अशी अवस्था गल्लोगल्ली आली. पक्ष चालवायला पैसा लागतो ह्याला मान्यता मिळाली आणि विचारवंताची – निष्ठावंतांची फळी कापली जायला लागली. प्रत्येक पक्षाने हे स्वीकारलं. मग जनतेलाही स्वीकारवच लागलं. ह्या नव्याने आलेल्या दादा-भाऊ लोकांनी ‘अभ्यासाने काही नाही होत, ताकत असेल तर काही पण होतं’ असा संदेश समाजाला दिला.
  २. मग जे उरले सुरले होते त्यांना अस्तित्वाची भीती वाटायला लागली. त्यांनी आपापल्या प्रांताच्या , भाषेच्या, जिल्ह्याच्या संघटना उभारल्या. जे जे उदात्त, सुंदर आहे ते फक्त आणि फक्त आमचंच आहे आणि बाकी सगळे त्याला मारक आहात अशी भावना त्यांनी समाजात आणून सोडली. मग त्या पातळीवर संकुचित झुंडशाही ला चालना मिळाली. वाढत चाललेली लोकसंख्या , कमी होत चाललेले रोजगार, कावेबाज आणि संकुचित मनोवृत्तीच्या लोकांकडे आलेला प्रचंड पैसा आणि चिक्कार मोकळा वेळ ह्या सगळ्यांनी ह्या संकुचित झुंडशाही ला अजून मोठं केलं. मग आपण इतके खाली उतरलो कि महाराष्ट्रा चा महागायक , महागायिका सुद्धा जातीच्या , प्रांताच्या जोरावर जिंकायला लागलो.
  sms जितके जास्त तितका तो गायक मोठा असं पूर्वी असतं तर कोणी सांगावं ‘लता- अशा’, ‘भीमसेन’ सुद्धा कधी ऐअकत आले नसते.
  3. महाराष्ट्रात सध्या विविध स्थित्यंतरे चालू आहेत. समाज प्रबोधन , सत्यशोधक असे शब्द वापरून so called प्रस्थापितांना हटवणे हा त्यातला एक भाग आहे तसंच प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्राला बिहार-उ प्र शी compare करून आपण चांगले आहोत असे दाखवत मूळ मुद्द्यापासून लोकांची दिशाभूल करणे असो किवा इतिहासाचे पुन:लेखन असे भासवत चालवलेली दंडुकेशाही असो. ह्या सर्व गोष्टीना मी स्थित्यंतरे म्हणण्यामागे कारण असं कि ह्या सर्व गोष्टी महाराष्ट्राला एका विशिष्ठ सुधारित , सुशिक्षित-सुसंस्कृत समाज जीवनापासून खूपच लांब नेणाऱ्या आहेत.
  ह्या सर्व गोष्टीना हल्ली राजाश्रय मिळतोय. लोकांना आता १५ ऑगस्ट च्या, किवा वसंतमाला मधील व्याख्यानमाला नकोयत. कारण त्यात विचार करावा लागेल. विचार करायचा म्हणजे अभ्यास करावा लागेल. अभ्यास करायचा म्हणजे स्वतःला झोकून द्यावं लागेल आणि तेच तर कोणाला नकोय. झोकून देण्यात आणि ‘झोकांड्या देण्यात’ फरक असतो हे कळणारा समाज महाराष्ट्राच्या दुर्दैवाने कमी होतोय.
  झुंडशाही ला सखोल अभ्यास करावा लागत नाही आणि त्यामुळे ती relatively सोपी असते म्हणून आपण ती पटकन स्वीकारतोय.

  • मिलिंद,
   सगळीकडे अर्थकारण दडलेले आहे . आता साहित्यिक क्षेत्रातही तसेच होते आहे याचे वाईट वाटते.प्रादेशिक, भाषिक, जागतिक साहित्य सम्मेलनं भरवली जात आहेत, या मधे पण अर्थकारण जास्त आणि साहित्याबद्दलची आस्था कमी आहे.
   तुमचे सगळेच मुद्दे पटले, अजून एखादा लेख लिहायला हरकत नाही, याची जाणीव झाली.. मनःपूर्वक आभार.

 17. krantis says:

  लाईक करा आणि लायकी ठरवा 😛
  लेख प्रचंड आवडला. पुढच्या लेखाची वाट पाहत आहे.

 18. Guru says:

  मला साईटचे नाव आठवतंय….. अन मध्यंतरी तुम्ही एका स्टेटस वर हिरीरीने ह्या खुळचट संकल्पने विरोधात केलेले मतप्रदर्शन पण स्मरते आहे…….. संदर्भ तर लागला…. पण काका तुम्ही कश्याला वैताग करुन घेताय…. द्या सोडून अपन बडा लाईफ़ जीनेका ना!!!!…….. अन तसेही मते पटत नाहित म्हणुन तुमच्या विरोधात चिल्लाचोट करणा-यांची तुम्हाला सवय आहेच…….. छोड देनेका!!!! अश्याने बी.पी चा त्रास होईल अन डाक्तर मंग सारी तर्री बंद क-याले लाविन!!! थे आपल्याले परवळनारे नोये ना!!!!!!!!……. हड्डी फ़ोडनेका मस्त रहने का काका, अन तसेही तुमच्या ब्लॉग ची एक वेगळीच ओळख आहे……इथे त्या चिवत्यांना जागा कश्याला देताय!!!!!!

  • गुरु,
   अरे मला काही त्रास नाही, पण तो येडझवा माझ्याबद्दल कुठल्यातरी ग्रुप मधे वेडंवाकडं लिहित होता, म्हणून वैताग आला होता. खरं तर त्याच्या नावानिशच पोस्ट टाकणार होतो, पण एखाद्याचं नाव लिहून बदनामी करणं शिष्ठसंमत नाही, जर आपणही तसंच केलं तर त्याच्यात आणि आपल्यात काय फरक रहाणार??

   • Guru says:

    हा हे मात्र रास्त आहे……. नाव घेऊन बोलणे शिष्ठसंमत नाही…….

 19. या कळपशाहीचे अजून एक कारण म्हणजे माणसाला इतरांविरुद्ध आवाज उठवण्यापेक्षा त्यांच्या हो ला हो म्हणणे अधिक सुरक्षित वाटते. आणि त्याशिवाय काय चूक काय बरोबर याचा विचार करायची कोण तसदी घेत नाही.

 20. Aparna says:

  मला ही पोस्ट कळली पण स्पेसिफ़िक अर्थातच नाही कळले…का कुणास ठाऊक फ़ेबुवर नसल्याचा आणखी एक फ़ायदा असं माझ्या दृष्टीने म्हणेन काका. 🙂

  अवांतर – साधारण कुठेही गेलं अगदी शाळेतले ग्रुप मग पुढे कंपनीमध्ये साहेबाच्या पुढे पुढे करणारे, मायाजालावरही कंपू असं सगळं पाहत असतो आपण..कुठे कुठे रोखणार..शेवटी काय म्हणतात नं ते जनाची नाहीतर मनाची वाटली तरंच या अशाप्रकारच्या समोरच्याला कमी लेखण्यासाठी होणार्‍या कंपूशाही कमी होतील. नाहीतर जसजशी साधनं निर्माण होताहेत प्रत्येक ठिकाणीच कंपू आहेतच…

  • अपर्णा
   बुकगंगा ने एक स्पर्धा ्ठेवली होती, आणि एक वाय झेड माणूस एका सो कॉल्ड लेखकाची चमचेगिरी करत होता, म्हणून हे पोस्ट!

 21. ruchira2702 says:

  Kya baat kahi hai kaka!!! Kahi nav thauk aahet malapan… Tyachyavar hasav ki radav kalat nahi…jaudya soda… Shevti kay quality wins at the end

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s