मुकेपणातली शक्ती…

गणेश मतकरीचे  या सिनेमाचे परीक्षण वाचूनही त्यांचे  न ऐकता परवा बर्फी बघायला गेलो होतो. अर्थात सौ. ची हा सिनेमा पहाण्याची इच्छा होती, आणि मग तिच्या इच्छेविरुद्ध न वागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 🙂 सिनेमा सुरु झाला आणि अर्ध्या तासातच माझा पेशन्स संपला. थोड्या वेळाने जेंव्हा सौ. ने ” अहो, घोरताय काय? हे काय घर आहे का? ” म्हणून उठवले तेंव्हा जबरदस्तीने डॊळे ताणून आणि उरलेला चित्रपट पाहिला. हा चित्रपट तरूणांमध्ये खूप लोकप्रिय झालाय, पण प्रौढ लोकांना फारसा आवडलेला नाही कारण त्याचे तकलादू कथानक, फार तर पाऊण तासाच्या लायकीचे कथानक तीन तास खेचले तर नक्कीच तापदायक होते. एक प्रामाणिक मत म्हणजे बर्फी काही मला ऑस्कर च्या तोडीचा वाटला नाही, पण अभिनय मात्र प्रियंका, आणि रणवीर कपूर ने उत्कृष्ट केलाय यात संशय नाही.

याच थीम वर १९७२ साली संजीव कुमार आणि जया भादुरी चा एक कोशिश नावाचा सिनेमा आला होता, त्या सिनेमा मधे दोघेही मुक बधीर असतात . त्या मधल्या संजीव कुमार आणि जया भादुरीचा अभिनय आजही लक्षात आहे.एक अक्षरही न बोलता केवळ अभिनयाने प्रेक्षकांच्या डोळ्यातून पाणी काढायचं कसब, जया- संजीव मधेच आहे. मला संजीव कुमार आणि रणबीर ची तुलना करायची नाही, पण जर करायचीच झाली, तर संजीव कुमार नक्कीच उजवा ठरेल. कदाचित आधी कोशिश पाहिलेला असल्याने बर्फी थोडा पुचाट वाटला असावा. एक शब्दही न वापरता, आपल्या मनात काय आहे हे दुसऱ्याला केवळ अभिनयाने दाखवून द्यायचे म्हणजे काही चेष्टा नाही.असो..

माझ्या लहानपणी एक कार्टून काही पेपर मधे यायचं. सकाळी पेपर आला की, आधी ते कार्टून चे पान उघडून ते कार्टून पहिल्यानंतरच पुढचा पेपर वाचला जायचा. हिंदी, मराठी पेपर मधे त्या कार्टून कॅरेक्टरचे नाव असायचे गुणाकर, तर इंग्रजी पेपर मधे हेन्री. एक गोल टक्कल असलेला दहा वर्षाचा वात्रट पण लोभस मुलगा म्हणजे हेन्री. या कार्टून ची स्पेशालिटी म्हणजे एकाही कार्टून पात्राच्या तोंडी शब्द वापरला नाही. केवळ स्क्रिप्ट मधले चित्र बघूनच विनोद समेजेल असा असायचा.  बर्फी, कोशीश, चार्ली चॅप्लिन  किंवा हेन्री या सगळ्यांतला एक दुवा म्हणजे सगळे ’मुकं’ पणे मनोरंजन करणारे.

कार्ल एंडरसन यांनी हे कार्टून १९३२ साली ” सॅटर्डे इव्हिनींग पोस्ट ” साठी काढणे सुरु केले होते .एक साधी सोपी कॉंटेंपररी थिम घेऊन सुरु केलेले हे कार्टून काढतांना जे काही सांगायचे आहे ते केवळ चित्राच्या माध्यमातून, आणि ते पण एकही शब्द ना वापरता सांगितल्या गेले पाहिजे हे पथ्य पाळल्यामुळे याचा एक वेगळाच वाचक वर्ग तयार झाला  जवळपास २००५ पर्यंत जगभरात अनेक पेपर्स मधे हा हेन्री डोकावून जायचा.

हेन्री आणि गारफिल्ड हे दोन्ही कार्टून्स माझे फेवरेट. कारण एकच, जे काही सांगायचं आहे ते सगळं काही चित्रातूनच सांगितलं जातंय. या इतर कार्टून्स बरेच आहेत, पण हेन्री आणि लिटील लू ( हे भारतात नाही आलं) आज जेंव्हा हेन्री चे १९३८ चे कार्टून पहातो ,तेंव्हा पण हलकेच हसू येते.. आणि हेच या कार्टुन चे यश.

 हा लेख म्हणजे मुक पणे केलेल्या  अभिनयातील ताकद जाणवली म्हणून लिहिलाय. काय विश्वास नाही बसत का या वाक्यावर?मनमोहनसिंग  कडे पहा  एकदा- बसेल विश्वास! 

बाय द वे, हेब्री चे १९३४ च्या पिरियड मधले  कार्टून्स पहायचे असतील  तर  ते इथे  आहेत.

जया भादुरी  चा ’कोशीश” जर पाहिला नसेल, आणि पहाण्याची इच्छा असेल  तर इथे क्लिक करा, ऑन लाइन पहाण्यासाठी.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मनोरंजन and tagged , , , , . Bookmark the permalink.

42 Responses to मुकेपणातली शक्ती…

 1. SnehaL says:

  मनमोहनसिंग कडे पहा एकदा- बसेल विश्वास!
  😀 😀 😀 😀 😀 😀
  बाकी नो कमेंट्स 😀 😀

  • महेंद्र says:

   मनमोहनमुळेच तर हे पोस्ट लिहीले आहे.. आधी शेवटचे वाक्य मनात आले, मग नंतर हे पोस्ट!

 2. बर्फी मला आवडला पण तो कुठून कुठून ढापला गेलेला आहे त्या लिंक पाहिल्यावर मात्र तो चित्रपट ऑस्करला पाठवून पुर्‍या देशाची लायकी निघणार हे नक्की झाले आहे.

  मनमोहनच्या मूकपणात पण समस्त सामान्य भारतीयांच्या डोळ्यात पाणी काढायची टाकत आहेच. वरचेवर सिद्ध होतेच आहे.

  आणि हो जमलं तर काकूंनां “ईंग्लिश विंग्लिश” हा सिनेमा पहायला नक्की घेऊन जा काका.

  • महेंद्र says:

   सिद्धार्थ,
   पहातो रवीवारी जमलं तर. बर्फी मधले चार्ली चॅपलिनचे सिन्स सारखे आठवत होते पहातांना.
   मनमोहनाच्या मुकेपणामुळे समस्त जनता डोळ्यातून पाणी काढते आहेच. पण काय करणार ?

 3. धन्यवाद काका!

 4. Anagha says:

  हेन्री चे १९३८ चे कार्टून पहातो ,तेंव्हा पण हलकेच हसू येते.. आणि हेच या कार्टुन चे यश……. 🙂

  एक छोटा बदल रणवीर म्हणजे तो जो “बॅंड बाजा बारात” वाला आणि रणबीर बर्फी वाला कपूर कुलोत्पन्न.

  • महेंद्र says:

   अनघा,
   तसाही मी या बाबतीत थोडा कच्चा लिंबूच आहे. दुरुस्त करतो लवकरच.. 🙂

 5. tivtiv says:

  बर्फी अर्धा पाहिला. उरलेला पहायचा आहे. त्यामुळे कथा अजून कळलेली नाही. प्रियांकाचा अभिनय खूप आवडला. ‘कोशिश’ पण पहायचा आहे. पूष्पकही असाच एक मूक चित्रपट. खूप वर्षापूर्वी पाहिला होता आणि आवडला होता. आता कथा नीटशी आठवत नाही.
  ‘चार्ली चॅप्लिन’ माझे एकदम आवडते. चार्ली चॅप्लिन ऑनलाइन एपिसोड्स कुठे पहायला मिळतील.

 6. vyavasthit preekShan karun aamhaalaa kaLaville aabhaar.

  • sarika says:

   Barfi pahayala jayacha tharvala hota..pan velich savadh kelat tyabaddal dhans kaka..
   Baki post nehamisarkhich …kay vatel te sangnari..:-):-)

   • महेंद्र says:

    सारिका
    तसं तर गणॆश मतकरी ( आपला सिनेमास्कोप वाले) त्यांनी पण सावध केले होते. चार स्टार असलेला सिनेमा आवडला नाही असे उघडपणे म्हणणारे ते एकच असू शकतात, पण तरीही मी पाहिलाच की नाही? बऱ्याच गोष्टी आपल्या हाती नसतात…..

  • महेंद्र says:

   काका,
   प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार. तुमची प्रतिक्रिया आली की खूप छान वाटतं.. 🙂

 7. ajay says:

  pantpradhan manmohansingha varachi comment agdich porkat aahe.

  • अजय
   ब्लॉग वर स्वागत.
   शक्य आहे,कारण मी बरेचदा पोरकट सारखा वागतो असं आमच्या घरातील 🙂 “काही” लोकांचे म्हणणे आहे 🙂 प्रतिक्रियेसाठी आभार.

 8. Tanvi says:

  मी नाही केलेली महेंद्रजी हा सिनेमा पहायची हिंमत… प्रियांका मला कशीही सहन होत नाही…. आणि अमितला पहायला जायचं होतं हा सिनेमा पण >>माझ्या इच्छेविरुद्ध न वागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 🙂 🙂
  बाकि कोशिशबाबतचे मत अगदी पटले.
  मनमोहनसिंगांबद्दल तर षटकार 🙂

  • तन्वी
   🙂 मला पण प्रियांका आवडत नाही, पण या खेपेस तिने उत्कृष्ट अभिनय केला आहे.
   कोशीश मला पण खूप आवडला होता. 🙂 एकेकाळचा गाजलेला चित्रपट.

 9. मला बर्फी फक्त प्रियांकासाठी आवडला. हेन्री कलेक्शन जबरी आहे, मला नव्हते जास्त माहित त्याच्याबद्दल. धम्माल आहेत.

  अवांतर – मनमोहनसिंगबद्दल बोलायचं झालं तर ………!!!

  🙂 🙂

  • सुहास
   हेन्री हे कार्टून वेगवेगळ्या चार लोकांनी १९३४ ते २००५ या काळात काढले. सगळ्य़ंचीच कार्टून्स कार्ल अ‍ॅंडरस्न च्या बरोबरीची होती.

 10. gouri0512 says:

  काका, हेन्री मस्तंय. मनमोहन आणि ताकद हे दोन शब्द एका वाक्यात म्हणजे काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय 🙂

  • महेंद्र says:

   धर्मयुग नावाचे एक हिंदी साप्ताहिक होते त्या मधे याचं नाव गुणाकर असायचं. मस्त कॅरेक्टर आहे.
   मनमोहन आणि ताकद…. 😀

 11. Pankaj Z says:

  😀 शेवटचे वाक्य वाचून फुटलो मी.

 12. zulukps says:

  हा लेख म्हणजे मुक पणे केलेल्या अभिनयातील ताकद जाणवली म्हणून लिहिलाय. काय विश्वास नाही बसत का या वाक्यावर?मनमोहनसिंग कडे पहा एकदा- बसेल विश्वास!
  😀

  • महेंद्र says:

   अख्ख्या भारताला हलवून सोडलंय मुक्याने. गॅस, डिझल, काय वाटेल ते निर्णय घेतले सरदारने..

 13. zulukps says:

  हा लेख म्हणजे मुक पणे केलेल्या अभिनयातील ताकद जाणवली म्हणून लिहिलाय. काय विश्वास नाही बसत का या वाक्यावर?मनमोहनसिंग कडे पहा एकदा- बसेल विश्वास!

 14. suhas adhav says:

  barfee me pan pahila ….. avaddla mala
  no doubt movie madhye abhinay far chan hota doghancha hi ….full entertainment
  pan Oscar chya level cha vatla nahi ….
  pan last la je mention kelat te agdi patla …agdi supper-like tyachya sathi…

  pan kharach manmohan singh ajabach aahe …kasa kay koni etka gap basu shakta 😛
  tehi aapla prime ministers aasa 😛

  • सुहास
   मनमोहन सिंगांना बरोबर समजतं की मौनम सर्वार्थ साधनम… मौना मुळेच ते सारखे कुठल्याही प्रसंगातून तरून जातात, आणि युवराज अडकतात.. 🙂

 15. तो इतक्या ठिकाणाहून कॉपी केलेला आहे हे वाचल्यापासून इच्छाच मेली बघायची.

  • ्हेरंब,
   ते तर आहेच. पुन्हा एडीटींग खूप वाईट केलेले आहे, अजिबात काही लिंक लागत नाही..

 16. anuvina says:

  संजीव कुमार आणि जया भादुरी यांच्या सारख्या कसलेल्या कलाकारांचा “कोशिश” हे वेगळेच रसायन होते. मी बर्फी बघितला. सध्याच्या प्रसवलेल्या इतर सगळ्या चित्रपटात जरा उजवा आणि वेगळा असंच म्हणता येईल. अगदी असंच त्या डॉन किंवा अग्निपथ च्या रिमेक बद्दल झालं होतं. ज्यांनी जुने चित्रपट पहिले आहेत त्यांना हे नवीन रूप नाही आवडलं.
  राहता राहिला मनमोहनसिंगांचा मुकाभिनय …. आजकल वरून आदेश आल्याशिवाय मुका पण घेऊ शकत नाहीत असं ऐकलंय. आणि तुम्ही चक्क म्हणताय अख्ख्या भारताला हलवून सोडलंय मुक्याने. गॅस, डिझल, काय वाटेल ते निर्णय घेतले सरदारने.. 😉

  • बर्फी मधे अभिनय निश्चितच चांगला केला आहे, पण मूळ स्त्रोत आधीच सगळीकडे प्रसिद्ध झाल्याने सिनेमा पहातांना चोरी जाणवत होती.
   ज्याने जूने सिनेमे पाहिले आहेत, त्याला नवीन नक्कीच फारसे आवडणार नाहीत:)

 17. anuvina says:

  कोशिश मध्ये एक सीन आहे जो मला प्रचंड आवडतो. त्या सीन मध्ये संजीव कुमार आणि जया भादुरी यांनी जो अभिनय केलाय त्याला तोड नाही. दोघेही मुकबधीर. स्वतःच्या मुलाला खुळखुळा वाजवून दाखवत असतात. पण मुल त्या कडे लक्षच देत नाही. त्यांना वाटते की आपले मुल देखील आपल्या सारखेच मुकबधीर आहे की काय? ही भावना त्यांनी त्यांच्या चेहेर्यातील हावभावावरून अप्रतिम वठवली आहे. आणि नंतर जेंव्हा कळतं की तो खुळखुळा रिकामा आहे त्यात वाजण्यासाठी खडेच नाहीत. आणि जेंव्हा खडे टाकून ते परत खुळखुळा वाजवतात आणि त्यांचे मुल त्या आवाजाच्या दिशेने बघतं तेंव्हा त्यांच्या चेहेऱ्यावर जो आनंद दिसतो तो अभिनय निव्वळ लाजवाब. असे कलाकार नेहेमी होत नाहीत.

  • कोशीश सगळाच सिनेमा मस्त आहे. आपलं नाव सांगतांना पायावर हिरवी मिरची ठेऊन हरीचरण नाव सांगतो तो प्रसंग.. सगळेच मस्त आहेत.
   मला खूप आवडला होता .

 18. SURAJ MOHITE says:

  सर, मला काही भाषणांच्या, (motivational )लिंक हव्या आहेत.
  thank you , sir .

  • सूरज
   याच ब्लॉग वर अविनाश धर्माधिकारी यांच्यावर एक पोस्ट लिहिले आहे त्या पोस्ट मधे बऱ्याच लिंक्स आहेत.

  • महेंद्र says:

   ही लिंक आहे पहा.. http://wp.me/q3x8 या पोस्टच्या कॉमेंट मधे ऑडिओ फाइल्स ची लिंक आहे दिलेली.

 19. guru says:

  काका हेन्री पाहुन लहानपण आठवलं!!!! हितवाद लावला होता बाबांनी आमच्या “फ़्लुएंसी” साठी तेव्हा दर शनिवारी अकरा वाजता शाळेतनं आले की टाय़ “रॅंबो सारखा” डोईला गुंडाळुन भिंतीला पाय लाऊन हेन्री वाचत खदाखद हसल्याचे स्मरते!!!!!…… बाकी रणबीर चा अभिनय आवडला…. अन आम्ही “इल्यानातच” पिक्चर चा पैसा वसुल केला हे वेगळे सांगणे नलगे!!!! 😀 😀 😀 😀

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s