दहा मिनिटात कवी व्हा..

नेट वरून

फेसबुक वर कविता पोस्ट करण्याचे प्रमाण हल्ली खूप वाढलंय. मुलींना   आपण किती संवेदनशील आहोत  हे दाखवायचं असेल तर चारोळी किंवा कवितेला पर्याय नाही, हे आजकालच्या तरूणांनी  ओळखलेलं  आहे म्हणूनच प्रत्येक तरूण कवी  बनण्याचा प्रयत्न करतो.  मंगेश पाडगांवकरांनी जे कवितेला वृत्त छंदाच्या जोखडातून बाहेर काढलं , त्या मुळे तर मुक्तछंद कवींचा सुळसुळाट झाला आहे,  हे जरी खरं असलं  तरी पण वृत्तबद्ध कविता आणि गझल मधला गोडवा काही औरच!

कवितेचा सगळ्या पॉप्युलर प्रकार  म्हणजे चारोळी. चंद्रशेखर गोखल्यांनी या चारोळ्यांना वेगळीच प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. शब्दांवर  प्रभुत्व असलेले चंद्रशेखर गोखले हे चारोळ्यांचे अनभिषिक्त राजे!  त्या मूळे जरी तुम्हाला वृत्तबद्ध कविता येत नसतील , तरीही नाराज होण्याची आवश्यकता नाही, चारॊळी हा प्रकार नक्कीच लिहून पाहिला जाऊ शकतो. अर्थात, त्या साठी तुमची कल्पना शक्ती उच्च कोटीची असायला हवी, नवनवीन कल्पना सुचायला हव्या. बरेच असे लोकं असतात की जे हुशार आणि उच्चशिक्षित जरी असले तरी साहित्याच्या  बाबतीत  ’ढ’  असतात. त्यांना कविता करण्या साठी  सगळ्यात मूल भूत गरज असलेले वृत्ताचे ज्ञान, वगैरे नसते, आणि  मुक्तछंद कविता करण्यासाठी शब्दांचे भांडार पण  नसते.    आता अशा लोकांनी काय बरं करावे?

तरूण मुली जात्याच थोड्या जास्त संवेदनशील असतात, त्यामुळे त्या  कविता या प्रकारात बऱ्याच रममाण होतात- आणि म्हणूनच मुलं पण  कवी होण्याचे स्वप्न पहात असतात. मुलांनाही वाटतं , की आपणही कविता कराव्या म्हणजे मनाचा संवेदनशील भाग जगापुढे ( मुलींच्या समोर ) दाखवता येऊ शकेल, पण लिहायला बसलं की काय करावं , कसं लिहावं हेच समजत नाही, म्हणून  आजचा हा लेख अशा होतकरू कवींसाठी- “दहा मिनिटात कवी कसे बनावे?”{ एका सर्व्हे नुसार (मी केलेल्या) }८५ टक्के मुलं ही केवळ मुलींना इम्प्रेस करण्यासाठी कविता फेसबुक वर पोस्ट करतात, आणि त्या पैकी ९० टक्के या चोरीच्या असतात..)कवी  होण्यासाठी  काही फारसं करावं लागत नाही. दहा मिनिटात कवी कसे बनायचे याचे सोपे उपाय सांगतो.

पहिला उपाय म्हणजे जर तुम्हाला आपण  काही प्रस्थापित कवी, गझल लेखकांना  फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांना आपल्या मित्रांच्या लिस्ट मधे सामील करून घ्या, म्हणजे त्यांचे अपडेट्स वेळोवेळी पहाता येतील. त्या मधे हमखास  उत्कृष्ट कविता सापडतील, त्या कविता तुम्ही आपल्या भिंतीवर आपली कविता म्हणून चिकटवू शकता. फेसबुक वर  पोस्ट करताना ज्याची कविता चोरली आहे  त्या मित्राला  दिसणार नाही अशी पोस्ट करू शकता( फेस बुक मधे तशी सोय आहे). आमचे मित्र धोंडॊपंत आपटे ( उत्कृष्ट गझल लेखक ), चंद्रशेखर गोखले (चारोळीकार), तर अशा चोऱ्यांनी खूप जेरीस आलेले आहेत. आणि परवा तर पंतांनी या चोरांना वैतागून चक्क एक स्टेटस टाकला  :- तो असा ,

सभोवती हे चोर तरी तू नकोस सोडू वाटेला
तुझी पौर्णिमा रोजच असता का घाबरशी अवसेला
कस सोन्याचा आहे त्याला लोखंडाची का भीती
सांग ’अगस्ती’ चोर कोणता चोरू शकतो प्रतिभेला?

कविता जरी चोरली, तरीही आपली प्रतिभा कोणी चोरू शकत नाही . पॉझिटीव्ह थिंकिंग म्हणतात ते यालाच.

दुसरा उपाय  म्हणजे गुगल सर्च मधे जाऊन  इंग्रजी   कवींच्या कविता शोधा, त्यातल्या त्यात रोमॅंटीक कविता जास्त चांगल्या, कारण त्यांना फेसबुक वर जास्त लाइक मिळतात.  त्यांचे मराठी मधे भाषांतर करून आपली कविता म्हणून आपल्या भिंतीवर चिकटवू शकता.  गुगल ट्रान्सलेट मधे इंग्रजी कविता हिंदी भाषांतर करण्याचा प्रयत्न केला तर ते अतिशय  भयंकर होते , तेंव्हा इंग्रजी ते हिंदी भाषांतर केल्यानंतर  त्याचा अर्थ नीट जाणून घ्या , आणि एकदा तो अर्थ व्यवस्थित समजला की  तेच शब्द  मराठी मधे  भाषांतर करुन आपली कविता तयार करा.

हिंदी मधे पण उत्कृष्ट कविता आहेत. इंटरनेट वर असे बरेच हिंदी कवितांचे ब्लॉग आहेत , त्या ब्लॉग वरच्या हिंदी कविता  पण खूप छान असतात. मराठी लोकं हिंदी ब्लॉग च्या वाटेला पण  जात नाहीत, म्हणून त्या कविता मराठी मधे ट्रान्सलेट करून आपल्या पोस्ट वर टाकू शकता.  इथे थोडं डोकं वापरून स्वतःचे शब्द वापरले तर कविता चोरीची आहे हे कोणालाच समजणार नाही.

हिंदी गाणी बरीच आहेत . इ.स. १९५० ते १९८० च्या कालावधी मधली गाणी फारच उत्कृष्ट भावपूर्ण असायची, त्यांची शब्दरचना पण अप्रतिम असायची. हिंदी गाण्य़ांची शब्दरचना  इंटरनेट वर शोधा, बऱ्याच साईट्स आहेत अशा गाण्यांच्या शब्दरचना  देणाऱ्या. त्यातल्या एखाद्या गाण्याचे मराठी मधे भाषांतर करा आणि करा पोस्ट आपल्या भिंतीवर! मी तुम्हाला खात्री देतो की हे कोणीही ओळखू शकणार नाही. माझा एक मित्र  आहे  कौस्तुभ नाबर   नावाचा, त्याला खूप हिंदी गाणी पाठ होती,  आणि त्याची अजून एक खासियत म्हणजे कुठल्याही कागदावर न लिहिता मनातल्या मनात भाषांतर करून शिघ्र कवी प्रमाणे तो पटापट कविता म्हणून दाखवायचा.  खूप वर्ष आम्हाला त्याची ही ट्रिक समजत नव्हती. हे अर्थात दिसतं तितकं सोपं नाही, त्या साठी शब्दांचं भांडार तुमच्याकडे असायला हवे, ते टॅलंट कौस्तुभ कडे होतं, म्हणून तो करू शकायचा, पण तुम्ही कागद पेन घेऊन बसा आणि करा प्रयत्न!

जुन्या काळी म्हणजे १९२०- ते ५० च्या काळात वृत्तबद्ध कवितांचे बरेच संग्रह निघाले होते. रद्दीच्या दुकानात गेल्यास कोपऱ्या मधे बेवारस पडलेले असे बरेच कवितासंग्रह दिसतील, त्या मधले एखादे जुने पुस्तक उचलून त्यातली एखादी कविता शब्दशः पोस्ट करा- ती कविता कोणी वाचलेली असण्याची शक्यता जवळपास नसते.ज्याची कविता आहे, तो काही तुमच्यावर आक्षेप घेण्यास जिवंत नाही, म्हणजे ती कविता इंटरनेट वर तुम्ही आधी पोस्ट केली म्हणजे तुमच्या मालकीची आहे, असे म्हणून तुम्ही कधीही भांडणं करू शकता.

नाटकिंग कोल नावाचा एक गायक होऊन गेला. त्याची रोमॅंटीक गाणी जसे” पुट युवर स्विट लिप्स निअर फोन , लेट्स प्रिटेंड वी आर टुगेदर..” वगैरे शब्दशः भाषांतरासाठी एकदम योग्य आहेत. सरळ सरळ शब्दशः भाषांतर जरी केलं तरी खपून जाऊ शकेल.

शेवटचं म्हणजे, फेसबुक वर बरेच कवितांचे गृप आहेत, शक्य तितके जास्त ग्रूप जॉइन करा आणि तिकडच्या कविता  स्वतःच्या वॉल वर पोस्ट करा. जर मूळ लेखक भांडायला आला तर त्याला ब्लॉक करा.. 🙂

तर मंडळी अशा तऱ्हेने तुम्ही केवळ दहा मिनिटात कवी होऊ शकता . हा लेख  लिहीण्याचा प्रयत्न केलाय, कारण माझे बरेचसे लेख  फेसबुक वर काही लोकं स्वतःच्या नावे पोस्ट करताहेत. एक डार्क ह्युमर म्हणून लिहीण्याचा केलेला प्रयत्न, कितपत जमलाय तुम्हीच ठरवायचं.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in विनोदी and tagged , , , , . Bookmark the permalink.

60 Responses to दहा मिनिटात कवी व्हा..

 1. आल्हाद alias Alhad says:

  खीक्‌ खीक्‌ खीक्‌ करून सार्कास्टिकली हसतोय आख्खी पोस्ट वाचताना…खरं सांगतो ती शेवटची डार्क ह्युमरवाली ओळ लिहीली नसतीत तर नक्कीच कुणीतरी नॅट किंग कोल गूगलला असता!
  कवी हा व्यक्तीविशेषाला अशाच लोकांनी भारी बदनाम करून ठेवलंय राव…

  • आल्हाद, अरे खरंच आहे तो गायक. त्याची गाणी मस्त आहेत. मी वर दिलेलं गाणं इथे पहा यु ट्युब वर.

   • आल्हाद alias Alhad says:

    हो आहे आहे खरंच. माहिती आहे मलाही… एखादा खरंच त्याला गूगलून भाषांतराला लागला तर अवघड व्हायचं जगणं… तरी कविता समूह सोडल्यावर बरंच सुसह्य झालंय आता!

    तुम्हाला पुलेशु

 2. ruchira2702 says:

  Tufaan idea chi kalpna kaka… Pan he bhurte kavi pakdle gele ki mothe kevilvane vatatat ho…:-)

  • रुचिरा
   सुरुवातीला मी बराच भांडायचो, पण नंतर सोडून दिलं.
   कवितांच्या ग्रूप मधे असे बरेच चोरटे असतात,तिथून उचललेल्या कविता आपल्या पेज वर टाकणारे. त्यांना खरंच काही फरक पडत नाही,मला तर असेही लोकं भेटले आहेत, की ज्यांना मी माझा लेख चोरला म्हणून ~ऒब्जेक्ट केलं तर त्यांनी चक्क ब्लॉक करून टाकलं फेसबुक वर. असो.

 3. Guru says:

  जे ब्बात काका…… …….लेख नेहमीप्रमाणेच आवडला…… ज्याला अक्कल आहे त्याला त्यातले व्यंग कळले असेलच….. नसलेल्यांसाठी उद्या एक अथर्वशीर्षाचे आवर्तन घालतो!!!!!!!……..
  ————————————————————————————————————————
  “तरूण मुली जात्याच थोड्या जास्त संवेदनशील असतात, त्यामुळे त्या कविता या प्रकारात बऱ्याच रममाण होतात”

  हेच जर तुम्ही आधी बोलले असते तर!!!!!! चक्चक्चक्चक्क्क्क……… 😉 😉
  ——————————————————————————————————————

  • गुरु
   तूला सांगायची खरंच गरज आहे का? 🙂 तुला सगळंच तर माहिती आहे,आणि जर आता समजलं असेल तरीही वेळ गेलेली नाही.

  • Anagha says:

   नसलेल्यांसाठी उद्या एक अथर्वशीर्षाचे आवर्तन घालतो!!!!!!!…….. :))))))))) hahahhahha

 4. mandar17390 says:

  Kaka,sodun dya ho, itka kai manala lavun ghayche??tumchi lihaychi kala konachya bapala chori karta yenar aahe ka?ugach dokyala shot lavun faayyda nahi…
  Kavitanchyq trnslation cha karun baghto prayatna mahnun kharach,laykit changle jamle ter tumhla TAG karin 🙂

  • मंदार
   अरे मी अजिबात मनाला लावून घेत नाही. एकदा ब्लॉग वर लेख टाकला की तो लवकरच फेसबुक वर कुठेतरी दिसणार हे तर मी गृहीत धरून चालतो हल्ली. 🙂

 5. onkark says:

  “दुसर्याच्या कविता मी माझ्याच म्हणून लाटल्या ||नुसत्याच नाही लाटल्या तर झेरोक्स करून वाटल्या “-ओंकार (हि कविता पण मी लात्लेलीच आहे :))])

 6. मी आता भांडायचे सोडून दिले आहे दादा ! आंतरजालावरील किमान १५ ते २० ब्लॉग्सवर माझ्या कविता सुखेनैव नांदत असतात सदैव, माझे काही हितचिंतक, मित्र माझ्या वतीने तिथे भांडतातही. मी मात्र आजकाल..
  “तुका म्हणे उरलो उपकारापुरता” अशी भुमिका घेतलेली आहे 😛
  तुमचा लेख नेहमीप्रमाणेच खुसखुशीत, हळुच चिमटे काढणारा असा झाला आहे 🙂

 7. चोरी वाढल्यानेच मी कवितांमध्ये माझे टोपण नाव गुंफायला सुरूवात केली !

  • विशूभाऊ,
   अरे ते ठिक आहे, पण ते नाव बदलता येऊ शकते ना.. त्याचं काय? तेवढी बुद्धी असतेच चोरांना.

   • Anagha says:

    Chor nehamich itaranpeksha jast hushar asatat….javu det….kavita lekh chorata yetat…”Pratibha” nahi na….to paryant javu det “chalta hai” mhanayche ani pudhe jayache!

    • अनघा,
     अगदी बरोबर .. एखादी गो्ष्ट टाळता येत नसली, की ती एंजॉय करायची एवढंच आपल्या हाती असते.

  • विशाल, हे उगाचच सांगितलंस. चोरलेली कविता वाचायला तरी त्यांना वेळ असतो का ? कोण जाणे, पण मुद्देमालासकट चोर पकडता आला असता.

 8. क्या बात है पंत……… क्या बात है……..

  बहार आणलीत. नेहमीप्रमाणे फारच छान लेख. चित्तवेधक मांडणी. हसून हसून पुरेवाट

  तुम्ही जे जे उत्तमोत्तम पर्याय सांगितले आहेत, ते आजपर्यंत अनेकांच्या लक्षात आले नसतील ))))

  आता सर्वत्र …. अवघा प्रेमाचा सुकाळ

  आपला,
  (हसरा) धोंडोपंत

  • पंत,
   मनःपूर्वक आभार.
   आता सर्वत्र प्रेमाचा सुकाळ.. अहो तो तर झालेला आहेच.
   हा लेख वाचल्यावर आपल्या कवितांच्या चोऱ्या कमी होतील अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही 🙂

 9. Vijay says:

  ati sundar.. ankhi ek premakavitecha source visarlat ki pant.. kontehee bhaktigeet ghya anik tyatla thodasa piece gheun tyachyat aplya priyeche naav gumpha.. thodassa meter ikde tikade karava lagla tari chalel pun bhaktigeetatli ji kahi utkat bhaktichi bhavana aste tee preetichya palikadli aslyamule thodishi dilute houl preeti madhe atyant chanpaiki basu shakate..

  On a slightly different note – asmadikanni ekda reverse prayog karun “tuzya usala lagel kolha” he bhaktigeet kase ahe ya vishyawarti ardha taas vyakhyaan dile hote.. ekda manachya kalya matit bhakticha uusacha mala fulavalala anik shadripu roopi kolha dharla ki zale..

  • विजय,
   वाह, क्या बात है.. माझ्या लक्षातच आलं नव्हतं हे .
   अजून एक मुद्दा राहून गेला, तो म्हणजे उर्दू कवितांचे मराठीकरण करणे. एखाद्या शेर चा मराठी भाषांतर केले की मस्त चारॊळी बनते. 🙂 ब्लॉग वर स्वागत आणि आभार.

 10. अनेक उभरत्या प्रियकर/कवींच्या प्रेमाचं श्राद्ध घातलंत तुम्ही तर 😉

  • हेरंब,
   काही तरी लिहिलंय .पंतांचे अपडेट पाहिले, आणि हा लेख लिहायचे सुचले. 🙂

   • Aparna says:

    प्रेमाचं श्राद्ध…

    हेओ….लोल्स..:)

    काका, मस्त विषय मिळाला…..अशात एखाद्या शब्दाचा अर्थ माहीत नसलेला शब्दवाली कविता चोरली आणि समोरचीने त्याचाच अर्थ विचारला की झालंच मग प्रेमाचं श्राद्ध.. 😉

 11. काका, दे मारा…. फट्याक…. 🙂 🙂

 12. anuvina says:

  साहेब मस्तच बसली आहे. धोंडोपंतांची तर बातच वेगळी. खरी प्रतिभा कोण चोरू शकणार? चंद्रशेखर गोखल्यांच्या चारोळ्यांनी तर माझं कॉलेज जीवन समृद्ध केलंय …. अगदी नादीच लावलं होतं त्यांनी. त्या नादात मी पण चारोळ्यांचा रतीब टाकला होता आणि त्यानेच जन्माची साथीदार सापडली. 😉 ….. संसारात पडल्यावर चारोळ्या बंद झाल्या (हे ओघाओघाने आलेच). काही काही कविता खूप मस्त वाचनीय असतात. त्या ढकलत ढकलत माझ्या मेल बॉक्समध्ये येतात. मधे एक दोन वेळा अश्या वाचनीय कविता मी माझ्या ब्लॉग वर टाकल्या … अर्थात मूळ कवी माहित नाही. कुणाला माहित असल्यास कळवावे अशी टिप टाकून. आणि चक्क एका कवितेवर दोघा जणांनी हक्क दाखवला तेंव्हा पासून हा प्रकार बंद केला. 😉
  तसं म्हणाल तर साहित्यचोरी ही काही नवीन नाही.

  • अगदी खरं आहे. प्रतिभा कोणीच चोरू शकत नाही, तसेच लिहीण्य़ाची स्टाइल बघुनही लोकं कोणाचं पोस्ट असू शकतं याचा अंदाज बांधतात. चंद्रशेखर गोखले पण या चोरीपासून वाचलेले नाहीत, आणि पंत तर जाम वैतागले आहेत, पोस्ट केली, की कॊणीतरी कॉपी करतोच..

 13. bolMJ says:

  एकदम जबरदस्त लिहिलाय….आणि १००% सक्सेसफुल फॉर्मुला आहे हा…पोस्ट वाचून कोण कवी झाला नाही तर पोस्ट परत.. 😀

 14. suhas adhav says:

  chan vatla post …
  majha ek kissa sangto ..
  shalet 8 veet….. aastana mala vataycha aare magazine madhye majha pan nav aasava 😛
  so ekda kelach parakram kavita copy- paste karaycha …
  pan ti kavita majhya baien na etki avdli ki mala staff room madhye bolaun ….paus hya vishayavar ek kavita lihnyas sangitli , ti pan tithech basun …… hava tight jhali majhi..aata kay …. shevti jitka marathi me aushyabhar shiklo titka vaparla …ani kashi bashi jamli kavita ….ani vishesh mhanje ti majya baiena avadli titkich ….
  pan tyapudhe me parat kadhi aasa parakram kela nahi …. dev pan ekda vachavto nehmi nahi 😛 🙂

  • सुहास
   जर स्वतःला जमली , तर मग सोडून का दिले कविता करायचे?
   एक हॉबी म्हणून सुरु ठेवायला हरकत नाही.
   कदाचित आपल्याला कविता येतात हा शोध लागायचा असेल अजून. मला पण वयाच्या ४९वर्षापर्यंत आपल्याला लिहिता येऊ शकते हेच माहिती नव्हतं ! आहे की नाही गम्मत?

 15. Maithili says:

  हाहाहा… मस्तच काका… 🙂

 16. भारी आहे काका 🙂

  बघा नाही तर हाच लेख चोरायचं कुणी 😛

  • नागेश
   वरची पंतांची कविता वाचली की नाही?? काही फरक पडत नाही.. चालायचंच म्हणून सोडून देतो हल्ली.

 17. ni3more says:

  barobar bolata kaka tumhi chortyan sathi ha uttam lekh lihila ahe tumhi mastach

 18. सुदैवाने स्वत:च्या काय किंवा चोरीच्या काय ;-)…कवितांच्या वाटेला अजून गेले नाही. कविता/कथा हा आपला प्रांतच नव्हे. त्यामुळे *फारसं* वाड्मय(?) चौर्य माझ्या बाबतीत झालेले नाही. पण आपण लिहिलेलं कुणाला तरी चोरावसं वाटतंय ही जाणिव म्हणाल तर सुखद आहे. मात्र हे ही मान्य आहे की, त्याचे योग्य ते श्रेय योग्य त्या व्यक्तिला मिळायला हवे.

 19. मस्त ब्लॉग आहे………..मला खूप आवडला
  http://www.marathi-tech.blogspot.com

 20. कथा, कविता असो वा सिनेमे… सगळीकडेच ढापा ढापी सुरू आहे. अलीकडेच पाहिलेला बर्फि सिनेमा प्रचंड आवडला होता पण नंतर जाणकार लोकांनी तो कुठून कुठून ढापला गेलाय त्याच्या लिंक्स दिल्या आणि फुस्स्स झाले. आत्ता तोच सिनेमा भारतातर्फे ऑस्करला चालला आहे. म्हणजे दुनियाभर लायकी निघणार. कविता, चारोळ्या पचल्या की लोकं सिनेमे ढापतात… चालायचेच 😦

 21. ह्म्म्म…….खरंय तुझं महेंद्र…. !
  मी पण दुर्लक्ष करते सरळ. कविता, लेख वगैरे ही साहित्य चोरी तर सर्रास होतेच. पण अल्बम्स ची गाणी सुद्धा कॉपीराईट्स ना न जुमानता कितीतरी साईट्स वर दिसतात.
  बाकी लेख एकदम फर्मास…. 🙂

 22. काका…एखादा आवडलेला Blog किंवा कविता लेखकाच्या नावासहित.. Post केली/Share केली तर काही हरकत नाही ना….??? 😉
  [हा लेख… (लिंक) Wall वर Post करतोय म्हणून म्हटलं…… ;)]

  • त्या साईटचा मालक कोण आहे? त्याला लिहायला हवे.

   • hasaleko says:

    bokya satbande asnar ajun ek

    • श्वेता says:

     हे म्हणजे plain plagiarism च best example!!!

     सर, तुम्ही फारच छान लिहितात गड्या … मी फारशी ब्लॉग वाचक नाही.. पण मराठी वाचक आहे.. तुमचा ब्लॉग मला चुकून सापडला.. आणि गेले 2 दिवस मी वाचतेच आहे.. it has been an awesome stress-buster for me.. आणि तुमच्या ब्लॉग लेखकांच्या “invisible” प्रकारात मी मोडते.. मला तर प्रवीण दवणे, सांझगिरी, तंबी दुराई, कणेकर वेगैरे दिग्गज आठवलेत … तुमच्या निवडक ब्लॉग’स चे पब्लिशिंग चे मी वाट बघेन … and your coming blogs too… thank you for writing अँड best regards.. 🙂

     P. S. I like the use of emoticons too 🙂 🙂 🙂

     • श्वेता,
      मनःपूर्वक आभार. हा ब्लॉग केवळ आपले मन मोकळे करण्यासाठी हक्काची जागा म्हणून वापरतो. इतकी जास्त स्तुती केली, की आता मलाच लाजल्यासारखं वाटतंय.असो, पुन्हा एकदा आभार.

 23. Swapnil Sahastrabuddhe says:

  मुळात कविता, गझल ही शिकण्याची गोष्ट नाही. मनाला फील होणे आपण म्हणतो ते फील झाले पाहिजे. शब्दांचे ज्ञान असणे फार गरजेचे आहे. नाहीतर फील तुम्ही घ्याल पण तो इतरांना तुमच्या रचनांमधून देऊ शकणार नाही. तसेच उत्तम कविता होण्यासाठी तुमची अभिरुची उत्तम असणे गरजेचे आहे. नाहीतर मग तुमच्या रचना वाचूही नयेत शहाण्याने अशा काहीशा होतात. मी देखील कवी आहे, गझल लिहितो. मीनाकुमारी, अथवा मिर्झा गालिब यांच्या गझल मी ‘गझल’ मानतो. मीर, मोमीन, दाग देहेलवी देखील उत्तम, कसलेले शायर होते.आजकाल गझलकारांचे आणि गझलांचे पीक आलंय. गझला पाडल्या जातात, कविता निरर्थक. उत्तम कविता जाणण्याचे सामर्थ्य, ती जाण कमी होत चालली आहे. अमुक अमुक हे ढमुक ढमुक पण ते तमुक तमुक तसे नाही, हे असे काहीतरी लिहून त्याला गझल म्हणतात. पहा तुम्ही कुठेही. मायबोलीवर गझलांचा बाजार भरतो अधूनमधून तेथे बऱ्याच जणांची कीव करावीशी वाटते मला. या अशा परिस्थितीत कवितांचे, काव्याचे भवितव्य काय, आणि कसलेले शायर, कवी पुढे येऊ शकतील काय या प्रश्नाचे उत्तर मला स्वतःला फार असमाधानकारक मिळते.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s